कुणी कुणाला काय हाक मारावी !

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
16 May 2015 - 6:45 pm
गाभा: 

काही महिन्यांपूर्वी एका सदरात एक प्रसंग वर्णन केला होता

एका कुटुंबात पहिले अपत्य येते आणि त्या नवजात बालकाला आणि पहिलटकरणीला भेटायला सासरची मंडळी (बाळाची आत्या आजी, इव्हन पणजी) त्या सुनेच्या माहेरी जातात .... आगतस्वागत झाल्यावर सुनेची आई आत वळून हाक मारते," अग पिंकी ... कोण आलंय बघ .. बाळाला घेऊन येतेस का बाहेर ?"

आणि

त्या पाहुण्यांपैकी पोक्त आजी त्या सुनेच्या आईला फटकारतात "अहो तुमची पिंकी आता स्वत:च आई झाली आहे ..तिला पिंकी काय म्हणताय अजून चांगले तिचे नाव आहे नं "XXXX" आता तशी हाक मारा बघू तिला ...पुरे आता पिंकी बिन्की ....सुनेच्या आईचा चेहेरा खर्रकन उतरतो ..आणि कसंनुस हसत आपल्या लेकीला ..कधीही सवय नसलेल्या तिच्या नावाने हाक मारतात ...(पुढची कथात जी काय असेल ती )...

पण मुद्दा :

हि अशी लाडाची नावे, संबोधने सोडून द्यावीत का ? ते हि कुणा तिसऱ्याच्या सांगण्यावरून ?

वरील प्रसंग किती जुना आहे माहित नाही पण हल्ली लग्न झाल्यावर बर्याच मुली जिथे माहेरचे आडनाव बदलत नाहीत तिथे हि अशी संबोधने बदलू देतील ?

...नै मुद्दा फार फार छोटा आहे पण तुमचे काय मत आहे ??

प्रतिक्रिया

जेपी's picture

16 May 2015 - 7:11 pm | जेपी

मुद्दा लैच छोटा आहे ..
मोठ्ठाहोईपत्तुर जागा पकडुन ठेवतो..

-जेपी

यसवायजी's picture

16 May 2015 - 7:24 pm | यसवायजी

@ तुमचे काय मत आहे >>
मला वाटते, असले धागे काढलेच नाही पाहिजेत.

मत असे आहे की पिंकीला कोणी काय हाक मारायचे ते तिचे तिला बघुन घेता येईल की!बर्याच बायकांना घरगूती नाव वेगळं आणि औपचारिक दुसरं असतं,त्याना जे आवडतं ते त्या बरोब्बर घेतात रुळवुन!!

माई मोड ऑन- अरे अत्र्यंग्या,अरे गेला तो काळ पणजीबाईचा .अस आमचे 'हे' म्हणतात.मी पण आता ह्यांना नावानेच हाक मारते.पण चारचौघात नाही बरं का !!-माई मोड ऑफ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 May 2015 - 7:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माई तुमचाचं डुआयडी आहे ह्याची दिवसेंदिवस खात्री होतं चालली आहे. :)

मोड ऑन-अरे,चिमण्या..का त्या जेप्याला छळतो..बिचारा एकाच आयडीच नेटबिल भरताना परेशान असतो..तो कशाला डुआयडी काढेल..अस..'हे' म्हणतात..बाईगं काय ती माहिती ह्यांच्याकडे माझा तर उर भरुन येतो- मोड ऑफ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 May 2015 - 7:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

८०% खात्री झालेली आहे.

असंका's picture

18 May 2015 - 2:51 pm | असंका

:-))

इरसाल's picture

18 May 2015 - 11:20 am | इरसाल

त्या माईंच्या मोडाचे एकदाच ऑपरेशन करुन टाक.(त्यावर गोळ्यापण निघाल्यात बहुतेक म्हणे)
अस सारखं सारखं "मोड" आलेले बरे दिसतात्/वाटतात का ते ! हं ! ;)

नाखु's picture

21 May 2015 - 9:06 am | नाखु

माई दिवाणे खात्रीच्या बाता करतात आणि तुम्ही कात्रीच्या !!!!

मोड-मोडके ना देख मोड-मोडके !मिपाके सफर तू अकेला ही नही! साथ है तेरे थिंकर नेफळेके !

टॉफी निर्मीत मोड इन मिपा या काव्य संग्रहातून साभार
चावक वाचक नाखु

माम्लेदारचा पन्खा's picture

16 May 2015 - 7:41 pm | माम्लेदारचा पन्खा

आपण बरं नि आपलं काम बरं !! पिंकी आणि तिची आई बघून घेतील काय ते….

