श्रीरंग जोशी यांच्यासोबत पुणे कट्टा- रविवार दि. २२ जून

प्रचेतस's picture
प्रचेतस in काथ्याकूट
20 Jun 2014 - 10:07 pm
गाभा: 

मिपाकर श्रीरंग जोशी नुकतेच पुण्यात आले आहेत.
त्यांना आपल्या सर्वांना भेटायची इच्छा आहे. आताच त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार हा जाहीर धागा टाकत आहे.

कट्ट्याची ढोबळमानाने रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील.

कट्ट्याची वेळ: रविवार दि. २२ जून २०१४. दुपारी चार वाजता.
ठिकाण: शनिवारवाडा

ज्यांना शक्य होईल त्यांनी दुपारी ४ वाजता शनिवारवाड्यापाशी जमावे. शनिवारवाडा पाहून वेळ मिळाल्यास जवळच मंगळवार पेठेतील शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणपती मंदिर बघून नंतर खादाडी कुठे करायची हे ठरवता येईल.
शनिवारवाडा संध्याकाळी ६.०० वाजता बंद होतो ह्याची नोंद घ्यावी.

ज्यांना लवकर येणे जमणार नाही ते संध्याकाळच्या खादाडीसाठी भेटू शकतील.

मी, सूड, धन्या, आणि अत्रुप्त आत्मा येत आहोत.

अधिक माहितीसाठी मला किंवा आत्मुबुवांना व्यनि करावा.

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Jun 2014 - 10:13 pm | पैसा

आमच्या चहाची सोय करायचं लक्षात आहे ना?

प्रचेतस's picture

20 Jun 2014 - 10:17 pm | प्रचेतस

आता चहा शनिवारवाड्यावरच =))

पैसा's picture

20 Jun 2014 - 10:20 pm | पैसा

पुणेरी उत्तर. आता स.पे. मधला एखादा यजमान शोधणे आले.

प्रचेतस's picture

20 Jun 2014 - 10:25 pm | प्रचेतस

वडगाव बुद्रुक मधला एखादा यजमान शोधत नाहीत हे नशीब.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jun 2014 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा

ऑंsssss *shok* पैसा ताई पण पुण्यात!

पैसा's picture

20 Jun 2014 - 11:19 pm | पैसा

वल्लीने कितीही अनाहितांना घेऊन या, चहा देतो म्हटलेलं. आणि आता विसरला सोयिस्करपणे! पुणेकरांच्या नावावर आणखी एक किस्सा जमा झाला! =))

प्यारे१'s picture

20 Jun 2014 - 11:26 pm | प्यारे१

हे बघा, ते 'पीसीएम्सी' वाले आहेत... तेंची महापालिका येगळी हाय!
त्यातनं पन आमच्या 'सरां'ला कुनी म्हनलं तर ते आक्की पार्टी आनि प्यार्टी पन देतेत. (असं आयकूण हाय)
तेवा हे वेक्तिसापेक्श हाय स्तळसापेक्श नाय हाय हे ची किरपया णाँद घ्यावी.

-नुत्काच पुनेकर ;)

प्रचेतस's picture

20 Jun 2014 - 11:28 pm | प्रचेतस

नाय ब्वा.
चहा पाजण्याचा आमचा वादा कायम हाय.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jun 2014 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा

ह्हूंssss :-/
हे पिंपरी-गोवा युतिचं दु... दु.... कारस्थान आहे! :-/

पैसा's picture

20 Jun 2014 - 11:44 pm | पैसा

युती कसली? पिं. चिं. वाल्यांचं काय खरं नै. आता आम्ही शिंव्हगड रोडवाल्यांबरोबर महायुतीचा विचार करू.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jun 2014 - 8:35 am | अत्रुप्त आत्मा

आपल्या इचाराचा इचार केला जाइल! ;)
कोर कमिटी पुडे सदर इचार ..विणिमयासाठी ठेवनेत येइल! :D

कोर कमिटीत पिंचि आणि सिंहगड रोडावरची मेंब्रे समसमान आहेत त्यामुळे एकमत होणे कठीण वाटते. ;)

चौकटराजा's picture

21 Jun 2014 - 12:09 pm | चौकटराजा

पिंचीकडे " वजनदार" माणसे आहेत.ती सुद्धा सातवाहन कालीन शर्ट घालणारी !

