प्रमोदकाकांना मिपाचे संपादकपद..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
19 Nov 2009 - 8:10 pm
गाभा: 

नमस्कार,

आपले एक वरीष्ठ मिपाकर प्रमोदकाका यांनी यापूर्वी मिपाच्या संपादक पदावर काम केले होते. काही कारणांनी मध्यंतरी त्यांनी हे पद सोडले होते.

तरीदेखील पुन्हा एकदा त्यांच्यावर संपादकपदाची जिम्मेदारी टाकण्यात येत आहे आणि त्यांनी ती मान्य करावी अशी त्यांना जाहीर व कळकळची विनंती. तात्याच्या शब्दाखातर ते ती मान्य करतील असा विश्वास!

अलिकडेच वयाने, ज्ञानाने, अनुभवाने खूप वरीष्ठ असणार्‍या एका मिपाकराबद्दल मिपावर अत्यंत खालच्या पातळीवर काही लेखन केले गेले/प्रतिसाद दिले गेले याची मिपाचा मालक या नात्याने मला अत्यंत शरम वाटते! मिपावर असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून थट्टा-मस्करीची लिमिटस् कुठे सुरू होतात, कुठे संपतात याची धुसर रेषा ओळखणार्‍या प्रमोदकाकांसारख्या ज्येष्ठ मिपाकराची संपादक या नात्याने मिपाला या क्षणी अत्यंत गरज आहे..

आणि म्हणूनच प्रमोदकाकांनी पुन्हा एकवार संपादक म्हणून काम पाहावे अशी त्यांना कळकळीची विनंती!

ते ती मान्य करोत अथवा न करोत, मी याच क्षणापासून मिपाच्या संपादकाचे अधिकार त्यांना बहाल करत आहे!

धन्यवाद,

--तात्या अभ्यंकर.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2009 - 8:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देव साहेब, अभिनंदन...!

-दिलीप बिरुटे

अक्षय पुर्णपात्रे's picture

19 Nov 2009 - 8:41 pm | अक्षय पुर्णपात्रे

प्राध्यापक साहेबांसारखेच म्हणतो. श्री देव यांचे अभिनंदन.
_______________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law

सखाराम_गटणे™'s picture

19 Nov 2009 - 8:45 pm | सखाराम_गटणे™

+२

प्रभो's picture

19 Nov 2009 - 8:42 pm | प्रभो

देवकाका, अभिनंदन....आणी संपादकीय कामासाठी शुभेच्छा!! :)

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

विशाल कुलकर्णी's picture

20 Nov 2009 - 1:00 pm | विशाल कुलकर्णी

प्रमोदकाका,

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

अमोल खरे's picture

19 Nov 2009 - 8:52 pm | अमोल खरे

काँग्रॅट्स देव काका.

टारझन's picture

19 Nov 2009 - 8:59 pm | टारझन

देव काकांचे अभिनंदन आणि मिसळपावला शुभेच्छा :)

आमचे सहकार्य नेहमीच राहिले आहे, राहील .

- (शुभेच्छूक) टारझन मित्र मंडळ

सूहास's picture

19 Nov 2009 - 9:00 pm | सूहास (not verified)

म्हणजे दंगामस्ती कमी होणार तर..

असो ..ईकडे तात्या सौताच "देवकाका" असा उल्लेख करतात म्हणुन आम्ही देवआजोबा म्हणणार.

देवाआजोबा , मनपुर्वक अभिनंदन.

सू हा स...

