लग्न.... लिव इन रिलेशन.... डिवोर्स

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in काथ्याकूट
18 Feb 2015 - 12:21 am
गाभा: 

"माझ्या मुलीनी लग्न नाही केल न तरी मी तिला नक्की सपोर्ट करेन. काय मिळतं ग लग्न करून? सतत अपमान! आई-वडिलांचा उद्धार आणि कितीही केल तरी माझा कशावरही हक्क नाही हे सतत एकवून दाखवणं... त्यापेक्षा तुझ्यासारख उत्तम शिक्षण घ्याव आणि चांगली नोकरी करून इंडिपेंडेंट आयुष्य जगाव." आज परत सुरुचिचा.... माझ्या शाळेपासूनच्या मैत्रिणीचा.... पारा चढ़ला होता. सहाजिकच होत ते. ती कितीही खपली तरी सतत दूषणं ऐकावी लागायची तिला. शाळेपासूनच ती खूप हुशार. तिला फ़क्त डॉक्टर नाही तर सर्जन बनायचे होते. पण मग कितीतरी वर्ष फ़क्त शिक्षण. मग तितकाच् शिकलेला नवरा मिळेल का... परवडेल का... असा विचार करून आई-वडिलांनी 12वी नंतर पैथोलॉजीचा कोर्स करायला लाउन मग लग्न उरकुन टाकले होते. लग्नानंतर जसा इतरांचा सर्व साधारण संसार होतो तसा तिचाही चालला होता. सासु अधुन मधून टॉन्ट्स मारायची. नवरा-बायको दोघे कामावरून दमुन आलेले असायचे... मग एखाद्या विषयावारुन दोघांची जुंपायची. मग सगळी पुढची-मागची उणी दूणी काढली जायची.... आणि मग त्या वीकएंडला आमच दोघींच भेटण ठरलेल; आणि तिच स्वतः च्या आयुश्याबद्दल रडणं आणि मी कशी सुखी आहे याच कौतुक क़रण ठरलेल.

माझी गोष्ट थोड़ी वेगळी होती. म्हणजे मीच ती ठरवून वेगळी घडवली होती. मी काही अभ्यासात हुशार नव्हते. पण खूप बड़बड़ी होते. प्रचंड मोठा मित्र परिवार. सर्वसाधारणपणे जसे अनेक जण फ़ार करिअरचा विचार न करता ग्रेजुएट होतात तशी मी देखिल झाले होते. पण अजुन नोकरिच जमत नव्हतं. मला इटक्यात लग्न नव्हतं करायच. बाबा माझ्या बाजूनि होत... म्हणून ठिक होत. एकदा बाबांचे एक मित्र घरी आले होते. म्हणाले तू इतकी बोल्ड आहेस, स्मार्ट आहेस मग मिडीयामधे ट्राय कर न. उद्या या पत्यावर जा. माझा मित्रच आहे. मी बोलून ठेवतो. मी दुस-या दिवशी गेले... आणि माझ नशिब अस जोरदार की मला त्या चॅनेलमधे चांगला चान्स मिळाला. आणि मग मी कधीच मागे वळून बघितल नाही. मला लग्नाबद्धल फ़ार उत्सुकता नव्हती. आणि मग करियर करताना राहून गेल. आई मागे लागली काही वर्ष आणि मग तिनेही नाद सोडला. आता मी मस्त कमवून आणि माझा स्वतःचा फ्लॅट घेऊन राहात होते. एक मित्र होता... आम्ही लग्नाचा विचार केला नव्हता. तसे एकत्र होतोही आणि नव्हतोही आम्ही. पण अलीकडे मात्र आमचे खटके उडायला लागले होते. मी कधी कुठे जाते... काय करते ते तो सतत मला विचारायचा. आणि जर मी विचारल तर तू काय माझी बायको आहेस का? अस म्हणून मला गप्प् करायचा. समोर असला तरच माझा... अस वागायचा. मला हे अस राहाण खटकत होत....आवडत नव्हतं. मी सुरुचिला हे माझ्या मनातल अलीकडे एक-दोनदा बोलले देखिल होते.

एकदा सुरुचि आणि मी असच एका मॉलमधे बसून गप्पा मारत होतो. अचानक मला सविता दिसली. आमची तिसरी पार्टनर. मला आश्चर्य वाटल. तिला मी हाक मारली. "सविता... अग... तू इथे?" तिने आम्हाला बघितल आणि कड़कडून मिठी मारली. "अग मी इथेच असते आता. कधीच परत आले U. S. हुन. अग मी डिवोर्स घेतला." तिने सहज एखादी सामान्य घटना सांगावी तस सांगितल. आम्ही दोघी अवाक् झालो. कारण तिच्या आवडीच शिक्षण तिने घेतल होत.सविता स्वतः C. A. होती. लग्न सुद्धा प्रेम करून मग केल होत. आणि आज ती घटस्फोट घेऊन परत इथे आली होती. "नाही पटल त्याच आणि माझ. एक्चुअली मला करियरसुद्धा हव होत आणि संसारसुद्धा. दोन मूलं तरी हवित अस माझ मत. करियर करणार तर मुलांना कोण सांभाळणार... आणि मग त्याचं वाया जाण... ते टेन्शन.. त्याला ते नको होत. तो म्हणाला मी नोकरी सोडतो... घर मूलं सांभाळतो तू करियर कर; कमव. ते का कोण जाणे मला नाही पटल. सारखी भांडण... वाद... शेवटी आम्ही डिवोर्सचा निर्णय घेतला. म्यूच्यूअली झाला. त्यामुळे त्रास नाही झाला. And now here I am back ti u both beautiful girls." अस म्हणून सविता हसली.