प्रचेतस's picture

21 Jun 2014 - 12:32 pm | प्रचेतस

=))

हो, आणि एक इरसाल म्हातारं पण आहे. ;)

इरसाल's picture

21 Jun 2014 - 12:47 pm | इरसाल

वल्ली मी अजुन थोडा "तरुण" आहे हो.

त्रिवेणी's picture

21 Jun 2014 - 3:03 pm | त्रिवेणी

चहा न पिणार्याy अनहितांसाठी दुसरी काही सोय केली आहे का *unknw*

प्रचेतस's picture

21 Jun 2014 - 3:04 pm | प्रचेतस

अरे बापरे...... *shok*

त्रिवेणी's picture

21 Jun 2014 - 3:08 pm | त्रिवेणी

घाबरू नका. जुस, आइसक्रीम असे काही *clapping*

प्रचेतस's picture

21 Jun 2014 - 3:12 pm | प्रचेतस

*ROFL*

सगळेजण एकत्र भेटा, जर चुकुन पुण्यात पाऊस असलाच तर, गरमागरम भजी आणि कटिंग सोबत भरपुर गप्पा मारा.
सचित्र वृत्तांताची वाट पहात आहे.

आदूबाळ's picture

20 Jun 2014 - 10:44 pm | आदूबाळ

वा वा! कट्ट्यास शुभेच्छा!

ता.क. साखरभात खाऊ नये.

गुरुवारी किंवा शुक्रवारी ठेवला असता तर, नक्की आलो असतो.

प्रचेतस's picture

20 Jun 2014 - 11:30 pm | प्रचेतस

शुक्रवारी त्यांचे उसगावात प्रस्थान होणार आहे.

पैसा's picture

20 Jun 2014 - 11:51 pm | पैसा

धागा हायजॅक केल्याबद्दल सॉरी बिरी काय म्हणणार नाय. जोशीबुवांना भेटायचं आहेच्च. त्यांच्या एका गाववालीची खबरबात घ्यायची आहे.

एस's picture

21 Jun 2014 - 3:37 pm | एस

पुण्याचा धागा हायजॅक व्हावा आणि तेही ज्येष्ठ संपादिकेकडून. याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. शनिवारवाड्यासमोर कट्टा चालू असे पर्यंत धरणे धरण्यात येणार आहे याची संमंने कृपया नोंद घ्यावी. कट्टा आयोजकांनी हे उपोषण नाही हे लक्षात ठेवून धरणेकर्‍यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी ही सूचना.

पैसा's picture

21 Jun 2014 - 4:43 pm | पैसा

धरण्याला माझा 'बेशर्त' पाठिंबा. चहा तरी नक्की मिळेल हे ठौक आहे. बाकी काय ते प्रसंगोपात्त कळेलच. माझ्या अंदाजाप्रमाणे २ अनाहिता/धरणेकरी असतील तर चहा+भजी, ४ असल्यास फुल्ल चहा, ६ असल्यास कटिंग चहा, आणि त्याहून जास्त असल्यास "कोण आपण" इ. बोलाची कढीभात मिळण्याची शक्यता दिसते.

प्रचेतस's picture

21 Jun 2014 - 4:48 pm | प्रचेतस

अहो पण अनाहिताच धागा हायाज्याक करायल्यात आणि धरणे पण त्याच धरणार हे म्हणजे मुख्यंमंत्री केजरीवालने उपोषण करण्यासारखे झाले.

पैसा's picture

21 Jun 2014 - 5:04 pm | पैसा

स्वॅप्स धरणे धरायला येणार आहे. अनाहिता नव्हे! आमचा बेशर्त पाठिंबा हय.

टवाळ कार्टा's picture

22 Jun 2014 - 12:46 pm | टवाळ कार्टा

खांदा मिळाला दंबुक चालवायला ;)

एस's picture

24 Jun 2014 - 5:04 pm | एस

पैतैंनी धोका दिल्याबद्दल पुन्हा एकदा निषेध. चहापाण्याचं इतकं छान अनाहिता-नियोजन केलं होतं की त्या धसक्याने आम्ही धरणे धरण्याचा विचार कुपोषणाच्या भीतीने ऐनवेळी बदलून कट्ट्याला टांग मारली आणि ह्यांनी चक्क ओले काजू दिलेन्...