धमाल मुलगा's picture

19 Nov 2009 - 9:12 pm | धमाल मुलगा

पुनःसंपादकपदाबद्दल अभिनंदन :)

मुक्तसुनीत's picture

19 Nov 2009 - 9:13 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो.
अभिनंदन आणि शुभेच्छा.

सुबक ठेंगणी's picture

20 Nov 2009 - 8:49 am | सुबक ठेंगणी

असेच म्हणते.
देवकाकांना हार्दीक शुभेच्छा! :)

निखिल देशपांडे's picture

20 Nov 2009 - 9:41 am | निखिल देशपांडे

असेच म्हणतो
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

प्रसन्न केसकर's picture

20 Nov 2009 - 1:23 pm | प्रसन्न केसकर

अभिनंदन असेच म्हणतो. माझ्याकडुन आवश्यक ते सर्व सहकार्य मिळेलच.

चतुरंग's picture

19 Nov 2009 - 9:15 pm | चतुरंग

काटेरी मुकुटधारी मंडळामध्ये सहर्ष स्वागत!! :D

(खुद के साथ बातां : आता चाली लावता लावता देवकाका अवांतर प्रतिक्रियांची(ही) वाट लावणार तर! ;)(काका ह्.घ्या.) :T )

(काटेरी मुकुटधारी)चतुरंग

गणपा's picture

19 Nov 2009 - 9:23 pm | गणपा

रंगाशेठ हळुच चिमटा काढलात वर हलके घ्या म्हणताय .
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

चतुरंग's picture

19 Nov 2009 - 9:37 pm | चतुरंग

गणपा, तुझ्या जिभेला ना मेल्या हाड कसं ते नाहीच!! #o
गप पडून रहावं पनीर माखनावाला खाऊन ते नाही, करतंय काड्या, करतंय काड्या! X(

(काडीवानदादा)चतुरंग

देवदत्त's picture

19 Nov 2009 - 9:18 pm | देवदत्त

शुभेच्छा

गणपा's picture

19 Nov 2009 - 9:20 pm | गणपा

देवबाप्पा, तात्या एवढ्या कळकळी ने सांगताहेत तर घ्याच हो ही जवाबदारी परत एकदा आपल्या शिरावर.
:)
आपल्या ठोश्याला घाबरुन तरी पोरं दंगा कारायची थांबतात का पाहु ;)

आगाऊ अभिनंदन..
-गणपा.

प्रमोद देव's picture

19 Nov 2009 - 9:37 pm | प्रमोद देव

तात्या फार मोठी जबाबदारी टाकलेली आहेस. खरं तर प्रामाणिकपणाने सांगायचं तर मी ही जबाबदारी स्वीकारणार नव्हतो. पण तू व्यनीतून दिलेला दम वाचून जाम घाबरलोय. ;)
तेव्हा नाईलाजाने ही जबाबदारी स्वीकारतोय. मी माझ्या परीने नक्कीच मिपावरचे वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करेन पण खेळीमेळीत कुणाचाही वैयक्तिक अपमान,टिंगल-टवाळी होणार नाही ह्याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी. इथला प्रत्येक सभासद मग तो वयाने,अनुभवाने मोठा असो अथवा लहान असू दे..त्याची अशी स्वतःची खास ओळख आहे. त्याची स्वतःची अशी एक प्रतिमा आहे.
कृपया त्या प्रतिमेला तडे जाईल,त्या व्यक्तीचा आत्मविश्वास भंग पावेल,त्याच्या आत्मसन्माला धक्का पोचेल इतकी टोकाची टीका त्यावर करू नका. मस्करी करताना त्याची कुस्करी होणार नाही ह्याचंही भान ठेवा अशी कळकळीची विनंती मी सगळ्यांना करतोय.

आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची खात्री आहेच.
तात्या आणि समस्त मिपाकरांना मनःपूर्वक धन्यवाद

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

प्रकाश घाटपांडे's picture

19 Nov 2009 - 10:03 pm | प्रकाश घाटपांडे

मस्करी करताना त्याची कुस्करी होणार नाही ह्याचंही भान ठेवा अशी कळकळीची विनंती मी सगळ्यांना करतोय.

हॅहॅहॅ ! आमी आता आदुगरच काळजी घेतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रभो's picture

19 Nov 2009 - 10:20 pm | प्रभो

>>हॅहॅहॅ ! आमी आता आदुगरच काळजी घेतो.

