महिला वायुदल पायलटस

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
18 Jun 2016 - 10:36 pm
गाभा: 

३ महिलांनी भारतीय वायुदलात फायटर जेट पायलट म्हणून जबाबदारी स्वीकार्लीये.
त्या युवतींचे मनापासून कौतुक, आदर आणि अभिमान.

तथापि ह्या युवतींना काय प्रकारच्या कामगिऱ्या पार पाडाव्या लागतील हा प्रश्न सतावतोय. विशेषत: उद्या युद्ध सुरु झाल्यास ह्या महिलांना हम्म घ्या हे विमान आणि जाऊन करा बॉम्बिंग सिमेपलीकडे असा आदेश पार पडावा लागेल का ? सौरभ कालिया वगैरे आठवले कि अशा जागी एखादी स्त्री असेल तर काय होईल असे वाटते.

आर्मी आणि नेव्हीत काय परिस्थिती आहे ? प्रत्यक्ष युद्धमैदानावर स्त्रिया जातात का ? इतर देशानमध्ये काय परिस्थिती आहे ?

मला झाशीची राणी, रायबघन वगैरे उदाहरणे ठाऊक आहेत पण फायटर प्लेन्स वगैरे म्हणजे केवळ स्तिमित करणारे आहे ...

सोन्याबापू, डॉक्टर खरे आदी प्रभृतीनच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.

प्रतिक्रिया

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

18 Jun 2016 - 10:53 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

<<सुबोध खरे मोड ऑन>>
खरं आहे अत्रन्गिपाऊस साहेब,मी सैन्यात होतो त्यामुळे तिकडच्या व्यथा मलाच माहित आहेत.फारश्या स्त्रिया युद्धमैदानावर जात नाहीत,बाकि हा प्रयोग स्तुत्यच आहे.
<<सुबोध खरे मोड ऑफ>>

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jun 2016 - 6:07 am | डॉ सुहास म्हात्रे

भारताच्या पहिल्या महिला फायटर पायलट्सचे मनःपूर्वक अभिनंदन !

हे आवश्यकच होते आणि ते करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारतिय वायुदलाचेही अभिनंदन !

हे आवश्यक होतं, आणि बराच काळ होत नव्हतं.

मैलाचा दगड म्हणतात तशी महत्वाची घटना. एअरफोर्सपेक्षाही स्त्रियांसाठी जास्त महत्वाची.

माझी माहिती कदाचित चूकही असेल पण स्त्रीला भारतात ट्रक वगैरे हेवी व्हेईकलचं लायसेन्स दिलं जात नाही असं ऐकलंय. (की कोणी अॅप्लायच करत नाहीत)

हेही दूर व्हावं.

चलत मुसाफिर's picture

19 Jun 2016 - 11:26 am | चलत मुसाफिर

महिलांनी लढाऊ विमाने उडवली, पायदळात भरती झाल्या, सीमा सुरक्षा दलात सामील झाल्या तर पुरुष सैनिकांची सर्व कर्तव्ये त्यांना करावी लागणार हे उघड आहे.

"महिलांचे युद्धात काय होणार?" ही भीती खुद्द महिलांपेक्षा पुरुषांना आणि त्याहून जास्त पुरुषप्रधान संस्कृतीला भेडसावत असते. लिंगशुचिता हे या भीतीचे फक्त वरवरचे आवरण असते. खरी भीती ही लिंगविशिष्ट अधिकार आणि सामाजिक सत्ता हातातून जाईल याची असते.

चलत मुसाफिर's picture

19 Jun 2016 - 11:39 am | चलत मुसाफिर

ह्या महिलांना हम्म घ्या हे विमान आणि जाऊन करा बॉम्बिंग सिमेपलीकडे असा आदेश पार पडावा लागेल का?

युद्ध जाऊ द्या हो! ती फार विरळा घटना आहे. तुम्ही साधं आपल्या कुटुंबातील एखाद्या स्त्रीला दिल्ली ते लखनौ (मनात आली ती नावे घेतली आहेत. इथे इतर कोणतीही दोन शहरे असू शकतात) रात्रीच्या बसने एकटी जाऊ द्याल का? ती लाख तयार असली तरीही?

हे फक्त उदाहरण आहे. वैयक्तिक मानून घेऊ नये. मला वाटते, आपल्यापैकी बहुतेक सर्व पुरुष अशा प्रसंगी धास्तावून जातील. याचे कारण आपला पुरुषप्रधान व्यवस्थेवर विश्वास नसतो. ही व्यवस्था एकांड्या स्त्रीच्या विरोधात कुठल्या टोकाला जाऊ शकते हे आपल्या अंतर्मनातला सैतान आपल्याला किडके हास्य करून सतत सांगत असतो.

अत्रन्गि पाउस's picture

19 Jun 2016 - 6:34 pm | अत्रन्गि पाउस

नाहीच !

कुणीही सुज्ञ हेच उत्तर देईल

चलत मुसाफिर's picture

19 Jun 2016 - 10:01 pm | चलत मुसाफिर

युद्ध, शत्रू, धर्म, बॉम्बगोळे इ. सगळे बागुलबुवा खोटे आहेत. वास्तविक पाहता, स्त्रिया कोणतेही काम आपल्या खांद्याला खांदा लावून (आणि कदाचित अधिक चांगले) करू शकतात, संधी मिळाल्यास आपले जीवन आपल्याला हवे तसे मनसोक्त जगू शकतात, लिंगशुचिता हा त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा मुद्दा असेलच असे नाही हे स्वीकारण्याची आपण पुरुषांच्याच मनाची तयारी अजून व्हायची आहे, हे खरे.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

19 Jun 2016 - 11:45 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

एअरफोर्सचे जाऊद्या,एखादा मल्टीॲक्सल कंटेअर भरगाव वेगाने चालवून पुरुष डायवरांच्या मनात धडकी भरवनारी नारी मला बघायची खुप इच्छा आहे.

भाते's picture

19 Jun 2016 - 8:26 pm | भाते

मल्टीॲक्सल, कंटेअर, डायवरांच्या, भरवनारी, नारी

नानामाई आणि समस्त डुआयडी,
एक सरळ वाक्य मराठीत लिहिता येत नसेल तर मिपावर कशाला येतोस रे? संमं कदाचित तुझ्या डुआयडीवर बंदी घालणार नाही, पण जोपर्यंत तु मिपावर शुध्द मराठीत लिहित नाहीस तोपर्यंत तुला माझे हे असे प्रतिसाद वाचावेच लागतील.

अनुप ढेरे's picture

19 Jun 2016 - 9:44 pm | अनुप ढेरे

हे कंत्राट आपल्याला मालकांकडून लाभले आहे काय? उगाच का खाजवून खरूज काढता? धाग्याचा विषय आणि तुमचा उद्दाम प्रतिसाद याचा काय संबंध?

भाते's picture

20 Jun 2016 - 8:54 pm | भाते

माझा हा आणि वरचा प्रतिसाद कृपया उडवावा हि नम्र विनंती. नानामाईच्या डुआयडीवरचा माझा राग आणि त्याच्या शुध्दलेखनाच्या चुका हे प्रकरण पुढेही चालु रहाणार आहे. इतके चांगले प्रतिसाद येत असताना या धाग्यावर माझा हा प्रतिसाद नको.

खटपट्या's picture

19 Jun 2016 - 9:33 pm | खटपट्या

हे बघा,

https://www.youtube.com/watch?v=Im0awrk6X90

https://www.youtube.com/watch?v=7knACn55RTs

https://www.youtube.com/watch?v=Qoh7jiWHa3Y

बर्‍याच आहेत. उघडा डोळे बघा नीट...

पिलीयन रायडर's picture

20 Jun 2016 - 3:05 am | पिलीयन रायडर

अत्यंत क्लासिक बातमी आहे ही!!! फार म्हणजे फारच मस्त वाटलं!

मला काय वाटतं, एक बायकांच्या डोक्यातुन "आपण बाई आहोत" ह्याची अवास्तव जाणीव काढुन टाकली ना, तरी बायका १० कामं जास्त डेअरिंगने करतील. आपण बाई आहोत म्हणुन अमुक तमुक चार गोष्टी आपल्याला जमणारच नाहीत असं उगाच डोक्यात फिट असतं. नाही तर शाररिक क्षमता जरा कमी आहे पण बाकी स्त्री आणि पुरुषाच्या कार्यक्षमतेत फरक का असवा? विचार करण्याच्या पद्धतीत असेल, पण म्हणुन करुच शकत नाहीत बायका असं काही नसतं. ह्या तिघींनी फार भारी उदाहरण घालुन दिलंय!

