मदत हवी आहे

धाकली's picture
धाकली in काथ्याकूट
15 Jan 2010 - 5:00 pm
गाभा: 

मला नुकतच ऑस्त्रेलियाचा व्हिसा मिळाला आहे. मी नोकरीसाथि तिकडे जाणार आहे. मिसलपावचे सभासद सगळिकडे आहेत. म्हणून ईथे मदत मागत आहे.
सध्याच्या बातम्या वाचुन फारच अस्वस्थ वाटत आहे. कोणी मिपाकर तिकडे असेल अथवा कोणाला तिकडची काहि माहिती असल्यास जारुर कळवा.
बर्यच जणानी सा॑गितले कि बातम्या एका॑गि आहेत. तुमचे विचार जारुर काळवा.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

15 Jan 2010 - 5:30 pm | मदनबाण

बर्यच जणानी सा॑गितले कि बातम्या एका॑गि आहेत. तुमचे विचार जारुर काळवा.
मला तरी या बातम्या एकांगी आहेत असे वाटत नाही.हिंदुस्थानी विद्यार्थांना होणारी मारहाण आता तिथे रोजचीच गोष्ट झाल्यात जमा आहे.
आपल्या हिंस्थानच्या सरकार मधे एवढी ताकद जरुर आहे की ते ऑस्ट्रेलियन सरकारला सज्जड दम देऊ शकतात...की आमच्या नागरीकांना संरक्षण द्या,चालु प्रकार लगेच थांबला पाहिजे. पण इच्छा शक्तीचा आभाव अजुन काय...म्हणुन हिंदुस्थानी नागरीकांवर होणारे हल्ले अजुन थांबले नाहीत.

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jan 2010 - 6:16 pm | बिपिन कार्यकर्ते

बाणा... वृत्तपत्रातील किंबहुना आजकाल सगळ्याच प्रसारमाध्यमातील बातम्या एकांगीपणाकडे झुकणार्‍याच असतात असा मला बरेच वेळा अनुभव आला आहे. सध्याही ऑस्ट्रेलियात राहणार्‍या एका कडून तिथली सद्यः परिस्थिती हस्ते परहस्ते समजली. तेव्हा ऑन ग्राउंड वातावरण काही एवढे खराब नाही हे समजले.

माझा स्वतःचा अनुभव सांगतो. पहिल्यांदा जेव्हा मनसेचा राडा झाला तेव्हा पुण्यात मला एक कोर्स अटेंड करण्यासाठी यायचे होते. कोर्सच्या बरोब्बर ४ दिवस आधी मला कळवण्यात आले की तो कोर्स पुढे ढकलला गेला आहे. कारण काय तर मुंबईत म्हणे भयानक लफडी चालली आहेत. सगळ्या चॅनेल्सवर दाखवत होते काही काही दृश्य. मी त्या लोकांना सांगितले की असले काही नाहीये, माझे सगळे नातेवाईक मुंबईत सुखाने रोजचे जीवन जगत आहेत वगैरे... आणि शिवाय कोर्स पुण्यात आणि भिती मुंबईत. मुंबई पुण्यात जवळ जवळ पावणेदोनशे कि.मी. चे अंतर आहे हे ही मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. सुदैवाने त्यांनी ऐकले आणि कोर्स अगदी व्यवस्थित पार पडला. नंतर संयोजकांनी स्वतः येऊन सांगितले की प्रसारमाध्यमांमुळे ते घाबरून गेले होते. आता काय बोलणार?

बाकी भारत सरकार वगैरे बद्दल जे काही तू लिहिले आहेस त्यात तथ्य (या बाबतीत तरी) फारसे नाहीये असे त्या ऑस्ट्रेलियास्थित स्नेह्याच्या रिपोर्टावरून वाटले. असो. कोणी तरी एवढा महत्वाचा निर्णय घेत असताना भावनेच्या भरात चुकू नये म्हणून एवढे लिहिले.