आम्हीही...म्हणून तर (प्रतिसादांची)"काळजी घेणे" या विभागाचे संपादकपदी टार्‍याची नियुक्ती केलीय..

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

मिसळभोक्ता's picture

19 Nov 2009 - 10:49 pm | मिसळभोक्ता

कृपया त्या प्रतिमेला तडे जाईल,त्या व्यक्तीचा आत्मविश्वास भंग पावेल,त्याच्या आत्मसन्माला धक्का पोचेल इतकी टोकाची टीका त्यावर करू नका. मस्करी करताना त्याची कुस्करी होणार नाही ह्याचंही भान ठेवा अशी कळकळीची विनंती मी सगळ्यांना करतोय.

मीही अशीच विनंती सर्वांना करतो.

देवकाका,

संपादकपदावर नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रकाश घाटपांडे's picture

20 Nov 2009 - 9:19 am | प्रकाश घाटपांडे

वा वा मिभो

मीही अशीच विनंती सर्वांना करतो.

सोतासकट ना?
मंग सही मदी खालील बदल करावा लागन!
(आमच्या कडे सर्व प्रकारच्या दु:खावर निरजण घालुन मिळेल)

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Nov 2009 - 1:19 pm | परिकथेतील राजकुमार

देवबाप्पांचे अभिनंदन आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा.

अवांतर :-

मी माझ्या परीने नक्कीच मिपावरचे वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करेन

तुमच्याकडे 'परी' आहे हे कधी सांगीतलेत नाहित हो या आधी ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्राजु's picture

19 Nov 2009 - 10:16 pm | प्राजु

अतिशय योग्य निर्णय!
अभिनंदन देव काका.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

दिलीप वसंत सामंत's picture

19 Nov 2009 - 10:31 pm | दिलीप वसंत सामंत

यासाठी manogat.com प्रमाणे प्रकाशनपूर्व संपादन हवे. संपादकांनी आपल्या अधिकारात असभ्य, शिवराळ, असंस्कृत असे लिखाण काढून टाकावे. हे ज्याना मान्य असेल त्यांनीच सभासद व्हावे. कोठेतरी बंधन हे हवेच. ३-४ दिवसापूर्वी एका प्रतिसादात काही सभासदानी शिवराळ भाषा वापरली होती. एक सूचना maayboli.com प्रमाणे येथे छायाचित्र सरळ प्रकाशित करण्याची सोय असावी.

चतुरंग's picture

19 Nov 2009 - 10:44 pm | चतुरंग

प्रकाशनपूर्व संपादनाबाबत असहमत आहे. तात्काळ प्रतिक्रिया देता येणे, त्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता नसणे ही मिपाची खासियत आहे आणि त्याचेच आकर्षण सर्व सभासदांना असते. एखाद्या नाटकातल्या भूमिकेला दाद तिथल्यातिथे आणि लगेच मिळण्यातला आनंद ह्यात आहे.
अर्थात त्याचबरोबर ह्या स्वातंत्र्याची एक जबाबदारी सभासदांवरही येते ती म्हणजे प्रतिक्रिया देताना थोडा तरी विचार हवा, अगदीच शिवराळ भाषेत, उगीचच काहीच्या बाही बरळणे, वैयक्तिक चिखलफेक, सारखी टवाळी, धाग्याचा खरडफळा करणे इ. गोष्टींना स्वतःच चाप लावायला हवा ह्या बाबत सहमती.
पूर्वसंपादन जर लादले गेले तर मला व्यक्तिशः अतिशय दु:ख होईल!

चतुरंग

प्रभो's picture

19 Nov 2009 - 10:48 pm | प्रभो

रंगाशेठशी शब्दशः सहमत....
कालच प्रा. डाँ. चा "तात्या मनोगतावर परतला" हा लेख वाचत होतो....त्यातला प्रा. डाँ. चाच एक प्रतिसाद आहे की त्यांनी मनोगत का सोडलं...ते वाचल्यावर मिपाचे वेगळेपण दिसून येतं..

