चांगला रविवार होता. सकळाच्या भरपेट नाश्तायानंतर आरामात सोफ्यावर पेपर वाचत पडलो होतो. ही खाली बाजारात १० मीनटात जावुन येते (खीक *lol* १० मी ) असे सांगुन गेलेली तो १/२ तास झाला तरी पत्ता नव्हाता. एवढ्यात बेल वाजली म्हणुन दरवाजा उघडला तर कोपर्यात चप्पल भिरकावत, माझ्याकडे रागाने बघत, फणकार्याने, तरातरा चालत आतमध्ये गेली. आयला जाताना तर "राजा! मी बाजारात जातेय तुला काही हवंय का?" म्हणणारी (कसं मोराचं पीस फिरवल्यागत वाटत होतं हो. आहा हा रविवार सार्थकी लागणार असं वाटत होतं) आल्यावर एवढी वाफेच्या इंजिनासाअरखी चेहरा लाल *blush* करुन खदखदत का होती, कुणास ठाउक (गेला संपुर्ण रविवार डबडयात गेला).
मी दरवाजा बंद करुन पुन्हा सोफ्यावर जावुन वाचायाचा क्षीण प्रयत्न करत होतो. पण अर्धे लक्ष आतमध्ये होतं. न जाणो कधी गरम कुकरचं झाकण उघडायचं आणि गरम वाफ बाहेर पडायची.
या बायकांचं एक समजत नाही. आता बघा, काय झालं हे नवर्याने स्वःतहा विचारल्याशिवाय तोंडतुन शब्द बाहेर पडेल तर शपथ (च्यायला एरव्ही बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही म्हणतात ते कसे काय बुवा), बरं नाही विचारलं तर आतमध्ये धुसफुस चालु होते. भांड्यांचा फुटबॉल, एखादी बशी फुटणं, गेला बाजार तोंडाची "माझं मेलीचं नशीब..., माझंच चुकलं... असं काहीतरी पुटपुटणं चालु. आणि समोर आली आणि कधी हा मला विचारतोय का असे चेहर्यावर दिसत असतं म्हणुन विचारतो तर एक तर फुरगुटुन बसावं किंवा फुटलेलं अंड जसं वाहात जावं किंवा पाण्याने ट्म्म भरलेल्या पिशवीला टाचणी लागावी तसे सगळं मनातलं (याच आठवड्याचं की गेले कित्येक दिवसांच हे काय माहित नाय) बाहेर येतं.
खरं तर कारण काही तरी क्षुल्लक असतं पण यांना आख्खा दिवस त्यावर खिंड लढवता येते. कधी भाजीवाल्या भैयाने यांना वजनात गंडवलेलं असतं, तर कधी घरापर्यंत येतो सांगुन गल्लीच्या टोकावरच सामानासकट खाली उतरवणारा रिक्षावाला कारणीभुत असतो. कधी शेजारणीशी खटका उडालेला असतो. मग एरव्ही जिन्यात भेटल्यावर किमान १/२ तास हव्या त्या विषायावर काथ्याकुट करणार्या शेजारणीला पाण्यात पाहते ही.
यांचा मुड सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरतच. बरं मुड जाण्याची कारणे अजुनही कैक आहेत. त्यातली किमान अर्धा डझन कारणं माझ्या वागण्यामुळे (असं तिला वाटतं हा!) निर्माण होतात.
आता बघा मी परवा रात्री जेवायला टबलावर बसलो तर पानात दोन भाज्या, म्ह्टलं वा बाईसाहेब खुश दिसताहेत.
"बिरड्याच्या भाजीची चव अप्रतिम आहे एवढंच म्ह्टलं." तर झालं पापाड मोडला.
"हो बरोबर लागणारचं शेजारच्या काटे वहिनींनी दिल्येय ना" आख्खी वाटी भरुन खा."
" अगं आता मला काय माहित होतं का स्वप्न पडलं होतं की ही भाजी काटे वहिनींनी दिल्येय ती."
" अहाहा ती वाटी काय आपली आहे?" मेली मी इथं दिवसभर मरमर करुन.... मी शांत बसतो ( करतो काय) झालं म्हणजे आता जेवयच्या आधी ताट वाट्यांकडे लक्षपुर्वक बघायला लागणार उद्यापासुन.
