एखाद्याचा जातो जीव

प्रचेतस's picture
प्रचेतस in काथ्याकूट
11 Feb 2010 - 9:12 am
गाभा: 

प्रिय मिपाकरांनो,
अलीकडे आम्ही मिपावर बर्‍याच पाककृती वाचतो. त्यात मांसाहारी पाककलांचे वाढते प्रमाण बघून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर त्या मुक्या प्राण्याची आकृती उभी राहते. त्याच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, प्राण जातांना त्याने केलेली धडपड, विरोधाला न जुमानता कसायाने क्रूरपणे केलेली त्याची हत्या हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते.
तुम्ही खातांना अगदी मिटक्या मारून मारून खाता. पण तुमच्या जिभेच्या चोचल्यांपायी एखाद्याचा जीव जातो त्याचे काय?
मी काही 'शाकाहार हाच श्रेष्ठ, मांसाहार कनिष्ठ की उलट' ह्या वादात पडणार नाही. पण मनाला जे वाटते ते सांगितले. आता काय योग्य काय अयोग्य हे ज्याने त्याने ठरवावे.

मनास वाटले ते थोडक्यांत लिहून थांबतो आहे.

-
एक शाकाहारी

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

11 Feb 2010 - 9:17 am | विंजिनेर

रास्त आहे.
ह्यावर सोपा उपाय म्हणजे, पाकृ लेखकाने शिर्षकात पाकृ मांसाहारी किंवा शाकाहारी ह्याचा उल्लेख करावा
उदा: कोळंबीचे लोणचे (मांसाहारी)
तो धागा मग शाहाकार्‍यांनी उघडायचा की नाही हे त्यांना सहज ठरवता येईल :)

अमृतांजन's picture

11 Feb 2010 - 9:20 am | अमृतांजन

>>पाकृ लेखकाने शिर्षकात पाकृ मांसाहारी किंवा शाकाहारी ह्याचा उल्लेख करावा

गुडायडीया

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jul 2011 - 2:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

कोळंबीचे लोणचे, माश्यांचे कालवण, पापलेट फ्राय, कोंबडी वडा, भेजा फ्राय असे काही वाचुन प्राणी डोळ्या समोर येणार नाहीत का?

पैजारबुवा

कोंबडी वडा हा पुर्ण शाकाहारि पदार्थ आहे.यात कोंबडि पन नसते आणि वडा पण नसतो.

तुमच्या सामान्य ज्ञानाबद्दल कायमच आदर वाटत आला आहे.

हळूहळू दुणावेल याची खात्री आहे (आदराबद्दल बोलतो आहे मी, सामान्य ज्ञानाबद्दल नाही - गैरसमज नसावा)

५० फक्त's picture

17 Jun 2012 - 4:26 pm | ५० फक्त

उद्या लोकं ' कोंबडी पळाली ' हे गाणं अतिशय सात्विक आहे असं म्हणतील, हाकानाका.

मोदक's picture

17 Jun 2012 - 11:13 pm | मोदक

'कोंबडी पळाली ' हे गाणं अतिशय सात्विक आहे
'चिकनी चमेली' हे गाणं अतिशय सोज्वळ
'अनारकली डिस्को चली' हे गाणं अतिशय सपक
शीला की जवानी हे गाणं अतिशय भावूक

बलोबल ना? ;-)

सागर's picture

18 Jun 2012 - 2:23 pm | सागर

शीला की जवानी हे गाणं अतिशय भावूक

हे जरा जास्तच पटले... ;)
नक्की कुठे भावूक झालास रे मोदका तू ? शीला की जवानी बघताना (की ऐकताना) :D

बाकी वल्लीसारख्या दुर्गप्रेमीने मांसाहारासाठी होणार्‍या क्रूर हत्येबद्दल हळहळ व्यक्त केली ते एक बरे झाले.
मांसाहार या पृथ्वीतलावर कधीच बंद होऊ शकणार नाही. मानव प्रगत नव्हता (आदिमानव होता) तेव्हापासून तो मांसाहारी आहे. ;) एवढ्या युगांची सवय एकदम कशी सुटेल मित्रा ;)

सागर's picture

18 Jun 2012 - 2:49 pm | सागर

द्विरुक्तीमुळे प्रकाटाआ

गवि's picture

18 Jun 2012 - 2:47 pm | गवि

कोंकणात जाताना वाटेत चिपळूण लागेल असा रूट ठेवा आणि डीबीजे कॉलेजच्या टेकाडाच्या खाली अगदी कॉलेजच्या एंट्रीजवळ असलेलं वर्दळ हे हॉटेल गाठा.. त्यात कोंबडी वडा थाळी मागवा.. ती खचितच शाकाहारी नसते पण अस्सल खवय्याला स्वर्गीय आनंद मिळेल याची खात्री..

