मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-१

सुनिल डोईफोडे's picture
सुनिल डोईफोडे in जनातलं, मनातलं
13 Mar 2008 - 3:03 pm

बायकोसोबत मार्केटिंगला जाणं म्हणजे एक सुखद अनुभव असतो... म्हणजे आपापल्या बायकोसोबत. ही गोष्ट कोणीही नाकारु शकणार नाही विशेशत: जर त्यांच्या बायकांसमोर विचारलं तर...

मी आणि माझी पत्नी एकदा मार्केटिंगसाठी गेलो होतो. जसंकी नेहमी होतं ती पुढे चालत होती आणि मी आपला मागे मागे... काही घेण्यासारखं आहेका ते बघत होतो. एका दुकानावर लावलेल्या एका जाहिरातीने माझं लक्ष आकर्षित केलं.

लिहिलं होतं, " लसून शिलण्याचं यंत्र .... फक्त दहा रुपए'. "यंत्र' या शब्दाने माझी उत्सुकता चाळवली गेली ... तसे तर आजकल कोणत्याही गोष्टीचे यंत्र मिळतात ... मी दुकानदाराजवळ गेलो... त्याला मी ते "यंत्र' दाखवायला सांगितलं... पाहतो तर एक 6 इंच लांब आणि 3 इंच परिघ असलेली ती एक रबराची ट्यूब होती. मी ती उलटून पुलटून पाहू लागलो... खरं म्हणजे मी ते यंत्र सुरु करण्याचं बटन शोधत होतो.

"काय मुर्ख माणूस आहे ... ' या अविर्भावात पाहत त्या दुकानदाराने ती ट्यूब माझ्या हातातून हिसकून घेतली आणि तो दुकानदार त्या यंत्राचं प्रात्याक्षिक मला दाखवू लागला. त्याने एक लसुन ट्यूबमध्ये घातला आणि तो त्या ट्यूबला जोरजोराने रगडायला लागला. जर इतक्या जोरात रगडलं तर सालं तो लसून शिलायच्या ऐवजी आपले हातच शिलल्या जायचे. आणि इतक्या जोरात ती ट्यूब रगडण्याच्या ऐवजी जर सरळ तो लसूनच रगडला तर इतक्या वेळात कमीत कमी अर्धा किलो लसून शिलल्या जायचा. आता "काय मुर्ख माणूस आहे ......' या अविर्भावात पाहण्याची माझी पाळी होती.

ऐवढ्यात " अहो बघा तर ... कानातले झुमके ... कसे वाटतात ' बाजूच्याच दूकानातून माझी पत्नी म्हणाली. मी तिथे गेलो. मी आता थोडा सतर्क झालो होतो कारण आता त्या दुकानदाराच्या मार्केटिंग स्कीलच्या ऐवजी माझ्या मार्केटिंग स्कीलची खरी कसोटी होती. मी त्या दुकानदाराला किंमत विचारली.

" दोनशे रुपए ... तुम्ही आहे म्हणून दिडशेत देवू ' तो म्हणाला.

" तुम्ही आहे म्हणून ...' मी त्याच्याकडे निरखुन बघितले. मी त्याला ओळखत नव्हतो. कदाचीत तो मला ओळखत असावा....

त्याने माझ्या मनातलं व्दंद्व जाणलं असावं.

" मागच्या वेळीसुध्दा मी तुमच्याकडून जास्त पैसे घेतले नव्हते. ' त्याने म्हटले.

तो मला किती ओळखतो हे मला समजले होते - कारण मी पहिल्यांदाच त्याच्या दुकानात जात होतो.

पण त्याने ती गोष्ट इतक्या आत्मविश्वासाने सांगीतली की त्याला काही म्हणण्याच्या ऐवजी मीच आपल्या मनाची समजूत घातली की कदाचीत चूकीने तो आपल्याला दूसरंच कुणीतरी समजत असावा. तशी ते झुमके विकत घेण्याची माझी बिलकूल इच्छा नव्हती. आतापर्यंतच्या अनुभवातून मी माझ्या पत्नीची मानसीकता चांगल्या तऱ्हेने समजून चूकलो होतो. मी जर झुमक्यांना खराब म्हटले तर ती ते नक्की घेणार. म्हणून मी म्हटले " खुप चांगले आहेत... तुला शोभून दिसतील'

" ठीक आहे ... माझ्या बहिणीसाठीसुद्धा एक जोडी पॅक करुन द्या' तीने मला पैसे देण्याचा इशारा करीत दुकानदाराला म्हटले.

