कोडी पचडी - चिकनचे लोणचे

विंजिनेर's picture
विंजिनेर in पाककृती
20 Feb 2010 - 4:01 pm

ही आंध्रदेशीय पाककृती अनेक वेळा करून - "ट्राईड अँड टेस्टेड" अशी आहे.
अनेक पायर्‍या असल्यामुळे कदाचित किचकट आणि वेळखाऊ वाटण्याची शक्यता आहे पण जर त्या पायर्‍या जशाच्या तशा करत गेलात तर निकाल हमखास बरोबर येणार हे नक्की(न झाल्यास पैसे परत :) ).
अजून एक म्हणजे हा पदार्थ एखादी निवांत दुपार हाताशी असेल तरच करा. घाई-घाईत केल्यास/पायर्‍या गाळल्यास चव हमखास बिघडेल.

कच्चा माल :
चिकन १ किलो हाडांसकट - बोटभर तुकडे करून
४ टेबलस्पून तेल
१ १/२ टेबलस्पून तिखट
१/२ टेबलस्पून हळद
१ १/२ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
३ लिंबांचा रस - २/३ मिनिटे गरम करून थंड केलेला.
मिठ - चवीनुसार

मसाला
३ टेबलस्पून धणे
१ टेबलस्पून जिरं
१ १/२ टेबलस्पून मेथी बी (मेथ्या?)
१ टेबलस्पून खसखस
२ इंच दालचिनी तुकडा
५ लवंगा
१ चक्रीफूल
१ वेलदोडा

फोडणीचे साहित्य
पाऊण कप तेल
दोन चिमूट मेथ्या
१२-१५ पाकळ्या लसूण - साधारण ठेचून
२०-२५ कढीलिंबाची पाने
३-४ लाल मिरच्या

कृती
१. जड बुडाच्या कढईत मंद आचेवर मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे २-४ मिनिटे कोरडे भाजून(तेलाशिवाय) घ्यावेत. सुंदर सुवास सुटला पाहिजे पण पदार्थ करपता कामा नये.
भाजल्या नंतर कढईतून बाजूला काढून थंड करावे. मग वस्त्रगाळ दळून घ्यावेत.

२. ४ टे. स्पू. तेल त्याच कढईत गरम करावे. त्यात आलं-लसूण पेस्ट, चिकन, तिखट, हळद आणि मिठ घालून चांगले मोठ्या आचेवर ५ मि. परतून घ्यावे. आच कमी करून मध्यम आचेवर चिकन पूर्ण शिजू द्यावे (म्हणजे पाणी संपून तेल सुटले पाहिजे). ह्याला पायरीला एकूण साधारण २०-२५ मिनिटे लागतात.

३. दुसर्‍या जड बुडाच्या भांड्यात पाऊण कप तेल गरम करा. त्यात कढिलिंब, लसूण पाकळ्या, मिरच्या आणि मेथ्या मिनिटभर परता. नंतर शिजवलेले चिकनचे तुकडे, उरलेली ग्रेव्ही असं सगळं एकत्र करा आणि १५ मि. मध्यम आचेवर शिजवा.
४. गॅस लहान करून (तापवून थंड केलेला) लिंबाचा रस घाला. व्यवस्थित हलवून घ्या. गॅस बंद करा. चिकन थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रिज मधे ठेवा.

वि.सू: १. लिंबाचा रस तापवुन थंड करणे अतिशय महत्वाचे आहे.
२. फ्रिज शिवाय बाहेर लोणचं ठेवायचे असेल तर ३र्‍या पायरीत तेल थोडं जास्त(म्हणजे बरणीत काढून ठेवल्यावर लोणच्यावर दोन बोटं तेलाचा थर राहिल इतपत.) वापरा. हे लोणचं फ्रिज मधे २०-२५ दिवस सहज टिकतं. मी बाहेर ठेवून बघितलं नाही (किंबहूना उरलंच नाहीये :D )
३. दुसर्‍या पायरीत २०-२५ मि. शिजवलेलं चिकन काही लोकांना रबरी वाटेल. तसं असेल तर ५ मिनिटे कमी शिजवलं तरी चालेल.

हे लोणचं दही-भात, डोसा, पोळीबरोबर अफलातून लागतं.

प्रतिक्रिया

सुनील's picture

20 Feb 2010 - 5:10 pm | सुनील

हा प्रकार खाल्ला होता. आवडला होता. इथे पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गणपा's picture

20 Feb 2010 - 5:33 pm | गणपा

वाह विंजिनेरसाहेब ,
एकदम झंटॅमॅटिक पाकृ. =P~
आम्ही चिकनचे सर्व अपराध उदार मनाने (त्यांच्या सकट)उदरात घेतो.

संजा's picture

20 Feb 2010 - 6:28 pm | संजा

याच प्रमाणे मटन लोणचे सुध्दा बनविता येईल काय ?

संजा

विंजिनेर's picture

22 Feb 2010 - 3:19 pm | विंजिनेर

मी कधी केलं नाहिये. आपण कराल तर जरूर इथे सांगा :)

विसोबा खेचर's picture

20 Feb 2010 - 6:50 pm | विसोबा खेचर

क्लास!

तात्या.

शुचि's picture

20 Feb 2010 - 7:05 pm | शुचि

चांगलं वाटतय .....
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

स्वाती२'s picture

20 Feb 2010 - 8:07 pm | स्वाती२

मस्त पाकृ! नक्की करणार.

खादाड's picture

22 Feb 2010 - 1:50 pm | खादाड

दिसत तर छानच आहे ! किती दिवस टिकत साधारणपणे ? :?

विंजिनेर's picture

22 Feb 2010 - 3:23 pm | विंजिनेर

सर्व खवैय्या वाचकांचे आभार.
@खादाड - विसु. #१ मधे टिकावू पणा दिलाय की - २०-२५ दिवस. स्वाणुभव विचाराल तर १० दिवसांपेक्षा जास्त उरत नाही (गडकरींच्या भाषेत लोणच्याची "चटणी होते" ):)

बेसनलाडू's picture

23 Feb 2010 - 4:57 am | बेसनलाडू

मटण,कोलंबी यांचीही लोणची थोड्याफार फरकाने अशीच करतात,असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
(खवय्या)बेसनलाडू

नंदन's picture

23 Feb 2010 - 11:23 am | नंदन

झकास!

>>> हे लोणचं दही-भात, डोसा, पोळीबरोबर अफलातून लागतं.
--- सहमत आहे. बेला म्हणतो त्याप्रमाणे आंध्र पद्धतीचं कोलंबीचं लोणचंही अतिशय रुचकर.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

तुषार काळभोर's picture

31 Oct 2017 - 9:34 pm | तुषार काळभोर

याचिसाठी केला होता अट्टाहास
येता ऐतवार झक्कास व्हावा!!

मस्त आहे. मी देखील हीच पाकृ वापरतो हे करताना..मुरल्यावर अप्रतिम लागत हे लोणचं!

खादाड's picture

2 Nov 2017 - 11:10 pm | खादाड
खादाड's picture

2 Nov 2017 - 11:10 pm | खादाड
खादाड's picture

2 Nov 2017 - 11:10 pm | खादाड
खादाड's picture

2 Nov 2017 - 11:11 pm | खादाड

कढीपत्त्याची पानं म्हणायचं आहे का ?