शेवटच्या ट्रिपेतील प्रत्यक्ष नमुना :

मोदक's picture

19 Jun 2012 - 12:03 am | मोदक

काय हे गवी.. :-(

मार्च मधल्या दापोली प्रवासाची आठवण करून दिली तुम्ही.

दापोली बाजारपेठेतल्या एका खाणावळीत बसून कोंबडी वडे, सुरमई आणि कोळंबी हाणली होती आणि पाण्याऐवजी २ / ३ ग्लास सोलकढी.

छ्य्या.. उगाच वल्लीचा धागा वर काढला.

खान्देशी's picture

11 Feb 2010 - 9:31 am | खान्देशी

सहमत!!!!!!!

मितालि's picture

11 Feb 2010 - 11:14 am | मितालि

अलीकडे आम्ही मिपावर बर्‍याच पाककृती वाचतो. त्यात शाकाहारी पाककलांचे वाढते प्रमाण बघून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर त्या मुक्या वनस्पतींची आकृती उभी राहते. त्यांच्या केविलवाण्या पानांत गोळा झालेले प्राण, प्राण जातांना त्याने केलेली धडपड, विरोधाला न जुमानता शेतकर्‍याने क्रूरपणे केलेली त्याची हत्या हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते.
तुम्ही खातांना अगदी मिटक्या मारून मारून खाता. पण तुमच्या जिभेच्या चोचल्यांपायी एखाद्याचा जीव जातो त्याचे काय?
मी काही ' मांसाहार हाच श्रेष्ठ, 'शाकाहार कनिष्ठ की उलट' ह्या वादात पडणार नाही. पण मनाला जे वाटते ते सांगितले. आता काय योग्य काय अयोग्य हे ज्याने त्याने ठरवावे.

जीवे जीवस्य जीवनम .. टेक इट ईझी....

मनास वाटले ते अवांतर लिहून थांबते आहे.

-
एक मांसाहारी

लवंगी's picture

11 Feb 2010 - 11:41 am | लवंगी

=))

टुकुल's picture

11 Feb 2010 - 1:18 pm | टुकुल

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))

--टुकुल

मराठी_माणूस's picture

15 Jul 2011 - 3:05 pm | मराठी_माणूस

वनस्पतीना नर्व्हस सिस्टीम नसते, त्यामुळे त्याना प्राण्यांसारख्या वेदना होतात का नाही ते माहीत नाही. त्यांमुळे प्राण्यांची आणि वनस्पतींची तुलना योग्य वाटत नाही.

गवि's picture

15 Jul 2011 - 3:17 pm | गवि

त्यामुळे त्याना प्राण्यांसारख्या वेदना होतात का नाही ते माहीत नाही.

हे तर जास्तच वाईट आहे.

मारताना प्राण्याला वेदना होतात. त्या होताना आणि संपल्याचे कळते. वनस्पतींमधे सेंट्रल नर्व्हस सिस्टीम नसल्याने कदाचित अगदी शिजेपर्यंत सतत वेदना होत राहात असतील आणि त्यांचे दु:खही कोणी करणार नाही..कारण वेदनेचे बाह्य दर्शन नाही.

समजा वनस्पतींना जाणीव नसती तर त्या इतर जीवांसारख्या वाढल्या असत्या/बीजे निर्माण केली असती/पुनरुत्पादन केले असते हे शक्यच नाही. केवळ त्या जाणिवा त्यांना आहेत की नाही हे माहीत नसल्याने त्या नाहीत हे गृहीत धरणे सोयीचे का?