जेवण झाल्यावर शांतपणे टी.व्ही बघावा नी काय त्त्या रटाळं मालिका बघायच्या म्हणुन जरा नविन गाणी वाजवु म्हटलं तर
"हल्ली कोणतीच गाणी धड वाजवण्याच्या लायकिची नाहीत, ममता ने एक FTV हा Channel बंद केला पण तिला म्हणावं आत्ताच्या हिंदी पिक्चर मधली गाणी का नाही सेंसॉर होत?" मग रिमोट आपसुक तिच्या हातात जातो. मग सासु सुनेच्या रडक्या मालिका सुरु झाल्या की मी पुस्तक वाचत झोपी जातो.
कुठे बाहेर फिरायला गेलं की आम्ही आपलं फुटपट्टीसारखं सरळ चालावं, (हो काय बिशाद बाजुला असलेल्या हिरवळीचं ओझरतं जरी दर्शन घेतलं तर) तर हिला मध्येच काचेच्या शोकेस मधली भारीतली साडी दिसावी अन "चला ना नुसती किंमत तर पाहुन येवु ." म्हणत दुकानात शिरते न शिरते तर तो दुकानदारशेठ "हेS हेS हेS या मालक दुकान आपलंच आहे असं म्हणत " बारक्या, या मॅडमना नविन स्टॉक दाखवं" म्हणत दातांची बत्तीशी दाखवतो. तर इकडे क्रेडिटकार्ड वाकुल्या दाखवते.
शेजारची मीना परवा त्या वागळेंच्या मुलाच्या गाडीवरनं (बाई़क) घरी आली. त्या आधी फडकेंचा नातवाने तिला गल्लीच्या टोकापाशी सोडलं
" अगं हो. हो.. , बसेस येत नसतील वेळेवर म्हणुन एखादे वेळेस घेतली असेल लिफ्ट तर बिघडलं कुठे?"
"हो तुम्हाला भारी तिचा पुळका. महामाया आहे ती "मी बाई संतीण माझ्या मागे दोन तीन" अशी गत. या पुढे काय बोलणार.
"शेजारच्या बागड्यांची नमिता जीमला जातेय गेले दहा दिवस, वजन घटवायला,"
" बरं मग त्यात एवढं आश्र्चर्य काय?" आपल्या तब्येतीची काळजी घेते ही चांगली गोष्ट आहे की. तुला हवं असेल तर तुही लाव की? तेवढीच तिला सोबत होईल."
"जल्लं मेलं मला कशाला हवीत ही थेरं ती जातेय ते जाडी आहे अन लग्न जमत नाही म्हणुन. (याचा अर्थ-- माझं काय आता लग्न झालयं मी जाडी झाली तरी चालेल असा घ्यायचा का? *UNKNOWN*
नवर्याकडुन सुट्टीच्या दिवसात घरकांम कसं करुन घ्यायचं हे ह्यांना बरोबर माहित असतं. "अहो माझा हात पोहचत नाही त्या सिलिंगची जळमटं काढायचेत जरा मदत करा ना." "आज मला तुमच्या हातचा चहा प्यावासा वाटतो." "खाली जाताय तर जाताना दळणाची पिशवी भैयाला नेवुन द्या ना तेवढी." जरा मी शेजारच्या काकुंबरोबर साड्यांचं प्रदर्शन भरलंय तेवढं पाहुन अर्ध्या तासातच येते तुम्ही जरा ती वॉशिंग मशीनचा तिसरा राउंड झालाय तेव्हा तेवढे कपडे ड्रायरला लावता का?
कामं करायला काही वाटत नाही. पण मग हा एवढ्या गोड मधाळ आवाजात कशाला सांगायला पाहिजे. नीट सांगा ना.
आम्ही काय नाही म्हणतोय थोडंचं.
अरे त्या खिडक्या उघड्या ठेवा म्हणजे मधमाशांना दुसरीकडे कुठे जायला नको. या बघा इथे प्रत्येक वाक्याला मध टपकतंय नुसतं.
तर काय हा असा या बायकांचा स्वभाव . काही कळत नाही आणि वळतही नाही.काय लोक्स तुमाला तुमच्या बायडीचा स्वभाव कळला काय? कळलाय मग लई बेस झालं.
प्रतिक्रिया
5 Mar 2014 - 5:22 pm | जेपी
=))
अवांतर - तुमची हे आपल धाग्याची शंभरी भरणार .
6 Mar 2014 - 8:21 am | आंबट चिंच
भरु द्या की माझी पण शंभरी (म्हणजे वयाची हो!) मग मी मिसळपावचा माजी सदस्य म्हणुन मनगटात जोर असे पर्यंत कळफलक बडवत खिंड लढवेन.
5 Mar 2014 - 5:41 pm | विटेकर
आवडलं ,
घरोघरी मातीच्या चुली.
सवयीने आता त्याचे वैषम्य ही वाटत नाही .
चालायचचं !