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jun 2016 - 5:50 am | कैलासवासी सोन्याबापु

नाही तर शाररिक क्षमता जरा कमी आहे

आपण स्वतः एक स्त्री असून असे म्हणता ह्याचेच आश्चर्य वाटले खासे! स्त्रीची शारीरिक क्षमता कमी आहे हे कसे ठरवले? म्हणजे ती कमी मोजायला बेसला किंवा बेंचमार्कला कुठली / कोणाची शारीरिक क्षमता ठेवली !? पुरुषाचीच ना? नसती तर स्त्रीची शारीरिक क्षमता कमी आहे वगैरे आपण बोललाच नसतात असे वाटते.एकंदरीत स्त्रीची शारीरिक क्षमता कमी वगैरे अजिबात नसते , उदाहरणादाखल आपण आर्मी मध्ये असणाऱ्या ladies पाहू शकतो ऐरफोर्स मध्ये पायलट म्हणून तरी शरीरांस विपरीत जी फोर्स (गुरुत्वाचे विरुद्ध बल) वगैरे सहन करायला लागतो बाकी आर्मी मध्ये असे काही नसते , अधिकारी म्हणून ओटीए चेन्नई मध्ये निवडल्या जाणाऱ्या पोरीना सुद्धा पुरुष ट्रेनिज इतके भयानक खडतर ट्रेनिंग करावेच लागते (अगदी क्रू कट हेअरस्टाईल ते दिवसाला 22 किमी रनिंग अन बाकी सगळे) त्यामुळे तुम्ही म्हणता आहात त्याला मी सहमत नाहीये

स्त्री-पुरुष शारीरीक क्षमता समान असतात असा सर्वसाधारण सुर तुमच्या प्रतिसादाचा आहे.
ऑलिम्पीक गेम्स आधुनिक दृष्टीकोणातुन आयोजित केले जातात सध्या तरी त्यात अत्याधुनिक सायन्स चा अवलंब इ असतो, त्यावर अनेक आंतरराष्ट्रीय संघटना लक्ष ठेउन असता, त्यातुन क्रमाने इतर भेदभाव जसा वर्णभेद इ. काढुन टाकण्यात आला.
जर स्त्री-पुरुष शारीरीक क्षमतेत कुठलाच फरक नसता तर मग आजपर्यंत दोघांना विना भेदभाव समानतेने एकमेकांत खेळवण्याची मागणी पुढे आली असती, हा विषय चर्चिला गेला असता किंवा अगोदर यावर कदाचित मंथन झालेले असेल.पण अजुनही स्त्री-पुरुष मिक्स फुटबॉल टीम, किंवा बास्केटबॉल टीम अस काही अस्तित्वात नाही. किंवा महीला विरुद्ध पुरुष बॉक्सर अशी मॅच माहीत नाही. फार पुर्वी मार्टीना नवरातिलोवा ने बहुधा पुरुष टेनीस खेळाडु बरोबर एक मॅच खेळली होती बहुधा अर्ध वट आठवतय. पण स्त्री-पुरुष हे ऑलिम्पीक मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीतच खेळवले जातात.
असे का मला कुतुहल वाटते म्हणजे असे काही संशोधन आहे का ? स्त्री-पुरुष क्षमता समानच आहेत की काही बाबतीत काही खेळात पुरुष शारीरीक क्षमता जास्त व काहीत स्त्रीयांची जास्त असे काही आहे का ? स्त्री-समतावादी संघटनांनी अशी कधी मागणी केलेली आहे का ?
जाणुन घ्यायला आवडेल. व खरेतर वैद्यक शास्त्र इतक प्रगत आहे तर स्त्री-पुरुष शारीरीक क्षमते संदर्भातील शास्त्रीय निर्णयावर नक्कीच पोहोचलेल असणार. काय निकाल आहे या संदर्भात फरक आहे की नाही नसल्यास असे एकत्रित गेम्स का खेळवले जात नाहीत ?
सर्वात गुढ तर मला शारीरीक क्षमतेत फरक असेल नसेल मात्र बुद्धिबळ सारखे जे प्रामुख्याने मानसिक शक्तीवर आधारीत खेळ आहेत त्यातही आंतरराष्ट्रीय स्पर्धा स्त्री-विरुद्ध पुरुष अशी बघितल्याचे आठवत नाही. अशा स्पर्धा खेळवल्या जात नाहीत इव्हन ऑलिम्पीक मध्येही नाही याचा अर्थ यावर खल झालाच असेल व काही निर्णयावर वैद्यकीय विश्व आलेलं असेल
की अजुन काही अ-शारीरीक पैलु ही आहेत असे स्त्री-पुरुष सामने न खेळवण्या संदर्भात
असे का बरे असेल ? जाणुन घ्यायला आवडेल.

बाकी नो कॉमेंटस पण बुद्धिबळात स्त्रिया आहेत हो साहेब.

थोडं गुगल केल्यावर तर ज्युडिथ पोल्गर ने गॅरी कास्पारोव ला हरवल्याची पण एक बातमी दिसली...

मारवा's picture

22 Jun 2016 - 10:47 am | मारवा

या माहीतीसाठी
धन्यवाद !

मारवा's picture

22 Jun 2016 - 10:49 am | मारवा

या माहीतीसाठी
धन्यवाद !

अगदी माझ्या मनातले प्रश्न विचारले आहेत. धन्यवाद मारवाजी!!

कितीतरी खेळातले नियमही स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळे असलेले पाहायला मिळतात. उदा. टेनिस मेन्स सिंगल ही ५ सेटची असते तर विमेन्स सिंगल ही ३ सेट्सची असते. यामागे स्त्री-पुरुषांच्या नैसर्गिक क्षमतांचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे की पारंपारिक पुरुषी वर्चस्वतेचा पुर्वग्रह? जाणकारांच्या प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत.
बाकी सोन्याबापूंनी दिलेल्या स्त्रियांच्या मल्टीटास्किंग करण्याच्या किंवा प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला स्ट्रेच करण्याच्या क्षमतेबद्दल सहमत आहे. पण त्याचवेळी हातघाईच्या संगिनीयुद्धात एक साधारण (अ‍ॅव्हरेज या अर्थाने) स्त्री एका साधारण पुरुषाला किती टक्कर देउ शकेल याबद्दल शंका आहेच.

कितीतरी खेळातले नियमही स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळे असलेले पाहायला मिळतात. उदा. टेनिस मेन्स सिंगल ही ५ सेटची असते तर विमेन्स सिंगल ही ३ सेट्सची असते. यामागे स्त्री-पुरुषांच्या नैसर्गिक क्षमतांचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे की पारंपारिक पुरुषी वर्चस्वतेचा पुर्वग्रह

नियम कशाला बघायचा त्यासाठी. रेकॉर्ड बघायचे. अ‍ॅथलेटीक्स, वेटलिफ्टींग, स्विमिंग अशा शारीरीक क्षमता काउंट होउ शकणार्‍या गेम्स मध्ये.

आता त्यात स्त्रिया इतके वर्षे नव्हत्या म्हणून लेवल व्हायला काही पिढ्या जातील हेही खरेच.

पिलीयन रायडर's picture

20 Jun 2016 - 9:02 pm | पिलीयन रायडर

जनरल निरीक्षणातुन झालेलं मत आहे हो. विदा बिदा काही नाहीये माझ्याकडे. मारवा म्हणतात तसं खेळात कायम फरक पाहिलेला आहे. मेकॅनिकलला असताना फोर्जिंग वगैरे करताना मुलं जे दणकुन हातोडा घालायचे ते पाहिलंय. भाऊ-वडील-नवरा ह्यांच्यात एकंदरितच जास्त ताकद असते हे पहिलय.

शिवाय पाळी आणि गरोदरपणा ह्यातुन जाताना शरीर दमतेच. हे असं काही कधी पुरुषाला सहन करावं लागत नाही. म्हणुन ही माझे असे मत आहे.