हे सर्व मांसाहार शाकाहारापेक्षा जास्त दयाळू किंवा चांगला आहे असे म्हणण्यासाठी नसून, एकूण जीव हा घ्यावाच लागणार हे दाखवण्यासाठी आहे. व्यक्तिगत प्रेफरन्स म्हणून शाकाहार घ्यायला कोणाची काय हरकत असणार?

फक्त व्हिटॅमिन बी ट्वेल्व शाकाहारातून मिळत नाही. त्यासाठी किमान दूध अंडी घ्यावी लागतील. तेही न घेतल्यास मरणप्राय स्थिती होईल. तेव्हा व्हिटॅमिन बी ट्वेल्वची इंजेक्शने आणि गोळ्या घ्याव्या लागतील त्या नॉनव्हेज (प्राणिज) असतील.

जीवो जीवस्य जीवनम् हेच खरे..

मराठी_माणूस's picture

15 Jul 2011 - 3:46 pm | मराठी_माणूस

केवळ त्या जाणिवा त्यांना आहेत की नाही हे माहीत नसल्याने त्या नाहीत हे गृहीत धरणे सोयीचे का?

ते गृहितक कदाचीत अज्ञानावर अधारित असेल , पण ज्या गोष्टीची पुर्ण जाणीव आहे त्या बाबतीत असंवेदनशील होता येइल का , हा मुद्दा आहे.

ह्म्म. मी कितीही तात्विक वाद घातला तरी तुमच्या मुद्द्यात नकीच संपूर्ण तथ्य आहे. ते नेहमीच राहील.

त्यातलं खरं काय ते सांगू का? केवळ न समजत्या वयापासून नॉनव्हेज खातो म्हणून आता काही वाटत नाही. डिसेन्सिटाईझ होतं. हे सर्व नॉनव्हेज खाणार्‍यांच्या बाबतीत होत असावं. तरीही आपल्या प्रत्यक्ष समोर ती बकरी मारली तर त्यांनाही ती कदाचित गिळली जाणार नाही. त्यासाठी हे सर्व आडोशाला चालतं. तसेही काही जण असतात की ते स्वहस्ते मारुन खातील. पण त्यातही ती बकरी काही दिवस घरी ठेवली आणि लळा लागला तर कापू शकतील का? शंका आहे.

जे अजून खात नाहीत त्यांनी खाऊ नये. हे ठीकच.. आणि व्हेजमधेही खूप चविष्ट ऑप्शन्स असतात..

शैलेन्द्र's picture

16 Jun 2012 - 2:36 pm | शैलेन्द्र

"पण त्यातही ती बकरी काही दिवस घरी ठेवली आणि लळा लागला तर कापू शकतील का? शंका आहे."

आमच्या गावात एक गमतीदार पद्धत आहे, समजा कोंबडी मारायची असेल, आणी ती घरीच असेल तरी, जरा लांबच्या शेजार्‍याची त्याच आकाराची कोंबडी बदलुन घ्यायची (आपली द्यायची-त्याची घ्यायची), म्हणजे आमटीचा भुरका मारताना, डोळ्यांसमोर रोज अंगणात फिरणारी कोंबडी नाचत नाही..

:)

सोत्रि's picture

16 Jun 2012 - 6:23 am | सोत्रि

ते गृहितक कदाचीत अज्ञानावर अधारित असेल


डॉ. जगदीशचंद्र बोस ह्यांनी वनस्पतींना संवेदना असतात हे प्रयोगानिशी सिद्ध केले आहे. वनस्पतींच्या संवेदना सुर्यप्रकाश, तापमान, संगीत इत्यादींनी उद्दीपीत होतात ह्यावर त्यांची प्रचंड संशोधन केले होते.

- ( अन्न हे पुर्णब्रम्ह मानणारा ) सोकाजी

हो, आणि एक जगदिश्चन्द्र बोस हे झाडांशि बोलायचे असहि ऐकलय मी.

