अचारी पनीर/पनीर अचारी

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
28 Dec 2015 - 4:54 pm

achari 1

थांबा! थांबा!! थांबा!!! पनीर आणि पर्यायाने माझ्यावर कमेंट करण्याआधी ह्या पाकॄचे व्हेरीएशन्स पहा. ह्यात पनीर एवजी बटाटा, सीमला मिरची, बटाटा - सीमला मिरची, तोंडली (उभ्या चीरुन), भेंडी, फ्लॉवर, गाजर, आलू-गोभी, मटार किंवा मिक्स व्हेज ई. विविध भाज्या सींगल किंवा काँम्बो करुन घालता येतील. जेवढे म्हणून पर्याय सुचतील तेव्हढ्या विविध अचारी फ्लेवर भाज्या करता येतील...

नॉनव्हेज वाल्यांनाही नाराज व्हायचं काम नाय. चिकन, मटण, कोलंबी, पापलेट घालून अचारी मुर्ग, अचारी प्रॉन्स चा लुफ्त घ्या.

टिपा: एका पाकृतून दुसर्‍या पाकृ सुचत जातात तसचं काहिसं ह्या पाकॄ बाबत झालं आहे. लिहिता लिहिताच खालील पाकॄ सुचल्या आहेत.

अचारी पनीर/मिक्स व्हेज टिक्का: आलं/लसूण पेस्ट, १ ते २ चमचे चक्का, चवीप्रमाणे लोणचे मसाला, मसाला तिखट, लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे मीठ घालून पनीर किंवा मिक्स भाज्या मॅरीनेट करुन ठेवा. नंतर नॉन स्टिक पॅन मधे ग्रील/रोस्ट करुन गरमागरम सर्व करा.

चिकन/फिश टिक्का: वरच्याच पेस्ट मधे पनीर/भाज्यां एवजी बोनलेस चीकन/फिश चे तुकडे, प्रॉन्स मॅरीनेट करुन मिक्स नॉन-व्हेज प्लॅटर सर्व करा. दारु/वारुणी सोबत साईड डिश.

चला मग घ्या पटपट साहित्य आणि डीट्टेल पाकृ लिहून.

साहित्यः
१. अर्थातच पनीर क्युब्स - अर्धा कि.
२. कांदे - २ मध्यम
३. टोमॅटो - ३ मध्यम
४. हिरवी सीमला मिरची - दोन मध्यम
५. लसूण पाकळ्या - ४ ते ५
६. पेरभरं आलं
७. लोणचं मसाला - १ ते २ चमचे (आवडीप्रमाणे कमी/जास्त)
८. मसाला तिखट - १/२ चमचा
९. हळद - पाव चमचा
१०. तेल - ५ ते ६ पळ्या (तेल मात्र जरा जास्तचं लागतं)
११. चवीप्रमाणे मीठ/साखर
१२. सुख्या लाल मिरच्या - २
१३. जीरं - १ चमचा
१४. बारीक चीरलेली कोथींबीर

कॄती:
१. पनीर क्युब्स गरम पाण्यात घालून ठेवा जेणेकरुन मउ होतील. कांदे, टोमॅटो, १ हिरवी सीमला मिरची, लसूण पाकळ्या आणि पेरभरं आलं ह्यांची मिक्सर मधे मुलायम पेस्ट करुन घ्या. सीमला मिरची वाटणात घातल्याने भाजीला छान फ्लेवर येतो. उरलेल्या १ सीमला मिरचीचे चौकोनी तुकडे करुन घ्या.

achari 2 achari 3

२. मंद आचेवर एका नॉनस्टीक कढईत/वोक मधे तेल तापलं की जीरं तडतडलं की हळद, मसाला तिखट घालून वाटलेली पेस्ट घाला. पेस्ट पुर्ण शीजून कडेने तेल सुटायच्या एक ५ मि. आधी चौकोनी चीरलेली सीमला मिरची आणि लाल सुख्या मिरच्या घालून परतत रहा.

achari 4 achari 5
achari 6

३. पेस्ट पुर्ण शीजली की लोणचे मसाला, मीठ, साखर घाला. गरजेप्रमाणे पाणी घालून ग्रेव्ही सारखी करा.

achari 7

४. पनीर क्युब्स अ‍ॅड करुन मंद आचेवर एक ५ ते ७ मि. गेव्ही उकळू द्या. ग्रेव्ही नको असेल तर भाजी सुखीही छान लागते. गरमागरम अचारी पनीर पोळी, फुलका किंवा नान सोबत सर्व करा. मी ग्रेव्ही बरोबर व्हेज मेथी पुलाव केलेला.

achari 8 achari 9

५. झटपट आणि चविष्ट अश्या अचारी भाज्यांचा लुफ्त घ्या.

achari 10

achari 11

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

28 Dec 2015 - 4:56 pm | मी-सौरभ

तों पा सु....

