एक पोएटीक कन्फ़्युजन झालय

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
24 Oct 2014 - 9:40 pm
गाभा: 

मी अनेक वर्षांपुर्वी एक सुंदर गझल जगजित सिंग च्या आवाजात ऐकली होती. ती प्रचंड आवडली होती. तीच्या मधुर चालीमुळे ती डोक्यात अधुनमधुन घुमत राहयची. नंतर ती कॅसेट (ती काळ्या फ़िल्म वाली) हरवली मात्र गझल डोक्यात रुतुन बसली. तिचे शब्द व त्यांचा एक मनात लागलेला अर्थ देखील तसाच फ़ीट्ट झाला. आपले गैरसमज जसे घट्ट होउन जातात तसाच. मी ती बेहोश गुणगुणत असे व मोठा आनंद मला ती गझल गुणगुणतांना व्हायचा. तिचा अर्थ त्यातले शब्द व सर्वात महत्वाच म्हणजे जगजित चित्रा चा आवाज तर खुपच पागल करायचा, प्रचंड आवडायचा. पुढे वय वाढल ( सध्या मी नव्वदीच्या घरात आहे, तब्येत ठणठणीत आहे, पाचन संस्था कायम चुर्णा शिवाय ही व्यवस्थीत काम करते, छान ५ कीलोमीटर फ़ीरतो, संध्यानंद नियमीत वाचतो, होणार सुन मी ह्या घरची नियमीत बघतो, रोहीणी ताइंचा अभिनय भावतो. नायिका फ़ारच.... असो जास्त लिहायला लागलो तर तोल ढळतो)

तर वयोमानामुळे काय होत की आम्हा वृध्दांचा एकात दुसर मिक्स होउन घोळ फ़ार वाढतो. आमचा नॉस्टेल्जीया भावना विचार या सर्वांचा एकत्रित गुंता होत असतो.( वन हंड्रेड इयर्स ऑफ़ सॉलिट्युड या मार्क्वेझ च्या महान कादंबरीतल्या ओल्ड बुकसेलर चा मुळ गावी परततांना उडतो तसा गोंधळ होतो तो उतारा फ़ार सुंदर आहे राव नॉस्टेल्जीया वरचा जरुर वाचा नसेल वाचला तर) त्यामुळे आम्हाला कधी कधी कळत नाही की काय होत की कुठल्या गाण्याचा काय अर्थ आहे ओळ काय होती त्यापेक्षा मुळ सोडुन दुसरच काहीतरी डोक्यात बसत व त्याने मोठी गंमत उडते एक स्वीट पोएटीक कन्फ़्युजन तयार होते. तर या गाण्याच इतकच माहीत होत की समवन समव्हेअर या जगजित चित्रा सिंग ने त्यांच्या एकुलत्या एक १८ वर्षा च्या कोवळ्या वयाच्या मुलाच्या अपघाती मृत्यु नंतर काढलेला हा सुंदर अलबम होता. ( त्या देखण्या मुलाचा त्या दोघांबरोबर चा फ़ोटो त्यावर होता तो अजुनही कसा काय कोण जाणे स्पष्ट आठवतो) तर गझल व त्याच्या मला आठवत असलेल्या ओळी अशा होत्या. आणि त्याचा अर्थ मला मोडका तोडका उमजलेला मी असा लावत होतो.

कोइ समझेगा क्या राज-ए-गुलशन
जब तलक ना उलझे काटो से दामन
गुलशन – बगिचा

अर्थ सहज लागतो. बगिचा उद्यान हे जीवनाच प्रतिक आहे. जीवनाचा खरा अर्थ तेव्हाच कळेल जेव्हा जीवनातील कठोर वास्तवाला सामोर जाल, जीवनातल्या काट्यांशी दु:ख वेदना मृत्यु नुकसान अपयश विरोध आदिंशी सामना होइल तेव्हाच जीवनाचा अर्थ गवसेल असे कवि म्हणतो. तोपर्यंत खर जीवन काय आहे कळणारच नाही. कळण शक्य नाही. एक आग का दरीया है गुजर के जाना है सारखा भाव.

यक बयक सामने आ न जाना
रुक ना जाए कही दिल की धडकन

यक बयक एकाएकी अचानक च जर जीवन तुमच्या समोर त्याच्या पुर्ण अक्राळविक्राळ स्वरुपात आलं, तर तुम्ही त्याला पेलु शकणार नाहे. यु कुड नॉट हॅन्डल इट. महाभारतात कृष्ण जसा अर्जुना ला विश्वरुप दर्शन घडवतो ते अर्जुनाला जस पेलवत नाही त्याने तो मुर्छीत होतो तस काहीस. म्हणजे स्टेप बाय स्टेप जीवनाचा एक एक पैलु तुमच्या समोर येत गेला तर तेच चांगल आहे. एक एक करुन तुम्ही ते आकलन करु शकता , चिंतन करु शकता पचवु शकता. हळुवारपणे राइप होण्यात मजा आहे. पण अचानक येउन आदळली जीवनातील वेदना दु,:ख आदि तर रुक ना जाए कही दिल की धडकन

गुल तो गुल खार तक चुन लिए है
फ़िर भी खाली है गुलची का दामन

ही ओळ ही तशी सरळ आहे जीवनात जाणवणारी सार्वकालीक व्यर्थता रीक्तता. सर्व फ़ुल जीवनरुपी उद्यानातली तोडली सर्व भोग भोगले तरीही अजुन एक पोकळी आहेच ती जाणवतेय थोडा है थोडे की जरुरत अभी है . कींवा हजारो ख्वाहीशे ऐसी की हर ख्वाइश पे दम निकले बहोत निकले मेरे अरमॉ फ़िर भी कम निकले. सनातन अतृप्ती त्या गुलची ला जाणवतेयं जी आपल्या सर्वांचाच अनुभव असतो.

आता इथे पुढील दोन शेर मध्ये माझ्या मेमरी ने सरमिसळ केली मी अशा ओळी डोक्यात बाळगुन होतो व गंमत म्हणजे एक अर्थ ही लावुन घेतला होता. तो शेर चुकीचा असा

कितनी आराइश-ए-आशियाना
बर्कं को दोस्त समझु के दुश्मन ?

