लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????

Primary tabs

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in काथ्याकूट
16 May 2017 - 2:14 pm
गाभा: 

लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते.
तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते.
आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात.
प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही.
दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे.
तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?
२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?

३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?
चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 May 2017 - 2:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

तर,मायबोलीकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. ???

एकच लेखन अनेक संस्थळांवर कॉपी करण्यापूर्वी निदान योग्य ते बदल करण्याची खबरदारी घेतलेली बरी असते ;) :)

मायबोलीकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.

हीहीहीहीही, तिकडं काय ठरलंय?

तर,मायबोलीकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.

पावनं, गल्ली चुकलासा जनु?

सतिश गावडे's picture

16 May 2017 - 2:27 pm | सतिश गावडे

काय राव, तिकडचे पार्सल इकडे आले. तिकडे कोणते पार्सल पाठवलेत?

वरुण मोहिते's picture

16 May 2017 - 2:31 pm | वरुण मोहिते

आपण अवतारी पुरुष आहात माहित होते . पण दारू ,बाया हे नाद करताना बुद्धी शाबूत असावी लागते . असो कधीतरी लेक्चर ला या आमच्या .कॉपी पेस्ट करून थकतो माणूस .

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

16 May 2017 - 3:13 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

@ संपादक,लेखात मायबोली ऐवजी मिसळपाव करावे.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

16 May 2017 - 3:13 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

@ संपादक,लेखात मायबोली ऐवजी मिसळपाव करावे.

माम्लेदारचा पन्खा's picture

16 May 2017 - 3:19 pm | माम्लेदारचा पन्खा

मराठी संस्थळावरचा सर्व्हे करायला ?

दिवाळीच्या फराळाची ताटं फिरवल्यासारखे लेख फिरवताय . . . . ईगल गँग, बिच्छू गँगची गोष्ट माहिती आहे का???

प्रसन्न३००१'s picture

16 May 2017 - 3:24 pm | प्रसन्न३००१

१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?
२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?

प्रत्येकाने आपापली सोय बघावी... दुसर्यांना कशाला विचारत फिरायचं :-P

मुद्दा रोजच्या जगण्यातला आहे हे नक्की.

सदस्यांनी चर्चा व्यक्तिगत न होऊ देता मुद्यावर आधारित ठेवली तर ती विवाहित, उलटसुलट विचारांचा गोंधळ झाल्यानं लग्न करु की नको या द्विधेत सापडलेले अविवाहित, चुकीची विचारसरणी पसरवणारे राजवाडे (पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले), तितकीच चुकीची धारणा असलेले टफि (मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते ) आणि एकूणात भारतीय विवाह संकल्पनेमागचा विचार या सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा उहापोह होऊ शकेल.

मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो

सर यावर तुम्ही एक धागा काढत नाही? अशा ज्ञानदायी धाग्यांची मिपाला गरज आहे.

सतिश गावडे's picture

16 May 2017 - 9:17 pm | सतिश गावडे

मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते

वरच्या प्रतिसादात हे वाचलं नाही वाटतं तुम्ही. शोधा तो धागा आणि वेचा ते ज्ञानकण.

अरेरे, सरांच्या ज्ञानाचे कण वेचायचे म्हणजे मज पामराला होणे नाही. त्यांनी बैजवार धागा काढावा आणि सर्वांना उपकृत करावे. समस्त मानव प्रजाती त्यांची ऋणी राहील.

@ संपादक,लेखात मायबोली ऐवजी मिसळपाव करावे.

तिकडे काय नाव आहे आपले :-) ;-)

mayu4u's picture

27 May 2017 - 5:10 pm | mayu4u

आणि ऐसी अक्षरे वर ग्रेट थिंकर

धागे मात्र सेम असतात.

दीपक११७७'s picture

28 May 2017 - 1:02 pm | दीपक११७७

ती कडे पण मिपा करांना नावे ठेवतात का हे महाशय.

सुबोध खरे's picture

16 May 2017 - 6:51 pm | सुबोध खरे

हा फार मोठा आणि गहन विषय आहे. तरीही
१) मुक्त शरीर संबंध असणे हे पुरुषाच्या दृष्टीने फायद्याचे असले तरी स्त्रीच्या दृष्टीने ते तितके फायद्याचे नाही. आणि बालकांच्या दृष्टीने नक्कीच नाही कारण मातृत्व हे असंदिग्ध आहे( आई कोण हा प्रश्न उद्भवत नाही) पण पितृत्व संदिग्ध आहे त्यामुळे मूल हे आपले नसेल तर पुरुष त्याच्या प्रतिपाळासाठी किती कष्ट घेईल हा एक अनुत्तरित प्रश्न आहे.
२) पुरुषाची कामेच्छा हि स्त्रीपेक्षा जास्त असते आणि जास्त काळ टिकणारी असते. त्या तुलनेत स्त्रीची कामेच्छा हि बरीच हेलकावे खाणारी असते म्हणजे पाळीच्या वेळेस, गरोदरपणात रजोनिवृत्तीनंतर बरीच कमी झालेली आढळते. यामुळे एक पत्नी व्रत यात पुरुषाला कामेच्छा मारायला लागते आणि त्याची कुचंबणा होते हि वस्तुस्थिती असली तरी स्त्रीआणि मुलाच्या दृष्टीने एक पत्नीव्रत हे अंतिमतः फायदेशीर ठरते.
३) लग्न बाह्य संबंध हे बहुसंख्य वेळेस कामवासना शमवण्यासाठी उपयुक्त होतात. हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीने उपयुक्त असले तरीही समाजास्वास्थ्यासाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही त्यामुळे जगभर बहुसंख्य समाजात लग्न संबंधांना जितकी मान्यता आहे तितकेच लग्नबाह्य संबंधांबद्दल तिरस्कार आहे.
४) पुरुषाची कामेच्छा जास्त का असते या बद्दल मी एका धाग्यात शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे याचा विस्तृत उहापोह केला होता परंतु माझे लेखन यावर टिचकी मारली असता दुसरेच काही तरी येत आहे. आणि आता तेच परत टंकायचा मूड नाही. जेंव्हा माझे लेखन उपलब्ध होईल तेंव्हा पुढच्या भागाची चर्चा करता येईल.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

16 May 2017 - 7:25 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

छान प्रतिसाद सुबोधजी,पुरुषाचं टेस्टेस्टिरॉन उतारवयात बरचं कमी होत तरीही त्याचं कामेच्छा कमी होत नाही याच रहस्य काय?
नातीच्या वयाच्या तरुण मुलींकडे वखवखलेल्या नजरेने बघणारे म्हातारे बघितले की हा प्रश्न पडतो.

अतृप्त कामेच्छा !

त्यातून हे सगळे उपप्रश्न निर्माण होतात :

१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?

नाही. लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृधापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे.

अतृप्त कामेच्छेमुळे विवाहाकडे संभोगाची सोय म्हणून पाहिलं जातं.

२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?

अतृप्त कामेच्छा !

३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?

अशा बाता किती जणांशी (जणींशी) करणार ? कामतृप्ती विवाह सार्थक करुन जाते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 May 2017 - 9:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृधापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे. ???!!!

सतिश गावडे's picture

16 May 2017 - 9:51 pm | सतिश गावडे

त्यांनी म्हटलंय म्हणजे असणार. त्यांचे मत नेहमी परिपूर्ण, निर्विवाद, परफेकट असते याची त्यांना तीळमात्रही शंका नाही.

दशानन's picture

16 May 2017 - 9:56 pm | दशानन

देवाला, गुरूला, आईला आणि अतीज्ञानीला प्रतिवाद करू नये नाहीतर थोबाड फुटते अशी म्हण आहे म्हणे हिब्रू मध्ये! ;)

येथे तर देवांचे देव प्रतिसाद देत आहेत, किमान होय म्हराज!!! म्हणून गप्प व्हा ;)

त्यांनी फक्त यादी दिली आहे. कालक्रमणेनुसार यादी नसावी .... कदाचित.

"लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृधापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे."

संक्षी, तुम्हाला येथे अपत्याचा विवाह असे म्हणायचे आहे का? असल्यास त्याचा योग्य खुलासा करा नाहीतर वेगळाच अर्थ निघतो :D

होतो शब्द'छळ' त्यांच्याकडून कधी कधी एवढे मनावर नका घेऊ ;)

दीपक११७७'s picture

16 May 2017 - 7:24 pm | दीपक११७७

http://www.maayboli.com/node/62593

@ सिंथेटिक जिनियस

विषयाला धरुन चर्चा करा.
मायबोलीचा मिपा करु नका

http://www.maayboli.com/node/62593

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

16 May 2017 - 7:26 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

काय चुकलं त्यात,मिपावर चार प्रतिसाद देणारे जेन्युन आहेत बाकी धाग्याचा खरडफळा करायला बसतात म्हणून ती कमेंट दिली आहे.

त्या चार जणांना व्यनि करायचा.
ना बनेगा खरडफळा, ना बनेगा कचरा.

जेवत असलेल्या ताटाबद्दल / ताटामध्ये असे "शेण" का हो कालवले?

मिपाच्या विरुद्ध बाजूला कधीकाळी मी पण उभा होतो, पण असा प्रकार... नाही पटला!
माफी मागावी मिपाची तुम्ही.

अभ्या..'s picture

16 May 2017 - 7:59 pm | अभ्या..

कल्लुळाचं पाणी....
कल्लुळाचं पाणी....
कल्लुळाचं पाणी....
कशाला ढवळिलं.. नागाच्या पिलाला का गं खवळिलं ??

सतिश गावडे's picture

16 May 2017 - 9:20 pm | सतिश गावडे

ते कमरेला लटकलं आहे ते खांद्यावर असलेल्या सापाचे पिल्लू आहे की त्या सापाची शेपटी आहे?

टवाळ कार्टा's picture

16 May 2017 - 9:34 pm | टवाळ कार्टा

उत्तर मिळाल्यावर त्या माहितीचा कसा उपयोग करणार हाहात सर?

सतिश गावडे's picture

16 May 2017 - 9:43 pm | सतिश गावडे

अभ्याभाऊ सोलापूरकर चटणीवाले यांचे "नागाच्या पिल्लाला का गं खवळीलं" हे मत योग्य आहे की नाही याचा उलगडा होईल या माहितीने.

टवाळ कार्टा's picture

17 May 2017 - 10:10 am | टवाळ कार्टा

कसे? तुमच्याकडे नाग आहे की नागाचे पिल्लू?

सतिश गावडे's picture

17 May 2017 - 11:32 am | सतिश गावडे

विषय चित्रातील बाईच्या अंगावरील नागाचा चालू आहे.

अभ्या..'s picture

17 May 2017 - 11:48 am | अभ्या..

ते चित्र नव्हे तर चित्रपट्टिका आहे. ;)

अभ्या..'s picture

17 May 2017 - 11:48 am | अभ्या..

ते चित्र नव्हे तर चित्रपट्टिका आहे. ;)

तुमच्याकडे नाग आहे की नागाचे पिल्लू?

तुम्हाला दोन्हीपैकी काय हवं आहे ते सांगा.

दशानन's picture

17 May 2017 - 12:04 pm | दशानन

आवरा

=))

टवाळ कार्टा's picture

17 May 2017 - 12:15 pm | टवाळ कार्टा

काहीही नको...सर नर्तकी ऐवजी नागाचीच इतकी का चौकशी करत होते ते समजले नव्हते म्हणून विचारले

सूड's picture

17 May 2017 - 12:39 pm | सूड

ज्याची त्याची आवड..

खिक.... असभ्य! असभ्य !!

आदूबाळ's picture

16 May 2017 - 7:28 pm | आदूबाळ

वा सिंजि वा!

दुसरीकडे जाऊन मिपाच्या नावाने खडे फोडायचे, आणि मग मिपावरच चर्चेचा जोगवा मागत यायचं!

दशानन's picture

16 May 2017 - 7:40 pm | दशानन

:)

दीपक११७७'s picture

16 May 2017 - 7:57 pm | दीपक११७७

कुणाची म्हस कुणाला उठबस
सिंजी हे इथे बसेल ना चपखल.+11111111111111

ती कडुन ईकडे

"लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृद्धापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे."

यात न समजण्यासारखं किंवा गैरसमज होईल असं काय आहे ? विवाहितांच्या जीवनात ही सर्व परिमाणं याच क्रमानं दिसत नाहीत काय ?

प्रतिसाद देणारे सदस्य (कुणा दांपत्याचा) विवाह झाल्याशिवाय कौतुकाचा जन्म घेऊ शकले असते काय ? शिवाय योग्य संगोपनाशिवाय त्यांच्या सांप्रत जीवनाची जी काय घडी बसली आहे ती तशी बसली असती काय ? जर विवाह संस्थाच अस्तित्त्वात नसती तर त्यांचे विवाह झाले असते का ? आणि जेव्हा वृद्धापकाळ येईल त्यावेळी त्यांनी निर्माण केलेली कुटुंबव्यवस्था त्यांना उपयोगी ठरणार नाही का ? सरते शेवटी, मृत्यूसमयी आप्त जवळ असतील तर तो, एकट्यानं कुठे तरी (बहुदा कुणी जीवलग जवळ नसतांना), आलेल्या मृत्यूपेक्षा, सुखाचा होणार नाही काय ?

आता चर्चाविषय पाहा : लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????

एकवेळ विचार न करु शकणारे सदस्य काहीही प्रतिसाद देतात ते ठीके पण ज्यांची जवाबदारी चर्चा लाईनवर ठेवण्याची आहे ते सुद्धा काहीही प्रश्न निर्माण करायला लागले तर चर्चेतून काय निष्पन्न होणार ?

दशानन's picture

17 May 2017 - 12:21 pm | दशानन

तुमची टांग दुखत नाही का हो आजोबा?
दर वेळी गिरे भी टांग के उपरच तुमचे सुरू असते, कधी तर सज्जनपणे झालेली चूक मान्य करुन माघार घेत जावा की राव!

अद्द्या's picture

17 May 2017 - 12:39 pm | अद्द्या

प्रयत्न चांगला होता तुमचा.. पण वेळ वाया जातोय

एवढ्यात ते एलियन केप्लर वरून इथे येऊन सात बारा पण करून घेतले असते .. तेवढं बघा काय ते

संजय क्षीरसागर's picture

17 May 2017 - 2:24 pm | संजय क्षीरसागर

एकतर यांची समज कमी हे वेळोवेळी दाखवून दिलं आहे कारण यांच्या प्रतिसादाला काहीही आगापिछा नसतो. त्यात सदस्याला स्वतःचं संकेतस्थळ असल्यासारखी, काहीही संबोधण्याची यांची हिंमत कशी होते ? या आयडीला योग्य ती समज द्यावी.

