हेअर कलरीन्ग — भाग १

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जनातलं, मनातलं
18 Oct 2016 - 10:22 pm

सर्व प्रथम आपण पाहुया की आपल्या केसांना काळा रंग कसा प्राप्त होतो. तर आपल्या केसांचा रंग हा केसातील रंगकाणांवर म्हणजे मेलेनिन मुळे ठरतो. ज्या रंगाचे मेलेनिन त्याच रंगाचे केस असतात म्हणजे मेलेनिन काळे तर केस ही काळे आणि मेलेनिन जर तांबुस असतील तर केसही तांबुस असतात. ब्लाँड , ग्रे, ब्राउन या नैसर्गिक छटांच्या मेलेनिनची रचना वेगळी असते. जेव्हा या नैसर्गिक मेलेनिन चे प्रमाण अत्यंत कमी होते तेव्हा केस पांढरे होतात. शरीरात होणारे हार्मोनियल बदल, रक्तातील प्राणवायु, शरीरात असणारे लोह, तांबे, इतर जीवन सत्वे , क्षार यांची कमतरता अशा काही मुख्य कारणांमु़ळे केसांचा रंग बदलुन पांढरा होतो आणि एकदा का केसांचा रंग पांढरा झाला की तो नैसर्गिक रीत्या बदलत नाही. असे अकाली पांढरे झालेले केस बहुतकरुन कुणाला आवडत नाहीत.आजकाल हेअरकलर म्हणजे फक्त पांढरे केस काळे करणे इतकच नव्हे तर फॅशनचा एक अविभाज्य भाग बनुन गेले आहे. काळा , चॉकलेटी , मरुन , बरगंडी, पिंगट अशा वेगवेगळ्या छटा याला आजकाल सगळीकडे पसंती आहे. त्यात चाळीशी आली की डोक्यावर रुळणारे रुपेरी केस आपल्याला आपल्या वार्धक्याची जाणीव करुन देतात. सण-समारंभ , लग्न , मंगल कार्य यात सगळेजण आपल्या रुपेरी केसांवर एक मुलामा देउन वावरत असतात. आजकाल केस रंगवण्याचे बरेच प्रकार बाजारात उपलव्ब्ध आहेत पण पुर्वी मेंदी आणि तत्सम नैसर्गिक वस्तुंचा केस रंगवण्यासाठी वापर केला जात असे. चला तर पाहुया केस रंगवण्याचे आधुनिक प्रकार आणि छटा. आपल्या भारतात केसांच्या रंगांबद्दल जास्त जागरुकता दिसुन येत नाही. बर्‍याचदा डोळ्यांंची जी छटा असते त्या छटेचे केस त्या व्यक्ति ला शोभुन दिसतात पण आपल्याकडे काळा, चॉकलेटी हे रंग जास्त प्रमाणात वापरले जातात.

कलप किंवा डाय करण्याचे प्रकार -
मेंदी - मेंदी हे नैसर्गिक कलप आहे. त्याबरोबर ते कंडीश्नर हि आहे.इजिप्शियन राणी "सेसा" हिने मेंदीचा वापर केल्याचे माहीत आहेच. पुर्वापारापासुन आपल्याकडे मेंदी चा वापर केस रंगवण्यासाठी केला जातो.यामधे रंग निर्माण करणारे लॉसन असते. मेंदी चा इतर केमिकल डाय प्रमाणे कुठलाही दुष्परीणाम नसतो काळ्या हेअर डाय ने केस खुपच काळेभोर झाले तर मेंदी लावुन तो कलर जरा कमी करु शकतो. मेंदी मुळे केसांना नैसर्गिक चमक येते. पण जर केस खुपच पांढरे असतील तर मेंदी मुळे केसांना शेंदरी पिवळट छटा येते जी अज्जिब्बात चांगली दिसत नाही. मुळचे केस काळे असतील आणि बरेचसे पांढरे झाले असतील तर मेहेंदी मुळे पांढरे केस लालसर आणि काळे केस भुरकट दिसतात असा कलर चेहर्‍याला शोभुन दिसतो. मेंदी लावण्याआधी केसांना तेल लावले असेल तर केस धुवुन घ्यावेत. साधारण लोखंडाच्या भांड्यात किंवा कढईत मेंदी २-३ तास चहा किंवा कॉफी उकळुन त्यात भिजत घालावी. मेंदी हे नैसर्गिक कलर कलप असल्याने रंग ये ण्यासाठी दुसरे काही घालण्याची गरज नाही पण केसांसाठी पोषक असे आवळा पावडर , नागर मोथा ,वाळा याचा वापर करु शकता. त्या नंतर केसाला मेदी लावुन २ तासाने धुवुन टाकावी. मेंदी केसाला लावायची पद्धत पुढच्या भागात देतेच आहे.