गझल मध्ये एक एक शेर स्वयंपुर्ण असतो तो स्वतंत्र अर्थ असतो व त्यांचा गुछ म्हणजे गझल असते. या न्यायाने एक स्वतंत्र अर्थाचा हा शेर म्हणुन मला तो उर्दु तल्या नेहमीच्या प्रतिंका च्या आधारे असा वाटला किंबुहना मी असा चुकीचा अर्थ लावत होतो. तर मी असा अर्थ लावत होतो की हा एका पक्ष्याच्या पॉइंट ऑफ़ व्ह्यु लिहीलेला शेर आहे. जणु एक छोटा नाजुक पक्षी आपल्या घरट्या कदे आशियाना कडे बघुन म्हणतोय की

कितनी आराइश-ए-आशियाना

काय सुंदर रोशणाइ आहे माझ्या घरट्याची काय सुंदर दिसत आहे माझ घरटं या उजेडात या विजेच्या लखलखाटात. म्हणजे रात का वक्त है बिजली कडक के चमकी है और उसकी रोशनी मे क्या जगमगॉ के उठा है मेरा घरौंदा. मेरा आशियाना. तर तो पक्षी हरखुन गेलाय स्वत:च्या घरटुल्याच ते सुंदर रुप बघुन ती लकाकी बघुन. आणि हे सर्व कशामुळे घडुन आलय तर बर्कं मुळे बिजली मुळे बर्क हीच कारणीभुत आहे त्याच्या घरट्याच सौंदर्य वाढवण्यात. त्याची दिवाळी च साजरी केलीय जणु विजेने.

आणि पुढच्या ओळीत तो पक्षी दिल चिर के जाने वाला सवाल पुछता है की बर्कं को दोस्त समझु के दुश्मन ? की आता विज कडाडलेली आहे आणि ती माझ्या घरट्या वर पडणार आणि माझ घरटुल ही विज कायमच उध्वस्त करणार. मग तो विचारतो की माझ घर उजळवुन टाकणार्या मला अफ़ाट सौंदर्याचा प्रत्यय देणारया या विजेला यासाठी माझा मित्र समजु की पुढच्याच क्षणी माझ घरट कायमच उध्वस्त करेल म्हणुन माझा शत्रु समजु. ?

कविने एक अतिशय नाजुक क्षण चिमटीत पकडलाय असे मी समजत होतो. हा वरील दोन क्रमांकाची चुकीची ओळ लावल्याने बदललेला अर्थ होता. मुळ ओळ काळाच्या ओघात विसरल्याने खाली वर ओळ लागल्याने भलताच अर्थ मी लावुन बसलेलो होतो. वरील चुकीचा सेकंड इफ़ेक्ट शेवटाच्या लाइनलाही लागलाच
शेवटची ओळ मी अशी चुकीची डोक्यात घालुन बसलो होतो. ती अशी की

अजमत ए आशियाना बढा दी
टुट जाए ना शाख ए नशेमन
साहजिकच या ओळीचा अर्थ लागत नव्हता अडखळत होतो. कारण ती ऒळ मुळात अशी नाहीच तर अर्थ कुठुन लागणार ? वरती चुकुन अपघाताने अर्थ लागला होता इथे जमतच नव्हत. मी ही सोडुन दिल कारण अजमत शब्दाच आकलन नव्हत पुढे एक सुंदर मराठी उर्दु डीकशनरी मिळाली श्रीपाद जोशी यांची( अत्यंत उत्कृष्ट अप्रतिम उर्दु मराठी डिक्शनरी) त्यात वरील कीडा वळवळत च होता म्हणुन अगोदर अजमत शब्दाचा अर्थ बघितला तर तो श्रेष्ठत्व महत्व प्रताप आदर असा निघाला अर्थ जोडुन बघितला तर काहीच अर्थबोध होत नव्हता एका विक्षीप्त दर्दी जाणकार मित्राकडे गेलो त्याला सांगितल तो नेहमीच्या शैलीत म्हणाला अरे ..... तु ते सोड वो तेरे बस की बात नही उसके लिए डीफ़्रंट सेन्सीबिलीटी मंगता है. मी त्याला सोडुन तो विषय ही सोडुन दिला.

नंतर एक दिवस रेल्वे स्टेशनवर एक जगजित चित्रा च्या गजल च्या लिरीक्स च पुस्तक मिळाल ते वाचतांना ही गझल सापडली उत्सुकतेने ते वाचु लागलो तर धक्काच बसला मुळ ऒळी ची मी केलेली भयंकर सरमिसळ लक्षात आली. थोडा वेळ घाबरलो च्यायला आपल आता कस व्हायच मेमरी तर फ़ारच धोका द्यायला लागली राव. ओरीजीनल ओळी अशा क्रमात होत्या
कितनी आराइश ए आशियाना
टुट जाए ना शाख-ए-नशेमन

ही मुळ बरोबर ची ओळ होती

दुसरा शेर असा होता
अजमत- ए-आशिया ना बढा दी.
बर्क को दोस्त समझु के दुश्मन ?

तर असे पोएटीक कन्फ़्युजन झाले मग मी म्हटल जाउ द्या बघु आता बरोबरीचा काय अर्थ आहे तो आणि या वेळेस ठरवल की जाणकारांनाच विचारु
तुम्ही प्लिज मला सांगाल का योग्य अर्थ काय आहे तो ?
कारण नव्याने अर्थ लावण्याच वय आता माझ राहील नाही. व मेमरी वर तर अजिबात भरवसा करता येत नाही. विक्षिप्त मित्र मला लायकच समजत नाही तो
जाए तो जाए कहॉ ?

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

24 Oct 2014 - 9:43 pm | सतिश गावडे

वाह... मारवाश्री... वाह...

मला आठवतेय ती कॅसेट, विवेक त्या दोघांच्या मुलाचं नाव, आणि मला वाटतं खालचा फोटो आहे तुम्हाला आठवतोय तो:

Vivek

बाकी अर्थ वगैरे वाहिदा, जयंतराव कुलकर्णींसारखे दर्दी लोकं सांगतीलच. तोपर्यंत गाणं ऐकुयातः

कोइ समझेगा क्या राज-ए-गुलशन

सतिश गावडे's picture

25 Oct 2014 - 11:42 am | सतिश गावडे

हा फोटो एका ब्लॉगवर पाहीला होता. त्या पोस्टवर जगजित सिंग यांच्या पत्नी चित्रा सिंग यांच्या खडतर जीवनाचे वर्णन वाचून मन सुन्न झाले होते.

विशीतल्या मुलाचं अपघाती जाणं, त्यानंतर चित्रा यांचं बारा तेरा वर्षांच्या नैराष्यातून बाहेर पडून गायचा प्रयत्न करणं, ते करताना आपला गाता गळा जवळपास एक तप कालावधी रीयाज नसल्यामुळे साथ देत नसल्याची जाणिव होणं, त्यानंतर जगजितचं जाणं, पहील्या नवर्यापासून झालेल्या मुलीची दोन मुले मागे ठेऊन आत्महत्या अशी एकामागोमाग एक दुःखे कोसळत होती.