दशानन's picture

17 May 2017 - 3:12 pm | दशानन

परत निरर्थक प्रतिसाद!
अहो जे तुम्ही चुकीचे बोलले /लिहले आहे त्याबद्दल माफी मागा. चूक मान्य करा.

अभ्या..'s picture

17 May 2017 - 3:33 pm | अभ्या..

क्षणभर मला इथे "मी मराठी " असल्याचा भास झाला.

संजय क्षीरसागर's picture

17 May 2017 - 4:55 pm | संजय क्षीरसागर

क्षणभर मला इथे "मी मराठी " असल्याचा भास झाला.

एखादा कायम भ्रमातच असेल तर त्याला वास्तवाची कल्पना येणं अवघड असतं म्हणतात :)

संजय क्षीरसागर आणि टर्बोचार्जड फिलॉसॉफर हे एकाच व्यक्तिचे दोन ID आहे का?

संजय क्षीरसागर's picture

17 May 2017 - 5:00 pm | संजय क्षीरसागर

संकेतस्थळावर व्यक्तीची ओळख त्याच्या लेखनशैलीमुळे असते. तुम्ही एकदम नवखे दिसता त्यामुळे असा गैरसमज झाला आहे. माझे प्रतिसाद वाचत चला, गैरसमज दूर होईल.

दीपक११७७'s picture

17 May 2017 - 5:25 pm | दीपक११७७

हे सगळे तुमच्या मागे का लगले आहेत.

बरेचदा सर्व प्रतिसाद वचुन सुध्दा कळले नाही. म्हणुन विचारले. :-)

संजय क्षीरसागर's picture

17 May 2017 - 5:43 pm | संजय क्षीरसागर

माझी मतं ही प्रचलित समाजधारणांविरुद्ध असतात त्यामुळे सदस्यांच्या कल्पनांना धक्का बसतो आणि मग सदस्य मला कोंडीत पकडायचा प्रयत्न करतात, जेणे करुन त्यांच्या कल्पना पुन्हा प्रस्थापित होतील.

आता इथेच बघा, विवाह हे बंधन आहे अशी बहुतेकांची ( म्हणजे जवळजवळ सर्वांचीच !) धारणा आहे आणि त्यांचा मुक्त लैंगिक व्यवस्थेला (मनातल्या मनात का होईना :) ) पाठींबा आहे ! माझं मत विवाह संकल्पनेला अनुकूल आहे आणि ती केवळ दोघातली मान्यता असल्यामुळे ते बंधन असू शकत नाही असा दावा आहे. त्यामुळे सदस्य मला कॉर्नर करायच्या प्रयत्नात आहेत आणि मला उत्तरं द्यायला मजा येतेयं !

मार्कस ऑरेलियस's picture

17 May 2017 - 12:55 pm | मार्कस ऑरेलियस

लग्न हा एक अतिषय निरर्थक प्रकार आहे , ह्या विषयावर आमच्या गुरुदेव ओशोन्नी एक अप्रतिम प्रवचन दिले आहे :

OSHO: Marriage and Children - YouTube
https://www.youtube.com/watch?v=5ocbZhRQS9I

ह्या पेक्षा जास्त आम्हाला काहीही बोलायचे नाही .
असो.

सानझरी's picture

17 May 2017 - 3:31 pm | सानझरी

+1.. मी पण हीच लिंक डकवणार होते इथे..

संजय क्षीरसागर's picture

17 May 2017 - 4:44 pm | संजय क्षीरसागर

पण तुम्ही दिलेल्या लिंकमधे ते साफ चुकले आहेत. दुर्दैवानं ते माझा प्रतिवाद करु शकत नाहीत पण ते करुही शकले नसते हे मात्र नक्की.

एनी वे, तुम्हाला ते विचार पटले आहेत तर तुम्ही प्रतिवाद करुन दाखवा.

१) ओशो म्हणतात लग्नापेक्षा स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे

ओशोंना कल्पनाच नाही की स्वातंत्र्य ही धारणारहित चित्तदशा आहे आणि विवाह ही केवळ मान्यता आहे. कोणतीही `मान्यता' (ती एकदा मान्यता आहे हा उलगडा झाला की), स्वातंत्र्याला बाधा आणू शकत नाही.

२) ओशो म्हणतात की विवाहोत्तर संभोग हा ड्यूटी म्हणून केला जातो आणि स्त्रीच्या अनिच्छेनं केला जातो.

दुर्दैवानं ओशोंना एकमेकांप्रती अनुबंध असणारी जोडपी माहिती नाहीत. विवाहोत्तर संभोग हा एकमेकांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी आणि परस्परांना सुख देण्यासाठी केला जातो याची त्यांना सुतराम कल्पना नाही.

३) ओशो म्हणतात अपत्य ही कम्युनची जवाबदारी असेल !

ओशो कम्युननं अशा एकाही बालकाची जवाबदारी स्वीकारलेली नाही. आणि जगात आजतागायत अनाथालयाशिवाय अशी जवाबदारी स्वीकारणारी कोणतीही संस्था नाही.

माझी आज सुद्धा कम्युनची मेंबरशिप आहे. मला तिथले मुक्त लैंगिक संबंधवाले पुरते माहिती आहेत. त्यांना आता लाइक माइंडेड पार्टनर मिळणं अशक्य झालं आहे कारण वय झाल्यावर स्त्रीला तर कुणी विचारत नाहीच आणि वयस्क पुरुषाला तरुणी मिळणं अशक्य झालं आहे.

तुमच्या माहितीसाठी सांगतो. ओशोंनाही मृत्यूपूर्वी स्वतःची चूक लक्षात आली ! ती अशी की पब्लिकला सत्यामधे इंटरेस्टच नाही त्यांना फक्त नव्या पार्टनरमधे रस आहे ! म्हणून ओशो सुद्धा शेवटी म्हणाले की तुम्ही अनेक व्यक्ती एक्सप्लोअर करा पण शेवटी एकाशी सेटल व्हा....अर्थात, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

माझा प्रतिवाद करु शकत नाहीत पण ते करुही शकले नसते हे मात्र नक्की

साहेब.. तुम्ही त्यांना गुरु स्थानी मानता असं कुठे तरी वाचलं होत मी.. म्हणजे .. कॉन्फिडन्स असण्याबद्दल काहीच हरकत नाही.. पण हे जरा अति होतंय का ?

संजय क्षीरसागर's picture

17 May 2017 - 5:21 pm | संजय क्षीरसागर

पण ओशोंच्या या विचारसरणीमुळे अनेकांच्या जीवनाची वाट लागली ही वस्तुस्थिती आहे.

ते म्हणाले होते की सर्व जग हे एक कम्युन होईल तेव्हा पृथ्वी स्वर्ग होईल. पण जिथे त्यांचा कम्युनच, स्वतः ओशो हयात असतांना, सदस्यांच्या अपत्यांची जवाबदारी स्वीकारायला तयार नव्हता (आणि आता तर शक्यच नाही), तिथे सर्व जगात मुक्त लैंगिक संबंध आणि अपत्यही समाजाची जवाबदारी कशी होईल?

तस्मात, सामाजिक सुव्यवस्था आणि अपत्याची जवाबदारी यासाठी विवाहसंकल्पनेला पर्याय नाही.

अद्द्या's picture

17 May 2017 - 6:01 pm | अद्द्या

बरं

<<<तुम्ही त्यांना गुरु स्थानी मानता असं कुठे तरी वाचलं होत मी.. म्हणजे .. कॉन्फिडन्स असण्याबद्दल काहीच हरकत नाही.. पण हे जरा अति होतंय का ?>>>
==>> गुरु सुद्धा चुकू शकतात ना ? किती ही शिकलेसवरले तरी वैचारिक गुलामगिरी सोडायला कोणी तयार होत नाही, हे दुर्दैव्य.

गुरु जे सांगेल ते अंतिम सत्य या विचारसरणी मुळेच तर टनटणी, आसाराम, बाबा, बापूंचे पीक फोपवले.

संजय क्षीरसागर's picture

17 May 2017 - 6:20 pm | संजय क्षीरसागर

थोडा फरक आहे.

ओशो सिद्ध होते याबद्दल मला कणमात्र शंका नाही आणि त्याबाबतीत जगातल्या कुणाशीही आणि कोणत्याही फोरमवर मी प्रतिवादाला तयार आहे. पण ओशोंचा विवाहाकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकीचा होता कारण जी जोडपी त्यांनी बघितली (इन्क्लूडींग हीज ओन पॅरेंटस !) ती सर्व विवाहाला "वास्तविकता" मानत होती. त्यामुळे विवाह ही सुद्धा एक मजेची गोष्ट असू शकते हे त्यांच्या लक्षात आलं नाही.

मी कम्युनला गेलो तेव्हा ओशो नव्हते आणि माझं लग्न झालेलं होतं ! त्यामुळे मला तिथल्या तरुणींपेक्षा सत्यशोधनात इंटरेस्ट होता. शिवाय पत्नीशी मी उत्तम धागे जुळवले होते त्यामुळे तिलाही मी तिथे नेलं (तीनं त्यात पुढे काही रस घेतला नाही ती गोष्ट वेगळी) पण माझी कार्डस ओपन होती. तस्मात, विवाह हे ओशोंच्या दृष्टीनं बंधन असेल, माझ्या दृष्टीनं नाही.

सर असंच ज्ञान द्देत रहा सर!! नाहीतर या प्रगोसारखे ओशोच्या प्रेमात आंधळे झालेले सदस्य लोकांची दिशाभूल करत राहतील. तुम्हीच एक तारणहार आहात घनिष्ट संबंधातली गुंतागुंत समजून सांगायला.

मार्कस ऑरेलियस's picture

17 May 2017 - 6:50 pm | मार्कस ऑरेलियस

नमस्कार संक्षी सर !

सर्वात महत्वाचे म्हणजे : हा प्रतिसाद देवुन मी तुमचा प्रतिवाद करायचा प्रयत्न करत नाहीये , मी केवळ माझ्या आकलनावरुन जे काही माझे मत बनले आहे ते मांडत आहे. माझे मत सार्वत्रिक सत्य असेल असे माझे म्हणणे नाही . तसेच ओशो सरही सार्वत्रिक रित्या योग्यच असतील असे ही माझे म्हणणे नाही . जो तो माणुन ज्याच्या त्याच्या जागी आणि ज्या त्या काळी योग्य असतो ( असे माझे वैयक्तिक मत आहे ).

१ ) लग्न ह्या संकल्पनेला माझ्या मते अनेक पैलु आहेत : त्यातील महत्वाचे म्हणजे धार्मिक सामाजिक आर्थिक आणि वैयक्तिक.
आता धार्मिक दृष्टीने पहायला गेल्यास आजकाल च्या लग्नात जे काही होते तसले काही माझ्या धर्मात अपेक्षित नाही , रादर माझ्या धर्मात लग्ना विषयीच्या ज्या संकल्पना आहेत त्यांत निधर्मी राजसत्तेने घुसखोरी करुन नसत्या संकल्पना घुसवल्या आहेत. तस्मात धार्मिक दृष्टीने मला आजकालची लग्न संकल्पना निरर्थक वाटते.

सामाजिक पैलुने पहायला गेल्यास लग्न हे एक प्रकारचे अ‍ॅव्हरेजिंग ऑऊट चाच प्रकार आहे जो की अ‍ॅन्टी नॅचरल आहे असे मला वाटते . प्रत्येकाला प्रजोत्पादनाची संधी मिळालीच पाहिजे असा काहीसा हट्ट आहे त्यात. ह्यामुळे नॅचरल सिलेक्शन चा मुलभुत नैसर्गिक नियम ओव्हर राईड केला जातो असे मला वाटते .

आर्थिक पैलुतुन पहायला गेल्यास मात्र लग्न ही संकल्पना सेन्सिबल वाटते कारण पुरुष हे सहसा फक्त विकासाचा प्रगतीचा संमृध्दीचा मार्ग चोखळतात पण त्या नादात सस्टेनेबिलिटी हा महत्वाचा मुद्दा दुर्लक्षिला जातो , आणि योगा योगाने बायकांचा फोकस बहुतांश वेळा सस्टेनॅबिलीटी वर असतो . माझ्या वैयक्तिक अनुभवावरुन तरी किमान मला तसेच वाटते की माझे जर लग्न झाले नसते तर मी आज कमावतो त्या पेक्षा किमान दुप्पट तिप्पट पैसे कमावत असतो पण आज मी फॅमिली मॅन असल्यामुळे जितका लॉन्गटर्म वेल्थ क्रियेशन चा विचार करतो तितका केला नसता आणि बहुतांश पैसा असाच उडवला असता !

आणि लास्टली वैयक्तिक पैलुतुन पहायला गेल्यास मला लग्न ही संकल्पना निरर्थक वाटते कारण ज्या व्यक्तीवर मी प्रेम करतो तिच्या सोबत रहायला आणि सुखाने जयागला मला धर्माची राज्याची आणि समाजाची मान्यता घ्यावी लागते हा एक दुर्दैवी आणि मुर्ख प्रकार आहे असे माझे वैयक्तिक मत आहे ! प्रेम ही नैसर्गिक संकल्पना आहे आणि लग्न ही मानवनिर्मित सोय . आधी प्रेम महत्वाचे लग्न नाही केले तरी हरकत नाही ! ( कदाचित हा विचार तरुणांना पटत असावा म्हणुन सध्या तरी लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार वाढताना दिसत आहे )

२) ओशो संभोग हा ड्युटी म्हणुन केला जातो असे म्हणल्याचे मला तरी आठवत नाही . परत एकदा क्लिप पहातो . ओशो म्हणालेत : प्रेम संपल्यानंतरही केवळ बंधन म्हणुन लग्नात रहायचे , अन अनिच्छेने त्याच व्यक्ती सोबत संभोग करायचा हे नॉन सेन्स आहे त्या पेक्षा एकामेकाला स्पष्ट सांगा की आपले प्रेम होते , आपण सुखाने काही काळीकाळ व्यक्त केला आता प्रेम संपले आहे आप्ण स्वतंत्र होवु , एकमेकाला त्रास देत जगण्यात काय अर्थ ? मलातरी हे विधान १००% पटते !

३) ओशो म्हणतात की मुले ही कम्युनची जबाबदरी आहे हा विचार मलाही अतिरेकी आदर्शवादी वाटतो , एकदम समाजवाद किंव्वा साम्यवदासारखा ! ह्यावर सोप्पा उपाय म्हणजे प्रजोत्पादनाच्या आधीच स्त्री पुरुषांनी ठरवावे की मुलांची जबाब्दारी आणि ओनरशिप कोण घेनार ते ! मुलगा झाल्यास वडीलांनी जबाबदारी घ्यावी आणि मुलगी झाल्यास आईने ( किंव्वा व्हाईसव्हर्सा) हा सोप्पा थंबरुल असु शकतो !

