डु आयडी आणी चपला

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in काथ्याकूट
28 Jan 2015 - 6:39 pm
गाभा: 

आज बर्‍याच काळाने सुहासची आठ्वण झाली म्हणुन म्हटले एक खरड टाकुयात. आजकाल त्याचे प्रतिसादही दिसत नाहित. त्याच्या नावावर टिचकी मारली तर कळाले की मला त्याच्या खवत डोकावयाचा अधिकार नाही. थोडीफार इकडे तिकडे विचारणा केली असता असे कळाले की सुहास बॅन आहे. हे मला नविनच होते. सुहासने बॅन होण्यासारखे नक्की काय केले हे कळेना. तसा तो थोडा फटकळ आहे पण बॅन करावे असे काही त्याने केले असेल असे माहिती नव्हते. थोडी अजुन चौकशी करता कळाले की विमे आणि संक्षी सुद्धा बॅन आहेत. विमेंचेही तेच. फटकळ आहे पण भाषा नेहमीच जपुन वापरतो. मग एकदम काय झाले?

एकीकडे तर मिपावर प्रवेश संपादित असुनही भारंभार डु आयडी निघतात आणि दुसरीकडे जेन्युइन लोक बॅन होतात. हे काय गौडबंगाल आहे? त्यातपरत सुहास, विमे, संक्षी वगैरे डु आयडी घेउन काड्या घालणार्‍यातले नाहित म्हणजे मग या कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या आहेत त्या यांच्या नाहित. जर हे डु आयडी चालतात तर मग जेन्युइन लोक का नाहित?

मिपावर प्रवेश संपादित असतानाही (आता नसेल तर मला माहिती नाही. पुर्वी तरी होता) हे डु आयडी (सरळसरळ नामसाधर्म्य असणारे) कसे तयार होउ शकतात?

मिपावर जर लोक बॅन होणार असतील तर त्यांना का बॅन केले आणि कधी (आणी कोणाकोणाला) हे देखील लोकांना कळायला हवे. किमान इतर लोक त्याच चुका परत करणार नाहित.

डु आयडींना पायघड्या आणि इतरांना चपला असा प्रकार मिपावर जाणुनबुजुन होणार नाही ही कल्पना आहे. पण मग जालीय हत्या झालेल्या आयडींचे अपराध तरी लोकांना कळाले पाहिजेत आणि डु आयडींना बॅनही केले गेले पाहिजे असे मला तरी आपले वाटते.

सुहास, संक्षी, विमे वगैरे बॅन नसतील आणी माझी माहिती / समजूत चुकीची असेल तर आनंदच होइल.

इतरांची मते जाणुन घेण्यास उत्सुक

आपलाच नम्र

मृत्युं जय

प्रतिक्रिया

बाकीच्यांचं माहीत नाही, पण (बहुतेक) मनसेच्या ब्ल्यूप्रिंटच्या धाग्यावर सुहास यांची भाषा मला तरी आक्षेपार्ह वाटली होती.

संक्षींच्या शोधात मीही आहे.

बॅटमॅन's picture

28 Jan 2015 - 6:48 pm | बॅटमॅन

अगदी असेच म्हणतो.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

29 Jan 2015 - 9:25 am | जेम्स बॉन्ड ००७

मी पण संक्षी कुठे गायबले हाच विचार करत होतो. :(

मी-सौरभ's picture

28 Jan 2015 - 6:54 pm | मी-सौरभ

सं. मं. च्या अपेक्षित प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत आहे.

विमे बॅन आहे ऐकून नवल वाटलं!! बॅन होण्यासाठी फटकळपणा हा निकष असेल तर दुसर्‍यांनी जा सांगण्या आधी आपण निघून जावं का असा विचार करतोय!!

बॅटमॅन's picture

28 Jan 2015 - 7:05 pm | बॅटमॅन

सेम हिअर.

विलासराव's picture

28 Jan 2015 - 7:19 pm | विलासराव

परवाच विमे आनी प्रास यांच्याबरोबर एक कट्टा झाला पण हा विषय काही झाला नाही.

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2015 - 2:20 pm | श्रीगुरुजी

>>> विमे बॅन आहे ऐकून नवल वाटलं!!

"विमे" नक्की कोणत्या आयडीचे लघुरूप आहे? खालील अनेक प्रतिसादात "विमे" या आयडीचा उल्लेख आहे. हा नक्की कोणता आयडी ते लक्षात येत नाहीय्ये.

स्वामी संकेतानंद's picture

29 Jan 2015 - 2:24 pm | स्वामी संकेतानंद

विमे = विश्वनाथ मेहेंदळे असतील, बहुतेक.

अन्या दातार's picture

29 Jan 2015 - 3:08 pm | अन्या दातार

...

hitesh's picture

28 Jan 2015 - 7:35 pm | hitesh

कोण जेनुन व कोण आक्षेपार्ह हे संपादक ठरवतात. तुम्हाला ते जेन्युन वाटतातम्म्हणए संपादकाला तसेच वाटत असतात का ?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Jan 2015 - 10:12 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हेच म्हणते.कंपूबाजी करून आक्षेपार्ह लिखाण करणार्यांना बाहेरचा रस्ताच दाखवायला हवा.

( नाना नेफळाप्रेमी )

जेम्स बॉन्ड ००७'s picture

29 Jan 2015 - 9:30 am | जेम्स बॉन्ड ००७

बरं, कंपुबाजी न करता एकट्याने केलेल्या आक्षेपार्ह लिखाणाबाबत आपलं मत काय?

