डस्टी ब्यूटी .........

किल्लेदार's picture
किल्लेदार in भटकंती
6 Feb 2017 - 7:17 am

डस्टी ब्यूटी .........

एवरेस्टवर नाही तर किमान त्याच्या देशात तरी जाऊन यावे अशी माफक इच्छा ठेऊन एका भल्या पहाटे काठमांडू चे तिकीट बुक करून टाकले आणि दिवस मोजीत बसलो. मनाची आणि शरीराची तयारी करायला एक महिना जवळ होता. द्रव्याची तजवीज तेवढी नेहमीप्रमाणे शेवटच्या आठवड्यात करायची होती. नेपाळ मध्ये भारतीय चलन चालत असले तरी पाचशेच्या नोटा सहसा चालत नाहीत तेव्हा सर्व रोख शंभरीतच लागणार होती. आणि त्याच आठवड्यात ........... "मित्रो.... आज मध्यरात्री के बाद पाचसौ और हजार के नोट मात्र कागज के टुकडे बन के रह जायेंगे !!!" अशी घोषणा झाली......

मग काय ......... थोडेफार डॉलर्स आणि थोडे हवाला व्यवहार यांच्या मदतीवर हवाला ठेऊन हे एवरेस्ट आधी सर करावे लागले आणि विमान एकदाचे पुण्याहून उडाले.

दिल्ली मागे पडली आणि तास सव्वा तासांतच समोर हिमालयाची उत्तुंग शिखरे आणि खाली गंडकी नदीचे नागमोडी, विशाल पात्र दिसू लागले.
15591249_10211321540454716_1445797922229138970_o

15625726_10211321507453891_8638685495493585904_o

वैमानिक बहुदा काठमांडूचा रस्ता विसरला असावा कारण त्याने तिथेच डोंगरात २-३ फेऱ्या मारल्या आणि मग नेमकी वाट सापडल्यासारखा परत मार्गस्थ झाला. माझे पैसे मात्र पूर्ण वसूल झाले.

एखाद्या मोठ्या परातीमध्ये खूप धान्य इतस्ततः विखुरल्याप्रमाणे खाली काठमांडू दिसू लागले.

एखाद्या वाया गेलेल्या कार्ट्याकडून जितकी अपेक्षा असते किंबहुना त्याहीपेक्षा कमीच अपेक्षा माझी काठमांडूकडून होती पण विमानतळाच्या बाहेर आलो आणि हिमालयाच्या अगदी पायाशी असलेले हे राजधानीचे शहर अगदीच हाताबाहेर गेल्याची जाणीव झाली. हिमालयात इतके कळकट आणि बकाल शहर (?) माझ्या तरी अजून बघण्यात आलेले नाही. नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे कदाचित बरीच हानी झाली असेलही पण त्यापूर्वीही हे शहर इतकेच अस्ताव्यस्त असावे.

IMG_20161120_100409_HDR
IMG_20161120_133800_HDR
IMG_20161120_132632_HDR

नेपाळ हिंदू धर्म सोडून जैन धर्माकडे झुकतो आहे काय असे मास्क लावून फिरताना आणि त्याच अवस्थेत इतर लोकांना बघताना वाटून जाते
IMG_20161120_124956

एवढ्या धुळीत आणि माणसांच्या पसाऱ्यात रॉलीला शोधताना फारच दमछाक झाली. बराच आटापिटा केल्यावर शेवटी रॉलीची एक सावळी बहीण सापडली (नंतर पुढच्या दिवशी रॉलीही ).

अर्धा दिवस हातातून निसटल्यामुळे जवळच असलेल्या नागरकोटला निघालो. नागरकोट हे काठमांडूजवळचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. इथून वातावरण स्वच्छ असेल तर एवरेस्ट चा टाळू दिसतो म्हणतात. इतक्या स्वच्छ, किंबहुना स्वच्छ वातावरणाची अपेक्षा मी आधीच सोडून दिली होती. बाकी नागरकोट हे मात्र निःसंशय सुंदर आहे.

15540919_10211330780005699_6678047468941842405_o

नागरकोट, पीसफुल कॉटेज
IMG_20161114_063219_HDR

ला दोरजे लाकपा

15440549_10211330792846020_2576560671190475274_o

ठरल्याप्रमाणे जोमसोमला जायचं असेल तर नागरकोटला जास्त वेळ देऊन चालणार नव्हते. नागरकोट-काठमांडू-पोखरा हा पल्ला बराच लांबचा आहे.

