मेक्सिकन हॉट चॉकलेट

स्वाती२'s picture
स्वाती२ in पाककृती
12 Nov 2009 - 1:29 am

गणपा यांच्या कोल्ड कॉफी मुळे जीभ तर चाळवली पण बाहेर थंडी. तेव्हा कोल्ड कॉफी एवढेच मला प्रिय असलेले हॉट चॉकोलेट केले. या वेळचे चॉकोलेट मिक्स थोडे वेगळे. घरी बनवलेले, मेक्सिकन चवीचे. ही पाकृ आहे इझाबेलाज कॅंटिना मधली. बघा आवडतेय का.
चॉकोलेट मिक्स
साहित्य
१ कप सेमीस्वीट चॉकलेट चिप्स
१/२ कप साखर
१ टे. स्पून दालचिनी पावडर

कृती
सर्व एकत्र करुन ग्राइंडर मधून बारीक पावडर करुन घ्या. हवाबंद डब्यात भरून ठेवा.

हॉट चॉकोलेट
साहित्य
१ कप दूध
२ टे. स्पून चॉकोलेट मिक्स
कृती
भांड्यात दूध आणि चॉकोलेट मिक्स एकत्र करा. मध्यम आचेवर गरम करत ठेवा. सतत ढवळत रहा. वाफा येइतो गरम करा. दुधावर फेस आला पाहिजे. कपात ओता.
किंवा माझ्यासारखे आळशी असाल तर
थोडसं दूध आणि चॉकलेट मिक्स कपात घ्या. चमच्याने ढवळुन मायक्रोव्हेव मधे १० सेकंद गरम करा. चमच्याने चांगल घोटा. उरलेले दूध घालुन ढवळा. आता परत मायक्रोव्हेव मधे २० सेकंद गरम करा. बाहेर काढून ढवळा.असेच अजून दोनदा १५-२० सेकंद गरम करणे आणि ढवळणे करा.

एंजॉय!

प्रतिक्रिया

रेवती's picture

12 Nov 2009 - 2:41 am | रेवती

कोल्ड कॉफी करायचा सिझन गेला असल्याने आमची सोय करण्याचा प्रयत्न फारच आवडला. चांगली पेयकृती. नाटक्या साहेबांच्या पेयांना टक्कर देइल असे पेय आहे हे!;)

रेवती

लवंगी's picture

12 Nov 2009 - 2:56 am | लवंगी

आजच बनवते!! यात वरुन थोडे मार्शमेलो घातले तर एवन..

स्वाती२'s picture

12 Nov 2009 - 5:10 pm | स्वाती२

यात वरुन थोडे मार्शमेलो घातले तर एवन..
येस्स! किंवा पेपरमिंट फ्लेवरची कँडीकेन पण मस्त जमते. स्टरर म्हणून दिसतेही छान!

आशिष सुर्वे's picture

12 Nov 2009 - 9:47 am | आशिष सुर्वे

झक्कास.. चॉकलेट हा आमचा कच्चा बिंदू (विक प्वाईंट)..
छान पाकृ आहे...

एका थोड्याश्या वेगळया प्रकारे केल्यास ह्यात थोडीशी दालचिनी पावडर आणि चिमूटभर मिरची पावडरही घालतात..
पहा एकदा प्रयत्न करून!! :)

-
कोकणी फणस

मसक्कली's picture

12 Nov 2009 - 12:33 pm | मसक्कली

हे ही आवडले... :)

=D>

गणपा's picture

12 Nov 2009 - 12:54 pm | गणपा

हं यम यम् लहानपणीची आठवण जागी केलीस :)