नमस्कार,
गेल्या काही दिवसांपासून मिसळपाववरील संपादक मंडळ विश्रांती अवस्थेत होते. मिपावरील वातावरण योग्य रहावे. मिपावरील चर्चा उत्तम व्हाव्यात आणि एकूणच मिपावरचा सर्व सदस्यांचा वावर सुलभ व्हावा यासाठी संपादक काम करीत असतात. यामुळे संपादक मंडळ हे मिपाच्या रचनेतील अतिशय महत्वाची पातळी आहे. आता पर्यंत अनेक मिपाकरांनी संपादक म्हणून उत्तम काम पाहिले आहे. मिसळपाव.कॉम त्यासाठी आभारी आहे.
आज पासून पुढील सहा महिन्यांकरीता तीन सदस्यांना मिपा संपादक म्हणून अधिकार देत आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
२) गवि
३) गणपा
यांच्या शिवाय प्रशांत यांचे कडे संपादकीय, तांत्रीक अधिकार आहेतच. तांत्रीक बाबतील नीलकांत किंवा प्रशांत यांचेशी संपर्क साधता येईल.
धन्यवाद.
- नीलकांत
प्रतिक्रिया
31 Dec 2015 - 2:07 pm | पिवळा डांबिस
ईऽऽश्य! असं काय एकदम मोठ्याने विचारतात होय भर कट्ट्यावर?
बिका, तुम्हाला किनई, अगदी हेच्च नाही बघा!!!!
;)
31 Dec 2015 - 1:24 pm | कौशिकी०२५
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
31 Dec 2015 - 1:46 pm | कंजूस
अशांसाठी काही स्पष्टीकरण न देता पंधरा दिवस/ तीन महिन्यांसाठी निलंबन वगैरे करता येईल का?ज्या तिघांबद्दल बोलत आहोत त्यांनी कमीतकमी इतर ठिकाणी जाऊन अपप्रचारतरी केलेला नाही मिपाचा.जसे या हट्टी माणसाने केलाय.-
शेजारी पाजारी
इथे 24 November, 2015 - 19:46 पोस्ट मध्ये आहेत मुक्ताफळं
31 Dec 2015 - 2:12 pm | नीलकांत
निलंबन हे केवळ अपवादात्मक परिस्थितीतच व्हावे अशी अपेक्षा असल्यामुळे अशी काही रचना कायम करावी असे वाटत नाही. प्रत्येक सदस्याचा स्वभाव वेगळा असतो. त्या त्या वेळची परिस्थिती वेगळी असते. सब घोडे १२ टक्के असे काही करावेसे वाटत नाही. सध्या तरी जमेतोवर असे करण्याचे टाळतोय, पुढे नाहीच जमले तर अशी रचना करता येईल.
या तिघांच्याबाबत तुम्ही वरकेलेल्या उल्लेखाबाबत सहमत आहे. इतरांना शुभेच्छा :)
31 Dec 2015 - 3:56 pm | कंजूस
धन्यवाद। (:-)।
31 Dec 2015 - 2:05 pm | राही
कसलेले, जाणते आणि समतोल संपादक निवडल्याबद्दल आणि काही कायम ठेवल्याबद्दल नीलकान्त यांचे अभिनंदन.
तीनही संपादकांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
संपादक म्हणून पुढील अर्धे वर्ष (कारण ही नेमणूक सध्या सहा महिन्यांसाठी आहे असे जाहीर झाले आहे,) आणि वैयक्तिकरीत्या येते संपूर्ण वर्ष त्यांना सुखशान्तीपूर्ण आणि आनंदाचे जावो ही इच्छा
31 Dec 2015 - 2:44 pm | भिंगरी
गवि, गणपा आणि डॉ. सुहास यांचे अभिनंदन!
31 Dec 2015 - 2:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
इथल्या प्रतिसादकांच्या शुभेछांसाठी अनेकानेक धन्यवाद !
सर्व सभासदांचे संपादनाच्या कामात (म्हणजे संपादनाची कमीत कमी गरज पडावी असे ;) ) पूर्ण सहकार्य असेल याची मिपाचा पूर्वानुभव पाहून खात्री आहेच. त्यासाठी आगाऊ धन्यवाद !
हे नववर्ष
सर्व सभासद व वाचकांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि सुहृदांना
प्रगतीचे, सुखाचे, आयुरारोग्याचे आणि समृद्धीचे
जावे हीच शुभेछा !
31 Dec 2015 - 10:20 pm | कवितानागेश
आत्ता पाहतेय हां धागा. संपादकांना नव्या इनिंग साठी शुभेच्छा! :)
31 Dec 2015 - 10:54 pm | साती
नविन संपादकांचे अभिनंदन!
1 Jan 2016 - 2:56 am | विकास
तिन्ही संपादकांचे अभिनंदन आणि त्याहूनही महत्वाचे.... शुभेच्छा! :)
बाकी याच निमित्ताने समस्त मिपा परीवारास नववर्षाच्या शुभेच्छा!