OnPaste.20170205-114311

काठमांडू सोडले की आपण या धुळीच्या साम्राज्यातून एकदाचे बाहेर पडू ही आशा फोल ठरली. काठमांडू ते पोखरा हा प्रवास इतका अंत पाहणारा ठरला की सव्वादोनशे किमी च्या प्रवासात माझा कॅमेरा एकदाही बाहेर निघाला नाही, तशी इच्छाही झाली नाही. रस्त्याच्या बाजूने मानवी वस्ती सतत सोबत करत राहते. पोखऱ्याला पोहोचलो आणि फेवा ताल च्या शेजारच्या एका हॉटेल मध्ये एकदाची पाठ टेकली.

धुळीस मिळवणे, धूळ चारणे, धूळधाण होणे, डोळ्यात धूळ फेकणे असे आत्तापर्यन्त ऐकलेले काही वाक्प्रचार कुठून उगम पावले असावेत याचा शोध आज मला लागला होता. नागरकोटच्या जवळच असलेले धूलिखेल हे पर्यटन स्थळ असेच नावारूपाला आले असेल काय ? इथून जवळच असलेला धवलगिरी आता धूळगिरी म्हणून ओळखला जाईल काय असे उपरोधिक विचारही मनात डोकावून गेले.

पोखरा हे ठिकाण काठमांडू पेक्षा बरे असले तरी त्याच पठडीतले. फेवा तालच्या आसपास चा परिसर सोडला तर परिस्थिती इथेही बिकटच. सकाळी तात्काळ पोखरा सोडले आणि जोमसोम च्या रस्त्याला लागलो. पोखरा ते बेनी हाच काय तो रस्ता. त्यापुढे रस्ता अतिशय घातकी. रॉलीसारखी अंगापिंडाने मजबूत आणि वजनदार गाडी इथल्या डोंगरी रस्त्यांवर बिचकते. धुळीचा दोन दोन इंच जाड थर, मोठमोठे दगड, दवामुळे निसरडे झालेले रस्ते, चिखल यासाठी रॉलीसारखी गाडी उपयोगाची नाही. ताकदवान इंजिन पण हलकी अशी होंडा सीआरएफ किंवा तत्सम इतर गाड्या या भागासाठी उत्तम. या रस्त्याने उरलीसुरली हिम्मत खच्ची केली. मनाची ताकद शिल्लक होती पण आधीच आजारी असलेल्या शरीराने साथ सोडली आणि बेनीहून परत फिरलो.

पोखरा ते बेनी रस्ता
t-9065

परतीच्या वाटेवरचे धाम्पूस हे थोडे अनवट ठिकाण मात्र अतिशय रम्य आणि दिलासादायक. इथे पोहोचायचा रस्ता म्हणजे एक आव्हानच. कदाचित त्यामुळेच हे ठिकाण धुळीपासून आणि माणसांच्या गर्दीपासून बऱ्यापैकी अलिप्त आहे. संधीप्रकाशात इथल्या रासवट वाटेवर रॉलीने माझ्या मोठ्या बंधूंना एकदा पाठीवरून भिरकावूनही दिले पण नशीब बलवत्तर म्हणून कुठलेही हाड न मोडता इष्ट स्थळी वेळेवर पोहोचलो.

नेपाळ असो वा लडाख, मला रात्रीच्या जेवणात एक गोष्ट नेहमीच आवडते आणि ती म्हणजे तिबेटी थुक्पा. भरपूर भाज्या आणि नूडल्स घालून केलेले हे सूप, भूक आणि थकवा यावर रामबाण इलाज आहे.

IMG_20161115_195353_HDR

भरपूर थुक्पा खाऊन रूमच्या बाहेरच खुर्ची टाकून बसलो. गारठा बराच होता पण हातातला कॅप्टन मॉर्गन चा ग्लास हा खंबीरपणे मला सोबत करत होता. मंद चंद्रप्रकाशात समोरच मच्छपुच्छरे आणि अन्नपूर्णाची शिखरे शांतपणे पहुडली होती.

धाम्पूसची पहाट ही खरोखर नेत्रसुखद. अन्नपूर्णा पर्वतरांग आणि मच्छपुच्छरे इथून जसे दिसतात तसे कदाचितच इतर कुठून दिसत असावेत.