मेंदीमधे दुसरा मिसळला जाणारा वनस्पति जन्य रंगप्रकार म्हणजे "नीळ". या पानांची भुकटी जर मेंदीत मिसळली तर निळसर पासुन गडद काळ्यापर्यंत कोणत्याही रंगछटा केसांवर चढवता येतात. परंतु आजकाल याचा वापर कमी होतो. या शिवाय, कॅमोमिल, ब्राझिल वुड , अक्रोडाची हिरवी वाले याचा उपयोग करुन केसांसाठी निरनिराळे रंग बनवता येतात.

केमिकल डाय :— अलिकडे केमिकल डायने केस रंगविण्याचे प्रमाण वाढले आहे. यात गोदरेज हेअर डाय, गार्नियर, लॉरीयल , वेला , नुपुर मेंदीडाय अशा बर्‍याच नावाजलेल्या कंपन्यांची चलती आहे, स्वस्त आणि मस्त या वा क्याला अनुसरुन गोदरेज हेअरडाय च्या डाईला सगळ्यात जास्त मागणी आहे. पण जितके स्वस्त कलप तितके त्याचे दुष्परीणामही जास्त. हलक्या दर्जाच्या डाईने केस जास्त पांढरे होतात मग याचा वापर सतत करावा लागतो. केस गळणे अ‍ॅलर्जी , कोंड्याचे प्रमाण वाढणे हे प्रकार वाढतात. त्यातल्या त्यात वेला , लॉरीयल आणि नावाजलेल्या कंपन्यांची उत्पादने वापरणे बरे. पण तरीही केमिकल डाय वापरणे अपायकारकच. केमिकल डाय मधे आजकाल मेंदी डाय हा प्रकार हि खुप वापरला जातो. त्यातल्या त्यात मेंदी म्हंटल म्हणजे हर्बल आणि म्हणुन ते सेफ असणार असे बर्‍याच जणांचे मत असते पण हे साफ चुकीचे आहे. कारण यात काळा , बरगंडी या छटा असतात आणि त्या केमिकल डाय असल्याशिवाय मिळु शकत नाही. दुसरा प्रकार म्हणजे शाम्पु बेस डाय. उदा. वॅसमॉल केश काला. या प्रकारात डाय हा शॅम्पु प्रकारात असतो. केसांवर काही वेळ ठेवुन धुवुन टाकल्यावर हवा तो कलर केसांना येतो.

पर्मनंट हेअर डाय हा प्रकार हि फॅशन जगतात खुप फेमस आहे. यात हेअर कलर केसांना पर्मनंट लागतो पण आपल्या केसांची सतात वाढ होत असते , जस जसे केसांची वाढ होते नवीन आलेल केस हे नैसर्गिक रंगाचेच येतात त्यामूळे आपल्याला नवीन केसांना डाय करावेच लागते. आपल्या चेहफ्याच्या कलर ला सुट होईल असे कलर वापरणे योग्य ठरते. जसे गोर्‍यापान वर्ण असलेल्या करड्या रंगांचे डोळे असणार्‍या व्यक्तिंना ग्रे कलरचा हेअरकलर जास्त सुट होतो . तसेच चॉकलेटी यात डार्क , मिडीयम , लाईट हे शेड , बरगंडी या शेडस ही खुप सुट होतात. सावळया वर्णाच्या व्यक्तिंना चॉकलेटी यात डार्क , मिडीयम , लाईट हे शेड ही सुट होतात. बर्‍याच दा केसांचे थोडे थोडे भाग घेउन ब्लाँड , बरगंडी , पिंक अशा शेडसने रंगवले जातात.