आता राहिला तो महत्वाचा मुद्दा म्हणजे अध्यात्मिक : अध्यात्मिक मार्गात वाटचाल करताना शुन्य लग्न करणे , एक लग्न करणे किंव्वा अनेक लग्न करणे हे तेन्ही मार्ग मोक्षाप्रत नेणारेच आहेत. ब्रह्मचारी हनुमान किंवा एकपत्नी राम किंव्वा बहुपत्नी दशरथ तिघेही धन्यच आहेत ! धन्यो गृहस्थाश्रमः असे महाभारतात स्पश्टपणे म्हणलेले आहे ! पराशर मत्स्यगंधा, कृष्ण जांबुवंती , भीम हिडींबा, अर्जुन चित्रांगदा हे तर माझे एकदम आवडते कपल्स आहे , एकदम परफेक्ट मॅरेज! !
मग हे असे असताना राजसत्तेने किव्वा समाजाने ह्यातील एकाचाच हट्ट धरावा हे अनाकलनीय , अतार्किक आणि अनैसर्गिक आहे. ह्या असल्या विचित्र नियमांमुळेच सध्याच्या काळातील लग्न संस्था निरर्थक आणि रीडंडंट ठरते .

इति शम |

थोडक्यात तुमच्या प्रतिसादाचं सार असं आहे :

प्रेम ही नैसर्गिक संकल्पना आहे आणि लग्न ही मानवनिर्मित सोय . आधी प्रेम महत्वाचे लग्न नाही केले तरी हरकत नाही !

आणि त्याला सपोर्ट ओशोंचं हे विधान आहे :

ओशो म्हणालेत : प्रेम संपल्यानंतरही केवळ बंधन म्हणुन लग्नात रहायचे , अन अनिच्छेने त्याच व्यक्ती सोबत संभोग करायचा हे नॉन सेन्स आहे त्या पेक्षा एकामेकाला स्पष्ट सांगा की आपले प्रेम होते , आपण सुखाने काही काळीकाळ व्यक्त केला आता प्रेम संपले आहे आप्ण स्वतंत्र होवु , एकमेकाला त्रास देत जगण्यात काय अर्थ ? मलातरी हे विधान १००% पटते !

हे प्रेम संपतं (किंवा संपलं) हे कुणी, केंव्हा आणि कसं ठरवायचं ? मुळात तुमची किंवा ओशोंची प्रेमाची व्याख्या काय आहे ?

कारण असं जर संपणारं प्रेम असेल तर ते अर्ध्या तासातही संपू शकतं आणि ते रोज सकाळी उठल्यावर चेक करायला हवं ! मग पुन्हा नव्या प्रेमपात्राची सोय करा, अपत्य झाली असतील तर त्यांची व्यवस्था लावा, जर एकाच्या दृष्टीनं प्रेम संपलं आणि पार्टनरच्या लेखी प्रेम चालू असलं तर मग तो तिढा कसा सोडवणार ? माझ्या मते ओशोंचे विचार फार उथळ आहेत.

विवाह हा इतका मॅच्युअर्ड डिसिजन आहे की तुमची पत्नी सर्वार्थानं तुमचाच एक भाग होते, कदाचित म्हणूनच तिला अर्धांगिनी म्हणतात. ज्या जोडप्यात असा अनुबंध असतो त्यांच्या मनात `प्रेम आहे किंवा संपलं' असा विचारच येत नाही. एकमेकांप्रती कृतज्ञतेचे इतके धागे गुंफले जातात की अशा व्यक्तीशी आपण सगळं आयुष्य शेअर करुन बसतो. तीनं केलेला सकाळचा चहा, तिनं आवरलेलं घरदार, तिनं अपत्य जन्माला घालून आपल्या जीवनात आणलेला आनंद, तिनं केलेला रोजचा स्वयंपाक, तिच्या दु:खात आपण तिला दिलेला हात, एकमेकांच्या हॉस्पिटलायजेशन्समधे अनुभवलेले अविस्मरणीय प्रसंग, आप्तांच्या मृत्यूप्रसंगी दोघांनी जागून काढलेल्या रात्री, तिच्या साथीनं केलेल्या सहली, तिच्याबरोबर साजरे केलेले आपले आणि नातेवाइकांचे सोहळे, तिच्या बरोबरीनं घेतलेला अपत्य संगोपनाचा आनंद, मुलामधे आणि आपल्यात निर्माण झालेला गोडवा........माय गॉड ! ओशोंनी हे अनुभवलेलंच नाही. अशा व्यक्तीचा सहवासच इतका मोलाचा असतो की प्रेमाची दुसरी व्याख्याच नाही.

माझ्या अनुभवानं, ओशोंनी हे परस्पर अनुबंधाचं जगच पाहिलेलं नाही. त्यामुळे ओशोंना विवाह ही संकल्पनाच समजलेली नाही. त्यांचे विचार हे फक्त त्यांनी बघितलेल्या विसंवादी जोडप्यांवर आधारित आहेत आणि त्यांची प्रेमाची कल्पना अत्यंत बालीश आहे.

संजय पाटिल's picture

18 May 2017 - 10:26 am | संजय पाटिल

+१

विशुमित's picture

18 May 2017 - 11:09 am | विशुमित

सिम्पली ग्रेट प्रतिसाद ...!!

सानझरी's picture

18 May 2017 - 7:22 pm | सानझरी

+1.. असंच म्हणते..

चित्रगुप्त's picture

18 May 2017 - 1:55 pm | चित्रगुप्त

@संक्षीसर, अतिशय सुंदर चपखल प्रतिसाद आहे वैवाहिक जीवनाबद्दल. बरेचदा ओशो हे भाषणाच्या प्रवाहात वाहवत जाऊन भलतेच काही, त्यांच्या प्रशंसकांना सुद्धा न पटण्यासारखे सांगताना दिसतात. कधी कधी मुद्दाम धक्कादायक विधाने करण्याची खोड त्यांना होती की काय, असेही वाटते.

अभिजीत अवलिया's picture

18 May 2017 - 7:44 pm | अभिजीत अवलिया

संक्षि, चांगला प्रतिसाद.

मार्कस ऑरेलियस's picture

19 May 2017 - 5:06 pm | मार्कस ऑरेलियस

माझ्या मते ओशोंचे विचार फार उथळ आहेत.

आपल्या मताचा आदर आहे संक्षी सर ! मी आधीच म्हणालेलो कि जो तो ज्याच्या त्याच्या जागी आणि काळी योग्य असतो. ओशो ने जे अनुभवविश्व पाहिले त्यात ओशो योग्य होते , तुम्ही जे पाहिले आहे त्यात ते अयोग्य ठरु शकतात. इथे वादाचे काही कारण नाही !

हे प्रेम संपतं (किंवा संपलं) हे कुणी, केंव्हा आणि कसं ठरवायचं ? मुळात तुमची किंवा ओशोंची प्रेमाची व्याख्या काय आहे ?

प्रेम ही खुपच वैयक्तिक बाब असते आणि तस्मात त्याच्या व्याख्या व्यक्तीपरत्वे भिन्न असतात . ओशो ची व्याख्या काय होती मला माहीत नाही आणि माझी व्याख्याही वैयक्तिक असणार सार्वजनीन नाही !

( मेंदुच्या कोणत्यातरी कोपर्‍यात डोपामाईन नावाचे केमिकल सिक्रीट झाल्यावर आपल्याला आनंदाची " आनंद " ह्या भावनेची जाणीव होते , एखाद्या व्यक्तीच्या सहवासाने किंव्वा नुसत्या आठवणीने आपल्याला अशा आनंदाची जाणीव होत असेल तर त्याला मी प्रेम म्हणतो. तुम्ही ये तेरा जिक्र है हे गाणे ऐकले आहे का गुझारिष चित्रपटातील तसे काहीसे ! किंव्वा तुम्ही धर्मवीर भारतींची कनुप्रिया वाचली आहे का ? एस्पिशली आम्रबौर के गीत की कविता ... तसे काहीसे , मी त्याला प्रेम म्हणतो !
आणि ही प्रेमाची व्याख्या जनरलाईझ करता येते , उदाहरणार्थ अशा कित्येक गोष्टी आहेत व्यक्ती नाहीत , वस्तु आहेत , जागा आहेत , आठवणी आहेत , अनुभव आहेत की त्यांच्या नुसत्या स्मरणाने ही आनंदाची अनुभुती येते . ह्या सार्‍यालच मी प्रेम म्हणतो !

आणि काही काही वेळा मग डोपामाईन सीक्रीट व्हायचे थांबु शकते , मग त्या व्यक्ती सोबत कितीही वेळ घालवा , त्यातुन कणमात्र आनंद होत नाही त्याला प्रेम संपणे म्हणतात. हे होतं , मी स्वतः अनुभवलंय , तुम्ही अनुभवलं नसेल तर तुम्ही नशीबवान आहात ! पण होतच नाही असे म्हणत असाल तर असो. )

प्रेम जसं होतं तसंच ते संपतेही , प्रेम संपण्याला एक्झ्यॅक्ट शब्द नाही पण हे होते हे नक्की ! आणि ते रोज सकाळि उठुन चेक करायची गरज पडत नाही , ते झाल्या क्षणी तुमच्या लक्शात येते !

ज्या जोडप्यात असा अनुबंध असतो त्यांच्या मनात `प्रेम आहे किंवा संपलं' असा विचारच येत नाही. एकमेकांप्रती कृतज्ञतेचे इतके धागे गुंफले जातात की अशा व्यक्तीशी आपण सगळं आयुष्य शेअर करुन बसतो. तीनं केलेला सकाळचा चहा, तिनं आवरलेलं घरदार, तिनं अपत्य जन्माला घालून आपल्या जीवनात आणलेला आनंद, तिनं केलेला रोजचा स्वयंपाक, तिच्या दु:खात आपण तिला दिलेला हात, एकमेकांच्या हॉस्पिटलायजेशन्समधे अनुभवलेले अविस्मरणीय प्रसंग, आप्तांच्या मृत्यूप्रसंगी दोघांनी जागून काढलेल्या रात्री, तिच्या साथीनं केलेल्या सहली, तिच्याबरोबर साजरे केलेले आपले आणि नातेवाइकांचे सोहळे, तिच्या बरोबरीनं घेतलेला अपत्य संगोपनाचा आनंद, मुलामधे आणि आपल्यात निर्माण झालेला गोडवा........माय गॉड !

हे सगळे करायला लग्न ह्या धार्मिक विधीची किंव्वा सामाजिक मान्यतेची किंव्वा सरकारी अ‍ॅप्रुव्हल ची काय गरज हे कळाले नाही . लग्न न करताही हे सारे होतेच की ! मी आधी म्हणल्याप्रमाणे सध्यस्थीतीतल्या लग्न ह्या संकल्पनेतेत एक अडकलेपणा आहे. प्रेम फक्त एकदाच होते / एकदा तरी होतेच. असे कोठे तरी गृहीतक आहे . ते तसे का आहे हे माहीत नाही . काही काही लोकांना प्रेम होतच नाही मग त्यांन्नी लग्न ह्या भानगडीत का पडावे ? ( माझ्या नात्यातली अगदी जवळची एक व्यक्ती आहे की जिने घरी स्पश्ट सांगितले आहे की मला हे प्रेम बिम काही जाणवत नाही , आणि जोवर जाणवत नाही तोवर 'केवळ वय निघुन चाललय' ह्या कारणास्तव लग्न करणार नाही !!) तसेच प्रेम संपलं म्हणुन विवाहबंधनातुन बाहेर पडलेले काही मित्र मैत्रीणी आहेत, केवळ लग्न नावाचा काहीतरी कृत्रीम संस्कार झालाय म्हणुन उगाचच कुढत कुढत एकत्र रहायचं ह्याला काही अर्थ नाही !

माझ्या अनुभवानं, ओशोंनी हे परस्पर अनुबंधाचं जगच पाहिलेलं नाही. त्यामुळे ओशोंना विवाह ही संकल्पनाच समजलेली नाही. त्यांचे विचार हे फक्त त्यांनी बघितलेल्या विसंवादी जोडप्यांवर आधारित आहेत आणि त्यांची प्रेमाची कल्पना अत्यंत बालीश आहे.

परस्पर अनुबंध निर्मांन होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे , त्याला लग्ना सारख्या कृत्रीम विधीची गरज नाही. ओशोंनी विसंवादी जोडपी पाहिली असतील म्हणुन त्यांचे मत प्रतिकुल बनले असेल पण मी सुसंवादी जोडपीही पाहिली आहेत की ज्यांच्या कडे पाहुन एकच जाणवते की ह्यांनी लग्न केले नसते तरी काहीही फरक पडला नसता , लग्नाअधी लिव्ह इन मध्ये असताना ह्यांचे एकमेकांवर जितके जिवापाड प्रेम होते तितकेच आत्ताही आहे !

असो.

प्रेम म्हणा किंव्वा लग्न हे सारे आयुष्याच्या अनेक पैलुंपैकी एक आहेत , प्रत्येकाच्या जडणघडणी नुसार , अनुभव विश्वानुसार त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन भिन्न भिन्न असु शकतो , रादर असणारच . आयुष्य बहुरंगी बहुढंगी आहे ! कोणाचाही ज्याच्या त्याच्या जागी योग्यच आहे !
पण " केवळ माझाच दृष्टीकोन केवळ सत्य , बाकीचे असत्य ! लग्न संस्थेला पर्यायच नाही , किंव्वा असतील तर ते भिकारडे " ही एकांगी टोकाची मनोवृत्ती मध्यपुर्वेतील धर्मांच्या प्रभवाने आली असावी असे राहुन राहुन वाटते कारण आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मात तरी असला एकांगीपणा कोठेही दिसत नाही !
I accept and appreciate the beauty of diversity of thoughts ! Life is colorful , Don't see it through someone's monochrome goggles!

|| जय हनुमान || जय श्रीराम || जय श्री कृष्ण ||

संजय क्षीरसागर's picture

19 May 2017 - 5:54 pm | संजय क्षीरसागर

१) आनंदाचा आणि डोपामाईनचा फारसा संबंध नाही ! आनंदही स्वतःची स्वतःशी कनेक्टिविटी आहे. ज्या व्यक्तीच्या सहवासात तुमची ही कनेक्टिविटी हरवत नाही (आणि तिचीही कायम राहाते) तो सहवास दोघांना प्रिय वाटतो.

शिवाय तुम्ही म्हणता तसा आनंदाचा संबंध स्मृतीशी असेल तर तो नेहेमी क्षणिक असेल कारण स्मृतींचा पट फार भराभर बदलत असतो.

तस्मात डोपामाईन एकीकडे सिक्रेट होतंय आणि दुसरीकडे थांबलंय असा प्रकार निदान माझ्या अनुभवात तरी होत नाही कारण त्यावर सहवासाचं सुख अवलंबूनच नाही !

