दिल्लीकरांचे प्रायवेट न्यूज चंनेल्स................ (भाग - २)

मंगेशपावसकर's picture
मंगेशपावसकर in कलादालन
26 Feb 2010 - 11:25 am

नमस्कार मित्रानो,

सर्वप्रथम आपणास सांगू इच्छितो कि कृपया या लेखा कडे अर्थपूर्ण (प्रक्टीकल) कटाक्ष टाकावा
व नंतर आपला अभिप्राय कळवावा.

दिल्लीकरांचे हिंदी न्यूज चंनेल्स स्वत;ची मनमानी करत हवी ती टिप्पणी करतात.
मला माहित आहे कि वाचकांना उदाहरण अपेक्षित आहे. खालील निदर्शनास आणलेल्या बातम्याकडे ह्यांचे साफ त्यांना सोयीस्कर दुर्लक्ष असते.

१. उदा. रेल्वे अर्थसंकल्प, फक्त बिहार ते मुंबई व पुणे , यु.पी. ते मुंबई व पुणे , गोवाहाटी ते मुंबई व पुणे(कर्म भूमी एक्स्प्रेस परवाच लौंच झाली ), हे दिल्लीकर न्यूज चांनेल ह्या सर्व बातम्या फारच चवीने दाखवीत होते. पण मुंबई ची उपेक्षा उदा. लोकल ट्रेन्स, सेन्ट्रल, वेस्टर्न. ह्या टी आर पी ची आशा नसलेल्या बातम्या दाखवणे ह्यांच्या जीवावर येते.

२. मुंबईकर जो सर्वाधिक कर वा रेवेन्यु मिळवून देतो. त्या साठी कधीहि कुठली बातमी जी त्याला सुखावेल हे दाखवण्याची तसदी घेत नाहीत.

३. इकडे लौन्ढे भरवून पाण्याची, विजेची, वानवा किंवा लोकल मधील गर्दी वाढवण्याचे प्रकाराबद्दल कोणी आपले मुस्काट उघडत नाही.

४. मुंबई आहे मुळी सगळ्यांची पण एवढ्याशा मुंबई मध्ये संपूर्ण भारत वर्ष घुसावाल का? असा खडा सवाल हि जनविरोधात जाण्याचा भीतीने कुणी करत नाही.

५. मुंबई बद्दल कोणत्या नेत्यांनी तोंड उघडले तर त्यांची मुस्कटदाबी होते. ह्यांचा एकाच परवलीचा शब्द " फिर ### ने उगला जहर "

६. मुंबई वर झालेल्या ताज वरील हल्ल्यामध्ये मुंबई पोलीस हि शहीद झाले होते पण ह्यांचे आपले एकच " बिहारी दिल्लीकरांनी मुंबई वाचवली "

७. वेंगसरकर क्रिकेट चयन समिती चे अध्यक्ष असताना त्यांचावर मराठी लौबीचा आरोप ह्याच करंट्यांनी ठेवला.

८. बांद्रा -वरळी सी लिंक ला वीर सावरकर उड्डाणपूल नाव देण्या ऐवजी राजीव गांधी मार्ग देण्याचा पक्षपातीपणा ह्या लोकांनीच केला

९. मुंबईकरांच्या, महाराष्ट्रीयांचा हक्कांबद्दल त्यांच्या असुविधेबद्दल शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल कधी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला नाही.

१०. कधी मराठी चित्रपट प्रोमोट करण्याचे कष्ट हि मंडळी घेत नसतात. पण हिंदी वा भोजपुरी चित्रपटांची धुमधडाक्यात जाहिरातबाजी चालू असते

११. दिल्लीच्या सी एम शीला दीक्षित ह्यांनी स्वत; बिहारी व यु .पी मंडळी च्या वाढत्या लौढयान बद्दल आक्षेप घेतला होता. पण ह्या तेज न्यूज चानेल्स ने त्यांचे काय केले हे आपणास सांगण्याची आवश्यकता नाहीच