टवाळ कार्टा's picture

16 May 2015 - 7:41 pm | टवाळ कार्टा

पिंकीला आणि तिच्या आइला आईला असेल तर बाकीचे गेले _ _ _

नूतन सावंत's picture

16 May 2015 - 7:59 pm | नूतन सावंत

लोक काय म्हणतील?याचा विचार मुळीच न करता हाक मारणारा/री आणि ज्याल/जिला हाक मारायची एवढयापर्यंतच हा मुद्दा सीमित असायला हवा/ आहे.मुद्दा खूपच छोटाआहे याच्याशी सहमत.

बाबा पाटील's picture

16 May 2015 - 8:41 pm | बाबा पाटील

आमचा एक चुलत आज्जा होता,८० वर्षाचा वजन ६०-६५ किलो,आण आज्जी होती ७० वर्षाची पण आज्ज्यापेक्षा फुटभर उच्च आणी ९० किलोची.हा आज्जा वस्तीतल्या पारावर बसुन बब्बडे जरा चहा ठेव ग आश्शी मोठ्ठी हाळी द्यायचा हे एकुन त्याचा एक नातजावाय ढुंगणावर पडोस्तवर हासला होता,पण गंगाआज्जा काय बदालला नाय.तव्हा आस हाय पाव्हन कुनी कुनालाबी कायबी नावान ओरडु द्या . आपल काय जातय ?

अजया's picture

16 May 2015 - 9:05 pm | अजया

=))

सुबोध खरे's picture

16 May 2015 - 9:24 pm | सुबोध खरे

जाता जाता --माझा भाऊ लोहार चाळीत घाऊक बाजारात कारखान्याचे सामान घ्यायला जात असे. तेथल्या शेटने( हा पंचविशीतील गुजराथी तरुण होता) पहिल्यांदा हाक मारली, 'पोऱ्या. ते पान्हे घेऊन ये. पोऱ्या चांगला पन्नाशीचा मिशाळ बाप्या होता. माझ्या भावाने शेटला विचारले याला पोरया का म्हणता? त्यावर तो शेट गुजरातीत म्हणाला. साहेब हा माझ्या बापाच्या तरुण काळापासून आमच्याकडे नोकरीला आहे. आला तेंव्हा १०-१२ वर्षाचा पोरगाच होता त्यामुळे तेंव्हा पासून त्याचे नाव पोऱ्याच आहे.

लालगरूड's picture

16 May 2015 - 10:18 pm | लालगरूड

मिसळपाव् free आहे का. सदस्याना ID साठी पैसे द्यावे लागतात का

अत्रन्गि पाउस's picture

17 May 2015 - 12:21 am | अत्रन्गि पाउस

एखादा कट्टा आयोजित करून तो प्रायोजित केल्यास कुणाला हरकत नसते ...
हघ्याहेवेनंसां

शि बि आय's picture

16 May 2015 - 11:00 pm | शि बि आय

पिंकी अन तिची माय काय ते घेतिल न बघून... आज्जी बाईचा का वेळ जाईना का काय??

उगा का अकाला शिकवाय लागली म्हातारी.. अन पिंकी च्या माय ला तरी कस गप बसवल...

आमची पिंकी अन तिची माय असत्या ना...

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2015 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा

माझी एक मावशी तर मला लाडानी परागच्या जागी पल्ल्या नायतर,पल्लीवी अशी हाक मारते. त्यात मला इचित्र असे कधीच काहिही वाटले नाही.. त्ये म्हनतेत णा-पसंड आपणी आपणी.

स्वप्नांची राणी's picture

17 May 2015 - 12:11 am | स्वप्नांची राणी

पुर्वी जवळजवळ प्रत्येक कुटूंबात एक तरी बेबी आत्या/ मावशी /काकु असायचीच. माझ्या तर प्रत्येक नात्यात आहेत. आता आज्ज्या काय, त्यांच्यातल्या काहीजणी तर पणज्या झाल्यात...तरीही बेब्या त्या बेब्याच..!!

उगा काहितरीच's picture

17 May 2015 - 1:19 am | उगा काहितरीच

तरीही बेब्या त्या बेब्याच..!!

सॉलीड...

चलत मुसाफिर's picture

17 May 2015 - 1:00 am | चलत मुसाफिर

मी लहानपणापासून ओळखत असलेल्या एका मुलीचे नाव त्यावेळी काही अगम्य कारणामुळे 'बेंबट्या' असे पडले होते. तिला तशी हाक मारणे म्हणजे भांडण/लाफा/दोन्ही ओढवून घेणे होते.