मृत्युन्जय's picture

29 Jan 2015 - 11:15 am | मृत्युन्जय

बरोबर आहे. इतरांना जेन्युइन वाटणारा प्रत्यक्षात डुअ आयडी होता म्हणुन उडवला गेला असेल तर उत्तमच. पण सुहासला आणी विमेंना प्रत्यक्षात ओळखणारे इथे ढीगाने सापडतील (त्यात काही संपादकही असतील). तर मग ते डु आयडी कसे? विमे आणि सुहासचे डु आयडी नसतीलच याची काही मी ग्वाही देत नाही (नसावेत असे वाटते खरे). पण मग त्या डु आयडींना बॅन करा ना विमेला कशाला?

दूसरी गोष्ट तुम्ही विसरलात की डु आयडींना त्वरेने चपला द्याव्यात अशी सूचनाही मी केलेली आहे.

तिसरी गोष्टे जेन्युइन म्हणजे फक्त जेन्युइन माणूस नाही तर जेन्युइन अप्रोच असलेला माणूस. कोण जेन्युइन आहे ते अर्थात अमाझे मत आहे. संपादकांचे तसे असेलच असे नाही. पण जे जेन्युइन नाहित ते जेन्युइन नाहित याबद्दल बहुतेक सगळ्यांचे (बरेच संपादक धरुन) एकमत असताना अश्या कुत्राच्या छत्र्या कश्या टिकतात असा मुख्य प्रश्न आहे.

फक्त फटकळपणा हा निकष असेल असं वाटत नाही. ताकिद देऊनसुद्धा परत परत त्याच चुका करणे हा मुख्य मुद्दा असावा. बाकिच्या दोघांचं माहीत नाही पण संक्षी गेले यात नवल नाही. जरा उशीरच झाला त्याला पण 'देर आये दुरूस्त आये'.
असो

मला वाटलेलं संक्षी स्वतःच गेले सोडून....?

बॅन की काय ते कसं कळतं?

प्रास's picture

28 Jan 2015 - 11:27 pm | प्रास

आता बर्‍याच दिवसांनी मिपावर प्रतिसादाला येणं होतंय. मध्यंतरी पारच येणं उणावलेलं.

धाग्यावरईल प्रतिसादात विलासरावांनी उल्लेख केलेला असल्यामुळेच स्वतंत्र लिहितोय.

विमेंना बॅन केल्याचं महिन्यांपूर्वीच समजलं. त्यानंतर वाचनमात्र राहून साद-प्रतिसाद वाचले. व्यक्तिश: मला तरी कुठेही विमेंचा (त्यांना साजेसा) जहाल प्रतिसाद दिसला नाही. त्यामुळे त्यांचं बॅन होणं हे निदान मला तरी आश्चर्यकारक वाटलं आणि वाटतं. मृत्युंजयरावांनी आज विषयाला वाचा फोडलेली पाहून माझं मत व्यक्त केल्याशिवाय राहवलं नाही म्हणून हा प्रतिसादप्रपंच.

संपादकांचं काम कठीण असतं, त्यांच्यामागे फार व्याप असतात, ते लष्कराच्या भाकर्‍या भाजता भाजता हौसेने काम करतात आणि मला त्याबद्दल त्यांचा अतीव आदर वाटतो पण तरीही आयडी बॅन करताना, जाहिरपणे यावर काही लिहिणे शक्य नसेल तर निदान व्यनिच्या माध्यमातून तरी (जे मालकांनी सढळ हस्ते वारण्यासाठी प्रदान केलेलं आहे) ते त्या त्या आयडीला कळवणे, शक्य झाल्यास त्याची कारण-मीमांसा सांगणे आवश्यक वाटते.

अन्यथा भारंभार आयड्यांच्या जन्माला आपण कारणीभूत तर होत नाही आहोत ना, याचा संमंने विचार करावा.

तूर्तास इतकं पुरे.

विमेंच्या प्रतिसादात व्यक्ती विरोधापेक्षा, मतांचा विरोध जास्त जाणवतो.

विमेंची आणि माझी २-४ वेळा भेट झाली.कधी "मिपा"कर म्हणून तर कधी "ऐअ"कर म्हणून...आणि प्रत्येक वेळी विमे व्यक्ती म्हणून जास्त आवडत गेले.

अर्थात एखादी व्यक्ती प्रतिसादात जशी दिसते, तशी नसते.प्रत्यक्षात वेगळी दिसतेच.

"संक्षी" बाबत पण हाच अनुभव घेणे बाकी आहे.ह्या वेळी जमल्यास संक्षींना पण नक्कीच भेटेन.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Jan 2015 - 3:00 am | निनाद मुक्काम प...

माझ्यामते वोट्स अप वर मिपा किंवा संपादकांच्या विषयी लिहिणे हे कारण असू शकते का
काही कळत नाही.
बाकी माझ्यामते मिपावर दरवेळी ज्याला प्रवेश बंद केला जातो त्यासाठी घोषणा केलीच जाते असे काही धोरण परंपरा प्रथा नाही
माझ्यामते व्यनि मधून काय लिहिले जाते ते इतरांच्या साठी अज्ञात असते.
अवांतर
मला कधीकाळी ताकीद मिळाली होती तेव्हापासून मी एकदम गुणी बाळासारखा राहतो. माझा वाद संपादक मंडळाशी काहीही नव्हता , ज्यांच्याशी होता त्यापैकी कितीतरी परागंदा झाले काहींनी स्वखुशीने तर काहींचे सक्तीने अवतार समाप्त झाले.
काहींनी दुसरीकडे दुकान थाटले.
ह्या पोस्टमुळे जुना इतिहास आठवला , सल्ला देऊन गार करणारे सल्लागार आठवले आणि बरेच काही आठवले ,
एवढे मात्र नक्की गेल्या एक वर्षात निदान माझ्या पाहण्यात मिपावर राडा झाला नाही ,
एखादी चर्चा वाद वाढले तरी भाषेची पातळी व पोत कायम राहिला. उदा चार्ली चा लेख ...
कंपूबाजी कधीच इतिहासजमा झाली , कुणाच्या नावाने कैवार घेऊन भांडायला येणारे हवशे नवशे अंतर्धान पावले.