हे सगळं वाचल्यानंतर जगजित आणि चित्राने गायलेली गझल आठवली,

मंझील ना दे चराग ना दे हौसला तो दे
तिनके का ही सही तू मगर आसरा तो दे

बहुगुणी जी
धन्य झालो.
तुमचे आभार कोणत्या शब्दात मानु ?
खरच कळत नाही.
साष्टांग नमस्कारा चा स्वीकार करावा.

संजय क्षीरसागर's picture

25 Oct 2014 - 11:03 am | संजय क्षीरसागर

कोई समझेगा क्या राज़-ए-गुलशन
जब तक उलझे न काँटों से दामन

याक-बा-याक सामने आना जाना
रूक न जाये कहीं दिल की धड़कन

गुल तो गुल खार तक चुन लिए हैं
फिर भी खाली है गुलचीं का दामन

कितनी आराइश-ए-आशियाना
टूट जाये न शाख-ए-नशेमन

अज़मत-ए-आशियाना बड़ा दी
बर्क को दोस्त समझूँ के दुश्मन

इथे ऐका.

मारवा's picture

25 Oct 2014 - 5:39 pm | मारवा

आराइश चा योग्य अर्थ आता सापडला तो रोषणाइ नसुन सजावट असा आहे. मी सर्व उलट सुलट लावत होतो. आता जो काय अर्थ लागतोय तो असा मिलिंद जीं नी तो दाखवला पण अजुन थोड समाधान नाही होत आहे आता शब्दांचे अर्थ क्लीअर झालेय पुर्ण शेर चे अर्थ भाव थोडा आकलनाच्या बाहेर च वाटतोय
http://www.aisiakshare.com/comment/reply/3408/79271

संजय क्षीरसागर's picture

26 Oct 2014 - 9:57 am | संजय क्षीरसागर

अल्बम जरी पुत्रवियोगानंतर काढला होता आणि (त्याला) समर्पित असला तरी, गज़लकडे त्या अँगलनं पाहून उपयोग नाही. कारण फ़ना निज़ामीचा अंदाज़े बयां तसा नाही. ...तो असा आहे :

जोपर्यंत कुणी प्रेमाचं साहस करत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी ही दुनिया गुलशन होत नाही. त्याच्या जीवनात फुलांच्या रंगांची उधळण होत नाही.

कोई समझेगा क्या राज़-ए-गुलशन
जब तक उलझे न काँटों से दामन

आणि त्याचं कारण मोठं दिलकष आहे, त्यानं प्रेमाची (काटेरी) पायवाट चालण्याचा मोह चुकवलेला असतो. तो साधं, सरळ, (हृदयाला धक्का न लागेल असं) जगलेला असतो.

एका हिंदी गाण्याच्या ओळी आहेत :

हमने तो दिलको आपके कदमोंपे रख़ दिया,
इस दिलका क्या करेंगे ये, अब आप सोचिए |

वन हॅज टू रिस्क!

`जब तक उलझे न काँटों से दामन' कुणालाही जीवनातल्या वसंताचं रहस्य (`राज़-ए-गुलशन'), समजणार नाही.
__________________________
याक-बा-याक सामने आना जाना

तुझी इतकी वाट पाहिलीये सखे, की आता तू अशी अचानक (आणि सहज) समोर येऊ नकोस.

रूक न जाये कहीं दिल की धड़कन |

याचे दोन अर्थ आहेत.

साधा सरळ अर्थ असा की, तुला अचानक असं समोर पाहून जीव इतका हरखून जाईल की कदाचित हे हृदय थांबेल.

दुसरा अर्थ असायं, `तू येशिल' या आशेवर तर हे हृदय धकधकतंय. तू अचानक, प्रत्यक्ष (आणि इतक्या सहज) सामोरी आलीस, तर हृदयाला धकधकायला... काही कारणच उरणार नाही.
_____________________

गुल तो गुल खार तक चुन लिए हैं
फिर भी खाली है गुलचीं का दामन

गुलचीं म्हणजे फ्लोरिस्ट.

शायर म्हणतो, मी (तीचे) सगळे रंग स्वीकारले.

(शेवटी प्रेम म्हणजे आहे तरी काय? एक बेतहाशा चाहत. ती तुमच्यासाठी परी असली की `राज़-ए-गुलशन' उलगडायला लागतं. मग दुनिया भले काहीही म्हणू दे. आणि तिला देखिल तुम्ही हवेसे वाटायला पाहिजे असं कुठे आहे? तुमच्याकरता ती सर्वस्व असली की झालं!)

तीचं प्रेमच काय धिक्कार सुद्धा मंजूर केला पण तीनं मला आपलसं केलं नाही. माझ्या हृदयाला शेवटापर्यंत एकाकीपणाच सहन करावा लागला.

____________________

कितनी आराइश-ए-आशियाना
टूट जाये न शाख-ए-नशेमन

आशियाना आणि नशेमन, दोन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे, `घर'.

पण इथे ते शब्द प्रेयसीच्या देहाला उद्देशून आहेत आणि त्यामुळे शेर कमालीचा नज़ाकतदार झाला आहे.

तू इतकी सजली आहेस (की त्या आभूषणांची तुला दृष्ट न लागो), आणि देहाची कमनीयता जरा सुद्धा कमी न होवो. (`टूट न जाए शाख-ए-नशेमनचा' इथे लिटरल अर्थ नाही.)

तुझा देह इतका सजला आहे की त्या आभूषणांनी हरपून जाऊन, कुणाला (तुझ्या) देहाच्या एकेका सौंदर्यशाखेचा विसर न पडो. खरं तर तू इतकी सजली आहेस की त्या सजण्यानं, मला तुझ्या देहाच्या सौंदर्याचा (म्हणजे तुझा!) विसर न होवो.

___________________________

अज़मत-ए-आशियाना बढा दी
बर्क को दोस्त समझूँ के दुश्मन

शेवटचा शेर क्लायमॅक्स आहे. तुझ्या आगमनामुळे माझ्या जीवनात रोषणाई झाली. तू विजेसारखी माझ्या आयुष्यात आलीयेस.

आता ही विज, माझी संगीनी होईल की क़ातिल, माझं घर रौशन करेल की उजाडून टाकेल?