कधी तरी कांद्याचं थालीपीठ वगैरे .. हा पु लं ड्व्यायलॉग आठवावा !
जाऊ द्या !
5 Mar 2014 - 5:42 pm | बॅटमॅन
शंभरी भरायच्या प्रतीक्षेत. स्वयंघोषित प्रवक्त्यांच्याही प्रतीक्षेत.
5 Mar 2014 - 5:43 pm | सूड
+१
5 Mar 2014 - 5:53 pm | मुक्त विहारि
झक्कास....
5 Mar 2014 - 6:03 pm | शिद
आपलेच दात आणि आपलेच ओठ... असो.........(येथे दिर्घ सुस्कारा सोडलेली स्मायली कल्पावी...)
5 Mar 2014 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा
@आणि समोर आली आणि कधी हा मला विचारतोय का असे चेहर्यावर दिसत असतं म्हणुन विचारतो तर एक तर फुरगुटुन बसावं किंवा फुटलेलं अंड जसं वाहात जावं >>>
@ महामाया आहे ती "मी बाई संतीण माझ्या मागे दोन तीन" >>>
वारल्या गेलो आहे! 
आता या धाग्यावर पाशवी शक्तिंचा जोरदार हल्ला होणार..असे भाकित वर्तवतो!

(सगळ्यांच्या कुंडल्यांमधले राहू/केतू कळणारा) ज्योतिषचंद्र-आत्मू!
5 Mar 2014 - 7:36 pm | पैसा
धन्यवाद!
5 Mar 2014 - 9:16 pm | अत्रुप्त आत्मा
ज्योतिषचंद्र आत्मू ! :D
धन्यवाद! =))
14 Mar 2014 - 12:27 pm | रमताराम
ज्योतिषचंद्र आत्मू ! >> ळॉळ
5 Mar 2014 - 7:41 pm | प्यारे१
सारे कसे शांत शांत !(ही शांतता वादळापूर्वीची असं कोण म्हणालं ते? ) :)
5 Mar 2014 - 7:43 pm | मुक्त विहारि
असो...
पळावे...
5 Mar 2014 - 7:50 pm | माहितगार
८ मार्च अजून दूर आहे ! :)
5 Mar 2014 - 7:51 pm | मृगजळाचे बांधकाम
घरोघरी तेच आहे हो
5 Mar 2014 - 8:03 pm | लौंगी मिरची
ह्म्म्म , एकंदरित लेख वाचुन तुम्हाला झेपत नाहि असा अंदाज वर्तवावासा वाटतोय .
5 Mar 2014 - 8:51 pm | शुचि
हाहाहा =)) =)) फुटले!!!
5 Mar 2014 - 8:19 pm | बाबा पाटील
नुसती बत्तीच द्यायची तर आख्या दारुगोळ्याच्या कोठारालाच आग लावुन पळाले की राव.!
5 Mar 2014 - 9:13 pm | पैसा
एकदा बायकोच्या नावाने ओरडत होता. विसरलात काय!
5 Mar 2014 - 11:16 pm | विनोद१८
*mosking*
विनोद१८
6 Mar 2014 - 8:34 am | आंबट चिंच
बॅटमॅन, सूड, मुक्त विहारि, शिद, अत्रुप्त आत्मा,शुचि,बाबा पाटील,विनोद१८- सर्वांना धन्यवाद .

स्वगतः- अजुन अनाहितांचा हल्ला कसा झाला नाही कुणास ठाउक?
6 Mar 2014 - 9:04 am | अजया
स्वगतः- अजुन अनाहितांचा हल्ला कसा झाला नाही कुणास ठाउक?
फाट्यावर तर मारले नाही ना????????
6 Mar 2014 - 4:01 pm | इरसाल
अनाहिता हे नाव बदलुन "हाणा इथ" करावे ही लम्र विनंती.
6 Mar 2014 - 9:51 am | भाते
साप शांतपणे पहुडला आहे तर कशाला उगाच त्याच्या शेपटीवर पाय देताय?
6 Mar 2014 - 10:41 am | जेपी
साप शांतपणे पहुडला आहे तर कशाला उगाच त्याच्या शेपटीवर पाय देताय?
+१6 Mar 2014 - 11:12 am | अत्रुप्त आत्मा
@स्वगतः- अजुन अनाहितांचा हल्ला कसा झाला नाही कुणास ठाउक?>>> :D बघा....बघा...हो! आंम्ही जातकांचे मन कसें ओंळंखतोंsss.. ते बघा!!! =))
6 Mar 2014 - 11:16 am | बॅटमॅन
'अनाहितांचा हल्ला' असं सारखंसारखं वाचून कुठलं मधमाशांचं दळ आहे की काय असं वाटत राहतं =))
6 Mar 2014 - 11:34 am | आंबट चिंच
त्या मधमाशा नाही आहेत. आयला बॅट्या त्या निदान एकदा चावुन तरी सोडुन देतील पण या.....