अती अवांतर काही अतिशय जेष्ठ मिपाकारणी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. त्यामागील कारण त्यांनाच विचारले तर मिपाचे धोरण पटले नाही असे उत्तर दिले मी तपशीलात गेलो नाही
च्यायला
गुमान लेख लिहा हव तर जिलब्या पाडा , प्रतिसाद ,उपप्रतिसाद द्या , वाद घाला
दोन द्या दोन द्या
थोडक्यात सामान्य मिपाकर बनून राहिलो तर मिपाचे नियम व धोरण व सम ह्यांच्यात खुपण्यासारखे मला तरी काहीच आढळले नाही.
अती अती अवांतर
ह्या निमित्ताने अजून कोण कोण हद्दपार झालेले आहेत ते तरी कळूदे

ते सल्लागार असून, उगाच्च काड्या करणारे जास्त, असतात.

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2015 - 1:55 pm | प्रभाकर पेठकर

निनाद,

दोन द्या दोन द्या

पॉलीसी आवडली. (खरं पाहता त्यामागील प्रांजळपणा).

अविनाश पांढरकर's picture

29 Jan 2015 - 4:24 pm | अविनाश पांढरकर

एखादी गोष्ट आवडली तर आवर्जुन सांगा
.
.
नाही आवडली तर मनात ठेवा……

आतिवास's picture

29 Jan 2015 - 12:41 am | आतिवास

म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण़ काळ सोकावतो...!!

अस्वस्थामा's picture

29 Jan 2015 - 2:11 am | अस्वस्थामा

एक शंका म्हणून विचारतो,
एखाद्या आयडीस बॅन करण्याची प्रोसेस काय असते ? त्या आयडीला आधी पूर्वसूचना वगैरे दिली जाते का ?
बॅन करण्याची कारवाई कोणीही संपादक करु शकतो की संपादकांची टीम ते ठरवते?
जर एखाद्यास हा निर्णय अन्यायकारक वाटला तर तक्रारीसाठी काय व्यवस्था, नियमावली आहे?

इथे संपादकांविषयी कोणताही आक्षेप अथवा आकस नसून शक्य तितकी पारदर्शक व्यवस्था होण्यास मदत म्हणूनच हे प्रश्न उपस्थित करतोय.

सुहासचा ब्लु प्रींट संदर्भात अत्यंत गलिछ प्रतिसाद त्याला बॅन करायला कारणीभूत झाला काय माहित नाहि. विमेंकडुन तर काहिच आक्षेपार्ह वाचल्याचं आठवत नाहि, बहुतेक विमे जास्त वाचलच नाहि मी. संक्षी मर्यादा सोडायचे बरेचदा, पण बॅन होण्यालायक त्यांनी काय केलं असावं?
यांच्या बॅन होण्याची नेमकी कारणं बहुतेक कधिच कळणार नाहित.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2015 - 4:19 am | मुक्त विहारि

विमे हे वाचण्यापेक्षा भेटण्यातच जास्त खुलतात.

मला तरी विमेंचा अनुभव खूपच उत्तम आला.

विमेंचा प्रतिसाद व्यक्तीशः न घेता स्वभावतः घेतलात तर, विमें सारखा माणूस नाही.

मला पण सुरुवातीला विमेंचे, इतर धाग्यांवरील प्रतिसाद पचवायला जडच गेले. पण प्रत्यक्ष भेटल्यानंतर प्रतिसादा मागचे त्यांचे अंतःकरण उलगडत गेले आणि आमच्यातले वाद पण मिटले आणि सुसंवादाकडे वाटचाल सुरु झाली.

प्रत्यक्ष समोरासमोर भेटून, मतभेद दूर करायला पाहिजेत, हे परत एकदा पटले.

एकदा सुनील बरोबर आणि एकदा विमेंच्या बरोबर.

एक दोन भेटीत माणसाला काय पारखतात मूवी, साला आपण फयान झालोय ह्या स्कील चे

इमे काका , वाचताय णा

धन्यवाद.

सुनील's picture

29 Jan 2015 - 4:17 pm | सुनील

प्रत्यक्ष समोरासमोर भेटून, मतभेद दूर करायला पाहिजेत, हे परत एकदा पटले.

एकदा सुनील बरोबर आणि एकदा विमेंच्या बरोबर

अरेच्चा! आता हे कधी झालं?

एक झटपट कट्टा ठरवा न् टाकू मिटवून काय म्त्भेत वैग्रे असतील ते!!

काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या - हाकानाका ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 7:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सं.क्षिं.चा आयडी अनब्लॉक कधी होणारे? आणि माझ्या वाचण्यात तरी आजवर विमेंकडुन काही आगळीक घडलेली नाही. स्पष्टवक्तेपणा आणि चांगल्या शब्दात आपली मतं मांडणं ही आगळीक होऊ शकत नाही. असो.

hitesh's picture

29 Jan 2015 - 8:44 am | hitesh

संपादक जेण्व्हा आयडी उडवतात तेंव्हा त्याचे आक्षेपार्ह लिखाणही उडवतात.. त्यामुळे कंपुला असेच वाटणार की आमचं बाळ गुणी होतं तरीही उडालं.

