माकां वाटातां विसाव्या शतकातल्या पूर्वार्धातली ही परिस्थिती असूक होयी.कोकणातून मुंबईक नोकरीसाठी जाणार्या चाकरमान्याबद्दल कोकणातल्या इतरांका त्यावेळी चाकारमान्यांचो थोडो कमीपणाच वाटायचो.
सावतांची शेती असताना,तेतूर चांगली कमाई होत असताना तेंच्या बबानाक मुंबईक जाऊन गिरणीत चाकरमान्याचा काम करण्यात काय विशेष वाटतां?उलट हेकां दळभद्रीपणाचां लक्षण म्हणूक होयां मां. कोकणी माणूस बबनसारख्या त्या चाकरमान्याची अप्रत्यक्षपणांन अवहेलनाच करीत होतो.
जग बदलत चालला हां.बदल होऊक होयो.हेच्यामधून आपली उर्जितावस्था होतली. असां त्यावेळचे ते गावकरी मानुक तयार नव्हते.
"सावतांचो बबनो मुंबयक जातासां म्हणे.मेल्याक कसली अवदसा सुचली कोण जाणे. हंय वाडवडीलांची एव्हडी मिळकत आसां.थंय मुंबयत जाओन कबुतरांच्या घुराड्यासारख्या चाळी्तल्या खोलीत हो दिवस काढतलो.फाट-फाटे चपाती-भाजीचो डबो घेवून गिरणीत चाकरमानी म्हणून कामावर जातलो.काय म्हणे तर महिन्या अखेर नगद पैसो हातात मिळता.
ह्याकां अवलक्षण म्हणुचां नाय तर काय?"
सावतांच्या बबन्याची चर्चा असो,नायतर आणि कुणाची अशीच चर्चा असो, गावकरी पूर्वसाच्या किंवा रामेश्वराच्या देवळाच्या आवारात किंवा वडाच्या चौथर्यावर बसून शिळोपातल्यो गप्पांचो विषय म्हणून चर्वीचरण करण्यात मश्गूल रव्हंत.
"कामतांच्या मंदाक मुंबईत दिला म्हणे.
नाबरांचो झील दादरच्या पोस्टात कामाक आसां.
हल्लीच तो मंदाक बघून गेलो.पसंत केल्यान.
येत्या मे महिन्यात मंदा बोटीन मुंबईक जाताला."
गावकरी अशी मंदाची चर्चा करूक लागले.
पूर्वी होकाल(नवरी) कोकणातून मुंबईक जाताना बंदरावरून पडावातून जाऊन आगबोटीत बसायची. पोचवूंक जाणारो तिचो बाप तेकां बंदरावर म्हणायचो,
"बाये गो माझ्या! पडावातून आगबोटीत चढताना जरा जपान
मंदा नव्या इरकली नववारी लुगडा नेसून,नाकात नथ,गळ्यात चंद्र- हार आणि मंगळसूत्र,हातात गोट, पाटल्यो,पायाच्या बोटांत वेढणां,आणि पायात करकरीत नवीन जुतां घालून तयार.
आणि बापूस,डोक्यात काळी टोपी,सफेद सदरो आणि ब्लेजरचो कोट,खाली परीट घडीचा धोतार आणि पायात कोल्हापूरी जुतां घालून बंदरावर जावच्या तयारीत असायचो.
बापाचो हो उपदेश ऐकून कवी म्हणतां,
"गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान"
(चाल:- गो चेडवाsss, पडावाssतून आगबोटीत जपाssन
घो तुझो र्हवतां शिमीटाच्याss चाळीत
रातपाळी करून घरी इल्यावर
दिवसा-ढवळ्या असतोलो झोपान
गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान"
आता मुंबईतून अमेरिकेत जाणारी आधूनीक मंदा( होकाल),मोटारीतून उतरून विमानात जाऊन बसतां. मंदाचो पेहराव आधूनीक आसां.
वरती स्लीव्हलेस टॉप,खाली जीन प्यॅंट,पायात नायकीचे शूज,खांद्यावर मगरीच्या कातड्याची पर्स,डोक्याची बॉयकटाची भाबरी,गळो उघडो आणि हातात आयफोन अशा तयारीत मंदा. आणि वरून बोडको,अंगात थ्री-पीस सुट,पायात मखमली बूट,मिशीक किशोर कुमार कट अशा तयारीत बापूस आसां.
