मदत :- अंगातील आळस कसा घालवू?

शाहरुख's picture
शाहरुख in काथ्याकूट
26 Nov 2009 - 7:44 am
गाभा: 

नमस्कार,

मी खरं तर हुशार आहे..पण हल्ली माझ्या अंगात असलेला आळस फारच वाढत चाललेला आहे..काही करायची हुशारी वाटत नाही..तरी समाधानकारक उपाय सुचवावा.

(चिंतित) शाहरुख

तळटीप - हा धागा इतर साहित्यिक धाग्यांत लुडबूड करतोय याची संपूर्ण जाणीव आहे..समस्येचे समाधान होताच मा. संपादक मंडळास धागा उडवणेसाठी विनंती केली जाईल.

प्रतिक्रिया

Nile's picture

26 Nov 2009 - 7:55 am | Nile

(मराठी!?) संकेतस्थळांवरचा वावर जरा कमी करा! ;)

मदनबाण's picture

26 Nov 2009 - 7:56 am | मदनबाण

ज्ञान मुद्रा करा फरक पडेल...
http://www.scribd.com/doc/3408747/-

मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

  1. आळस नेमका कशाचा वाटतोय? सगळ्याच कामांचा? की काही ठराविक कामांचा?
  2. रोज थोडा तरी व्यायाम करता का? उदा. किमान ४५ मिनिटे झपझप चालणे, किंवा ३० मिनिटे पोहोणे किंवा कुठलाही पुरेसा शारीरिक व्यायाम.
  3. आंतरजालावर जरूरीपेक्षा जास्त वेळ रेंगाळत रहाता का?
  4. मनापासून अजिबात नको असलेले एखादे काम बराच काळ करत रहावे लागले आहे का? तसे असल्यास त्यापासून लवकरात लवकर बदल कसा मिळवता येईल हे पहा.
  5. सध्या तरी एवढेच सुचते आहे. आणखी काही सुचल्यास कळवेनच.

    चतुरंग

शाहरुख's picture

26 Nov 2009 - 9:41 am | शाहरुख

विनोदी पद्धतीने किंचित अतिशयोक्ती करून सांगितले असले आणि काळजी करण्याचे कारण नसले तरी समस्या खरी आहे.
संध्याकाळी ४-४.३० लाच अंधार पडायला चालू झाल्यापासून बहूतेक असे होतेय..

बाकी व्यायामात नियमितता आणणे, ईंटरनेटवर जास्त न रेंगाळणे यासाठी प्रयत्न चालू आहेतच :-)

स्वाती२'s picture

26 Nov 2009 - 6:13 pm | स्वाती२

>>संध्याकाळी ४-४.३० लाच अंधार पडायला चालू झाल्यापासून बहूतेक असे होतेय..
http://www.gannett.cornell.edu/healthAtoZ/healthAdvice/winterBlues.html

लवंगी's picture

26 Nov 2009 - 7:13 pm | लवंगी

४ ल अंधार पडायला सुरवात झाली कि हे नेहेमीच आहे.. मस्त चियरफुल्ल गाणी ऐका आणी भरपूर लाईट्झ लावा घरात

शाहरुख's picture

27 Nov 2009 - 3:23 am | शाहरुख

धन्यवाद..

धागा उघडून झालेल्या साहित्यिक निराशेबद्दल सगळ्यांचीच माफी.
मा. संपादक मंडळ, हा धागा उडवण्यास धागालेखक या नात्याने माझी कोणतीही हरकत नाही.

बाकी मी हुशार नाही हं..कृपया मला अवघड कोडी घालू नयेत :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Nov 2009 - 11:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शिवायः
अधूनमधून झकासपैकी चॉकलेट + बिनसारखेची कॉफी असा बेत करा!

अदिती

विनायक प्रभू's picture

26 Nov 2009 - 1:51 pm | विनायक प्रभू

१ आणि ४ मधेच खरी गोम आहे.
मनापासुन हवे असलेल्या काम जास्त करताहात म्हणुन तर आळस येत नसेल ना?

पाषाणभेद's picture

26 Nov 2009 - 8:08 am | पाषाणभेद

ज्या प्रमाणे पोटातील वाढलेली चरबी कमी करण्याचे ऑपरेशन करावे लागते त्या प्रमाणे वाढलेला आळसही कमी करण्याचे ऑपरेशन करून घ्या. अधिक माहितीसाठी येथे चौकशी करा.
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी

अमृतांजन's picture

26 Nov 2009 - 8:13 am | अमृतांजन

हशा पिकवा, हशात सामील व्हा आणि पहा सगळा रुख बदलेल.

