दिवाळी अंक २०१७ - पूर्वतयारी

आदूबाळ's picture
आदूबाळ in गटसाहित्य
14 Aug 2017 - 2:52 pm

नमस्कार!

यंदाच्या दिवाळी अंकाच्या पूर्वतयारीसाठी हा धागा.

विषय
"व्यक्तिचित्रं" हा विषय सुचला आहे. हा विषय कसा वाटतो आहे यावर आपली मतं प्रतिसादात द्या.

तारखा
वसुबारसः सोमवार १६ ऑक्टोबर
∴ अंक प्रकाशनः रविवार १५ ऑक्टोबर
∴ एक आठवडा आधी अंक प्रकाशनासाठी तयार पाहिजे - सोमवार ९ ऑक्टोबर
∴ लेख देण्याची शेवटची तारीख - शनिवार ३० सप्टेंबर

टीम्स आणि प्रक्रिया
दिवाळी अंकात सासंबरोबर इतरांचा सहभागही असतो (आणि असायला पाहिजे). दर वेळी काही स्वयंसेवक आपणहून सामील होतात. त्यासाठी अंकाचं सगळं काम "मिपासंवाद"मध्ये करावं असं वाटतं. (नीलकांत / प्रशांतने सेपरेट "अंकचावडी" काढून दिली तर बेस्टच.)

दिवाळी अंक टीम ही एकत्र काम करत असली तरी त्यांच्यात कामानुसार उपटीम्स असतात. प्रत्येक चमूत कोणाला काम करायचं असल्यास कृ० खाली प्रतिसादात तसं कळवणे.

लेखन चमू
या चमूचं काम म्हणजे आलेलं लेखन अंकापर्यंत पोचवणे.

प्रक्रिया: लेखन येणे --> लेखकाला पोच देणे --> मिपासंवादमध्ये प्रकाशन करणे --> मिपासंवादमध्ये मतदान (घेणे / न घेणे, चित्र हवं / नको) --> मुशो --> फायनल प्रकाशनयोग्य धागा बनवणे (डेडलाईन ३० सप्टेंबर)

नूलकरकाका नेहेमी मुशो करतात. काका - यंदाही करू शकाल ना?

सजावट चमू
या चमूचं काम म्हणजे अंकात चित्रं, बॉर्डर, सजावट वगैरे करणे. अंकाच्या जाहिराती आणि मुखपृष्ठही.

प्रक्रिया: चित्र/सजावट सुचवणे --> मिपासंवादमध्ये सगळ्यांची मतं घेणे --> चित्र/सजावट बनवणे --> फायनल धाग्यात घालणे (डेडलाईन ३० सप्टेंबर)

अभ्या गेली काही वर्षं हे करतो आहे. यंदा नीमोही सासंमंमध्ये आल्याने हा चमू दणकट झाला आहे.

प्रसिद्धी चमू
या चमूचं काम म्हणजे अंकाची प्रसिद्धी मिपावर आणि मिपाबाह्य ठिकाणी करणे.

प्रक्रिया: सजावट चमूबरोबर जाहिराती / राईटप फायनल करणे --> ते विविध ठिकाणी झळकवणे

वेल्लाभट फेसबुक पानाची जबाबदारी बघतात. दिवाळी अंकासाठी हे काम हाती घेऊ शकाल का?

तांत्रिक चमू
या चमूचं काम म्हणजे धागे फायनल झाल्यावर त्यावरच्या प्रतिक्रिया हटवून प्रकाशित करणे. तसंच, अन्य टीमना काही तांत्रिक अडचण आल्यास त्या सोडवणे.

प्रशांत - सालाबादप्रमाणे हे कराल ना?

------------
प्रत्येक सासंने किमान एका तरी चमूमध्ये सहभागी व्हावं असं सुचवतो.

