श्रीगणेश लेखमाला २०१७

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in गटसाहित्य
3 Jul 2017 - 10:53 pm

श्रीगणेश लेखमाला २०१७ च्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे.

लेखमालेचा विषय : आयुष्यात घडलेल्या चुका आणि त्यातून कसा मार्ग काढला वगैरे.. (वेगळा विषय सुचला तर जरूर कळवा)

निवडक मिपाकरांना व्यनी करून लेख मागवायचे आणि गणपती आल्यावर प्रत्येक दिवशी एक प्रकाशित करायचा. (हे असेच चालत आलंय बहुदा... हे योग्य की जाहिर आवाहनाचा धागा काढायचा?)

जाहीर आवाहन केल्यावर एकसे एक लेख येतील असे वाटतेय. संख्या जास्त झाल्यास निवड करू अथवा दरदिवशी दोन लेख प्रकाशित करण्याचा पर्याय आहेच.

बाकी धाग्याचा अथवा व्यनीचा मसुदा आणि बाकी चर्चा प्रतिसादात करूच. इथे जास्त काही लिहीत नाही.

श्री गणेश चतुर्थी तारीख : २५.८.२०१७
अनंत चतुर्दशी : ५.९.२०१७
एकूण दिवस :१२

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

19 Aug 2017 - 11:47 pm | जव्हेरगंज

सासं आयडीला चावडीचा access नाही.

एस's picture

20 Aug 2017 - 3:48 am | एस

:-) :-) :-)

एक काम करता का जव्हेरभाऊ, सासं आयडीला आलेले लेख इथे तुमच्या आयडीने कॉपी करून प्रकाशित करा. म्हणजे नूलकरसर इथेच मुशो करू शकतील. प्रत्येक लेखासाठी नवीन धागा काढायचा. ते त्याच धाग्याचे संपादन करून धाग्यातच मुशो करतील.

बादवे, आत्तापर्यंत किती लेख प्रत्यक्षात आले आहेत आपल्याकडे?

नीलमोहर's picture

20 Aug 2017 - 10:24 pm | नीलमोहर

आतापर्यंत चार लेख आलेले आहेत.

एस's picture

21 Aug 2017 - 12:10 am | एस

मला वाटते आबा, श्रीरंगपंत आणि पिराताई यांच्याकडून लेख येणे बाकी आहे. साहित्य-संपादक आयडीने त्यांना एकदा व्यनि करून आठवण करून द्यावी का?

@आबा, तुम्ही लिहिताय ना?

आदूबाळ's picture

21 Aug 2017 - 1:52 pm | आदूबाळ

हो - लिहितो. एका कथास्पर्धेसाठी कथा लिहिण्यात वीकांत गेला. लौकरात लौकर देतो.

आदूबाळ's picture

21 Aug 2017 - 6:48 pm | आदूबाळ

चावडीत प्रकाशित केलं आहे.

एस's picture

20 Aug 2017 - 3:54 am | एस

रंगभूषामंडळ, @अभ्याशेठ आणि निमोताई, तुम्ही सजावटीचे काय ते ठरवले असेलच. ते काही सांगण्याची गरज नाही. :-)

नीलमोहर's picture

22 Aug 2017 - 10:25 pm | नीलमोहर

श्रीगणेश लेखमाला : प्रस्तावना

नमस्कार वाचक मित्रहो,

श्रीगणेशचतुर्थीचा योग साधून दर वर्षीप्रमाणे श्रीगणेश लेखमाला आपल्यासमोर सादर होत आहे. इतर अनेक उपक्रमांप्रमाणेच ही लेखमाला मिपाचे खास वैशिष्ट्य ठरत आली आहे. लेखमालेसाठी लेख पाठविण्याच्या आवाहनाला मान देऊन आवर्जून लेखन पाठविणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.
वाचकांनीही लेखमालेचा आस्वाद घ्यावा आणि आपले अभिप्राय नोंदवावेत ही विनंती.

