आलबेल

सचिन's picture
सचिन in जे न देखे रवी...
9 Mar 2008 - 1:31 am

कोणाच्या तरी पुतळ्याची
कुठेतरी विटम्बना झाली
म्हणून परवा आमच्याही
गावामध्ये दङगल झाली

ज्यान्चे नाव माहीत नाही
कार्याबद्दल कल्पना नाही
त्यान्च्या नावे मण्डळान्ची
दगडफेकही खच्चून झाली

बन्दोबस्त झाले, अश्रुधूर झाला
आता सारे आलबेल आहे
गोळीबारातल्या जखमी - मृतान्ची
यादी देखील पुसट झाली

प्रतिक्रिया

प्राजु's picture

9 Mar 2008 - 2:15 am | प्राजु

हे ज्वलंत सत्य आहे. आणि हे कधी बदलेल असे वाटत नाही.
कवितेतली भावना आवडली.

- (सर्वव्यापी)प्राजु

सचिन's picture

9 Mar 2008 - 2:25 am | सचिन

धन्यवाद प्राजुताई !!
मिसळपाव वरचा मला मिळालेला पहिलाच प्रतिसाद ...आणि असा उत्साहवर्धक !

प्राजु's picture

9 Mar 2008 - 2:32 am | प्राजु

आणखिही उत्तम काव्यांची अपेक्षा आहे आपल्याहडून.
- (सर्वव्यापी)प्राजु

इनोबा म्हणे's picture

9 Mar 2008 - 2:49 am | इनोबा म्हणे

सचिनराव्,अगदी झकास जमलीय कविता.
आपल्याकडून अशाच आणखी काही काव्यांची अपेक्षा! लगे रहो!

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

स्वाती राजेश's picture

9 Mar 2008 - 2:52 am | स्वाती राजेश

मि.पा. वर स्वागत..
अशाच कवितांची वाट पाहात आहोत.
प्राजु शी सहमत..

सचिन's picture

9 Mar 2008 - 2:56 am | सचिन

मन:पूर्वक धन्यवाद !

फटू's picture

9 Mar 2008 - 5:42 am | फटू

एक दाहक सत्य खूप मोजक्या शब्दात व्यक्त केलं आहे...

धनंजय's picture

9 Mar 2008 - 7:31 am | धनंजय

कविता. धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 7:44 am | विसोबा खेचर

थोडक्यात, परंतु छानच लिहिले आहे...

सचिनराव,

मिसळपाववर मनापासून स्वागत...

कृपया आपला लॉग-ईन आयडी देवनागरीत बदललात तर बरं होईल...

तात्या.

सुधीर कांदळकर's picture

9 Mar 2008 - 8:01 am | सुधीर कांदळकर

लॉग इन देवनागरीत बदला. नाहीतर दंगल होईल. नामांतरवादी करतील. नाही केला तरी दंगल होईल. नामांतरविरोधी करतील.

असो. उत्तरोत्तर अशाच छान कविता आपल्याकडून लाभोत.

धन्यवाद.

सचिन's picture

9 Mar 2008 - 10:23 am | सचिन

रसिक वाचकान्ना विनम्र अभिवादन !
आता नामान्तर करून टाकले आहे.

सुवर्णमयी's picture

10 Mar 2008 - 11:27 pm | सुवर्णमयी

कवितेचा अतिशय भेदक झाला आहे. कविता आवडली.
सोनाली