अक्षया's picture

28 Dec 2015 - 5:01 pm | अक्षया

खुप छान दिसते आहे..चवही छानच असणार.
करुन बघेन. :)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Dec 2015 - 5:03 pm | अत्रुप्त आत्मा

दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

अत्रुप्त आत्मा's picture

28 Dec 2015 - 5:07 pm | अत्रुप्त आत्मा

दिपकाबाबा पनिरवाले यांणी शेवटचे २ फोटू दुत्त दुत्तपणानी ब्याचलर लोकांन्ना जळवण्यासाठी टाकलेले हायेत! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

प्रचेतस's picture

28 Dec 2015 - 7:42 pm | प्रचेतस

जौद्या ओ अता.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Dec 2015 - 8:07 am | अत्रुप्त आत्मा

आगोबा-बुक्कीमारात्मबन्ध

http://freesmileyface.net/smiley/battle/punching.gif

पियुशा's picture

29 Dec 2015 - 5:09 pm | पियुशा

काय खतरा कलर आहे !

सस्नेह's picture

28 Dec 2015 - 5:07 pm | सस्नेह

छानच, मस्तच, .....!
सिमला मिरची पेस्ट केल्यावर तिचा उग्र वास जातो का ?

दिपक.कुवेत's picture

29 Dec 2015 - 12:56 pm | दिपक.कुवेत

भाजीस अजीबात उग्र वास येत नाही

उगा काहितरीच's picture

28 Dec 2015 - 6:33 pm | उगा काहितरीच

मस्त ! पनीर म्हणजे विषय संपला . कालच मटर पनीर खाल्लामुळे फोटो पाहून विशेष जळजळ झाली नाही पण भूक लागली मात्र !

( वा वा वा वा ) × १०००००००....

पद्मावति's picture

28 Dec 2015 - 6:41 pm | पद्मावति

वाह, मस्तं अचारी पनीर.

यशोधरा's picture

28 Dec 2015 - 6:45 pm | यशोधरा

भन्नाट!

मस्त लागत असेल.नक्की करुन बघणार.तेवढी मेथी पुलावाची पण रेसिपी द्यायचीस ना!

भुमन्यु's picture

29 Dec 2015 - 7:06 pm | भुमन्यु

बाडीस

कंजूस's picture

28 Dec 2015 - 6:57 pm | कंजूस

हम्म**************

सूड's picture

28 Dec 2015 - 7:13 pm | सूड

कढई नवीन का?

दिपक.कुवेत's picture

29 Dec 2015 - 12:39 pm | दिपक.कुवेत

त्याला वोक म्हणतात सूड भावजी. असो. मिक्सर पण नविन घेतला. भांड नविन दिसलं नाहि???

असं असं!! भांड्याचं लक्षात आलं नाही. वयमानापरत्वे नजर क्षीण होत चालली आता. =))

दिपक.कुवेत's picture

30 Dec 2015 - 5:14 pm | दिपक.कुवेत

पण फक्त (नजरच) ना?

सूड's picture

30 Dec 2015 - 7:02 pm | सूड

प्रश्न कळला नाही.

(निरागस) सूड

प्रचेतस's picture

28 Dec 2015 - 7:41 pm | प्रचेतस

प्रचंड भारी.

मदनबाण's picture

28 Dec 2015 - 7:43 pm | मदनबाण

मस्त ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhimmathirigae... ;) :- Srimanthudu

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Dec 2015 - 8:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

तोंपासु !

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Dec 2015 - 8:13 pm | अनिरुद्ध.वैद्य

मस्त दिसतेय ... नक्की करून बघील :)

मस्त फ़ोटो एकदम.पनीर आवडत नाही सो बटाटा घालनार.
अवांतर-कढ़ाई नवीन का?
पुलावची रेसिपी दया लवकर.

मस्त फ़ोटो एकदम.पनीर आवडत नाही सो बटाटा घालनार.
अवांतर-कढ़ाई नवीन का?
पुलावची रेसिपी दया लवकर.

अमृत's picture

29 Dec 2015 - 10:38 am | अमृत

दिसायला एक्दम रूचकर दिसतेय...

नीलमोहर's picture

29 Dec 2015 - 12:49 pm | नीलमोहर

नक्की करणार.