मृत्युन्जय's picture

29 Jan 2015 - 11:09 am | मृत्युन्जय

बरोबर आहे. म्हणुनच कंपुल किंवा इतरांना असे वाटु नये आणि त्यांनी त्या चुका परत करु नये यासाठी कारण कळाले तर बरे होइल असेच लिहिले आहे मी पण

पिंपातला उंदीर's picture

29 Jan 2015 - 9:04 am | पिंपातला उंदीर

सुहास ने आक्षेपार्ह भाषा वापरली हे मान्य . पण त्या धाग्यावर टोळीने शिकार करण्याचा प्रकार होत होता . मनसे ने नाशिक मध्ये राष्ट्रवादी / कॉंग्रेस चा पाठींबा कसा घेतला यावरून आणि इतर काही मुद्द्यावरून त्याला एकटे पाडून कोंडमारा करण्यात आला . cornered झाल्यावर जनावर पण आक्रमक होत हा तर हाडा मांसाचा माणूस होता . (भयानक विरोधाभास म्हणजे मनसे ने घेतलेल्या पाठीम्ब्याला 'अनैतिक' आणि नाही नाही ते विशेषण देणारी चौकडी विधानसभा निवडणुकी नन्तर भाजप ला राष्ट्रवादीने दिलेला पाठींबा कसा योग्य आहे हे सांगणारे द्राविडी प्राणायाम करणारे प्रतिसाद देऊ लागले आणि काही विद्वान गायब झाले . दुर्दैवाने हि कसरत बघायला इथे सुहास नव्हता. असो ) . बाकी विमे कोण होते हे माहित नाही आणि संक्षी तर संक्षी होते त्यामुळे त्यांच्याबद्दल पास . बाकी मला व्यक्तीशः आय डी मागच्या व्यक्ती जाणून घेण्यात फारसा रस नाही . I am not here to make friends . बाकी कुठल्या हि आय डी च्या नसण्याने कुठल्या हि संस्थळाला फरक पडतो असे वाटत नाही . हा जनांचा प्रवाहो कुणाच्या असण्या वा नसण्याने थांबणार नाहीच . संपादकांनी हे जे कठोर निर्णय घेतले त्यामागे नक्कीच valid कारण असणार यावर माझा विश्वास आहे . Lets give Devil its due .

जेपी's picture

29 Jan 2015 - 9:58 am | जेपी

माझे मत सुहास.. ला बॅन करण्याबद्द्ल आहे.पेशावर नामक धाग्यावर सुहास.. ला खालील प्रतिसाद आलता.
हा सुहास डोक्यावर पडलाय . अभ्यास नाय काय नाय , उगाचच कशाला पण काय पण चिकटवतो .
त्यांनतर मनसे च्या धाग्यावर ही असेच व्ययक्तीक भाषा वापरली गेली.
त्यानंतर सुहास ने आक्षेपार्ह भाषा वापरली.
त्यांची भाषा चुकली हे मान्य आहे.पण आंतरजालावरील माहिती वाचुन स्वतःला शहाणे समजणारे लोकांनी,
जमिनीपातळीवर काम करणार्‍याची अक्कल काढु नये.
* हे मत माझे वेयक्तीक आहे *

चौकटराजा's picture

29 Jan 2015 - 10:18 am | चौकटराजा

आपल्या आजच्या जीवनशैलीत एकाच सोसायटीमध्ये अति भिन्न प्रकारचे लोक रहात असल्याने वाडा संस्कृति प्रमाणे आज काल, घरोबा, खास मैत्रिण, खास दोस्त ही प्रकरणे संपत चालली आहेत. एक माणूस पाच वर्षात पाच पाच कंपन्या बदलण्याची जीवनशैली निर्माण झाल्याने कार्यलयातील दीर्घ मैत्री ( वा शत्रूत्व ) आता शक्य नाही. सबब आपला समानधर्मा सापडविण्यासाठी लोक सोशल नेटवर्किंग साईटसचा उपयोग करू लागले आहेत. अशामुळे आपण मिपा सारख्या ठिकाणी येतो.मला इथे काही खरोखरच असे लोक भेटले .उदा. चित्रगुप्त, इस्पिक एक्का . जे माझ्या वयाचे आहेत. मनमिळाउ आहेत. हे सुख मला नातेवाईकात मिळत नव्हते. आमच्या बिल्डिंग मधे ही नाही.काही वेळेस या मिपाचा माहिती मिळण्यासाठी, काही मदतीसाठी ही उपयोग होतो. ( उदा. मधुरा देशपांडे यांनी मला काही माहिती देणे ) .काही बाबतीत जिव्हाळ्याने, पोटतिडीकीने चर्चा होणे इथे अपेक्शित आहे. तशी करणारे श्री गुरूजी, क्लिटन, विकास इथे आहेत. आता काही असेही आहेत की 'मी कसा त्याला नागवतो पहा आता ' असा उदद्योग करणारे. यातून अहंकार , तुच्छता ई नको असलेली विषे इथे निर्माण होतात. मग आता याला उचला अशी भावना नियामक मंडळात उदभवू शकते.माझे असे निरिक्षण आहे की धागा म्हणजे नक्की काय ? धागा म्हणजे माझ्या मते माहितीची विचारांची देवाण घेवाण . या बाबतीत धागा भऱकटणे म्हणजे काय याच्या स्प्ष्ट कल्पना संपादकांकडे असावयास हव्यात. उदा नारायण धारप यांचे साहित्य अशा विषय असेल तर मी नारायण धारपाना भेटलो वगैरे हा माझा प्रतिसाद धाग्याला धरून नाही सबब असा प्रतिसाद भले माहिती देणारा असला तरी मूळ मथळ्याला तो धरून नसल्याने उडवला गेला पाहिजे. या साठी नारायण धारपांच्या सहवासात असा वेगळा धागा मी वा कुणी तरी काढला पाहिजे. तर एक शिस्त राहील.बाकी शिष्टसंमत भाषा न वापरणे किंवा एखाद्याचा उपमर्द करणे यासाठी फारतर व्यनीचा वापर करावा. धाग्याचा वापर सनदशीर टीका वा कौतुक करण्यास हरकत नसावी.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 10:32 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

५०००% सहमत!!

