ओवेसीचे भाषणातील बोल आणि संविधान कोड

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in काथ्याकूट
17 Mar 2016 - 5:00 pm
गाभा: 

निवडणुका जवळ आल्या की अल्पसंक्यांच्या मतांसाठी नेहमीप्रमाणे परवा भाषणात तो YZ ओवेसी " मी भारतमाता की जय बोलणार नाही" तेव्हा माझ्यावर कोणी सक्ती करु नका. आणि आमदार वारिस पठाण यांनी याची री ओढली आणि मला कोणीतरी संविधानात "भारत माता की जय" बोलण्यासाठी तसे कोणते कलम असेल तर सांगा असे काहीसे बरळला. आता यावर राष्ट्रवादीवाले सगळे तोंडात मुग गिळुन गप्प बसले आहेत आणि एक शिवसेना सोडली तर कोणीही विरोध दर्शविलेला नाहीये.

तर जाणकार लोकांनी प्रकाश टाकावी की खरेच असे बोलण्यास काही संविधानात्मक कोड किंवा घटनेमध्ये अशी काही तरतूद आहे काय ज्याद्वारे "भारतमाता की जय" म्हणणे , "जन गण मन" किंवा "वंदे मातरम" चालु असताना आहे त्याच जागेवर सावधान स्थितीत उभे राहाणे हे पाळणे बंधन कारक आहे.

डिस्क्लेमरः- वरिल माहिती ही फक्त माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर जे काही २/४ दिवसात प्रसारमाध्यमांद्वारे चालु आहे ते ऐकुन पाहुन लिहला आहे. कोणताही विदा मागु नये. संपादक मंडळास काहीही आक्षेपार्ह आढळल्यास लेख काढुन टाकावा.

प्रतिक्रिया

माहितगार's picture

17 Mar 2016 - 5:14 pm | माहितगार

List of Fundamental Duties: Art. 51A, Part IVA of the Indian Constitution, specifies the list of fundamental duties of the citizens. It says “it shall be the duty of every citizen of India:

to abide by the constitution and respect its ideal and institutions;
to cherish and follow the noble ideals which inspired our national struggle for freedom;
to uphold and protect the sovereignty, unity and integrity of India;
to defend the country and render national service when called upon to do so;
to promote harmony and the spirit of common brotherhood amongst all the people of India transcending religious, linguistic and regional diversities, to renounce practices derogatory to the dignity of women;
to value and preserve the rich heritage of our composite culture;
to protect and improve the natural environment including forests, lakes, rivers, and wild-life and to have compassion for living creatures;
to develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform;
to safeguard public property and to abjure violence;
to strive towards excellence in all spheres of individual and collective activity, so that the nation constantly rises to higher levels of endeavor and achievement. Further, one more Fundamental duty has been added to the Indian Constitution by 86th Amendment of the constitution in 2002.
who is a parent or guardian , to provide opportunities for education to his child, or as the case may be, ward between the age of six and fourteen years.

संदर्भ

माहितगार's picture

17 Mar 2016 - 5:17 pm | माहितगार
प्रसाद गोडबोले's picture

17 Mar 2016 - 5:23 pm | प्रसाद गोडबोले

थोडक्यात सांगायचे तर " भारत माता की जय" असे म्हणा/ म्हणलेच पाहिजे असे संविधानात कोठेही लिहिलेले नाहीये , शिवाय वन्दे मातरम तर सरळ सरळ हिंदुत्ववादी गीत आहे आणि म्हणुनच हे म्हणण्याची कोणावरही सक्ती करता येणार नाही केली तर ती संविधानिक नसेल आणि कोर्ट ऑफ लॉ मध्ये तुम्ही केस हराल हे निश्चित !!!

माहितगार's picture

17 Mar 2016 - 5:25 pm | माहितगार

हिंदुत्ववादी गीत

ज्यात हिंदू देवतांचा रुपक म्हणून वापर केलेले असते ते सर्व हिंदूत्ववादी असते का ?

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 5:27 pm | नाना स्कॉच

गीत हिंदुत्ववादी नाहीये पण ते गात्यावेळी पाळावे असे कोड्स पण कुठेच उपलब्ध नाहियेत

विकास's picture

17 Mar 2016 - 7:46 pm | विकास

Rajendra Prasad, who was presiding the Constituent Assembly on 24 January 1950, made the following statement which was also adopted as the final decision on the issue:

...The composition consisting of words and music known as Jana Gana Mana is the National Anthem of India, subject to such alterations as the Government may authorise as occasion arises, and the song Vande Mataram, which has played a historic part in the struggle for Indian freedom, shall be honoured equally with Jana Gana Mana and shall have equal status with it. (Applause) I hope this will satisfy members.