मुली हे पुरुषांइतकंच करु शकत असतील तर आनंदच आहे की वो.. पाळी चालु असताना मुली हे ट्रेनिंग करत असतील तर माझा दंडवत!!!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jun 2016 - 9:21 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो मग माझा मुद्दाच तुम्हाला खास कळलेला नाही असे खेदाने म्हणावे लागेल, मुळात मी विदा वगैरे काहीच मागितला नाहीये. तरी असो! काही उणे अधिक वाटल्यास माफ करा ही विनंती करतो अन रजा घेतो

_/\_

पिलीयन रायडर's picture

21 Jun 2016 - 2:38 am | पिलीयन रायडर

अहो मी म्हणतेय की मला आपलं आजुबाजुला पाहुन असं वाटत रहायचं की निसर्गतः पुरुषांना जास्त ताकद मिळालेली आहे. पण तुम्ही म्हणताय तसं एवढी अवघड ट्रेनिंग्स जर स्त्रियाही करत असतील तर फारच भारी गोष्ट आहे! अनेक स्त्रियांना पाळीत फारच त्रास होतो. गरोदरपणातही अनेक घडामोडींमधुन शरीर जाते. पण तरीही जर एक स्त्री ह्याही बाबतीत पुरुषाच्या मागे नसेल आणि ह्याही क्षेत्रात काम करत असेल तर त्याहुन अभिमानास्पद ते काय!

:)

चलत मुसाफिर's picture

20 Jun 2016 - 11:47 pm | चलत मुसाफिर

शारीरिक क्षमता ही जर दंडबैठका, हाणामारी, कुस्ती अशा निव्वळ आडदांड कसोट्यांवर तोलली, तर स्त्री-पुरुषांत लिंगसापेक्ष फरक हा आढळणारच, यात शंका नाही.

पण मुद्दा वेगळा आहे. सैनिकी कार्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता ही यापलिकडे अनेक गोष्टी सामावून घेते. सिनेमात सनी देओल हा सेनाधिकारी होऊन शिट्ट्या-टाळ्या घेत असतो. पण प्रत्यक्षात असा बलभुज, आडमुठा, संतापी, गर्विष्ठ आणि एकलकोंडा सैनिक शोधून सापडणार नाही. सैनिकाचे शरीर हे स्नायूंचे पोते क्वचितच असते. हुकूम मिळताच झोप, जेवण, प्रतिकूल हवापाणी, वेळकाळ, पावलापावलावरचा धोका यांची पर्वा न करता, कित्येक किलोचे वजन, हत्यार, दारूगोळा हे सारे उचलून रात्रीबेरात्री अनेक मैल खडतर पर्वतांत चालून मोहिमेवर जाणारे सैनिक हे बहुतांशी लवचिक, सडपातळ, सौम्यवाच, आज्ञापालक, रोखठोक आणि समूहानुकूल वर्तणुकीचे (Team player) असतात - नव्हे, असावेच लागतात.

हे गुण वारेमाप स्नायुशक्तीपेक्षा अधिक महत्वाचे असतात. स्त्रियांमध्ये ते पुरुषांइतकेच असू शकतात.

हा झाला एक मुद्दा.

यातून निघणारा दुसरा मुद्दा मात्र गोंधळात टाकणारा आहे. जर असे असेल, तर स्त्रिया सैन्यदलांत फक्त अधिकारी म्हणूनच का रुजू होतात? सैनिक, वायुसैनिक किंवा खलाशी म्हणून त्यांना अजूनही का घेतले जात नाही?

अप्पा जोगळेकर's picture

21 Jun 2016 - 2:56 pm | अप्पा जोगळेकर

मुष्टियुद्ध, कुस्त्या, तालीमबाजी यांचा अलेक्झांडरला तिटकारा होता. यातून चांगले सैनिक घडू शकणार नाहीत असे त्याला वाटे. त्यामुळे सैनिकांनी या गोष्टीत वेळ घालवू नये असे त्याला वाटे. कवायती, शस्त्रांचे प्रशिक्षण त्याला अधिक गरजेचे वाटे असे कुठेसे वाचल्याचे आठवते.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jun 2016 - 2:12 pm | llपुण्याचे पेशवेll

मुष्टियुद्ध, कुस्त्या, तालीमबाजी यांचा अलेक्झांडरला तिटकारा होता. यातून चांगले सैनिक घडू शकणार नाहीत असे त्याला वाटे. त्यामुळे सैनिकांनी या गोष्टीत वेळ घालवू नये असे त्याला वाटे. कवायती, शस्त्रांचे प्रशिक्षण त्याला अधिक गरजेचे वाटे असे कुठेसे वाचल्याचे आठवते.
पण हे सगळे करणार्‍या भारतीयांच्या सैन्याकडून म्हणूनच तो हरला असावा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jun 2016 - 5:38 am | कैलासवासी सोन्याबापु

"आई मना नात्ता पायदे आत्ता....."

"अगं माझ्या चाव्या कुठे गेल्या ग मला उशीर होतोय"

"सूनबाई तेवढी बीपीची गोळी दे पाहू"

हे मल्टीटास्किंग सहजी सांभाळणाऱ्या भारतीय नारी

"कंट्रोल धिस इज ऑस्कर 06 रेडी फॉर टेक ऑफ"

"ऑस्कर 06 इनकमिंग मिसाईल 3 ओ क्लॉक 14 किमी"

"लुसिंग इंजिन पॉवर प्रिपेरिंग फॉर इमर्जन्सी लँडिंग"

हे मल्टीटास्किंग सुद्धा अतिशय नैसर्गिक रित्या सांभाळतील हि मला खात्री आहे! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jun 2016 - 6:52 am | डॉ सुहास म्हात्रे

+१११

राजाभाउ's picture

20 Jun 2016 - 6:22 pm | राजाभाउ

+११११११
यथायोग्य प्रतिसाद.

पिलीयन रायडर's picture

20 Jun 2016 - 9:03 pm | पिलीयन रायडर

१०००% मल्टीटास्किंग भारीच करतात बायका! हे ही करणारच.. वादच नाही!

पिलीयन रायडर's picture

20 Jun 2016 - 9:03 pm | पिलीयन रायडर

१०००% मल्टीटास्किंग भारीच करतात बायका! हे ही करणारच.. वादच नाही!

अजया's picture

25 Jun 2016 - 11:31 am | अजया

खूप स्फूर्तिदायक गोष्ट आहे ही.

नाखु's picture

20 Jun 2016 - 3:18 pm | नाखु

उत्तम निर्णय (सरकारचा संबधीत विभागाचा)

हा धागा (काही प्रतिसादांच्या) खराब हवामानातून शतक स्थाळी पहोचो हीच अत्रंगी पाउसाला शुभेच्छा..

स्वगत :धागालेखकाने मिपावर नियमीत यावे तसेच महारष्ट्रात अत्रंगी नसलेल्या (आप्ल्या)भावास वेळेवर व सर्व्दूर पाठविणे.....

अर्धवटराव's picture

21 Jun 2016 - 2:09 am | अर्धवटराव

देर आए दुरुस्त आए... आपलं ५०% मानवी रिसोर्स दुय्यम वागणुकीतुन मोकळं होताना दिसताना आनंद होतोय.

शारिरीक क्षमतेच्या बाबतीत स्त्री-पुरुष सारखेच असावेत. बाय डिफॉल्ट बाहुबल आणि उंची मधे पुरुषांना थोडं झुकतं माप दिलय निसर्गाने. पण ति काहि आडकाठी नाहि. शिवाय २१वे शतक दोन हातांच्या स्नायु बळापेक्षा दोन कानांमधे असणार्‍या मेंदुबळावर चालणारं आहे. तिथे निसर्गाने काहिच उणं ठेवलं नाहि महिला आघाडीवर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jun 2016 - 6:17 am | डॉ सुहास म्हात्रे

एकाच वयाच्या स्त्री-पुरुषांची तुलना करून "स्त्रियांची शारिरिक क्षमता कमी आहे" असे विधान नेहमी केले जाते.

जेव्हा एखाद्या कामासाठी, पुरुष-स्त्री असा भेद न करता, शारिरीक-मानसिक-बौद्धीक क्षमतेच्या चाचण्यांत उत्तीर्ण झाल्यावरच (ठरवलेल्या सर्व पातळ्या पार केल्यावरच) निवड केली जाते, तेव्हा वर लिहिलेली तुलना अशास्त्रिय आणि अव्यवहार्य ठरते.

सर्वसामान्यपणे, शास्त्रिय विचार करण्याऐवजी, लहानपणापासून आपल्या मनावर जे बिंबविलेले असते त्याप्रमाणे विचार केला जातो... यात पुरुष व स्त्रिया दोन्ही तितकेच सामील असतात. शिवाय, अश्या गैरसमजामुळे ज्याला नोकरीव्यवसायात-राजकारणात-समाजात वरिष्ठ अर्थ-पद-जागा-सन्मान-मानसिकता मिळत असते, तो सहाजिकच गैरसमजाची भलावण करत राहतो किंवा त्याची शिकार बनत राहतो... व गैरसमजाला खतपाणी मिळत जाते.