नाखु's picture

29 Jan 2015 - 11:32 am | नाखु

दादूस बाडिस.+१

मुक्त विहारि's picture

29 Jan 2015 - 11:34 am | मुक्त विहारि

५०००%...

ना कम ना ज्यादा...

मृत्युन्जय's picture

29 Jan 2015 - 11:02 am | मृत्युन्जय

सर्वप्रथम हे सांगु इच्छितो की हा धागा कुठल्याही संपादकावर किंवा संमं वर टीका करण्यासाठी काढलेला नाही. बहुसंख्य संपादकांना मी आंजाच्या माध्यमतुन व्यवस्स्थित ओळखतो आणि बहुतेक सगळे योग्य निर्णय घेणारे वाटतात. मुद्दा उद्दाम डु आयडींचा आणि अचानक पणे गायब झालेल्या जेन्युइन आयडींचा आहे. जेन्युइन आयडी म्हणजे ते जे उजळमाथ्याने स्वतःची ओळख उघड करतात आणि त्यांना साहित्यात आणि चर्चेत रस असतो. डु आयडी ते जे बुरखा पांघरुन केवळ उपद्रव माजवण्यासाठी येतात.

डु आयडी अधुन मधुन कुत्र्याच्या छत्र्यांसारखे डोके वर काढतात. कधी त्यांचा उद्देश जातीय दंगा माजवण्याचा असतो तर कधी राजकीय अराजक माजवण्याचा किंवा कधी नुसतीच मतांच्या पिंका टाकण्याचा किंवा काड्या करण्याचा. बाकी हे आयडी अजगरासारखे निवांत पडुन असतात. आपला आवडता विषय आला की असंबंद्ध गरळ ओकतात. रावणाच्या दहा तोंडांसारखे हे एकामागुन एक निर्माण होतच राहतात. इथल्या बर्‍याच जेन्युइन लोकांना स्वतःचे आयडी तयार करताना त्रास झाला असेल. आयडी लवकर अप्रूव्ह होतच नाही कारण संपुर्ण प्रक्रिया मॉडरेटेड आहे. पण मग डु आयडी इतक्या संख्येने इतक्या पटपट कसे तयार होतात. कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकते की कोणीतरी संपादक यांना सामील आहे काय? यांचे डु आयडी कसे पटकन अप्रूव्ह होतात इतरांना इतका वेळ लागत असुनही.

दूसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काही जण इथे संन्यस्त वृत्तीने कर्म करण्यासाठी येतही असतील आणी मित्र बनवायचेच नाहित असा त्यांना पण असावा पण बाकीचे काही अश्या ध्येयाने पछाडलेले नसतात. त्यामुळेच इथे ते चांगले लेख वाचण्यासाठी आणि उत्तम चर्चांमध्ये भाग घेण्यासाठी येत असतील तरीही सर्वसाधारण समाजप्रिय माणसांप्रमाणे त्यांचे मित्र बनतच जातात. बर्‍याच लोकांना माणसे जोडण्याची हौस असतेच. त्यामुळे मधुनच एखाद्या मित्राचा आयडी बॅन होतो तेव्हा माणूस गोंधळतो. शिवाय बर्‍याचदा आंजावरील मित्र प्रत्यक्ष जीवनात घनिष्ट मित्र असतीलच असे नाही. त्यामुळे इतर काही संपर्क नसतो. आंजावरच होत असतो. असा माणूस अचानक नाही दिसेनासा झाला की गोंधळ उडतो. त्यामुळे आभाळ कोसळते असे नाही. पण तरीही माणूस वैतागतो.

माझ्यापुरते बोलायचे झाल्यास विमेचे प्रतिसाद मला आवडायचे. म्हणजे तो माझ्या बाजूणे गोग्गोड प्रतिसाद वगैरे टाकायचा असे काही नाही. त्याने वेळोवेळी माझ्याही धाग्यांवर किंवा प्रतिसादांवर तिरकस प्रतिसाद दिले. पण माणूस उपद्रवमूल्य असणारा नाही आणि स्वतःच्या मतांशी रीझनेबली ठाम आहे. संक्षीबद्दल मला फारशी माहिती नाही. मी कधीच त्यांचे धागे किंवा प्रतिसाद नीट वाचले नाही. मला ते काय लिहितात हेच कळायचे नाही पण लिहिताना ते मर्यांदांचे भान ठेउन लिहितात इतके समजायचे. त्यामुळे त्यांनी बॅन होण्यासारखे नक्की काय केले याची उत्स्तुकता आहे. सुहासचा कुठलातरी प्रतिसाद अगदीच चुकीचा होता असे दिसते. अयोग्य भाषा वापरली असेल तर ते नक्कीच स्वीकारार्ह नाही. पण त्याने असे काही प्रतिसाद दिले आहेत हेच माहिती नसल्यामुळे मला तरी त्याला बॅन केल्याचे आश्चर्य वाटले होते. हे सगळे लिहिण्यामागचे कारण की एखाद्या माणसाला का बॅन केले जाते आहे हेच जर मुळात आम्हाला (म्हणाजे सामान्य (आणि कुठल्याही कंपुमध्ये नसलेल्या) सदस्यांना) कळत नसेल तर कुठेतरी थोडीशी नाराजी राहते.

hitesh's picture

29 Jan 2015 - 11:26 am | hitesh

जेन्युइन आयडी म्हणजे ते जे उजळमाथ्याने स्वतःची ओळख उघड करतात आणि त्यांना साहित्यात आणि चर्चेत रस असतो.

.....

उजळमाथ्याने ओळख दाखवायची म्हणजे नेम्कं काय करायचे ? प्यान कार्ड आधार कार्ड तुम्हाला दाखवायचे का ?

शहर/गाव
जगातल्या सगळ्यात विक्षिप्त लोकांचे
देश
युवराजांचा देश
लिंग
Male

.....

या माहितीवर हे स्वतःचा आयडी जेन्युन मानतात व इतरांचा डुप्लिकेट !

मृत्युन्जय's picture

29 Jan 2015 - 12:36 pm | मृत्युन्जय

त्याचे काय आहे हितेशराव इतर लोक मला जेन्युइन आयडी मानतात. मी नाही. आणी मला ओळखणारे इथे ढीगाने सापडतील (संपादक धरुन). तुमच्याबद्दल असे कोण म्हणु शकते?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 12:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यांना नाना, माई, ग्रेटथिंकर, सचिन वगैरे लोक्स नीट ओळखतात.

hitesh's picture

29 Jan 2015 - 1:32 pm | hitesh

हं ..
म्हणजे तुम्ही एखाद्या कंपुचा मेंब (ढ) र असाल तरच जेन्युन अन्यथा नाही !

असो.

साईबाबा आम आदमीना जेन्युन वाटतात व शंकराचार्यांना ते डु आयडे वाटतात !

मृत्युन्जय's picture

29 Jan 2015 - 1:43 pm | मृत्युन्जय

कंपु कशाला लागतो. इथले निम्मे लोक कुठल्याही कंपुत नाहित. माझाही नाही. पण डु आयडी लगेच ओळखु येतात. रस्त्यात माणसे कोण आणी गाढवे कोण हे देखील लगेच कळते की त्यासाठी कोणलाही घोळका करुन उभे रहायला लागत नाही.

बाकी साईबाबांच्या उदाहरणावरुन तुम्हाला जेन्युइन आणी डु आयडी या संकल्पना नीटश्या कळलेल्या नाहित असे दिसते. परत एकदा थंड डोक्याने विचार करा बरे.

hitesh's picture

29 Jan 2015 - 3:03 pm | hitesh

संपादकानी इथे ठेवलेले सर्व आयडी जेन्युनच आहेत.

तुमची चिंता तुम्हाला लखलाभ

संपादकानी इथे ठेवलेले सर्व आयडी जेन्युनच आहेत.

ही उपरती तुम्हाला मृत्युंजयच्या आयडीवर शंका घ्यायच्या आधी झाली असती तर किती बरं झालं असतं नै?

hitesh's picture

29 Jan 2015 - 3:11 pm | hitesh

शंका ते इतरांवर घेताहेत

मृत्युन्जय's picture

29 Jan 2015 - 3:32 pm | मृत्युन्जय

मिपावर बरेच आयडी उडवले गेले आहेत. उडवले जाण्यापुर्वी सगळे जेन्युइन होते आणि उडवले गेल्याबरोबर डु आयडी झाले असा काही गैरसमज आहे की काय तुमचा? असो डु आयडी आणि जेन्युइन आयडींबद्दलच अभ्यास वाढवा असे पुन्यांदा सांगतो.

>>उजळमाथ्याने ओळख दाखवायची म्हणजे नेम्कं काय करायचे ? प्यान कार्ड आधार कार्ड तुम्हाला दाखवायचे का ?

हो!!

खाई त्याला खवखवे, चोराच्या मनात चांदणं, इ.इ. म्हणी आठवल्या.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2015 - 11:42 am | मुक्त विहारि

"सर्वप्रथम हे सांगु इच्छितो की हा धागा कुठल्याही संपादकावर किंवा संमं वर टीका करण्यासाठी काढलेला नाही."

ते जाणवले, म्हणूनच प्रतिसाद देत आहे.दंगा न करता प्रामाणिक पणे मत प्रदर्शित करणे, हीच खरी लोकशाही.

"माझ्यापुरते बोलायचे झाल्यास विमेचे प्रतिसाद मला आवडायचे. म्हणजे तो माझ्या बाजूणे गोग्गोड प्रतिसाद वगैरे टाकायचा असे काही नाही. त्याने वेळोवेळी माझ्याही धाग्यांवर किंवा प्रतिसादांवर तिरकस प्रतिसाद दिले. पण माणूस उपद्रवमूल्य असणारा नाही आणि स्वतःच्या मतांशी रीझनेबली ठाम आहे."

प्रचंड सहमत, कारण मी पण विमेंना भेटलो आहे.आधीच सांगीतल्या प्रमाणे, विमेंना निदान २-३ वेळा प्रत्यक्ष भेटल्याशिवाय विमे कळत नाहीत.

"मी कधीच त्यांचे धागे किंवा प्रतिसाद नीट वाचले नाही. मला ते काय लिहितात हेच कळायचे नाही पण लिहिताना ते मर्यांदांचे भान ठेउन लिहितात इतके समजायचे."