असोत. पण कुण्णाच्याही वृत्तांतात पुणेरीपणा जाणवला नाही. अरेरे! शनवारवाड्या, उगी उगी. आपण दोघे मिळून कट्टा करू आणि स-छा.चि. वृत्तांत दै. स. (हे दै. सं. असे वाचू नये, त्यातील ज्या 'स' वर अनुस्वार नाही त्याचाही खरा पुणेकर सानुनासिकच उच्चार करतो म्हणा!) मध्ये छापून आणू. ओके?

पैसा's picture

25 Jun 2014 - 12:55 am | पैसा

स्वॅप्स येणार असे कळल्याने मी काजूची आणखी दोन पाकिटे नेली होती ती परत आणावी लागली. त्यामुळे स्वॅप्सच्या निषेधाचा निषेध!

आता परत पार्टी बदलली आहे कारण शेवटपर्यंत आम्हाला चहा काही मिळाला नाही. शेवट चहाऐवजी जेवणाची वेळ होत आली आहे हे बघून आम्ही तिथून "टळलो."

एस's picture

25 Jun 2014 - 11:28 am | एस

मीही अनाहिता येणार म्हणून दोन काजूवाले गुड-डे बिस्किटपुडे घेतले होते. वल्लीशेटनी अनाहितांना चहा दिल्यावर त्यात बुडवून खायला द्यायला म्हणून. ते पुडे परत न्यावे लागले.
यावर उतारा म्हणून रत्नांग्रीवरून चार पाकिटं मागवली आहेत आता.

रेवती's picture

21 Jun 2014 - 12:55 am | रेवती

हे काय? पैतै, पंतांच्या पत्नीने अनाहितावर हे सांगितले नव्हते. बघा, आता काही होऊ शकतय का.

जुइ's picture

21 Jun 2014 - 7:55 am | जुइ

:D

मी पण येत आहे.

पैसा's picture

21 Jun 2014 - 10:17 am | पैसा

भेटू नक्की!

रेवती's picture

21 Jun 2014 - 5:33 pm | रेवती

हां, मग ठीक आहे.

खटपट्या's picture

21 Jun 2014 - 2:42 am | खटपट्या

शुभेछा !!!

यशोधरा's picture

21 Jun 2014 - 8:02 am | यशोधरा

कट्ट्याला शुभेच्छा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Jun 2014 - 8:10 am | विश्वनाथ मेहेंदळे

पुणे कट्ट्याचा धागा, तो पण वल्लीकडून ?
चक्कर येउन पडतो आहे. शुद्धीवर आलो की उर्वरित प्रतिक्रिया देईन.

चौकटराजा's picture

21 Jun 2014 - 8:27 am | चौकटराजा

हपिसातून अलीकडे वल्ली ला मिपा कट्यासाठी टी ए, डीए मिळायला लागलाय ! सबब नोव्हेंबर मधे कट्टा हंपी येथे आहे.

=))

जेव्हड्या मिपाकरांना भेटता येईल तेव्हढ्या मिपाकरांना भेटण्याची श्रीरंगाची इच्छा आहे अन्यथा नेहमीप्रमाणेच खाजगी कट्टा केला असता. ;)

धन्या's picture

21 Jun 2014 - 8:41 am | धन्या

बदलला आहे तो.

हल्ली तो गड/किल्ला/लेणी/गुंफा पाहायला गेल्यावर त्या जागेची माहितीही सांगतो. तुम्ही त्याच्यासोबत ट्रेकला जाणं बंद केल्याचं दु:ख सहन न झाल्यामुळेच हे अमुलाग्र परीवर्तन झाले असावे त्याच्यात.

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2014 - 9:20 am | श्रीरंग_जोशी

या धाग्याबाबत वल्ली यांचे मनापासून आभार.

मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा उद्या पूर्ण होणार. :-).

माझा इथला भ्रमणध्वनी क्रमांक ७०२८४६५३१६ आहे.

बाबा पाटील's picture

21 Jun 2014 - 10:39 am | बाबा पाटील

नक्की येत आहे.

बाबा पाटील's picture

21 Jun 2014 - 10:46 am | बाबा पाटील

अहो पण शनिवारवाड्याजवळ आमच घोड बांधायच कुठ ? का हमालवाड्यातच बांधुन तेथुन चालत यायच ?