असो, जुनी गोष्ट. आता तिची मुलगी कॉलेजात आहे :-)

चित्रगुप्त's picture

17 May 2015 - 2:29 am | चित्रगुप्त

प्रेमाच्या, लाडाच्या वगैरे नावाने फक्त आपसात दोघेच (जे कुणी असतील त्यांनी) असताना संबोधावे, अन्य लोकांसमोर यथोचित संबोधन वापरावे, यात समंजसपणा आहे. नाहीतरी आपण समाजात वावरताना अनेक उपचार पाळतच असतो, त्यात आणखी हेही भान ठेवणे बरे.

gogglya's picture

17 May 2015 - 11:59 am | gogglya

आमच्या शेजारी राहणाऱ्या काकू टोपणनाव ठेवण्यासाठी पूर्ण कॉलनी मध्ये प्रसिद्ध होत्या [अजुनही आहेत त्या]. माझ्या पत्रिकेत 'ट ' अक्षर आले आणी सर्व जण गोंधळून गेले. त्या काकुंनी पटकन 'टंडाड्या' असे नाव ठेवले. अजूनही समवयस्क मित्र-मैत्रिणी यांची मूळ नावे पटकन आठवत नाही पण टोपणनावे चांगलीच लक्षात आहेत… त्या काकूंच्या स्वतःच्या मुलाच्या लग्नात सगळे जण 'टिन्क्या,टिन्क्या' असे म्हणत असताना नववधु ला वाटले की कोणी लहान मूल असेल सासरी. पण जेंव्हा ते नाव स्वतःच्या नवऱ्याचेच असल्याचे कळले तेंव्हा लग्न पुर्ण लागले नसतानाही तिने वटहुकुम काढून यापुढे कोणीही नवऱ्याला मूळ नावानेच हाक मारावी नाहीतर माझ्याशी गाठ आहे अशी धमकी दिली होती!

खेडूत's picture

17 May 2015 - 1:18 pm | खेडूत

;)
!!!

जे लोक नेमड्रॉपिंगचे फ्यान असतात त्यांना टोपणनावं म्हणजे तर पर्वणीच!

"... अण्णा गाणार म्हंजे काय..."
"... रसूलभाईचा तर प्रश्नच नाही..."

प्रकाश घाटपांडे's picture

17 May 2015 - 7:29 pm | प्रकाश घाटपांडे

'अहो आदूबाळ' ऐकायला कसे वाटते? ए आदूबाळा असे म्हटल्यावर कसे वाटते? शिवाजीचा उल्लेख एकेरी इतके वर्षे खटकत नव्हता पण आता ब्रिगेडी लोकांना तो खटकू लागला. शिवाजी कोण होता? या पानसरेंच्या पुस्तकामुळे हा विषय पुन्हा चर्चिला गेला.मित्र,आई,राजा व देव यांचा उल्लेख व्याकरणातच एकेरी आहे.
हाक मारणारा व ज्याला हाक मारली जाते तो यांच्यातल नात कस आहे यावर बरच काही अवलंबून आहे.

आदूबाळ's picture

18 May 2015 - 3:26 pm | आदूबाळ

एकदम मान्य! माझा रोख लखू रिसबूड टैप माणसांकडे होता.

(अवांतरः "अहो आदूबाळ" सांस्कृतिकदृष्ट्या चूक आहे, "ए आदूबाळा" योग्य आहे. पण पन्नास वर्षांनी आदूबाळ ब्रिगेडने याला आक्षेप घेतला तर मज न सांगणे ;) )

(वळू सिनेमातल्या "संपतराव मुतल्यात" या ड्वायलाकची आठवण झाली.)

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 May 2015 - 2:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

वाचतोय
मला लहानपणी एका टोपणनावाने हाक मारायचे. मुंज झाल्यावर आजीने सांगितले की आता याला नीट नावानेच हाक मारायची. ते नाव मी सर्वांना सांगु लागलो. पण कागदोपत्री माझे नाव तिसरेच लावले होते आणि पुढे कॉलेजात गेल्यावर आणि त्याहीपुढे नोकरी लागल्यावर नावाचा फारच घोळ होउ लागला. अजुनही घरचे आणि मित्र/ बरीच ईतर मंडळी जुन्या नावाने हाक मारतात. पण प्रोफेशनल ओळखीचे सर्वजण राजेंद्र नावाने :)

मात्र माझ्या मुलांना एकच नाव ठेवुन अणि घरीदारी सगळीकडे कंपलसरी तेच वापरुन मी तो घोळ निदान त्यांच्यासाठी ठेवला नाहीये.