२) हे सगळे करायला लग्न ह्या धार्मिक विधीची किंव्वा सामाजिक मान्यतेची किंव्वा सरकारी अ‍ॅप्रुव्हल ची काय गरज हे कळाले नाही

सहमत आहे ! पण अपत्य जन्म, संगोपन आणि औरसत्त्वाचा नेमका मुद्दा तुम्ही वगळलायं आणि सहजीवनात तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना असा परिपूर्ण संसार करायचांय त्यांना विवाहावेगळा पर्याय काय ?

अपत्याची गरज काय ? असा तुमचा स्टँड असेल तर मग लिव-इनची सुद्धा गरज काय ? मूड येतील तेव्हा, मूड येईल तिथे, दोघं आपपल्या घरी राहून सुद्धा, एकमेकांना भेटू शकतीलच की ! आणि मग एकावेळी अशा मल्टीपल लिव-इन्स चालू शकतील ! आज मूड आला तर हिच्याबरोबर, उद्या तिच्या आठवणीनं डोपामाईन सिक्रेट झालं (आणि नशिबानं तिचं सुद्धा झालं :) ! ) तर तिच्याबरोबर, मग बरेच दिवस डोपामाईन सिक्रेट झालं नाही तर एकटंच खानावळीत जेवायचं आणि ते कधी सिक्रेट होतंय त्याची वाट बघायची !

३) " केवळ माझाच दृष्टीकोन केवळ सत्य , बाकीचे असत्य ! लग्न संस्थेला पर्यायच नाही , किंव्वा असतील तर ते भिकारडे "

पर्याय तर सांगा ना ! ज्याला अपत्य हवंय आणि ज्यांच्या अपत्याला औरसत्त्व हवंय त्यांना लग्नावेगळा पर्याय काय आहे ? लिव-इनमधे अपत्य झाली आणि अचानक रात्रीत डोपामाईन सिक्रेट होत नाही असा साक्षात्कार झाला तर मुलांनी कुणाकडे बघायचं ?

संजय क्षीरसागर's picture

19 May 2017 - 6:03 pm | संजय क्षीरसागर

लिव-इनमधे अपत्य झाली आणि अचानक रात्रीत `डोपामाईन सिक्रेट होत नाही' असा साक्षात्कार झाला तर मुलांच्या डोपामाईनचं कुणी बघायचं ?

मार्कस ऑरेलियस's picture

19 May 2017 - 6:24 pm | मार्कस ऑरेलियस

पर्याय तर सांगा ना !

सध्याच्या फक्त एक आणि एकच प्रकारच्या प्रचलीत लग्न ह्या प्रकाराला अनेक पर्याय आहेत संक्षी सर !

१) लग्न न करता ब्रह्मचारी रहाणे
२) लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये रहाणे
३) एकाशी लग्न करणे
४) एकीशी लग्न करणे
५) अनेकांशी लग्न करणे
६) अनेकांशी लग्न करणे
७) अनेकांशी आणि अनेकींशी लग्न करणे
८) मुक्त लग्न करणे
९) समुह लग्न करणे
१०) लग्न किंव्वा सहवासही न करता एकामेकाच्या प्रेमात रहाणे !!
११)...
१२)....

खुप पर्याय आहेत सर पण ते मध्यपुर्वेतील विचारसरणी स्विकारलेल्या लोकांना समजावणे अशक्य आहे

p

बाकी औरसत्व एक अत्यंत वाईट संकल्पना आहे , ह्या संकल्पनेने कित्येक निष्पाप लोकांचे आयुष्य जन्माला यायच्या आधीच उध्द्वस्त केले आहे ! ह्या असल्या खुळचट संकल्पना माणुस प्रजाती किती काळ गोंजारत रहाणार आहे देव जाणे !

माझ्या स्पर्मने जन्म झालेले प्रत्येक मुल माझेच असेल. माझेच ! औरस / अनौरस असला फरक नाही !

असो. अजुन चर्चा केली असती पण
तुम्ही असे म्हण्त आहात की ....

१) आनंदाचा आणि डोपामाईनचा फारसा संबंध नाही !

त्या मुळे इथेच थांबतो =))))

सुबोध खरे's picture

19 May 2017 - 7:38 pm | सुबोध खरे

प्रगो
मेंदुच्या कोणत्यातरी कोपर्‍यात डोपामाईन नावाचे केमिकल सिक्रीट झाल्यावर आपल्याला आनंदाची " आनंद " ह्या भावनेची जाणीव होते , एखाद्या व्यक्तीच्या सहवासाने किंव्वा नुसत्या आठवणीने आपल्याला अशा आनंदाची जाणीव होत असेल तर त्याला मी प्रेम म्हणतो.
हे मूलभूत गृहितकच चूक आहे. आज आपले आपल्या बायको बरोबर किंवा आईबरोबर भांडण झाले तर तिच्या आठवणीने सुद्धा डोके ठणकते. (आजच्या पुरते का होईना) याचा अर्थ आपले प्रेम नष्ट झाले का?
दुर्दैवाने तुमची प्रेमात आणि हव्यास किंवा वासना यात गल्लत होते आहे.
"प्रेम जसं होतं तसंच ते संपतेही , प्रेम संपण्याला एक्झ्यॅक्ट शब्द नाही पण हे होते हे नक्की" हे वाक्य असाच दृष्टिकोन दाखवते.
आपल्या बायकोचे कुणाबरोबर तरी लफडे आहे या विचाराने अत्यंत क्षुब्ध झालेला माणसाला जेंव्हा हि धारणा/ कल्पना खोटी आहे म्हटल्यावर एकदम प्रेम कसे उफाळून येते? दोन मिनिटापूर्वी संपलं असं वाटलेलं प्रेम एकदम कसं तयार होतं?
केवळ डोपामाईन हा एक पदार्थ घेऊन तुम्ही जो इमला उभारला आहे तो मुळात पोकळ आहे.
प्रेम हि भावना अजून शास्त्रज्ञाना समजलेली नाही. त्यासाठी असंख्य न्यूरो केमिकलस ( सेक्स संप्रेरके न्यूरोट्रांसमीटर आणि न्यूरो पेप्टाइडस) जबाबदार आहेत केवळ डोपामाईन एकच नव्हे. आणि यांची एकमेकांत काय प्रक्रिया होते हे अत्यंत जटील आहे.
ओशो याना सर्वज्ञ मानून तुम्ही त्यांच्या प्रवचनाचा आधार घेतला आहे म्हणून त्याचे लंगडे समर्थन करता आहात.
परस्पर अनुबंध निर्मांन होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे , त्याला लग्ना सारख्या कृत्रीम विधीची गरज नाही.
बाकी औरसत्व एक अत्यंत वाईट संकल्पना आहे ,

तुम्ही एखाद्या मित्राची जमीन कसायला घेतलीत. त्याने तुम्हाला सांगितले मला तुमचा पुण्याचा फ्लॅट दे आणि त्याबदल्यात हि जमीन तुझी. मग तुम्ही ७/१२ आणि इतर कागदपत्रे का करता? एखाद्या गोष्टीला legitimacy (औरसत्व) हे महत्त्वाचे आहे.
हेच औरसत्व तुमच्या प्रेम संबंधाला देण्यासाठी चार माणसांच्या साक्षीने लग्न केले जाते.
"लग्न संस्थेला पर्यायच नाही , किंव्वा असतील तर ते भिकारडे " ही एकांगी टोकाची मनोवृत्ती मध्यपुर्वेतील धर्मांच्या प्रभवाने आली असावी " हि केवळ अशा ओशो हेच बरोबर या मनोवृत्तीतून आली आहे असे वाटते.
आपल्याला माहिती असावे कि ज्ञानेश्वर माउली यांच्या आई वडिलांचे लग्नच झालेले होते (हा इतिहास आहे. पुराण किंवा कविकल्पना नाही.) जेंव्हा मध्यपुर्वेचा भारताशी फारसा संपर्क आलेला नव्हता.
तेंव्हा उछशृंखल वृत्तीला आधार देण्यासाठी चुकीचे संदर्भ देऊ नका.
आपण उद्धृत केलेल्या लग्नसंस्थेच्या सर्व पर्यायात होणाऱ्या मुलांचा किंवा वृद्ध आईबापांचा विचार कुठेच दिसत नाही.
वरिल सर्व पर्याय फक्त "farmyard morals" किंवा स्वैराचार दाखवतात एवढेच मी म्हणेन.
केवळ मध्य पूर्वच नव्हे अति पूर्व अति पश्चिम अति उत्तर येथे असलेल्या संस्कृती मध्ये सुद्धा लग्नाला समर्थ पर्याय दिसत नाही.
माझ्या स्पर्मने जन्म झालेले प्रत्येक मुल माझेच असेल. माझेच ! औरस / अनौरस असला फरक नाही !
तुमच्या एका मैथुनात निर्माण झालेल्या १० अब्ज शुक्राणूंपैकी कोणतया शुक्राणुंमुळे तुमचे मूल जन्माला आले हे तुम्हालाही सांगता येणार नाही. मग बरेच सहचर असणाऱ्या असलेल्या स्त्रीला कसे सांगता येईल हो? लक्षात ठेवा paternity is suspect, maternity is not. पितृत्व हे खात्रीचे नाही, मातृत्व आहे.
अफाट संपत्ती असलेल्या माणसाची गोष्ट वेगळी पण optimum utilization of resources च्या आधुनिक जमान्यात तिसऱ्याच माणसाचे मूल वाढवायला तितकी संपत्ती नसलेले पण बेफाट स्वैर विचार असणारे किती पुरुष तयार होतील?
उगाच सवंग लोकप्रियता किना सनसनाटी साठी बेफाट विधाने करता आहात असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे
एकदा https://en.wikipedia.org/wiki/Biological_basis_of_love हे वाचू पहा आणि त्यानंतर त्याचे संदर्भही वाचून पहा. ते समजले कि मलाही समजवा. कारण मला "प्रेम आणि त्याची उत्पत्ती" समजलेले नाही. त्याची अनुभूती येते एवढे मात्र सत्य.

मार्कस ऑरेलियस's picture

19 May 2017 - 9:47 pm | मार्कस ऑरेलियस

नमस्कार सुबोध खरे सर !
हे मूलभूत गृहितकच चूक आहे. आज आपले आपल्या बायको बरोबर किंवा आईबरोबर भांडण झाले तर तिच्या आठवणीने सुद्धा डोके ठणकते. (आजच्या पुरते का होईना) याचा अर्थ आपले प्रेम नष्ट झाले का?
दुर्दैवाने तुमची प्रेमात आणि हव्यास किंवा वासना यात गल्लत होते आहे.

तुम्ही ना डॉक्टर एकदम एका ऑऊटलायर वरुन अनुमान काढत आहात : चला अजुन एक उदाहरण देवुन बोलु : मी म्हणतोय की माझे आंब्यावर प्रेम आहे , त्याच्या नुसत्या स्मरणाने माझ्या डोक्यात डोपामाईन सीक्रीट होतं आणि मला आनंद होतो, आता एखाददुसरा आंबा मला आंबट लागलेला नाही काय ? लागलाय की , पण चांगले लागलेल्या आंब्याच्या आठवणी त्या आंबट लागलेल्या आंब्याच्या स्मरणावर ओव्हर राईड करतात आणि म्हणुनच माझे आंब्यावर प्रेम आहे . आता समजा मला पुढचे काही सीझन फक्त आंबटच आंबे मिळत राहिले तर ती स्मृती स्ट्राँग होईल आणि मग मला आंब्याच्या आठवणीने डोपामाईन सीक्रीट होणार नाही , आणि मग मला आंबा आवडणे कमी होईल , आणि कालांतराने बंदही होईल , तेव्हा माझे आंब्यावरचे प्रेम संपले असेल !

सो सिंपल ! एका भांडणाने एक क्षण डोपामाईन सीक्रीट होणार नाही पण हीच प्रक्रिया कायम चालु राहिली तर त्या व्यक्तीच्या आठवणीने डोपामाईन व्ह्यायचे थांबेल तेव्हा मग मी प्रेम संपले असे म्हणेन ! काहीही गल्लत नाही सर्ळ स्ट्रेट फॉरवर्ड आहे ! ह्यात समजायला काय अवघड आहे हेच मला स्मजत नाहीये !

केवळ डोपामाईन हा एक पदार्थ घेऊन तुम्ही जो इमला उभारला आहे तो मुळात पोकळ आहे.
प्रेम हि भावना अजून शास्त्रज्ञाना समजलेली नाही. त्यासाठी असंख्य न्यूरो केमिकलस ( सेक्स संप्रेरके न्यूरोट्रांसमीटर आणि न्यूरो पेप्टाइडस) जबाबदार आहेत केवळ डोपामाईन एकच नव्हे. आणि यांची एकमेकांत काय प्रक्रिया होते हे अत्यंत जटील आहे.

असेलही , पण त्याने डोपामाईन्चे अर्ग्युमेन्ट वीक होत नाही . उल्ट स्ट्राँगच होते . डोपामाईन च्या ऐवजी क्ष्य्झ नावाची १७६० केमिकल्स असतील प्रेमाला कारण ! ती असतील तेव्हा त्याला प्रेम म्हणु , नसतील तेव्हा प्रेम संपले असे म्हणु !!

ओशो याना सर्वज्ञ मानून तुम्ही त्यांच्या प्रवचनाचा आधार घेतला आहे म्हणून त्याचे लंगडे समर्थन करता आहात.
हि केवळ अशा ओशो हेच बरोबर या मनोवृत्तीतून आली आहे असे वाटते.

हे आप ण उगाचच खुस्पट काढत आहात . मी किमान २-३ वेळा वर म्हणालोय की जो तो ज्याच्या त्याचा जागी आणि काळी योग्य असतो . ओशो ओशोंच्या जागी संक्षी संक्षींच्या जागी आणि मी माझ्या जागी ! ओशो कुठेच चुकले नाहीत , ओशो देव आहेत असे मी कुठेतरी म्हणालोय का ?

आपल्याला माहिती असावे कि ज्ञानेश्वर माउली यांच्या आई वडिलांचे लग्नच झालेले होते (हा इतिहास आहे. पुराण किंवा कविकल्पना नाही.) जेंव्हा मध्यपुर्वेचा भारताशी फारसा संपर्क आलेला नव्हता.