प्रचेतस's picture

21 Jun 2014 - 10:55 am | प्रचेतस

कसबा गणपतीपाशी किंवा खुद्द शनिवारवाड्याच्या प्रांगणातच पागेची व्यवस्था आहे. तिथं बांधा घोडं.

बाबा पाटील's picture

21 Jun 2014 - 11:29 am | बाबा पाटील

आणखी एक शंका उद्या पालखी कुठे असेल ?

पालख्यांचा उद्या पालखी विठोबा आणि निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्काम असेल तेव्हा रस्ते सुरळीत चालू असतील.

जेनी...'s picture

21 Jun 2014 - 11:44 am | जेनी...

:(

छ्या राव.. आजकाल कट्ट्याला हजेरी लावणे काही होत नाही. आता कट्टापण कुठे तर शनिवारवाडा म्हणजे आमचाच परिसर. पण नेमका मुंबईला यावे लागल्याने कट्टा हुकला तो हुकलाच.. :(

प्रभाकर पेठकर's picture

21 Jun 2014 - 2:10 pm | प्रभाकर पेठकर

*i-m_so_happy*
*i-m_so_happy*
*i-m_so_happy*
*i-m_so_happy*
कट्टेकरांना अनेक हार्दिक शुभेच्छा....!

मुक्त विहारि's picture

21 Jun 2014 - 3:22 pm | मुक्त विहारि

आमच्या कडून पण हार्दिक शुभेच्छा....

माझीही शॅम्पेन's picture

22 Jun 2014 - 1:24 pm | माझीही शॅम्पेन

++२

आमच्या कडून पण हार्दिक शुभेच्छा....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Jun 2014 - 10:16 am | निनाद मुक्काम प...

सचित्र वृत्तांकनाची वाट बघत आहे.

डॉ. भुषण काळुसकर जेवण्याच्या वेळी येतील असं त्यांनी म्हटलं आहे.

बाबा पाटील's picture

22 Jun 2014 - 6:53 pm | बाबा पाटील

ओ.पी.डी. मध्ये अडकलो आहे.येवु शकत नाही त्याबद्दल क्षमस्व.कट्ट्यास शुभेच्छा.

बाबा काका तुम्ही रंगा काकांना टांग दिलित काय?? *shok*

बाबा पाटील's picture

23 Jun 2014 - 12:09 pm | बाबा पाटील

माझ्या पेशंट्स नी मला टांगेत टांग टाकुन अडकवुन ठेवले बरे.नाहीतर मी कधीच कुनाला टांग देत नाही बरे.

त्रिवेणी's picture

23 Jun 2014 - 5:04 pm | त्रिवेणी

कट्टा व्रुत्तांत?

यशोधरा's picture

23 Jun 2014 - 5:11 pm | यशोधरा

वृत्तांत नाही का यायचा मध्यवर्ती पुण्यात घडलेल्या कट्ट्याचा? ;)

कट्टा धमाल झाला असेल ह्यात काही शंका नाही... सविस्तर व सचित्र कट्टा वृत्तांच्या प्रतिक्षेत.

वृत्तांत लिहिलाच पाहिजे असं काही नाही.

तरी थोडक्यात देतो.

एकंदर हजर व्यक्ती

श्रीरंग जोशी आणि जुई, पैसा ताई, अपर्णा अक्षय, इस्पीकचा एक्का, चौकटराजा, हुकुमी एक्का (ह्या तिघांचा हुकमी डाव होता), वल्ली, धन्या, धन्याचा भाचा, सूड, अत्रुप्त आत्मा, ५० फक्त विथ चि. १००, प्रशांत (वहिनी आणि बालके अर्णवसह), देशपांडे विनायक काका, वाचनमात्र मिपाकर अजित सावंत आणि समीर शेलार, मोदक (१५ मिनिटे उपस्थिती) अणि डॉ. भूषण काळुसकर (फक्त जेवणाला उपस्थिती)

कट्ट्याची क्षणचित्रे:

शनिवारवाड्यापाशी जमून नगारखान्यापाशी गप्पा छाटणे, पैसाताईने गोव्यावरून आणलेले काजू, अपर्णातैने आणलेला बेळगावचा कुंदा, श्रीरंगाने आणलेली चॉकलेट्स आणि ५० फक्त यांनी कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे आणलेली सोनपापडी मनसोक्त चापणे.