तात्पर्य- एकच नाव ठेवावे आणि त्यानेच हाक मारावी.

पिंकीला पिंकीच्या आईने काय हाक मारावी हा दोघींचा प्रश्न आहे. असल्या भोचक आज्जेसासवांना माझ्यासारखी खमकी माणसं मिळायला हवीत. माझ्याबाबतीत असं झालं तर दोन मिनटात मिजास उतरुन ठेवली असती म्हातारीची. त्यांच्याच घरी जाऊन त्यांनाच शिकवते म्हणजे काय? आज नाव बदल म्हणाली उद्या आणखी काही म्हणेल!!

चित्रगुप्त's picture

18 May 2015 - 4:05 pm | चित्रगुप्त

पिंकीला पिंकीच्या आईने काय हाक मारावी हा दोघींचा प्रश्न आहे

हे खरे, पण ते फक्त त्या दोघीच असताना. इतर लोक, सासरची वृद्ध मंडळी समोर असताना त्यांचा विचार करणे आवश्यक.
पाश्चात्य व्यक्तिस्वातंत्र्याचा आपल्याकडे होऊ लागलेला अतिरेक झपाट्याने आपल्याला विवेकशून्य करू लागला आहे की काय, असे वाटते.

इतर लोक, सासरची वृद्ध मंडळी समोर असताना त्यांचा विचार करणे आवश्यक.

काय संबंध? काल आलेल्या सासरच्या लोकांसाठी मायलेकींनी जन्मापासूनच्या सवयी सोडायच्या? आणि असं काय विशेष केलंय? पिंकीच म्हणाली ना?

चित्रगुप्त's picture

18 May 2015 - 4:44 pm | चित्रगुप्त

लग्न, सासर-माहेर, बाळंतपण, मुलांना वाढवणे ..... लई मंजे लईच गुंताडा असतो राव, लई उभे आडवे धागे असत्यात, ते सर्व उस्कटून सांगायचे तर एक लेखच लिहावा लागेल. वागता - बोलताना दुसर्‍यांचे भान ठेवणे, वृद्ध मंडळीचा मान ठेवणे, हा विवेक होय, एवढेच आत्ता सांगू शकतो.

चित्रगुप्त's picture

18 May 2015 - 4:20 pm | चित्रगुप्त

आपणासि पहावे आपण, या नाव ज्ञान
हे समर्थ वचन फार गहन आहे बाबा.

नाखु's picture

18 May 2015 - 5:09 pm | नाखु

कुणाची खाजगी-जाहीर्-एकांताची-टोपण्-उघड कशीही नावे असली तरी

आपण कशालाही "नावे" ठेऊ नये असे आमच्या "मुवींच्या महाराज बाबांचे" मत आहे

आणि ते आम्हाला कसलेही नाव न ठेवता मान्य आहे.

नामदार ते दमदार
नाखुस टोपणनाववाला.

आमच्या येथे कशाचाही कुठेही कसाही संबंध लावून मिळेल.
थेट्पिंकर पिचकारीवाले.

प्रसाद१९७१'s picture

18 May 2015 - 7:10 pm | प्रसाद१९७१

त्या पाहुण्यांपैकी पोक्त आजी त्या सुनेच्या आईला फटकारतात "अहो तुमची पिंकी आता स्वत:च आई झाली आहे ..तिला पिंकी काय म्हणताय अजून चांगले तिचे नाव आहे नं "XXXX" आता तशी हाक मारा बघू तिला ...पुरे आता पिंकी बिन्की ....सुनेच्या आईचा चेहेरा खर्रकन उतरतो

खरे तर ह्या म्हातार्‍या बाईच्या ( पोक्त म्हणवत नाही कारण त्या शब्दात शहाणपणा अपेक्षीत असतो ) खणखणीत कानाखाली वाजवावी अशी इच्छा झाली. कमीतकमी त्या थेरडीला कोणीतरी "तू कोण? तूझा संबंध काय? तुला विचारले आहे का मी की माझ्या मुलीला काय हाक मारु ते?" इतके तरी विचारायला पाहीजे होते.

"तू कोण? तूझा संबंध काय? तुला विचारले आहे का मी की माझ्या मुलीला काय हाक मारु ते?"

पर्फेक्ट!!