सूर्योदय
15578148_10211343024511804_1652583486112640333_o

मच्छपुच्छरे आणि अन्नपूर्णा २
15493355_10211343111233972_9001003472414270125_o

जपानमधील साकुरा किंवा चेरी ब्लॉसमसारखाच स्थानिक भाषेतील पैम झाडाचा गुलाबी मोहोर
15540865_10211330940889721_5363424409578708537_o

IMG_20161117_080032_HDR

IMG_20161117_080453_HDR

इथून तासाभरावर असलेला ऑस्ट्रेलियन कॅम्प हा इथला व्हॅन्टेज पॉईंट. इथे पोहोचलो तेव्हा दुपारची जेवायची वेळ झाली होती. मांसाहारामध्ये फक्त मासे खाणारा मी, इथे साडेपाच हजार फुटांवर काय मिळणार ? पण अन्नपूर्णा हे नाव सार्थ ठरवत हिमालयाने मला इथे ट्यूना नूडल्स आणि बरोबर "एवरेस्ट" ही नेपाळी बीअर असा पाहुणचार केला.

IMG_20161116_125417_HDR

IMG_20161116_123106_HDR

भर दुपारी, भरपूर सूर्यप्रकाशात समोरचे अन्नपूर्णाचे दृश्य एकदम चकचकीत दिसत होते. सूर्य तळपत असला तरी हवा गारच होती. तिथेच खुर्ची टाकली आणि पुढ्यातल्या पर्वतरांगांमधल्या एकेका शिखराची ओळख पटवू लागलो. अगदी समोर समोर करणारा, टोकदार असा आणि नेहमीच जास्त फुटेज खाणारा मच्छपुच्छरे. त्याच्याच बाजूला ठेंगणासा हिऊनचुली, त्याच्या मागे सिंगुचुली आणि गंगपूर्णा, आडव्या भिंतीसारखा अन्नपूर्णा ३, त्याच्याच बाजूला दोनही हात पसरून बसलेला अन्नपूर्णा २.... ही एवढी भावंडं. त्यांच्या पलीकडे दूरवर मनासलू, हिमलचुली-नगडीचुली अशी एकामागून एक शिखरे दिसतच राहतात.

हिऊनचुली
15493341_10211343275998091_4466720948936256574_o

अन्नपूर्णा २
15578207_10211343275758085_4161267557817842787_o

दिवस मावळतीकडे झुकला आणि शुभ्र हिमशिखरे आता थोडी तांबूस दिसू लागली. ठराविक अंतराने होत जाणारा रंगांमधला बदल विस्मयकारक असाच आहे. माझ्या कॅमेराला काही तो टिपता आला नाही. ते सर्व खापर कॅमेराच्या माथी फोडून मी शांतपणे हा बदल डोळ्यांनीच पीत होतो. आधी तांबूस,मग नारिंगी, मग हलका लालसर गुलाबी, नंतर गुलाबी आणि शेवटी शेवटी तर आकाशी निळा.

हा हलका निळा रंग आता लवकरच काळा होणार होता आणि खाली धाम्पूसपर्यंत तासभर तरी चालत जायचे होते. वाट सरळ असली तरी परिचित नव्हती आणि कुठेकुठे तर गर्द रानातूनही होती. तेव्हा इच्छा नसतानाही लवकर काढता पाय घेतला आणि अंधारातच मोबाइलच्या प्रकाशात धाम्पूस गाठले.

यापुढच्या संपूर्ण प्रवासात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना आताशा आली होती. धाम्पूस-सारंगकोट या रस्त्याने त्याला जमेल तसा धुळीचा पाहुणचार केला. कुठेही कशाची कमी पडू दिली नाही.

सारंगकोटमधून ….
IMG_20161117_114215_HDR

सारंगकोट-पोखरा-बेगनास ताल रस्ता हा थोडा अपवाद म्हणता येईल. बेगनास ताल हे धाम्पूस सारखेच सरप्राईज पॅकेज ठरले. एका उंच डोंगरावर रस्ता संपतो तिथे एक हॉटेल होते. हॉटेल यथातथा असले तरी मालक हौशी होता. समोरच्याच तलावातली ताजी तळलेली मासळी, इथलीच गोरखा बीअर आणि इथून ३६० अंशातून दिसणारे दृश्य यांचा एकत्रित परिणाम शब्दांत मांडता येण्याजोगा नाही.