देशपांडेकाका यांचा पानशेत धरणफुटीचा त्यांनी घेतलेला अनुभव ऐकणे आणि तो अनुभव ऐकण्यास इतर लोकांचे पण आमच्या कोंडाळ्याभोवती गोळा होणे.

मग शनिवारवाड्यात शिरून वाडा पाहण्यापेक्षा गप्पाच जास्त मारणे, पेशवेकालीन इतिहास आणि वाड्याचे स्थापत्य यांच्या माझा घोर अज्ञानानद्दल माझ्यावर टिका होणे.

वाड्यातून बाहेर येणे, पै तै, अपर्णातै, देशपांडे काका, अजित सावंत आणि मोदक ह्यांचा निरोप घेणे आणि उर्वरित सर्वांछे नव्या पेठेतील भोज थाळी गृहाकडे प्रस्थान. तिथे अमर्यादित गुजराती थाळी चापून परत भरपूर गफ्फा हाणून घरी जाणे व पुढच्या भ्रमंती कट्ट्याची आखणी करणे.

एकंदरीतत कट्ट्याला जाम मजा आली. बोले तो फुल्ल्टू एन्जॉय.

मी तर इन मीन चार डोकी असतील असं समजून आलो होतो. येवढी मंडळी असतील असं चुकूनही वाटलं नव्हतं. बाकी सोनपापडी आणि गोयांच्या काजवांचं कवतिक करावं तेवढं कमी!! आम्ही पोचेपर्यंत कुंदा बेतास बात शिल्लक राह्यला होता. ;) भोज थाळीतली दालबाटी, ताक अप्रतिम. पुरणपोळी पण वाईट नव्हती तिथली, पण आदल्याच दिवशी तुपात निथळणार्‍या चार पुरणपोळ्या एकाहाती ओरपल्याने भोज मध्ये पुरणपोळी म्हणून जो काही प्रकार वाढत होते त्याचं अप्रूप वाटलं नाही. बाकी भोज मधले वाढपी पोळी असो, दालबाटी की खिचडी; तूप अगदी उजव्या हाताने वाढत होते. खिचडीसुद्धा नेहमीच्या चवीपेक्षा हटके होती. संध्याकाळी येवढं सगळं हादडून पोटात अंमळ कमी जागा राह्यल्यामुळे खिचडी अधिक मागवता आली नाही.

भोजनानंतर भोजच्या बाहेर काही तात्त्विक चर्चा पार पाडून सगळ्यांनी एकमेकांचा नदीकाठच्या रस्त्यावर* निरोप घेतला.

*पुण्यातले रस्ते आपल्याला आताशा कळू लागलेत असं दाखवायचा क्षीण प्रयत्न!!

यशोधरा's picture

23 Jun 2014 - 6:09 pm | यशोधरा

धन्यवाद वृत्तांताबदल :)

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2014 - 6:10 pm | टवाळ कार्टा

उर्वरित सर्वांछे नव्या पेठेतील भोज थाळी गृहाकडे प्रस्थान. तिथे अमर्यादित गुजराती थाळी चापून

मराठमोळ्या पुण्यात सुध्धा जेवणासाठी मात्र गुज्जु जेवण??? पुर्वीसारखं पुणं राहि राहीलं नाही आता ;)

सर्वांछे

हे पण गुजरातीतच??? :)

प्रचेतस's picture

23 Jun 2014 - 6:16 pm | प्रचेतस

मराठमोळ्या पुण्यात सुध्धा जेवणासाठी मात्र गुज्जु जेवण??

त्याचं कसं ना की बाहेर पयशे घालवून मराठमोळंच जेवण करायचं असेल तर घरीच का नको? म्हणून मग बाहेर गुज्जु/राजस्थानी जेवण.

हे पण गुजरातीतच???

आता काय अच्छे दिन आले ना. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jun 2014 - 6:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा मोदी इफेक्ट असावा... कट्टेका दिन अछा था !

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jun 2014 - 6:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

अछा नाही... "अच्छा" बर्का *yes3* (हा प्रतिसाद-स्वयंसुधारणा नसल्याचा इफेक्ट... त्याचा राजकारणाशी काsssहीसुद्धा संबंद्ध नाही ;) )

धन्या's picture

23 Jun 2014 - 5:55 pm | धन्या

कट्टयाची प्रकाशचित्रे उर्ध्वस्थापीत ही नम्र विनंती.

