सह्याद्री आणि त्याच्या कुशीतलं जग

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in मिपा कलादालन
6 Oct 2014 - 12:12 pm

नमस्कार,
सह्याद्रीत भटकताना काढलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो शेअर करत आहे. सह्याद्री आणि त्याच्या कुशीतलं लोकजीवन हे नेहमीच काहीतरी दाखवून, शिकवून जाणारं असतं. आनंद देणारं, शांतता देणारं असतं. फोटोंमधून ते टिपण्याचा केलेला एक प्रयत्न. प्रतिक्रीयांचं, प्रतिसादांचं स्वागत. फोटो लो रेजोल्यूशन आहेत, साईझ कमी ठेवायच्या हेतूने तसे टाकलेत.

a
ट्रेकला निघालं, की पहिला थांबा असतो तो रस्त्यात जिथं कुठं सूर्योदयाशी गाठ पडेल तिथे

a
पावसाळ्यानंतर डोंगर, त्याच्या पायथ्याची शेतं नटतात ती अशी

a
एक लोभस जांभळं फूल

a
'विराट' हे विशेषण शोभणारी सर्वात भारी गोष्ट, सह्याद्री

a
पिवळी धम्मक फुलं

6
आणखी एक वेगळंच फूल

7
हिरवळ दाटे चोहीकडे

8
उन्हं खात बसलेलं एक कोकरू

8
यारीयां

9
चावडी

10
जिथे तिथे दिसणारी ही फुलं

11
वाहते भार जीवनाचा

12
बघत रहावं, बघत रहावं, असं सह्याद्रीचं सौंदर्य......

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

6 Oct 2014 - 3:49 pm | दिपक.कुवेत

एकदम निरागस, शहरी स्पर्श न लागलेलं असं हे जीवन....मस्तच. पाण्यासाठि अजुनहि बायकांना भार वहावा लागतो हे खेदजनक आहे.

वेल्लाभट's picture

6 Oct 2014 - 4:24 pm | वेल्लाभट

खरंच.

मस्त हिरवेगार फोटो.
येऊर का?

वेल्लाभट's picture

6 Oct 2014 - 4:23 pm | वेल्लाभट

कळसुबाई

प्रचेतस's picture

6 Oct 2014 - 6:56 pm | प्रचेतस

ओह्ह. ओके.
मगाशी मोबाईलमधून पाहिल्यामुळे शिखरांची भव्यता नीटशी दिसली नसल्यामुळे ओळखता आले नाही.

रेवती's picture

6 Oct 2014 - 6:30 pm | रेवती

सुरेख फोटू. सगळ्या चित्रांमध्ये जीवन छान दाखवलय.

कंजूस's picture

6 Oct 2014 - 6:48 pm | कंजूस

छान !

सुहास..'s picture

6 Oct 2014 - 7:53 pm | सुहास..

आवडेश !! और भी आने दो

सूड's picture

6 Oct 2014 - 8:02 pm | सूड

मस्त!!

भारी! फोटो आवडलेच. अजून टाका.

किसन शिंदे's picture

7 Oct 2014 - 8:35 am | किसन शिंदे

मस्त फोटो!

रच्याकने ती पिवळी फुलं सोनकीची आहेत.

स्पंदना's picture

31 Oct 2014 - 6:04 am | स्पंदना

मस्त फोटो!! डोळे निवले.

रच्याकन ते कोकरु नाही, कोकरु मेंढीचं, हे पालवं, शेळीचं पिल्लु. टण्णा टण उड्या मारतात. फार मस्तवाल. ढुश्या तर अश्या बसतात की काय सांगु?

टवाळ कार्टा's picture

31 Oct 2014 - 7:40 am | टवाळ कार्टा

माझा गणेशा झालय :(

खटपट्या's picture

31 Oct 2014 - 8:32 am | खटपट्या

मस्त !!

गणेशा's picture

13 Nov 2014 - 7:07 pm | गणेशा

मस्त एकदम.. आवडेश..
एकदम गावाकड जावुन आल्यागत वाटतय

वेल्लाभट's picture

14 Nov 2014 - 4:59 pm | वेल्लाभट

थँक्यू थँक्यू !