ज्ञानेश्वरांचा संबंध लक्षात आला नाही . मी म्हणालोय की औरसत्व ही एक वाईट संकल्पना आहे , जितका सांब औरस आहे तितकाच सांब आहे , जितका सुतसोम औरस आहे तितकाच घटोत्कच , जितका शृतकीर्ती आणि अभिमन्यु तितकाच बब्रुवाहन ! औरस अनौरस ही संकल्पना फार फार ऊशीरा आलीये , आणि त्याने निश्प्पाप लोकाचे नुकसानच केले आहे ! अगदी शिवकालातही अनौरस मुलांना राजांनी टाकुन दिल्याचे दिसत नाही पण केवळ अनुरस आहेत ह्या एका उल्लेखाने त्यांचे जन्मसिध्द अधिकार हिरावल्याचे दिसुन येते ! बाजीरावांच्या आणि मस्तानीची मुलाची रीतसर मुंज करुन घेतली असती तर कदाचित बाजीराव जास्त जगले असले !

तुमच्या एका मैथुनात निर्माण झालेल्या १० अब्ज शुक्राणूंपैकी कोणतया शुक्राणुंमुळे तुमचे मूल जन्माला आले हे तुम्हालाही सांगता येणार नाही. मग बरेच सहचर असणाऱ्या असलेल्या स्त्रीला कसे सांगता येईल हो? लक्षात ठेवा paternity is suspect, maternity is not. पितृत्व हे खात्रीचे नाही, मातृत्व आहे.
तुम्ही डॉक्टर असुन असे विधान करत आहात हे पाहुन आश्चर्य वाटले . साधी सिंपल जेनेटिक टेस्ट करुन मुलाचा बाप कोण ओळखता येते हे बहुतेक तुम्ही जाणत असाल. माझ्या १० अब्ज शुक्राणूंनी १० अब्ज अपत्य जन्माला आली तरी ती सर्वच्या सर्व माझीच असतील अस्से मी म्हणत आहे ! त्यातीक कोणीही अनौरस नसेल इतकेच मी म्हणले आहे !

तेंव्हा उछशृंखल वृत्तीला आधार देण्यासाठी चुकीचे संदर्भ देऊ नका.
उगाच सवंग लोकप्रियता किना सनसनाटी साठी बेफाट विधाने करता आहात असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे

ही दोन्हीही विधाने मला ad hominem वाटतात . वर चाललेल्या चर्चेत मी किंव्वा संक्शींनी कोठेही वैयक्तिक आरोप केलेले दिसत नाहीत. मी तर वारंवार म्हणालोय की मला संक्षींच्या मताचा आदर आहे , त्यांच्या विचारस्वातंत्र्याचा आदर आहे !

तुम्ही मात्र पहिल्याच प्रतिसादात डायरेक्ट व्यक्तीगत टीकेवर उतरेला दिसता . असो , हा येवढा पार्ट सोडुन मला तुमच्या मताचा आणि विचारस्वातंत्र्याचा आदरच आहे ! आणि तुम्हाला तुमच्या विचारसरणी ने जय्गायला मी अडथळा करणार नाही.
We hold these truths to be sacred & undeniable; that all men are created equal & independent, that from that equal creation they derive rights inherent & inalienable, among which are the preservation of life, & liberty, &

the pursuit of happiness;

. सर्वेत्र सुखिनः सन्तु ! :)

सुबोध खरे's picture

19 May 2017 - 10:14 pm | सुबोध खरे

गोल आणि भंपक वितंडवाद

मार्कस ऑरेलियस's picture

19 May 2017 - 10:30 pm | मार्कस ऑरेलियस

सुखी रहा :)

शित्रेउमेश's picture

31 May 2017 - 11:04 am | शित्रेउमेश

खूप छान प्रतिसाद ... +++++१

शित्रेउमेश's picture

31 May 2017 - 11:05 am | शित्रेउमेश

खूप छान प्रतिसाद ... +++++१

सुबोध खरे's picture

17 May 2017 - 7:04 pm | सुबोध खरे

लग्नसंस्था हि लोकशाही सारखी आहे.
ती आदर्श नाही पण तिचे पर्याय भयानक आहेत.
आणि सध्यातरी त्याला सशक्त असा पर्याय दृष्टी पथात नाही.
हे सर्व "खुला संभोग" "लिव्ह इन" इ. हे गेल्या ५०-१०० वर्षातील पर्याय आहेत जेंव्हा पासून संततिप्रतिबंधक साधने उपलब्ध झाली.
बहुसंख्य स्त्रीमुक्तीवाद्यांनी पण हे मान्य केलेले आहे कि स्त्रीमुक्तीच्या इतिहासात संततिप्रतिबंधक साधने हा एक फार मोठा टप्पा आहे.
सध्या मी एवढेच म्हणेन

कानडाऊ योगेशु's picture

18 May 2017 - 8:23 am | कानडाऊ योगेशु

हे सर्व "खुला संभोग" "लिव्ह इन" इ. हे गेल्या ५०-१०० वर्षातील पर्याय आहेत जेंव्हा पासून संततिप्रतिबंधक साधने उपलब्ध झाली.
बहुसंख्य स्त्रीमुक्तीवाद्यांनी पण हे मान्य केलेले आहे कि स्त्रीमुक्तीच्या इतिहासात संततिप्रतिबंधक साधने हा एक फार मोठा टप्पा आहे.

बँग ऑन डॉक.
पुजा भट ला महेश भटने सल्ला दिला होता पाहीजे तितका स्वैराचार कर पण मुले होऊ देऊ नकोस म्हणुन असे वाचल्याचे आठवते आहे.

पगला गजोधर's picture

17 May 2017 - 7:36 pm | पगला गजोधर

मागे तुम्हीच का कोणीतरी धागा काढला होता नं हो सातारकर ? की

केळवण ह्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नाव, "केळ्याची वन वन , या कार्यक्रमानंतर थांबते", म्हणून पडले असावे, अश्या अर्थाचा ......

चू भू दे घे

टवाळ कार्टा's picture

17 May 2017 - 7:39 pm | टवाळ कार्टा

ख्याक =))

बदलापुरकर's picture

17 May 2017 - 7:53 pm | बदलापुरकर

Khar aahe.

गामा पैलवान's picture

18 May 2017 - 12:39 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,


पण तिचे पर्याय भयानक आहेत.

किंचित असहमत. विवाहसंस्थेस पर्याय नाही! असलाच तर त्यास चामडीबाजार म्हणतात.

तसं बघायला गेलं तरी लग्न हाही एक बाजारच म्हंटला जातो. पण त्यात निदान स्त्रीला किमान सुरक्षितता तरी लाभते, जी चामडीबाजारात शून्य असते.

आ.न.,
-गा.पै.

स्त्रीला किमान सुरक्षितता तरी लाभते

सुरक्षितता नव्हे. सुरक्षिततेची अपेक्षा.

स्त्रीला किमान सुरक्षितता तरी लाभते
बऱ्यापैकी सुरक्षितता सुद्धा लाभते. साधे गळ्यात मंगळसूत्र असेल तरी इतर पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अगदी मध्यमवर्गात राहणाऱ्या बायका याचसाठी वैधव्य आले तरी कुंकू मंगळसूत्र काढत नाही.
दारुडा आणि अगदीच बिनकामाचा(नुसताच कुंकवाचा धनी) नवरा असेल तरी झोपडीत राहणारी बाई त्याला सहन करीत असते कारण कपाळाचे कुंकू पाहून झोपडित राहणारे इतर "लांडगे" तिच्यापासून लांब असतात. न जाणे दारुड्या नवऱ्याने चाकू मारला तर काय घ्या.

दीपक११७७'s picture

18 May 2017 - 2:27 pm | दीपक११७७

सहमत

श्री श्री माहीतगार जी
आणि
श्री श्री बिरुटे सर

यांच्या प्रतिक्रिया वाचायला नाही मिळाल्यात अजुन.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

18 May 2017 - 5:19 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मंगळसुत्र असेल तर स्त्रीला सुरक्षीतता मिळते हा गावठी विचार झाला .याचा अर्थ तुमच्या देशात कायद्याचं राज्य नसून लफंग्यांचं राज्य आहे.

दीपक११७७'s picture

18 May 2017 - 6:50 pm | दीपक११७७

माफकरा पण - गावठी या शब्दाला तुच्छ, निम्न या अर्थाने वापरणे हा शुध्द मुर्ख पणा आहे असे वाटते.

पण टर्बोचार्जड फिलॉसॉफर म्हटंल की चालायचच.

ज्या इलाजा मुळे आपल्याला चांगला/इसपित फरक पडत असेल तोच इलाज आपण करणार मग तो युनानी असो, आयुर्वेदिक असो, होमीओपॅथीक असो की अजुन कोणता. आपलं काम झाल्याशी मतलब कायं ?

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

18 May 2017 - 5:20 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मंगळसुत्र असेल तर स्त्रीला सुरक्षीतता मिळते हा गावठी विचार झाला .याचा अर्थ तुमच्या देशात कायद्याचं राज्य नसून लफंग्यांचं राज्य आहे.

सतिश गावडे's picture

18 May 2017 - 5:24 pm | सतिश गावडे

रामराज्य येईल तेव्हा येईल हो. पण मंगळसुत्राच्या निमित्ताने आया बहिणींना सुरक्षितता मिळत असेल तर त्यात वाईट काय आहे.
तुम्ही तुमचा पैसा अडका सोनं नाणं घरात उघडे ठेवून दरवाजे सताड उघडे टाकून बाहेर जाता का?

टवाळ कार्टा's picture

18 May 2017 - 5:27 pm | टवाळ कार्टा

तुम्ही तुमचा पैसा अडका सोनं नाणं घरात उघडे ठेवून दरवाजे सताड उघडे टाकून बाहेर जाता का?

या सरकारच्या आधीचे सरकार असतानासुद्धा असेच वाटायचे का असे विचारा सर ;)

सतिश गावडे's picture

18 May 2017 - 5:32 pm | सतिश गावडे

अच्छा. हा कंगोरा आहे तर त्या विधानाला. मग चालू द्या.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

18 May 2017 - 8:25 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

अहो साहेब, पोरी बारा तेरा वर्षाच्या असताना वयात येतात ,बुबुक्षीत नजरेच्या पुरुषांची तेव्हापासुनच त्यांना न्याहळण्याची सुरवात होते. मग काय म्हणता????? बाराव्या वर्षी बार उडवायचा??????

टवाळ कार्टा's picture

18 May 2017 - 8:57 pm | टवाळ कार्टा

त्या बारा-तेरा वर्षात मुलांवर समानतेचे संस्कार करा की

सुबोध खरे's picture

19 May 2017 - 11:08 am | सुबोध खरे

ट फि साहेब
बुभुक्षित माणसांची नजर तर ७० वर्षाच्या बाईकडे पण असते. पण मुलीचे वडील आणि विशेषतः आई अशा कोवळ्या मुलीकडे तिची वाढ होईपर्यंत लक्ष ठेवून असतात. शिवाय मुलगी पण कुणाला फशी पडू शकते. आणि याच कारणासाठी गरिबांकडे लवकर लग्न करण्याकडे कल असतो.
लग्नातुन सुरक्षितता दोन्ही तर्हेची असते. एक म्हणजे शरीरसुख सहज मिळू लागल्याने मुलगी तारुण्याच्या उन्मादात वाहावण्याची शक्यता नाहीशी होते.आणि भावनिक दृष्ट्या मुलगी गुंतल्याने तिचं पण "लक्ष" बाहेर जाण्याची शक्यता कमी होते.
मुलीचे लग्न झाले आहे हे समजले कि तिच्यावर " लक्ष" ठेवणाऱ्या तरुणांची संख्या पण लक्षणीय रित्या कमी होते. शिवाय छेडछाड केल्यास गरम डोक्याच्या नवऱ्याशी भांडण होण्याची शक्यता असल्यामुळे बुभुक्षित लोकहि जरा मर्यादेत राहतात.

टवाळ कार्टा's picture

18 May 2017 - 5:26 pm | टवाळ कार्टा

अभी असली पिच्चर शुरु हुआ भाय
popcorn

अप्पा जोगळेकर's picture

18 May 2017 - 5:36 pm | अप्पा जोगळेकर

गावठी हा शब्द वापरणे हासुद्धा तथाकथित 'गावठी' पणा आहे.
गावाकडचे म्हणजे फालतू अशी काहीशी मानसिकता यातून दिसते. त्यापेक्षा मागास हा शब्द वापरावा.

गामा पैलवान's picture

18 May 2017 - 11:21 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर's picture

19 May 2017 - 12:42 pm | संजय क्षीरसागर

साधी गोष्ट आहे. परस्परात दीर्घकाल शारीरिक संबंध ठेवण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत, लग्न किंवा लिव-इन. खरा प्रश्न, संबंधित व्यक्तींचा फोकस केवळ शरीरसंबंधावर आहे की कुटुंब निर्माण करण्यावर आहे, असा आहे.

ज्यांना केवळ विविधता उपभोगायची आहे ते लिव-इनसारखा पर्याय निवडणार आणि त्या प्रकारच्या संबंधातून लग्न केलं तरी त्यांना कायम वैविध्याच आकर्षण राहाणारच. याची दोन कारणं आहेत. स्त्रीला विवाहपूर्व अनुभव कमालीचा आणि पुरुषाला त्यानं खटपट केली तेवढा असणार, त्यामुळे दोघंही एकमेकांबद्दल कायम साशंक (पण बोलायची चोरी :) )! शिवाय एकदा नाद लागला की तो सुटायची मुश्कील त्यामुळे शक्यतो अपत्यप्राप्ती नकोच वाटणार. तस्मात, लिव-इनवाले कितीही ठरवू देत त्यांचा एकमेकांप्रती अनुबंध निर्माण होऊ शकत नाही आणि त्यामुळे लिव-इनमधून एक सुखासिन घर निर्माण होण्याची शक्यता दुर्लभ.