—Constituent Assembly of India, Vol. XII, 24-1-1950

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 8:06 pm | नाना स्कॉच

पण मग सद्धया अस्तित्वात असणाऱ्या फ्लॅग कोड मधे हा उल्लेख नाहीये का?? नसल्यास का नाही? असल्यास माझे वाचन कमी आहे हे मान्य करून मी आपणाला ह्या संबंधी विदा द्यावा ही विनंती करतो, जेणेकरुन मला माझा अभ्यास ते वाचुन वाढवत नेता येईल. :)

विकास's picture

17 Mar 2016 - 8:23 pm | विकास

इथे काय स्पुन फिडींग करत बसायचे आहे का? आणि बाकीच्यांनी काही अभ्यास न करता पिंक टाकत बसायचे?

वर दिलेल्या राष्ट्रपतींनी काय म्हणले आहे? "The composition consisting of the words and music known as Jana Gana Mana is the National Anthem of India, subject to such alterations in the words as the Government may authorise as occasion arises; " त्यामुळे फ्लॅग कोड मधे नॅशनल अँथम म्हणून समजले जाते. पण जेंव्हा वंदे मातरम् म्हणले जाईल तेंव्हा त्याला देखील, "which has played a historic part in the struggle for Indian freedom, shall be honoured equally with Jana Gana Mana and shall have equal status with it." थोडक्यात समान मान दिला जाईल असे म्हणले आहे. त्यामुळे कोणाला राष्ट्रगीत म्हणून म्हणायची सक्ती कदाचीत नसेल पण त्या गीताचा अपमान करण्याचा हक्क देखील नाही कारण त्याचा दर्जा राष्ट्रगीता इतकाच आहे... असो.

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 8:39 pm | नाना स्कॉच

इथे काय स्पुन फिडींग करत बसायचे आहे का? आणि बाकीच्यांनी काही अभ्यास न करता पिंक टाकत बसायचे?

ज्ञान वाटल्याने वाढते असे वाडवडील सांगुन गेलेत, असो. तुच्छता न दाखवता अधिक्षेप न करता समजवले असते आपण तर आदर वाटला असता तुमच्याबद्दल, पण तुम्ही आमची एक इमेज तयार करुन त्या आधारावर घृणा करताय इतके नोंदवतो. असो.

अजुनही काही प्रश्न होते खरे, पण आता स्वतःचा अजुन अपमान करवुन घेत विचारायची इच्छा नाही, धन्यवाद. :)

प्रसाद गोडबोले's picture

17 Mar 2016 - 5:29 pm | प्रसाद गोडबोले

ज्यात हिंदू देवतांचा रुपक म्हणून वापर केलेले असते ते सर्व हिंदूत्ववादी असते का ?

हिंदुत्ववादी नसेलही कदाचित पण "शिर्क" असते हे निश्चित .

माहितगार's picture

17 Mar 2016 - 11:35 pm | माहितगार

:) शिर्क ? चंद्र, पृथ्वी - देशांची सिमा दर्शवल्यावर तयार होणारी चित्रे, झेंडे- , सूर्य, बार्बी डॉल सारखी लहान मुलांची खेळणी, प्रत्येक ऑब्जेक्ट, अक्षरे -कॅलीग्रफी-, शब्द, कागद, पुस्तके, प्रार्थना स्थळे या निर्जीव गोष्टी, माणसाची मेमरी, माणसाचे इमॅजीनेशन-अमूर्तातून जाणवणारे मूर्त-, प्रेषित आणि इश्वराची नावे दिलेली पण आदर्शांना न उतरणारी माणसे, कशाची उदाहरणे आहेत ? बरेच लिहिण्यासारखे असावे असो.

एकदा नकारात्मक बाजूनेच पहायचे ठरवल्यावर कशातही काहीही शोधता येते. मग सौदी अरेबीयाच्या राष्ट्रगीतातील 'मावतनी', 'मावतनी' ऐकताना/म्हणताना मा शब्द सुद्ध खुपायला लागेल, सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येच्या इंडोनेशीयन राष्ट्रगीतातही ibuku
म्हणजे मातृदेश म्हणून देशाला आईच्याच रुपात पाहून तिची सेवा (स्काऊट) करण्यासाठी सांगीतले आहे तेही खुपावयास हवे. (बहुधा इजिप्तच्या राष्ट्रगीतातही 'माता' अर्थाचा शब्द येतो त्यांच्या राष्ट्रगीतात 'देशासाठी त्याग' म्हटले आहे म्हणजे इश्वरा शिवाय देशासाठीसुद्धा राष्ट्रगीतातून त्याग करता येऊ शकतो की) फक्त इश्वरच पवित्र असेल आणि बाकी काहीच पवित्र नसेल तर एखादा देश पवित्र (पाक) कसा काय असू शकतो पाक हा शब्द देशासाठी वापरणे चालते? त्यांच्या राष्ट्रगीतात 'साया यी खुदा...' हे शब्द शेवटच्या ओळीत येतात ज्याची मुर्ती नाही त्याची सावली कशी पडते ? काहीच नाहीतर आईच्या पायापाशी स्वर्ग कसा असू शकतो एवढा तर प्रश्न नक्कीच विचारता येईल