भव्य गोपुरासारखाच दिसणारा आणि कुठल्याही मानवनिर्मित गोपुराला खुजा ठरवणारा मच्छपुच्छरे.
15625716_10211349356670104_6109952926036287404_o

सकाळी बेगनास ताल धुक्याच्या दुलईत पहुडला असला तरी मच्छपुच्छरेची दिनचर्या भल्या पहाटेच सुरु होते.
15591182_10211362061627720_3193583384077869338_o

पाण्याचे धबधबे खूप बघितले पण असा धुक्याचा प्रथमच बघायला मिळाला
15540772_10211362169830425_3660843747923774075_o

यापुढे जो प्रवास करायचा होता त्याने तेव्हाही अंगावर काटा आला आणि आठवण आली की आजही येतो. काठमांडूहूनच परत जायचे असल्यामुळे तिथे जावे लागणे क्रमप्राप्त होते. काळजावर मोठा दगड (किंवा कदाचित धूळ) ठेऊन कसेबसे काठमांडू गाठले. पर्यंटन-धर्म सांभाळावा म्हणून मीही काठमांडूतल्या रस्त्यांवरून भटकलो, टोप्या-मफलर घेतले, कुकऱ्या शोधल्या, चित्रविचित्र मुखवटे असलेल्या दुकानांत डोकावलो, स्थानिक बाजार धुंडाळून आलो. दरबार चौकात जाऊन पडझड झालेली, टेकू लावून उभी केलेली आणि आता पर्यटकांना प्रवेश नसलेली भव्य मंदिरे बघितली. त्याबद्दल अजून सांगण्यासारखे असले तरी त्या आठवणीत आणि आठवणींवर असलेली धूळ झटकायची माझ्यात हिम्मत नाही आणि इच्छा तर अजिबातच नाही.

तळटीप.....
या लिखाणातून कुठल्याही नेपाळी बांधवाला दुखवायचा माझा अजिबात हेतू नाही पण आहे ती सत्यपरिस्थीती आहे.
तिबेटी हॉट बीयर पिऊ घातल्याबद्दल मी काठमांडूचा ऋणीच आहे.

IMG_20161119_201436_HDR

प्रतिक्रिया

निसर्ग बघून डोळे निवले

पिलीयन रायडर's picture

7 Feb 2017 - 2:10 am | पिलीयन रायडर

+२२२१२१२३४२१२३१२१२२१२१

किल्लेदार's picture

7 Feb 2017 - 4:54 am | किल्लेदार

हे म्हणजे काय बुवा ?

सही रे सई's picture

10 Feb 2017 - 8:36 pm | सही रे सई

आकड्यात हिशोब न करता येण (शब्दात वर्णन न करता येण च्या धर्ती वर )

किल्लेदार's picture

12 Feb 2017 - 1:42 am | किल्लेदार

हा हा हा

पिलीयन रायडर's picture

10 Feb 2017 - 10:31 pm | पिलीयन रायडर

डोळे निवले ह्याला सहमती आहे हो!!!

छान वर्णन आहे भटकंतीचे! तुमची "धूळ"वड लवकर आटोपती घ्यावी लागली याबद्दल सहानुभूती! ;-)

फोटोज बद्दल काय बोलावे म्या पामराने..तरीही सुर्योदयाचा आणि धुक्याच्या धबधब्याचा फोटू खास! तो सुर्योदयाचा फोटू आणि रंगसंगती बघून, तूच काढलेला एक जुना फोटू आठवला.. पण कुठला होता ते आता लक्षात येत नाहीये..

ता.क.: काही फोटू मी वॉलपेपर म्हणून माझ्या लॅपटॉप वर ठेवणार आहे असे विनयपूर्वक सांगून ठेवतो.

लाडू's picture

6 Feb 2017 - 10:59 am | लाडू

सगळेच फोटो आवडले. पेम/साकुरा, धुक्याचा धबधबा आणि सारंगकोटमधून काढलेला जास्तच आवडले.

संजय पाटिल's picture

6 Feb 2017 - 11:09 am | संजय पाटिल

सुंदर फोटो आणि तेव्हढेच सुंदर वर्णन!

सानझरी's picture

6 Feb 2017 - 11:10 am | सानझरी

लेख आणि फोटोज जबरदस्तच.. धुक्याचा धबधबा फारच आवडला.. :)

पद्मावति's picture

6 Feb 2017 - 12:07 pm | पद्मावति

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले. फोटो तर अप्रतिम.