हे विद्युलते, तुला मी सखी समजू की वैरी?
___________________________

हमने तो दिलको आपके कदमोंपे रख़ दिया,
इस दिलका क्या करेंगे ये, अब आप सोचिए |

मारवा's picture

26 Oct 2014 - 10:52 am | मारवा

एका वेगळ्याच दृष्टीकोणातुन बघितलेली कविता, घेतलेला सुंदर अप्रतिम आस्वाद !
एक पैलुदार हिरा कीती वेगवेगळ्या कोणांतुन न्याहाळता येतो
आणि त्याची निरनिराळ्या अर्थाचा व सौंदर्याचा प्रत्यय देण्याची क्षमता कीती विलक्षण असते.
आता त्याची निर्मीती करणारया प्रतिभावंता ची तारीफ करु की आस्वाद घेतांना पुनर्निमीती करणारया रसिक जौहरी ची करु
हा यक्षप्रश्न तुर्तास निर्माण झालेला आहे
अनेकान्त वाद ही आठवतोय या निमीत्ताने आणि हॅरॉल्ड ब्लुम जे म्हणतो की प्रत्येक रसिक वाचक कवितेची एक प्रकारे पुनर्निमीती च करत असतो.
हे कीती खरय याच उदाहरण अनुभवण्याचा आनंद मिळाला
अनेक अनेक धन्यवाद संजय जी
या अप्रतिम आस्वादासाठी

एकदम सही वाक्य आहे!

ओशो म्हणाले होते, " माझ्या नंतर सुद्धा सत्याची अभिव्यक्ती देणारे एकसोएक माहिर येतील, मी शेवटचा नाही. आणि त्या अर्थानं सत्य कधीही जुनं होत नाही. ते नव्या प्रेरणा घेऊन पुन्हापुन्हा व्यक्त होत राहातं"

इथे पोहोचायला युगे लागतील वयाने आणि समजायला.

मारवा's picture

26 Oct 2014 - 12:39 pm | मारवा

कुठलीही कविता तुम्ही कुठल्या भावदशेत वाचता वा ऐकत आहात याचा ही अर्थनिर्णयनावर प्रभाव पडत असावा कदाचित. एक गालिब च्या फ़ेमस गझल मधील शेर आहे
मत पुछ की क्या हाल है मेरा तेरे पिछे
ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे.
आता ही गझल गातांना जगजित सिंग ला जर तुम्ही ऐकल व गझल जर वाचलेली नसेल तर बघा काय होत कारण जगजित जी पहीली ओळ गातो ना ती कमालीच्या उदास स्वरात अत्यंत आर्त विव्हल आवाजात गातो. यावरुन असा भाव श्रोत्याच्या मनात साहजिकच निर्माण होतो की हा जो प्रियकर आहे त्याच्या प्रेयसीला अत्यंत आर्त स्वरात विरह वेदनेने व्हिव्हळुन म्हणत आहे की मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पीछे
आपण जगजित च्या स्वरात या गझलेच्या या ओळीला पहील्यांदाच सामोरे गेलो तर जगजितच्या भावदशेचा आपल्यावर परीणाम होतो. मात्र मुळ गझल जर अगोदर वाचली असेल वा इव्हन पुढची ओळ जरी बघितली तरी सहज कळते की हा एका इगोइस्टीक मनस्वी प्रियकराने थोडा अहंमन्यतेने केलेला प्रश्न आहे की कारण पुढील ओळ आहे
ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे ?
यात माझी काळजी सोड तु तुझ काय ते सांग असा सरळ रोखटोक सवाल आहे.
या गझल चा पहीला शेर देखील गालिबच्या इगोइस्टीक स्वभावाची प्रचीती उघड देतो
बाजीचा ए अत्फ़ाल है जमाना मेरे आगे
होता है शबोरोज तमाशा मेरे आगे.
पुढील काही शेर याच गझल मधील गालिब चा इगो उघड दाखवितात. ( अर्थात मनस्वी लव्हेबल इगो थोडा वेडसर अव्यवहारी तरीदेखील हवाहवासा जपावासा वाटणारा इगो) अनेकांचा इगो डोक्यात जातो काही दुर्मिंळांचा आपल्यालाच जपावासा वाटतो त्यापैकी एक. साहेब आला नाही दारात स्वागताला म्हणुन इंटरव्ह्यु न देताच परत मेणा फ़िरवणारा गालिब आजकालच्या लाचारांच्या जमान्यात अव्यवहारीक का होइना भलताच आवडुन जातो, भावतो)
तर मुद्दा असा की वाचक श्रोता गायक आदिंची त्या त्या वेळेची भावदशा अर्थनिर्णयनावर प्रभाव पाडत असते.
चुपके चुपके रात दिन आसु बहाना याद है
हम को अब तक आशिकी का वो जमाना याद है
या एकाच गझल ला जगजित आणि गुलाम अली कीती भिन्न अभिव्यक्ती देतात. जगजित अतिशय उदास स्वरात एकाच समान फ़्लॆट चालीत ही गझल गाउन संपवितो व गुलाम अली
क्या बात है नजाकतीने एक एक ओळ उलगडत ती सादर करतो. या गझल मध्ये नॉस्टेल्जीया आहे पण नॉस्टेल्जीया पुर्ण उदास च भाव दशेत नेहमीच असतो असे नव्हे स्मरण रंजन हा मराठी प्रतिशब्द नॉस्टेल्जिया चा मोठा सुंदर आहे स्मरणा तील रंजन हा पैलु तो दाखवतो इथे प्रियकर नॉस्टेल्जिक आहे त्याला जुने दिवस आठवताय प्रिये बरोबरचे पण तो नॉट नेसेसरीली प्रत्येक वेळेस उदास होतोय त्याच्या मनाला प्रियेच्या बरोबरीने व्यतीत केलेले सुखाचे दिवस काही क्षणांपुरते का होइना मोहरुन टाकत आहेत, हे ही तर खरे आहे.
हा त्या प्रियकराचा मोहरुन जाण्याचा भाव गुलाम अली जगजित पेक्षा अधिक तरलतेने स्वरात चालीत पकडतो असे माझे व्यक्तीगत मत आहे.
पण तरीही तरीही एकच शब्द एकच भाषा इतकी भिन्न भावानुभुती कशी देउ शकते
गुढ च आहे नाही सगळ ?

मारवाजी, शब्द केवळ निर्देश आहे, अर्थ रसिकाच्या मनात आहे. त्यामुळे रसिक जितका अनुभव संपन्न तितका अर्थ गहिरा होत जातो.

उदाहरणार्थ : `चुपके चुपके रात दिन आसु बहाना याद है' हा ज्याचा अनुभव आहे, तो ती गज़ल, त्या भावदशेशी समरस होऊन गाईल. जो केवळ शायरीतली कल्पना स्वरातून उतरवायचा प्रयत्न करेल, त्याची गज़ल खर्‍या रसिकाला (त्याच्या स्वानुभवाशी) रिलेट करु शकणार नाही.