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

15 Aug 2017 - 10:20 am | जव्हेरगंज

लेखन चमू +1

अभ्या..'s picture

15 Aug 2017 - 12:15 pm | अभ्या..

नमस्कार,
अत्यंत अल्टिमेट आणि जबरदस्त आणि प्रचंड आवडता विषय आहे. अप्रतिम देखणा होईल हा विषेषांक ह्यात शंका नाही. कल्पनाच इतकी भारी जमतेय की अह्ह्ह्ह्हा, कधी एकदा वाचायला मिळतेय असे झालेय. थ्यांक्स आदूबाळा.
आता जबाबदार्‍या.
१) अ‍ॅज अ फुटकळ लेखक (विनय, विनय) मी एखादी जिल्बी पाडू शकेन. त्यासाठी मला गृहित धरायला हरकत नै.
२) अ‍ॅज अ सजावट. कव्हरपेज करु शकेन पण इतर वर्षीप्रमाणे मी काहीच उपल्ब्ध असु शकणार नाहीये. माझा एक व्यवसाय नव्याने सुरु झाल्यामुळे आणि घरगुती जबाबदार्‍यामुळे मी कव्हर सोडून कशातच कुठल्याच पध्दतीने योगदान देऊ शकणार नाहीये, क्षमस्व. (अ‍ॅक्चुअली मला फार वाईट वाटतेय ह्याच आवडत्या विषयाच्या अंकावेळी माझा प्रॉब्लेम आल्याने पण नाईलाज आहे)
३) अ‍ॅज अ जाहीरात. सेम २ रे कारण. :(
तरीही नीमो रंगभुषा व सासं मंडळात असल्याने काही प्रॉब्लेम येणार नाही ह्याची खात्री आहे.
धन्यवाद

सुधांशुनूलकर's picture

15 Aug 2017 - 8:54 pm | सुधांशुनूलकर

नूलकरकाका नेहमी मुशो करतात. काका - यंदाही करू शकाल ना? असं विचारायचं नसतं, 'करा' असं सांगायचं असतं. ते अध्याहृत असतं.
करणारच.

काही अपवादात्मक परिस्थितीत ५ ऑक्टोबरपर्यंत लेख स्वीकारता येतील.

एस's picture

20 Aug 2017 - 12:50 pm | एस

एव्हढं श्रीगणेश लेखमालेचं काम मार्गी लागलं की इकडे लक्ष देतो.

आदूबाळ's picture

30 Aug 2017 - 6:52 pm | आदूबाळ

मिपाचा दिवाळी अंक टप्प्याटप्प्यात प्रसिद्ध व्हावा अशी मागणी अनेकजण करताहेत. (गेल्या वेळी ही कल्पना सुचवल्यावर "त्या ऐसीच्या अंकासारखं आपल्याला काही नको!" असं सांगण्यात आलं होतं!)

मला व्यक्तिशः आठवडाभर किंवा पंधरवडाभर हळुहळू अंक येण्यात काहीच गैर वाटत नाही. उलट याने आपलं काम सोपंच होईल.

बाकी मंडळींचं काय मत?

(विषय आणि इतर गोष्टींप्रमाणे यावरही मत नोंदवावं.)

एस's picture

30 Aug 2017 - 8:13 pm | एस

सहमत आहे. एकेका दिवशी एकेक लेख प्रकाशित केल्यास सर्व लेख वाचले जातील आणि पुरेसा न्याय मिळेल.

प्रशांत's picture

1 Sep 2017 - 8:40 pm | प्रशांत

नीलकांत / प्रशांतने सेपरेट "अंकचावडी" काढून दिली तर बेस्टच.

पहिला लेख येण्याच्या आधी करुन देतो

तुम्हाला सगळ्यांना ओके असेल, तर उद्या/परवा मिपासंवादमध्ये हा धागा टाकतो. विषयाबद्दल किंवा अन्य काही सुचवण्या असतील तर त्या लवकरात लवकर कराव्यात.