भाते's picture

23 Jun 2014 - 7:48 pm | भाते

सिनेमा बघायच्या अपेक्षेने आलो होतो आणि सिनेमाचे केवळ ट्रेलर बघितल्यासारखे वाटले!

अहो ते प्रत्यक्ष अनुभवण्यातच मजा.
इतरांना फक्त ट्रेलरच.

कधी नव्हे ते वल्लीशी सहमत !! ;)

श्रीरंग_जोशी's picture

23 Jun 2014 - 8:21 pm | श्रीरंग_जोशी

MiPa Katta at Shaniwarwada

सर्व चित्रे

माझ्या आयुष्यातील पहिलाच मिपा कट्टा अविस्मरणीय झाला. श्री विनायक देशपांडे शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारावर सर्वप्रथम हजर होते. अपर्णा अक्षय यांची उपस्थिती सुखद धक्का देऊन गेली. पन्नासराव, पैसातै व अपर्णातै यांनी आणलेल्या खाऊमुळे कट्ट्याची सुरुवातच चवदार झाली.

वल्ली व सूड यांनी लघुवृत्तांत चांगला लिहिला आहे. कट्ट्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल वल्ली व सवंगड्यांचे मनापासून आभार व सर्व कट्टेकर्‍यांना धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

23 Jun 2014 - 8:31 pm | प्रभाकर पेठकर

मस्तं कट्टा. बरेच जणं ओळखिचे तरी बरेच अनोळखी.
प्रत्येक नांवासहित छायाचित्रे असती तर ज्ञानात भर पडली असती.

संजय क्षीरसागर's picture

23 Jun 2014 - 11:03 pm | संजय क्षीरसागर

१. पैसा, २. अपर्णा अक्षय, ३. प्रशांत ४. मोदक, ५. अजित सावंत ६. इस्पीकचा एक्का, ७. समीर शेलार, ८. वल्ली, ९. अत्रुप्त आत्मा, १०. देशपांडे विनायक काका, ११. हुकुमी एक्का, १२. सूड, १३. ५० फक्त, १४. हजेरी पटात उल्लेख नाही आणि १५. चौकटराजा.

श्रीरंग जोशी आणि जुई (फोटो क्रमांक 8637 पाहाणे), धन्या, धन्याचा भाचा (या फोटोत नाहीत) अणि डॉ. भूषण काळुसकर (फक्त जेवणाला उपस्थिती)

हुकुमीएक्का's picture

23 Jun 2014 - 10:30 pm | हुकुमीएक्का

मिपाकरांसोबतचा माझा पहिलाच कट्टा. खुप मस्त झाला कट्टा.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jun 2014 - 12:48 am | अत्रुप्त आत्मा

या कट्ट्याला मी तसा निम्म्यातच पोहोचलो. प्रशांत वगळता बाकि सर्वांची भेट ..गप्पा झाल्याच. समीर,देशपांडे काका,रंगा,जुई सगळ्यांना प्रथम भेटलो..याचा आनंद होताच. त्यात चहाच्या गाडीवरुन,मी दिलेल्या एका इचित्र =)) उदाहरणाचा देशपांडे काकांनी खरा रंग दाखवून दिला. आणि त्यामुळे चहा न पिताच चढला. समीर आमच्यात नविन फक्त नावाला होता..एव्हढ्या आम्ही गप्पांमधे मिसळून गेलो होतो. पैसा ताई आणि आपर्णा ताईंशी मी सक्काळीच १ तासाचं गप्पाष्टक जमवून आलेलो असल्यामुळे...त्यात नविन वाढ आगोबानी पैसा ताईं समोर (माझा) :-/ छळ :-/ करण्यातच काय ती झाली. (पैसा ताईनी पण सकाळी भेटलो तेंव्हा..-साबुदाणे वडे खाल्ले..असं सांगुन मला छळलच! :-/ आपर्णा ताईंनी बेळगावी कुंदा दिला..तो मात्र मस्त मस्त होता.. *i-m_so_happy* अत्ताही खाल्ला थोडा! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-509.gif ) नंतर त्या दोघि आणि देशपांडे काका व अजुन एक(नाव विसरलो..) जण असे मार्गस्थ झाल्यावर आंम्ही सर्व भो जन... भोजनास गेलो. पण चिरंजीव शंभर आणि धन्याचा भाचा यांनी संपूर्ण कट्टाभर जो काहि धिंगाणा घातला...त्याला तोड नाही. http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-349.gif धन्याच्या भाच्यानी आगोबाला ठेवलेली ५/६ नावे ऐकून मी या पुढे किमान १ वर्ष तरी निश्चिंत झालो आहे! (धन्या ..भाचा मि.पा.वर आलाच पाहिजे! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-510.gif )
हुकमीएक्काही प्रथमच भेटला.. पण तो ४०...४५..वयाचा असावा..असा मी नावावरून बांधलेला अंदाज मात्र फसला...असो!
बाकि खर्‍या गप्पा झाल्या..चालल्या होत्या,त्या हाटिलामधे रंगा ..चौरा..आणि समीर..इस्पिकएक्का..यांच्यातच.त्या गप्पांचा उत्तरार्धही जेवणे झाल्यावर बाहेर चांगला अर्धापाऊण तास रंगला. विशेषतः चौ.रा. आणि रंगा मंजे अगदी लॉनटेनिस-मॅच चाल्लीवती! अगदी ग ह न चर्चा! मस्त मजा आली.