तर पुढच्या भागात आपण हेअर डाय करण्याचि पद्धत तसेच मेंदी डोक्याला लावायची पद्धत पाहु.

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण लेख.पुभाप्र

मीली's picture

19 Oct 2016 - 9:04 am | मीली

चांगली माहिती कविता .
पुढील भाग लावकर येऊ दे.

स्नेहश्री's picture

19 Oct 2016 - 9:17 am | स्नेहश्री

छान माहिती कविता...

काळी मेहेंदी लावणे कितपत चांगले.. कारण त्यातपण केमिकल्स वापरलेले असतातच ना??

कविता१९७८'s picture

19 Oct 2016 - 12:39 pm | कविता१९७८

काळी मेंदी ही केमिकल युक्तच असते. नैसर्गिक मेंदी म्हणजे दुकानात जी हाताला लावण्यासाठी मेंदीची पावडर असते ती घ्यावी. वर लेखात मी लिहलय की काळा आणि बरगंडी कलर हा मेंदी मधे डाय असल्या शिवाय येउ शकत नाही.

पुढच्या भागात मेंदी कशी भिजवावी व डोक्याला कशी लावावी याबाबत माहीती देईन.

सुबोध खरे's picture

19 Oct 2016 - 9:49 am | सुबोध खरे

एक विशेष सूचना -- नैसर्गिक मेंदी हि सुरक्षित आहे म्हणजेच स्वतः तयार केलेली मेंदी हि सर्वात जास्त सुरक्षित असते.
बाजारात केस "रंगवायला" मिळणाऱ्या मेंदीत इतर अनेक पदार्थ असतात ज्याने तुमच्या त्वचेला/ आरोग्याला अपाय होऊ शकतो.
खालील दुवा वाचून पहा. http://www.hennapage.com/henna/warnings.html

बर.. मग घरगुती काळी मेहेंदी कशी तयार करावी?? काही माहिती मिळू शकेल??

कविता१९७८'s picture

19 Oct 2016 - 12:41 pm | कविता१९७८

काळी मेंदी असा काही प्रकार नाही , नैसर्गिक मेंदी लावल्यावर पांढरे केस लालसर शेंदरी आणी काळे केस भुरकट दिसतात . केस पुर्ण पांढरे असतील तर ते शेंदरी पिवळट दिसतील.

अच्छा म्हणजे घरच्या घरी केस काळे नाही करता येत???

कविता१९७८'s picture

19 Oct 2016 - 12:45 pm | कविता१९७८

घरच्या घरी म्हणजे ? घरच्या घरी तुम्ही केसांना मेंदी ही लावु शकता आणि डाय ही करु शकता. पार्लर मधे जायची गरज नाही.

अहो... मी तसेच केस काळे करतो... मला विचारायचं होतं कि नैसर्गिकरित्या नाही का केस काळे करता येत?? कुठलेही केमिकल्स नं वापरता...

स्वाती दिनेश's picture

19 Oct 2016 - 10:49 am | स्वाती दिनेश

माहितीपूर्ण लेख, पु भा प्र.
स्वाती

संदीप डांगे's picture

19 Oct 2016 - 1:02 pm | संदीप डांगे

वयाच्या चौदाव्या वर्षांपासून माझे केस पांढरे व्हायला लागले, 20-21 पर्यंत 80 टक्के पांढरे झाले, आमच्या घरात आनुवंशिक आहे, वडिलांची चाळीशीत 100 टक्के चांदी झाली, बहिणीचे काळसर सोनेरी आहेत,

केमिकल डाय शिवाय पर्याय नाही कारण घरगुती मेंदीने फक्त पिंगट होतात व मुसलमानी छाप दिसतात, काळा रंग वापरत नाही कारण नैसर्गिक वाटत नाही, लोरीयल कैच्या कै महाग आहे, महिन्याचा खर्च पाचशे सहाशे आणि तोही मोबाईल बिल सारखा न टाळता येणारा,

सुरवातीला मी डाय करूच नये या मताचा होतो कारण माझे केस नैसर्गिक रेशमी आहेत, डाय केले की रखरखीत होतात. पण जो भेटेल तो स्पष्ट दिसत असूनही "केस पांढरे झाले का?" असं विचारायचा, ना मागता हक्काने उपाय सांगत बसायचा, याचा कंटाळा आणि चीड यायला लागल्याने व तेही ऐन कुमारवस्थेत असे रोज सहन करत राहावं लागतं असल्याने नाईलाजाने डाय जवळ केली.