तुम्ही म्हटलंय "वाचक श्रोता गायक आदिंची त्या त्या वेळेची भावदशा अर्थनिर्णयनावर प्रभाव पाडत असते". तसं नाही. रसिक नेहमी ओपन माइंडेड असतो. त्याची चित्तदशा आरश्यासारखी स्वच्छ असावी लागते. त्या चित्तदशेवर कलाकृती भावतरंग उमटवते. मग रसिक त्या भावतरंगांना स्वतःच्या अनुभवविश्वात घेऊन जातो. तिथे जर रसिकाला, कलाकाराची उत्कटता स्पर्शून गेली तर, अर्थाची बरसात सुरु होते. एकेका अनुभवाचे अनेकानेक पैलू उलगडायला लागतात.

उदाहरणार्थ हा गा़लिबचा शेर :

मत पुछ की क्या हाल है मेरा तेरे पिछे
ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे |

काय जबरदस्त शेर आहे, माशाल्ला! याला म्हणतात स्वतःची कदर असणं. मला कधीही ग़ालिबच्या व्यसनांच्या, त्याच्या उधळेपणाच्या, कफल्लकतेच्या कथात रस नव्हता. त्याचा कलामच इतका बेहोष करणारा आहे की तो प्रत्येक रसिकाच्या कल्पनेला नवं आव्हान देतो. वन हॅज टू अप्रिशियेट हिज कॅलिबर.

प्रेयसीची मिन्नतवारी तर सगळेच करतात पण `माझ्या प्रितीमुळे तुझा रंग बहरलायं' (ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे) असं केवळ ग़ालिबच म्हणू शकतो. जनसामान्यांना यात गा़लिबची अहंमन्यता दिसेल, पण तो प्रेमाचा गौरव आहे.

मारवाजी, ग़ालिब कमालीचा प्रतिभाशाली शायर आहे. त्याची शब्द योजना इतकी अचूक आहे की अर्थ थेट हृदयापर्यंत पोहोचलाच पाहिजे. मग तो आशिक त्याच्या जमान्यातला असो की आत्ताचा, की इथून पुढे येणार्‍या कुठल्याही काळातला. त्याची शायरी चिरंतन आहे, कालातीत आहे.

एखाद्याला अहंमन्य म्हटलं की मिडिऑकर्स स्वतःचं बहुमत जमवायला मोकळे होतात.

संदीपनं म्हटलंय :

तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या,
पाठ फिरु दे त्याची नंतर, ... बोलू काही |

पण अशा वृत्तीमुळे त्यांची मिडिऑक्रसी वरच्या स्तर गाठू शकत नाही.

या गझल मधील गालिब या प्रियकरा चा व एकंदरीत भाव अहंमन्य मला माझ्यापुरता वाटला. गालिब अ‍ॅज अ पर्सन देखील अहंकारी होता ही तर अनेक दा दिसुन येणारी बाब आहे. मात्र त्याने काही फरक मला तरी पडत नाही. वर म्हटल्या प्रमाणे त्याचा इगो मला आवडतो. एक मनस्वी पिळ असलेला माणुस होता तो त्यात या कारणासाठी त्याचा तिरस्कार करावा निर्भत्सना करावी असे काही वाटत नाही. मी तर त्याच्या काव्याचा प्रेमी आहे. त्याच्या कवितांचा आनंद घेतांना तर ती बाब पुर्णपणे निरर्थक दुय्यम आहे. मात्र या गझल मधील जो प्रियकराचा भाव आहे तो असा आहे असे म्हणायचे होते.
व तो तसा असतांना जेव्हा जगजित सिंग च्या आवाजात जो भाव येतो
मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे
तो अतिशय व्याकुळ हर्ट झालेला बघ मी कीती दु:खात आहे काय माझी हालत झालीय या अर्थाचा तो विसंगत असुन ही जर मुळ गझल वाचलेली नसेल नुसताच जगजित च्या स्वरात ऐकला असेल तर वेगळा परीणाम होतो इतकच सुचवायच होत
हे दर्शविण्यात मिडीऑक्रसी तुम्हाला वाटली याचा खेद वाटतो.

बाजीचा ए अत्फ़ाल है दुनिया मेरे आगे
होता है शब-ओ-रोज तमाशा, मेरे आगे
इक खेल है औरंग-ए-सुलेमॉ मेरे नजदींक
इक बात है एजाज-ए-मसीहा मेरे आगे
जुज नाम नही सुरत-ए-आलम मुझे मंजुर
जुज वहम नही हस्ती-ए-अशियॉ मेरे आगे
होता है निहॉ गर्द मे सहरा मेरे होते
घिसता है जबी खाक पे दरिया मेरे आगे
मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे
ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे
सच कहते हो , खुदबीन-ओ-खुदआरा हु न क्यु हु ?
बैठा है बुत-ए-आईना सीमा, मेरे आगे

संजय क्षीरसागर's picture

27 Oct 2014 - 11:43 am | संजय क्षीरसागर

तुम्ही मिडीऑक्रसी दर्शवतायं असं मला कदापी म्हणायचं नाही, तरी गैरसमज नसावा.

इन जनरल, ग़ालिब काय (किंवा ओशो काय अथवा तत्सम इतर कुणीही असो), त्यांच्या लेखनावर चर्चा होतांना, व्यक्तीगत संदर्भ मधे आणून त्यांच्या प्रतिभेची प्रतवारी कमी केली जाते त्याविषयी मी ते विधान केलं आहे.

गवि's picture

27 Oct 2014 - 11:52 am | गवि

संक्षी..

`माझ्या प्रितीमुळे तुझा रंग बहरलायं' (ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे)

हे इंटरप्रिटेशन वेगळं असलं तरी ते बरोबर वाटत नाही.

तेरे पीछे या शब्दांत ती पुढे निघून गेलीय आणि हा आता पूर्ण मागे पडलाय ( तिच्या बाजूने भूतकाळ झालाय) हे सिद्ध होतं.

आणि मेरे आगे यातून तुझ्या या पुढील नव्या (माझ्याविना पुढे चालू असलेल्या ) आयुष्यात तुझे काय positive , केवळ सलामतच नव्हे तर नजाकत (रंग) याबाबत, कसे चालले आहे ते विचारले आहे. इथे अहंमन्यतेच्या पूर्ण उलट भाव आहे. मेरी (रडकथा) छोड अपनी (रंगभरी दास्तान) बता.

तिचा 'हाल' पूछण्याऐवजी रंग कैसा है ही सकारात्मक रचना आहे.

हे वाईट किंवा चांगले असा प्रश्न नाही पण अर्थ असा वाटतो.

संजय क्षीरसागर's picture

27 Oct 2014 - 1:01 pm | संजय क्षीरसागर

मत पुछ की क्या हाल है मेरा तेरे पिछे
ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे | मिर्जा़ गा़लिब

याचा अर्थ : तेरे पीछे या शब्दांत ती पुढे निघून गेलीय आणि हा आता पूर्ण मागे पडलाय ( तिच्या बाजूने भूतकाळ झालाय) हे सिद्ध होतं आणि त्यामुळे असा होतो :

मेरी (रडकथा) छोड अपनी (रंगभरी दास्तान) बता

असं (तुला) जरी वाटत असलं तरी, तेरे पिछे आणि मेरे आगे हे शब्द कालनिर्देशक नाहीत.