लग्न करणारे कुटुंब निर्माण करायला तयार असतात पण ही मानसिकता दोन्हीकडून हवी. थोडक्यात, दोघात मिळून एकच आयुष्य जगायची मॅच्युरिटी हवी. एकदा हा ठराव पास झाला की करीयर, पैसा, अपत्य जन्म, संगोपन, स्वयंपाक, इतर प्रापंचिक कामं, तिचं माहेर, तुमचे नातेवाईक, अधेमधे हॉस्पिटलायजेशन्स, झाल्यास इकडचे किंवा तिकडचे मृत्यू ........आणि कायकाय, असा भेद उरत नाही. दोघं मिळून जो काय प्रसंग आहे तो एकमेकांच्या साथीनं निभावतात किंवा साजरा करतात. दोघात मिळून जगायला एक वाइड स्पेक्ट्रम उपलब्ध होतो आणि संभोग हा अर्थात महत्त्वाचा असला तरी तो एकमेकांशी आनंदाचं शेअरींग होतो. लग्न हा जगण्याचा सर्वस्वी वेगळा पर्याय आहे. एकमेकांच्या साथीनं, जे काय आहे ते शेअर करत, दोघांनी मिळून जगायचं एक अयुष्य असा तो गेम प्लान आहे. यामधे एकमेकांप्रती अनुबंध आणि कृतज्ञता निर्माण झाली की संभोग ही आनंद (घेण्यापेक्षा) देण्याची प्रोसेस होते, मग सर्व दृष्टीकोनच बदलतो. जसं दोघं मिळून एकच आयुष्य जगतात तसा दोघं मिळून संभोगाचा आनंद शेअर करतात. अर्थात, जेवढा एकमेकांप्रती खुलेपणा जास्त तेवढा आनंद जास्त. याला तीन कारणं आहेत : १) अपराध शून्य चित्तदशा (नो गिल्ट फिलींग), २) कमालीचा निवांतपणा आणि ३) एकमेकातला अनुबंध ! यात दोघातली कंपॅटिबिलीटी इतकी कमालीची वाढते की दुसरी संधी आली तरी तो माहौल जमून येण्याची शक्यता नसते. तस्मात, वैविध्याचं आकर्षण केवळ फँटसी म्हणून असू शकतं पण पुरेशी मॅच्युरिटी असली की ज्या तीन गोष्टी विवाहित जोडप्यात जमून येतात त्याची खुमारी हिट-अँड-रनमधे कधीही मिळू शकणार नाही हे सहज लक्षात येतं. शिवाय लग्नानंतर जी कुटुंबव्यवस्था निर्माण होते ती दांपत्य, अपत्य आणि दोन्ही कडच्या फॅमिलीज या सर्वांना अनेक दृष्टीनं हिताची ठरु शकते.

यात दोघातली कंपॅटिबिलीटी इतकी कमालीची वाढते की दुसरी संधी आली तरी तो माहौल जमून येण्याची शक्यता नसते.

==> वाह क्या बात है संक्षी जी..!!

अनुप ढेरे's picture

19 May 2017 - 4:08 pm | अनुप ढेरे

संक्षिंशी मिपाच्या इतिहासात इतकं सहमत झालं नसेल कोणी. तुम्ही संक्षींचे डुआयडी आहात असा संशय येईल लोकांना.

संजय क्षीरसागर's picture

19 May 2017 - 4:58 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही सुद्धा अधनमधनं सहमत होताच !

अच्छा म्हणजे सहमत असले की डू आयडी असते हे माहित नव्हते मला. कंपू गिरी का काय तरी म्हणतात ते.

बाप जन्मी आपल्याला असली कंपू गिरी जमली नाही आणि जमणार नाही.
चालू द्यात.

पैसा's picture

19 May 2017 - 1:51 pm | पैसा

ही लग्नसंस्था साली माजली आहे! =))

संजय क्षीरसागर's picture

19 May 2017 - 2:11 pm | संजय क्षीरसागर

कश्याच्या जीवावर ? आणि काय लॉजिक आहे त्या विधानामागे ?

संजय क्षीरसागर's picture

19 May 2017 - 2:28 pm | संजय क्षीरसागर

हा माज उतरवायला त्या विद्वानांनी नक्की काय उपाय योजना सुचवली आहे ?

काय लॉजिक आहे त्या विधानामागे

घासुगुर्जींना विचारा.

पैसा's picture

19 May 2017 - 4:14 pm | पैसा

ही बघा ती चर्चा. अशा काहीतरी गंभीर चर्चा करा. हवाबाणांचा आता लै कट्टाळा आलाय. लग्न करायचं तर करा, नायतर नका करू. पण चर्चा आवरा.

संजय क्षीरसागर's picture

19 May 2017 - 4:55 pm | संजय क्षीरसागर

आणि राघांचा त्यावर सल्ला !

तुम्ही, तुमची बायको, तिच्या मैत्रिणी व त्यांचे नवरे यांना प्रेफरन्स लिस्ट करून जोड्यांची अदलाबदल का करत नाहीत? देर से आये पर दुरुस्त आये होईल. आणि अशीच अदलाबदल दर वर्षभराने करण्याची व्यवस्था केली तर सगळेच सुखी होतील.

क्या कहेने ! तो धागा ७ वर्षांपूर्वीचा आहे, अशी उपाय योजना कुणी करुन पाहिलीये का ?

इतक्या टुकार चर्चेला गंभीर म्हणणारे सांप्रत चर्चेला कंटाळणारच.

लग्न हे फक्त दोन व्यक्तिंमधील संबंध जुळवणे नसून दोन कुटुंबे आणि तदानुषंगिक अनेक कुटुंबे यांचा संबंध जुळून येणे असते, याचा आपल्या संस्कृतीतही विसर पडत चालला आहे की काय ?
वृद्ध पालकांची/आजी-आजोबांची काळजी घेणे या अत्यंत महत्वाच्या कार्यासाठीही प्रेम/लग्न टिकून रहाणे आणि संततीचे औरसत्व महत्वाचे आहे.

१) लग्नाला पर्याय म्हणून तुम्ही जे १० पर्याय सुचवलेत त्यातला पहिला पर्याय बाद आहे कारण मुद्दा शारीरिक संबंधाचा आहे. पर्याय क्रमांक ३,५ आणि ७ समलिंगींसाठी आहेत ते चर्चाविषयाशी संबधित नाहीत. पर्याय क्रमांक ६, ९ आणि १० केवळ काल्पनिक आहेत. सो वी आर लेफ्ट विथ २ अँड ४ (कारण ८ आणि ४ एकच आहेत), आणि ते असे आहेत :

(२) लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये रहाणे
(४) एकीशी लग्न करणे

थोडक्यात, तुमच्याकडे कोणतही सुसंगत उत्तर नाही.

२) बाकी औरसत्व एक अत्यंत वाईट संकल्पना आहे

कधी अनाथालयाला भेट देऊन पाहिली आहे का ? ज्यांचं संगोपनच होऊ शकत नाही अशा मुलांच्या आयुष्याची काय वाताहत होते याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येत नसेल तर वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. स्वतःला कधी अशा परिस्थितीत कल्पून बघा, इट इज ड्रेडफुल ! ज्यांना आई-वडीलांचं प्रेमच मिळू शकलं नाही, ज्यांना घराचा आधारच नाही, अशी मुलं आयुष्यात उभी राहाणंच अवघड. अनौरसत्त्वाचं शल्य मानवी मुलाच्या सायकीत इतकं खोलवर जाऊन बसतं की ते मूल आयुष्यात कधी कोसळेल सांगता येत नाही.

३) माझ्या स्पर्मने जन्म झालेले प्रत्येक मुल माझेच असेल. माझेच ! औरस / अनौरस असला फरक नाही !

हा तुम्हाला ज्योक वाटत नाही काय ? `तुमचं मुल' म्हणजेच त्या मुलाचं `औरसत्व' आहे याची तुम्हाला कल्पना नाही का ?

४) आनंदाचा आणि डोपामाईनचा फारसा संबंध नाही !

तुम्ही थोडं फार अध्यात्म वाचलं जरी असेल (कळायची गोष्ट सध्या बाजूला ठेवू) तरी आनंद ही स्थिती आहे, ती उचंबळून येणारी भावना नाही. तस्मात, डोपामाईन (किंवा काय असेल ते) हा `कॉन्सिक्वन्स' आहे 'कॉज' नाही. आनंद ही कायम स्वतःशी कनेक्टिविटी आहे आणि डोपामाईन हा त्याचा रिझल्ट आहे. तुम्ही शरीरशास्त्राच्या आधारावर घोडा गाडीच्या मागे जोडतायं :) !

१) डोपामाईन च्या ऐवजी क्ष्य्झ नावाची १७६० केमिकल्स असतील प्रेमाला कारण ! ती असतील तेव्हा त्याला प्रेम म्हणु , नसतील तेव्हा प्रेम संपले असे म्हणु !!

तोच तर माझा मुद्दा तुम्ही टाळलायं ! ही संप्रेरकं तुम्हाला सिक्रीट होतायंत आणि तिला होत नाहीत तर आता किती दिवस वाट पाहायची ? बरं या बेसिसवर एक स्थिर रिलेशनशिप तयार होणंच शक्य नाही कारण संप्रेरकांचा काय भरवसा ? आणि मग अपत्य झाली असली तर त्यांच्या संप्रेरकांचं काय ? ती म्हणायला लागली की तुम्हाला एकत्र बघितलं तरच आमची संप्रेरकं सिक्रीट होतात (आणि तीच वस्तुस्थिती आहे !), तर तो लफडा कसा सोडवणार ?

२) औरस अनौरस ही संकल्पना फार फार ऊशीरा आलीये , आणि त्याने निश्प्पाप लोकाचे नुकसानच केले आहे ! अगदी शिवकालातही अनौरस मुलांना राजांनी टाकुन दिल्याचे दिसत नाही पण केवळ अनुरस आहेत ह्या एका उल्लेखाने त्यांचे जन्मसिध्द अधिकार हिरावल्याचे दिसुन येते ! ....माझ्या १० अब्ज शुक्राणूंनी १० अब्ज अपत्य जन्माला आली तरी ती सर्वच्या सर्व माझीच असतील अस्से मी म्हणत आहे ! त्यातीक कोणीही अनौरस नसेल इतकेच मी म्हणले आहे !

उल्लेखाचं एकवेळ जाऊं द्या. वास्तविकात मुल स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार ? तुम्ही ऐतिहासिक दाखले देऊन वास्तव कसं हाताळणार ? उद्या तुमच्या उदात्त कल्पनेप्रमाणे विवाह संकल्पना लयाला गेली, कुणीही कुणाशीही रत होतंय अशी कल्पना करा (अर्थात, ज्याच्या त्याच्या डोपोमाईनप्रमाणे :) ! ) मग भसाभसा मुलं व्हायला लागली, तीही तुमच्या औदार्यशिल विचाराप्रमाणे सगळी औरसच आहेत..... आता ती सांभाळायला कोण घेणार ? इथे तुमची डोपोमाईन थिअरी लावायची तर पब्लिक म्हणणार या मुलांकडे बघून आमचं नाही सिक्रीट होत ! मग ते सर्व प्रचंड लफडं कोण निस्तरणार ?

मार्कस ऑरेलियस's picture

20 May 2017 - 12:37 pm | मार्कस ऑरेलियस

तुमचं चाललय संक्षी की तुम्ही म्हणताय हापुस आंब्याला पर्यायच नाही , मी म्हणतोय की बाबा हे बघ पायरी आहे , रायवळ आहे , लंगराआहे , केसरिया आहे , दशहरी आहे , तर तुम्ही म्हण्ताय की हे आंबेच नाहीत आणि आंबा म्हणजे फक्त हापुसच ! आणि वर म्हणताय की माझ्याकडे सुसंगत उत्तर नाही !! आता बाकीचेही आंबेच आहेत हे तुम्हाला कोण पटवुन देनार ? असो

तुम्ही समलिंगी लग्नांना , मुक्त लग्नांना लग्न मानत नसाल तर ती तुमची विचारसरणी झाली , खुश राव्हा . मी सर्वांनाच साहचर्याचे पर्याय म्हणुन समान समजतो आणि सर्वांना समान मानतो !

आणि अनाथालय वगैरे मुद्दा चर्चेत येचुच कसा शकतो देव जाणे कारण मी तर स्प्ष्ट म्हणालोय कि अपत्याची जबाबदारी पित्याची असते , ज्याला पिता आहे तो अनाथ कसा ? उगाच्च काहीतरी तुम्हचं ! `तुमचं मुल' म्हणजेच त्या मुलाचं `औरसत्व' आहे हेच मी वारंव्वर म्हणतोय की मुल बापाचेच असते आणि औरसच असते , मग त्याची आई विधीवत लग्न झालेली असो की नसो. लग्नाचा औरसत्वाशी संबंध नाही !!

आणि आता हे महत्वाचे :

वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल.

संक्षी , यु टू ! तुम्हीही वैयक्तिक टिप्पणीवर उतरलात ? !

माझी वैचारिक किंव्वा अध्यात्मिक बैठक किती खोल किंव्वा किती उथळ आहे ह्याचे मला सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही , तुमच्याकडुन किंव्वा मिपाकडुन तर मुळ्ळीच नाही !

तुम्ही , तुमचे खोल विचार आणि अतिखोल आध्यात्मिक बैठक वगैरे सुखी राव्हा . तुमच्या विचारांचा आदर आहेच , पट्त नसले जुळत नसले तरीही एक वेगळा विचार म्हणुन मी त्यांचा आदर करु शकतोच !

मी माझ्या जागी , माझ्या खोल की उथळ अध्यात्मिक बैठकीत सुखी रहातो . माझे विचार तुम्हाला कळावेत किंव्वा पटावेत असा माझा मुळ्ळीच हट्ट नाही .

सुखी रहा :)

(संपादित)

सुबोध खरे's picture

20 May 2017 - 1:16 pm | सुबोध खरे

तसेच खरे डॉक्टर ' मी बोटीवर होतो तेव्हा' ही पालुपद लावत स्वःची लाल करुन घेण्याबाबत प्रसिध्द आहेत ,
वाटलंच मला.
अजून पर प्रगो यावर घसरले कसे नाहीत.
बेफाट वक्तव्य करायची. मग
मुद्दे संपले कि "वैयक्तिक टिप्पणी केली म्हणून रडारड करायची
अजून ते "स्वमतांध दांभिकता" कसं काय बुवा आलं नाही.
वादात हारायला लागलं कि असे सारे फाटे फुटतात.
मी, ओशो आणि प्रवचन हेच सत्य, बाकी सर्व भंपक
असू द्या असू द्या.

मार्कस ऑरेलियस's picture

20 May 2017 - 9:55 pm | मार्कस ऑरेलियस

व्हा उछशृंखल वृत्तीला आधार देण्यासाठी चुकीचे संदर्भ देऊ नका.
उगाच सवंग लोकप्रियता किना सनसनाटी साठी बेफाट विधाने करता आहात असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे

http://www.misalpav.com/comment/939909#comment-939909

ही विधाने तुमची आहेत . वैयक्तित टिप्पण्णीला स्युरुवात तुम्ही केली आहे खरे मी नाही . आणि मुद्दे संपायचा प्रश्नच नाही , मी पहिल्यापासुन एकच मुद्दा मांडतोय की लग्न ही निरर्थक संस्था आहे , ती तुम्हाला पटत नाही म्हणुन तुम्ही पहिल्यांदा वैयक्तिक टिप्प्णीला सुरुवात केली आही मी नाही . मी वादात जिंकणे हरणे असले काही मानत नाही तुमची मते तुम्हाला लखलाभ माझी मला ! कळ्ळं ???

आणि हो आता संपादकांना विचारतो अशी एकांगी कारवाई का ? आणि त्यांचे उत्तर येत नाही तो वर तुम्ही तुमच्या बोटीवर खुष् रहा :)

संजय क्षीरसागर's picture

20 May 2017 - 2:58 pm | संजय क्षीरसागर

तुम्हाला चर्चेमधे रस आहे की विषयाला फाटे मारण्यात हे नक्की करा. आणि मुद्याला धरुन लिहा म्हणजे चर्चा लाईनवर राहील.