प्रतिक्रिया

एस's picture

18 Feb 2015 - 12:35 am | एस

:-)

खटपट्या's picture

18 Feb 2015 - 12:39 am | खटपट्या

क्रमशः राहीलंय का ?

ब़जरबट्टू's picture

18 Feb 2015 - 9:03 am | ब़जरबट्टू

एकंदरीत कथेतील मुंलीना कोणत्याही परीस्थितीत स्वत:ला सांभाळणे व लवचिकता दाखवणे कठिण जातेय तर.. ना लग्न झालेली सुखी आहे, ना लिव्ह इन वाली.. तिसरी तर कहर आहे, प्रेमविवाह करून आणि वर इतका सोशिक व सामंज्यसपणा असलेला नवरा भेटल्यावर पण ये हाल ? रब्बा... :(

प्रशांत बच्छाव's picture

6 Mar 2018 - 1:54 pm | प्रशांत बच्छाव

तिसरी तर कहर आहे

हाहाहाहा भारी..

ज्योति अळवणी's picture

18 Feb 2015 - 9:15 am | ज्योति अळवणी

हा लेख लिहिण्यामागे एक उद्देश् असा आहे की सिचुएशन कशीही असली तरी आपली मानसिकता आपल्याला समजणे आवश्यक आहे. अजूनही आपले अनेक निर्णय हे इतरांवर अवलंबून असतात. स्वाभाविक आहे कारण आपण कुटुंब व्यवस्थेत राहतो. परंतु तरीही... premarital Councelling आवश्यक आहे. त्याशिवाय आपण घेतलेला निर्णय जर अयोग्य वाटला तर तो बदलावा; कदाचित् त्यात जास्त मोकळ जगण्याचे chances आहेत.

हाडक्या's picture

18 Feb 2015 - 4:29 pm | हाडक्या

परंतु तरीही... premarital Councelling आवश्यक आहे.

काय हो काकू, तुम्ही "विवाहपूर्व समुपदेशन" करता काय ? नै म्हंजे बर्‍याचदा राम-बाण उपाय असल्यागत सांगत असताय म्हणून विचारलं.

ऋषिकेश's picture

18 Feb 2015 - 10:00 am | ऋषिकेश

तीन कथाबीजांना एकत्र गुंफण्याची कल्पना आवडली. अधिक तपशीलवार आणि धीमेपणाने प्रसंग फुलवले असते तर बहार आली असती.

पुलेशु.

काळ बदलला आहे असं म्हणतात . पण मनुष्य स्वभाव बदलला नसावा. ह्या २ गोष्टी गृहीत धरून माझ मत मांडतो
१. चार लोकं लग्न करतात म्हणून आपणही करावं हे चुकीचं आहे. तरीही लग्न करायचेच असल्यास ,त्या चार लोकांच्या आयुष्यात जर त्रयस्थ पणे डोकावून बघा. त्यांची लग्न यशस्वी झाली असं वाटत असेल तर त्यामागची कारणं पडताळून बघा. लग्न ही खूप मोठी जबाबदारी आहे. स्वत:च्या जोडीदाराला समजून घेणं आणि प्रसंगी समजावून सांगणं किंवा गरज पडलीच तर समज देणं खूप महत्वाच असतं. कुठलाही एक नियम लावून संसार करणं शक्य नाही. प्रसंगनिष्ठ निर्णय घेत आले पाहीजे. काही निर्णय चुकतात. चुकू द्या. जोडीदाराच्या प्रत्येक कृतीवरून निष्कर्ष काढणं योग्य नाही. कधी कधी परिस्थितीपुढे सगळेच हतबल असतात. संसारात "मी" थोडासा बाजूला ठेवावा.
२. फक्त लग्न न करण्याला पर्याय म्हणून लिव्ह इन राहणे योग्य नाही. काही लोकांचा स्वभावानुसार त्यांनी एकटेच राहिलेले बरे असते. आजकाल फक्त शरीरसुखासाठी लिव्ह इन राहण्याची पद्धत आहे.ते पटत असेल असेल तरच राहा. लिव्ह इन मध्ये जोडीदाराकडून कुठलीही अपेक्षा ठेवता येत नाही. "मी तुझा/तुझी नवरा/बायको नाही" एवढं म्हटलं की झालं.खरं म्हणजे लिव्ह इन ही कल्पना पूर्ण समजावून न घेता ती अंगीकारण्यात आली आहे असं वाटते. लग्न असो किंवा लिव्ह इन, कोणतंही नातं निभावण्यासाठी तशी तयारी हवीच.
३. घटस्फोट होणं खरोखर दुर्दैवी आहे. काही नवरे किंवा बायका खरच सहवासाच्या लायकीचे नसतात. तिथे घटस्फोटा शीवाय पर्याय नाही. पण बऱ्याच केसेस अश्या आढळतात जिथे नवरा बायको मध्ये पटत नसल्यामुळे
त्यांच्यातला संवाद च बंद होतो. त्यामुळे दरी निर्माण होते. शेवटी घटस्फोट घेतल्या जातो. अश्या ठिकाणी कोणी मध्यस्थी केल्यास संसार वाचू शकतो.

राही's picture

18 Feb 2015 - 5:06 pm | राही

प्रतिसाद आवडला.
कधी कधी तत्त्वे बाजूला ठेवून प्रसंगनिष्ठ निर्णय घ्यावे लागतात. जज्मेंटल न होणे, उपदेश न करणे आणि लवचिकता या तीन गोष्टी दृढ नात्यासाठी आवश्यक असाव्यात.

बहुगुणी's picture

18 Feb 2015 - 5:52 pm | बहुगुणी

दोन्ही प्रतिसादांना +१!

आकाश कंदील's picture

18 Feb 2015 - 11:01 am | आकाश कंदील

ब़जरबट्टूशी पूर्ण सहमत

अन्या दातार's picture

18 Feb 2015 - 2:53 pm | अन्या दातार

पहिल्या दोन केसेस ठिक आहेत. तिसरी केस अक्षरशः गॉन केस आहे.

नाही पटल त्याच आणि माझ. एक्चुअली मला करियरसुद्धा हव होत आणि संसारसुद्धा. दोन मूलं तरी हवित अस माझ मत. करियर करणार तर मुलांना कोण सांभाळणार... आणि मग त्याचं वाया जाण... ते टेन्शन.. त्याला ते नको होत. तो म्हणाला मी नोकरी सोडतो... घर मूलं सांभाळतो तू करियर कर; कमव. ते का कोण जाणे मला नाही पटल.

You want to eat the cake and have it too! असे काहिसे आहे. पण त्यावर घटस्फोट हा उपाय वाटत नाही. समजा करीअर हवे आणि मुले नकोत यासाठी घटस्फोट समजू शकतो. पण मुलेही हवीत, त्यांची जबाबदारी तर नको, नवरा कमावणार नाही हेही नको म्हणून घटस्फोट? काय लॉजिक काय आहे यामागे?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Feb 2015 - 3:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

२+२=४ एवढं सरळं गणित जर का मुलींच्या डोक्यानी निघालं असतं तर समस्तं पुरुष जमात सुखी झाली नसती का?
नको तिथे कॉम्प्लेक्सीटी वाढवण्यामधे त्यांचा हात कोणं धरणार? =))

चला पॉपकॉर्न, पिझ्झा, कोक आणि बर्गर मागवतो.

मदनबाण's picture

18 Feb 2015 - 3:38 pm | मदनबाण

२+२=४ एवढं सरळं गणित जर का मुलींच्या डोक्यानी निघालं असतं तर समस्तं पुरुष जमात सुखी झाली नसती का?
प्रचंड अनुमोदन ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर

टवाळ कार्टा's picture

18 Feb 2015 - 5:36 pm | टवाळ कार्टा

तेल, तूप, सरपण, पेट्रोल घेउन बसू का? ;)

प्रशांत बच्छाव's picture

6 Mar 2018 - 1:58 pm | प्रशांत बच्छाव

Kharay

मि सुद्धा लिव इन रिलेशन मध्ये राहिलो आहे, ते हि ३ वेळा, पण एक वेळ अशी येते कि स्त्रि पुरुषान्च्य नात्याला काहितरी बन्धन हे लागतेच नाहितर काचेच्या पेल्या सारखे नाते फुटुन जाते, वरिल लेखामध्ये एक स्त्रि तिच्या जोडिदाराला विचारते तेव्हा तो तिला म्हनतो कि तू काय माझी बायको आहेस का? अस म्हणून मला गप्प् करायचा. ह्या वाक्यातच लिव्ह इन रिलेशन चा पोकळ्पना लक्षात येतो, आणि तो कितपत टिकु शकतो, हे समजते,

मि सुद्धा लिव इन रिलेशन मध्ये राहिलो आहे, ते हि ३ वेळा

बरं मग?