म्हणूनच तर, चोखाळलेला मार्ग सोडून नवीन मार्ग / पायंडा पाडणारे नेहमीच अती-अल्पसंख्य असतात... मात्र, एकदा त्यांनी मार्ग बनवला की त्यावरून अनेकजण सहज मार्गक्रमण करतात... मग, काही दिवसांनी तो नवीन मार्ग, चोखाळलेला तार्किक महामार्ग बनतो !

हेच, या नवीन मार्ग बनविणार्‍या तीन वाघिणींच्या यशामागचे गमक व उत्तुंगत्व आहे!

स्वाती दिनेश's picture

21 Jun 2016 - 2:17 pm | स्वाती दिनेश

ही बातमी वाचून छान वाटले,
स्वाती

सौरभ कालिया वगैरे आठवले कि अशा जागी एखादी स्त्री असेल तर काय होईल असे वाटते.

झी न्युज वर या संदर्भातील बातमी बघतांना असे ऐकले की भारताने हा निर्णय ८१ वर्षे उशीराने घेतलेला आहे. गंमत म्हणजे पाकीस्ताननेही भारता अगोदर या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे असे न्युज मध्ये सांगण्यात आले.
महीला वैमानिक चे शत्रुंनी अपहरण केले किंवा शत्रु प्रदेशात त्या कारवाईदरम्यान अपघाताने त्यांच्या ताब्यात गेल्या
तर त्यांच्यासोबत काय घडेल ?
हाच कळीचा प्रश्न बहुधा हीच काळजी या निर्णयामागच्या विलंबामध्ये असावी असे प्रथमदर्शनी तरी वाटते.
युद्धकैदींसंदर्भात वागणुकीचे आंतरराष्ट्रीय जिनीव्हा करार इ.संबधित मानवाधिकाराचे नियम आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी कितपत होत असते असेल ? हा मोठा प्रश्न आहे.
आता पुरुष सैनिक कैदी जर शत्रुंकडुन पकडला गेला व त्यावर अत्याचार झाला हत्या झाली तरी तो संवेदनशील मुद्दाच असतो. जसे सौरभ कालिया सोबत झाले.
मात्र स्त्री सैनिक कैदी जर शत्रुंकडुन पकडली गेली तर प्रकरण अती तीव्रतेने संवेदनशील होण्याची शक्यता आहे.
यामागे एका परंपरागत मानसिकतेचाही प्रश्न ऐरणीवर येतो. स्त्री ही एक समाजाच्या विशेष प्रतिष्ठेची बाब समजली जाते. राजपुतांमधील "जोहार" ची परंपरा इ. यामागील "ऑनर" ची मानसिकता अधोरेखीत करतात. किंवा हरयाणा इ.त होणारे "ऑनर किलींग" हा स्त्री संदर्भातील त्या त्या समाजाचा व कुटुंबाचा "ऑनर" शी प्रतिष्ठे शी जोडलेला संबंध मानला जातो.' विशेष म्हणजे यात व्यक्तीगत त्या स्त्री च्या मताचा भुमिकेचा संबंधच नसतो. तो त्या समाज कुटुंबाचा आर्बिट्ररीली जोडलेला ऑनर असतो.
हा निर्णय निसंशय स्वागतयोग्यच आहे. मात्र आपल्याला हा निर्णय घेण्यास इतका विलंब का झाला व कुठल्या सामाजिक धार्मिक नितीच्या कल्पनांनी व जोखडांनी या निर्णयास विलंब लावला. थेट पाकीस्तानच्याही आपण मागे का पडलो ? याचा विचार करणे अभिनंदनानंतर आवश्यक आहे.
माझ्या अल्पमाहीतीप्रमाणे अजुनही पायदळात फ्रंटवर महीला तुकडीला पाठवले जात नाही. अचुक माहीती मला नाही. त्यामागेही वरील भुमिकाच असेल. आजपर्यंतचे सैन्याचे धोरण साधारणपणे महीलांना मागे मागे वा साहाय्यक अशा प्रकारच्या भुमिकेत ठेवणे असेच होते.
ज्या समितीने हा निर्णय घेतला व ज्या समितीने हा निर्णय लांबविला त्यांची यामागील काय भुमिका होती ती जर नीट कळाली तर विषयाचे अचुक आकलन कदाचित होइल. पण हा जरा कारपेटखाली ढकलललेला मुद्दा ( विचारही करावासा न वाटणारा) असा फेस न केलेला वाटतो.

अत्रन्गि पाउस's picture

22 Jun 2016 - 12:47 pm | अत्रन्गि पाउस

पाकिस्तानात आपल्या आधी फायटर प्लेन्स चालवणाऱ्या स्त्रिया आहेत ???
कमाल आहे

धनावडे's picture

24 Jun 2016 - 11:27 pm | धनावडे

हो आहेत की त्यातल्या एका महिला पायलटचा विमान
दुर्घटनेत मृत्यु झाला काही महिन्यापुर्वी

भीमराव's picture

24 Jun 2016 - 6:38 pm | भीमराव

काही वर्षांपुर्वी महाराष्ट्रात स्त्री विरुद्ध पुरुष अशी कुस्ती झाली होती जी बरोबरी मधे सोडवली गेली

सुबोध खरे's picture

24 Jun 2016 - 8:00 pm | सुबोध खरे

लष्करातील डॉक्टर म्हणून माझे दोन शब्द
एकाच वजनाच्या उंचीच्या स्त्री आणि पुरुषाच्या शारीरिक क्षमतेमध्ये नक्कीच फरक आहे. त्यामुळे जी कष्टाची कामे पुरुष सहज करू शकतात तीच कामे करण्यासाठी स्त्रियांना जास्त कष्ट घ्यावे लागतात ही वस्तुस्थिती आहे.
एक मुद्दा --आधुनिक युद्धात इतक्या शारीरिक क्षमतेची गरज पडेल/ पडते का? बहुधा नाही.
दुसरा जास्त महत्त्वाचा मुद्दा. लढाऊ विमानात अत्यंत कमी वेळात निर्णय घेऊन त्याची अंमल बजावणी करणे आवश्यक असते. उदा तुम्ही मिग २९ चालवत आहात आणि तुमच्या शत्रूकडे एफ १६ विमान आहे ही विमाने जेंव्हा समोरासमोर येतात तेंव्हा त्यांचा प्रत्येकी अगदी ९०० किमी वेग असेल तरीही मिळून वेग १८०० किमी ताशी होतो म्हणजेच दर दोन सेकंदाला एक किमी. आपल्याला आपल्या दिशेने येणारे विमान २० किमी अंतरावर रडार वर "दिसले"
तरीही त्याचा वेग दिशा आणि ते शस्त्रूचे आहे की आपले आहे हे ठरवून त्याला आपल्या रडारच्या क्षेत्रात घेणे त्यावर क्षेपणास्त्र रोखणे विमानाच्या संगणकाला आज्ञा देणे आणि हे क्षेपणास्त्र डागणे यास फक्त १० सेकंद मिळतात. (ही फारच आदर्श स्थिती आहे सर्वसाधारणपणे वैमानिकाला या निर्णयासाठी ५-६ सेकंदच मिळतात) सामान्य परिस्थितीत हा वेळ फारच कमी आहे. त्यातून एखादी वैमानिक स्त्री रजस्वला( perimenstrual ) असेल तर तिची मानसिक स्थिती जास्त दोलायमान असते( emotional lability). अशा स्थितीत स्त्रिया असे अत्यंत क्षणीकी निर्णय घेऊ शकतील का याबद्दल जगात डॉक्टर आणि शास्त्रज्ञ यांना शंका होती. त्याचे निराकरण झाले असावे म्हणून शेवटी जगात अनेक देशांनी लढाऊ वैमानिक म्हणून स्त्रियांची नियुक्ती केली आहे. यानंतरही अनेक प्रश्न अजून सुटलेले नाहीत. स्त्री गरोदर होते तेंव्हा ती कमीत कमी एक वर्ष वैमानिक या कामापुरती निकामी होते. स्त्रियांकडून प्रशिक्षण पूर्ण केल्यावर मी पुढची दोन किंवा तीन वर्षे गरोदर राहणार नाही असे लिहून घेणे हे वैयक्तिक स्वातंत्र्याच्या आड येत असल्याने लिहून घेता येत नाही. असे लिहून घेतले आणि तरीही ती स्त्री गरोदर राहिली तर तिला गर्भपात करायला भाग पाडणे हेही( वैयक्तिक स्वातंत्र्या मुळे) शक्य नाही. एक लढाऊ वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी ६-८ कोटी रुपये आज खर्च होतात. (कारण हे प्रशिक्षण आता भारतात होते). एक गरोदरपणांतून पूर्ण होऊन त्या वैमानिक स्त्रीला आपले वजन आकार आणि शारीरिक क्षमता पूर्ण मिळवेपर्यंत कमीत कमी दीड वर्ष जाते. यांनतर तिला परत रिफ्रेशर प्रशिक्षण देऊन परत पूर्ण प्रशिक्षित अवस्थेत आणण्यासाठी अजून ४-५ महिने जातात.
आजही वायुदलात "जाती"व्यवस्था फार मोठ्या प्रमाणावर आहे. यात लढाऊ वैमानिक हे उच्च जातीतले असून वाहतुकीच्या विमानाचे वैमानिक खालच्या उतरंडीवर आहेत हेलीकॉप्टरचे वैमानिक अजून खाली आणि नॅव्हीगेटर अधिक खाली आहेत. या महिला कुणाशी लग्न करणार हाही एक प्रश्न आहे. परत लग्न केल्यावर नवरा आणि बायकोला एकाच ठिकाणी "शक्यतो" नियुक्ती द्यावी हा सरकारी नियम आहे. अशा सर्व दोलायमान स्थितीत आज वायुसेना आहे. ही परिस्थिती पूर्ण स्थिरत्व येईपर्यंत हा प्रश्न पूर्ण सुटला असे म्हणता येत नाही.
राहिली गोष्ट युध्दकैदी म्हणून पकडले गेल्यावर काय होईल याचे एक भीषण उदाहरण आपल्याला सौरभ कालिया च्या रूपात पाहायला मिळालेले आहे. स्त्री (वैमानिक) जर युध्दकैदी म्हणून पकडली गेली तर तिचा वापर ISIS वाले SEX SLAVES( गुलाम वेश्या) म्हणून कसे करतात हे जग पाहत आहे. रोज ४०-५० लोक (बेशुद्ध होईस्तोवर) बलात्कार करत राहतात. आणि असे कित्येक दिवस चालते.
अशा परिस्थितीचे काय करायचे हा एक लष्करी व्यूहरचनाकारांना भेडसावणारा ज्वलंत प्रश्न आहे.
असे असंख्य पैलू आहेत. केवळ स्त्रियानी पुरुषांच्या मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात बाजी मारली म्हणून "जितं मया" म्हणून भूभू :कार करण्यात अर्थ नाही.