बिपिन कार्यकर्ते

मदनबाण's picture

16 Jan 2010 - 10:13 am | मदनबाण

बिपीनजी तुम्ही म्हणता तेही बरोबरच आहे,पण तिकडे हिंदुस्थानी लोकांवर हल्ले हे काही अजुन थांबलेले नाहीत.पुढच्या काही महिन्यात अशा बातम्या वाचायला मिळाल्या नाहीत तर हे प्रकार बंद झाले असे समजण्यास हरकत नसावी.

जाता जाता :---
http://www.timesnow.tv/Foul-play-in-Gurudwara-attack-in-Aus/articleshow/...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jan 2010 - 6:07 pm | बिपिन कार्यकर्ते

जरूर जा. काहीही नकारात्मक विचार मनात न आणता जा. काही व्हायचे असेल तर ते घरात बसल्या बसल्या पण होऊ शकते. (सतिश शेट्टी कुठे गेले होते ऑस्ट्रेलियाला? इथेच झाले जे व्हायचे ते.) स्वानुभवावरून सांगतोय हे सगळे. मी जिथे गेलो होतो तिथे जायच्या आधी बर्‍याच लोकांनी सावध वगैरे केले मला. पण तो काळ माझ्या आयुष्यातला सगळ्यात जास्त संस्मरणिय असा काळ ठरला. आणि महत्वाचे म्हणजे वृत्तपत्रात बहुतांश थोडेफार अतिरंजित वर्णन येतेच येते. खरी परिस्थिती फार वेगळी असते. फार तर काय... तिथे गेल्यावर नाही पटले तर परत याल एवढेच ना? ठीक है यार. चलता है. (नाही तरी आपण भारतिय, 'चलता है' अ‍ॅटिट्युड साठी प्रसिध्दच आहोत.)

जरूर जा... मजेत रहा... कधी मधी आम्ही आलोच तर आमचा मस्त पाहुणचार करा. ;)

बिपिन कार्यकर्ते

चिरोटा's picture

15 Jan 2010 - 6:23 pm | चिरोटा

तिकडे घडणारी अशी प्रत्येक घटना 'रॅसिझम'चे पॅकिंग लावून आपली मिडिया मीठ लावून सांगत आहे. भारतियांची संख्या गेल्या १५ वर्षात तिकडे लक्षणीय वाढली आहे असे म्हणतात. तेव्हा अशा प्रकारच्या घटनांमध्ये थोड्याफार प्रमाणात भारतिय् लोकांचे प्रमाण असले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. भारतातही असेच किंबहूना ह्याहून गंभीर गुन्हे घडतात आणि त्यात कोणीही सापडू शकतो.जे लोक तेथे रॅसिझमने त्रस्त झाले आहेत त्यांना परतीचा मार्ग आहेच.
तेव्हा खुशाल जा....
भेंडी
P = NP

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2010 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपाववरील सन्माननीय सदस्य आणि आमचे मित्र 'निनाद' आपल्याला योग्य मार्गदर्शन करु शकतील. आपण त्यांच्याशी संपर्क करावा असे वाटते. ते आपल्याला जरुर मदत आणि मार्गदर्शन करतील. जान है तो जहान है ! हा त्यांच्या लेखही वाचावा.

-दिलीप बिरुटे

jaypal's picture

15 Jan 2010 - 6:44 pm | jaypal

म्हणुन मला घेऊन चला ;-)

मस्करीचा भाग सोडा आणि बिका काका म्हणताहेत तस आगदी बिनधास्त होउन काहीही नकारात्मक विचार मनात न आणता जा. भविष्या साठी लक्ष लक्ष शुभेच्छा :-) आल ईज वेल , आल ईज वेल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