कसल्याच काव्यात्मक तुलना रुपके न वापरता अरेबिक, फार्सी, उर्दू, भाषा गद्यस्वरुपातही जिवंत आहेत का ? कवि वंदे मातरम तर कविताच आहे, देशाला फादर लँड समजणार्‍या देशात असतातर वडीलांना आदरस्थानी कल्पून त्याने कविता लिहिली असती, पहिल्या कडव्यात कि जे काँग्रेसने राष्ट्रभक्तीपर स्विकारले त्यात आईस वंदन करतो तसे वंदन म्हणजे आदर या पलिकडे काय आहे ? 'हम बुलबुले है उसकी' मध्ये 'बुलबुले' काय आहे रुपकच आहे ना ते वाच्यार्थाने घ्यावयाचे का रुपकार्थाने, वंदे मातरमची उर्वरीत कडवी ध्येय वेड्या कविची 'जे न देखे रवि' स्वरुपातली कडवीच आहेत, कवि स्वधर्मातील सर्व कर्मकांडे अडथळे सर्व दूरकरुन माता रुपी देशाला पुन्हा एकदा दुर्गेच्या म्हणजे सर्वशक्तीमान स्वरुपात बघु इच्छितो. अर्थात उर्वरीत कडवी निर्गुण निराकार मंडळींना पटलीच पाहीजेत असे नाही, इस्लाम ज्या आई-बापाकडून संगोपन होते त्यांच्याची कृतज्ञ राहण्यासच सांगतो, ज्या देशात तुमच्या मागच्या किमान नव्वद पिढ्या आणि पुढच्या किती जातील हे माहित नाही त्या देशातील अन्न पाणि ग्रहण करताना मातीवर आसरा घेताना कृतज्ञतेची आदराची काही भावना नको का ? इतरांनी लिहिलेली देशपर गितांपेक्षा अधिक चांगली देशपर गिते तुम्ही स्वतः लिहा आणि म्हणा एक्सक्युजेस कसली देताय ? (अर्थात हे सर्व कुणालाही व्यक्तिश: उद्देशून अथवा दुखावण्यासाठी लिहिलेले नाही, ह.घ्या चुभूदेघे.)

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 11:41 pm | तर्राट जोकर

ज्या देशात तुमच्या मागच्या किमान नव्वद पिढ्या आणि पुढच्या किती जातील हे माहित नाही त्या देशातील अन्न पाणि ग्रहण करताना मातीवर आसरा घेताना कृतज्ञतेची आदराची काही भावना नको का

>> अशी भावना नाही आहे असे कोणी व कसे ठरवले?

ज्यांच्यात असते त्यांचे दिसते आणि त्या बद्दल मुळीच तक्रार नाही, केवळ मुस्लिम म्हणून नव्हे रबिंद्रनाथ टागोरांसारखे हिंदूधर्मप्रेमी (ज्यांची राष्ट्रवादाची व्याख्या म्हणे ओवेसी सोईस्कर तेवढी स्विकारु पहात आहेत) सुद्धा स्वदेशहीताची सुविहीत काळजी घेणारी राष्ट्र हि संकल्पना बाजूस सारुन -अद्याप फारशी प्रगती न झालेल्या- डायरेक्ट वसुधैव कुटूंबकम च्या गप्पा मारतात.

(आपण विचारलात तसा प्रश्न येऊ नये म्हणून टागोर आणि सावरकर या विषयाचा सर्वात आधी धागा मीच काढला पण अभ्यासू तर्कसुसंगतेचे वावडे ठेऊन डायरेक्ट एकमेकांशी शब्दफैरी मारण्याची हौसेतच आनंद घेतला जातो तेव्हा विचाराची समतोल एवजी मर्यादीत बाजुच दिसेल नाही का?)

हवे तर हे दूरचे सोडा याच धागा लेखाच्या प्रतिसादातील काकासाहेब चिमणरावांचा प्रतिसाद कशाचे लक्षण आहे ?

तर्राट जोकर's picture

18 Mar 2016 - 1:39 am | तर्राट जोकर

सर, तुमचे अवजड शब्द, तर्क मला काही समजत नाहीत, तेवढी माझी ग्रहणशक्ती आणि प्रोसेसींग कॅपेसिटी नाही.

मी फक्त एवढेच विचारले तेही आपल्याच प्रतिसादाच्या अनुषंगाने की भावना नको का असा प्रश्न आपण विचारला ह्याचा अर्थ भावना नाही असे आपल्याला वाटले, ती असावी असे वाटले म्हणून आपण हा प्रश्न विचारला असे मला वाटले. साहजिक आहे भावना नाही असे आपल्याला का व कोणत्या आधारावर वाटले हा प्रश्न येईलच.

बाकी, ओवेसीसारख्या लोकांना खुपसटं काढायला निमित्त लागतात. ओवेसी काय किंवा आदित्यनाथ, तोगडिय सगळे दुसर्‍या धर्माची भीती घालून धृवीकरण करण्याच्या मागे आहेत. ते कुराणाचा हवाला देणं फुल्ल फेकूगिरी आहे. पाकिस्तानमधे जाऊन ज्यापद्धतीने त्याने भारतीय मुस्लिमांचे प्रतिनिधित्व केले तो ओवेसी भारताचा, या भूमीचा, इथल्या लोकांचा मान ठेवत नाही, ती आपली मानत नाही असे म्हनायचे का? केवळ तो भारतमाताकीजय म्हणनार नाही ह्या त्याच्या वक्तव्यावर आधारुन काही उतावळे देशभक्त त्याला देशद्रोही सिद्ध करायला तुटून पडलेत, तर वक्तव्यच आधार घ्यायचे असेल तर मग पाकिस्तानातले त्याचे भाषण हा त्याच्या देशावरच्या प्रेमाचा पुरावा का समजू नये? देशभक्ती म्हणजे नेमकं काय हा प्रश्न उभा राहतो.

माहितगार's picture

18 Mar 2016 - 1:45 pm | माहितगार

...भावना नाही असे आपल्याला का व कोणत्या आधारावर वाटले हा प्रश्न येईलच....

चांगला प्रश्न आहे, कलकत्त्यातील एका मदरस्यात राष्ट्रध्वज आणि 'जन गण मन' हे राष्ट्रगीत म्हणू इच्छिणार्‍या सुधारणावादी मुख्याध्यापक काझी मासूम अख्तर या नावाने गूगल सर्च देऊन तो कोण कोणत्या छळाला सामोरे गेला आहे ते पहा. देशभरातील बाकी मदरस्यांबद्दल या पेक्षा वेगळी स्थिती असेल हे सिद्ध करुन माझा मुद्दा खोटा पाडल्यास खूप आनंदीत होईन.

प्रतिक सन्मानाचे महत्व

'पॅन' हा शब्द लावून कम्युनीझम असो हिंदूत्व असो अथवा इस्लामीझम असो आधी वैश्विकतेची भलावण करून मग राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेस प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष वेळोवेळी नाकारले जात असते. वैश्विकतेची भलावण करण्यात वैश्विकतेकडे जाण्यात वावगे काही नाही पण या 'पॅन' वाल्यांना बाकी विवीधतेचे वावडे असते म्हणजे वैश्विकरणाच्या कम्युनीस्टांच्या संकल्पनेत नॉन कम्युनीस्ट बसत नसतात, तसेच पॅनइस्लामवादी संकल्पना असते ज्यांच्या वैश्विकरणाच्या संकल्पनेत नॉन इस्लामीक बसत नसतात, पॅनख्रिश्चनीकांचेही प्रकार असतात त्यात हा जोवाह विटनेस प्रकार अभ्यासावा -जगातील सर्व राष्ट्रांची सरकारे त्यांच्यासाठी सैतानच असतात- असेच इतर पॅन वाल्यांचेही असते, आपापल्या पॅन वाल्या भूमिकेत आपण इतर विवीधतेला बसवत नाही आपण फक्त संकुचित भूमिकेवर चालतो हे बहुधा दडवले जाते, इतरांकडून शांतता, सहिष्णूतेची, मानवाधिकारांची अपेक्षा करतात स्वतः सहिष्णूता मानवाधिकार अहिंसा गुंडाळून ठेवतात (टागोरांसारखा अपवाद असला तरी ओवेसी सारखे त्यांचा सोईस्कर तेवढाच विचार उचलतात-आपण भूमिकेचा कोणता भाग लपवून ठेवत आहोत हे सहज सांगत नाहीत)
त्यापुर्वी राष्ट्रा राष्ट्रातील स्थानिक जनतेच्या हितांची काळजी घेऊन विवीधतेसहीत विश्वाचे एकत्रिकरण हे ह्या लोकांच्या गावीही नसते, इराक, सिरीया, इजिप्त यांच्या एकत्रिकरणाचा प्रयत्न १९६०च्याच दशकात फसला, उर्वरीत अरब राष्ट्रांनी अथवा इस्लामिक राष्ट्रांनी राजकीय दृष्ट्या एकत्र होण्याचे कोणतेही यश संपादन केले नाही, जे लोकनियुक्त सरकारांना जमले नाही आणि जेव्हा केव्हा वैश्विकरणाची जी काही प्रगती करावयाची आहे ती लोकनियुक्त सरकारांनी करावयाची असते हे लक्षात न घेता संकुचीत फंडामेंटलीस्ट विचारांच्या संघटना स्थापन करून ज्या कोणत्या राष्ट्रात असतात तेथे अतीरेकी स्वरुपाच्या विचार आणि कृतींना प्रोत्साहन देत असतात, मग संबंधीत देशाची राष्ट्रगीते ध्वज इत्यादी प्रतिके यांच्या डोळ्यात खुपतात, प्रतिक हननाने नुकसान नाही पण त्यामागे असलेली संकुचित आणि वेळ प्रसंगी इतर विचारांच्या लोकांना मारु इच्छिणार्‍या अतिरेकी विचारप्रणाली चिंतेचा विषय असतात म्हणून राष्ट्रगीत आणि ध्वज या प्रतिकांच्या सन्मानाचे महत्व वाढते.

...भावना नाही असे आपल्याला का व कोणत्या आधारावर वाटले हा प्रश्न येईलच....

आता उर्वरीत आशंकीत भावना माझी स्वतःची नाही पण इतरांची असल्यास तुमच्याच वाक्यात जरासा बदल करुन, त्यांना विश्वास देण्याची गरज समजून घ्यावयास हवी, एका विशीष्ट समुहाच्या अल्प लोकांनी १९४७ मध्ये देशाची फाळणी देशभर हिंसकतेची (डायरेक्ट अ‍ॅक्शनची) करुन घेतली हि जखम बहुसंख्यांकांच्या काळजावर असणे सहाजिक आहे, जेव्हा त्या समुहाच्या उर्वरीत लोकांना सामावून घेतले जात आहे तेव्हा ते खरोखरच राष्ट्राच्या मुख्यप्रवाहात आहेत का अशी आशंका बहुसंख्यांकातील काही गटांना असू शकते, त्यात वर म्हटल्या पश्चिम बंगाल मधल्या मदरसेचे उदाहरण दिले तसे अनुभव स्थानिक लोकांना येत असू शकतात, ज्यांना राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज सन्मानास हरकत नाही त्यांनी राष्ट्रीय एकत्मतेसाठी, परस्पर विश्वास वृद्धींगत करण्यासाठी पुढाकार घेऊन आपली देशाप्रेमाच्या भावनेचा कृतीतून परीचय करुन देण्याची आणि आपल्या समुहातील समुदायातील गल्लीतील लोकांना देशप्रेमाच्या संस्कृतीच्या धाग्यात बांधून घेण्याची अपेक्षा रास्त असू शकते किंवा कसे

माहितगार's picture

17 Mar 2016 - 5:42 pm | माहितगार

कोर्ट ऑफ लॉ मध्ये तुम्ही केस हराल हे निश्चित !!!

बरोबर आहे पण शिक्षणाने कायदा अभ्यासक असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भारताची घटना व्यवस्थीत माहित असणार, त्यांच्यापुढे पुढच्या निवडणूकीत कोर्ट ऑफ पब्लिक मध्ये एका धर्मांध पक्षाच्या प्रतिनिधीला हरवण्यासाठीचे चॅलेंजचे धनुष्य त्यांनी यशस्वीपणे झेलले. कायदा मंडळातल्या अंतर्गत कारभारात कोर्ट ऑफ लॉ सहज हस्तक्षेप करत नाही, या निमीत्ताने कदाचित कोर्ट ऑफ लॉ ला आपली पोझीशन पुन्हा तपासून निर्देश जारी करावे लागतील तो पर्यंत सध्याचे आधिवेशन संपलेले असेल आणि भविष्यातील राजकीय बाजी भाजपाने मारलेली असेल. तसेही या दबावांच्या माध्यमातून जय हिंद म्हणायला लागले हे ही नसे थोडके. जय हिंद न म्हटल्यास सध्या मुस्लिम तरुण वर्ग सुद्धा मुस्लिम धार्मीक पक्षांपासून दुरावेल त्यामुळे ती जोखीम ते घेत नसावेत असेही शक्य आहे. नाहीतर हिंद शब्दातही अर्धा हिंदू शब्द आहेच की, हिंदूस्थान शब्द वापरण्यास चालतोच न या लोकांना कारण त्यांच्याच पुर्वजांनी तयार केला तो शब्द.

प्रचेतस's picture

17 Mar 2016 - 5:18 pm | प्रचेतस

ओह्ह नो.
नॉट अगेन. दर्दुकाका यु टु?

प्रमोद देर्देकर's picture

18 Mar 2016 - 10:18 am | प्रमोद देर्देकर

दु दु वल्लीचाचा. मी लहान आहे हो वल्लीचाचा अजुन तुमच्या पेक्षा.

माहितगार's picture

17 Mar 2016 - 5:24 pm | माहितगार

Whenever the Anthem is sung or played, the audience shall stand to attention. However, when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem.

संदर्भ

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 5:26 pm | नाना स्कॉच

"भारतमाता की जय" म्हणणे , "जन गण मन" किंवा "वंदे मातरम" चालु असताना आहे त्याच जागेवर सावधान स्थितीत उभे राहाणे हे पाळणे बंधन कारक आहे.

तीनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत एकीचा दूसरीशी संबंध नाही, जन गण मन साठी "फ्लॅग कोड" आहे जो गृह मंत्रालयाच्या संस्थळावर उपलब्ध आहे, वंदेमातरम् साठी तसा काही कोड असल्याच ऐकिवात अन वाचण्यात नाही अन भारत माता की जय म्हणलेच पाहिजे असे काहीच नाहीये!!.

आधीही इतर जागी बोललोय, ओवैसी कायदेशीर बोलतो त्याला जिंगोइस्टिक प्रतिसाद देऊन अथवा टिका करून उपयोग नाही , मुद्द्याला मुद्द्याने कापणे गरजेचे आहे

विकास's picture

18 Mar 2016 - 12:55 am | विकास

केवळ संदर्भ म्हणून वरील प्रतिसादाच "सुयोग्य" भाग(च) खाली चिकटवत आहे... ;)

"The composition consisting of the words and music known as Jana Gana Mana is the National Anthem of India, subject to such alterations in the words as the Government may authorise as occasion arises; " त्यामुळे फ्लॅग कोड मधे नॅशनल अँथम म्हणून समजले जाते. पण जेंव्हा वंदे मातरम् म्हणले जाईल तेंव्हा त्याला देखील, "which has played a historic part in the struggle for Indian freedom, shall be honoured equally with Jana Gana Mana and shall have equal status with it." थोडक्यात समान मान दिला जाईल असे म्हणले आहे. त्यामुळे कोणाला राष्ट्रगीत म्हणून म्हणायची सक्ती कदाचीत नसेल पण त्या गीताचा अपमान करण्याचा हक्क देखील नाही कारण त्याचा दर्जा राष्ट्रगीता इतकाच आहे... असो.

नाना स्कॉच's picture

18 Mar 2016 - 5:18 am | नाना स्कॉच

.

टवाळ कार्टा's picture

17 Mar 2016 - 7:36 pm | टवाळ कार्टा

एखादी गोष्ट कायदेशीररित्या बरोबर असेल तर ती तार्कीकदृष्ट्या बरोबरच असते का?

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 7:58 pm | नाना स्कॉच

तर्काच्या लेयर्स असतात कांद्यासारख्या! शुद्ध तर्क कोणालाच पचत नाही कारण आपल्या डोक्यातल्या संकल्पना केंद्रस्थानी मानुन आपण त्याच्या भोवती तर्क फिरवत असतो, कारण तर्काची मातब्बरी मोठी, आपण आपल्या संकल्पना तर्कात फिट करून त्यांना एक मान्यता मिळवायच्या मागे लागलेलो असतो, ह्याला कोणीच अपवाद नाही, शास्त्रज्ञ नाही, राजकारणी नाही, समाजशास्त्री नाही, कायदा नाही का तुम्ही आम्ही कोणीच नाही, अपवाद असते तर वादविवादाचे शास्त्र विकसित झाले नसते, कारण त्याला काहीच कार्यकारणभाव उरला नसता.

हेआमचे वैयक्तिक मत आहे

फ़क्त आपण देतोय तो तर्क हा नैसर्गिक तर्काच्या किती जवळ जातोय ते पहायचे , अन जो तर्क नैसर्गिक तर्काच्या जास्तीत जास्त जवळ जाईल तो खरा हे मानायचा मोठेपणा दाखवावा असे मात्र मनापासून वाटते

टवाळ कार्टा's picture

17 Mar 2016 - 8:30 pm | टवाळ कार्टा

मराठीत लिवा की जरा :)

सुंदर प्रतिसाद!!! मला काहीच कळत नाही असा आव आणून एवढा अर्थपुर्ण प्रतिसाद दिलात..

गरिब चिमणा's picture

17 Mar 2016 - 8:02 pm | गरिब चिमणा

सर्व शक्तीमान अल्लाह शिवाय कुणाचाही जयजयकार करायची व कुणासमोरही झुकायची परवानगी कुराण ए शरीफ देत नाही,त्यामुळे जनाब असोद्दीन ओवेसी यांच्या त्या वक्तव्यात काहीही गैर नाही.

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 8:08 pm | नाना स्कॉच

मालक ! नका नादी लागु ते तुमच्या सारख्या काँग्रेसी लोकांस बी बडवतंय बरंका!! पुढे मर्जी तुमची!! :D

DEADPOOL's picture

17 Mar 2016 - 9:03 pm | DEADPOOL

जंत झाले का बरे?
"मांजरीचे"

आपल्या आईवडिलांच्या पाया पडणं व त्यांसमोर झुकायची
परवानगी कुराण ए शरीफ देत का?

होबासराव's picture

18 Mar 2016 - 7:23 pm | होबासराव

जंत झाले का बरे?
"मांजरीचे"

अश नाय कलायच डेड्पुल भौ.. तो प्लश्न आमिच विचारनार ;)

मोगा जंत झाले का बरे?
"मांजरीचे"

मितभाषी's picture

28 Mar 2016 - 2:11 pm | मितभाषी

ऐवजी 'जंत मेले का? असे पाहीजे ना?

माहितगार's picture

17 Mar 2016 - 9:29 pm | माहितगार

सर्व शक्तीमान अल्लाह शिवाय कुणाचाही जयजयकार करायची व कुणासमोरही झुकायची परवानगी कुराण ए शरीफ देत नाही,त्यामुळे जनाब असोद्दीन ओवेसी यांच्या त्या वक्तव्यात काहीही गैर नाही.