विजुभाऊ's picture

11 Feb 2010 - 11:49 am | विजुभाऊ

हे असले काही वाचले नाका की गलबलून येते.
शाकाहार केला तर वनस्पेतींची हत्या होते.
मांसाहार केला तर जीवहत्या होते
डास ढेकूण झुरळे पिसवा मारल्या तर त्यांची हत्या होते.
बॅक्टेरीया / व्हायरस यांची आपण शरीरातच हत्या करतो.
जंताच्या गोळ्या खाऊन पोटातल्या जंतांची हत्या करतो.
छे:......
हे अस्ले विचार मनात येतात आणि मग स्वतः स्वतःचे डोके खाउ लागतो
एक स्वडोकेहारी

विजुभाऊ's picture

11 Feb 2010 - 11:49 am | विजुभाऊ

हे असले काही वाचले नाका की गलबलून येते.
शाकाहार केला तर वनस्पेतींची हत्या होते.
मांसाहार केला तर जीवहत्या होते
डास ढेकूण झुरळे पिसवा मारल्या तर त्यांची हत्या होते.
बॅक्टेरीया / व्हायरस यांची आपण शरीरातच हत्या करतो.
जंताच्या गोळ्या खाऊन पोटातल्या जंतांची हत्या करतो.
छे:......
हे अस्ले विचार मनात येतात आणि मग स्वतः स्वतःचे डोके खाउ लागतो
एक स्वडोकेहारी

शिल्पा ब's picture

16 Jul 2011 - 1:51 am | शिल्पा ब

अगदी अगदी...आता तुमच्या सहीवरील चित्रच पहा ना.. एक छोटा मुलगा एका उंदराची हत्या करुन वर त्याला उलटे करुन ओढत चाललाय..आणि वर हसतोय..माझ्या तर डोळ्यात पाणी आले, गळा भरुन आला, नाक चोंदले.

स्पा's picture

15 Jul 2011 - 2:00 pm | स्पा

अगदी खरय वल्ली

हा धागा उकरुन मांसाहारी V/S शाकाहारी अशी दंगल माजवणार्‍या आतंकवादी स्पावड्याचा निषेध !!!!!!!!
(साला हल्ली लोकांना चाव चाव चावायची सवयच लागली आहे.) ;)

हा धागा उकरुन मांसाहारी V/S शाकाहारी अशी दंगल माजवणार्‍या आतंकवादी स्पावड्याचा निषेध !!!!!!!!
अंडीखाऊ, चिंबोर्‍याखाऊ स्पावड्याचा निषेध म्हणा. ;)

स्पावड्या. आत्ताच धागा वर काढण्याचे काही प्रयोजन? :)

बादवे.. मस्त असते मटण वगैरे. खावे.. रस्सा पिऊन मत दे.

अप्पा जोगळेकर's picture

16 Jul 2011 - 12:55 am | अप्पा जोगळेकर

ज्याप्रमाणे वरचेवर होणार्‍या स्फोटांकडे दुर्लक्ष करण्याची सवय झालेली आहे तशीच जर प्राण्यांची कत्तल होणारच या सत्याची सवय लावून घेतली तर मांसाहाराचा आनंद तुम्हालासुद्धा घेता येईल. प्राण्याम्ची कत्तल करणे योग्य की अयोग्य हा एक विवाद्य मुद्दा आहे.
जर अयोग्य तर वनस्पतींची कत्तल तरी का करावी ? हा प्रश्न उरतोच.
आणि जर योग्य तर मग एका माणसाने दुसर्या माणसाला मारुन तरी का खाउ नये हा प्रश्न उरतोच. शेवटी हे सगळे मनाचे खेळ आहेत. खाटकाच्या दुकानात बकरे टांगून ठेवलेले असतात आणि ते पाहण्याची आपल्याला सवय असते.
जर माणसे मारुन त्यांचे मुडदे दुकानात टांगून विकायला ठेवलेले पाहण्याची लहानपणापासून सवय असती तर तेदेखील आपल्याला क्रूर वाटले नसते. राँग टर्न हा इंग्रजी चित्रपट अशा मुडद्यांनी-मुंडक्यांनी-रक्तामांसाने भरलेला आहे. पहिल्याच सिनमध्ये एका बाईचे दोन उभे काप करण्यात येताना दाखवले आहे. पण त्या चित्रपटात अशी इतकी दॄश्ये आहेत की सुमारे तासाभरानंतर बघणार्‍याची नजर मरुन जाते आणि नंतर काहीच वाटत नाही.

