उमेद

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
8 Feb 2010 - 1:42 pm

बेगॉन/ डायझोन्/टीक२०
सगळे एकदम वापरुन पाहिले
कितीही झटकले तरी झुरळ काही मरत नाही
जीव तुटता तुटता पुनर्जन्म होतो
हात पाय हलत रहतात
अधुनमधुन पंख फडफडतो
जातो जातो वाटते पण जीव काही जात नाही
कितीही झटकले तरी काही झुरळ मरत नाही
तु काहीही कर पोसलेला नेता आहे
मी इथल्या सगळया
समाजाच्या नामर्दगानीवर
कुरतडत राहीन अंधारात तुलाच.
जगत राहीन तुझ्या उष्ट्यावर
आणि माज करेन त्यावरच.
तूच शेवटी हरणार आहेस
मी असाच आहे शतकांपासुन
तु ही असाच आहेस शतकांपासुन
सोशीक आणि सहनशील
निवडणूका वगैरे जन्तुनशाकाना
आम्ही दाद देत नाही.
हे सांगितल्यावाचुन ते रहात नाही
या उपायांनी काही होत नाही,
आमची जाड कातडी
कशालाच दाद देत नाही
हे ठाउक आहे म्हणुन
ती काही उमेद हारत नाही ...!

शृंगारवावर