@ गरिब चिमणा,
१) यांचे पुर्वज आणि मध्यपुर्वेतील समकालीन सत्तेपुढे सुलतान आणि बादशहांसमोर हे शरीराने वचनाने नाहीतरी मनाने झुकत नव्हते का काय ? २) झिया उल हक मुशर्रफसारखी मंडळी आमेरीकेपुढे मनाने झुकतच होती आणि आजही त्यांचे लष्करप्रमुख आमेरीकेपुढे झुकतातच ना ? ३) मनाने हुकुमशहांपुढे यांच्या विवीध देशातील मंडळी झुकुनच असतात ना ? ४) मुल्ला मौलवींपुढे फतवेगिरी पुढे मनाने झुकूनच असतात ना ?

५) कुणापुढे झुकले म्हणजे त्याचा देवच झाला हा शोध आपण कुठून लावला ? व्यक्ति सत्तेपुढे शहाणपण नको म्हणूनही झुकू शकते अथवा आदरानेही झुकू शकते पण त्याचा अर्थ समोरच्याचा देव केला असाच होतो असा नियम नाही किंवा कसे
६) जय जय कार करणे म्हणजे झुकणे अथवा समोरच्याचा देवच केला जातो हा शोध तुम्ही कुठूनशीक लावला ?

७) सर्वात महत्वाचे तुमच्याच हिशेबाने 'जय हिंद' म्हणणे स्विकारुन ओवेसी गैर(?)कृत्य करत आहेत का ?

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 9:51 pm | नाना स्कॉच

काय हो चिमणा साहेब,

सिजदा अन पैबोस ह्या प्रथेअंतर्गत दरबारी मानकरी लोकांस जमीनीवर लोटांगण घेऊन बादशाह सलामतचे पायचे चुंबन घ्यायची रीत सुरु करणारा "गियासुद्दीन बलबन" हा मुसलमान नव्हता काय???

"ज़िल ए इलाही" उर्फ़ जमिनीवरची अल्लाहची छाया असे टाइटल स्वतःला लावुन घेणारा बादशाह कोण होता??

टवाळ कार्टा's picture

28 Mar 2016 - 2:18 pm | टवाळ कार्टा

१) यांचे पुर्वज आणि मध्यपुर्वेतील समकालीन सत्तेपुढे सुलतान आणि बादशहांसमोर हे शरीराने वचनाने नाहीतरी मनाने झुकत नव्हते का काय ? २) झिया उल हक मुशर्रफसारखी मंडळी आमेरीकेपुढे मनाने झुकतच होती आणि आजही त्यांचे लष्करप्रमुख आमेरीकेपुढे झुकतातच ना ? ३) मनाने हुकुमशहांपुढे यांच्या विवीध देशातील मंडळी झुकुनच असतात ना ? ४) मुल्ला मौलवींपुढे फतवेगिरी पुढे मनाने झुकूनच असतात ना ?

झुकल्यावर तोंड कोणत्या बाजूला असायचे वरच्या सगळ्यांचे??? =))

अर्धवटराव's picture

17 Mar 2016 - 11:36 pm | अर्धवटराव

.

श्रीगुरुजी's picture

17 Mar 2016 - 8:16 pm | श्रीगुरुजी

भाजप सरकारने सभागृहात कोणी भारतमाता की जय म्हणतोय का नाही यावर दिवसभर चर्चा करून पूर्ण दिवस वाया घालविण्यापेक्षा काहीतरी भरीव काम करावे. मुळात जी गोष्ट घटनेने सक्तीची केलेली नाही ती इतरांनी केली नाही या विषयावर पूर्ण दिवस घालविण्यासारखे काय आहे हेच मला समजलेले नाही.

तर्राट जोकर's picture

17 Mar 2016 - 8:37 pm | तर्राट जोकर

तसे झाले तर काम करायला लागेल, उत्तरे द्यायला लागतील. त्यापेक्षा गोंधळ माजलेला बरा अस्तुया. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो.

पम्या, कुठे नादी लागताय त्या ओवेसीच्या. घटनेमधे बरेच काही लीहीले नाहीय.
संडासातून बाहेर आल्यावर हात धुवावे असे घटनेमधे लीहीले नाहीय. म्हणून आपण हात धुवायचे थांबणार का.
त्ये चिखलावर काटी मारत बसलंय, मारुदे त्याला. आला कटाळा की जाइल उटून...

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 8:51 pm | नाना स्कॉच

संडासातून बाहेर आल्यावर हात धुवावे असे घटनेमधे लीहीले नाहीय. म्हणून आपण हात धुवायचे थांबणार का.

अक्षरशः कैच्याकै

नाना स्कॉच's picture

17 Mar 2016 - 8:58 pm | नाना स्कॉच

to develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform;

शौचमार्जन झाल्यावर हात धुतल्याने आरोग्य अबाधित राहते अन रोगराई पसरत नाही हे ज्ञान वरती अधोरेखित केलेल्या "फंडामेंटल ड्यूटीज" मधे उल्लेखलेल्या "scientific temper" मधे बसेल काय???