१२. आसाम , सिक्कीम व तामिळनाडू व केरळ मध्ये झालेल्या बिहारी व उत्तर प्रदेशीय नागरिकांवर झालेल्या हल्ल्याबद्दल कोणी हि बोलण्यास तयार नाही

१३. सर्वात महत्वाची गोष्ट आजच्या बातमी नुसार भारत -पाक सचिव स्तरीय भेटी मध्ये पाकिस्तानने भारताच्या सर्व मागण्या अमान्य केल्या व भारतास आपल्या विफलतेचे खापर पाकिस्तानवर फोडू नये असे बजावले.
ह्या इंडो-पाक अमन कि आशा ह्या प्रोग्राम ला देखील ह्याच लोकांनी मांडीवर बसवले.

माझ्या मते पत्रकारितेस फक्त बातम्या देण्याचा हक्क वजा जवाबदारी आहे. आमचे (नागरिकांचे ) हे समजण्याचे काम आम्हा वरच सोडावे. चांगले काय वाईट काय ते आम्हास कळते.
आपले टोमणे, आपला मसाला टाकून आपली मनमानी करणाऱ्या हे आईतखाऊ आपल्याच टी आर पी च्या भिके वर जगतात. कपटनीती करून स्वतः टी आर पी. हास्य कार्यक्रम, आय पी एल, इकड तिकड च्या निरर्थक गप्पा मारून मार्केट मध्ये टिकून राहणे. हा धन्धाच या हलकट माणसांनी मांडला आहे .
कधी तरी सह्याद्री दूरदर्शन च्या बातम्या पाहून बघा किंवा बी बी सी न्यूज पहा त्यात कधीच असला आतेताईपणा दाखवला जात नाही.

त्यांचे काम फक्त एकच आपला एकही शब्द जास्त न टाकता सत्य परिस्थिती लोकांसमोर आणणे, "सबसे तेज" बनण्याचा जीवघेण्या शर्यतीत आपली नैतिक मुल्ये गमावलेल्या अशा झपाटलेल्या पिसाटांना आत्मपरीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे.

मंगेश पावसकर

mgccmangeshpaw@gmail.com

वावर

प्रतिक्रिया

नील_गंधार's picture

26 Feb 2010 - 12:00 pm | नील_गंधार

लेखाशी व लेखकाच्या भावनांशी पुर्णतः सहमत.

सविस्तर प्रतिसाद सवडीने.

नील.

अनामिका's picture

26 Feb 2010 - 3:08 pm | अनामिका

मंगेश !

नका स्वतःला वृथा त्रास करुन घेऊ... हिंदी माध्यमांनी आता महाराष्ट्राला व पर्यायाने मराठी माणसाला फक्त देशद्रोही व अतिरेकी घोषित करण्याचेच शिल्लक ठेवले आहे......पण याच प्रकारच्या सवंग व उथळ पत्रकारितेत आणि वृत्तांकन करण्यात धन्यता मानणार्‍या काही महाराष्ट्रातील स्वतःला मराठी म्हणवणार्‍या वृत्तवाहिन्या देखिल आघाडीवर आहेत्...अर्थात त्याला त्यांचा काही इलाज नाही....कारण शेवटि त्या बिचार्‍यांचे मालक तिथे दिल्लीतच बसले आहेत.....तत्वासाठी अथवा स्वाभिमानासाठी मराठी म्हणवणारे स्वतःच्या पोटावर पाय कसा येऊ देतील?
फार फार तर तुमचे हे लेखन मनसे अध्यक्षांपर्यंत पोहोचवता येत का ते बघा.....कारण सध्या फक्त तेच मराठी आणि महाराष्ट्रासाठी लढत आहेत( :? )...दिल्लीश्वरांना जाब विचारण्याची आणि फाट्यावर मारण्याची धमक फक्त आणि फक्त त्यांच्यातच आहे...बाकी कुणामधे दम नाही... 8>
आणि म्हणतात ना "मारणार्‍याचा हात धरता येतो बोलणार्‍याचे तोंड नाही"
पण आताशा ती देखिल सोय राहिली नाही .कारण हल्ली कुणी राहुलबाबासारखा टिनपाट येतो आणि मराठी माणसाला टपली मारुन जातो....आणि मग हा सगळा स्टंट आधिच ठरलेला असल्याची माहिती मिळाली (वा हेतुपुरस्सर दिली गेली)असल्याने व आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या एका पक्षाची आयती फजीती कशी होते हे बघण्यासाठी म्हणुन आंम्ही ती टपली देखिल खाऊन मराठी माणसाचा अपमान उघड्या डोळ्यांनी पहात बसतो.केवळ स्वतःची खुंटी बळकट करण्यासाठी.
अवांतर-लवकरच मनसे स्वतःची वैयक्तिक महाराष्ट्राला व मराठीला वाहिलेली वाहिनी सुरु करणार असे ऐकुन आहोत..
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