टवाळ कार्टा's picture

18 Feb 2015 - 5:37 pm | टवाळ कार्टा

ते ३ वेळा पस्तावले असे लिहायचे आहे त्यांना

पाणक्या's picture

27 Oct 2016 - 10:27 am | पाणक्या

+1111111111111111

स्पंदना's picture

19 Feb 2015 - 1:22 pm | स्पंदना

काय सूड?
यमगर्नीसारख्या गावातला मुलगा अस काही करतो याच कौतुक राहीलं बाजूला वर आणि "बरं मग?" काय?
आधी कौतुक कर, थोड कुतुहल दाखव, जरा स्वतःला इन्फेरीअ‍ॅरीटी आल्याच दाखव, क्या है उसमे जो मुझमे नहे है? वगैरे फिल्मी स्टायल ओरडुन घे...
ते राहीलं बाजूला
बरं मग? म्हणे.

यमगर्नीसारख्या गावातला मुलगा अस काही करतो याच कौतुक राहीलं बाजूला वर आणि "बरं मग?" काय?
आधी कौतुक कर, थोड कुतुहल दाखव, जरा स्वतःला इन्फेरीअ‍ॅरीटी आल्याच दाखव, क्या है उसमे जो मुझमे नहे है? वगैरे फिल्मी स्टायल ओरडुन घे...
ते राहीलं बाजूला
बरं मग? म्हणे

अर्र!! चुकलंच की!! आता केलं तर उसनं अवसान आणून केल्यागत वाटेल. आता नेक्स्ट टाईम प्रयत्न करतो. पुण्यातलं पाणी पितोय म्हणून की काय देव जाणे; शिंचं दुसर्‍याचं कौतुक, स्वतःबद्दल इन्फेरीअ‍ॅरीटी वैगरे काही वाटतच नाही हो आताशा!! ;)

टवाळ कार्टा's picture

19 Feb 2015 - 2:49 pm | टवाळ कार्टा

पुण्यातलं पाणी पितोय म्हणून की काय देव जाणे; शिंचं दुसर्‍याचं कौतुक, स्वतःबद्दल इन्फेरीअ‍ॅरीटी वैगरे काही वाटतच नाही हो आताशा!!

=))

चिनार's picture

19 Feb 2015 - 3:01 pm | चिनार

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

मदनबाण's picture

19 Feb 2015 - 3:11 pm | मदनबाण

*LOL*

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Feb 2015 - 5:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

किमान दोन-चार खोटे क्लेम टाकले असतेत तरं जास्तं बरं वाटलं असतं. =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2015 - 11:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

पुण्यातलं पाणी पितोय म्हणून की काय देव जाणे; शिंचं दुसर्‍याचं कौतुक, स्वतःबद्दल इन्फेरीअ‍ॅरीटी वैगरे काही वाटतच नाही हो आताशा!!

या असल्या रॉकेटचं इंधन भरलेल्या समिधा कोणत्या दुकानात मिळतात हो ? :)

पिवळा डांबिस's picture

20 Feb 2015 - 1:55 am | पिवळा डांबिस

या असल्या रॉकेटचं इंधन भरलेल्या समिधा कोणत्या दुकानात मिळतात हो ?

'सदाशिव समिधा भांडार'
आमचेकडे रॉकेटचे इंधन भरलेल्या समिधा (आणि परकर!) माफक भावात मिळतात!!!
;)

इंधन भरलेल्या समिधा (आणि परकर!)

बाबौ.

"झेरोक्स आणी घाउक कांदे बटाटे" असा फलक प्रत्यक्ष पाहीलेला... :)

अजया's picture

20 Feb 2015 - 7:46 am | अजया

=))

सूड's picture

20 Feb 2015 - 6:02 pm | सूड

समिधा (आणि परकर!)

झालंच तर दणकट पायजमे, आमसुलं, आंब्याची साटं आणि काही ठिकाणी १०व्या-१२व्याचं जेवण!! ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Feb 2015 - 8:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

दहाव्या-बाराव्याच्या जेवणाची ऑर्डर कमीतं कमी १५ दिवस आधी द्यावी हे लियायचं विसरलात काय?

रंगार्‍याला द्यायचे पैसे आणि बोर्डावरची जागा यात येवढंच मावलं !! ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Feb 2015 - 8:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

खाली कागद लावायचा ना मग!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Feb 2015 - 3:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादातल्या ३ हा आकडा लिव्ह इन रिलेशनशिपची व्यवहार्यता दर्शवतं नै काय?
तिथेचं एक आकडा असता आणि रहातोय असां व्याकरणिक बदल असता तर मी पाठिंबा दिला असता...

जर लिव्ह इन नसतं तर तुम्हाला हा प्रयोग ३ वेळा करणं किती सुलभ राहिलं असतं?

खटासि खट's picture

24 Feb 2015 - 7:11 am | खटासि खट

तीन वेळा ?
आयला तुमची नेमणूक एआयबी चा होस्ट म्हणून करणेत येत आहे.
जोहार !

तीन तर्‍हेच्या व्यक्तिरेखा एकत्र मांडणं आवडलं!!