गामा पैलवान's picture

24 Jun 2016 - 10:37 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

तुमच्याशी अगदी शंभर टक्के सहमत. बायकांनी अशी वैमानिकेची कामं करू शकतील का हा प्रश्न नाही. त्यांना तशी करून द्यावीत का हा प्रश्न विचरला पाहिजे. वेळ पडल्यास झाशीच्या राणीने महिलांची पलटण उभारली होती. पण तो अपवाद झाला, नियम नव्हे. अशी वेळ पडलीच तर म्हणून महिलांचे राखीव दल उभारण्यात यावे. मुख्य लढाईची (उदा. : सियाचीन, काश्मीर, वगैरे) जबाबदारी देणे शक्य होईल तितपत टाळावे.

आ.न.,
-गा.पै.

मारवा's picture

25 Jun 2016 - 11:38 am | मारवा

बायकांनी अशी वैमानिकेची कामं करू शकतील का हा प्रश्न नाही. त्यांना तशी करून द्यावीत का हा प्रश्न विचरला पाहिजे.

मुख्य लढाईची (उदा. : सियाचीन, काश्मीर, वगैरे) जबाबदारी देणे शक्य होईल तितपत टाळावे.

असाच विचार आजपर्यंतच्या धोरणकर्त्यांनी आजवर केलेला होता व म्हणुनच अशी जबाबदारी देणे टाळलेले होते. आज पहील्यांदा नविन विचार झाला आहे व नविन निर्णय घेतलेला आहे.
महीलांना अशी कामे करण्यास प्रतिबंध का असावा ? त्यांना मुख्य लढाईची जबाबदारी का देऊ नये ?

पुरुष सैनिकाच्या बाबतीत जर
१- सैन्यात मुख्य लढाईत लढणे व शत्रुस हरवुन युद्ध जिंकणे ही अभिमानाची श्रेष्ठतेची व सम्माननीय बाब मानली जाते.
२- दुर्देवाने शत्रु वरचढ ठरल्यास व त्याच्या हातुन मृत्यु आल्यास ही देखील अत्यंत अभिमानाची वीरमरण येणे शहीद होणे ही देखील सन्माननीय बाब मानली जाते.
३- त्याहुन अधिक दुर्देवाची बाब शत्रुकडुन बंदी बनवले जाणे व त्याच्या छळाचा शिकार होणे वा बंदिवासात जीवण व्यतीत करणे हा मोठा त्याग धीरोदत्तपणा राष्ट्रभक्ती मानली जाते. असा छळ धीरोदत्ततेने भोगणे त्यास सामोरे जाणे हे त्या व्यक्तीच्या श्रेष्ठतेचे गमक मानले जाते. उदा. वीर सावरकर इ. नी राष्ट्रासाठी भोगलेला छळ तुरुंगवास इ. तो टाळल्यास वा तसा प्रयत्न केल्यास व त्या बदल्यात काही शत्रुशी कॉम्प्रोमाइज केल्यास ते लज्जास्पद मानले जाते.इ.
तर पुरुष सैनिकाच्या बाबतीत जे वरील ३ बाबी पुर्णपणे सन्माननीय मानल्या जातात व असे झाले तर ते एक दुर्देव जरी असले तरी त्या व्यक्तीच्या बाबतीत एक मोठी सन्माननीय बाब असते. तर
एक स्त्री सैनिक वरील तीनही प्रकारांपैकी कुठल्याही प्रकाराला सामोरी गेली तर त्यात त्या स्त्रीच्या बाबतीत ते सन्माननीयच नाही का ?
म्हणजे आपल्या राष्ट्राचा पुरुष सैनिक जे जे भोगतो ते ते स्त्री सैनिका ने भोगले
किंवा आपल्या राष्ट्राचा पुरुष सैनिक जे जे त्याग राष्ट्रासाठी करतो तो तो त्याग करण्याची तयारी स्त्री सैनिकाने दाखवली
तर तिला तसे न करु देणे यामागे काय कारण आहे ? काय विचार आहे ?
क्षमतेचा तर प्रश्नच नाही क्षमता तुमच्या मतेच असली तरीही असे करु द्यावे का असे तुम्ही म्हणता
या पुरुषाला जे करु देण्यात तुमची हरकत दिसत नाही ते स्त्री सैनिकास करु देण्यास तुमचा नेमका आक्षेप काय आहे ?
आ.न.मा.

अत्रन्गि पाउस's picture

25 Jun 2016 - 10:18 am | अत्रन्गि पाउस

डॉक्टर साहेब आपल्याच प्रतिसादाची वाट बघत होतो. नेहेमीप्रमाणे अत्यन्त संतुलित, माहितीपूर्ण आणि अभ्यासू विवेचन.
शेवटचा परिच्छेद अस्वस्थ करणारा आणि अतिशय पटणारा !

गामा पैलवान's picture

25 Jun 2016 - 12:40 pm | गामा पैलवान

मारवा,

>> या पुरुषाला जे करु देण्यात तुमची हरकत दिसत नाही ते स्त्री सैनिकास करु देण्यास तुमचा नेमका आक्षेप काय आहे ?

याचं एक उत्तर खरे डॉक्टरांनी अगोदर दिलंच आहे. परत सांगतो. आयसिससारख्या दहशतवाद्यांच्या हातात आपल्या सैनिक बायका पडल्या, तर त्यांना सैनिकाचा गौरवशाली मृत्यू येणार नाहीये. त्यांची वेश्याबाजारात विक्री होईल. आयसिसला वेश्याविक्रीची संधी उपलब्ध करून द्यावी का?

दुसरं म्हणजे सैनिक स्त्रीस मुले होऊ देऊ नयेत. आईचा मृत्यू आणि बापाचा मृत्यू यांत महदंतर असतं. आई नसल्याने लहान मुलाची जी हानी होते ती कशानेही भरून निघंत नाही. आपण काय गमावतोय हेही त्या लहानग्याला कळंत नसतं. अशा प्रसंगी एखाद्या आईला मुद्दाम रणांगणावर लोटण्यात काय अर्थ आहे?

आ.न.,
-गा.पै.