हर्षद आनंदी's picture

26 Nov 2009 - 8:37 am | हर्षद आनंदी

आळस हा मानसिक रोग आहे, तो घालविण्यासाठी मनाची तयारी महत्वाची.
तुम्ही आळस आला आहे \ येतो \ आळशी बनला आहात, हे मान्य केल्याबद्दल अभिनंदन!!! कारण इथेच तुम्ही अर्धी लढाई जिंकली आहे.

आता ज्या कामाचा आळस येतो तेच काम नव्याने सुरू करा, सगळा आळस निघुन जाईल. उत्साह काय्म टीकविण्यासाठी झेपेल तेवढा व्यायाम \ १ तास चालणे शक्यतो कमीत कमी प्रदुषणाच्या भागात.. अगदी घरात सुध्दा तुम्ही शतपावली करु शकता.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

विजुभाऊ's picture

26 Nov 2009 - 9:45 am | विजुभाऊ

झोपताना रोज अर्धी बाटली कायमचूर्ण ग्लासभर पाण्यातून घेणे.
कोणत्याही प्रकारचे आळसेस घालवण्यासाठी हा एकदम खात्रीशीर उपाय आहे.

प्रमोद देव's picture

26 Nov 2009 - 1:09 pm | प्रमोद देव

झोपताना रोज अर्धी बाटली कायमचूर्ण ग्लासभर पाण्यातून घेणे.

हाहाहाहाहाहा!

सवयी कधीच सुटत नाहीत. काही लोकांच्या बाबतीत... दिसली कविता की कर विडंबन आणि आमच्या बाबतीत......लावा चाल. ;)

आशिष सुर्वे's picture

26 Nov 2009 - 10:13 am | आशिष सुर्वे

कृपा करून बंगलूरू ला यावे..
माझ्या 'बॉस'ला आळस घालवण्याचे बरेच प्रकार माहित असून.. त्याचा मी एकमात्र 'गिनीपिग' आहे.
-
कोकणी फणस

सूहास's picture

26 Nov 2009 - 5:12 pm | सूहास (not verified)

माझ्या 'बॉस'ला आळस घालवण्याचे बरेच प्रकार माहित असून.. त्याचा मी एकमात्र 'गिनीपिग' आहे.>>>

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

सू हा स...

अवलिया's picture

26 Nov 2009 - 11:03 am | अवलिया

पण मी म्हणतो आळसामधे वाईट काय आहे?
त्याच्याबद्दलच चांगल मीच लिहिलं असतं पण जाम आळस आला आहे.

आळशी अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

पण आम्ही शत्रु वरही प्रेम करतो. तुम्ही पण करा.

**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मोहन's picture

26 Nov 2009 - 11:52 am | मोहन

बर्याच दिवसांपासून जर सकाळी ताजेतवाने व संध्याकाळ नंतर निरुत्साही वाटत असल्यास, मेडीकल प्रॉब्लेम असू शकेल. आपल्या डॉ. ला प्रकृती दाखवणे ईष्ट होईल.

मोहन

वाहीदा's picture

26 Nov 2009 - 1:00 pm | वाहीदा

झोप येत नसेल तरीही बिझान्यावर लोळत पडू नका ...

सकाळी लवकर उठून गवतावर अनवाणी चाला... गवतावर पडलेले दवबिंदूच्या स्पर्शाची जाणीव पावलांना होऊद्या !!
ताजी फुले खरेदी करा ... आपली रूम प्रकाशीत मस्त स्वच्छ ठेवा... त्यात ती फुले सजवा ...
कुठेतरी मस्त फिरायला जा !! Lonnnnnnnng Drive, Movie, Deck....Party...Salsa...Dance till you drop ...Dinner...

न आवडणार्या गोष्टींचा विचार ही करू नका... फक्त आवडणार्या व्यक्ती बरोबर पुर्ण दिवस व्यतित करा.... आर डी बर्मन ची गाणी ऐका..
then next day go back to the routine with fresh attitude
simple :-)
~ वाहीदा

Nile's picture

26 Nov 2009 - 1:08 pm | Nile

Take a long break from work and then take a break from the break for a day and work, you will feel awesome! Believe it! ;)

वाहीदा's picture

26 Nov 2009 - 1:32 pm | वाहीदा

How cool is this cool, Dude ?? :?

:-)
~ वाहीदा

टारझन's picture

26 Nov 2009 - 1:49 pm | टारझन

अतिशय उत्तम धागा आणि त्यावर तितक्याच अभ्यासु (आंग्ल असल्याम्हणून काय झालं ? ) प्रतिक्रिया ! व्वा !! खरोखर मजा आली ! इतकी मौलिक माहिती ह्या पद्धतीने मिळू शकेल ह्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता साहेब !
लेखकाचे आभार कसे मानु तेच कळत नाहीये :)
केवळ नतमस्तक .. आमचा प्रणाम स्विकार करावा !