स्वा. सावरकर सरळ सरळ हे जग बर्‍याच अंशी मनुष्य प्राण्यास जगण्यास प्रतिकूल आहे म्हणून ते 'मनुष्यप्राण्यास जगण्यासाठी' अनुकूल करुन घ्यावे आणि त्यासाठी अवश्य असेल ती हिंसा करावी असे म्हणत.

इंटरनेटस्नेही's picture

16 Jul 2011 - 2:40 am | इंटरनेटस्नेही

मी आता अहिंसा म्हणुन नाही; पण वजन ज्या वेगाने वढत चालले आहे ते बघता बहुदा शाकाहराकडे वळणार आहे!
वल्ली, चांगला विषय, या बाबतीत अजुन चर्चा होणे गरजेचे आहे.

आणि जर योग्य तर मग एका माणसाने दुसर्या माणसाला मारुन तरी का खाउ नये हा प्रश्न उरतोच.

'स्वतःचे अस्तित्व टिकवणे' एवढा साधा (आणि स्वार्थी) उद्देश या निषेधामागे असावा.

म्हणजे असे आहे, की मी समजा दुसर्‍या एखाद्या मनुष्यास मारून खायचे ठरवले. निसर्गतः यात काही गैर नसावे. पण मग समजा त्या मनुष्यासही मला मारून खाण्याचा विचार आला तर? मग काय होईल? जो अधिक बलशाली असेल तो दुसर्‍याला खाईल.

म्हणजे जेव्हा मी दुसर्‍या कोणा मनुष्यास खाण्याची लालसा धरून जगतो, त्याचबरोबर दुसरा कोणीतरीही मला मारून खाऊ शकतो या भीतीने आणि त्यापासून बचावाच्या तयारीने मला सतत राहिले पाहिजे.

निसर्गनियमानुसार यातही काही गैर नाही. पण यात एक सततची मानसिक कटकट आहे. जात्याच आळशी असल्याने मी ती टाळू इच्छितो. मग त्या दृष्टीने मी 'आपण समाज नावाच्या एका कळपात राहतो' या बाबीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. या कळपाची आपल्या सदस्यांना काही नियमांच्या बंधनात अडकवण्याची - आणि त्या नियमांची अंमलबजावणी करण्याची - जी ताकद आहे, ती वापरता येईल का, ते पाहतो. मग असा काही नियम बनावता येईल का, की जेणेकरून कोणी मला मारून खाऊ शकणार नाही? पण एकट्या मलाच खाऊ नये असा नियम करता येण्याइतकी काही माझी कळपात वट नाही - शेवटी मी एक मामूली सदस्य आहे. बाकीचे सदस्य म्हणतात, की तू कोण मोठा लागून गेलास, की तुलाच एकट्याला खायचे नाही? आम्ही काय घोडे मारलेय? पण 'आपल्याला कोणी खाऊ नये' असे बाकीच्या सदस्यांनाही आपापल्यापुरते वाटत असतेच. मग 'इन द कॉमन इंटरेस्ट ऑफ सोसायटी' तडजोडीचा तोडगा असा निघतो, की 'या कळपाच्या (समाजाच्या) सदस्यांपैकी कोणीच कोणालाच मारून खायचे नाही' असा आजपासून 'कडक कायदा' आहे.

यात माझे इतरांना मारून खायचे स्वातंत्र्य नष्ट होते, आणि माझी 'ती' हौस मला कायमची मारावी लागते. पण माझी कातडी तर बचावते! आणि मुख्य म्हणजे, 'दुसरा कोणीतरी मनुष्य कदाचित आज मला खाईल' या सतत भीतीखाली त्याबद्दल कायम सतर्क राहण्याची माझी रोजची कटकट वाचते.

(माझ्या कळपामध्येसुद्धा माझी जर एवढी वट असेल, की 'मी आणि माझ्या कंपूतले किंवा मर्जीतले काही खास थोडे यांनाच फक्त कोणी खायचे नाही, बाकीच्यांना खाल्ले तरी चालेल, आणि मी कोणालाही खाल्ले तरी चालेल', असा नियम करून मी त्याची अंमलबजावणी घडवून आणू शकत असेन - if I can get away with it - तर कदाचित मी तसाही नियम घडवून आणेन.)

मात्र, इतर प्राणी हे जर माझ्या कळपाचे, माझ्या समाजाचे घटक नाहीत, तर मग त्यांना या नियमाचे संरक्षण अर्थातच लागू नाही. त्यामुळे, त्यांना मारून खाण्याची जर माझी ताकद असेल, तर मग खुशाल!