एखादा पुरुष सैनिक रणांगणावर पाठविला जातो तेव्हा तो
विजयी होइल
विरगतीला प्राप्त होइल
विटंबित होइल ( शत्रुकडुन कैद झाल्यावर अनेक प्रकारे संभाव्य )
या तिन्ही शक्यता गृहीत धरलेल्याच असतात. यात त्याची क्षमता व या पैकी कशालाही सामोरे जाण्याची तयारी गृहीतच असते.
शिवाय नेहमीच विरगती वा विटंबनाच होइल असे नाही. विजयाच्या विश्वासानेच सैनिक रणावर पाठवला जातो व दुर्देवाने झालेच तर विरगती वा विटंबने ला सामोरे जाण्याचे त्यात धैर्य आहे एक डिग्नीटी आहे देशासाठीचा त्याग आहे हे ही गृहीतच असते.
मग पुरुष सैनिक जसा जर समर्थ असेल तयार असेल व त्याची राष्ट्रसेवा करण्याची स्वबलिदान करण्याची तयारी असेल तर
त्याला जी देशसेवा करण्याची संधी दिली जाते.
त्याच देशसेवेच्या संधीची मागणी जर पुरुष सैनिकप्रमाणेच समर्थ व तयारी दाखवलेल्या स्त्री सैनिकाने (गर्भवती नसलेल्या ) केली तर ती का नाकारली जावी ? कुठल्या आधारावर ?
असाही नविन महीला पायलटांना किमान चार वर्ष गर्भधारणा टाळण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. आणि त्या तो पाळतील अशीच शक्यता जास्त आहे.
मी असे गृहीत धरत आहे की देशसेवा देशासाठी समर्पण करण्याची मागणी करणारी स्त्री सैनिक गर्भवती नाही. तर मग
तिला ही संधी का नाकारण्यात यावी ?
पुरुष सैनिका प्रमाणे स्त्री सैनिका ला देशसेवेची समान संधी ( ज्यात समान धोके अंतर्भुत आहेत ) का नाकारली जावी ?
आ.न.मा.

अनुप ढेरे's picture

25 Jun 2016 - 3:29 pm | अनुप ढेरे

प्रिसाइजली. स्त्रीया हा निर्णय स्वतः घेऊ शकतीलच की. फायदे, धोके लक्षात घेऊन. त्यांच्या वतीने बाकिच्यांनी का घ्यावा हा निर्णय.

स्त्री-पुरुष समानता प्रामाणिकतेने मान्य असेल तर स्त्री सैनिकाला पुरुष सैनिकाप्रमाणे संधी देण्यात काहीच अडचण नको.
स्त्री/पुरुष रणात विजयी झाले तर दोन्ही शौर्यपदकास पात्र होतील. त्यांच्या स्त्री/पुरुष शौर्य कथा समाजास प्रेरणा देतील.
स्त्री/पुरुष रणात विरगतीस प्राप्त झाले तर त्यांच्या विरगतीचा सन्मान होइल. त्यांचे बलिदान समाजास प्रेरणा देईल.
स्त्री/पुरुष शत्रु कडुन कैद होउन विटंबीत झाले तर निर्भत्सना शत्रुच्या अयोग्य वागणुकीची होइल मात्र ते जर धीरोदत्तपणे विटंबनेला सामोरे गेले तर त्यांचा त्याग समाजास प्रेरणा देईल.
स्त्री व पुरुष यांच्या विटंबनेत दोन्ही समान बळी आहेत दोन्ही समान सहानुभुतीस पात्र आहेत. दोघांच्या विटंबनेत फरक नाही.
ज्या व्यक्तीच्या विचारात नजरेत स्त्री पुरुष समान आहेत त्यात काहीच अडचण नाही. मात्र जर
१-स्त्री ही पुरुषापेक्षा इनफेरीयर आहे, कमी क्षमतेची आहे असा समज असेल.
२-स्त्री ही समाजाचा एक ऑनर आहे. पुरुष पकडला जाण्यापेक्षा स्त्री चे पकडले जाणे (शत्रुकडुन) हा "ऑनर"च्या कल्पनेतुन
लज्जास्पद प्रकार आहे असे वाटत असेल.
३-स्त्री ला प्रोटेक्ट करणे हे समाजाच्या पुरुषाचे नैतिक कर्त्यव्य आहे कारण तो जन्मजात यात सक्षम अधिक ताकदीचा आहे व स्त्री ही मुळात कमकुवत आहे व तिला संरक्षणाची गरज आहे.
४- पुरुष जेव्हा स्त्री ला पुढे करतो तेव्हा तो कमकुवत आहे त्यात दम नाही स्त्री ने रणात पुढे लढणे व पुरुषाने मागुन सहाय्यक असणे हे पुरुषाच्या अभिमानाला धक्का लावते असे वाटत असेल
अशी भुमिका असेल तर मात्र वरील स्त्री सैनिकाच्या पुढे असण्यात फायटर असण्याला विरोध होतो.

सुबोध खरे's picture

25 Jun 2016 - 7:41 pm | सुबोध खरे

मारवा साहेब
आपण म्हणता तशी स्त्री पुरुष समानता ही आदर्श परिस्थिती आहे. प्रत्यक्ष परिस्थिती अशी असेल असे नाही.
आजही कितीही समानता वादी माणूस असेल तरीही तो आपल्या मुलीला अपरात्री बाहेर पाठवत नाही ही वस्तुस्थिती आहे.
लष्करी व्यूहरचनाकारांना आदर्श नव्हे तर प्रत्यक्ष परिस्थिती गृहीत धरावी लागते. उद्या दहशतवाद्यानविरुद्ध लढाई साठी त्यांनी स्त्री सैनिक पाठवले आणि दहशतवाद्यांनी त्यांना ओलीस धरून बलात्कार केला( सूड घेण्यासाठी) आणि ठार न मारता अगदी "सोडून" दिले तर देशभर लष्करी अधिकाऱ्यांच्या तोंडात शेण घातले जाईल. त्यांना स्त्रीपुरुष समानते साठी कोणीही पारितोषिक देणार नाही.
त्यामुळे आज जरी लढाऊ वैमानिक म्हणून स्त्रियांना परवानगी मिळाली असेल तरीही उद्या शत्रूच्या गोटात खोलवर हल्ला DPS (DEEP PENETRATION STRIKE) करायची पाळी आली तर या वैमानिकांना पाठ्वण्या अगोदर लष्करी तज्ज्ञांना चार वेळेस विचार करायला लागेल ही वस्तुस्थिती आहेच.
आरामखुर्चीतील विचारवंत(आदर्श) आणि लष्करी डावपेच तज्ज्ञ( वास्तव) यात हा फरक राहणारच.

उद्या दहशतवाद्यानविरुद्ध लढाई साठी त्यांनी स्त्री सैनिक पाठवले आणि दहशतवाद्यांनी त्यांना ओलीस धरून बलात्कार केला( सूड घेण्यासाठी) आणि ठार न मारता अगदी "सोडून" दिले तर देशभर लष्करी अधिकाऱ्यांच्या तोंडात शेण घातले जाईल

असे समजा झालेच गृहीत धरु या ही बातमी आज आली तर तुम्ही यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या तोंडात शेण घालणार का ?
जर हो तर तुम्ही काय कारण द्याल ? म्हणजे काय मुद्द्यावर तुम्ही त्यांना जबाबदार धरणार ? काय अपेक्षा तुम्ही करता ?
तुम्ही त्यांना काय म्हणणार ?

सुबोध खरे's picture

27 Jun 2016 - 10:26 am | सुबोध खरे

मारवा साहेब
तुम्ही एअर ऑफिसर कमांडिंग आहेत आणि पाकिस्तानच्या सरगोधा बेसवरील अणुक्षेपणास्त्रे नष्ट करण्यासाठी हल्ला करायला जग्वार विमाने पाठवायची आहेत. यात १० % शक्यता विमाने पडली जातील अशी आहे.
तुमच्या कडे १६ विमाने आहेत आणि ३२ वैमानिक ज्यातील ४ स्त्रिया आहेत अशा वेळेस तुम्ही स्त्री वैमानिकांना पाठवाल की पुरुष?
केवळ समानता म्हणून पुरुषांबरोबर स्त्रियांना पाठवाल का?

पण पण.. स्त्रियांनी जाण्याची इच्छा दर्शविली तर? (जी इच्छा त्यांच्या स्वेच्छेने ही खडतर करियर स्वीकारण्याच्या निर्णयात ऑलरेडी अंतर्भूत आहे असं मानायला हरकत नाही.)

आणि कधीतरी खुद्द "एअर ऑफिसर कमांडिंग" ही निर्णय घेणारी व्यक्तीच स्त्री असावी यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे असं नाही वाटत? की तसं व्यवस्थेला नको वाटत असेल?