माझा एक समवयस्क मित्र अंशतः टकला होता, तो मला म्हणायचा, "आबे, तुला किमान रंगवायला केस आहेत डोक्यावर, त्यात समाधान मान!"

असो, डाय ने 'डोक्यावर' हात ठेवला त्यामुळे मनस्ताप बंद झाला, ;)

सुबोध खरे's picture

19 Oct 2016 - 8:39 pm | सुबोध खरे

डांगे अण्णा
उगाच त्रागा करू नका. केस "आहेत" म्हणून "रंगवता" येतात. आमच्या डोक्यावरील काळया केसानी "काळे" करायला सुरुवात केली आहे आणि माथ्यावर चंद्र दिसायला लागला आहे. त्याचे काहीच करता येत नाही. ( नाही म्हणायला केस ट्रान्सप्लांट करता येतात पण उगाच ५०-६० हजार खर्च करायची तयारी नाही).
केस डायने रंगवले तर त्याचच शरीरावर दूरगामी अपाय होतो असा कोणताही भक्कम पुरावा आढळलेला नाही. तेंव्हा चिंता न करता डाय वापरत जा.
बायका मेक अप करतातच ना. ( याचा शब्दशः अर्थ असा आहे कि जे आपल्याकडे नाही त्याची भरपाई करणे) मग चिंता सोडून द्या.
चांगले दिसणे हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतो.या नि आपण चांगले दिसत नसला तर आपला आत्मविश्वास कमी होतो हे स्पष्ट आहे.

संदीप डांगे's picture

19 Oct 2016 - 8:55 pm | संदीप डांगे

=)) धन्यवाद खरेसाहेब!

केस काळे करायला लागल्यावर - जेव्हा नैसर्गिक दिसणारे रंग उपलब्ध नव्हते -तेव्हा दुसराच त्रास उपटला. केस डाय केलेले दिसायचे, त्यावर लोक डायचे दुष्परिणाम सांगत बसायचे. 'डोळे अधू होतात' हा एक फार कॉमन. आता 18 वर्षे झाली नियमित डाय करत आहे, 12 -12 तास संगणकावर काम केलंय, दृष्टी अजूनही उत्तम आहे!

लोक घोडयावर बसू देत नै पायी चालू देत नाही,

बाकी रेशमी नसले तरी डोक्यावर भरघोस केस आहेत हेच खूप आहे, ;)

केस पांढरे होणं हे आनुवंशिक असतं? टक्कल पडणं असतं हे ऐकलेलं आहे आणि मी स्वतः त्याचा पुरावाही आहे. पण पांढरे होणंही आनुवंशिक असतं हे माहित नव्हतं.

संदीप डांगे's picture

20 Oct 2016 - 9:22 pm | संदीप डांगे

आमचं सगळंच डिफ्रंट! ;) =))

सर्व काका लोकांचे, चुलतभावांचे केस पांढरे आहेत, आईकडून जीन्स जास्त प्रभाव टाकणारे आहेत त्या त्या प्रमाणात पांढरेपणा आहे, पण चौदावं लागलं की एखादा तरी केस पांढरा आहेच प्रत्येकाचा! शंभर टक्के काळे केस असणारा कोणीच नाही ;)

धर्मराजमुटके's picture

20 Oct 2016 - 7:22 pm | धर्मराजमुटके

सेम स्टोरी हिअर. लग्न जमवायला, पोरगी पहायला गेलो तेव्हा डाय केल्यामुळे दिसणार्‍या काळ्या कुळकुळीत केसांवर होणार्‍या सासरचे लोक्स फारच खुश झाले. अर्थात तेव्हा डोक्यावर जुल्फे देखील घनदाट होती. मात्र लग्न झाल्यावर पोल खुल गयी. पण आमच्या काळात थोडं फार खोटं बोलणं अलाऊड असल्यामुळे लग्न टिकून राहिलं.