बाकी...चालू द्या..

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

प्रमोद देव's picture

19 Nov 2009 - 10:57 pm | प्रमोद देव

लेख अथवा प्रतिक्रिया ह्या दोन्हीसाठी पूर्वपरवानगी नकोच...असे माझे स्पष्ट मत आहे.
आपण सर्व सदस्यांनीच आपल्यावर एक मर्यादा घालून घेतली तर तीच फार मोलाची गोष्ट ठरेल.

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

टारझन's picture

19 Nov 2009 - 10:58 pm | टारझन

प्रकाशनपुर्व संपादन ????????
त्यापेक्षा तुम्हालाच मायबोली/मनोगतावर मायग्रेट केलं तर ?
च्यायला कसले कसले गुळचाट कुजाट आणि बकवास सोल्युशनं घेउन येतं पब्लिक ..
बाकी लिमीट, पातळी वगैरेची काळजी वहायला तात्यानं समर्थ असे संपादक नेमलेत , आपल्याला काळजी नसावी ...

(चला नविन टार्गेट सापडलं !!)
- डि.व.सा

शेखर's picture

19 Nov 2009 - 11:03 pm | शेखर

(चला नविन टार्गेट सापडलं !!)
सहमत आहे...

मला इथल्या संपादकांवर पुर्ण विश्वास आहे....

शेखर

प्रभो's picture

19 Nov 2009 - 11:09 pm | प्रभो

(चला नविन टार्गेट सापडलं !!) =)) =))

(लांबून मजा बघून मधे-मधे उडी घेणारा)प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

गणपा's picture

20 Nov 2009 - 1:47 am | गणपा

टार्‍या आता या दि.व.सा चे दिवस घालणार वाटते.
दिवस घालणे = बारावे-तेरावे
दिवसा = दिलीप वसंत सामंत

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

-गण्या

अजय भागवत's picture

19 Nov 2009 - 11:13 pm | अजय भागवत

श्री. प्रमोद देव,
अभिनंदन!

आपला एक लेख ह्या प्रसंगी आठवतो- भीमटोला त्याची गरज तुम्हास संपादनात न पडो अशी आशा बाळगतो व पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो.

चित्रा's picture

19 Nov 2009 - 11:18 pm | चित्रा

संपादक पदावरील नियुक्तीबद्दल अभिनंदन.

निमीत्त मात्र's picture

19 Nov 2009 - 11:24 pm | निमीत्त मात्र

अतिशय योग्य निर्णय. सामंतकाका वगैरे जेष्ठ लोक आता पुन्हा मिपावर येऊ शकतील अशी आशा करतो.

धनंजय's picture

19 Nov 2009 - 11:49 pm | धनंजय

अभिनंदन प्रमोदकाका.

शाहरुख's picture

20 Nov 2009 - 12:02 am | शाहरुख

अभिनंदन !!
मिपाच्या संपादक मंडळाची यादी कुठे मिळेल ?

स्वाती२'s picture

20 Nov 2009 - 1:01 am | स्वाती२

अभिनंदन देवकाका.

पाषाणभेद's picture

20 Nov 2009 - 1:49 am | पाषाणभेद

हाबिनंदन बर का काका.
--------------------
काय? घरात वॉल टू वॉल कारपेट टाकायचे नाही? मग घरात स्लीपर वापरा.

पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|

टुकुल's picture

20 Nov 2009 - 5:42 am | टुकुल

अभिनंदन देवकाका (आजोबा)..

पासानभेद बिहारी: पेहले आप टॅग बंद करे

--टुकुल

लवंगी's picture

20 Nov 2009 - 5:37 am | लवंगी

अभिनंदन देवकाका

हर्षद आनंदी's picture

20 Nov 2009 - 6:07 am | हर्षद आनंदी

देवकाका, सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा !!

