मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीकांची माहिती हवी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
5 Sep 2014 - 11:10 pm
गाभा: 

दहावीच्या वर्गातील मूलांना शिक्षकाची भूमीका वठवण्याची संधी मिळत असते पण यात नाट्यापेक्षा प्रात्यक्षीक अधीक असत, त्या आधी अगदीच लहानपणी डॉक्टर डॉक्टर हा खेळ खेळला जाताना दिसतो, तसा टिचर टिचर हा खेळही काही वेळा रंगलेला दिसतो.

सर्वच भाषेतील मनोरंजन क्षेत्रातील नाटक, टिव्ही सिरीयल्स चित्रपट इत्यादी माध्यमातून शिक्षकांच्या भूमिका विवीध कलाकारांनी केलेल्या आढळून येतात. ५ सप्टेंबर भारतात शि़क्षक दिन म्हणून पाळला जातो तर ५ ऑक्टोबर जागतीक शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. या निमीत्ताने नाटक, टिव्ही सिरीयल्स, चित्रपट इत्यादी मनोरंजन मनोरंजन माध्यमातून साकारलेल्या गेलेल्या शिक्षकांच्या भूमीकांबद्दल माहिती हवी आहे.

माहिती शोधताना नाही म्हणावयास टाइम्स ऑफ इंडीयाच्या कृपे करून सुश्मीता सेन (मै हु ना), चित्रांगदा सेन (देसी बॉईज), शहारूख खान (चक दे) अमीर खान (तारे जमीन पर), शाहीद कपूर (पाठशाला), अमिताभ बच्चन, इत्यादी नाव आली आहेत.

मला वाटते दुरदर्शन कालीन बुनीयाद नावाच्या हिंदी मालीकेत एक शिक्षकाची भूमीका आली आहे, अलिकडे कोणत्याशा मराठी चित्रपटात देशमुख नावाने एका शिक्षकाच चित्रण आलं आहे.

शिक्षकांच्या भूमीकात प्राधान्याने तीन प्रकार दाखवले जातात एक 'गुरू' ही भूमीका यात मुख्यत्वे संगीत, क्रिडा इत्यादी प्रकार येत असावेत, दुसरे शिक्षकाच्या व्यक्तीगत जीवनाशी संबंधीत भाग, तिसरे शाळा अथवा महाविद्यालयात प्रत्यक्ष शिकवताना.

तारे जमीन पर मधील आमीर खानची भूमीका आदर्श शिक्षकाची भूमीका आहे. मला वाटते श्रीराम लागूंनीही मराठी चित्रपटात शिक्षकाची भूमिका पार पाडली आहे ज्यात ते आदर्श शिक्षक आणि आदर्शापासून भटकलेले अशा दोन भूमीका एकाच चित्रपटातून पार पाडताना दिसतात.

तर आपणास ठाऊक असलेल्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतरही साहित्य ते मनोरंजन क्षेत्रातील शिक्षक/ प्राध्यापक/ मुख्याध्यापक/ प्राचार्य या भूमिकां असलेले साहित्य, नाटक, मालिका, चित्रपट कोणते पात्राचे नाव, कलाकार आणि शिक्षकाच्या संबंधीत रोल विषयी माहिती हवी आहे.

सोबतच तुमच्या शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनातील शिक्षकांबद्दल काही प्रसंग माहिती आठवली किंवा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कधी आपणास शिकवण्यास होऊन गेले असले तर त्या बद्दलही वाचण्यास आवडेल.

*ह्या धाग्यावरील आपले पुरस्कार प्राप्त शिक्षक आदर्श शिक्षक अथवा मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीका या संदर्भाने येणारे प्रतिसाद विकिप्रकल्पातूनही वापरले जाऊ शकतात म्हणून नित्या प्रमाणे आपले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.

*अनुषंगिका शिवाय इतर विषयांतरे टाळण्यासाठी आणि (अ)शुद्ध लेखनाचे बोधामृत टाळण्यासाठी धन्यवाद.

प्रतिक्रिया

एस's picture

5 Sep 2014 - 11:25 pm | एस

मला वाटते श्रीराम लागूंनीही मराठी चित्रपटात शिक्षकाची भूमिका पार पाडली आहे ज्यात ते आदर्श शिक्षक आणि आदर्शापासून भटकलेले अशा दोन भूमीका एकाच चित्रपटातून पार पाडताना दिसतात.

तुम्हांवर केली मी मरजी बहाल...
... नका सोडून जाऊ रंगमहाल!

काय राव, 'पिंजरा' आठवंना काय तुमास्नी?