मात्र दर महिन्याला डाय करण्याचा फार कंटाळा येतो तेव्हा सरळ टक्कल करुन येतो. तेवढीच दोन तीन महिने पैसे आणि वेळाची बचत.

संदीप डांगे's picture

20 Oct 2016 - 9:25 pm | संदीप डांगे

;)

माझी बायको गमतीत खेचतेच कि आम्हाला फसवलं म्हणून! अर्थात तिला आधीपासून माहिती आहे म्हणा! ;)

कपिलमुनी's picture

20 Oct 2016 - 8:16 pm | कपिलमुनी

केसांचे धार्मिकीकरण यावर धाग्याचे शतक करण्याचे पोटेंशियल आहे

pran

संदीप डांगे's picture

20 Oct 2016 - 9:28 pm | संदीप डांगे

नका हो नका असं करू... धागा तसाही शतक मारेल,

हिंदू मुस्लिम शीख इसाई
सबने बालो को मेंदी लगाई

राष्ट्रीय एकता मिशन

अनन्न्या's picture

19 Oct 2016 - 6:50 pm | अनन्न्या

पुढचे भाग येऊदेत. योग्यवेळी माहिती मिळतेय.

अविनाशकुलकर्णी's picture

19 Oct 2016 - 8:58 pm | अविनाशकुलकर्णी

बायको...अहो माझे केस पांढरे व्हायला लागले आहे..काय करु?
*
नवरा..व्हाय डोंच यु जुस्ट डाय

पिशी अबोली's picture

19 Oct 2016 - 9:16 pm | पिशी अबोली

छान माहिती, अगदी व्यवस्थित पद्धतीने सांगितली आहे.

पद्मावति's picture

19 Oct 2016 - 11:10 pm | पद्मावति

छान उपयोगी माहिती.

सुकामेवा's picture

20 Oct 2016 - 10:50 am | सुकामेवा

पुढील भाग लावकर येऊ दे.

प्रभाकर पेठकर's picture

20 Oct 2016 - 11:19 am | प्रभाकर पेठकर

काळा , चॉकलेटी , मरुन , बरगंडी, पिंगट अशा वेगवेगळ्या छटा याला आजकाल सगळीकडे पसंती आहे.

अमेरिकेत, मी एका आफ्रिकन ललनेला, जांभळा आणि लाल रंग केसांना लावलेला पाहिला आणि हे पाहण्याआधी माझे डोळे मिटले का नाहीत असा वैफल्यग्रस्त विचार डोक्यात आला.

वयोमानानुसार केस पांढरे होणे किंवा साथ सोडून निघून जाणे नैसर्गिक म्हणून पुरुषांनी स्विकारावे. शांपू आणि वासाची तेले (बाजारी) कधीच वापरू नये.

केस गळती आणि केसांची शुभ्रता स्त्रियांना जास्तच कठीण जाते, नैसर्गिक रित्याच.

माझा आजपर्यंत एकही केस पांढरा झाला नाही हे कोणाला सांगूनही खरे वाटत नाही.
आता वाद घालणे सोडून दीलेय.
बाकी ही माहीती भवीष्यात कामी येइल....

संदीप डांगे's picture

21 Oct 2016 - 4:45 am | संदीप डांगे

समजलं नाही, नक्की काय झालं आहे? वाद कशाबद्दल?

या वयात संपूर्ण केस काळे असणे शक्यच नाही असे बर्‍याच लोकांचे म्हणणे असते. अशा लोकांबरोबर कीती वाद घालत बसणार?
केस हातात घेउन घासून बघा म्हणतो....अजून काय बोलणार?

(फक्त वय विचारू नका)

संदीप डांगे's picture

21 Oct 2016 - 10:19 am | संदीप डांगे

चालायचंच!

माझ्याही आईचे वयाच्या 45 पर्यन्त एकही केस पांढरा नव्हता, बाबाचे 100 % पांढरे आणि आईचे 100% काळे! ;)

पिशी अबोली's picture

21 Oct 2016 - 2:30 pm | पिशी अबोली

माझे एकाच बटेचे केस मधेच पांढरे होत असतात. कुणी काळजी केली की लवकरच ती बट फॅशन म्हणून पूर्ण पांढरी रंगवणार आहे असं सांगून समोरच्याला गप्प करते.