+१... सहमत. संक्षींना ह्यावेळी भेटायचा नक्कीच प्रयत्न करणार.

म्रुत्युंजय, एक कट्टा तेरे नाम.

क्या बात हे मूवी , विमे भरून पावला असेल एवढे कौतुक ऐकून

त्याची मते ठाम आहेत पण तो ती आक्रस्ताळेपणे मांडत नाही आणि वैयक्तिक पण तर नाहीच नाही.

कदाचित मला सुरुवातीला झाला तसा, भास इतरांना पण झाला असेल.

असो,

मी माझा विमेंच्या बाबतीतला अनुभव सांगीतला, इतरांना कदाचित विमेंना भेटून वेगळा अनुभव पण आला असेल.

योगी९००'s picture

29 Jan 2015 - 12:01 pm | योगी९००

मी सुद्धा विमेंना भेटलो आहे. त्यांनी काही आक्षेपार्ह टाकले असावे असे वाटत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

29 Jan 2015 - 12:42 pm | प्रसाद गोडबोले

तसा मी आधीही मुवींचा फॅन होतोच आता ह्या वाक्या मुळे ए सी झालो आहे

दंगा न करता प्रामाणिक पणे मत प्रदर्शित करणे, हीच खरी लोकशाही.

आणि ह्यात थोडीशी भर घालु इच्छितो की " दुसर्‍याचे मत विरुध्द असेल आणि आपल्याला अजिबात पटत नसेल तरीही इथे प्रत्येकाला विचार आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे , तुझे मत तुला लखलाभ असो असे बोलुन शांत चित्ताने मत वैविध्य जोपासणे हाही एका प्रगल्भ लोकशाहीचा भाग आहे !"

तुझे मत तुला लखलाभ असो."

+ १....

बाकी एरवी निपचित पडून असणार्‍या रामपूरीसारख्या आयडींना या धाग्यावर लिहीतं झालेलं बघून मौज वाटली.

पुण्याचे वटवाघूळ's picture

29 Jan 2015 - 2:31 pm | पुण्याचे वटवाघूळ

ऑ संक्षी बॅन झाले? काय सांगता काय? बरं मग आमचे परममित्र निराकार गाढवरावांचे काय झाले?

जोक्स अपार्ट इतर अनेक आय.डींना बॅन करूनही ते दुसर्‍या नावाने इथे परत येऊ शकत असतील आणि विमेंसारख्याला परत येता येत नसेल तर ते चुकीचे आहे.त्याविषयी काहीतरी करायला हवे.

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2015 - 2:34 pm | प्रभाकर पेठकर

तात्यांच्या कार्यकाळापासूनच, 'मिसळपाव' हे वैयक्तिक आणि खाजगी संस्थळ आहे आणि आपण इथे पाहुणे आहोत हा विचार मी माझ्या मनांत रुजविला आहे. पाहुण्याने पाहुण्यासारखे राहावे. यजमानांच्या घरचे नियम कटाक्षाने पाळावेत. जर पटत नसतील तर त्या घरातून निघून जावे किंवा स्वतःचे घर बांधून त्यात सुखनैवं राहावे. हल्ली कामाच्या व्यस्ततेमुळे मी मिसळपाववर जास्त नसतोच. पण टोपणनांवाने लिहावे असे कधी वाटले नाही. मी 'प्रभाकर पेठकर' आहे आणि 'प्रभाकर पेठकर' नांवानेच मिसळपाव, फेसबुक, वॉट्सअ‍ॅप वर वावरतो. टोपणनांवाने, आपल्या मतांशी विरोध दर्शिविलेल्या, सदस्यावर वैयक्तिक पातळीवर आगपाखड करणे केंव्हाही गैरच. मुळात टोपणनांव का घ्यावे लागते? त्या मागे उद्देश काय असतो? हेच मला उमगलेलं नाही. पण असते एकेकाची आवड असे म्हणून मी सोडून दिले. उथळ धागे, उथळ प्रतिसाद, भडक मतमतांतरे आणि जिव्हारी लागणारे विषारी शब्द ह्याने काय साध्य होतं? अशा संवादात मी स्वतः लक्ष्य नसलो तरीही 'अ' आणि 'ब' मधील अत्यंत हीन पातळीवरील चर्चा, वाद वाचण्याचा शेवटी उबगच येतो. गढूळलेल्या डबक्यात कुठेतरी 'मोती' सापडेल म्हणून चिखल चिवडत बसणे मला रुचत नाही. माझ्या मतांनुसार हे जग चालणार नाहीये (आणि तशी माझी अपेक्षाही नाही) हे ध्यानात धरून जेंव्हा जेंव्हा मिपाचे वातावरण गढूळते मी मिपापासून स्वतःला दूर ठेवतो. असो.

पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना...!

मिसळपावचे वातावरण जास्त गढूळणार नाही ह्याची काळजी संपादक मंडळ घेत असतेच. संपादक मंडळाचे निर्णय योग्य की अयोग्य ह्यावर मी विचार करीत नाही. 'घरमालकांनी' त्यांना नेमले आहे. त्यांचे निर्णय पटले नाहीत तर मी मिसळपावच्या बाहेर पडेन. ह्या घराचे नियम ठरवायचा प्रयत्न मी करणार नाही.

पिंपातला उंदीर's picture

29 Jan 2015 - 2:35 pm | पिंपातला उंदीर

छान प्रतिसाद

असंका's picture

29 Jan 2015 - 2:44 pm | असंका

फारच रोखठोक.

पण विचार करायला भाग पाडलंयत...धन्यवाद!