रंगाराव वारीस आले..देशीच्या मि.पा.च्या..ही
दिंडी जावो तिकडे आमुची..येत राहो त्यांचीही!
https://m.ak.fbcdn.net/sphotos-c.ak/hphotos-ak-xap1/t1.0-9/p296x100/10456021_656755571077399_3450782743185364314_n.jpg

फोटू छान आलेत. मजा आलीये हे कळतेय.

मैत्र's picture

24 Jun 2014 - 10:58 am | मैत्र

आमच्या पुण्यात तेही शनिवारवाडा इथे कट्टा होऊन हुकल्याची विलक्षण जळजळ झाली आहे. त्यातही इस्पिकचा एक्का यांना भेटण्याची अजून एक संधी गेल्याची हळहळ पण आहे.
पण हा पायंडा पडला तर भविष्यात कधी चांगला योग येऊ शकतो अशी आशाही आहे..
एकंदरीत कट्टा मस्त झालेला दिसतोय.

देशपांडे विनायक's picture

24 Jun 2014 - 3:44 pm | देशपांडे विनायक

पुणे कट्टा फोटो

पुणे कट्टा वृतान्त येथे फोटो चढवले आहेत

देशपांडे विनायक's picture

24 Jun 2014 - 4:11 pm | देशपांडे विनायक

पुणे कट्टा वृतांत वाचून आणि फोटो पाहून ''इकडून '' सर्वांचे आभार मानण्यात आलेले आहेत

सर्वास विदित व्हावे हि विनंती

सखी's picture

24 Jun 2014 - 6:39 pm | सखी

मस्त कट्टा वृतान्त.

समीरसूर's picture

24 Jun 2014 - 9:10 pm | समीरसूर

मी हा धागा आणि जोशीसाहेबांचा निरोप रविवारी रात्री ११ वाजता पाहिले. मी गुरुवारपासून सुटीवर होतो. एक परीक्षा होती. थेट रविवारी रात्रीच माझे फेबु पाहिले आणि त्यात जोशीसाहेबांचा निरोप पाहिली. खूप चांगली संधी दवडली. पण तसंही मी येऊ शकलो नसतो कारण गुरुवार ते रविवार माझे रोज पेपर्स होते. पण मी जेवायला येऊ शकलो असतो नक्की. अ‍ॅट लिस्ट सगळ्यांच्या भेटी तरी झाल्या असत्या. मी एकही कट्टा अटेंण्ड केलेला नाही अजून. :-( एनीवे, पुढची संधी सोडायची नाय असे ठरवले आहे. बघू या.

बाकी कट्टा छान झाल्याचे वृत्त जोशीसाहेबांकडून कळले. :-) मला खूप हळहळ वाटली. मी १००% आलो असतो. :-( फोटो टाकल्यास थोडा मजा आ जायेगा...

फोटो टाकल्यास थोडा मजा आ जायेगा...

हा घ्या सचित्र कट्टा वृत्तांत.

हुकुमीएक्का's picture

24 Jun 2014 - 11:19 pm | हुकुमीएक्का

कट्ट्याचा सचित्र वृतांत येथे पहावा.