चित्रगुप्त's picture

18 May 2015 - 7:58 pm | चित्रगुप्त

अहो, जर मी आणि माझी लेक, एवढेच पुरेसे होते, तर तिचे लग्न तरी का लावले म्हणतो मी ? लग्न लावलेत ना, आणि मूलही झाले ना ? आता ती फक्त तुमची लेक राहिलेली नाही. सासुरवाडच्या लोकांचा पण विचार करणे, त्यांचा मान ठेवणे अगत्याचे आहे. सळसळत्या रक्ताच्या तरूण पुरुषांना हे उमगणार नाही, हेही स्वाभाविकच, पण सुनेच्या आईला नक्कीच कळले असणार ते, म्हणूनच तिचा चेहरा उतरला.
इथे प्रश्न फक्त अमूक ने तमूकला काय म्हटले याचा नाही हो, आपण बोलण्या-वागण्यात दुसर्‍यांच्या अस्तित्वाचा कितपत विचार करतो, हा आहे. हा केला जात नाही, म्हणूनच गणेशोत्सवात भयंकर लाऊड स्पीकर वाजवण्यापासून ते सलमान सारख्यांनी गाडीखाली बेदरकारपणे लोकांना चिरडत जाणे, बलात्कार, अश्या घटना घडत जातात. पाश्चात्त्य लोक टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्यवादी खरे, पण व्यवहारात ते सुद्धा दुसर्‍यांच्या मतांचा , सोयीचा विचार जरूर करत असतात. आपण त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य तेवढेच शिकलो की काय, असे कधी कधी वाटते. असो.

अहो, जर मी आणि माझी लेक, एवढेच पुरेसे होते, तर तिचे लग्न तरी का लावले म्हणतो मी ? लग्न लावलेत ना, आणि मूलही झाले ना ? आता ती फक्त तुमची लेक राहिलेली नाही. सासुरवाडच्या लोकांचा पण विचार करणे, त्यांचा मान ठेवणे अगत्याचे आहे. सळसळत्या रक्ताच्या तरूण पुरुषांना हे उमगणार नाही, हेही स्वाभाविकच, पण सुनेच्या आईला नक्कीच कळले असणार ते, म्हणूनच तिचा चेहरा उतरला.

आणि

म्हणूनच गणेशोत्सवात भयंकर लाऊड स्पीकर वाजवण्यापासून ते सलमान सारख्यांनी गाडीखाली बेदरकारपणे लोकांना चिरडत जाणे, बलात्कार, अश्या घटना घडत जातात.

हे दोन्ही टोकाचे विषय तुम्ही मिसळताय असं वाटत नाही?

दुसरं म्हणजे:

१) सासुरवाडच्या लोकांचा पण विचार करणे, त्यांचा मान ठेवणे अगत्याचे आहे. २) आपण बोलण्या-वागण्यात दुसर्‍यांच्या अस्तित्वाचा कितपत विचार करतो, हा आहे.

या गोष्टी त्या भोचक बाईंनाही करता आल्या असत्या. एक म्हणजे त्या सुनेच्या घरी होत्या स्वतःच्या नाही आणि अशा वेळी एक आई लेकीला सहज माहेरच्या नावाने हा मारुन जाते. तेव्हा तिने त्यांच्या संभाषणात नाक खुपसायची गरज नव्हती.

येवढंच जर खटकत होतं तर त्यांनी त्यांच्या नातवाचं लग्न करुन द्यायचं नव्हतं. अठराव्या शतकातली एखादी सोशिक आशा काळे शोधायची होती.

चित्रगुप्त's picture

18 May 2015 - 8:07 pm | चित्रगुप्त

खणखणीत कानाखाली वाजवावी अशी इच्छा झाली.

छान. काही अन्याय घडत आहे, असे वाटले, की संतापाने मन पेटून उठणे, हेही सुंदरच. अशी माणसे समाजाच्या, पर्यावरणाच्या, देशाच्या संरक्षणासाठी हवीतच. परंतु कौटुंबिक वातावरणात मात्र विवेकाने वागणे बरे.

प्रसाद१९७१'s picture

19 May 2015 - 9:36 am | प्रसाद१९७१

कौटुंबिक वातावरणात मात्र विवेकाने वागणे बरे

तेच तर सांगितले, कोणीतरी त्या थेरडीला विवेक शिकवायला पाहीजे होता. आणि इतके वय झाले तरी अजुन शिकली नाही म्हणजे कानाखाली वाजवणे हाच एक पर्याय.

