खाऊगल्ली

त्रिवेणी's picture
त्रिवेणी in पाककृती
16 Apr 2015 - 9:06 am

बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा.

तर चला एकमेका सहाय्य करू---------

अप्पु ताई ही पहिली रेसीपी तुझ्यासाठी ग.
वाग्यांची घोटलेली भाजी साठी तेलात मोहरी, जिरं, हिंग, हळद टाकून भरपूर लसूण आणि हिरवी मिरचीची चुरचुरीत फोडणी करून घ्यायची. नंतर त्यात हिरव्या वांग्यांच्या फोडी टाकुन परतवून घ्यायचे आणि भांड्यावर ताटात पाणी टाकुन मस्त दणदणीत वाफ काढायची. 10 मिनिटात वांगी बर्या पैकी शिजतात आता त्यात मीठ टाकुन वरण घोटायच्या रवीने भाजी मस्त घोटून घ्यावी. परत 5 मिनिट शिजवून भरपूर कोथंबीर टाकुन वरण बट्टी खायची.

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

17 Apr 2015 - 9:43 pm | आदूबाळ

http://www.misalpav.com/node/22637

- लिंकरंग जोशी

श्रीरंग_जोशी's picture

17 Apr 2015 - 9:58 pm | श्रीरंग_जोशी

मी दुवा दिला असता तर तो केवळ युआरएल च्योप्य पस्ते करून दिला नसता. त्यावर क्लिक केल्यास ते पान नव्या टॅबमध्ये उघडले असते. असो दुवा देण्याचे पुण्यकर्म करत रहावे :-) .

असंका's picture

18 Apr 2015 - 6:25 pm | असंका

आणि हे कसे साध्य करावे?

श्रीरंग_जोशी's picture

18 Apr 2015 - 8:04 pm | श्रीरंग_जोशी

दुव्याच्या कोडमध्ये target = "_blank" हे जोडायचे. हे नसल्यास वाचकाला राइट क्लिक करून Open in a new window निवडावे लागते. नुसते क्लिक केल्यास सध्याचे पेज जाऊन त्याच टॅबमध्ये नवे पेज उघडते.

<a target = "_blank" href="http://www.misalpav.com/node/22637">डुबुक इडली (मिनी इडली)</a>

असंका's picture

21 Apr 2015 - 5:10 pm | असंका

धन्यवाद...!! :-)

रॉजरमूर's picture

8 May 2015 - 1:35 am | रॉजरमूर

मिपाच्या पुढच्या version मध्ये याचा अंतर्भाव केल्यास छान सोय होईल .

पेठकरकाकांच्या सांबार

२० माणसांसाठी जास्त होईल. =))))

अजया's picture

17 Apr 2015 - 9:47 pm | अजया

धन्यवाद!

पीसी's picture

18 Apr 2015 - 9:19 pm | पीसी

मस्त धागा आहे. नविन रेसिपी शिकायला मिळतील.

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2015 - 5:06 pm | पिलीयन रायडर

पॅटीसची रेसेपी वेगळी काढा की नवा धागा म्हणुन.. मस्त आहे.. फोटो ही आहेत.. (तेच महत्वाचे.. अर्धे लोक फोटो पाहुन जातात.. कृती कोण वाचतोय!!!)

जोशी साहेब.. छोले मस्त!! वेगळा धागा काडुन रेसेपीपण द्याकी.. फोटो असल्याने तुमचं जवळजवळ सगळं काम झालंच आहे!

कुणी लिट्टी चोखा बनवलं आहे का कधी? मी खाल्लं आहे एका बिहारी मित्राकडे.. पुण्यात कुठे मिळेल? किंवा कुणी मला करुन खाउ घालेल का?!!!

आदूबाळ's picture

21 Apr 2015 - 5:20 pm | आदूबाळ

लिट्टी चोखा

असल्या नावाचा पदार्थ असतोय??

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2015 - 5:31 pm | पिलीयन रायडर

आणि मस्त असतोय!!

श्रीरंग_जोशी's picture

21 Apr 2015 - 5:58 pm | श्रीरंग_जोशी

नवं काहीतरी सुचवल्याबद्दल धन्यवाद पिरातै.

भविष्यात कधीतरी तपशीलवारपणे आलूछोले ही पाकृ टाकण्याचा प्रयत्न करीन. पूर्वीचा फटू आहे म्हणून थोडक्यात उरकणार नाही.

बाकी साहेब म्हणू नका हो.

सानिकास्वप्निल's picture

21 Apr 2015 - 6:20 pm | सानिकास्वप्निल

लिट्टी बाटीसारखाच प्रकार फक्त त्यातले सारण बर्‍याच वेळेला सातूच्या पिठापासून बनवतात. चोखा हा भरीतासारखाच पदार्थ वांगे, बटाटे किंवा मिश्र भांज्यांचे भरीत.

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2015 - 6:23 pm | पिलीयन रायडर

हे सापडलं!!!!

http://www.maayboli.com/node/51998

श्रीरंग_जोशी's picture

28 Apr 2015 - 8:20 pm | श्रीरंग_जोशी

राजमा मसाला बनवताना जर राजमा दहा-बारा तास पाण्यात भिजवून ठेवला तर तो पटकन शिजतो अन चवही टिकून राहते. पण त्यामुळे राजम्याचे दाणे (किंवा बिया) ओबडधोबड दिसतात.

याउलट राजमा पाण्यात अजिबात न भिजवता थेट कुकरमधे शिजवल्यास राजमा छान रेखीव दिसतो. पण चविष्टपणा नक्कीच कमी होतो.

तर मंडळी किती तास राजमा भिजवला की या दोन गोष्टींचा सुवर्णमध्य साधता येईल?