आता करण्यासारखं काही शिल्लक राहालं नव्हतं. चुपचाप पैसे काढून मी त्या दुकानदाराच्या हातावर ठेवले. कदाचित माझ्या पत्नीची मानसिकता ओळखण्यात मी उशीर लावला होता. तिची मानसीकता ओळखण्याच्या आधी तिनेच माझी मानसीकता ओळखली होती.

... क्रमश:...

पुढील भाग http://marathionlinenovel.blogspot.com या संकेतस्थळावर उपलब्ध

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

13 Mar 2008 - 4:33 pm | स्वाती राजेश

सुरवात मस्त झाली आहे.
जसंकी नेहमी होतं ती पुढे चालत होती आणि मी आपला मागे मागे...
ही गोष्ट बहूतेक ठिकाणी सारखीच असते...

पण आमच्या कडे उलट आहे. माझा नवरा पुढे पुढे असतो कारण्......कुठे सेल लागला आहे हे पाहण्यासाठी...
तो रस्ता टाळण्यासाठी....तो रस्ता टाळत माझ्याबरोबर सगळीकडे येतो...आहे नां गंमत?

पहिला भाग मस्तच!!!!!!!!!!
पुढील भागाच्या प्रति़क्षेत.....

तात्या विन्चू's picture

13 Mar 2008 - 4:49 pm | तात्या विन्चू

तिची मानसीकता ओळखण्याच्या आधी तिनेच माझी मानसीकता ओळखली होती.
याच साठी दर वेळेस नव्या युक्त्या तयार असायला हव्यात. :)

मार्केटिंग पेक्शा शॉपींग हा शब्द जास्त चपखल वाटतो....किन्वा आपला 'खरेदी' ही चालेल.

आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू

मीनल's picture

13 Mar 2008 - 6:54 pm | मीनल

नव-यासोबत मार्केटिंगला जाणं म्हणजे एक दु:खद अनुभव असतो...

मी:अरे हा ड्रेस कसा वाटतोय?
तो:ठिक आहे.पण जरा लहान साईज वाटत आहे ना ह्याचा?तुला होईल का?

मी डाय टिंग करण्याचा दृढ निश्चय करते ते तेव्हाच!

मी:बर. मग हा कसा आहे?
तो:रंग जरा डार्क आहे.तु जराशी , नाही म्हणजे अगदी जराशीच ग ,गोरी असतीस तर छान खुलला असता तो . तु जरासा लाईट कलर पहा ना.

मी `फेअर नेस क्रिम ` शॉपींग यादीत लिहिते ते तेव्हाच!

त्याला तसं कमीच कळत ,विशेषतः कपड्यातलं ,अस माझ ठाम मत आहे .
पण मला मख्यतः बघणारा तो आणि पैसे पुरवणाराही तोच.
मग काय .झक्कत कन्सल्ट करावे लागते.लाजेकजेस्तोवर विचारलेले बरे!

मी इकडून तिकडे मला `सुटेबल` असा ड्रेस बघत फिरत राह्ते .
आणि मी हा ड्रेस? की तो ? विचारत राहते.
तो ही फिरतो राहतो इकडून तिकडे.

मग ----
मी मुद्दामच डार्क लाल ,हिरव्या ,पिवळ्या रंगाचा ड्रेस दाखवते.
मी:हा बरा आहे नै का?
तो: हो हो हो.छानच आहे .तो फक्त तुलाच मस्त दिसेल्.घेच हा.
टॉप आहे .एकदम क्लासीक.
चला !!!!
मनासारखा मिळाला एकदाचा!
झाल ?का?
जाऊया का?
पैसे देऊन टाकतो आता?