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले. धुक्याचा धबधबा अप्रतिम..

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Feb 2017 - 12:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम चित्रांसह सुंदर प्रवासवर्णन !

गंडकी नदी आणि मच्छपुच्छरे यांची चित्र विशेष आवडली... मच्छपुच्छरे तर एखाद्या हिर्‍यासारखे दिसत आहे !!

किल्लेदार's picture

7 Feb 2017 - 5:02 am | किल्लेदार

मच्छपुच्छरे हे वेगवेगळ्या कोनातून वेगवेगळेच दिसते. एका कोनातून नावाप्रमाणे माशाच्या शेपटीसदृशही दिसते पण त्या कोपऱ्यात जाणे काही शक्य झाले नाही.

एस's picture

6 Feb 2017 - 1:34 pm | एस

वाह!

वरुण मोहिते's picture

6 Feb 2017 - 1:58 pm | वरुण मोहिते

. मला वाटलं क्रमशः वैग्रे आहे कि काय . भूकंपानंतर फार हानी झालीये काठमांडूची .
अवांतर -गोरखा आवडली का एवरेस्ट ?

किल्लेदार's picture

7 Feb 2017 - 4:58 am | किल्लेदार

नेपाळमधल्या स्थानिक बीअर्स म्हणजे
१. नेपाळ आईस,
२. गोरखा,
३. शेर्पा आणि
४. एवरेस्ट
मला सर्वच आवडल्यात :)......... अजूनही काही आहेत पण सापडल्या नाहीत.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2017 - 3:54 pm | अत्रुप्त आत्मा

टाळ्या..

किसन शिंदे's picture

6 Feb 2017 - 4:29 pm | किसन शिंदे

अप्रतिम आहेत सगळे फोटो.

नि३सोलपुरकर's picture

6 Feb 2017 - 6:26 pm | नि३सोलपुरकर

काय ते वर्णन आणि काय ते फोटो ...अप्रतिम.
फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले.

यशोधरा's picture

7 Feb 2017 - 7:02 am | यशोधरा

सुरेख फोटो.

एवढे मजेदार वर्णन आणि फोटो नेपाळचे आजपर्यंत पाहिले नाहीत.
मजा आली.

पैसा's picture

7 Feb 2017 - 11:23 am | पैसा

_/\_ किल्लेदार नाव दिसले की काहीतरी खास दिसणार आहे याची खूणगाठ बांधली जाते. कधीच निराशा होत नाही. :)

जव्हेरगंज's picture

7 Feb 2017 - 12:38 pm | जव्हेरगंज

खूप सुंदर!!

हतोळकरांचा प्रसाद's picture

7 Feb 2017 - 12:57 pm | हतोळकरांचा प्रसाद

अतिशय सुंदर वर्णन आणि तितकेच सुंदर फोटो! वाचत वाचत तुमच्यासोबत नेपाळ फिरून आलो :).

हतोळकरांशी बाडीस..!!!

__/\__

सस्नेह's picture

7 Feb 2017 - 1:08 pm | सस्नेह

डोळे निववणारे सुरेख फोटो ! आणि खुसखुशीत लेखन.

अद्द्या's picture

7 Feb 2017 - 1:14 pm | अद्द्या

वाह ,
सुंदर वर्णन . आणि त्याहून हि सुंदर फोटो ..

To do लिस्ट मध्ये आणखी एक गोष्ट :)

मंजूताई's picture

7 Feb 2017 - 3:13 pm | मंजूताई

डोळे निववणारे सुरेख फोटो ! आणि खुसखुशीत लेखन.
क्रमश: वाचायला आवडेल....

सरनौबत's picture

7 Feb 2017 - 7:37 pm | सरनौबत

फारच अप्रतिम!

आषाढ_दर्द_गाणे's picture

7 Feb 2017 - 10:28 pm | आषाढ_दर्द_गाणे

सगळीच चित्रं अप्रतिम आहेत!
धाम्पूसमधल्या चहाच्या कपाच्या चित्राची मांडणी (कॉम्पोसिशन) मस्त जुळून आलीये
आणि मच्छपुच्छरेच्या चित्रातली पूर्वभूमी (फोरग्राऊंड) (ज्याने त्याची भव्यता डोळ्यात भरते) खूपच छान
प्रवासवर्णनही आवडले

निशाचर's picture

9 Feb 2017 - 3:08 am | निशाचर

अप्रतिम फोटो!