कारण गा़लिबच्या शायरीचा तो अंदाज़च नाही. आता `मी स्वतःचं खरं करतो' हा (रेग्युलर) स्टँड घेतला तर पुढे काही लिहिण्यात अर्थच नाही.

बट इफ यू कॅन अंडरस्टँड (अँड आय होप यू विल); गा़लिबची शायरी इंटेंस आहे, अत्यंत उत्कट आहे. आणि इंटेसिटी म्हणजे वर्तमान, द वेरी प्रेझंट! त्यामुळे :

`तेरे पिछे' म्हणजे तुझ्याविना आणि `मेरे आगे' म्हणजे आत्ता, माझ्यासमोर!

त्यामुळे या शेरचे दोन अर्थ आहेत :

तुझ्याविना मी कसा आहे ही बात सोड, माझ्यासमोर तुझा रंग काय आहे ते सांग !

म्हणजे तू प्रतारणा केलीयेस, (पण त्यावेळी) मी तुझ्यावर जान कुर्बान केली होती. आज पुन्हा तू माझ्यासमोर आहेस. तर तुझ्याविना माझी काय स्थिती झाली होती ती कहाणी जाऊ दे, आज (पुन्हा) तू माझ्यासमोर आलीयेस (मला भेटायला) तर तुझ्या दिलाचा काय रंग आहे ते सांग!

दुसरा अर्थही तितकाच उत्कट आहे. म्हणजे तीनं प्रतारणा केली नाहीये. ती फक्त बरेच दिवस भेटायला आलेली नाही आणि आज समोर आहे. तर गा़लिब तिला विचारतो :

तुझ्या विरहात मी कसे दिवस काढले (मत पुछ की क्या हाल है मेरा तेरे पिछे) ते राहूं दे, आता मला भेटून तू किती रंगारंग झालीयेस ते सांग! (ये बता के क्या रंग है तेरा मेरे आगे)

इथे गा़लिबच्या अंदाज़ाचा सॉलिड व्यासंग हवा, तो (मेरे आगे च्या ऐवजी) `मेरे सामने' लिहिणार नाही कारण तिथे इंटेसिटी राहाणार नाही. `तेरे पिछे' ला शह द्यायला, एक ट्रिमेंडस काँट्रास्ट तयार करायला तो `मेरे आगे' लिहितो. `मेरे आगे' चा अर्थ तू पुढे निघून गेलीस आणि मी मागे पडलो असा नाही. आता, माझ्यासमोर, मेरे आगे, असा आहे.

आणि मेरे आगे यातून तुझ्या या पुढील नव्या (माझ्याविना पुढे चालू असलेल्या ) आयुष्यात तुझे काय positive

आणि मेरे आगे यातून तुझ्या या पुढील नव्या (माझ्याविना पुढे चालू असलेल्या ) आयुष्यात तुझे काय positive
गवि जी इथे गालिब आपल्या इतर शेर मध्ये अशा प्रकारची वाक्यरचना वापरतांना त्याला अर्थ कसा अभिप्रेत असतो हे बघणे रोचक ठरेल म्हणजे तो आगे म्हणतांना त्याला पुढील काळ अभिप्रेत असतो की मागे सरलेला काळ यासाठी त्याचा हा शेर बघावा

कोइ उम्मीद बर नही आती
कोइ सुरत नजर नही आती

आगे आती थी हाल-ए-दिल पे हसी
अब कीसी बात पर नही आती

येथे आगे हा पास्ट दर्शविण्यासाठी गालिब वापरतो या संदर्भात तुमचे विधान तपासणे रोचक ठरावे

बाजीचा ए अत्फ़ाल है जमाना मेरे आगे
होता है शबोरोज तमाशा मेरे आगे |

त्यामुळे शब्दयोजनेचा,शेराच्या माहौलशी समरस होऊन, अर्थ बघावा लागतो.

पैसा's picture

28 Oct 2014 - 10:56 am | पैसा

तेरे पीछे या शब्दांत ती पुढे निघून गेलीय आणि हा आता पूर्ण मागे पडलाय ( तिच्या बाजूने भूतकाळ झालाय) हे सिद्ध होतं.

हे पटलं. "तुझ्यानंतर माझी काय अवस्था झाली, काय विचारू नको! सांगण्यापलिकडची वाईट अवस्था आहे" असा अर्थ वाटतो.

गा़लिबची शायरी इंटेंस आहे, अत्यंत उत्कट आहे. आणि इंटेसिटी म्हणजे वर्तमान, द वेरी प्रेझंट! त्यामुळे :

हे जल्लां काय कल्लां नाय. उत्कटता आणि वर्तमानकाळ याचा काय बादरायण संबंध आहे ते प्लीज प्लीज कोणीतरी समजून सांगा.

प्रतापराव गुजरांची भावना अत्यंत उत्कट होती, मात्र ते मारले जाण्यापूर्वी वर्तमानात जगत होते असं म्हणणं अजिबात शक्य नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे
तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे |

यातल्या दुसर्‍या ओळीचा अर्थ फारतर शापवाणीसारखा वाटला. "आता माझ्यापुढे तुझा रंग कसा उतरतो ते बघच!" असा काहीसा. "तेरा रंग" हा शब्द बहुशः चेहर्‍याचा रंग उतरणे, चेहरा पांढरा पडणे अशा अर्थाने येतो.

मेरे आगे असे शब्द का वापरले आणि मेरे सामने का वापरले नाहीत याचं साधं उत्तर म्हणजे ते वृत्तात बसत नाहीत. बाकी साक्षात गालिब थडग्यातून उठून आला तरी मिपाकरांना समजावू शकणार नाही याची खात्री असल्याने तूर्तास एवढेच.

वेल्लाभट's picture

27 Oct 2014 - 10:38 am | वेल्लाभट

वाह.... आवडता विषय!

धागा, अनेक माहितीपूर्ण प्रतिसाद वाचून प्रचंड उल्हसित वाटतय. आज ग़ुलाम अली ऐकलाच पाहिजे.....
आणि ग़ालिब.......... _/\_ केवळ कमाल !

संजय क्षीरसागर's picture

27 Oct 2014 - 9:25 pm | संजय क्षीरसागर

मारवाश्री, दिलेल्या विडिओत १८ व्या मिनिटापासनं ती ग़जल आहे, ऐका

आणि त्यातला मूळ शेर असा आहे :

मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे
तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे |

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 11:09 pm | सतिश गावडे

मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे
तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे |

हा शेर आम्ही कुमार विश्वासकडून त्याच्या "कोई दिवाना केहता हैं" मध्ये ऐकला होता. इथल्या व्हिडीओत हा शेर तिसर्‍या मिनिटाला सुरु होतो.