उदा. म. फुल्यांनी / सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण/ हक्क देण्याबाबत सुरुवात केली त्या प्रतिकूल संघर्षपूर्ण काळात "हे सर्व बोलायला ठीक आहे, पण तुमच्या मुलीला तुम्ही वेळ आल्यास सावित्रीबाईंच्या शाळेत घालाल का? ती जास्त शिकली तर तिचं लग्न होईल का?" असे प्रश्न विचारले गेलेच असतील ना?

तिथे एकट्या सावित्रीबाई आणि एकेकटे आगरकर , एकेकटे कर्वे उभे राहिले. इथे सरकार आणि हवाईदल उभं राहिलंय.

अभिनंदन, अभिमान आणि सॅल्यूट टू गर्ल पॉवर..!!

मारवा's picture

27 Jun 2016 - 1:14 pm | मारवा

जर वरील परीस्थीती आहे समजा आणि मला निर्णय स्वातंत्र्य आहे तर नक्कीच १०० % मी स्त्री वैमानिकांना च पाठवेल.
याच कारण असे की आजपर्यंत पुरुषांना अनेक वेळा संधि मिळाली होती आहे व मिळेल. मात्र या निमीत्ताने एक उदाहरण प्रस्थापित होणार असेल एक संधी उपलब्ध होणार असेल तर नक्कीच स्त्री वैमानिकाला आवर्जुन पाठवलेच पाहीजे.
दुसर अस की त्याने एक उदाहरण प्रस्थापित होइल. पुढच्या वेळेस मग जेव्हा स्त्री वैमानिक पाठवायची असेल तेव्हा शंकांना धास्तींना पुर्णविराम बसुन एक त्यांच्या कार्यक्षमते विषयी विश्वास निर्माण होइल. म्हणून
१- आवर्जुन अशी संधी स्त्री वैमानिकांना मिळण गरजेच अत्यावश्यक आहे.
२- त्यानंतर निर्माण झालेलं उत्तम उदाहरण भविष्यकालीन स्त्रीयांचा मार्ग प्रशस्त करेल.
आपली घटना आपले सर्वांचे शिक्षण आपला विवेक आपल्याकडुन या समानतेची न्यायाची अपेक्षा करते.

गामा पैलवान's picture

27 Jun 2016 - 11:46 am | गामा पैलवान

गवि,

कार्योचित्य (suitability for job) नावाचा प्रकार आहेच ना? स्त्रिया आघाडीच्या कामासाठी सुयोग्य नाहीत. लढाई करू शकतील. अगदी पुरुषांपेक्षाही उत्तम लढाई करतील. पण इतर पर्याय उपलब्ध असतांना तशी ती करू द्यावी का, असा प्रश्न आहे.

आज भारतीय सैन्यात स्त्रियांना अतिशय मानाने वागवलं जातं. मेजवानीच्या प्रसंगी सर्वोच्च सेनाधिकारी सुद्धा साध्या सैनिकाच्या बायकोला अधिक मान आणि आदर मिळावा म्हणून प्रयत्नशील असतो. बायकांना ही खास वागणूक कशासाठी? माझ्या मते बायकांना ही खास वागणूक मिळण्याचा आणि त्यांना प्रत्यक्ष युद्धावर न पाठविण्याचा हेतू एकंच आहे.

आ.न.,
-गा.पै.

गवि's picture

27 Jun 2016 - 12:04 pm | गवि

कार्योचित्य (suitability for job) नावाचा प्रकार आहेच ना? स्त्रिया आघाडीच्या कामासाठी सुयोग्य नाहीत. लढाई करू शकतील. अगदी पुरुषांपेक्षाही उत्तम लढाई करतील. पण इतर पर्याय उपलब्ध असतांना तशी ती करू द्यावी का, असा प्रश्न आहे.

संधी द्या. जोखीम आणि परिणाम त्यांना जोखू द्या ठरवू द्या. क्षमता सिद्ध करुन दाखविण्याची केवळ संधी द्या. सर्वांप्रमाणेच त्यांनाही. खास औदार्य म्हणून नव्हे.

संधी द्या हे व्यवस्थेला उद्देशून आहे. फायटर पायलट बनण्याची संधी दिली गेलीच आहे. व्यवस्था बदलते आहे. आता या प्रशिक्षित स्त्रियांनी प्रत्यक्ष युद्धवेळ आल्यास परिस्थितीला थेट तोंड देऊन सिद्ध करावं यात आनंद वाटेल. तिथे सवलत घेतल्यास खेद वाटेल.

सुबोध खरे's picture

27 Jun 2016 - 12:06 pm | सुबोध खरे

गवि
स्त्रियांनी जायची इच्छा दाखवणे हा एक भाग झाला. आणि ते योग्य सुद्धा आहे. स्त्रियांना लढाऊ विमानात वैमानिक होण्यासाठी कोणतीच आडकाठी नसावी असे माझे वैयक्तिक मत आहे.
परंतु दुर्दैवाने प्रत्त्येक पुरुषाची मनोवृत्ती अशी नाही आणि लष्करी डावपेच तज्ञांना ज्यांना उत्तर द्यायचे आहे तेही लोक तितक्या खुल्या मनाचे असतील असे नाही. कागदोपत्री समानता छान आहे.
एखाद्या वैमानिक महिलेला एखाद्या मिशन वर पाठवले असताना तेथे न्हाणीघर किंवा शौचालय असेलच असे नाही. किंवा तंबूत राहायचा प्रसंग येतो अशावेळेस तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी हा एक मोठा कठीण विषय असू शकतो.
अधिकाऱ्यांचे स्नानघर
मी विक्रांतवर असताना न्हाणीघराला फक्त प्लास्टिकचा पडदा होता. एखादा पुरुष अधिकारी जर महिला अधिकारी नहात असताना "चुकून" पडदा सारून आत आला तर? ही "चूक" चुकून झाली की नाही हे सिद्ध करणे किंवा ती तशी चुकूनच झाली आहे हेही सिद्ध करणे कठीण आहे.
३०,००० सैनिकांमध्ये माझी वर्गमैत्रिण श्रीलंकेत एकटी स्त्री वैद्यकीय अधिकारी होती. तंबूत राहणे. कॅनव्हॉसच्या तंबूतच तिच्यासाठी न्हाणीघर तयार केलेले होते. त्याला अर्थात कुठे ही कुलूप घालणे शक्य नसे. चारी बाजूला पहार्यावर असलेले पुरुष सैनिकच होते. एखादा अविचारी किंवा नैराश्य (desparate वर frustrated) आलेला सैनिक रात्री तंबूत घुसेल काय या भीतीने तिला रात्र रात्र नीट झोप लागत नसे. साधे सॅनिटरी नॅपकिन आणण्यासाठी बाजारात जाताना तिला तीन गस्ती सैनिक घेऊन जायला लागायचे.
अख्ख्या ब्रिगेडला "माहिती" होत असे की डॉक्टर मॅडमची "पाळी" चालू आहे.
यात तसे लपवण्यासारखे काही नसले तरी जगजाहीर होण्यासारखी लाजिरवाणी परिस्थिती नाही.
ब्रिगेड कमांडरचे डोके सुद्धा तिची परत भारतात बदली होईपर्यंत शांत झाले नव्हते. कारण युद्धमान स्थितीत असलेले सैनिक कसे वागतील याचा कधी भरवसा देता येत नाही.
नौदलाच्या जहाजावर स्त्रियांना पाठ्वण्यात आले तेंव्हा काही विचित्र प्रसंग उद्भवले होते. काही पुरुष अधिकारी मेसमध्ये निळा चित्रपट पाहत असताना दोन स्त्री अधिकारी तेथे आल्या आणि त्यांनी आम्हाला पण हा चित्रपट आताच पाहायला मिळाला पाहिजे अशी मागणी केली. पण एक पुरुष अधिकाऱ्याने "आपली" सीडी काढून खिशात टाकली. त्यावर त्या स्त्रियांनी आम्हाला महिला म्हणून वेगळे वागवले जाते याबद्दल लेखी तक्रार केली. त्यांना तुम्ही तुमची सीडी आणा असे सांगून ते प्रकरण मिटवण्यात आले.
प्रत्येक जहाजावर स्त्रियांसाठी वेगळे न्हाणीघर/ शौचालय नाही. तसे बांधणे आता शक्य नाही.
परंतु लष्करी कायद्यात काही कलमे अशी आहेत की ज्याची नक्की व्याख्या करता येत नाही. उदा व्हायोलेशन ऑफ गुड ऑर्डर अँड मिलिटरी डिसिप्लिन.
अशा वेळेस नक्की काय करायचे हा फार कठीण प्रश्न असतो.
यासाठीच नेहमी २ + २ = ४ होतातच असे नाही.

