रेडी टु कुक (खास भटक्यांसाठी)

jaypal's picture
jaypal in पाककृती
21 Dec 2009 - 1:45 pm

मिपावरील भटक्या(ट्रेकर) अणि विमुक्त जनतेसाठी खास "रेडी टु कुक" रेसीपी.
बहुसंख्य भटक्यांच त्यांच्या भटकंती दरम्यान जेवण म्हणजे दालखिचडी. हि दालखिचडी प्रवासा दरम्यान बनविण मजेच आणि गरजेच असलं, तरी कधी-कधी शिणवट्या मुळे कंटाळवाण सुद्धा होतं.
म्हणुन सादर आहे "रेडी टु कुक"
साहित्य
१.तांदुळ धुवुन किंवा तसेच घ्यावेत.
२.आपल्या पसंतिच्या डाळी (आख्खे मुग, मुगडाळ(पिवळी), मसुर डाळ, तुरडाळ)
३.फ़ोडणी साठी तेल व ईतर साहित्य जसे जिरे,मोहरी,हिंग,हळद,धने, (आवडत अस्ल्यास बडिशेप,) कडीपत्ता, तमालपत्र,लवंगा ई.
४.लाल-सुक्या किंवा हिरव्या मिरच्या किंवा लालतिखट
५.मिठ
६.चवीपुरता गरम मसाला
७.कच्चे शेंगदाणे
कृति
१.प्रथम भांड्यात तेल गरम करावे. +
२.गरम तेलात जिरे,मोहरी,हिंग,कडीपत्ता ई.सर्व साहीत्य घालावे. येवढ्यात हळद घालुनये.(नाहीतर करपल्याने कडवट चव येइल.) +
३.या फ़ोडणित कच्चे शेंगदाणे तसेच सुक्या किंवा हिरव्या मिरच्या किंवा लालतिखट चांगले परतुन घ्या. हिरव्या मिरच्या असल्यास चिवड्या प्रमाणे खरपुस/कुरकुरीत परतुन घ्या. थोडाक्यात पाण्याचा अंश राहणार नाही याची काळजी घ्या. +
४.या मिश्रणात तांदुळ + डाळी (तांदुळ व डाळ यांचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे) चांगले खरपुस भाजुन घ्या. चवी प्रमाणे मिठ घाला+हळद घालुन परत थोडा वेळ परतुन घ्या.
५.थंड झाल्यावर हे मिश्रण हवाबंद बरणीत भरुन ठेवा. साधारण १०/१५ दिवस सहज टिकते. टिकाउ पणाचा उद्देश साधण्यासाठीच इथे कांदा,बटाटा किंवा टोमेटो वापरलेला नाही.

भटकंतीला जाताना हे मिश्रण सोबत घ्या. मस्त पैकी ३ दगडांची चुल मांडा, पाणी गरम करुन त्या मधे हे वरील "रेडी टु कुक" मिश्रण टाकुन शिजवा सोबत छानपैकी पापड भाजा आणि आवड्त्या लोणच्या बरोबर दे दनादण सुरु करा.(ही खिचडी शिजत अस्ताना आपापल्या आवडीप्रमाणे त्यामधे गाजर,मटार,कांदा,बटाटा किंवा टोमेटो वापरता येतो.भटकंती दरम्यान बटाटा व खजुर खाण्यात जास्त ठेवावा.)

याच पध्दतीने...... उपमा
१.नुसता रवा खरपुस भाजुन घ्यावा.
२.(तांदुळ आणि डाळींच्या ऐवजी) फ़ोडणीत भाजलेला रवा एकत्र करुन परत भाजावा.
३.थंड झाल्यावर हे मिश्रण हवाबंद बरणीत भरुन ठेवा. साधारण १०/१५ दिवस सहज टिकते.
४.भटकंतीला जाताना हे मिश्रण सोबत घ्या. मस्त पैकी ३ दगडांची चुल मांडा, पाणी गरम करुन त्या मधे हे वरील "रेडी टु कुक" मिश्रण टाकुन शिजवा.(प्रमाण=१ वाटी मिश्रणास २ वाट्या पाणी)
तयार आहे गरमा गरम वाफळलेला उपमा.

मिपाकरांना अजुन काही अश्या "रेडी टु कुक" रेसीपीज माहित असल्यास अवश्य येउद्यात.
फोटोसौजन्य = दोन्ही फोटो जालावरुन सभार.

प्रतिक्रिया

माधुरी दिक्षित's picture

21 Dec 2009 - 2:00 pm | माधुरी दिक्षित

दशानन's picture

21 Dec 2009 - 2:22 pm | दशानन

>>मिपाकरांना अजुन काही अश्या "रेडी टु कुक" रेसीपीज माहित असल्यास अवश्य येउद्यात.

हॉटेलात जाऊन गिळणे.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

jaypal's picture

21 Dec 2009 - 2:27 pm | jaypal

पर्याय सगळ्या ट्रेकस च्या दरम्यान उपलब्ध असेलच याची खात्री नसल्याने हा धागा टाकला आहे.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

श्रावण मोडक's picture

21 Dec 2009 - 2:39 pm | श्रावण मोडक

वा रे जयपा... आवडला प्रकार.

अवलिया's picture

21 Dec 2009 - 2:36 pm | अवलिया

श्री रा रा जयपालजीसाहेब

"रेडी टु कुक"

शिळं खावुन खावुन बुद्धि जड होते आणि आंतरजालीय विचारवंत बनण्याकडे वाटचाल चालु होते. त्याज्य प्रकार. अजिबात शिळं खावु नका.