पिवळं कसं करायचं हे माहिती नसल्यामुळे प्रतिसादात पिवळं करत नाही.

>>पिवळं कसं करायचं हे माहिती नसल्यामुळे प्रतिसादात पिवळं करत नाही.

इकडे लाल होतंय तेवढं पुरे, तू पिवळं केलंस नाही केलंस फार फरक पडेलसं दिसत नाही. ;)

पिवळं कसं करायचं हे माहिती नसल्यामुळे प्रतिसादात पिवळं करत नाही.

सतिश गावडे's picture

28 Oct 2014 - 10:09 am | सतिश गावडे

जेपीभाऊ, तुम्हीही स्वत:च पिवळं केलं. कसं करायचं ते नाही सांगितलं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Oct 2014 - 11:24 am | डॉ सुहास म्हात्रे

माझ्या मते या ओळींचा सरळ अर्थ असा आहे:

मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे

"तू सोडून गेल्यावर माझे काय झाले ते विचारू नकोस (तू सोडून गेल्यावर माझे काय झाले ते काय विचारतेस ?)."

अहंमन्य असलेला गालिब स्वतःच्या दुखावलेल्या मनःस्थितीची चर्चा करणार नाही, उलट तो प्रश्न झटकून टाकणार हे सहाजिकच आहे.

तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे |

"त्याऐवजी तू आता माझ्या समोर आल्यावर (माझ्याविना असल्याने) तुझाच नखरा माझ्यासमोर किती फिका पडलाय ते पहा जरा !"

त्याला दुखावून सोडून गेलेली प्रेयसी समोर आल्यावर तिची विनवणी वगैरे करण्यापेक्षा "मी मस्त मजेत आहे, उलट तुझीच अवस्था कशी दयनीय झालीय बघ." अशी शेखी मारणे ही पण अहमन्य स्वभावाची एक सहज प्रतिक्रिया आहे.

"मियाँ गिरा फिर भी टांग उपर है" याचे हे उदाहरण केवळ गालिबच दाखवतो असे नाही, हे जरा आजूबाजूला नजर टाकली तरी सहज दिसून येईल :) ;)

मुळात "बता" तेरा रंग असा शेर सांगितला गेला इथे. तो मी प्रथमच वाचून सरळ वाटलेले इंटरप्रिटेशन सांगितले. पण शायरीत अनेक ॲंगल आणि अर्थ लावता येतात हीच तर मजा आहे.

आता शेर "बता" असा नसून "देख" असा असल्याची माहिती पुढे आल्याने अर्थातच सर्व नूरच पालटला. मूलभूतच बदल.

फैझ अहमद फैझच्या आये कुछ अब्र मधली खालची ओळ:

फैझ थी राह सर बसर मंझिल
हम जहां पहुंचे कामयाब आये.

यापैकी दुस-या ओळीत मला किमान दोन वेगळे अर्थ दिसतात. एक अत्यंत सकारात्मक आणि एक निगेटिव्ह छटेचा पराभूत.

संजय क्षीरसागर's picture

28 Oct 2014 - 1:27 pm | संजय क्षीरसागर

कुणाला चर्चा लाईनवर ठेवण्यात इंटरेस्ट तर कुणाला (गा़लिबच निमित्त करुन) शेरेबाजी करण्यात.....असो!

गवि, सहमत आहे. इतक्या पसार्‍यात मूळ गज़ल सापडली हेच नवल आहे! त्या एपिसोडमधे नेमकी तीच गज़ल असेल असं मला सुद्धा वाटलं नव्हतं. पण आता स्वतः गुलजारनं सगळी सिरियल केलीये म्हटल्यावर, हे वर्शन :

मत पुछ के क्या हाल है मेरा तेरे पिछे
तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे |

ग्राह्य धरायला हवं.

आणि मग `तू देख के क्या रंग, तेरा मेरे आगे' याचे दोन अर्थ संभवतात.

कुणाला गा़लिब अहंमन्य वाटू शकतो...तर कुणाला तो त्याच्या (किंवा कुणाच्याही सच्च्या आशिकीचा) विजय वाटू शकतो.

क्यो मियॉ
बात जब निकलेगी तो दुर तक जाएगी वाला मामला हो गया. ये सिलसिला क्यो तोडते हो हुजुर
देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए चलो आपकी गझल लेते है कुछ तुम कहो कुछ हम कहत है
कयामत तक ना सही कुछ रोज तक ही सही पुरा दिवान नही कुछ चुनिंदा शेर सही
रेख्ते के सारे उस्ताद ना सही कुछ गालिब कुछ फैज सही
*******************
१- आए कुछ अब्र कुछ शराब आए, उसके बाद आए जो अजाब आए
२- बाम-ए-मीना से माहताब उतरे , दस्त-ए-साकीं मे आफताब आए
३- हर रग-ए-खु मे फिर चरागॉ हो, सामने फिर वो बे-नकाब आए
४- उम्र के हर वक पे दिल को नजर, तेरी मेहर-ओ-वफॉ के बाब आए
५- कर रहा था गम-ए-जहॉ का हिसाब, आज तुम याद बेहिसाब आए
६- ना गयी तेरे गम की सर्दरी, दिल मे यु रोज इन्किलाब आए.
७- जल उठे बज्म-ए-गैर के दर ओ बाम, जब भी हम खानाम्ख्रराब आए
८--इस तरह अपनी खामोशी गुंजी, गोया हर सिम्त से जवाब आए
९-फैज थी राह सर बसर मंजील, हम जहॉ पहुचे कामयाब आए.