;) :D

खटपट्या's picture

18 Mar 2016 - 3:09 am | खटपट्या

ह. घ्या हो नाना...:)

सलाम घ्या नानासाहेब :D

मी. ओवेसी हे भारत अम्मा कु सलाम म्हटले तरी आम्हास चालेल!
हाकानाका !!!

हुया आवशीचा खबू खाजमी व्हनार, माहा सबूद हाय,

एक प्रश्न आहे...उपरोधिक नाही..
भारतीय नागरिकाने आयकर भरावा हे संविधानाच्या कुठल्या कलमात स्पष्ट होतं?

जाणकारांनी माहिती द्यावी. ते कलम लिहिल्यास उत्तम ...

नाखु's picture

18 Mar 2016 - 10:46 am | नाखु

तू गप्राव्,इथं काय म्हणणं सक्तीचं आहे आणि काय न म्हणण सक्तीचं आहे यावर काथ्याकुट चाल्लाय आणि तू आयकर घेऊऊन बसलायस असहिष्णु कुठचा !!!

पाहिजे तर माझ्या शेजारी बस २-४ जागा राखून ठेवल्यातच.(येतान बुड्ढीके बाल घेऊन ये तरच मी माझ्या कडच्या शेंगा तूला देईन)

आसन क्र १०१५ नाखु

जागेवर रुमाल टाकून ठेवा काका..आलोच..
बुड्धीके बालचा रंग गुलाबीच्या ऐवजी भगवा चालेल का ? संविधानात तसं काही लिहिलं नाहीये ना

नाखु's picture

18 Mar 2016 - 11:51 am | नाखु

रंग कुठलाही असू दे पुढच पुढं बघू

चिनार's picture

18 Mar 2016 - 11:57 am | चिनार

पुढचा रंग पिवळा असणार हे नक्की !! :-)

नाना स्कॉच's picture

18 Mar 2016 - 12:08 pm | नाना स्कॉच

पण हे ही उपरोधिक वगैरे नव्हते असे आपण म्हणाल का?

नाना स्कॉच's picture

18 Mar 2016 - 11:21 am | नाना स्कॉच

ह्या लिंक मधे आपल्याला आपण बघु इच्छित असलेली सगळी माहीती मिळेल

-नाना

चिनार's picture

18 Mar 2016 - 11:24 am | चिनार

धन्यवाद नाना भाऊ

माहितगार's picture

18 Mar 2016 - 1:49 pm | माहितगार

आवडले

* लांबलचक दुवा जशाच्या तसा कॉपीपेस्ट करण्या पेक्षा लिंक जोडणे बरे पडले असते का

The scene opens with a panoramic visual of India and its colourful landscape. Occasionally, as Nehru reached a gathering, a great roar of welcome would greet him-‘Bharat Mata-Ki Jai’! He would ask the crowd what they meant by that cry, Who was this ‘Bharat Mata’, whose victory they wanted? Then not knowing how to answer, they would look at each other. At last a vigorous jat, wedded to the soil from immemorial generations, said that it was the dharti (the good earth) of India that they meant. What earth was it? Their particular village patch, or all the patches in the district or province, or in the whole of India? Nehru would then try to explain that India was all that they had thought and much more. The mountains, the rivers, the forests, and the broad fields which gave them food, but what counted ultimately was the people like themselves. Bharat Mata was essentially these millions of people, and victory to her meant victory to these people.

Travelling by train, the landscape and the landmarks flash past his eyes. Nehru wanders over to the Himalayas and sees the mighty rivers- the remote Brahmaputra, the Yamuna, and Ganga – that flow from the great mountain barrier into the plains of the country, from there, to the sea. India unfolds with its waterfall and rivulets and seas, with her richness of life and its renunciation, of growth and decay, of birth and death.

He visits old monuments at Ajanta, Ellora and the Elephanta caves. He sees the buildings of Agra and Delhi which tell the story of India’s past. At Sarnath, near Banaras, he could almost hear the Buddha’s first sermon. The inscriptions on the Ashoka Pillar of stone speaks to him. At Fatehpur-Sikri, he almost hears Akbar converse with the learned of all faiths. Slowly, the long panorama of India’s history unfolds itself before him with its triumphs and tragedies. To him, there is something unique about the continuity of a cultural tradition through 5,000 years of an unbroken history. Indian people feel pride and a special sensation when they say- "Bharat Mata Ki Jai".

ही वाक्ये आहेत डिस्कव्हरी ऑफ इंडिया च्या ईपिसोडमधल्या मधल्या पं नेहरुंची. जनतेने नेहरुजींचे स्वागत करताना जेव्हा भारत माता की जय चा जयघोष केला तेव्हा भारत माता की जय म्हणजे काय सांगताना नेहरुजी हे म्हणाले होते.

ओवैसी , वारिस पठाण यांना घटनेने राखीव जागा दिल्या तर ह्व्याच आहेत पण भारत माता की जय म्हणायचे तए श्वास अडकतो.