बाकी घोड्यावर खोगीर न घालता १० किलोमिटरची रपेट मारा .. आळस आणि चरबी दोन्ही पटकन गायब होतात असं वाचलंय कुठेसं !

- टारझन

विजुभाऊ's picture

26 Nov 2009 - 2:14 pm | विजुभाऊ

बाकी घोड्यावर खोगीर न घालता १० किलोमिटरची रपेट मारा .. आळस आणि चरबी दोन्ही पटकन गायब होतात असं वाचलंय कुठेसं !
अशाने हल्ली घोडे बारीक होतात असं वाचलय कुठेसं

वाहीदा's picture

26 Nov 2009 - 2:29 pm | वाहीदा

घोडे की रेडे ? ?
मी तर बाई रेड्यांबध्दल ऐकले होते .. ;-)
(Just Kidding no hard feelings plz - आंग्ल प्रतिसाद )
~ वाहीदा

वाहीदा's picture

26 Nov 2009 - 2:30 pm | वाहीदा

घोडे की रेडे ? ?
मी तर बाई रेड्यांबध्दल ऐकले होते .. ;-)
(Just Kidding no hard feelings plz - आंग्ल प्रतिसाद )
~ वाहीदा

टारझन's picture

26 Nov 2009 - 2:44 pm | टारझन

अशाने हल्ली घोडे बारीक होतात असं वाचलय कुठेसं

खुलाश्याबद्दल धन्यवाद विजुबाई !!

असो !

अविनाशकुलकर्णी's picture

26 Nov 2009 - 2:41 pm | अविनाशकुलकर्णी

आळस जाण्याच्या सोपा व फुकटचा उपाय.......आळस येण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरात व्हॅमपायर हे हारमोन्स असतात ज्या मुळे झोपाळु पणा वा आळस येतो ..यावर उपाय म्हणजे ते हर्मोन्स डी अक्टिव्हेट करणे....त्या साठी उठल्या उठल्या घराच्या गॅलरीत जाणे व डोळे टक्क उघडुन ३०-६० सेकंद सुर्याकडे टक लावुन पहाणे...त्या मुळे सुर्याचि सरी उर्जा शरीरात येते... व मन व शरीर एकदम फ्रेश होते..व ति सकाळी मिळालेली उरजा आपणास दिवसभर पुरु शकते..व आळस पळुन जातो....

[PDF]
The 30 Second Secret To Blasting Your Energy Levels Through The ... हे डाउन लोड करा....व आळस पळवा..........

http://www.google.co.in/#hl=en&q=+++30+second++energy&meta=&aq=f&oq=+++3...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Nov 2009 - 3:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वो कुलकर्णीसेठ, काहीही काय? उठल्या उठल्या (घड्याळात) १२ वाजले असतील तर काय ३०-६० सेकंद सूर्याकडे पहायचं? आणि सूर्यात किती ऊर्जा आहे हे माहित आहे का? काहीच्या काही काय?

अदिती

टारझन's picture

26 Nov 2009 - 3:13 pm | टारझन

जादू नाही पाहिला का ? कोई मिल गया मधला ? :)

विजुभाऊ's picture

26 Nov 2009 - 5:15 pm | विजुभाऊ

टार्‍या आता पुन्हा माणसात आला...
.....टारुलता

अर्चिस's picture

27 Nov 2009 - 10:47 am | अर्चिस

स्वताच्या घरातल्या फरश्या कंबर वाकवून रोज कमीतकमी दोनदा पुसून काढा. आळस जाईल व फरश्या देखील स्वच्छ होतील.

स्वानन्द's picture

27 Nov 2009 - 11:44 am | स्वानन्द

हपिसातील तापमान जास्त थंड तर नाही ना? जरा तापमान वाढवून पहा, काही फरक पडतो का? ( एसी चा वापर करून बरं...)
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Nov 2009 - 5:02 pm | llपुण्याचे पेशवेll

छान धागा छान प्रतिसाद. उपाय चांगले चांगले सुचवले आहेत. पण कोणताही १च एका वेळे करा. नाहीतर काहीकाही २ उपाय एकदम केले तर उगाच काम वाढेल.
उदा. झोपताना रोज अर्धी बाटली कायमचूर्ण ग्लासभर पाण्यातून घेणे आणि स्वताच्या घरातल्या फरश्या कंबर वाकवून रोज कमीतकमी दोनदा पुसून काढा. आळस जाईल व फरश्या देखील स्वच्छ होतील.
यात फरशी खराब होण्याचा धोका अधिक.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

ऑफिसत फार कम असत॑ वाट्ट॑ !
सकाळी नाश्ता कमी करत जा !

स॑दीप

काम करायचा क॑टाळा येतो म्हणून ऑफिसला येतो ...