पद्मावति's picture

5 Sep 2017 - 2:50 pm | पद्मावति

आता लवकरात लवकर आवाहानाचा धागा येऊ द्यावा.
लेख
कविता
व्यक्तीचित्रे ( ही मुख्य थीम ठेवायची हे ठरले आहे ना?)
प्रवास वर्णन
कथा
पाककृती
अशा प्रकारच्या साहित्य प्रकारामधे लेखांचे आवाहन करू.
या आठवड्या अखेर आवाहानाचा धागा काढायचा का? म्हणजे लोकांना लिहायला पुरेपूर वेळ मिळेल आणि आपल्याला उत्तम लेख निवडायचे स्वातंत्र्य.
मला व्यक्तिशः आठवडाभर किंवा पंधरवडाभर हळुहळू अंक येण्यात काहीच गैर वाटत नाही. उलट याने आपलं काम सोपंच होईल.

अनुमोदन.

जव्हेरगंज's picture

5 Sep 2017 - 5:13 pm | जव्हेरगंज

+1
व्यक्तिचित्रे ही थीम आवडली आहे!!!

जव्हेरगंज's picture

5 Sep 2017 - 5:13 pm | जव्हेरगंज

+1
व्यक्तिचित्रे ही थीम आवडली आहे!!!

पद्मावति's picture

5 Sep 2017 - 9:09 pm | पद्मावति

तुम्हाला सगळ्यांना ओके असेल, तर उद्या/परवा मिपासंवादमध्ये हा धागा टाकतो. नेकी और...हो प्लीज काढाच धागा.

आदूबाळ's picture

6 Sep 2017 - 7:40 am | आदूबाळ

झकास. आजच काढतो मग.

पद्मावति's picture

6 Sep 2017 - 1:12 pm | पद्मावति

मस्तच आदूबाळ. मी लेखन चमु मधे योगदान देऊ शकीन नक्कीच. तसेच प्रसिद्धी चमु मधे पण माझा सहभाग असेलच. मी फेसबूक पेज गेल्या काही महिन्यापासून बघतेय बरेचसे ते दिवाळी अंकासाठी सुद्धा बघीनच. वेल्ला ट्विटर हॅंडल करतात. जाहीर आवाहानाचा धागा लवकरच काढू. मे बी आज उद्यातच.

वेल्लाभट's picture

6 Sep 2017 - 9:32 pm | वेल्लाभट

मला आवडेल
मी फेसबुक वर नसतो विशेष, ते पैसा, अजया, पद्मावती बघतात. मी ट्विटर बघू शकतो. प्रसिद्धीसाठी कॉपी लिहू शकतो आणि इतर काही कल्पक सुचवू शकतो जसं मला सुचेल तसं.

व्यक्तीचित्रासाठी एक कल्पना :

या विषयावर जे धागे येतील, त्यांच्या लेखकांकडून धाग्यातील वर्णन केलेल्या व्यक्तीचा एखादा फोटो मागवता आला, आणि त्याचं व्यंगचित्र जर सजावट चमूपैकी कुणी काढू शकलं तर बहार येईल असं वाटतं. (मूळ फोटो सार्वजनिक न करणं हे अध्याऋत)

जव्हेरगंज's picture

8 Sep 2017 - 1:38 pm | जव्हेरगंज

रुपी Sep 7
मिटवा Block
नमस्कार!

दिवाळी अंकाबद्दलचे आवाहन पाहिले. प्रथमतः त्यासाठी धन्यवाद आणि अंक जोरदार व्हावा यासाठी शुभेच्छा!

त्यातल्या तिसर्‍या सूचनेच्या संदर्भात शंका आहे. एका व्यक्तिचित्राबद्दल लिहायचा विचार करत आहे. बीभत्सपणा नाहीये, पण जरा दु:ख, कारुण्य अशी छटा असलेलं व्यक्तिचित्र चालेल का? की आनंदीच हवं आहे?