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

घाटावरचे भट's picture

20 Nov 2009 - 6:08 am | घाटावरचे भट

सर्वप्रथम ट्याग बंद करत आहे.

देवकाकांना शुभेच्छा!!

सहज's picture

20 Nov 2009 - 7:07 am | सहज

> थट्टा-मस्करीची लिमिटस् कुठे सुरू होतात, कुठे संपतात याची धुसर रेषा ओळखणार्‍या प्रमोदकाकांसारख्या ज्येष्ठ मिपाकराची संपादक या नात्याने मिपाला या क्षणी अत्यंत गरज आहे..

थट्टा-मस्करी का होते (आपण काय लिहतो / रेटत असतो) व कशी करावी (तात्याला शरमिंदा न करता) हे कृपया "सर्व" संबंधीतांनी लक्षात घ्यावे. प्रमोदकाकांना कमीत कमी त्रास द्यावा ही विनंती.

मिपावरचे खेळीमेळीचे वातावरण कायम टिकून राहील याकरता तुर्क व अर्क दोघांनी प्रयत्न करावे.

टारझन's picture

20 Nov 2009 - 9:47 am | टारझन

प्रमोदकाकांना कमीत कमी त्रास द्यावा ही विनंती.

च्यायला .. सहजकाका भलताच चालू हो ;) असो... त्रास देऊ ... पण तो कमीत कमी देण्याचा नक्कीच प्रयत्न करू ;)

-(स)हजयात्री

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Nov 2009 - 1:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो सहजकाका, तुर्कांचं वय आणि अर्कांना सवय झाली आहे... सवयी सुटणं अंमळ कठीण असतं.
बाकी जगरीतीप्रमाणे श्री. देव यांचे अभिनंदन.

अदिती

सुनील's picture

20 Nov 2009 - 7:22 am | सुनील

देवकाकांचे अभिनंदन!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नंदन's picture

20 Nov 2009 - 7:30 am | नंदन

अभिनंदन, प्रमोदकाका!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

sujay's picture

20 Nov 2009 - 8:33 am | sujay

चांगल्या "चालीचे" संपादक देव काकांचे अभिनंदन !!!

वैधानीक ईशारा-समस्त मिपाकरांनी भिमटोल्यापासून सावध रहावे

सुजय

विकास's picture

20 Nov 2009 - 8:41 am | विकास

अभिनंदन प्रमोदराव! लवकर सामील व्हा :-)

एकलव्य's picture

20 Nov 2009 - 8:46 am | एकलव्य

अभिनंदन आणि शुभेच्छा!

अवलिया's picture

20 Nov 2009 - 9:10 am | अवलिया

म्हणजे आता मिपा देवाच्या भरवशावर तर !

आता सदस्यांना भारतीय राजकारण्यांचे वय झाले त्यांनी निवृत्त व्हावे अशी टिका करता येणार नाही. असो.

देवबाप्पा ... अभिनंदन !! :)

एखादी चाल जमली नाही तर तिचा राग आमच्या एखाद्या लेख वा प्रतिसादावर काढु नका म्हणजे मिळवली ;)

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

दशानन's picture

20 Nov 2009 - 9:16 am | दशानन

+१ !

असेच म्हणतो.

श्री. देव ह्यांचे अभिनंदन !

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Nov 2009 - 9:14 am | llपुण्याचे पेशवेll

देवकाकांचे अभिनंदन. संपादनाच्या क्षेत्रात दुसरी इनिंग खेळायला येणारे देवकाका सुनिल गावस्कर (सचिन छ्या!)प्रमाणे भासत आहेत.

(वरच्या -खालच्या पुढच्य मागच्या धूसर रेषा जिथे संपतात तिथून सुरु होणारा)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Nov 2009 - 9:28 am | बिपिन कार्यकर्ते

मनःपुर्वक अभिनंदन काका !!!