लेखमालेचा या वर्षीचा विषय आहे, 'माझा मी जन्मलो फिरुनी.'
प्रस्तुत विषय जेव्हा आवाहन धाग्यात मांडण्यात आला, तेव्हा अनेकांनी त्याबद्दल शंका व्यक्त केली, विषयाच्या सयुक्तिकतेबद्दल संदेह मांडण्यात आले.
काहींना हा विषय अहंमन्यता, मीपणा, आत्मस्तुती या गोष्टींना खतपाणी घालणारा वाटला. हा समज चुकीचा की बरोबर, ते लेख पाहून लक्षात येईलच.
सदर विषयातून नक्की कशा प्रकारचे साहित्य अपेक्षित होते, ते आलेल्या लेखांतून सोदाहरण स्पष्ट होईल अशी आशा आहे.

जुन्या गोष्टी, आचार-विचार, विकार, रिती, पद्धती, अप्रासंगिक ते सर्व मागे सोडून नव्या विचारसरणीचा अंगीकार, तसेच आयुष्यात कुठल्याही प्रकारे केलेला सकारात्म बदल म्हणजेही नव्याने जन्म. दर वेळी आयुष्य बदलण्यास एखादी मोठी घटना, कलाटणी कारणीभूत असेल असे नाही. ज्या क्षणी माणूस त्याच्या आताच्या जगण्यास सुसंगत नसलेल्या गोष्टींचा त्याग करून उपयुक्त गोष्टींचा स्वीकार करत पुढे जातो, तोच त्याचा पुनर्जन्म म्हणता येईल.
अगदी पाच वर्षांपूर्वी आपण कसे होतो, तेव्हाचे आपण आणि आताचे आपण यात किती फरक आहे, असा विचार केला तरी आपल्याला कळून येते की आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आपल्यात अनेक प्रकारे बदल होत जातात, जुने विचार बदलत जाऊन त्यांची जागा नवीन विचार घेतात, राहणीमान, जीवनशैली यातही बदल होत राहतात. या सर्वांतून एक नवीन 'मी' दर क्षणी घडत असतो आणि तसा तो घडलाही पाहिजे. अखेर बदल हा आयुष्यातील एकमेव स्थायिभाव आहे.

फिरून जन्म होणे, चुकांमधून मार्ग काढत पुढे जाणे यातून भव्य-दिव्य असे काही अभिप्रेत नाही. यात कुणा थोर व्यक्तींच्या, सेलिब्रिटीजच्या, ख्यातकीर्त लोकांच्या आयुष्यातील रोचक घटना असाव्यात, कुणी काही जगावेगळे अनुभव, किस्से सांगावेत असेही गरजेचे नाही. अतिसामान्य लोकांच्या आयुष्यातही अशा काही घटना घडतात की त्यांना स्वत:मधील, स्वत:सही जाणीव नसलेले सुप्त गुण बाहेर आणून प्राप्त परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढे मार्गक्रमण करावे लागते. अशाच काहीअनुभवांचा या वर्षीच्या लेखमालेत समावेश आहे.

विषयानुरूप उदाहरणे द्यायची, तर कुणी असाध्य आजारावर, अपघातावर मात करतो, कुणी नोकरीतील चाकोरीबद्ध साचलेपणातून बाहेर पडून नवी वाट चोखाळू पाहतो. कुणी स्त्री आलेल्या संकटांवर, परिस्थितीवर मात करत स्वयंसिद्ध बनू पाहते. कुणी गरिबीचे चटके सोसून स्वकष्टाने एक संपन्न आयुष्य घडवितो, कुणी आपल्या परिस्थितीची जाण ठेवून, समाजाला आपण काही देणे लागतो याचे भान ठेवून आपण मिळविलेली संपत्ती समाजाला परत करू पाहतो.... अशा अनेक उदाहरणांतून 'फिरुनी जन्मणे' हा लेखमालेचा विषय योग्य प्रकारे स्पष्ट होईल असे वाटते.

प्रत्येक व्यक्ती ही सामान्यच असते; मात्र काही वेळा अशा येतात, जेव्हा त्या व्यक्तीला ठरावीक चौकटीतून बाहेर पडून, आपल्यातील ताकद, क्षमता पूर्णपणे वापरून वेगळ्या वाटा निवडून त्यावरून चालावे लागते. हीच ती वेळ असते जेव्हा त्या सामान्यांतील असामान्यत्व ठळकपणे दिसून येते आणि त्यांच्याबरोबर इतरांचेही आयुष्य उजळून टाकते.

असेच काही सामान्यांतील असामान्यत्व दाखविणारे अनुभव आपल्यासमोर ठेवण्यास आम्हांस अत्याधिक आनंद होत आहे.
तरी सर्वांनी लेखमालेचा आस्वाद घ्यावा आणि आपले अभिप्राय अवश्य नोंदवावेत, ही पुन्हा एकदा विनंती.

चला तर मग, जयदीप साहनींच्या या अत्यंत सुंदर आणि प्रभावी शब्दांसह लेखमालेस आरंभ करू या.

उलझे नहीं तो कैसे सुलझोगे,
बिखरे नहीं तो कैसे निखरोगे,

उड़ने दो..

हवा ज़रा सी लगने दो,
सोया था अब जगने दो,
पंखों को हवा ज़रा सी लगने दो..

एस's picture

20 Aug 2017 - 11:03 pm | एस

समर्पक आहे. काही किरकोळ मुशो करण्याची आवश्यकता आहे. हाही प्रतिसाद नवीन लेख म्हणून इथे स्वतंत्र धाग्याच्या रूपाने नोंदवा. नूलकरसर त्याचे मुशो करून ठेवतील.

सुधांशुनूलकर's picture

21 Aug 2017 - 5:25 pm | सुधांशुनूलकर

हाही प्रतिसाद नवीन लेख म्हणून इथे स्वतंत्र धाग्याच्या रूपाने नोंदवा. - त्याची गरज नाही. तिथेच किरकोळ सुधारणा केल्या आहेत.

आदूबाळ's picture

21 Aug 2017 - 1:53 pm | आदूबाळ

मस्तच लिहिलं आहे! एक नंबर!

सुधांशुनूलकर's picture

21 Aug 2017 - 5:23 pm | सुधांशुनूलकर

इथेच किरकोळ सुधारणा (मुशो) केल्या आहेत.
छान. समर्पक.

जव्हेरगंज's picture

21 Aug 2017 - 6:30 pm | जव्हेरगंज

एक नंबर!!

नीलमोहर's picture

22 Aug 2017 - 10:45 pm | नीलमोहर

प्रस्तावनेचा शेवट थोडा वेगळा केला आहे.

नीलमोहर's picture

21 Aug 2017 - 8:46 pm | नीलमोहर

सॉरी पण मुशोसाठी इथे धागे काढणे, त्यावर प्रतिसाद देणे हा तितका बरोबर पर्याय वाटत नाहीय, हे सर्व धागे बाहेर दिसत आहेत,
त्याने लेखमालेत सरप्राइज एलिमेंट काहीच राहणार नाही. कृपया काहीतरी उपाय काढावा.
किंवा धागा शीर्षकातून लेखक इ. माहिती उघड होणार नाही असे काही करावे लागेल. मी माझ्या धाग्यात फक्त लेख क्रमांक टाकला आहे.

एस's picture

21 Aug 2017 - 11:11 pm | एस

सहमत आहे. इथे लेखांचे फक्त क्रमांक द्या. लेखकांची नावेदेखील टाळाच शीर्षकात. मला इथले लेख संपादित करता येत नाहीत. नूलकरसर, तुम्हांला करता येत असतील तर कृपया वरीलप्रमाणे बदल करा.

बादवे, आतापर्यंत सहा लेख आपल्याकडे प्रत्यक्षात आले आहेत.
ज्योती अलवनी, पैलवान, मामलेदाराचा पंखा, अनिवासि, आदूबाळ आणि श्रीरंग_जोशी यांच्याकडून लेख आले आहेत. पिराताईंकडून येणे अद्याप बाकी आहे. तरीही आपल्याला अजून तीन लेख कमी पडत आहेत. सर्व सासं, अजून कोणकोण लिहू शकणार आहे?

पद्मावति's picture

22 Aug 2017 - 2:13 am | पद्मावति

अभ्या.. लेख देणार आहेत. एस तुम्ही देऊ शकाल का? जव्हेरगंज तुम्ही?
पिरा दोन दिवसात नक्की देतेय.

नीलमोहर's picture

22 Aug 2017 - 9:03 am | नीलमोहर

लेख प्रकाशित कोणी, कसे, कधी करायचे आहेत. नीलकांत यांचा लेखमाला बनवण्याचा धागा वाचला, पण नीटसं समजलं नाही आणि तसं करता येत नाहीय.
प्रस्तावनेचा लेख माझ्या आयडीने प्रकाशित करायचा की सा.सं आयडीने,

एस's picture

22 Aug 2017 - 1:45 pm | एस

प्रस्तावनेचा लेख साहित्य संपादक आयडीने प्रकाशित करावा.

इतर लेख त्या त्या लेखकांच्या नावाने प्रकाशित करण्याचे अधिकार साहित्य संपादकांना नसावेत बहुतेक. तेव्हा येथे संपादक किंवा मालक यांची मदत लागेल. तीच गोष्ट पुस्तक बनविण्याची.

लेख आलेल्या क्रमाने प्रकाशित करूयात. आदल्या दिवशी संबंधित लेखकांना उद्या लेख प्रकाशित करणार आहोत याची सासं आयडीने व्यनि करून कल्पना द्यावी.

समारोपाचा लेखही तयार करून ठेवता का?

नीलमोहर's picture

22 Aug 2017 - 10:15 pm | नीलमोहर

समारोपाचा लेख नीलकांत यांचा असावा असे बोलणे झाले होते ना, तरी प्रयत्न करते.
लेख संपादक/ मालकांना पाठवावे लागतील ना?
(मी २४ पासून चार पाच दिवस घरी नसेन, मोबाईलवरून कितपत जमेल सांगता येत नाही.)

'लेख आलेल्या क्रमाने प्रकाशित करूयात' - थोडेसे असहमत, पहिला लेख जास्त प्रभावी असावा, बाकी रँडम क्रम देऊ शकतो,
मा.पं
पैलवान
आदूबाळ
ज्योती अळवणी
अनिवासि
किशन वसेकर

एस's picture

22 Aug 2017 - 11:09 pm | एस

नीलकांत यांच्याकडून लेख आला नाही तर आपण एक लेख तयार ठेवूयात.

तुम्ही सुचवलेला लेखांचा क्रम चांगला वाटतोय.

एस's picture

22 Aug 2017 - 11:16 pm | एस

०. प्रस्तावना (साहित्य-संपादक)
१. मामलेदाराचा पंखा
२. पैलवान
३. आदूबाळ
४. ज्योति अलवनि
५. अनिवासि
६. किशन वसेकर
७. पिलियन रायडर (लेख बाकी)
८. अभ्या.. (लेख बाकी)
९. लेख हवा
१०. लेख हवा
११. समारोप (लेख हवा. नीलकांत/सासं)

इथपर्यंत आलोत, हत्ती गेला, शेपूट राहिलंय मंडळी. जरा जोर लावूयात. :-)

दशानन ऊर्फ राज जैन यांना विनंती करून पाहूयात का?

प्रशांत's picture

23 Aug 2017 - 2:08 pm | प्रशांत

मदणबाण लेख देतो म्हटला.

पद्मावति's picture

23 Aug 2017 - 11:47 pm | पद्मावति

वा ग्रेट. आता ९ लेख झाले

एस's picture

24 Aug 2017 - 6:13 am | एस

दशानन बिझी आहेत. जमल्यास देतो म्हणाले.

पद्मावति's picture

24 Aug 2017 - 12:03 pm | पद्मावति

बेस्ट होईल मग. अगदीच नाही जमले तर मी एक लेख तैयार करुन थेवते म्हण्जे इमर्जन्सी मधे वपरता येइइल.

पद्मावति's picture

23 Aug 2017 - 12:56 am | पद्मावति

नीमो, मस्तच लिहिलीय प्रस्तावना.
यावेळी १२ दिवस आहे न बाप्पा? २५, २६, २७, २८, २९, ३०, ३१, १, २, ३, ४ आनी ५. अजुन चार लेख हवेत न?
नीलकान्त यान्नी समारोपाचा लेख लिहिला तर फार उत्तम होइल.
दशानन यान्ना विचरण्याची कल्पाना मस्त. कोणि त्यान्ना सम्पर्क करु शकेल का? अजुन सात आट दिवस आहेत आप्ल्याकडॅ.

नीलमोहर's picture

24 Aug 2017 - 9:20 am | नीलमोहर

प्रस्तावनेचा लेख उद्या सकाळी कधी प्रकाशित करायचा आहे, बाकी लेख संपादक/मालकांना पाठविण्याचे काही ठरले का?

एस's picture

24 Aug 2017 - 1:01 pm | एस

प्रस्तावनेचा लेख उद्या सकाळी लवकर प्रकाशित करा. मला वाटते साधारणतः सकाळी आठ-साडेआठ वगैरेंच्या सुमारास बोर्डावर यायला हवा. लेखमालेतील सर्व लेख हे 'श्रीगणेश लेखमाला' या टॅगखाली प्रकाशित व्हायला हवेत. आपण ते करू शकतो की नाही हे माहीत नाही.

हे सर्व लेख नीलकांत/प्रशांत हे लोक प्रकाशित करतात की संपादकदेखील करू शकतील? म्हणजे संबंधित लेखकाच्या नावाने प्रकाशित करायचे आहेत म्हणून विचारतो आहे. मागील वर्षी कसे केले होते? जुने सासं सांगू शकतील का?

सर्व लेख मुशो करून याच चावडीत असतील. तेव्हा तिथूनच कॉपी करून घेता येतील.

बादवे, या वर्षी सजावट वगैरे करणार आहोत का काही?

प्रशांत's picture

25 Aug 2017 - 11:29 am | प्रशांत

सर्व लेख लेखामाला मधे टाकु. आजचा टाकला.
उद्या व्यू बनवतो त्यात सङ सगळे लेख दिसतील आणि मेनु सुद्धा बनवतो

तुमचा what's app group असेल माझा ७५८८६२४२१२ नंबर अ‍ॅडवा.

- प्रशांत

एस's picture

25 Aug 2017 - 12:37 pm | एस

थँक यू सर!

आदूबाळ's picture

25 Aug 2017 - 8:21 pm | आदूबाळ

डन्न.

एस's picture

24 Aug 2017 - 1:08 pm | एस

सासं चावडीत मुशो करून झालेले मला पाचच लेख दिसत आहेत. अनिवासि यांचा लेख आहे का? मला दिसला नाही. आपल्याकडे आज २४ ऑगस्ट रोजी सहा लेख प्रत्यक्षात आले आहेत.

नीलमोहर's picture

24 Aug 2017 - 5:52 pm | नीलमोहर

अनिवासी यांच्या लेखाचा मुशो झालेला दिसतोय,
सजावटीचे अभ्या पाहत आहेत म्हटलेत.

श्रीरंग जोशी यांचा निरोप आहे की किशन वसेकर यांचा Kishan Vasekar असा मिपा आयडी आहे, त्या नावाने त्यांचा लेख प्रकाशित करावा.

उद्या लेख मी प्रकाशित करेन, तो नंतर लेखमाले मध्ये ऍड करावा लागेल, फक्त कुणीतरी प्रकाशित झाल्यावर त्याचे फॉर्मॅटिंग चेक करून बरोबर नसेल तर करून द्याल, मला मोबाईल वरून कळणार नाही.

सुधांशुनूलकर's picture

24 Aug 2017 - 5:47 pm | सुधांशुनूलकर

अनिवासि यांचा लेख आहे का? मला दिसला नाही.
अनिवासि यांच्या लेखाचं मुशो कधीच झालंय.
श्रीगणेश लेखमाला - लेख क्र. ४
http://www.misalpav.com/node/40711

एस's picture

24 Aug 2017 - 5:55 pm | एस

हो, दिसला मला. :-) आबांच्या लेखाचंही झालंय का मुशो करून सर?

सुधांशुनूलकर's picture

25 Aug 2017 - 12:53 pm | सुधांशुनूलकर

नाही. आज रात्रीपर्यंत होईल.
तसंही त्यात फार दुरुस्त्या नाहीत.

नीलमोहर's picture

25 Aug 2017 - 2:21 pm | नीलमोहर

प्रकाटाआ

एस's picture

24 Aug 2017 - 11:35 pm | एस

सकारात्मक
अत्यधिक
स्थायीभाव
ठराविक
अंगिकार

नूलकरसर, कृपया बरोबर आहे का ते सांगा.

तुषार काळभोर's picture

25 Aug 2017 - 1:03 pm | तुषार काळभोर

.

सुधांशुनूलकर's picture

25 Aug 2017 - 12:51 pm | सुधांशुनूलकर

सकारात्मक
अत्यधिक
स्थायिभाव
ठरावीक
अंगीकार

तुषार काळभोर's picture

25 Aug 2017 - 12:57 pm | तुषार काळभोर

तोंड फारच लहान आणि घास खूपच मोठा झाला :))

नीलमोहर's picture

25 Aug 2017 - 2:25 pm | नीलमोहर

उद्यापासून लेख कोण प्रकाशित करणार आहे, मालक की संपादक, त्यांना तसे कळवले आहे का,
लेखांचा क्रमही सांगावा लागेल.

एस's picture

25 Aug 2017 - 9:15 pm | एस

वर दिल्याप्रमाणे हा क्रम ठेवूया.

०. प्रस्तावना (साहित्य-संपादक)
१. मामलेदाराचा पंखा
२. पैलवान
३. आदूबाळ
४. ज्योति अलवनि
५. अनिवासि
६. किशन वसेकर
७. पिलियन रायडर (लेख बाकी)
८. अभ्या.. (लेख बाकी)
९. लेख हवा
१०. लेख हवा
११. समारोप (लेख हवा. नीलकांत/सासं)

उद्या मापंचा लेख प्रकाशित होणार आहे. तेव्हा त्यांना आज साहित्य संपादक आयडीने व्यनि करून कळवूयात. याचप्रकारे पुढील (सासंव्यतिरिक्त) लेखकांनाही व्यनि करून आधीच कळवूया.

आज मापंना मी साहित्य संपादक आयडीने व्यनि करतो.

बादवे, आपल्याकडे आजही सहाच लेख आहेत. बाकी लोकांकडे फॉलोअप घ्यायला हवा.

एस's picture

26 Aug 2017 - 9:14 am | एस

आज मापंचा लेख प्रकाशित व्हायला हवा. प्रशांतसर, टाकताय का? साहित्य संपादक मापंच्या नावाने प्रकाशित करू शकत नाहीत. हे काम तुम्ही किंवा संपादक करू शकतात.

तुषार काळभोर's picture

26 Aug 2017 - 10:11 am | तुषार काळभोर

दहा वाजून गेलेत. सासं आयडीने प्रकाशित करू. खाली मापंचे नाव (त्यांच्या प्रोफाईल पेजशी हायपर लिंक करून) टाकू.

एस's picture

26 Aug 2017 - 11:58 am | एस

ठीक आहे. बारा वाजत आलेत. करूयात.

प्रशांत's picture

26 Aug 2017 - 9:45 pm | प्रशांत

मी सकाळी सायकलिंग साठी गेलो, नंतर लगेच बाहेर जावे लागले.
लेख अपडेट केला.

उजव्या समासात नवीन व्यु ची लिंक दिली

उद्या सकाळी http://www.misalpav.com/node/40697 लेख मी लेखमाला मधे टाकतो

एस's picture

26 Aug 2017 - 1:03 pm | एस

तब्बल एक तास खटपट केल्यावर शेवटी लेख प्रकाशित झाला एकदाचा! 500 internal server error ने वात आणला प्रकाशित करताना.

पद्मावति's picture

26 Aug 2017 - 5:47 pm | पद्मावति

उत्तम प्रतिसादांनी आपल्या लेखमालेची मस्तं सुरूवात झालेली आहे.