यातील माझा सर्वात आवडता शेर हर रग-ए-खु मे फिर चरागॉ हो सामने फिर वो बे-नकाब आए. याच अर्थाच्या जवळ जाणारा दुसरा असाच एक सुंदर शेर
जाने आज किस किस की मौत आयी है रुख पे उनके कोइ नकाब नही.
और एक
सरकती जाए है रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता निकलता आ रहा है आफताब आहिस्ता आहिस्ता
आणि एव्हर ग्रीन गालिब
खुदा के वास्ते परदॉ ना काबे से उठा गालिब कहि एसा ना हो के या भी वही काफिर सनम निकले
( काबा या पवित्र स्थळा वर एक पडदा आहे असे म्हणतात , गालिब विंनंती करतोय की तेथील पडदा कृपया हटवु नका
कारण मला देवाएवजी तिथे माझ्या प्रियेचेच दर्शन होइल. कारण मला ती जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तीच तर दिसत आहे. म्हणुन मला तिथे पडदा हटवल्यावर देखील तिच दिसणार, जहॉ भी जाउ ये लगता है तेरी महफिल है तु इस तरह से मेरी जिंदगी मे शामिल है.)
तो फिर एक बार शमॉ गवि मियॉ के सामने रखता हु और इर्शाद कहता हु.
प्लीज एक्सप्लेन ४ ७ आणि ९ हे जरा विशेष कठीण वाटतात बाकी प्रत्येका साठी अनेक असोसिएशन्स ची अर्थांची व सिमीलर शेर ची मालिका मनात सुरु झाली आहे.
मात्र ४ ७ व ९ पे थोडा उजाला डालिए हुजुर
इर्शाद टू ऑल

मै जरा जुनु मे एक साथ बहोत सी गलतियॉ कर बैठा
वो शेर
खुदॉ के वास्ते पर्दा ना काबे से उठा वाइज
कही एसा ना हो या भी वही काफिर सनम निकले
वाइज (धर्मोपदेशक)
और भी बहोत बहोत गलतियॉ दिख रही है लेकीन चलो यहॉ से शुरु करते है
थोडी गुजारीश है जरा सुधार दिजीए
शुक्रगुजार तो हु ही
और अपनो का थोडी शुक्रीया मानते है ?
है ना ?

गझलेचा नाद फार वाईट. सुटता सुटत नाही पकडलं एकदा तिने तर. मी हल्ली गझल "घेणं" कमी करत आणलंय. पण पूर्ण सुटत नाही. कधीकधी असे रिलॅप्स व्हायला होतेच.

सध्या स्ट्रिक्टली केवळ त्या "कामयाब आये" विषयी.

एकीकडे मी जिथे गेलो तिथून यश घेऊन परतलो.. जिंकून परतलो.. यशवंत होऊनच परतलो... खूप confidence.

आणि दुस-या कोनातून पाहिलं तर मी जिथेजिथे पोचलो तिथेतिथे (आधीच किंवा मागोमाग) कामयाब (लोक) पोचले अन माझं यश हिरावून नेलं.

एखादा निवांत अद्भुत सुंदर दरीच्या टोकावरचा पोईंट आपल्याला खूप चढणीनंतर सापडावा आणि आपणच या अपूर्व ठिकाणाचे एकटे मालक असे म्हणेस्तो दहा ट्रेकर्सचं बेगुमान टोळकं झपाट्याने ढांगा टाकत आपल्याला मागे टाकत तिथे पोचावं.

अंदाज अपना अपना..

हे रात्रभर जागवणारे उद्योग सांगितलेत कुणी? नकाच अर्थ लावू.

मारवा's picture

29 Oct 2014 - 7:28 am | मारवा

कामयाब अर्थाचे दोन्ही कोण आवडले असा दुहेरी अर्थ जाणवलाच नव्हता अजिबात,
आणि ट्रेकर्स ची कॉमेंट तर बढीया
याला काय ट्रेकर्स ट्राउमा म्हणावे की ट्रेकर्स ट्रॅजेडी की माय मराठीत गिर्यारोहकाचे गर्वहरण !
पण यात तर मजा आहे डिस्कसींग पोएट्री इटसेल्फ इज ग्रेट जॉय सगळ्यात जास्त सेरेनडीपीटी अनुभवयाला मिळते जेव्हा आपल्याला माहीत नसलेला वेगळा अर्थ कळतो तेव्हा, म्हणुन मैहफील ला पर्याय नाही.
तुम्ही आए कुछ अब्र चा वरील लिंक दिलेला बेगम अख्तर चा व्हीडिओ जरुर बघा त्यात फार छान अशी जुन्या काळातील ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट महफिल दिसतेय, लोक पण अशी जवळ जवळ इनफॉर्मल बसलेली,
सुरुवातीला एक क्युट स्माइल असलेली निवेदिका येते तिला बघितल्यावर अजुन एक सेरेनडीपीटी होइल ती सलमा सुल्ताना दुरदर्शन वरची न्युज निवेदिका तिला मी आजपर्यंत फक्त वयस्कर असतांना न्युज देतांना बघितल्याचे स्मरणात होते
हा व्हिडीओ फारच जुना आहे त्यात ती अगदी तरुण दिसते. बेगम चा आवाज तर आपण काय बोलाव त्यावर आपली कॉमेंट करण्याची लायकीच नाही फक्त आनंद घ्यावा गप्पगुमान.
दुसरा जगजित चा जो आहे ना तो ही जवळपास १९८० च रेकॉर्डींग आहे त्यात ही जगजित चा अगदि सुरुवातीचा व्हर्जिन आवाज एकायला मिळतो. फार च सुंदर गायली आहे जगजितने ही गझल त्याचा अजा,,,,ब आये हे फार सुंदर लयीत तो म्हणतो
मेहंदी हसन थोडा रुचला नाही जड वाटला
पण एकच राग जसा वेगवेगळ्या आवाजात एकण्याचा आनंद अलौलिक असतो तसच गझल च्या बाबतीत ही आहे हे नक्की

कवितानागेश's picture

28 Oct 2014 - 10:51 pm | कवितानागेश

... वाचतेय.
गवि आणि प्रतापराव गुजरांशी सहमत.

स्पंदना's picture

29 Oct 2014 - 3:19 am | स्पंदना

@पैसा
जमलो गे बाय जमलो तुका
येकाच शेपुट ओढुन लाग्गेल तेव्हढ ताणुन थेट प्रतापराव गुर्जरांच्या तोंडात!!!

हे प्रतापराव गुर्जर कोण आहेत ? त्यांना कुणी मारल ? त्यांचा संदर्भ कशा संदर्भात आहे ? माझ्या पुर्ण डोक्यावरुन गेल.
प्लिज प्लिज कुणी तरी याचा डीटेल उलगडा करा.

पैसा's picture

29 Oct 2014 - 10:39 am | पैसा

मराठी इतिहासातील एक सोनेरी पान. "वेडात मराठे वीर दौडले सात" कधी ऐकलं असाल तर ते यांच्यावर लिहिलं आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Prataprao_Gujar

ज्योती जी
या नविन माहीती साठी
धन्यवाद !

जेपी's picture

29 Oct 2014 - 9:24 am | जेपी

वाखू साठवतो.
आरामात वाचायला चांगलाय.

न राहवून आणखी काही.. जड उर्दूत न शिरता तरीही काही आवडते इथे नोंदवतो.

उम्र यूं गुजरी है जैसे सर से
सनसनाता हुआ पत्थर गुजरे

अजून वेगळे काही ..

केहते है फिर लौट न आना
कुछ तो आगे बात चली है