कंजूस's picture

18 Feb 2015 - 8:30 pm | कंजूस

अशी काही करायचं हे ठरवणाऱ्याचं गणित, होय गणित चुकतंच. कर्मकांड, विधि, कोर्टमैरैजपेक्षाही केवळ एका शब्दावर बायको म्हणून वागवण्याइतकी निष्ठा दाखवणारे पुरूष होतील तेव्हा खरे लग्न होते. कागदोपत्री लिखापढी एक गरज म्हणून ,जगाला पुराव्यासाठी असते.

स्पंदना's picture

19 Feb 2015 - 1:23 pm | स्पंदना

मस्त हो कंजूस काका. मानलं.

जेपी's picture

18 Feb 2015 - 8:34 pm | जेपी

फालतु लेख..
तिसरा तर टोटल फालतु

हाडक्या's picture

18 Feb 2015 - 10:37 pm | हाडक्या

+१ ..
म्हणूनच जास्त शिरेस घेउ नका. ;)

नाखु's picture

19 Feb 2015 - 11:45 am | नाखु

लग्न
लिव्ह इन रिलेशन
घटस्फोट
हे तीनही वेगवेगळ्या व्यक्तीबरोबर व्हावेत म्हणजे आपण लग्न,प्रपंच,बांधीलकी अशा पुरोगामी जोखडातून बाहेर पडून नवमतवादी,क्रांतीकारी वैगरे होतो आणि समाजसुधारणेची धुरा फक्त आपल्यालाच वहायची आहे असा "संक्षी-प्त" साक्षात्कार लवकरच होतो.

चिर्कूट पुरोगामी नाखु.

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Feb 2015 - 2:51 pm | लॉरी टांगटूंगकर

नाद खुळा!!!!!! ==))

सोत्रि's picture

19 Feb 2015 - 9:53 pm | सोत्रि

काही पटले नाही आणि झेपलेही नाही!

- (कमिटेड) सोकाजी

मला फक्त एव्हडेच सान्गायचे होते कि लिव्ह इन रिलेशन हे फक्त सुरुवातिलाच खुप छान वाटते पण कालानतराने त्यातिल गोडवा सम्पुन जातो, आणि लग्नाच्या बाबतित सुधा हेच होते पण लग्नच्या नात्यात सासु सासरे, दिर, ननन्द, भावजय इत्यदि नाति इन्वोल असतात सगळे हसत खेळत, रडत भान्डत एकमेकाना साम्भाळत असतात त्यामुळे आयुष्यातिल गोडवा कधिहि सम्पत नाहि. पण लिव्ह इन रिलेशन मध्ये हि सर्व नाति नसतात आणि मुख्य म्हणजे नात्याला बन्धन नसते त्यामुळे आकर्षन सम्पले कि नाते लवकरच संपुष्तात यायला सुरुवात होते. त्यामुळे लिव्ह इन रिलेशन वर पुर्ण आयुष्य निघन्याचि स्वप्ने कधिच बघु नये. त्यासाठि लग्नाला पर्याय नाहि, पण तरिहि आयुष्यात एकदा का होइना लिव्ह इन रिलेशन चा अनुभव घ्यावा. ( ते हि लग्नच्या आधि आणि ते हि हिंमत असेल तरच ) त्या नात्यातुन जो आनन्द मिळतो त्याचि तुम्हि आयुष्यात कोण्त्याहि नात्याबरोबर तुलना करु शकनर नाहि.

त्या नात्यातुन जो आनन्द मिळतो त्याचि तुम्हि आयुष्यात कोण्त्याहि नात्याबरोबर तुलना करु शकनर नाहि.

हो तर !! आता तुम्हाला तीन-तीनदा तो अनुभव घ्यावासा वाटला म्हणजे खरंच काहीतरी आनंद असणार त्यात, हे ओळखण्याइतके हुश्शांर आहेत मिपाकर.

स्वगतः चला, आता लिव्हईन साठी कोणीतरी शोधणे आले.

त्यांचं तात्पर्य आहे की लगीन करा म्हणजे दोघांनाही सासू-सासरे (आणि तुमाला म्हेवण्या, करवल्या इ.इ.) वगैरे नवीन गोग्गोड नाती मिळतात आणि त्यांच्यासोबत हसत-खेळत (लिव-इन मध्ये हे काय हसत-"खेळत" नव्हते काय मग?) उरलेले आयुष्य व्यतित (व्यथित?) होते. (शंका : हे कोणत्या मालिका बगतेत?).
सूडा, यातून योग्य तो बोध घे.

[अवांतर : यांनी ३-३ लिव-इन मध्ये राहून पण त्यांना सहचार्याचा अर्थच नाय कळाला तर लग्न करुन काय वेगळे होणारे. त्यांनी जे लग्नाच्या संदर्भात मुद्दे मांडलेत ते अत्यंत तकलादू आहेत आणि समाजात लिव-इनला सढळ मान्यता मिळाली तर टिकणारे नाहीत असे नमूद करतो.]