आता चर्चाविषय पुन्हा एकदा वाचा :

लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????

१) आंबे, बाजीराव वगैरे उदाहरणं सोडा. समलिंगी, ब्रह्मचारी तुमच्या दृष्टीनं कितीही थोर असोत, ते या चर्चेचा विषय नाहीत. एकानी अनेकींशी किंवा एकीनं अनेकांशी लग्न बेकायदा आहे. ओके ?

आता सरळ प्रश्नाकडे या : नॉर्मल स्त्री आणि पुरुषांना एकत्र जगण्याचा विवाह किंवा लिव-इन सोडून तिसरा पर्याय कोणता ?

२) मी वारंव्वर म्हणतोय की मुल बापाचेच असते आणि औरसच असते , मग त्याची आई विधीवत लग्न झालेली असो की नसो. लग्नाचा औरसत्वाशी संबंध नाही !!

तुम्ही माझे प्रतिसाद न वाचताच उत्तरं देतायं ! पुन्हा नीट वाचा :

(औरसत्त्वाच्या) उल्लेखाचं एकवेळ जाऊं द्या.मुल स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार ? तुम्ही ऐतिहासिक दाखले देऊन वास्तव कसं हाताळणार ? उद्या तुमच्या उदात्त कल्पनेप्रमाणे विवाह संकल्पना लयाला गेली, कुणीही कुणाशीही रत होतंय अशी कल्पना करा (अर्थात, ज्याच्या त्याच्या डोपोमाईनप्रमाणे Smile ! ) मग भसाभसा मुलं व्हायला लागली, तीही तुमच्या औदार्यशिल विचाराप्रमाणे सगळी औरसच आहेत..... आता ती सांभाळायला कोण घेणार ? इथे तुमची डोपोमाईन थिअरी लावायची तर पब्लिक म्हणणार या मुलांकडे बघून आमचं नाही सिक्रीट होत ! मग ते सर्व प्रचंड लफडं कोण निस्तरणार ?

३) वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल.

पुन्हा तुम्ही प्रतिसाद नीट न वाचताच सुटला आहात !

आता तरी नीट वाचा :

"कधी अनाथालयाला भेट देऊन पाहिली आहे का ? ज्यांचं संगोपनच होऊ शकत नाही अशा मुलांच्या आयुष्याची काय वाताहत होते याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येत नसेल तर वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. स्वतःला कधी अशा परिस्थितीत कल्पून बघा, इट इज ड्रेडफुल ! ज्यांना आई-वडीलांचं प्रेमच मिळू शकलं नाही, ज्यांना घराचा आधारच नाही, अशी मुलं आयुष्यात उभी राहाणंच अवघड. अनौरसत्त्वाचं शल्य मानवी मुलाच्या सायकीत इतकं खोलवर जाऊन बसतं की ते मूल आयुष्यात कधी कोसळेल सांगता येत नाही."

आणि आता तुमची विचारसरणी किती पक्की आहे ते या प्रश्नाला नेमकं उत्तर देऊन दाखवून द्या :

ज्या मुलांची जवाबदारी घ्यायला पालक तयार नाहीत त्यांना अनौरस म्हणतात. याचा अनौरस मुलांना बाप नसतो असा अर्थ तुम्ही कुठून काढला ? जर आई-बाप जवाबदारी घ्यायला तयार नसतील तर ती मुलं अनाथालयात जातात इतकी किमान गोष्ट तुम्हाला माहिती असायला हरकत नाही.

तर प्रश्न असा आहे :

तुमच्या दृष्टीनं आदर्श असलेल्या `विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ?

मार्कस ऑरेलियस's picture

20 May 2017 - 9:59 pm | मार्कस ऑरेलियस

आणि मीही वारंवार हेच सांगतोय की ----

आंबे, बाजीराव वगैरे उदाहरणं सोडा. समलिंगी, ब्रह्मचारी तुमच्या दृष्टीनं कितीही थोर असोत, ते या चर्चेचा विषय नाहीत. एकानी अनेकींशी किंवा एकीनं अनेकांशी लग्न बेकायदा आहे. ओके ?

नो . नॉट ओके . चर्चेचा विषय लग्नाचा हेतु काय ? आणि मी स्पष्टपणे म्हाणालोय की सध्य स्थितीतील लग्न संस्था निरर्थक आहे , मी दुसरा कोणताच मुद्दा मांडलेला नाही. साहचर्याचे अनेक पर्याय आहेत जे की तुम्हाला पटत नसले तरीही पर्याय आहेतच आणि अल्पप्रमाणात का होईना जगात अस्तित्वात आहेतच !

तुमच्या दृष्टीनं आदर्श असलेल्या `विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ?

मुलाचा नैसर्गिक बाप ! ज्याच्या स्पर्म ने मुलाचा जन्म झाला तो !

विषय संपला !

संजय क्षीरसागर's picture

21 May 2017 - 12:35 am | संजय क्षीरसागर

१७ तारखेला तुमचं विधान आहे :

"ह्यावर सोप्पा उपाय म्हणजे प्रजोत्पादनाच्या आधीच स्त्री पुरुषांनी ठरवावे की मुलांची जबाब्दारी आणि ओनरशिप कोण घेनार ते ! मुलगा झाल्यास वडीलांनी जबाबदारी घ्यावी आणि मुलगी झाल्यास आईने ( किंव्वा व्हाईसव्हर्सा) हा सोप्पा थंबरुल असु शकतो !"

आणि आज तुम्ही म्हणतायः

`विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ? मुलाचा नैसर्गिक बाप ! ज्याच्या स्पर्म ने मुलाचा जन्म झाला तो !

म्हणजे एकतर तुमचे विचार ठाम नाहीत. दुसरी गोष्ट, तुमच्या दृष्टीनं जोडप्यातल्या सहचर्याचा सगळा खेळ संप्रेरकांवर अवलंबून आहे. म्हणजे विचारातली दुफळी हळूहळू स्पष्ट होते आहे.

आता स्वतःच्या विचारांशी पक्के राहून या प्रश्नांचं उत्तर देऊ शकाल काय ?

अ) जन्मदातीनं मुलावर हक्क सांगितला आणि तीनं बापाकडे बघून तिची संप्रेरकं सिक्रीट होत नाहीत म्हटलं तर बाप काय करणार ?

ब) शिवाय अपत्याच्या सुयोग्य संगोपनासाठी दोघांची आवश्यकता असते, जर बापाला मुलाच्या आईकडे बघून डोपामाईन निघत नाहीत असं लक्षात आलं तर तो मुलावरचा हक्क सोडणार की मुलाच्या आईला सोडणार ?

क) कायद्यानं मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत जन्मदाती हीच योग्य पालक आहे असा नियम आहे. पाच वर्षानंतर अपत्यानं बापाकडे जायला नकार दिला तर बाप काय करणार ?

ड) तुमच्या मुक्त संभोग व्यवस्थेत एक बाप हा दहा मुलांच्या जन्माचा नरपुंगव आहे असं निष्पन्न झालं आणि ती सर्व मुलं तथाकथित स्त्रीयांनी त्या थोर बापाच्या दारात आणून ठेवली तर ओशोंच्या ज्या `स्वातंत्र्याच्या सर्वोच्चतेचा' तुम्ही पाठपुरावा करतायंत ते महत्त्वाचं ठरवणार की मुलांचं संगोपन ?

मार्कस ऑरेलियस's picture

22 May 2017 - 12:29 pm | मार्कस ऑरेलियस

लोल.

तुम्हाला थंबरुल ह्या शब्दाचा अर्थ कळतो का ? आणि व्हाईस व्हर्सा ह्या शब्दाचा ? किंव्वा तुम्हाला म्युचुअल अ‍ॅग्रीमेन्ट ही गोष्ट माहीत आहे ? किव्वा सिंगल पॅरेंट ही संकल्पना ?

किंव्वा वेगवेगळ्या देशात कायदा वेगवेगळा असु शकतो ही संकल्पना माहीत आहे का ?

किंव्वा डायवोर्स नंतरही अनेक मुलांचे संगोपन करणारे बाप तुम्हाला माहीत नाही का ? तुम्हाला एलॉन मस्क माहीत आहे का जो त्याच्या डायव्होर्स नंतर त्याचा सहा मुलांचा सांभाळ करत आहे ?

तुमचं कसं झालय की तुम्ही लग्नाला दुसरा पर्याय असुच शकत नाही असे गृहीत धरुन चाललाय . ते मी वर आंब्याचे उदाहरण दिले तसे काहीसे चालल्य तुमचं . हापुस एक्के हापुस ! बाकीचे आंबेच नाहेत !
आता पायरी, रायवळ , केसरीया , लंगरा हे आंबेच असतात हे मी तुम्हाला पटवुन नाही देवु शकत .

गामा पैलवान's picture

20 May 2017 - 1:02 am | गामा पैलवान

मार्कस ऑरेलियस,

१.

प्रेम फक्त एकदाच होते / एकदा तरी होतेच. असे कोठे तरी गृहीतक आहे . ते तसे का आहे हे माहीत नाही .

प्रेम म्हणजे काय हा मोठा गहन प्रश्न आहे. तुमच्या उपरोक्त विधानातलं जे प्रेम आहे ते स्त्रीपुरुषांमधील प्रेम आहे. प्रत्यक्षात आपण फक्त स्वत:वरंच प्रेम करीत असतो. तेही डोपामाईनशिवाय!

पुरुषास त्याच्या स्वत:वरच्या प्रेमात जी स्त्री साथ देईल तिच्यावर त्याचं प्रेम बसतं. त्याचप्रमाणे जिला तिच्या स्वत:वरच्या प्रेमाची आश्वस्ती ज्या पुरूषाकडून मिळेत त्याच्यावर तिचं प्रेम बसेल. डोपामाईनास फारतर प्रेमाचं प्रतिबिंब म्हणता येईल.

२.

तसेच प्रेम संपलं म्हणुन विवाहबंधनातुन बाहेर पडलेले काही मित्र मैत्रीणी आहेत, केवळ लग्न नावाचा काहीतरी कृत्रीम संस्कार झालाय म्हणुन उगाचच कुढत कुढत एकत्र रहायचं ह्याला काही अर्थ नाही !

एकदम बरोबर. हिंदू समाजात पूर्वापार सर्रास घटस्फोट होत असंत. मात्र त्यांना घटस्फोट अशी संज्ञा नसे. त्यास वानप्रस्थ म्हणायचे.

एकदा का स्वत:वरच्या प्रेमात जोडीदाराची साथ मिळेनाशी झाली की प्रेम आटलं असं आपण समजतो. मग दुसरा जोडीदार शोधावा का? की स्वप्रेमचिंतनार्थ सरळ वानप्रस्थ स्वीकारावा?

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

20 May 2017 - 12:17 pm | गामा पैलवान

मार्कस ऑरेलियस,

तुम्ही विचारी आहात म्हणून एक उलेख करतो. समाजात मुक्त लैंगिक संबंध फैलावले तर काय होतं याचा शास्त्रशुद्ध अभ्यास जोसेफ ड्यानियल अन्विन या संशोधकाने केला आहे. दुवा : https://en.wikipedia.org/wiki/J._D._Unwin

वरील दुव्यावर जाऊन चार छोटे परिच्छेद आहेत ते वाचाच म्हणून सुचवेन.

थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या समाजात मुक्त लैंगिक संबंध फोफावतात तो शेवटी मानवसमूह न राहता पशूंचा कळप होतो.

आ.न.,
-गा.पै.

मार्कस ऑरेलियस's picture

20 May 2017 - 12:48 pm | मार्कस ऑरेलियस

बास प्रदीर्घ प्रतिसाद टंकायचा कंटाळा आलाय ... एकच विचारतो:

असेच मी कुठुन तरी शोधुन पॉली-अ‍ॅमोरे , LGBT च्या समर्थनातले, समर्थनातले चार दुवे शोधुन दिले , तर तुम्ही वाचणार का ? की फक्त जोसेफ ड्यानियल अन्विन ह्यांनाच कवटाळुन बसणार ?

तुम्ही हिंदुधर्माचे बर्‍याचदा समथन करताना दिसता म्हणुन एक प्रश्न विचारतो की : की तुम्ही तुसर्‍याच्या विचारांचा एक स्वतंत्र विचार म्हणुन आदर करणार की मध्यपुर्वेतल्या धर्मांच्या प्रमाणे 'स्वतःचाच विचार अंतिम सत्य , आणि बाकीचांचा असत्य. बाकीचा विचार धारण करणारे काफीर' अशी भुमिका घेणार ???

आ.न.
मा.ऑ.अ‍ॅ.ऑ

मार्कस ऑरेलियस,

१.

असेच मी कुठुन तरी शोधुन पॉली-अ‍ॅमोरे , LGBT च्या समर्थनातले, समर्थनातले चार दुवे शोधुन दिले , तर तुम्ही वाचणार का ? की फक्त जोसेफ ड्यानियल अन्विन ह्यांनाच कवटाळुन बसणार ?

दुवे वाचून बघेन. मात्र LGBT हे समाजातले अपवाद आहेत आणि ते रोग म्हणून धरण्यात यावेत. या नैसर्गिक स्थिती नव्हेत. यांचं स्पष्टीकरण ग्राह्य असलं तरी समर्थन मात्र मला ठार अमान्य आहे.

२.

की तुम्ही तुसर्‍याच्या विचारांचा एक स्वतंत्र विचार म्हणुन आदर करणार की मध्यपुर्वेतल्या धर्मांच्या प्रमाणे 'स्वतःचाच विचार अंतिम सत्य , आणि बाकीचांचा असत्य. बाकीचा विचार धारण करणारे काफीर' अशी भुमिका घेणार ???

दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करायला हरकत कसली. फक्त ते विचार वास्तवाशी संबंधित असावेत इतकीच (माफक) अपेक्षा आहे.

तसं पाहायला गेलं तर वाळवंटी पंथांशी सदर चर्चेचा काडीमात्र संबंध नाही. किंबहुना विवाह आणि साहचर्याचा उपासनापंथाशी कसलाच थेट संबंध नाही. भले धर्मग्रंथांत विवाहाविषयी आदेश वा सुचवणी असोत.

आ.न.,
-गा.पै.