प्रशु's picture

27 Feb 2010 - 12:13 am | प्रशु

मुळ धागाचा विषय हा दिल्लीपतींच्या महाराष्ट्रावर असलेल्या द्वेषा बद्द्ल आहे. त्यात राज ठाकरेंना खेचण्याचे काहिच कारण नाही. विषेशतः आपण ठळक केलेल्या वाक्यांचा हेतु आणि टाकलेली व्यंग चित्रे आपला राज वरचा रागच अधिरेखित करतात... (बहुतेक आपण राज मुळे बेकार झालेल्या कार्याध्यक्शांच्या हितचिंतक आहात...)

मंगेशपावसकर's picture

27 Feb 2010 - 2:01 am | मंगेशपावसकर

आपले धन्यवाद

राधेय's picture

28 Feb 2010 - 3:55 pm | राधेय

लेखकाच्या मताशी पुर्ण सहमत........

अविनाशकुलकर्णी's picture

28 Feb 2010 - 7:18 pm | अविनाशकुलकर्णी

संताप आवरत नाहि....काय पाप केले आहे मराठी माणसानी देव जाणे

Pankaj९४३२'s picture

25 Mar 2010 - 8:02 pm | Pankaj९४३२

हिंदी न्यूज़ चॅनेल वाल्यांच्या बातम्या म्हणजे मूर्खपणाचा कळस असतो...ते कधी काय सांगतिल आणि कुणाचा संबंध कोणाशी लावतील ह्याचा नेम नाही......खालील उदाहरणच घ्या ........
१) प्रत्येक हिंदी न्यूज़ चॅनेल वर एका वेळी सेम बातमी असते तरी पण त्यांच्या मते ती एक्सक्लूसिव्ली त्यांच्याच चॅनेल वर दाखवली जाते....
२) सचिन तेंडुलकर च्या दुखपतिच्या बातमीतील वीडियो मधे हे सचिन च्या तोंडावर गोल काढतात किंवा बाण दाखवून हा सचिन आहे असे सुचवितात....
३) महाराष्ट्रात परप्रांतीयांना झालेल्या मारहाणीची बातमी आठवडाभर.....आणि झारखंड मधे मराठी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीची बातमीच नाही....
४) प्रत्येक चॅनेल ने १ क्रिकेटर आणि १ बाबा पाळलेला असतो....जे स्वतः किती मूर्ख आहेत ह्याची माहिती देत असतात...
५) कुठल्यातरी फटकळ अवॉर्ड शो मधे मिळालेल्या अवॉर्ड च्या जोरावर हे लोक आपला चॅनेल हा देशातील सर्वात श्रेष्ठ चॅनेल आहे अश्या बोंबा मारत असतात.....

एक सूचना मराठी न्यूज़ चॅनेल साठी पण:

आगळे वागळे कपडे घालून दाढी मिश्या वाढवून हाताने रोबाटिक डान्स करणार्‍या न्यूज़ आंकर ने जरा आरडा ओरड कमी केले तर बर होईल....बातम्या चांगल्या असतात पण तुमच्या आरडाओरडी मुळे लोकांना त्रास होतो ( मग लोकांच मत तुम्हाला कळत नाही अस वाटत)...