मी माझ्या मुलीला काय वाट्टेल त्या नावाने हाक मारतो. तिची त्यात काही तक्रार नाही. हाच प्रसंग जर माझ्या बाबतीत घडला असता तर काय असे लगेच मनात आले. थोबाडीत मारली नसती त्या भोचक बाई च्या पण मुद्दाम पुन्हा मला हव्या त्याच नावानी हाक मारली असती. आणि पुढच्या आयुष्यात त्या बाईच्या नावावर कायमची काट मारली असती.

चित्रगुप्त's picture

18 May 2015 - 9:02 pm | चित्रगुप्त

या गोष्टी त्या भोचक बाईंनाही करता आल्या असत्या. एक म्हणजे त्या सुनेच्या घरी होत्या स्वतःच्या नाही आणि अशा वेळी एक आई लेकीला सहज माहेरच्या नावाने हा मारुन जाते. तेव्हा तिने त्यांच्या संभाषणात नाक खुपसायची गरज नव्हती.

हेही खरेच. सासरची मंडळी सुद्धा जरा 'हे'च वागतात, आणि त्यातून बायकां म्हटल्या, की काही सांगता येत नाही, केंव्हा, कुठे काय बोलतील ते ... असे खुद्द बायकाच म्हणतात. आता यावर काय म्हणू शकणार बाप्पे लोक ?

सौन्दर्य's picture

20 May 2015 - 9:59 pm | सौन्दर्य

धागा कर्त्याचा शबुद ख्वोटा पडतोय !

चित्रगुप्त's picture

21 May 2015 - 1:23 am | चित्रगुप्त

खरेतर आता या धाग्यावर काही लिहीणार नव्हतो, तरी हा माझा शेवटला प्रतिसाद : अगदी कोणाचेही असोत, पण आजी-आजोबा समोर आले, तर त्यांच्या पाया पडावे, त्यांची वास्तपुस्त करावी, त्यांच्या बोलण्यातले मर्म जाणून घेऊन तशी वर्तणूक करावी ...... त्याऐवजी त्यांना 'थेरडी' असे संबोधावे, कानाखाली वाजवण्याची, थोबाडीत देण्याची भाषा करावी, या कल्पनेने सुद्धा कसनुसे झाले. खरंच, आपण कुठे चाललो आहोत, आणि कुठे पोचणार आहोत ?

आपण कुठे चाललो आहोत, आणि कुठे पोचणार आहोत ?थोडे
विवेक वापरुन लिहा ना....

आपण कुठे चाललो आहोत, आणि कुठे पोचणार आहोत ?थोडे
विवेक वापरुन लिहा ना....

खटपट्या's picture

21 May 2015 - 9:37 am | खटपट्या

पन्नासला ५ कमी....
लवकर होउदे पन्नाशी पिंकीची...

जाता जाता- आमच्याकडे एक पपू आजोबा आहेत. अजुनही पपूच बोलतात. (परम पुज्य नव्हेत)

शि बि आय's picture

21 May 2015 - 4:31 pm | शि बि आय

आजी-आजोबा समोर आले, तर त्यांच्या पाया पडावे, त्यांची वास्तपुस्त करावी, त्यांच्या बोलण्यातले मर्म जाणून घेऊन तशी वर्तणूक करावी ......lockquote>

सगळे मान्य… पण त्यांनी देखील आपला आब राखावा. ती त्यांची सून होण्याआधी कोणाची तरी लाडकी लेक आहे. आणि आईने लेकीला कोणत्या नावाने हाक मारावी अथवा मारू नये हे सुनेच्या माहेरी जाऊन सांगू नये. मान द्यावा आणि घ्यावा.

आजही कित्येक आया आपल्या बाबा झालेल्या मुलाला बंडू, बाळ, मन्या अश्या मायेच्या आणि लाडाच्या नावाने हाक मारतात. मग तोच नियम सुनेला तिच्या माहेरी असताना का लागू होत नाही ????

श्रीरंग_जोशी's picture

21 May 2015 - 7:39 pm | श्रीरंग_जोशी

लेखन आवडलं.

दुसर्‍या बाजूच्या मुद्द्याचे महत्व समजत आहे तरी पण चित्रगुप्त यांच्या दृष्टिकोनाशी सहमत व्हावेसे वाटते.

आपल्या अवती भवती अनेक चीड आणणार्‍या गोष्टी घडत असतात, त्यावरच्या उपायांनी किमान नव्या समस्या उभ्या राहतील हा प्रयत्न असावा...