सूडा, यातून योग्य तो बोध घे.

काय बोध घ्यावा ते समजवून सांगा गुरुवर्य!!

हाडक्या's picture

20 Feb 2015 - 9:59 pm | हाडक्या

ह्या ह्या ह्या.. आमचीच खेचा राव. ;)
खाली पैसातैनी सांगितलाय बघ..

शादी का लड्डू, खाए वो पछताए, ना खाए वो भी पछताए.

>>ह्या ह्या ह्या.. आमचीच खेचा राव.
खाली पैसातैनी सांगितलाय बघ..

त्या अशाच बोलल्या असतील, कोणाला उद्देशून नव्हे.

कपिलमुनी's picture

23 Feb 2015 - 6:04 pm | कपिलमुनी

बहुधा "चांगल्या दिसणार्‍या मेव्हण्या असलेल्या ठिकाणी लग्न करा " असा बोध असेल

तरिहि आयुष्यात एकदा का होइना लिव्ह इन रिलेशन चा अनुभव घ्यावा. ( ते हि लग्नच्या आधि आणि ते हि हिंमत असेल तरच ) त्या नात्यातुन जो आनन्द मिळतो त्याचि तुम्हि आयुष्यात कोण्त्याहि नात्याबरोबर तुलना करु शकनर नाहि.

क्या बात है ! हे अस्सं पाहिजे .
मग तीन नंतर तुम्ही लग्नं केले की चौथ्याच्या प्रतिक्षेत ?

पैसा's picture

20 Feb 2015 - 7:48 pm | पैसा

शादी का लड्डू, खाए वो पछताए, ना खाए वो भी पछताए.

सिरुसेरि's picture

21 Feb 2015 - 12:18 am | सिरुसेरि

खोळंबा होतोय हे मीही मान्य करतो . पण येथे वैयक्तीक सोय गैरसोय बघून चालणार नाही .

तंबाखू वाल्या मलूष्ट्याचा काय रे तो ?

"लिव इन रिलेशन करून मग पटलं तर लग्न करायचं" अशी काही कल्पना काही लोकांनी करून त्यावर चर्चा घडत असेल तर वेळ वाया घालवत आहेत असं मला वाटतं. इकडे मोठ्या शहरांत नोकरीनिमित्ताने आलेले तरुण खोलीत एकत्र राहतात तसे परदेशात मुलं मुली राहतात. त्यांचा लग्न करायचा हेतू असतोच असं नाही अथवा आपले स्वभाव जमले तरच नंतर लग्न करू असंही नसावे ते कोणत्या कारणाने एकत्र राहतात हे कसं कळणार?

कंजूस काका स्वतः पाहिलेले आहे म्हणुन सांगते.
अतिशय चांगले आणि एकमेकाला जपून रहातात भारतातली पोर आणि पोरी सुद्धा. स्वयंपाक बनवताना भात लावणे डाळ लावने, कांदा कापणे ही कामे मुलांची, फोडण्या टाकणे आणि पोळ्या लाटने मुली. प्रत्येकजण आपापली प्लेट घेउन धुवुन तर ठेवतओच, पण साफसफाईसुद्धा वयवस्थीत करतात. मुलींना बेडरुम झोपायला देउन मुले हॉल मध्ये रहातात. रोज एकाने असे वॉशींग मशीन वापरतात. आणी एकमेकाबद्द्ला भरपूर आदर सुद्धा ठेवतात. मी पाहिलेल्या मुली त्या मुलांवर आरामात विशवास ठेवुन होत्या. ऑफीसला सगळ्यांनाच पळायचे असते. त्यानुसार तयार होणे आणि होउ देणे, अडीअडचणीला मदत करणे. निदान मी जे पाहिल तेव्हढ्याने मला भारतिअय मुल चांगली असतील तर चांगलीच रहातात हे कळल.
वाईट म्हणाल तर माझ्या नवर्‍याबरोअबर एक सरदारजी होता तो जरा ऑफीसातल्या पोरी आणणार आहे रुमवर जरा वेळाने या वगैरे म्हणायचा. (ही नेदरलँडस्ची गोष्ट) बाकी सिंगापुरात नुसत्या प्रोजेकट साठी आणलेली आणी एकाच फ्लॅट मध्ये कोंबलेली ही मुलं मुली अगदी व्यवस्थीत राह्यलेली पाह्यली आहेत.

वाईट म्हणाल तर माझ्या नवर्‍याबरोअबर एक सरदारजी होता तो जरा ऑफीसातल्या पोरी आणणार आहे रुमवर जरा वेळाने या वगैरे म्हणायचा.

पोरी अन सरदारजी यांचा राजीखुशीचा मामला असेल तर यात वाईट नक्की काय आहे ते कळालं नाही. असो.