(सहसा वाघाला मारून खाण्याची माझी ताकद नसते. उलट वाघच मला मारून खाईल, याची भीती जास्त असते. म्हणून मी सहसा वाघ मारून खात नाही. ती संधी फारशी मिळत नाही म्हणा, किंवा अशी संधी टाळण्याकडेच कल असतो म्हणा, किंवा संधी मिळाली तरी तिचा फायदा घेण्याची ताकद नसते म्हणा. पण एखादा बकरा मिळाल्यास तो सहसा फारसा प्रतिकार करू शकत नाही. म्हणजे करतो, पण त्याचा टिकाव लागत नाही. शिवाय, बकरा मला खाऊ शकेल ही भीती मला नाही. तेव्हा, अजापुत्रं खुशाल बलि दद्यात्!

बाकी वनस्पतींचे तर काय, त्या तर काहीच प्रतिकार करत नाहीत. मग त्या काय, बिनधास्त खा! शिवाय त्या हूं की चूं करत नाहीत, तेव्हा त्यांना तशीही संवेदनाच नसावी, अशी समजूत करून घेणे मला सोयिस्कर पडते. आणि तसेही मला काही ना काही खाणे तर भाग आहे - प्राणीही नाही खायचे आणि वनस्पतीही नाही खायच्या म्हटले, तर मग मी जगू कसा?)

बाकी, तसे बघायला गेले, तर आजच्या समाजाच्या नियमांत, मी जर एखाद्या मनुष्यास स्वतः कापून खाल्ले, तर मला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली शिक्षा होईल. (यातील 'वध' हा शब्द अधोरेखित करण्यामागचे कारण प्रस्तुत चर्चाविषयाशी पूर्णपणे असंबद्ध आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.) किंवा, मला खावेसे वाटले म्हणून मी एखाद्या मनुष्यास कापण्याचे काम जर एखाद्या कंत्राटदाराकडे औटसोर्स केले, तर त्याअधिक मला सुपारी देण्याच्या गुन्ह्याची जी काही शिक्षा कायद्यात असेल, तर तीही होईल. पण मी जर एखादा बकरा स्वतः कापून खाल्ला, किंवा कापलेला बकरा खाटकाकडून विकत आणला (अर्थात बकरा खाटकाकरवी कापून घेतला), तर त्याबद्दल त्या प्रकारची किंवा दुसरी कोणतीही शिक्षा मला होणार नाही.

का? याचे उत्तर सोपे आहे. कारण मनुष्यसमाजाचे नियम हे त्या समाजाच्या सदस्यांच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी बनलेले आहेत, आणि बकरे हे मानवी समाजाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना या नियमांचे संरक्षण लागू नाही. आणि मानवी समाजाचे सदस्य नसलेल्यांच्या सुरक्षिततेत (मानवी समाजाचा त्यात काही फायदा अथवा स्वार्थ असल्याखेरीज किंवा हितसंबंध गुंतलेले असल्याखेरीज) मानवी समाजाला स्वारस्य असण्याचे काहीच कारण नाही.

सांगण्याचा मुद्दा, माणसाने माणसाला न खाण्यामागे कोणतीही तात्त्विक बैठक नाही, तर साधा, सोपा आणि शुद्ध स्वार्थ आहे, इतकेच.

पैसा's picture

17 Jul 2011 - 1:08 pm | पैसा

भारी प्रतिसाद!

अप्पा जोगळेकर's picture

17 Jul 2011 - 7:03 pm | अप्पा जोगळेकर

तुमची विचार करण्याची क्षमता अफाट आहे. या प्रतिसादाबद्दल स्टँडिंग ओव्हेशन दिले पाहिजे. तरीदेखील काही शंका अजूनही शिल्लक राहिलेल्या आहेत पण मी स्वतःच त्या शंकांबाबत ठाम नाही म्हणून इतक्यातच काही विचारु शकणार नाही .

तिमा's picture

17 Jul 2011 - 7:32 pm | तिमा

जात्याच आळशी असल्याने मी ती टाळू इच्छितो.