मार्कस ऑरेलियस's picture

20 May 2017 - 10:38 pm | मार्कस ऑरेलियस

दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करायला हरकत कसली. फक्त ते विचार वास्तवाशी संबंधित असावेत इतकीच (माफक) अपेक्षा आहे.

reality is a matter of perception !
तुम्ही भारतात जन्माला आलात म्हणुन तुमच्यासाठी जे आसपास दिसले ते वास्त्व झाले . हेच सौदी किंव्वा अन्य इस्लामिक देशात जन्मला असता तर बहुपत्नीत्व तुम्हाला वास्तव वाटले असते , कॅलिफोर्नियात असता तर समलैंगिक लोकांचे साहचर्य तुम्हाला नॉर्मल वाटले असते :) भिन्नलिंगी आणि एकपत्नित्व ही जी सध्याच्या जगातील लग्नाची पध्दती आहे ती साहचर्याचा केवळ एक पर्याय आहे त्याला अनेक पर्याय उपलब्ध्द आहे . त्या सगळ्यांविषयी , पटत नसले तरीही , आपण आदर ठेवुन लोकांचे विचार स्वातंत्र्य मान्य करायला हरकत नसावी इतकेच मी म्हणत आहे !!

( बाकी : मी मध्यपुर्वेतील विचारसरणीचा संदर्भ दिलेला , त्या वृत्तीचा संबंध दिलेला . ह्या विचारसरणीची लोकं केवळ स्वतःच्या एकाच मताला कवटाळुन बसतात , अन्य पर्याय उपलब्ध असु शकतात हे ते मान्यच करत नाहीत . )

गामा पैलवान's picture

20 May 2017 - 11:25 pm | गामा पैलवान

मार्कस ऑरेलियस,

reality is a matter of perception !

असं तुमचं मत असेल तर आपण सुस्थापित तथ्यांच्या आधारे चर्चा करू. म्हणजे दृष्टीकोन आड यायला नको.

आ.न.,
-गा.पै.

अभ्या..'s picture

20 May 2017 - 11:46 pm | अभ्या..

अजुन चर्चा?
बापरे

संजय क्षीरसागर's picture

21 May 2017 - 10:09 am | संजय क्षीरसागर

अजुन चर्चा? बापरे

प्रगो रितसर लग्न करायचा विचार करत नाहीत तोपर्यंत चर्चा जारी राहील :)

मार्कस ऑरेलियस's picture

22 May 2017 - 12:47 pm | मार्कस ऑरेलियस

`बाकी काहीही असो पण

प्रगो रितसर लग्न करायचा विचार करत नाहीत तोपर्यंत चर्चा जारी राहील

आपण माझे रीतसर लग्न लाऊन द्यायचा इतका गंभीरपणे विचार करता हे पाहुन डोळे पाणावले !

म्हणुनच म्हणतो , कितीही मतभेद असले तरीही मतभेद मतभेदांच्या जागी , इरव्ही आपल्याला तुमच्या विषयी जाम आदर आहे :)

मार्कस ऑरेलियस's picture

21 May 2017 - 12:09 am | मार्कस ऑरेलियस

असं तुमचं मत असेल तर आपण सुस्थापित तथ्यांच्या आधारे चर्चा करू. म्हणजे दृष्टीकोन आड यायला नको.

एक गणित हा विषय सोडला तर सुस्थापित तथ्य असे काही नसते हो , आणि ईथे तर चर्चा चाललीय ती फिलॉसॉफी , मॉरल्स , इथिक्स वगैरे विषयांवर , त्यात तर सुस्थापित तथ्य कालही नव्हते आजही नाही आणि भविष्यात असे काही असण्याचा संभवही नाही . प्रत्येक गोष्ट ही दृष्टीकोनावरच थरते . तुम्ही भारतात काळ घालवल्याने तुम्हाला इथली मॉरल्स , इथली लग्न संकल्पना योग्य वाटत असेल , मी भारत सौदी अमेरिका अशा अनेक ठिकाणी काळ घालवल्याने प्रत्येक ठिकाणी लोकांच्या संकल्पना धारणा भिन्न भिन्न असु शकतात , असतातच हे मला कळुन चुकले आहे . भविष्यात पुर्व युरोप , जपान कोरिया चायना , अफ्रिकेत फिरण्याच्या मानस साहे , तिथले मॉरल्स आणि लग्न विषयक संकल्पना ह्या आपल्या भारतीय धारणां पेक्षा भिन्न असणार हे मला कळुन चुकले आहे . आणि म्हणुनच मी सर्वांच्या मताचा आदर करायला शिकलो आहे :)

असो.

आता चर्चा होणे नाही , वर जे वैयक्तिक टिप्पण्णीवर एकांगी संपादन झाले आहे त्या विषयी संपादक मंडळाला विचारपुस केली आहे , आणि आयडी संपादित करण्या विषयी विनंती केली आहे .

असो. :)

इत्यलम !

उपेक्षित's picture

20 May 2017 - 5:51 pm | उपेक्षित

प्रतिसाद वाचत वाचत इथे येईस्तोवर धागा काय विषयावरचा आहे तेच इसरून गेलो... ;)

मी काय म्हणतो, काही देऊन घेऊन संपवू या का विषय???
उगाच शंभर फाटे झाले आहेत, तेवढेच धागे झाले असते तर किमान लेखकाला टीआरपी भेटला असता, काय म्हणता?

उपेक्षित's picture

21 May 2017 - 11:52 am | उपेक्षित

देणारे लाख देतील हो पण घेणार्याने घेतले पायजे न ? कारण इथे बरेच जण मान्जीच इस्टमन कलरची (ईशाल भौचे आवडते वाक्य :) ) असा धोशा लावत बसलेत.
साला टंकाळा कसा येत न्हाय लोकास्नी काय म्हाईत गेला बाजार इतका येळ कुठून येतो खरडत बसायला ते पण समजत नाही :P

संजय क्षीरसागर's picture

21 May 2017 - 3:28 pm | संजय क्षीरसागर

साला टंकाळा कसा येत न्हाय लोकास्नी काय म्हाईत गेला बाजार इतका येळ कुठून येतो खरडत बसायला ते पण समजत नाही

त्याचं असं आहे की ज्यांना वैचारिक क्लॅरिटी आहे त्यांना आपल्या प्रतिसादांच मूल्य माहिती असतं आणि त्यांचे विचार त्यांच्या लेखनातून सहज प्रकट होतात. त्यांना आपला वेळ चाललायं असं वाटत नाही तर आपण मांडलेले विचार कित्येकांचे गैरसमज दूर करु शकतात याची कल्पना असते आणि संकेतस्थळाचा एक महत्त्वाचा उद्देश विचारांचं आदान-प्रदान आहे हे देखिल त्यांना माहिती असतं.

याउलट काही नुसता टिपी करणारे सदस्य असतात ज्यांना वैचारिक बैठकच नसते, ते अशा चर्चेत भागच घेऊ शकत नाहीत. मग त्यांचे दोन विभाग होतात. एका टाईपचे सदस्य इतके खंतावतात की धागा भरकटवून ते स्वतःची सुटका करवून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून त्यांचा वैचारिक कोतेपणा आणखीनच उघडा पडतो. दुसरा टाईप काहीही वेडगळ प्रतिसाद देऊन चर्चा कशी थांबेल हे पाहतो कारण आपल्याला काहीही कंट्रीब्यूट करता येत नाही ही अस्वास्थ्याची भावना त्यांना व्यथित करत असते.

उपेक्षित's picture

21 May 2017 - 5:14 pm | उपेक्षित

देवा ते पर्तिसाद जरा समजल अश्या म्हराटीतून देता काय ? ता काय असा आमी दुसर्या टायपात मोड्तुया (तुमच्या भासेत वेडगळ) so येड्यांना निट समजल असे ज्ञानामृत पाजळल (आपल पाजलत ;P ) तर बर वाटल...

तुम्हाला प्रतिसाद कळला असा होतो :) !

तुम्ही स्वतःच्या बॅटनं स्वतःचे स्टंप उडवले !

जल्ला मेला एक वाक्य समजल्यावर पूर्ण प्यारा समजला असा डंका पिटायला आम्ही काय महाज्ञानी आहोत का तुमच्या सारखे;? :P

अविनाशकुलकर्णी's picture

21 May 2017 - 6:03 am | अविनाशकुलकर्णी

आमची मि.पा वर अव्यभिचारी निष्ठा आहे..
इतर संकेत स्थळावर चोचा मारायला आम्हाला आवडत नाहि..
असो..चोच्या अकुकाका

अभ्या..'s picture

21 May 2017 - 9:58 am | अभ्या..

अकूकाकांचे असले धगधगते बानेदार उद्गार वाचायलाच तर मी अजुन इथे राह्यलौ.
अकूकाका, तुम्ही मिपाचे ब्रांड फॉर्च्यूनर आहात.

चित्रगुप्त's picture

21 May 2017 - 10:38 am | चित्रगुप्त

फ्रान्समधे आम्ही मुलाच्या मित्राच्या लग्नाला गेलो होतो, त्यात त्या जोडप्याचा चार-पाच वर्षे वयाचा मुलगाही होता. तिकडे कायदेशीर लग्न सुद्धा पाच का सहा प्रकारचे असते म्हणे. इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी खून करणे/होणे, मुलांना सांभाळणे, पोटगी देणे, प्रॉपर्टीत समावेश, अन्य व्यक्तींशी संबंध ठेवण्यातील मोकळीक, वेगळे होण्यातील सुलभता, टॅक्सची बचत, लग्नाचा खर्च... असे अनेक मुद्दे कोणत्या प्रकारचे लग्न करावे हे ठरवताना विचारात घेतले जातात म्हणे. कुणाला याबद्दल माहितीअसल्यास द्यावी.
Types of Marriages या नावाने विकीवर लेख आहे, त्यात तर खूपच प्रकार दिलेले आहेत.
https://en.wikipedia.org/wiki/Types_of_marriages

सुबोध खरे's picture

21 May 2017 - 11:17 am | सुबोध खरे

तुम्ही डॉक्टर असुन असे विधान करत आहात हे पाहुन आश्चर्य वाटले . साधी सिंपल जेनेटिक टेस्ट करुन मुलाचा बाप कोण ओळखता येते हे बहुतेक तुम्ही जाणत असाल.
तसेच खरे डॉक्टर ' मी बोटीवर होतो तेव्हा' ही पालुपद लावत स्वःची लाल करुन घेण्याबाबत प्रसिध्द आहेत

हि वाक्ये वैयक्तिक टीका नाहीत असे तुमचे म्हणणे आहे का?
पहिल्या वाक्यात तर तुम्ही माझ्या व्यावसायिक क्षमतेवर घसरला आहात.

सिम्पल जेनेटिक टेस्ट म्हणेज काय हे आपण लक्षात न घेता अशी विधाने करता म्हणून मला "बेफाट वक्तव्ये" लिहावे लागले.
आज या जेनेटिक टेस्ट ( खरं तर हि जीन्स ची नसून डी एन ए किंवा गुणसूत्रांची चाचणी आहे) पण आपण डॉक्टर नाही म्हणून हे सोडून देऊ.
डी एन ए टेस्ट मध्ये मुलाची आणि बापाची गुणसूत्रे जुळवून पाहण्यासाठी एका चाचणीला आज ( स्वस्त झाल्यामुळे ) १३ हजार रुपये पडतात. हि काही रक्तातील साखर तपासणी नव्हे कि १०० रुपये दिले आणि ऑटो ऍनालायझर वर तपासणी झाली.
जर एक स्त्री पाच माणसांबरोबर रत झाली असेल. तर प्रत्येक मूल जन्माला आल्यावर ६५ हजार रुपये खर्च होतील.
उदाहरणार्थ --साध्या ओशो कम्युन मध्येच ५०,००० संन्यासिनी होत्या. त्यातील फक्त १ हजार जरी स्त्रियांनी मुलांना जन्म दिला तरी हा खर्च साडे सहा कोटी होतो. यात शक्यता गृहीत अशी आहे कि हे सगळे ५००० पुरुष डी एन ए चाचणीला तयार होतील. जो पुरुष डी एन ए चाचणीलाच तयार होणार नाही तो मुलाच्या २१ वर्षे संगोपनाला काय तयार होणार?
श्री नारायण दत्त तिवारी यांची समग्र केस पहिली जेथे सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन हुकूम मिळवायला लागला तर एखाद्या माणसाला डी एन ए चाचणीला तयार करण्यासाठी किती कटकटी करायला लागतील हे आपल्याला लक्षात येईल.
डोपामाईन्चे अर्ग्युमेन्ट वीक होत नाही . उल्ट स्ट्राँगच होते . डोपामाईन च्या ऐवजी क्ष्य्झ नावाची १७६० केमिकल्स असतील प्रेमाला कारण ! ती असतील तेव्हा त्याला प्रेम म्हणु , नसतील तेव्हा प्रेम संपले असे म्हणु
असे १७६० केमिकल्स आपल्या मेंदूतून नाहीसे होत नाहीत.
त्यामुळे एकदाही ना पहिल्या मुलाबद्दल परदेशी असणाऱ्या माणसाला आपल्या अपत्याबद्दल प्रेम वाटू शकते.किंवा वृद्धाश्रमात ठेवलेल्या आईला आपल्याला लाथाडणाऱ्या मुलाबद्दल प्रेमच वाटत राहत असते.
म्हणूनच मी म्हणालो कि तुमचे मूळ गृहीतच चूक आहे कि डोपामाईन नष्ट झाले कि प्रेम संपले.
बाकि जीवशास्त्र गणिती अचूकतेने चालत नाही हे आपल्याला लक्षात आले असावे अशी आशा आहे.

दशानन's picture

21 May 2017 - 11:50 am | दशानन

+1

प्रतिसाद खूपच आवडला.

दीपक११७७'s picture

21 May 2017 - 3:18 pm | दीपक११७७

एकदम योग्य. नंबर एक.

विवाह संस्था योग्य की अयोग्य या साठी फार मोठ्या गणिताची आवश्यकता नाही. एवढा विचार केला तरी पुरे आहे.

सुरुवातीला मनुष्या झुंडीनेच रहात होता तेंव्हा विवाह हा प्रकार नव्हता.

पुढे तो ज्ञानाने प्रगल्भ होत गेला, मग त्याने स्वत:त भरपुर बदल केले त्यातील एक बदल म्हणजे विवाह करणे.
जगाच्या पाठीवर भाषेचे, जाती-जमातीचे किती ही प्रकार असले तरीही विवाह हा प्रकार थोड्या फार फरकाने सगळी कडेच
आढळतो. म्हणजे विवाह हा प्रकार हजारो वर्ष जुना असुन, त्याचा मुळ गभा अजुनही तसाच आहे. म्हणजेच कित्येक लोकांनी विचार पुर्वक घेतलेला तो निर्णय आहे.

त्यामूळे @मार्कस ऑरेलियस यांचे खालील वक्तव्य निर्थक, भंपक आणि अतिशय संकुचीत विचारा अंती बनलेले मत आहे असे वाटते.

मी पहिल्यापासुन एकच मुद्दा मांडतोय की लग्न ही निरर्थक संस्था आहे @मार्कस ऑरेलियस