एक मुक्तक.

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
2 Dec 2009 - 9:57 pm

अहो,
पोर किंचाळत उठली
राफा --राफा म्हणत,
घोर लागला मला मेलीला.
(पण )
तुम्ही आपले घोरत होतात.
मला मेलीला
(पण )
स्वप्न पडतात भलती सलती.

पोर किंचाळत उठली
आणि तुम्ही आपले तोंड उघडून..
(श्शी बाई! अजूनही लाळेची तार उशीवर.)
तर मी सांगत होते क्काय...
तो कावळा मेला बंद झाला.
पूर्वी डोळा लागला
की चंद्र दिसायचा
आणि हा मेला त्या चंद्रावर.
आताशा कुठे गेला काय ठावकी
(पण)

पोर किंचाळत उठली ...
तुम्ही आपले..
(आणि)
मला सांगा हो तुमची स्वप्नं,
आधी कसं तुम्ही सांगायचात
मी आले तुमच्या स्वप्नात.
खोटं मेलं सगळं
(पण)
तुमचं तोंड
(बघतेय आजकाल मी!)
झोपेतच उघडतं.

पोर किंचाळत उठली
(आणि)
मी हाका मारतेय तुम्हाला.
(मेलं दचकायचं काय येवढं.)
आणि काय पण ध्यान .
एक हात तिथे
(आणि )
दुसर्‍या हातात ब्रह्मगाठ.

मुक्तक

प्रतिक्रिया

Nile's picture

2 Dec 2009 - 10:01 pm | Nile

एका हात तिथे
(आणि )
दुसर्‍या हातात ब्रह्मगाठ.

=)) =))

आयचा घो म्हणायची वेळ की हो! ;)

अश्या 'प्रेरणा' नक्की कुठुन मिळतात कोण जाणे? ;)

टारझन's picture

2 Dec 2009 - 10:36 pm | टारझन

एका हात तिथे
(आणि )
दुसर्‍या हातात ब्रह्मगाठ.

बो !!
___/\____

- (तुर्त) हातदास

धनंजय's picture

3 Dec 2009 - 12:44 am | धनंजय

एकदम क्लास.

श्रावण मोडक's picture

3 Dec 2009 - 1:10 am | श्रावण मोडक

संदर्भांसहित कंस वाचले. दुर्बोध आणि त्यामुळंच दर्जेदार!

सहज's picture

3 Dec 2009 - 8:25 am | सहज

दुर्बोध आणि त्यामुळंच दर्जेदार!

:-)

निखिल देशपांडे's picture

3 Dec 2009 - 9:27 am | निखिल देशपांडे

दुर्बोध आणि त्यामुळंच दर्जेदार!

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

विनायक प्रभू's picture

3 Dec 2009 - 3:46 pm | विनायक प्रभू

५० शीच्या आसपास च्या कुटुंबाची अवस्था अगदी स्पष्ट शब्दात.
चरणामृत पाठवा हो मुनिवर्य.
हाथ आणि ब्रम्हगाठ- असुरक्षिततेचे रास्त वर्णन.

सुवर्णमयी's picture

3 Dec 2009 - 3:31 am | सुवर्णमयी

उत्तम कविता.
मला या कवितेचा शेवट असा करता आला असता का? हिंमत नाही अजून तेवढी:)
शेवट असाच हवा असला तरी वेगळ्या शद्बांनी तोच अर्थ आणता येईल.. कदाचित ते जास्त थेट होणार नाही..मी तो मार्ग पत्करला असता.

उमराणी सरकार's picture

3 Dec 2009 - 6:57 am | उमराणी सरकार

सुरूवातीच्या काही ओळी वाचल्यावर कविता टेनिसपटू नदाल विषयी आहे असा ग्रह झाला.
उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

विसोबा खेचर's picture

3 Dec 2009 - 8:42 am | विसोबा खेचर

अ‍ॅब्स्ट्रॅक्ट...! छान!

हर्षद आनंदी's picture

3 Dec 2009 - 8:49 am | हर्षद आनंदी

आणि काय पण ध्यान .
एक हात तिथे
(आणि )
दुसर्‍या हातात ब्रह्मगाठ.

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
:*

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

विजुभाऊ's picture

3 Dec 2009 - 9:33 am | विजुभाऊ

ऑब्सेसिव्ह अ‍ॅबस्ट्रॅक्टीझम की कायसे म्हणतात ते हेच काहो रामदासकाका

दशानन's picture

3 Dec 2009 - 9:40 am | दशानन

:)

हॅ हॅ हॅ !

ब्रम्हगाठ

=))

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Dec 2009 - 9:51 am | llपुण्याचे पेशवेll

छान छान रामदास काका.
प्रजापती आणि ब्रम्हगाठ वाह! काय बादरायण संबंध आहे. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

फ्रॅक्चर बंड्या's picture

3 Dec 2009 - 9:52 am | फ्रॅक्चर बंड्या

एक हात तिथे
(आणि )
दुसर्‍या हातात ब्रह्मगाठ.

=)) =)) =)) =)) =))

binarybandya™

सुमीत भातखंडे's picture

3 Dec 2009 - 1:15 pm | सुमीत भातखंडे

__/\__

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2009 - 1:37 pm | बिपिन कार्यकर्ते

कविता आधीच वाचली होती. पहिल्या वाचनात काय तरी अंदाज आला. पण नीटसं कळलं नाही. पण रामदासस्वामींची कृपा जाहली आणि बोधु जाहला.

आणि हो... क्लास मेंटेंड. काँग्रॅट्स सर !!!

बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा's picture

3 Dec 2009 - 2:53 pm | धमाल मुलगा

तर मी सांगत होते क्काय...
तो कावळा मेला बंद झाला.
पूर्वी डोळा लागला
की चंद्र दिसायचा
आणि हा मेला त्या चंद्रावर.
आताशा कुठे गेला काय ठावकी

=)) =)) =))
=)) =))
=))

साष्टांग!!

>>पण रामदासस्वामींची कृपा जाहली आणि बोधु जाहला.
हेच म्हणतो!
उगं आम्ही विप्रमास्तरांना क्रिप्टीक क्रिप्टीक म्हणुन हाकारतो! च्यायला, खरी पेश्शल गोम इकडं आहे ह्याची अनुभुती मिळाली! =))

-(स्टेफी--स्टेफी म्हणत किंचाळणारा) ध. ;)

अक्षय पुर्णपात्रे's picture

3 Dec 2009 - 7:52 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री रामदास, उत्तम मुक्तक. स्वप्नात सगळेच खेळ अनिर्णीत असतात (आणि) निर्णयी खेळास दोषी ठरवले जाते. दोषाला काळाचे बंधन नसते (पण) स्थळाचे असते.

मनिष's picture

3 Dec 2009 - 11:25 pm | मनिष

मला नाही कळली/झेपली - कोणी इथे किंवा खरडीतून समजवेल का? रामदास काकांची म्हणून उत्सुकता आहे, पण काही संदर्भ डोक्यावरुन... :(

मनिष's picture

3 Dec 2009 - 11:25 pm | मनिष

मला नाही कळली/झेपली - कोणी इथे किंवा खरडीतून समजवेल का? रामदास काकांची म्हणून उत्सुकता आहे, पण काही संदर्भ डोक्यावरुन... :(