बादवे, हा विषय इतका मोठा आहे की अक्षरशः ढिगाने उदाहरणे देता येतील. ही वरची टीओआयची उदाहरणे अगदीच फालतू वाटली. मराठीत मला वाटते राजा परांजपे, रंजना (सुशीला), चंद्रकांत कुलकर्णी (बनगरवाडी), प्रिया अरूण (शेम टू शेम), अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर आणि अशीच बरीच नावे आहेत. अगदी पटकन आठवत नाहीत. तरीपण वेळ मिळेल तसे इथे येऊन नक्कीच माहिती देत राहीन.

मित्रहो's picture

6 Sep 2014 - 10:41 am | मित्रहो

अतुल कुलकर्णी दहावी फ
दिलीप प्रभावळकर एक डाव भुताचा
श्रीराम लागू सामना. (सिनेमात प्रत्यक्षात शिकवताना दाखविले नाही पण नेहमी उल्लेख मास्तर असा होतो)
किशोर कुमार पडोसन (गुरु म्हणून, गाण शिकवण्याचा प्रयत्न अफलातून) मेहमूद पण त्याच चित्रपटात
स्मिता पाटील उंबरठा तिला शिक्षक म्हणावे की नाही हा प्रश्न आहे पण ती होस्टेलची वार्डन असते.

अशोक सराफ, भारत गणेशपुरे आणि मंडळी - निशाणी डावा अंगठा

आदूबाळ's picture

6 Sep 2014 - 12:37 pm | आदूबाळ

साहित्य
- चितळे मास्तर - व्यक्ती आणि वल्ली - पु. ल.
- अण्णा वडगावकर - व्य आ व - पु ल
- दामले मास्तर (आणि राखुंड्या वगैरे इतर) - बिगरी ते मेट्रिक
- बाबुल - महानंदा - जयवंत दळवी
- <तीन मास्तर> - सारे प्रवासी घडीचे - जयवंत दळवी
- मांजरेकर सर - शाळा - मिलिंद बोकील

अजून आठवून लिहीन

माहितगार's picture

6 Sep 2014 - 2:32 pm | माहितगार

'स्वॅप्स', 'मित्रहो' आणि 'आदूबाळ' आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादांसाठी धन्यवाद. आपल्या प्रतिसादांची संदर्भासहीत दखल मराथी विकिपीडियावरील मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीका या लेख विभागातून घेऊ शकलो आहे.

असेच अजून प्रतिसाद येऊ द्यात, मराठी विकिपीडियावरील माहितीत सुधारणा शक्य असल्यास त्या लेखातही जाऊन आपण करू शकता सध्यातरी आपणा सर्वांच्या अधिक प्रतिसादांची वाट पाहतो आहे. धन्यवाद.

ही वरची टीओआयची उदाहरणे अगदीच फालतू वाटली.

सहमत.

अनुपम खेर, सारांश, कोण विसरेल. त्याच्या तरुणपणात त्याने ती (७५ वर्षाच्या म्हातार्‍याची) भुमिका केली होती.
सगळ शूटींग शिवाजी पार्क परिसरातील होते. शाळेच शूटींग बालमोहन मधील होते.

माहितगार's picture

6 Sep 2014 - 4:49 pm | माहितगार

अनुपम खेर, सारांश, हो महत्वाचाच उल्लेख राहून गेला होता त्याचे आपण स्मरण दिल्याबद्दल धन्यवाद. अशा माहितीने धागाही रोचक होतो अर्थात विकिपीडिया लेखात माहिती मिळेल तशी जोडतोच आहे.

भिंगरी's picture

6 Sep 2014 - 3:43 pm | भिंगरी

कोणत्याश्या मराठी वाहिनीवर संस्कार ही मालिका होती त्यात मोहन जोशींनी आदर्श शिक्षकाची भुमिका केली होती.

माहितगार's picture

6 Sep 2014 - 4:52 pm | माहितगार

हि मालिका सम हाऊ माझ्या पहाण्यात आली नव्हती, वाहिनी आणि प्रसारण वर्षाचा अंदाजा या चर्चेच्या निमीत्ताने कुणी देऊ शकल्यास बरे पडेल. प्रतिसादांसाठी धन्यवाद

भिंगरी's picture

6 Sep 2014 - 4:01 pm | भिंगरी

त्यातील,'मना घडवी संस्कार'हे शिर्षक गीत फार छन होते.

शिद's picture

6 Sep 2014 - 6:05 pm | शिद

शिर्षक गीत खालील लिंकमध्ये ० ते १.२९ मि. पर्यंत पाहता येईल.

मना घडवी संस्कार

विअर्ड विक्स's picture

7 Sep 2014 - 12:15 pm | विअर्ड विक्स

मोहन जोशींचे नाव बल्लाळ सर होते या मालिकेत. या मालिकेतील इतर शिक्षकही चांगलेच होते.