आलबेल
कोणाच्या तरी पुतळ्याची
कुठेतरी विटम्बना झाली
म्हणून परवा आमच्याही
गावामध्ये दङगल झाली
ज्यान्चे नाव माहीत नाही
कार्याबद्दल कल्पना नाही
त्यान्च्या नावे मण्डळान्ची
दगडफेकही खच्चून झाली
बन्दोबस्त झाले, अश्रुधूर झाला
आता सारे आलबेल आहे
गोळीबारातल्या जखमी - मृतान्ची
यादी देखील पुसट झाली
वाचने
7206
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वा...
धन्यवाद
पु.ले.शु.
झक्कास
छान कविता आहे
धन्यवाद
सुंदर....
थोडक्यात भेदक
थोडक्यात, पण सुंदर..
संभाळून.........
नामान्तर
शेवट
एक सामाजिक वास्तव नेटक्या शब्दात. छान काव्य, सचिन.