मी समजते की माझा नवरा पुरा पकला आहे.
काढता पाय घेतलेला बरा.

पुन्हा एकटीच शॉपींगला यायचा ठरवून टाकते ते तेव्हाच.

बाप्पा's picture

10 Mar 2013 - 11:12 am | बाप्पा

क्षणभरासाठी वाटलं की आमच्या सौ नी लिहीली ही प्रतिक्रीया...

सुनिल डोईफोडे's picture

1 Apr 2008 - 12:08 pm | सुनिल डोईफोडे

वाचकांचा पुरेपुर सहभाग आणि आपले अनूभव शेअर केल्यामुळे आनंद वाटला. !
धन्यवाद!

प्रभाकर पेठकर's picture

1 Apr 2008 - 2:12 pm | प्रभाकर पेठकर

माझी बायको खरेदी मध्ये मला माझे मत विचारते आणि नेमकी माझ्या मताविरद्ध खरेदी करते. सुरुवातीला मला ह्या सर्वाचा खूप त्रास व्हायचा. जर विचारात घ्यायचेच नव्हते, तर माझे मत विचारलेच कशा करता, असा मी (मनातल्या मनात त्रागा करायचो) पण आता निर्ढावलो आहे. खरेदी लवकर उरकण्यासाठी आपले मत देणे गरजेचे आहे हे जाणून मत प्रदर्शन करतो आणि दुकानातील इतर 'माल' बघत बसतो. खरेदी लवकर आटपते.

शुचि's picture

10 Mar 2013 - 7:18 am | शुचि

हाहाहा

नितिन थत्ते's picture

10 Mar 2013 - 7:56 am | नितिन थत्ते

मला वाटलं "मार्केटिंग"विषयी काहीतरी लिहिलंय. पण उघडून पाहतो तो "शॉपिंग" विषयी लिहिलेलं दिसलं.

तुषार काळभोर's picture

10 Mar 2013 - 9:05 am | तुषार काळभोर

मलापन वाटलं की "विकण्या"विषयी लिहिलं असावं, पण हे तर "खरेदी"विषयी आहे.

त्याशिवाय ते "शिलण्याचं यंत्र" ऐवजी "सोलण्याचं यंत्र" बरं वाटलं असतं.

भाषेची सरमिसळ वगैरे ठीक आहे, पण हिंदी ने मराठीवर केलेला असा बलात्कार बघवत नाही हो! :(

आनंदी गोपाळ's picture

10 Mar 2013 - 7:23 pm | आनंदी गोपाळ

धागा मार्केटिंगसाठीच काढलेला आहे.

फकस्त, त्यांच्या ब्लॉगाचं मार्केटिंग आहे, पुढील भाग तिथे उपलब्ध होईल असे म्हटलेले दिसले.

आपल्या इर्रेझिस्टिबल लेखनशैलीमुळे पाईड पायपरच्या मागे पळत जाणार्‍या उंदरांप्रमाणे मिपावरून ब्लॉगच्या दिशेने ओघ सुरू होणार हे नक्की, हा सेल्समॅन कॉण्फिडन्स, अन अफलातून मारकेटिंग स्किल्स यांचे हृद्य मिश्रण आहे..

... क्रमश:...
पुढील भाग http://marathionlinenovel.blogspot.com या संकेतस्थळावर उपलब्ध

पाहिलंत? बॉटम लाईन म्हणतात ती हीच.

यशोधन वाळिंबे's picture

10 Mar 2013 - 11:09 pm | यशोधन वाळिंबे

@ सुनिल डोईफोडे,
हा लेख तुमचा जरी असला तरी आत्तापर्यंत पाच-पन्नास इतर ब्लॉग्स वर वाचला आहे, फेसबुक पेजेस ची ही तीच आकडेवारी..!! तुम्ही गुगल कडे कम्प्लेंट का नाही करत याचेच आश्चर्य वाटते. असो

तुमच्या शुन्य आणी इतर कादंबरया देखील वाचल्या सर्वच सरस होत्या पण परदेशी नावे मात्र खटकली.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा..!!