चेडवाक पोचवूक जाणारो मंदाचो बापूस तेकां विमान तळावर काय म्हणतलो तां कवीच्या भाषेत,
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
घो तुझो र्हंवतां बॉस्टनच्या चाळीत
गाडी शिवाय तेचां हलूचा नाय पान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
थैसरल्या जीवनात मोटारsच साधान
सीटबेल्ट लावून बस चांगला पसरान
पायी,पायी चालूचा आता जा विसरान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
हाटेलात गेलंस मगे फास्ट फूड खाशीत
हॉटडॉग,बरगर तू सपाटून चापशीत
वजन तुझा वाढतालाच, म्हणून जा समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
थंय सगळे असतले कामात अडकान
वेळ नाय जाणा म्हणून म्हणशीत बोलान
गजाली मारूक थंय, कोणच नाय आयच्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
घो गेलो सकाळी की येतोलो रातच्यान
दिवसभर टिव्ही बघून तू जातलंस कंटाळान
मग म्हणशीत कंटाळलंय नको ह्या जीवान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
शनिवार-आय्तवार ये मग फिरान
घो तुका नेतलो मॉल बघूक अलिशान
देशाची श्रीमंती, बघ उघड्या डोळ्यान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
शेवटचा सांगतंय नीट घे ऐकान
लवकरात लवकर जा होऊन पोटाच्यान
वेळ जावचां साधन! असां घे समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
प्रतिक्रिया
21 Feb 2016 - 4:48 am | अजया
:)
छान आहे लेख.
21 Feb 2016 - 7:32 am | राही
चांगला आहे लेख, पण असे कोंकणच्या बोलींतले लेख वाचताना असे दिसू लागलेय की या सर्व बोली लिखित स्वरूपात येताना मराठी नवीन शुद्धलेखनाचे संस्कार घेऊन येतायत आणि त्यामुळे त्यांचा वेगळेपणा लोप पावतो आहे. त्या मराठीळलेल्या वाटताहेत. साठसत्तर वर्षांपूर्वी कोंकण प्रांतातील बोलींचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्पष्टोच्चारित अनुस्वार हे होते. यामुळे कोंकणीत नपुंसक लिंग स्पष्ट होई. आता मात्र तसे होत नाही. उदा. वरच्या लेखातले एक वाक्य : वजन तुझा वाढतला. ह्यामध्ये वजन हा शब्द पुंलिंगी आहे असा मराठी भाषकांना भास होतो. पण तेच जर 'वजन तुजां वाढतलां' लिहिले तर बोलीचा वेगळेपणा कळेल. माकां तुकां हे उच्चारित अनुस्वार जयवंत दळवींच्या लिखाणात दिसतात.
केवळ कोंकणी बोलीच नव्हेत तर अलीकडे बॉलिवुड्च्या हिंदीवरही हा अनुस्वार-उच्चार-लोपाचा मराठी प्रभाव जाणवतो. पूर्वी 'आप आयीं थीं' असे स्पष्ट अनुस्वार असायचे. आज बॉलिवुडी हिंदीत अनुस्वारच गेले असे नव्हे तर स्वरांचा दीर्घोच्चारसुद्धा कमी होतोय. म्हणजे हे वाक्य 'आप आयि थि' असे उच्चारले जातेय. मुंबईत साकी नाका हा शब्द मराठी रिक्शावाले 'सकिनाका' (सगळे उच्चार अल्प दीर्घ) तर उत्तरी रिक्शावाले साsकीsनाsकाs असे प्रदीर्घ करतात.
पठारी मराठी 'हामी हो रही है'!
21 Feb 2016 - 12:16 pm | सस्नेह
लेख मजेदार आहे. कोकणीची सानुनासिकता उतरली असती तर आणि मजा आली असती !
21 Feb 2016 - 8:14 am | यशोधरा
लेख आवडला.
21 Feb 2016 - 8:53 am | एस
आणि मंदा बापाला म्हणेल, 'शटअप डॅड!'; -) आजकाल काय खरां नाय! लेख आवडूक. (सूडने दुर्लक्ष करणे. हंयसर भाषा शिकू रायलो. :-) )
21 Feb 2016 - 9:49 am | जेपी
लेख आवडलो आसा..
21 Feb 2016 - 11:39 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं लिवलं आसां ! काव्याने अजून मजा आणली :)
हाटेलात गेलंस मगे फास्ट फूड खाशीत
हॉटडॉग,बरगर तू सपाटून चापशीत
वजन तुझा वाढतालाच, म्हणून जा समजान
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
हे खास आवडलं !
21 Feb 2016 - 10:12 pm | सूड
मला वाटतं, अशोक हांडेंच्या दंगलगाणी मंगलगाणीमध्ये हे गाणं होतं, 'चल चेडवा पडावत्सून आगबोटीत जपान'; तेव्हा अर्थ कळायचा नाही, आता लिंक लागली.
21 Feb 2016 - 10:52 pm | पैसा
मस्त लेख!
22 Feb 2016 - 3:07 pm | पियुशा
मस्त .
23 Feb 2016 - 3:12 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला,
स्वाती
24 Feb 2016 - 10:10 am | श्रीकृष्ण सामंत
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार
24 Feb 2016 - 10:17 am | llपुण्याचे पेशवेll
काका, बरेच दिवसांनी तुम्हाला परत पाहून आनंद झाला.
25 Feb 2016 - 7:56 pm | नूतन सावंत
Mast.
25 Feb 2016 - 7:58 pm | स्वामी संकेतानंद
छान. कविता आवडली
27 Feb 2016 - 12:53 pm | भीडस्त
मस्त आहे आवडले