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 3:26 pm | टवाळ कार्टा

असे नस्ते विचारायचे...आप्ली महान भारतीय संस्कृती वगैरे वगैरे आठव बरे आणि भले राजीखुशीचा मामला असो...भारतीय म्हैलांच्या मते ते एका अबलेचे शोषण"च" अस्ते

पुर्षांचे सुख जर्रा म्हणून बघ्वत नै या म्हैलांना

सूड's picture

23 Feb 2015 - 3:29 pm | सूड

भारतीय संस्कृती

म्हणजे नक्की कोणती? वि का राजवाड्यांनी पुस्तकांत मांडलेली, मंदिरांवर चितारलेली की ब्रिटीश राजवट आल्यानंतर सोवळ्यात नेऊन ठेवलेली?

बॅटमॅन's picture

23 Feb 2015 - 3:36 pm | बॅटमॅन

भारतीय संस्कृती म्हणजे संस्कृतीच्या नावाखाली गाळ खपवणार्‍यांच्या मनात असते ती. भारतीय संस्कृती म्हणजे डेली सोप वगैरेंमध्ये दिसते ती.

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 3:38 pm | टवाळ कार्टा

तुला हवी ती घे :)

बॅटमॅन's picture

23 Feb 2015 - 3:37 pm | बॅटमॅन

ते बरीक खरंच म्हणा.

बाकी अधोरेखित भागाच्या अंशतः अर्थनिर्णयनाबद्दल काही अतिरोचक शक्यता मनात येऊन डोळे पाणावले.

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 3:40 pm | टवाळ कार्टा

अधोरेखित भागाच्या अंशतः अर्थनिर्णयनाबद्दल काही अतिरोचक शक्यता >> व्यनीतून सांग बरे कसें :)

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 3:41 pm | टवाळ कार्टा

जल्ला सम्ज्ला मला =))
पण तिकडे असे कर्णे म्हणजे लंगरमध्ये पैसे देउन जेव्णे ;)

बॅटमॅन's picture

23 Feb 2015 - 3:47 pm | बॅटमॅन

=))

त्यामुळे "**क शोषणाबद्दल तक्रार" वगैरेबद्दल अंमळ कन्फूजनच व्हायचं अगोदर, पुढे मग कळालं काय ते. =))

सूड's picture

23 Feb 2015 - 3:48 pm | सूड

__/\__

बट्टमणास लगाम (कसला ते समजून घेणे) लावण्याची तीव्रतेने गरज आहे असे नमूद करतो..
सुटला म्हणजे काय बिरेकच नाय अजाबात.. :))))

काय राव, सुटल्यावर थांबावे म्हटले तर तुम्हीच लोकं रस्त्यावर तेल ओतू र्‍हायला. कस्सा राव थांबू??????????

स्पंदना's picture

23 Feb 2015 - 3:53 pm | स्पंदना

कंजूस काकांच्या पोर पोरी एकत्र रहातेत या प्रतिसादाला दिलेला उपप्रतिसाद होता तो.
अन सरदारजीला पोरी पटत होत्या, अन माझ्या नवर्‍याला नव्हत्या पटत याचा निव्वळ राग हो तो. त्यात अबलेचे शोषण वगैरे काऽऽऽही नाही बघा!! निव्वळ जेलसी बघा की वो सरदारजीमे क्या है जो मेरे नवरे मे नही है॥।

*crazy*

बॅटमॅन's picture

23 Feb 2015 - 3:57 pm | बॅटमॅन

अच्चं जालं तल.

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 4:04 pm | टवाळ कार्टा

तुम्हारे नव्रे के पास तुम हय
येईच भोत ज्यादा हय =))

हा प्रतिसाद वाचून आमच्या स्पाला इतकी प्रगत विचारांची आंतरजालीय सासू मिळालेली पाहून जीव भांड्यात पडला. पोरगं घाटावर पाठवायचं कसं हा प्रश्न पडला होता, हा प्रतिसाद वाचून मी डोळे मिटले तरी चालेल असं वाटतंय!!

हाडक्या's picture

23 Feb 2015 - 5:00 pm | हाडक्या

हा प्रतिसाद वाचून मी डोळे मिटले तरी चालेल असं वाटतंय!!

हापिसात डोळे मिटूनच असतोस म्हणे बहुतेक वेळ.. ;)

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 5:05 pm | टवाळ कार्टा

ते कोणाचा सूड कधी, कसा, कितीवेळ घ्यायचा याचे चिंतन-मनन करत अस्तील :)

म्या घरजावाय करुन घिन आस कदी म्हनलो?
काय आटवत न्हाय गा!!
म्या आपली मनात सोडे, करंदी तोडतेय. पोरगी दीन, आन निवांत सा सा म्हयने मास्ळी, काजू खाईन.
शेवटी चिक्काट कोकणी ती कोकणीच. माझ्याच गळ्यात बांधुन रिकामी, ल्येक ती ल्येक, वर आणि येक!१

न्हाय बा. काय जमल आस वाटत न्हाय बा.