--अवलिया

jaypal's picture

21 Dec 2009 - 2:52 pm | jaypal

अवलियाजी,
आपल म्हणन पटत आहे पण काय आहे, हाटेलात जाण्याचा राजेशाही प्रकार सगळ्यांनच परवडतो असे नाही. शिवाय उपाशी राहण्यापेक्षा थोडं रेडीमेड तर रेडीमेड .उपरोक्त पा. कृ. मला शीळी वाटत नाही.
अवांतर = प्रत्येक प्रतीसादाला आपला एक प्रतीसाद द्यायाचाच, निदान दरवेळेस धन्यवाद तरी म्हणायच आणि धाग्याची शतकाच्या दिशेने वाटचाल ठेवायची असा स्तुत्य उपक्रम राबवावा काय ? ;-)

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अवलिया's picture

21 Dec 2009 - 2:58 pm | अवलिया

श्री रा रा जयपालजीसाहेब

उपरोक्त पा. कृ. मला शीळी वाटत नाही.

वाटत नाही हे शब्द महत्वाचे. वाटणे न वाटणे मनाचे खेळ. प्रत्यक्ष सत्य भिन्न असते. असु शकते. समजुन घेता येत नाही, समजत नाही, समजुन घ्यायचेच नाही या वेगवेगळ्या अवस्था. तुम्ही कोठे आहात याचा विचार करा.

--अवलिया

jaypal's picture

21 Dec 2009 - 3:05 pm | jaypal

अवलियाजी,
आपलं म्हणन पटल, डोळे खाडकन उघडले . धन्यवाद
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

JAGOMOHANPYARE's picture

21 Dec 2009 - 2:56 pm | JAGOMOHANPYARE

घरी करुन ठेवणार. भटकंती कधी करत नाही.

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

स्वाती२'s picture

21 Dec 2009 - 6:16 pm | स्वाती२

मस्त!
होस्टेलची आठवण झाली. माझ्या मैत्रीणीची आई करुन पाठवायची परीक्षेच्या काळात बाहेरचे खायला लागू नये म्हणून. अशाच प्रकारे करायची एक तयार पिठल्याची कृती कमलाबाई ओगल्यांच्या रुचिरात आहे.

रेवती's picture

21 Dec 2009 - 7:58 pm | रेवती

पिठल्याचा प्रयोग मी एकदा मासिकात वाचून केला होता. तसे पिठलेही चांगले लागते व पटकन होते. त्यासाठी भरपूर तेलात हि. मिरच्यांची फोडणी करून त्यात बेसन परतावे. लाल तिखट (हवे असल्यास), कोथिंबीर, मीठ घालून परतावे. कोथिंबीर हलकेच तळली जाते व पाण्याचा अंश रहात नाही. थोडी जिरेपूड, भाजलेले सुके खोबरेही मिसळावे. पिठले करायच्या वेळी उकळी आलेल्या पाण्याला पीठ लावावे.
या निमित्ताने माझ्या मावससासूबाई करतात त्या खमंग पिठल्याची आठवण झाली. भरपूर तेलातले त्यांच्या पद्धतीचे तयार पिठले प्रवासात दोनेक दिवस सहज टिकते. चव तर अफलातून असते

रेवती

jaypal's picture

21 Dec 2009 - 8:52 pm | jaypal

स्वाती२ अणि रेवती ताईंच्या प्रतीसादावरुन आठवले. माझ्या गावी(ता.मिरज मु.पो.बेडग) अजुन देखिल प्रवासासाठीच्या पिठल्यात पाण्याऐवजी दुध वापरतात.कांदा वापरत नहीत.सोबत गाडग्यातल दही, खरडा आणि भाजलेले शेंगदाणे
दुसरा भारी प्रकार म्हणजे दशम्या सोबत बुक्की मारुन (चिरलेला नाहे) फोडलेला कांदा+मिठ लाऊन तळलेल्या मिरच्या किंवा खरडा.
लवकरच दुधातल पिठल आणि दशम्या शिकुन इथे पा.कृ. टाकतो.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

धमाल मुलगा's picture

21 Dec 2009 - 8:00 pm | धमाल मुलगा

जयपाल,
ही युगत लै भारी है रं भावा :)
ट्रेकला वगैरे गेल्यावर दिवसभर चाल-चालुन दमल्यानंतर अंगात त्राण नाही, भुक तर मरणाची लागलीये आणी खिचडी व्हायला प्रचंड वेळ लागतोय..हे प्रकार रडकुंडीला आणतात :(

आता सादर आहे खास जयपाल ट्रेक फुड्सचे अप्रतिम उत्पादन 'रेडी-टु-कुक फॉर ट्रेक' !!!
:)

बट्ट्याबोळ's picture

21 Dec 2009 - 10:50 pm | बट्ट्याबोळ

कूल!!!!!!!

पाषाणभेद's picture

22 Dec 2009 - 1:52 am | पाषाणभेद

रेडी टू कुक अ‍ॅन्ड आय एम रेडी टू ईट इट.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

टुकुल's picture

22 Dec 2009 - 3:38 am | टुकुल

भारी प्रकार..
वाचनखुण साठवली आहे, नक्किच उपयोगात येणारी पाकक्रुती

--टुकुल

विशाल कुलकर्णी's picture

22 Dec 2009 - 10:14 am | विशाल कुलकर्णी

ठांकु रे भावा ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

भाग्यश्री कुलकर्णी's picture

22 Dec 2009 - 3:16 pm | भाग्यश्री कुलकर्णी

माझ्या बहिणीचे यजमानदुसरीकडे होते वर्षभर तेंव्हा ती त्यांना सोमवारी जाताना असेच प्रकार बनवुन द्यायची .सकाळी ऑफिसात जेवण मिळत असे रात्री आल्यावर हे पदार्थ शिजवुन खाता येत असत्.