हे वाचून क्षणभर असे वाटले की तुम्हाला लोकांची 'टाळु' फोडून खायला आवडते. बघा, नुसती चर्चा वाचून हिंसक विचार सुचतात.

पंगा's picture

17 Jul 2011 - 7:34 pm | पंगा

...आपलं... टाळी!

पल्लवी's picture

17 Jul 2011 - 9:01 pm | पल्लवी

ज्याला जे पटेल, पचेल अन रुचेल ते खावे..
सिंबळ्ळ !!

अलीकडे आम्ही मिपावर बर्‍याच पाककृती वाचतो. त्यात मांसाहारी पाककलांचे वाढते प्रमाण बघून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर त्या मुक्या प्राण्याची आकृती उभी राहते. त्याच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, प्राण जातांना त्याने केलेली धडपड, विरोधाला न जुमानता कसायाने क्रूरपणे केलेली त्याची हत्या हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते.

तुमच्या म्हणजे नक्की कुणाकुणाच्या डोळ्यांसमोर उभे राहते??? :-D

माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांनी सांगितलेली माहिती अशी की

[१] रस [ Glandular Secretions etc , ]

[2] रक्त [ Blood ]

[3] मेद [ Animal Fat ]

[4] मांस [ Muscles ]

[5] अस्थी [ Bones ]

[6] मज्जा [ Nerves, Bone Marrow ]

[7] शुक्र [ Reproductive and power Mgmt ]

हे ७ पैकी रस सोडून इतर एक जरी धातू जागृत किंवा सुप्त अवस्थेत असतात त्या सर्व वस्तू मांसाहारी . वस्तू मध्ये फक्त रस असणे हे शाकाहारी.

शिवाय स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी दुसर्याची हत्त्या करणे आणि त्याचे " जीवे जीवस्य जीवनम " हे हलकटपणाचेच लक्षण आहे.

आनंदी गोपाळ's picture

16 Jun 2012 - 1:06 pm | आनंदी गोपाळ

माझ्या ओळखीच्या दुसर्‍या गृहस्थांनी सांगितले आहे,
की फक्त वनस्पतींना निर्जीव पाणी, सूर्यप्रकाश व प्रकाशसंश्लेषण करून अन्न उत्पादन करता येते. बाकी सगळे सजीव, इतर जीव खाऊन जगतात
त्यामुळे वनस्पतींसकट सगळे सजीव खाणार्‍या मानवी हलकटपणात मीही सहभागी आहे ;)

गणपा's picture

16 Jun 2012 - 2:33 pm | गणपा

;)

रमताराम's picture

16 Jun 2012 - 4:02 pm | रमताराम

याला म्हणतात सौ सुनार की एक गणपा की. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यापेक्षा फोटो चिकटवणे कित्ती चान!

गणपा's picture

16 Jun 2012 - 2:26 pm | गणपा

ओक्के म्हणुनच बहुदा अंडे शकाहारात गणले जात असावे. ;)
पर्‍या येतोस काय चि़ज ऑम्लेट हाणायला?

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2012 - 3:33 pm | परिकथेतील राजकुमार

वैदिक पद्धतीने बनवणार काय ?

रमताराम's picture

16 Jun 2012 - 1:17 pm | रमताराम

यावरून आठवलं. गणपा तू मागे ती पायाचं सूप ची पाकृ टाकली होतीस ती लाजवाब होती हां. सांगायचं विसरलो होतो. केल्या कष्टाचे चीज झाले होऽ. सगळ्या मांसाहारी, पापी लोकांनी वाखाणली. अजून येऊ देत.
अवांतर: पालक-चिकन अशी जी पाकृ दिली आहेस ती शाकाहारी म्हणायची की मांसाहारी? चिकन अधिक असल्यावर मांसाहारी नि कमी असल्यावर शाकाहारी? का गोर्‍यासाहेबाच्या ब्रेडचा नखभर तुकडा खाल्ला की हिंदू लगेच किरिस्तांव होतो तसा चिकन शेजारच्या बर्नरवर शिजवले तरी पालकाची भाजी मांसाहारी म्हणायची?

(चिकनाहारी) रमताराम

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2012 - 1:34 pm | परिकथेतील राजकुमार

वल्लीशेठचे हे गाजलेले (विनोदी) विधान माझ्या नजरेतून सुटलेच कसे ?