रेवती's picture

30 Apr 2015 - 5:38 pm | रेवती

माझ्याकडील राजमे भिजत घातल्यावर पहिले काही तास त्यात पूर्णपणे पाणी शिरलेले नसताना ओबडधोबड दिसतात पण नंतर पूर्ण भिजल्यावर व्यवस्थित दिसतात. समजा मी सकाळी भिजवले तर रात्री राजमा राईस करता येतो. म्हणजे सात ते आठ तास लागतात. पुन्हा राजमा कोणत्या प्रकारातला आहे यावरही टैम बदलेल.

श्रीरंग_जोशी's picture

30 Apr 2015 - 5:42 pm | श्रीरंग_जोशी

पुढच्या वेळी राजमा पाण्यात भिजवल्यार अधिक काटेकोरपणे निरिक्षण करतो.

धन्यवाद.

स्पंदना's picture

30 Apr 2015 - 5:16 pm | स्पंदना

डाळ कांदा किंवा डाळीची उसळ!
तूर डाळ अथवा चणा डाळ करायची असेल तर जरा जास्त वेळ डाळ भिजवायची ,अथवा आम्ही करतो तस सरळ जरा जास्त पाण्यात घालून सऱळ बोटचेपी होइतो उकळायची. हे डाळ उकळलेले पाणी मी नंतर रसम साठी वापरते एखादा टोमॅटो त्यात चुरडून घालून. मसूरीची डाळ असेल तर मात्र नुसती धुवायची आणि चाळणीवर निथळत ठेवायची.
तर अशी बोटचेपी अथवा मसूरीची भिजवलेली डाळ (३ माणसांना एक दिड वाटी बस होइल) अन कापलेला कांदा भरपूर. (मी अश्या उसळींसाठी थोडा मोठा कापते कांदा. जवळ जवळ दिड सेमी आकाराचा. एक वेगळीच चव येते मोठ्या कापलेल्या कांद्याची, तो मिसळुन जात नाही उसळीत) तर फोडणीला कडीपत्ता हिंग आणि कांदा भरपूर तेलात. वरुन हळद. कांदा व्यवस्थीत ट्रान्स्परन्ट झाला की त्यावर डाळ घाला. मिसळलेलं तिखट किंवा कांदालसूण मसाला, मिठ थोडासा गूळ अथवा साखर, आणि आमसूल. मस्त एकसारखे परतून घ्यायचे आणि झाकण ठेवुन शिजवायचे. भरपूर कांद्याने शिजते डाळ व्यवस्थीत. वरुन हव तर जरासा दुधाचा हबका मार! डाळ शिजली की गॅस बंद करण्यापूर्वी भरपूर कोथींबीर चिरुन!.
माझ्या प्रत्येक भाजीत कांदा लसूण मसाला (आम्ही तिखट म्हणतो) जरी असला तरी आम्ही वरुन आणि पुन्हा नुसत लसूण खोबर एकत्र चेचुन घालतो. गरमा गरम चपाती बरोबर काय लागते सांगू? कालवलेल्या दही भाता बरोबर सुद्धा फर्मास! दुध भात, ताक भात सगळ एकदम चव वाढवुन जातं याच्या बरोबर!

रेवती's picture

30 Apr 2015 - 5:35 pm | रेवती

धन्यवाद. लगेच ह. डाळ भिजत घालते.

स्वाती दिनेश's picture

1 May 2015 - 6:24 pm | स्वाती दिनेश

मी पण करुन पाहते.. धन्यु अप्पु.

रुपी's picture

8 May 2015 - 1:44 am | रुपी

गरमा गरम चपाती बरोबर काय लागते सांगू? >> यामुळे तर कधी बनवून पाहिन आणि खाईन असं झालंय!

आदूबाळ's picture

30 Apr 2015 - 6:00 pm | आदूबाळ

नवीन धागा काढा. दुसर्‍या पानावर गेलं की नवे प्रतिसाद समजत नाहीत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 May 2015 - 5:07 am | निनाद मुक्काम प...

मुंबईचे मूळचे भूमिपुत्र ?
महेश कोठारेने एका मुलाखतीत आम्ही मुंबई चे पहिले स्थलांतरित असे सांगितले होते
इस्ट इंडिया कंपनीसाठी कारकून हवे होते तेव्हा देशस्थ व प्रभू ह्यांची काही कुटुंबे स्थलांतरित झाली पुढे पारशी व्यापारासाठी आले गुजरात वरून

मूळ भूमिपुत्र फक्त कोळी

>>मूळ भूमिपुत्र फक्त कोळी

ते सुद्धा गुजरातेहून आले होते म्हणे. येताना त्यांची देवी सोबत आणलंनीत 'मोमाई', तीच पुढे मुंबई झाली असं जग्गनाथ शंकरशेट यांच्या आयुष्यावरचं पुस्तक वाचनात आलं होतं मध्यंतरी त्यात वाचलं.

कपिलमुनी's picture

16 Jun 2015 - 2:30 pm | कपिलमुनी

घरी भरपूर पिकलेल्या पपया आल्या आहेत.
कोणाला याची बर्फी किंवा इतर पाकृ माहित आहे का ?

इथली मटण रश्स्याची कृती काय झाली?
मला करुन पहायची होती.

त्रिवेणी's picture

13 Jul 2015 - 9:36 am | त्रिवेणी

मी बऱ्याचदा गोड_आंबट वरण करण्याचा प्रयत्न केलाय tamate आणि चिंच घालून पण दोन्ही चे वरण काही केल्या जमत ना ही असे वाटते. प्लीज तुमच्या रेसिपी शेयर करा ना.
दुसर्यांच्या घरी खालेले जास्त छान वाटले.(त्यांच्या रेसिपी ने केले तरी वेगळेच वाटते.)