आणखी एक प्रश्न - प्रतिसादात एस भाऊंनी लिहिलं आहे की हे उपक्रम मिपाचे, मिपाकरांचे असतात.
तरीही मिपावर आयडी नसलेल्यांचे लेखन स्विकारणार असे का? तक्रार म्हणून नाही, पण यामागचे विचार जाणून घ्यायची खरोखर इच्छा आहे.

धन्यवाद,
- रुपी

एस's picture

8 Sep 2017 - 11:47 pm | एस

दुसऱ्या भागाचे उत्तर असे आहे की मिपाचा कुठलाही उपक्रम हा सर्वच मिपापरिवाराचा असतो. तो अमुक एका आयडीचा किंवा फक्त संयोजकांचा वगैरे नसतो. अर्थात ज्याचे त्याचे श्रेय ज्याला त्याला दिलेच पाहिजे. परंतु एखाद्या उपक्रमाचा किंवा विशेषांकाचा उल्लेख हा सतत कुणा विशिष्ट सदस्यांच्या नावाने जाणीवपूर्वक केला जातो तेव्हा त्यामागे काहीशा तुच्छतेची छद्मी छटा असते असे दिसून येते. अशाने आंतरजालावरील सहकार्याचे आणि संघभावनेचे विधायक वातावरण बिघडते. हे आंतरजालाच्या वा संस्थळाच्या विकासासाठी हानिकारक आहे.

याचा कसलाही संबंध मिपासदस्य नसल्यांचे लेखन मिपाच्या उपक्रमात समाविष्ट करण्याशी दुरान्वयानेही नाही. मिपावर अधिकाधिक लोक वाचन-लेखन करण्याच्या योगे यावेत आणि ही संख्या वृद्धिंगत होत राहावी हा चांगला हेतू अ-मिपाकरांचे लेखन स्वीकारण्यामागे असतो.

एस's picture

9 Sep 2017 - 12:01 am | एस

मी रुपी यांना व्यनि केला आहे. तेव्हा सासंने दुसऱ्या प्रश्नासंबंधी उत्तर न दिले तरी चालण्यासारखे आहे.

कारुण्य वा दुःखद स्वरूपाचे व्यक्तिचित्र दिवाळी अंकात चालेल की नाही यावर मिपासंवादमधील धाग्यात अधिक चर्चा व्हायला हवी. लेखनचमू काय ठरवेल ते मला मान्य असेल.

नीलमोहर's picture

9 Sep 2017 - 9:24 pm | नीलमोहर

नेहमीप्रमाणेच असेल ते काम करायची तयारी आहे :)

नीमोताई तुम्हाला मिपासंवादला अॅक्सेस आहे का?

नीलमोहर's picture

11 Sep 2017 - 10:14 pm | नीलमोहर

हो आहे, तिथे बरीच चर्चा झालेली दिसत आहे, वाचत आहे.

प्रशांत's picture

18 Sep 2017 - 11:36 am | प्रशांत

दिवाळी अंकाचे लेख http://www.misalpav.com/node/add/diwali-anka-chawadi या लिंक वरुन बनवता येतील

सर्व लेख बघण्यासाठी
ही http://www.misalpav.com/ankchawadi.html लिंक वापरा

तिथे काहीच दिसत नाहीये. अजून लेख टाकलेले नाहीत का?

वेल्लाभट's picture

19 Sep 2017 - 12:52 pm | वेल्लाभट

मला पण रिकामं पान दिसतं

सुधांशुनूलकर's picture

19 Sep 2017 - 2:11 pm | सुधांशुनूलकर

काही तांत्रिक अडचण होती. मला अ‍ॅक्सेस डिनाइड असं येत होतं. प्रशांतला कळवलं. त्याने दुरुस्त केलंय, मला अ‍ॅक्सेस मिळाला आहे.
आता आज रात्री विशेषांक चावडीत लेख टाकतो.