बिपिन कार्यकर्ते

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Nov 2009 - 9:55 am | ब्रिटिश टिंग्या

मनःपुर्वक अभिनंदन काका !!!

ब्रिटिश टिंग्या

अविनाशकुलकर्णी's picture

20 Nov 2009 - 10:12 am | अविनाशकुलकर्णी

देव पावला,,,,,,

समंजस's picture

20 Nov 2009 - 10:24 am | समंजस

देवकाका अभिनंदन!!

श्रीयुत संतोष जोशी's picture

20 Nov 2009 - 10:30 am | श्रीयुत संतोष जोशी

देवकाका ,
संपादकपदाबद्दल हार्दिक अभिनंदन.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

jaypal's picture

20 Nov 2009 - 10:49 am | jaypal

देवकाका म्हणतात ते आगदी बरोबर " मस्करीची कुस्करी व्हायला नको"
नेमणुकिवर खुश(झालेला)मस्क-या
जयपाल

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पर्नल नेने मराठे's picture

20 Nov 2009 - 11:04 am | पर्नल नेने मराठे

गागो =))
चुचु

jaypal's picture

20 Nov 2009 - 12:03 pm | jaypal

किती हरखली आहे पहा.
आनंद पोटात मझ्या माईना..माईना
आनंद पोटात मझ्या माईना
**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

दिलीप वसंत सामंत's picture

20 Nov 2009 - 1:15 pm | दिलीप वसंत सामंत

प्रशासक व संपादक यांस,
कृपया माझे येथील सभासदत्व रद्द करावे. मी पुन्हा येथे येणार नाही. तसेच माझ्या दिवसांची कोणी काळजी करू नये.
नमस्कार, येतो,
चुकलो, जातो.

विसोबा खेचर's picture

20 Nov 2009 - 1:40 pm | विसोबा खेचर

प्रशासक व संपादक यांस,
कृपया माझे येथील सभासदत्व रद्द करावे. मी पुन्हा येथे येणार नाही. तसेच माझ्या दिवसांची कोणी काळजी करू नये.
नमस्कार, येतो,
चुकलो, जातो.

अहो काय झालं? असं मनावर घेऊ नका. र्‍हावा की इथंच.. पायजेल तर मी स्वत: आपली मनापासून क्षमा मागतो..

तात्या.

jaypal's picture

20 Nov 2009 - 1:50 pm | jaypal

तात्याशी सहमत
र्‍हावा की इथंच..
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन's picture

20 Nov 2009 - 2:03 pm | टारझन

तात्याला माझ्यामुळे क्षमा मागावी लागल्याने मला आज स्वतःचीच शरम वाटते .. :(

मिसळपावचा मनोगत/उपक्रम करण्याच्या विचाराव लिहीलेला तो एक उत्स्फुर्त प्रतिसाद होता ..

एकाच प्रतिसादात पत्ता कट करा म्हणनारे व्यक्तिमत्व पहिल्यांदाच पाहिले !
असो !!
दिवसा इथे राहिले किंवा नाही राहिले ह्याने आम्हाला फरक पडत नाही .. पण त्यांच्या वर नमुद केलेल्या (फालतु) सुचना इथे नकोत एवढेच वाटते .. बाकी निर्णय तात्यावरंच आहे म्हणा :)

- (एक्स्लुझिव मिपाकर ) टारझन

कवटी's picture

20 Nov 2009 - 2:11 pm | कवटी

एकाच प्रतिसादात पत्ता कट करा म्हणनारे व्यक्तिमत्व पहिल्यांदाच पाहिले !
ते ही ४३ आठवडे मिपा वर राहुन्.. गम्मत आहे नै?

(रात्री)कवटी

कवटी's picture

20 Nov 2009 - 1:41 pm | कवटी

टार्‍या.... रांजणात कितवा दगड टाकलास?
कवटी