वाह ! पारणं फिटलं डोळ्यांचं !! बाकी तुमच्या चिकाटीला मानलं पाहीजे.

अनिंद्य's picture

10 Feb 2017 - 3:16 pm | अनिंद्य

कॅमेरा आणि निसर्ग दोघांवर तुमचे प्रेम फोटोतून दिसून येत आहे :-)

बाकी काठमांडूची धूळ आणि रस्त्यांच्या अवस्थेबद्दल वाचून वाईट वाटले. आपण निसर्गाला दोन्ही हाताने का ओरबाडतो कुणास ठाऊक. :-(

सही रे सई's picture

10 Feb 2017 - 8:38 pm | सही रे सई

सगळे फोटो म्हणजे एक एक लेख आहेत .. आणि त्यावर तुमच्या शब्दांचा साज पण सुंदरच जमला आहे.
तो धुक्याच्या धबधब्याचा फोटो .. अप्रतिम

किल्लेदार's picture

12 Feb 2017 - 1:49 am | किल्लेदार

थोडक्यात काय आता नेपाळ ला कुणी जाण्याचा निर्धारच केला असेल तर विमानाने काठमांडू गाठावे आणि तेथून परत जिथपर्यंत विमानाने जाता येत असेल तिथपर्यंत जावे. काठमांडू लुक्ला , काठमांडू-पोखरा-जोमसोम , काठमांडू एवरेस्ट एअर राईड अश्या बऱ्याच सोयी उपलब्ध आहेत.

पियुशा's picture

13 Feb 2017 - 10:02 am | पियुशा

माय माय कहर आहे हा निसर्ग !!!!! लैच आवडले फोटु :)
एक बावळत प्रश्न खर्च किती आला हो मानशी ?

संजय क्षीरसागर's picture

13 Feb 2017 - 11:31 am | संजय क्षीरसागर

आणि वृतांत धमाल आहे. इतका सायास करुन लोक पर्यटन का करतात असा मला नेहमी प्रश्न पडतो.

सत्याचे प्रयोग's picture

15 Feb 2017 - 3:16 pm | सत्याचे प्रयोग

मस्त फोटो आणि वर्णनहि

दिपस्वराज's picture

20 Feb 2017 - 11:00 am | दिपस्वराज

किल्लेदार साहेब, खरं तर मला नेहमी वाटतं कि कदाचित तुमच्याकडे हिमालयीन फोटो फक्त तुम्हीच काढावे याचे कॉपीराईट असावे. ला...ज.....वा....ब... क्या बात है. वर्णन नेहमी सारखे फ्रेश . ....लडाखचे फोटो या लेख बघितल्यापासून ध्यानीमनी फक्त...आणि फक्त लडाख. आता हे .....काय करायचं या माणसाचं ?

दिपस्वराज's picture

20 Feb 2017 - 11:04 am | दिपस्वराज

लडाखचे फोटो या लेख

लडाखचे फोटो व लेख 

छान लेखन.. फोटो खूपच सुंदर आहेत. सूर्योदयाचे तर अगदीच खास!

स्वाती दिनेश's picture

7 Nov 2017 - 8:11 pm | स्वाती दिनेश

हे कसं सुटलं माझ्या नजरेतून?
खूप सुंदर फोटो आणि माहिती..
नेपाळ ट्रीपच्या आठवणी ताज्या झाल्या. नागरकोट मला फार आवडले होते.
स्वाती

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 Nov 2017 - 7:50 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

फार सुंदर फोटो..

सिरुसेरि's picture

9 Nov 2017 - 7:58 pm | सिरुसेरि

सुंदर लेख आणी फोटो

वेल्लाभट's picture

9 Nov 2017 - 10:58 pm | वेल्लाभट

फोटो... निसर्ग _/\_
बास इतकंच

किल्लेदार's picture

10 Nov 2017 - 5:51 pm | किल्लेदार

:) :) :)

सगळे फोटो फारच अप्रतिम... धुक्याचा धबधबा अहाहा ! लेखाचं नाव मस्त.

जुइ's picture

10 Nov 2017 - 9:30 pm | जुइ

पहिली दुसरीत असताना नेपाळला गेलो होतो. त्यावेळी कदाचित इतके बकाल नसावे. बाकी वर्णन आणि फोटो आवडले.

किल्लेदार's picture

13 Nov 2017 - 9:39 pm | किल्लेदार

:)