प्रसाद गोडबोले's picture

29 Jan 2015 - 2:51 pm | प्रसाद गोडबोले

मिसळपावचे वातावरण जास्त गढूळणार नाही ह्याची काळजी संपादक मंडळ घेत असतेच. संपादक मंडळाचे निर्णय योग्य की अयोग्य ह्यावर मी विचार करीत नाही. 'घरमालकांनी' त्यांना नेमले आहे. त्यांचे निर्णय पटले नाहीत तर मी मिसळपावच्या बाहेर पडेन. ह्या घराचे नियम ठरवायचा प्रयत्न मी करणार नाही.

+ १००% !

हेच म्हणतो !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Jan 2015 - 5:11 pm | निनाद मुक्काम प...

सहमत
हेच मत माझ्या प्रतिसादात मांडले आहे , आपण सामान्य मिपाकर आहोत सर्व सामान्य असे नियम मला लागू होतात ,मी येथे जास्त पावसाळे पहिले , देवी सरस्वती माझ्या लेखणीत वसते . किंवा इतर अनेक कारणांनी मी स्वतःला जेष्ठ समजत नाहीत आणि कुणाला ज्येष्ठ मानून घेत नाही. म्हणून कंपूबाजीस सपशेल नालायक आहे,
संपादक मंडळाचा निर्णय शेवटचा अर्थात व्यक्ती पेक्ष्या पदाला मान देण्याकडे माझा कल आहे त्यामुळे जास्त राडे विदुषकी चाळे करणे तत्त्वात बसत नाही.

सुबोध खरे's picture

29 Jan 2015 - 7:22 pm | सुबोध खरे

क्या बात है पेठकर साहेब,
आपला तुम्हाला सलाम
अगदी माझ्या मनातील सही सही लिहलेत( आणी माझे टंकण्याचे कष्ट वाचवलेत)
धन्यवाद

घाटावरचे भट's picture

29 Jan 2015 - 2:46 pm | घाटावरचे भट

आयला!! हे अजूनही चालूच आहे का इथे?

कपिलमुनी's picture

29 Jan 2015 - 2:48 pm | कपिलमुनी

पैला राडारॉक्स मिपा आता राहिला नाही

जेम्स बॉन्ड ००७'s picture

29 Jan 2015 - 4:53 pm | जेम्स बॉन्ड ००७

खरंय भो

सुहास झेले's picture

29 Jan 2015 - 2:49 pm | सुहास झेले

चला ह्या धाग्याच्या निमित्ताने अनेक नवीन-नवीन आयडी नजरेस पडले ;-)

दिपक.कुवेत's picture

29 Jan 2015 - 3:22 pm | दिपक.कुवेत

संपादकांची काय प्रतिक्रिया आहे? त्यांचं काय म्हणणं आहे? अजून एका तरी संपादकाचा प्रतिसाद/स्पष्टिकरण आहे का ईथे?

डू आयडी म्हणजे डुप्लीकेट आयडी का?

नाही डू आयडी म्हणजे दुष्ट आयडी!! काही लोकांना 'द' टाईप करता येत नाही, ते 'ड' टाईप करतात. त्यावरुन हा अपभ्रंश अस्तित्त्वात आला आहे.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

29 Jan 2015 - 5:14 pm | जेम्स बॉन्ड ००७

हो हो. त्यांच्या या ऐदी पणावरुनच आयदी आणि मग आयडी असा शब्द निर्माण झालाय..
-पुन्हा ओक

बॅटमॅन's picture

29 Jan 2015 - 5:41 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

वारल्या गेले आहे. =))

स्वामी संकेतानंद's picture

29 Jan 2015 - 6:29 pm | स्वामी संकेतानंद

=))

आदूबाळ's picture

29 Jan 2015 - 6:17 pm | आदूबाळ

डुक्कर आयडी

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Jan 2015 - 5:12 pm | निनाद मुक्काम प...

पदम ह्यांच्यावर शाब्दिक सूड कम आसूड ओढला आहे.

स्पा's picture

29 Jan 2015 - 5:51 pm | स्पा

सूड कम आसूड ओढला आहे.

अह
ओढल्या गेल्या आहे

पदम's picture

29 Jan 2015 - 6:14 pm | पदम

माहीत नव्हत म्हणुन विचारल. बाळ अजुन लहान आहे ह्या क्षेत्रात.

जातवेद's picture

29 Jan 2015 - 7:00 pm | जातवेद

*lol*

मी-सौरभ's picture

29 Jan 2015 - 6:42 pm | मी-सौरभ

तुमि मजा बघुन र्हायले बाप्पा पन पब्लिकला काय कळ्ळा तर बरं व्हील ना :)

संपादक मंडळ's picture

29 Jan 2015 - 8:07 pm | संपादक मंडळ

मिपाच्या धोरणानुसार काही आयडींवर वेळोवेळी शिस्तभंगाची कारवाई वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या कालावधीसाठी केली जाते. बहुतेकवेळा सतत असांसदीय भाषा वापरणे, खेळीमेळीचे वातावरण बिघडवणे अशी कारणे असतात. मात्र तात्पुरती कारवाई असेल तर परत येताना त्या सदस्यांना अपमानास्पद वाटू नये म्हणून दर वेळी अशी कारवाई जाहीर केली जात नाही.

या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली आहे. त्यामुळे धागा आता वाचनमात्र करत आहोत. सामंजस्याने चर्चा केल्याबद्दल सर्व मिपाकरांना धन्यवाद! मात्र यापुढे कोणाला कसलीही शंका असल्यास सं मं आयडी किंवा नीलकांत आयडीला व्यनि करावा ही विनंती.