प्रचेतस's picture

16 Jun 2012 - 3:31 pm | प्रचेतस

आमच्या गतकाळच्या जिलब्या तुमच्या नजरेतून सुटल्याबद्दल तुमच्याकडे एक मस्तानी लागू.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2012 - 3:34 pm | परिकथेतील राजकुमार

मस्तानीला आमच्याकडे लागू केल्याबद्दल धन्यवाद.

नाना चेंगट's picture

16 Jun 2012 - 3:44 pm | नाना चेंगट

>>>मस्तानीला आमच्याकडे लागू केल्याबद्दल धन्यवाद.

भलत्या ठिकाणी स्पेस टाकले आणि नाही टाकले तर अर्थ बदलतो.

* मस्तानीला आमच्या कडेला गू केल्याबद्दल धन्यवाद. *

प्यारे१'s picture

16 Jun 2012 - 4:07 pm | प्यारे१

नाना, हा कुणाचा 'मोड' रे??? ;)

धागा घाण केलास लेका!

शाकाहारी असण्याचे खुप फायदे आहेत
मांसहारी असण्याचे खुप तोटे आहेत

शाकाहारी माणसे मनाने खुप चांगली असतात.

ऋषिकेश's picture

18 Jun 2012 - 1:39 pm | ऋषिकेश

एक वनस्पती नष्ट करून तुम्ही पर्यावरणाचे किती नुकसान करता.
त्यापेक्षा चिकन खा.. झाडे वाचवा!!
Eat chicken... GO GREEN!!!

:P

मीनाक्षी देवरुखकर's picture

18 Jun 2012 - 2:02 pm | मीनाक्षी देवरुखकर

खूप करमणूक झाली.. वल्ली यांचा हा धागा पाहून

मीनाक्षी देवरुखकर's picture

18 Jun 2012 - 2:04 pm | मीनाक्षी देवरुखकर

ट्रेकर वल्ली यांच्या मनाचा हा हळुवार कोपरा खूपच भावला

प्रसाद गोडबोले's picture

13 Apr 2018 - 8:08 pm | प्रसाद गोडबोले

खरंय !

दगडी वल्ली सरांच्या मनाचा हळवा कोपरा दिसला ह्या लेखाच्या निमित्ताने !


तुम्ही खातांना अगदी मिटक्या मारून मारून खाता. पण तुमच्या जिभेच्या चोचल्यांपायी एखाद्याचा जीव जातो त्याचे काय?

ह्या वाक्य तर जणु दवणे सरच सांगत आहेत असं वाटलं, एकदम टच्चकन डोळ्यात पाणीच आलं !

आययाया, वल्लीचा हळवा कोपरा लैच हुळहुळता होता व्हय.
बादवे ह्या देवरुखकर ताईचें आडनाव ऐकल्यासारखे वाटते. ;)

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2018 - 10:36 pm | श्रीगुरुजी

आमच्या डोळ्यांसमोर त्या मुक्या प्राण्याची आकृती उभी राहते. त्याच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, प्राण जातांना त्याने केलेली धडपड, विरोधाला न जुमानता कसायाने क्रूरपणे केलेली त्याची हत्या हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते.
तुम्ही खातांना अगदी मिटक्या मारून मारून खाता. पण तुमच्या जिभेच्या चोचल्यांपायी एखाद्याचा जीव जातो त्याचे काय?

+ १

स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांना वेदना देऊन आयुष्यभर त्यांचा छळ करणारे सुद्धा दोषी आहेत.

बोलघेवडा's picture

13 Apr 2018 - 10:42 pm | बोलघेवडा

कत्तलखान्याच्या भिंती जर काचेच्या असत्या तर जगात आज कोणीही मांसाहार केला नसता असं म्हटलं जाते.

कपिलमुनी's picture

13 Apr 2018 - 10:53 pm | कपिलमुनी

1.शाकाहार विरुद्ध मांसाहार
2. गांधी विरुद्ध इतर
3. आस्तिक नास्तिक
अशी जुनी युद्धे आठवली .

नाखु's picture

14 Apr 2018 - 10:29 am | नाखु

भाजीपाला घासपुस नाखु पांढरपेशा