परंतु दुर्दैवाने प्रत्त्येक पुरुषाची मनोवृत्ती अशी नाही आणि लष्करी डावपेच तज्ञांना ज्यांना उत्तर द्यायचे आहे तेही लोक तितक्या खुल्या मनाचे असतील असे नाही. कागदोपत्री समानता छान आहे.
एखाद्या वैमानिक महिलेला एखाद्या मिशन वर पाठवले असताना तेथे न्हाणीघर किंवा शौचालय असेलच असे नाही.

श्रीलंकेत एकटी स्त्री वैद्यकीय अधिकारी होती.

एखादीच स्त्री आहे सध्या, म्हणून यातले बहुतांश प्रॉब्लेम्स आहेत. बहुतांश पुरुष आहेत म्हणून एक विशिष्ट मनोवृत्ती रुढ आहे. बहुतांश पुरुष आहेत म्हणून एकटीला टॉयलेट नाहीये.. बहुतांश पुरुष आहेत म्हणून एकटीच्या सॅनिटरी नॅपकिन्सची चर्चा आहे. बहुतांश पुरुष आहेत म्हणून समानता कागदोपत्री वाटते आहे.

वुई गॉट टु ब्रेक द व्हिशियस सर्कल टु मेक इट चेंज.

एकटीच महिला इथपासून भरपूर महिला असा बदल होईपर्यंत हा संघर्ष अटळ आहे. पहिल्या गिर्यारोहकाला दोरीशिवाय कपारीत बोटं खोचत जावं लागतं. नंतर वहिवाट तयार होते. त्यासाठी पूर्ण जबाबदारी त्यांना देणं आवश्यक आहे असं म्हणणं आहे.

मारवा's picture

27 Jun 2016 - 1:48 pm | मारवा

यात तसे लपवण्यासारखे काही नसले तरी जगजाहीर होण्यासारखी लाजिरवाणी परिस्थिती नाही.

पाळी विषयी लपवण्यासारखे काही नाही व आवर्जुन जाहीर करण्यासारखीही काही बाब नाही. अगदी त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर विचार केल्यास कुणाला पडलच माहीती कोणाला तर त्यातही लाजिरवाणं काही नाही.
मात्र तरीही ते लाजिरवाणं वाटत यात ज्यांना वाटत त्यांच्या मर्यादेचा प्रश्न आहे. पाळी येणे ही अत्यंत सर्वसाधारण बाब आहे. त्याकडे बघण्याचा सहज दृष्टीकोण आपल्याकडे अजुन नाही याचा साधा अर्थ आपल्या समाजाला अजुन लांबचा पल्ला गाठायचा आहे. अनेक स्त्री वाद्यांनी पाळीकडे बघण्याचा दृष्टीकोण सहज करण्यासाठी ( पावित्र्य वा अपावित्र्य इ. च्या पलीकडे एक साधं बायोलॉजिकल फॅक्ट या अर्थाने ) आवर्जुन प्रयत्न केलेले आहेत करत आहेत. आणि यात लाजिरवाण वाटण्यासारखं काही नाही हे माझ्यापेक्षा एक डॉक्टर म्हणून आपण अधिक उत्तम तर्हेने समजावु शकतात.

परंतु दुर्दैवाने प्रत्त्येक पुरुषाची मनोवृत्ती अशी नाही आणि लष्करी डावपेच तज्ञांना ज्यांना उत्तर द्यायचे आहे तेही लोक तितक्या खुल्या मनाचे असतील असे नाही. कागदोपत्री समानता छान आहे.

ते तितक्या खुल्या मनाचे नाहीत हीच अडचण आहे आणि नेमकी याच अडचणींवर मात करायची आहे व ती करायची असेल तर त्यांची मने खुली करण्यासाठी अनुकुल परीस्थीती व अनुकुल उदाहरणे व अनुकुल प्रचार करणे गरजेचे आहे. उदा. आज हा पाकीस्तान नंतर उशीरा का होइना हा निर्णय घेऊन हा प्रयत्न केलेलाच आहे असेच एक एक पाऊल उचलावे लागेल.
थाउजंड माइल्स जर्नी बिगीन्स वुइथ वन स्टेप
गवि म्हणतात तसे आज मोजकी उदाहरणे आहेत म्हणून अडचणी आहेत. जेव्हा सावित्रीबाई फुले उदा काही वर्षापुर्वी शाळेत शिकवत होत्या तेव्हा कदाचित स्त्री-शिक्षीका संपुर्ण महाराष्ट्रात एकच एक असावी. मात्र त्यांनी एकदा सर्व शेण इ. झेलुन सुरुवात केली ( जशी तुम्ही भीती व्यक्त केली सध्याच्या केसमध्ये लोक शेण घालतील) तसे त्यांनी प्रत्यक्षात भोगले. त्याचा काय परीणाम झाला ?
तुम्ही बघतच आहात महाराष्ट्रातच याच राज्यात याच ठीकाणी काही दशकांपुर्वी जिथे एकच स्त्री-शिक्षीकेने सुरुवात झाली
आता आज महाराष्ट्रात किती स्त्री-शिक्षीका शाळांत अभिमानाने निर्भयतेने आनंदाने शिकवत आहेत ? काही लाख तरी असतील. कारण कालांतराने एकेक जोडत अनेक उदाहरणे झाली अनेक पिढ्या झाल्या व काल अगदीच अशक्य भयंकर वाटणारी बाब सर्वसामान्य झाली.
अगदी त्याच सावित्रीबाइंप्रमाणे आज तीनच महीला फायटर पायलट आहेत निरनिराळे प्रश्न आहेत तीन मधील काही प्रत्यक्षात लढतील शौर्यपदके मिळवतील तिन कडुन प्रेरीत होउन पुढच्या तीन लाख येतील.यात युटोपिया नाही हे सावित्रीबाइंसारख वास्तवात येणार.
मिनीस्ट्री ऑफ डिफेन्स ने या फायटर पायलट संदर्भात जो प्रेस रीलीज दिला होता त्यात असे म्हटले आहे
“Since their induction into the transport and helicopter streams of the IAF, their performance has been praiseworthy and at par with male counterparts. Inducting women into the fighter stream would provide them with an equal opportunity to prove their mettle in combat roles as well,” the statement said.
विशेष म्हणजे बरोबर मागच्याच वर्षी ज्या एयर चीफ मार्शल राहा यांनी फायटर पायलट स्त्रीयांच्या क्षमतेविषयी जी शंका या शब्दात व्यक्त केलेली होती
“As far as flying fighter planes is concerned, it is a very challenging job. Women are by nature not physically suited for flying fighter planes for long hours, especially when they are pregnant or have other health problems,”
त्याच एयर चीफ मार्शल यांच्या ही विचारात परीवर्तन सकारात्मक परीवर्तन झालेले दिसुन येते. त्यांनी पुर्वीच्या विधाना विरोधात आता असे म्हटलेले आहे.
Earlier this month, Air Chief Marshal Arup Raha said, "We have women pilots flying transport aircraft and helicopters. We are now planning to induct them into the fighter stream to meet the aspirations of young women in India."
असे विचार हळुहळु बदलत असतात. दृष्टीकोण बदलत असतात. मी एक पुरुष आहे माझ्याही मनात नेणीवेत कुठेतरी अजुन खोलवर मलाही न जाणवणारा स्त्री विरोधी दृष्टीकोण दडलेला असेल कदाचित. त्यासाठी सतत स्व-परीक्षण करत राहण गरजेच आहे. व स्वतःच्या चुकीच्या विचारांना सुधारणे व त्यात सुसंगती आणत राहणे ही मी माझी व्यक्तीगत जबाबदारी समजतो.

पाकीस्तानची स्त्री फायटर पायलट आयेशा फारुक युद्धासाठी सज्ज आहे.
http://www.dnaindia.com/world/report-i-m-ready-for-war-says-first-female...
पाकीस्तानची दुसरी एक फायटर पायलट मरीयम मुख्तियार चा ऑन ड्युटी एका अपघातात मृत्यु झाला. तिला एका शहीद सैनिकाप्रमाणे सन्मान मिळाला. कराचीच्या फैजल एयर बेस वर लष्करी इतमामात तिच्या स्त्री-पुरुष सहकार्‍यांकडुन तिला सन्मानाने अंतिम निरोप दिला गेला. ती केवळ २३ वर्षांची होती.
http://blogs.wsj.com/indiarealtime/2015/11/26/pakistani-female-fighter-p...
पाकीस्तानने २००६ पासुन दहा वर्षांपुर्वीच स्त्री फायटर पायलट ना सैन्यात सामील करणे सुरु केले.