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 5:27 pm | टवाळ कार्टा

ल्येक ती ल्येक, वर आणि येक!१

=))

काय जमल आस वाटत न्हाय बा.

ह्या निर्णयावर आता ठाम राह्यचं, नो चीटींग !! *mosking*

स्पंदना's picture

24 Feb 2015 - 7:56 am | स्पंदना

आस कस? आस कस?
कोकण्यांनीच कोकण्यांच्यी सासवा पळवुन लावल्या तर कस व्हायच?

तशीही मी हटले की पैजारबुवा धामणी घेउन तयार आहेतच. त्या बांधायच्या का गळ्यात?

तशीही मी हटले की पैजारबुवा धामणी घेउन तयार आहेतच. त्या बांधायच्या का गळ्यात?

पैजारबुवा, ते दोन पर्वचनाच्या क्याशेटी लावून दिल्या तं गप बसत्याल. पर कोल्लापूरी सासू? नगं!! तिची क्याशेट कोन आयकायचं आनी!! ;)

मृत्युन्जय's picture

23 Feb 2015 - 6:36 pm | मृत्युन्जय

पोरी अन सरदारजी यांचा राजीखुशीचा मामला असेल तर यात वाईट नक्की काय आहे ते कळालं नाही. असो.

खरय. आणि सरदारजी स्वतःचाच बेड आणि बाथरुम (आणी अजुन काय काय) वापरत असेल तर. ;)

बाथरुम वरुन आठवलं. हा सरदारजी आठवड्यातुन एकदा केस ते बुचडं सोडून धुवायचा. आख्खा टब भरायचा म्हणे केसाने. :(
अक्षरशः ब्रशने केस गोळा करुन टाकायचा डस्ट्बिन मध्ये. मग ते केस सुकवणे आणि त्याची परत ती बुचडी, आणि मग रुम पार्टनरला (हो. नवराच. माझाच ;) ) दुअसर टोक धरायला लावुन रोज ती पगडी बांधणे!!

आणी बेड जरी बेगळा असला तरी रुम वरुन फोन येइस्तो नवर्‍याला बाहेर कुडकुडत रहावं लागायच ना?

खटपट्या's picture

24 Feb 2015 - 10:04 am | खटपट्या

अगदी अगदी.
गेले वर्षभर सरदारा बरोबर रहात होतो. :)

म्हया बिलंदर's picture

23 Feb 2015 - 11:45 am | म्हया बिलंदर

हे "अलग" सहसा पचनी पडत नाही पण "अलग"चं अस्तित्व नकारता हि येत नाहि.
बाकी उपकार मधले प्राण मुखी मन्ना दा आठवले.

हे बघा, झोड्पणार नसाल तर आमचं अमूल्य मत इथे मांडायला आमची तयारी आहे.

लिव्ह इन हि कल्पना काही काळ ठीक असली तरी स्त्रीच्या कमी फायद्याची आणि पुरुषाच्या जास्त फायद्याची आहे असे स्वानुभवाने सहज सांगू शकते. किमान काही तरी लेखी करार असणे महत्वाचे आहे. २०-२५ वर्षे पर्यंत निव्वळ सौन्दर्य आणि तारुण्याचा जोरावर कुठलीही स्त्री रिलेशनशिप मध्ये वर्चस्व गाजवू शकते पण ३० वर्षे झाली कि स्त्रीची शेल्फ value झपाट्याने कमी होत जाते. बायॉलॉजिकल क्लॉक झपाट्याने "मूल" ह्या गोष्टीसाठी अडॅप्ट होऊ लागते. अशा काळांत पुरुषाची साथ असणे महत्वाचे आहे पण लिव्ह इन मध्ये ३० वर्षे उलटून गेलेल्या पुरुषाने त्या संबंधात राहणे माझ्या दृष्टीकोनातून तरी फार इरेशनल आहे. ३५ वर्षे उलटून गेली कि मॅरेज मार्केट मधील स्त्रीची किंमत शून्य.

सुबोध खरे's picture

27 Oct 2016 - 10:35 am | सुबोध खरे

अहो ताई
सत्य इतकं उघड आणि ढळढळीतपणे लिहू नका.
परंपरा विच्छेदक स्त्रीत्ववादी आणि स्त्रीमुक्तीवाद्यांची इ इ ची गोची होते.

संदीप डांगे's picture

27 Oct 2016 - 10:45 am | संदीप डांगे

=))

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2016 - 11:07 am | टवाळ कार्टा

तुमच्यावर पण आता शिक्के मारायची तयारी सुरु झाली असेल ;)

नाखु's picture

27 Oct 2016 - 11:13 am | नाखु

पण वास्तवता आणि समाजाची आज (इतरांकडे)पाहण्याची वस्तुस्थीती (पुस्तकी आदरश्वाद बाजूला ठेऊ) ध्यानात ठेऊन दिलेला प्रतिसाद आवडला आणि त्या प्रांजळपणाबद्दल अभिनंदन.