दिपक.कुवेत's picture

29 Dec 2015 - 12:54 pm | दिपक.कुवेत

हि घ्या व्हेज मेथी पूलावाची पाकॄ:

१. आलं/लसूण पेस्ट तयार ठेवा. कांदा / १ हि. सिमला मिरची उभी चीरुन घ्या. भात भीजत ठेवा.
२. फ्रोजन मिक्स व्हेज घालणार असाल तर ठिक अन्यथा फ्रेश घ्या.
३. मेथी स्वच्छ धुवुन बारीक चीरुन घ्या.
४. ही सगळी तयारी झाली कि मंद आचेवर एका नॉनस्टीक पॅन मधे २ चमचे साजूक तूप घाला. तूपात जीरं तडतड्लं की २ चिमूट हळद घाला.
५. कांदा/सिमला मिरची घालून परता. एक ५ मि. मेथी घालून परता. मेथी परतली की मिक्स व्हेज भाज्या घालून एक आधण आणा.
६. मॅगी चे व्हेज स्टॉक चे क्युब्स मिळतात ते दोन पाकीट घाला (एका पाकीटात २ क्युब्स असतात). क्युब्स भाज्यांमधे नीट मिक्स झाले की भीजवलेला भात घालून हलक्या हाताने परता.
७. आवश्यकतेनुसार पाणी घालून पुलाव मोकळा शीजवा. गरमागरम पुलावाचा भाजी / रायत्या बरोबर लुफ्त घ्या.

टीपः मॅगी क्युब्स मधे ऑलरेडी मीठ असतं सो नंतर अ‍ॅड करताना अंदाजाने घाला. ह्या क्युब्स च्या पट्कन गुठळ्या होतात म्हणुन क्युब्स घातलेत की लगेच फोर्क ने मॅश करा.

सुहास झेले's picture

29 Dec 2015 - 12:57 pm | सुहास झेले

जबरा आणि मेथी पुलावासाठी विशेष आभार्स साहेब :) :)

पैसा's picture

29 Dec 2015 - 1:34 pm | पैसा

जबरदस्त आहे!

त्रिवेणी's picture

29 Dec 2015 - 2:33 pm | त्रिवेणी

धन्यवाद पुलावसाठी.
माझा एक प्रश्न आहे- ते मैग्गी क्यूब मधे आणले आणि वापरतना लक्षात आले की ते खुप ऑइली आहेत.म्हणजे त्यात तुपकटपणा जास्त वाटला.सो मी सगळ पैकिट फेकून दिले.
तर कधीतरी vapryala ते चांगले आहे का.

दिपक.कुवेत's picture

29 Dec 2015 - 3:27 pm | दिपक.कुवेत

खुप तुपकट आणि खारट असतात. पण कधी कधी वापरायला चांगले आहेत. स्पेशली वरचा पुलाव खुप छान होतो. एक वेगळाच फ्लेवर येतो (नेहमीच्या खड्या मसाल्यांपेक्षा वेगळा).

इशा१२३'s picture

29 Dec 2015 - 4:35 pm | इशा१२३

मस्त पाककृती.फोटो तर...जाउद्या उगाच बघितले.
पुलावहि छान वाटतोय.

रेवती's picture

30 Dec 2015 - 12:48 am | रेवती

छान पाकृ व फोटो.

बोका-ए-आझम's picture

30 Dec 2015 - 12:55 am | बोका-ए-आझम

धन्यवाद दीपकजी. माझ्या मुलाला हा प्रकार प्रचंड आवडला. तो खूप कमी जेवतो पण त्याने आज अगदी मागून घेऊन ही भाजी खाल्ली. पुन्हा एकदा धन्यवाद!

दिपक.कुवेत's picture

30 Dec 2015 - 5:15 pm | दिपक.कुवेत

मुलाला आवडली यातच पोचलं सगळं.

राघवेंद्र's picture

30 Dec 2015 - 2:24 am | राघवेंद्र

दिपक भाऊ पनीर आचारी व मेथी पुलाव दोन्ही आवडले.

मुक्त विहारि's picture

30 Dec 2015 - 5:21 pm | मुक्त विहारि

आगामी डोंबिवली कट्ट्यासाठी नोंद करून ठेवली आहे.

मस्तच , पुलाव पावभाजि मसाला घालुन पण छान होतो.

मॅगी क्यूब मिळाले नाहीत :(
त्यांच्या शिवायच पुलाव करण्यात येईल आता.भाजी फारच मस्त झाली आहे.आज ३१डिसेंबर स्पेशल म्हणून केली!

नीलमोहर's picture

31 Dec 2015 - 3:06 pm | नीलमोहर

मीही आजच करून पाहिली, मस्त झाली.
सोप्या टेस्टी पा़कृसाठी धन्यवाद.

कुंदन's picture

1 Jan 2016 - 1:23 pm | कुंदन

दुबैत या बुवा तुम्ही रहायला.

भुमी's picture

5 Jan 2016 - 4:14 pm | भुमी

पनीर अचारी आणि मेथी पुलाव मस्त दिसत आहेत. तोंपासु.करुन बघते आता.

या थर्टीफष्टाला रेसिपी बघून (भावाने) केलं होतं, अप्रतिम झालं.

अनन्न्या's picture

6 Jan 2016 - 7:58 pm | अनन्न्या

फ़ारच सुंदर रेसिपी! वा.खू. साठवलीय

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jan 2016 - 8:34 pm | अत्रुप्त आत्मा

दीपक बाबा पनीर वाले , माझ्या बायकोने तुमचे रेसिपी सादरीकरण आवडले असे सांगितले आहे.

दिपक.कुवेत's picture

10 Jan 2016 - 2:07 pm | दिपक.कुवेत

दिसतेय तर तोंपासू... पण चव आवडली का सगळ्यांना?

अनन्न्या's picture

11 Jan 2016 - 9:38 am | अनन्न्या

मुलग्याचा डबा तर मित्रानीच संपवला!

संदीप डांगे's picture

11 Jan 2016 - 9:45 am | संदीप डांगे

पहिलाच फोटो बघून जीव जाण्यात आला आहे. प्राण परत आले की प्रतिसाद टाकायला येऊ... ;-)

मेथी पुलावाचे साहित्य किती प्रमाणात घ्यावे ?

दिपक.कुवेत's picture

11 Jan 2016 - 2:22 pm | दिपक.कुवेत

प्रतिसादात दिले आहे की!!

सुखी जीव's picture

11 Jan 2016 - 2:30 pm | सुखी जीव

मेथी पुलाव करायचा आहे पण हे मॅगी चे व्हेज स्टॉक चे क्युब्स कुठे मिळतील
तुमच्याकडे फोटो असेल /लिंक असेल तर द्याल का?

दिपक.कुवेत's picture

11 Jan 2016 - 6:43 pm | दिपक.कुवेत

तेवढ्याकरीता फोटो आणि लिंक??? जरा गुगलून बघा की. सुपरमार्केट/मॉल मधे अगदी सहज मिळतील ओ नाहितर मिपाकर त्रिवेणी ला विचारा.....त्या नक्कि सांगतील

स्नेह_म's picture

11 Jan 2016 - 5:02 pm | स्नेह_म

माफ करा, पण मेथी पुलावाचे साहित्यआचे प्रमाण दिलेले दिसत नाही आहे, फक्त कृती आहे. पुन्हा एकदा टाकाल का please

दिपक.कुवेत's picture

11 Jan 2016 - 6:47 pm | दिपक.कुवेत

१. आलं/लसूण पेस्ट - १ चमचा
२. कांदा / १ हि. सिमला मिरची - प्रत्येकि १
३. भात - १ ते १.५ कप
४. फ्रोजन किंवा फ्रेश मिक्स व्हेज - १ कप
५. मेथी - १ जूडी (जुडी कितपत जाड आहे त्या नुसार नाहीतर पुलाव कडवट होईल)
६. २ चमचे साजूक तूप
७. २ चिमूट हळद
८. चवीनुसार मीठ

आज मी तुमचं पनीर आणि मेथीपुलावचं कॉम्बिनेशन केलेलं.

अप्रतिम झालेलं!:) घरात सगळ्यांना आवडलं.

बादवे एक सांगायचं राहून गेलं.
तुम्ही सर्वात आधी आलं-लसूण पेस्टचा उल्लेख केलेला होता त्याप्रमाणे मी तयार करुन ठेवली, आणि नंतर तुम्ही कुठे उल्लेख केलेलाच दिसला नाही आणि गडबडीत माझ्याही लक्षात आलं नाही. पेस्टची वाटी मेथीपुलाव झाल्यावर पाहिली!

दिपक.कुवेत's picture

12 Jan 2016 - 11:51 am | दिपक.कुवेत

धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्द्ल. बहूतेक माझही गडबडीत लिहायचं राहून गेलं. पण पुलाव ब्येस्ट झाला ना? रच्याकाने जरा फोटो तरी टाकायचे....

प्रशांत ठाकूर's picture

10 Feb 2016 - 10:49 am | प्रशांत ठाकूर

खूप सोप्पी आणि छान रेसिपी आहे…