चतुरंग's picture

15 Jan 2010 - 6:51 pm | चतुरंग

रात्री अपरात्री परतणारे एकटे दुकटे, निर्जन जागा अशा ठिकाणी घडलेत. जिथे घडलेत त्या जागाही साधारण वस्तीच्या होत्या. सरसकट कुठेही "धर भारतीय आणि भोसक त्याला" असं अजिबात नाही. तुम्ही काळजी घ्याच पण ह्या कारणाने जाणं अजिबातच लांबवू/रद्द करु नका. माध्यमांच्या बातम्यांना जरुरीइतकंच महत्त्व असावं.
वरती दिलीप बिरुट्यांनी सांगितलेला लेख जरुर वाचा. त्यात निनादने स्वतः मदत करण्याची तयारी दाखवली आहे. त्याच्याशी संपर्क करा अधिक नेमकी माहिती मिळेल.
तुम्हाला शुभेच्छा!! :)

चतुरंग

II विकास II's picture

15 Jan 2010 - 7:03 pm | II विकास II

काळजी घेणे.
बातम्या अतिरंजक आहेत असे वाटते.
ऑस्ट्रेलियन लोकांना भारतीय लोक ऑस्ट्रेलियात येण्याआधी इतका विचार करतात हे कळले तर त्यांना अंमळ मौज वाटेल.
अंमळ हा शब्द ऑस्ट्रेलियात नक्की वापरतात की नाही हे माहीत नाही. निनाद यांना हे विचारावे लागेल.

अमृतांजन's picture

16 Jan 2010 - 7:43 am | अमृतांजन

इंग्लंडने त्यांच्या गुन्हेगारांना तडीपर करण्यासाठी अऑस्ट्रेलियाच्या भूमीचा वापर केला व तेथे ते गुन्हेगार व इतर नको असलेले नागरीक ह्यांना पाठवून दिले. आता त्यांच्या पुढील पिढ्या तेथे "सभ्य" होऊन नांदत आहेत. असो, हा गमतीचा भाग होता.

सगळ्या भारतातील प्रत्येक राज्यातील मुख्य वृत्तपत्रे (फक्त) सकाळी गोळा करुन जर "छापलेल्या" बातम्या वाचल्या तर त्यात भारतीय रेसिझम्च्या, अत्याचारांच्या, हत्या, बळी ई स्वरुपाच्या बातम्या वाच्ल्यातर आपण किती महान देशात रोजचे जगणे जगत आहोत त्याचा प्र्त्यय येईल व असे वाटेल की, मी जगात कुठेही तगण्याची/ जगण्याची खात्री आहे.

नीलकांत's picture

17 Jan 2010 - 10:47 pm | नीलकांत

माझ्या काही ऑस्ट्रेलियात राहणार्‍या मित्रांच्या मते हा केवळ भारतीय मिडीयाने केलेला बागुलबोवा आहे.
प्रत्यक्षात तसं काही विशेष नाहीये. त्यांच्या शब्दांत सांगायला गेलं तर जेथे जाल तेथील सामाजीक नियमांसोबत राहीलं तर काही होत नाही. उगाच भलतं धाडस केलं तर ते गोत्यात आणतं , त्यासाठी तुम्ही भारतीयच असण्याची गरज नाही.

त्यामुळे जाणार असाल तर नक्की जा. कसलीच चिंता ठेवू नका. आमचे एक मित्र श्री निनाद यांनी एक मेल पाठवली आहे. त्यात त्यांनी अश्याच अडचणी टाळण्याचे चांगले उपाय दिलेले आहेत. जमल्यास ते तुम्हाला पाठवतो. कामाला येईल.

- नीलकांत

आणखी दोन भारतीयांवर ऑस्ट्रेलियामध्ये हल्ला
http://bit.ly/6T9YGg
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान केविन रुड हे उगाच चिंतीत नसावे...
गेल्या आठवड्यात किती अशा प्रकारच्या बातम्या आल्या आहेत, याचा विचार कोण करत असेल का ?

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

अलगतावादाची विषवल्ली
http://bit.ly/a1QnFL

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato