कट्टा

Primary tabs

उदय's picture
उदय in काथ्याकूट
7 Aug 2017 - 9:25 am
गाभा: 

सप्टेंबर २ ते १२ च्या दरम्यान मी भारतात येणार आहे. मुंबईत आणि पुण्याला कट्टा करायला आणि मिपाकरांना भेटायला आवडेल.
मिपाकरांना आवडेल का आणि जमू शकेल का?
कृपया कळवावे म्हणजे त्याप्रमाणे प्लॅन करता येईल.

टीपः कट्टा ओला, सुका, सुका/ओला करायची माझी तयारी आहे.

==================================

पुण्याच्या कट्ट्याची वेळ :

शुक्रवार ८ सप्टेंबर, संध्याकाळी ६ वाजता:
बार्बेक्यू नेशन, डेक्कन जिमखाना

==================================

मुंबईच्याच्या कट्ट्याची वेळ :

(नक्की झाल्यावर इथे टाकली जाईल.)

==================================

प्रतिक्रिया

ज्योति अलवनि's picture

7 Aug 2017 - 9:31 am | ज्योति अलवनि

तुमच्या निमित्ताने मुंबईकर कट्टेकऱ्यांना भेटायला आवडेल.

पुण्यात कट्टा करणार असाल तर सांगा, तेवढ्यासाठी घाट उतरून खाली यायला नको मग!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Aug 2017 - 1:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वागत !

तुम्ही बाहेरून भारतात येत आहात. त्यामुळे इतरांना विचारण्याऐवजी, तुम्हाला पुणे व मुंबईत कोणता सोईचा दिवस व वेळ आहे हे इथे प्रतिसादात टाका. ते जास्त सोईचे होईल.

उदय's picture

8 Aug 2017 - 4:28 am | उदय

धन्यवाद. शनिवारी २ सप्टेंबरला बहुधा जेटलॅग असेल, त्यामुळे रविवारी सकाळी किंवा संध्याकाळी भेटता येईल, असा विचार आहे. म्हणजे मला कधीही, वीकडेला पण जमू शकेल, पण सर्वांना सोयीस्कर म्हणून शनिवार-रविवारला प्रेफरन्स. ३ सप्टेंबरला मुंबई आणि ८ संध्याकाळ/९ दुपार पुणे जमू शकेल का? माझा मुक्काम बोरिवली, विक्रोळी आणि तळेगाव इथे आहे, त्याप्रमाणे कुठेही चालेल. शक्यतो रेल्वे स्टेशनजवळ भेटलो तर सर्वांना सोयीस्कर होईल, असा अंदाज. त्या दृष्टीने बोरिवली, ठाणे, शिवाजी नगर ही ठिकाणे बरी वाटतात. वीकडेला मी १ दिवस फोर्ट एरियात जातो, तिथेपण महेश लंच होमला जमवता येईल.

खेडूत's picture

8 Aug 2017 - 10:44 am | खेडूत

३/४ ला गणेश विसर्जनाची ब्येक्कार गर्दी अवघ्या महाराष्ट्रात असते.
त्यामुळे एकच वीकांत तुम्हाला मिळेल, एका तरी ठिकाणी कामाच्या दिवशी कट्टा करावा लागेल असे वाटते.
पुण्यात म्हात्रे पुलाजवळ ज्याला डी पी रोड म्हणतात, तिथे साताठ ठिकाणी मुबलक जागा मिळते. फक्त फुंकणार्‍यांच्या धुराचा त्रास न होणारे ठिकाण कुणी सुचविल्यास येता येईल.
समोरच एक मराठी प्रकाशनाचे दुकान आहे तिथेही जरा जाता येईल.

बोरीवली ला असाल तर नक्की भेटता येईल..

मुंबईत ठाणे मध्यवर्ती असतं म्हणे.

उदय's picture

9 Aug 2017 - 11:42 pm | उदय

मी तर ऐकलय की डोंबिवली हे मध्यवर्ती आहे म्हणे. ;)

असतात एकेक गैरसमज लोकांचे, दुर्लक्ष करायचं. सबंध विश्वाच्या मध्यवर्ती असलेलं पुणं लोकांना बघवत नाही आणि मग उगाच वावड्या उठवतात.

ठाणे घोडबंदर रोडला करता येईल मुबलक हाॕटेल्स आहेत आणी उत्तम आहेत.

उदय's picture

9 Aug 2017 - 11:05 pm | उदय

शुक्रवार ८ सप्टेंबर, संध्याकाळी ६ वाजता:
बार्बेक्यू नेशन, डेक्कन जिमखाना
https://www.zomato.com/pune/barbeque-nation-deccan-gymkhana
सर्वांना भेटायला आवडेल. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2017 - 11:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

ये हुई ना बात !

मी येणार... मी पयला सुद्धा ! ;) :)

(मुंबईची वेळ नक्की केली की अशीच एका प्रतिसादात टाका. तिला मुख्य धाग्यात टाकले जाईल.)

असल्या हुच्च्भ्रु ठिकाणी जायची आपली ताकद नै बाबा.
आमी पास.

उदय's picture

15 Aug 2017 - 7:49 pm | उदय

मी ते झोमॅटोवरून शोधले होते आणि रेटिंग चांगले आहे. ३-४ मिपाकरांना विचारले तर ते त्यांना सोईस्कर आहे, म्हणून निवडले. बाकी ते कसे आहे, याची मला काही कल्पना नाही.

प्रयत्न करेन, हापिस असल्याने शक्यता कमी आहे.

नूतन सावंत's picture

15 Aug 2017 - 3:27 pm | नूतन सावंत

मुंबईतील कट्ट्याची वेळ आणि ठिकाण जाहीर करा ,ज्यांना जमेल ते येऊ शकतील.

उदय's picture

15 Aug 2017 - 7:46 pm | उदय

झोमॅटोवरून शोधलेले हे रेस्टॉरंट कसे वाटते? ठाण्याला आहे आणि रेटिंग चांगले वाटले. जर आवडले नाही तर मला दुसरीकडे चालेल.
https://www.zomato.com/mumbai/masaledaar-by-mini-punjab-panch-pakhadi-th...
शनिवार २ सप्टेंबर संध्याकाळी किंवा ३ सप्टेंबर संध्याकाळी जमेल का सर्वांना?

सुबोध खरे's picture

16 Aug 2017 - 12:22 pm | सुबोध खरे

जागा चांगली आहे. पण ज्यांना ओला कट्टा करायचा आहे त्यांच्यासाठी फक्त तेथे फोन करून विचारणे आवश्यक आहे कि बार चालू आहे का? कारण हि जागा हायवेपासून ५०० मीटर अंतराच्या आत आहे.
जाता जाता -- आजकाल बार असलेली पण ५०० मीटर अटीमुळे बार बंद झालेली हॉटेले कट्टा करण्याच्या दृष्टीने फारच चांगली पडतात कारण शनिवारी किंवा रविवारी गर्दीच्या वेळेस सुद्धा आरामात जागा मिळते आणि ग्राहक बांधून ठेवण्याच्या दृष्टीने सेवा स्वस्त आणि मस्त मिळते. फक्त तोंड "कोरडे" ठेवायची तयारी असावी लागते. मागच्या रविवारी "मंत्र" हॉटेलात गेलो होतो अनुभव वरीलप्रमाणे आला आहे. ----(((( ))))---

मी हि असेन इकडे तर नक्की येईन .