6 Mar 2014 - 11:40 am | बॅटमॅन
ही ही ही ही ;)
पाशवीपण, कालपण आजपण उद्यापण! ;) =))
6 Mar 2014 - 8:46 am | मनीषा
चिंच फारच आंबट हो...
पण चिंचेबरोबर जरासा गूळ घातला, की आमटी चवदार होते बरं का.
6 Mar 2014 - 9:00 am | प्रमोद देर्देकर
@ मनिषा :- आयला हे तर का खास शालजोडीतले मारलेत की.
6 Mar 2014 - 10:33 am | मदनबाण
हॅहॅहॅ... हॅहॅहॅ... नारायण ! नारायण ! ;)
चला जरा कळं लावुन {पक्षी :- काडी लावुन } जावे म्हणतो ! ;)
मंडळी काय म्हणतात ते... हं लुफ्त घ्या हो खालच्या धाग्याचा ! ;)
बायको ही सायको असते..डरकाळ्या आणि म्यांव..म्यांव
.
..
...
परत एकदा... नारायण ! नारायण ! ;)
6 Mar 2014 - 2:31 pm | दिव्यश्री
नवर्याला उशाखालाचा काय म्हणतात माहिती आहे ना ???
6 Mar 2014 - 2:52 pm | आंबट चिंच
काय माहीत नाही ब्वॉ. जरा इस्कटुन इस्कटुन सांग ना आम्हाला.
6 Mar 2014 - 11:41 am | आत्मशून्य
- Albert Einstein
6 Mar 2014 - 11:50 am | बाबा पाटील
भुतावळ कुठे गायब झालीय ? नक्कीच काहीतरी झोल आहे ? त्या अतृप्त आत्म्याला विचारुन पाहिले पाहिजे ?
6 Mar 2014 - 12:05 pm | भाते
उद्या कुठलातरी जागतिक दिवस का असे काहीतरी आहे ना! त्यामुळे सगळी भुतावळ त्याची चर्चा करत असतील. :)
पळा आता!
6 Mar 2014 - 12:17 pm | बॅटमॅन
उद्या त्यांचा दिवस आहे हो. तो झाला की चरचा तर होनारच.
6 Mar 2014 - 12:42 pm | अत्रुप्त आत्मा
@भुतावळ कुठे गायब झालीय ? नक्कीच काहीतरी झोल आहे ? त्या अतृप्त आत्म्याला विचारुन पाहिले पाहिजे ?>>> =)) नक्की कोणत्या दिशेनी हल्ला करायचा? यावर इचार करत असतील!
6 Mar 2014 - 12:26 pm | स्पंदना
श्या! काय घरच उगाळताहेत लोक?
निवडणुका जाहिर झाल्यात. तिकडे जावं म्हणतेय.
6 Mar 2014 - 12:43 pm | पिलीयन रायडर
शतकी धाग्या साठी माणुस काय काय लिहीतो...
जगदंब.. जगदंब...
6 Mar 2014 - 12:59 pm | आंबट चिंच
ओ पीरातै ! असं नै कै ही पलिकडचा पण लेख लिहुन तयार आहे. फक्त डकवायची खोटी आहे.
ओ अर्प्णातै :- त्यांचे निकाल काय जगजाहिर आहेत, ते काय बघायचं?
आता त्यांचा (महिलांचा) झाला की " आपण जागतिक पुरुषदिन साजरा करु"
लेडीज फर्स्ट काय बॅट्या.
6 Mar 2014 - 1:03 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!!!
मुळात एक दिवस साजरा करावा अशी परिस्थितीच अजून आलेली नाही! सर्व दिवस आमचेच. तशी स्थिती येईल तेव्हा पाहू ;)
6 Mar 2014 - 1:03 pm | कवितानागेश
मला धागाच कळला नाही. प्रॉब्लेम काय आहे नक्की?
6 Mar 2014 - 1:13 pm | जेपी
....मोड ऑन "एका विवाहीत पुरुषाच्या धाग्यावर अविवाहीत पोरांचा दंगा पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली" ....मोड ऑफ
6 Mar 2014 - 1:19 pm | अत्रुप्त आत्मा
जेपी! =))

=))
6 Mar 2014 - 1:28 pm | प्यारे१
___/\___
एक चित्र हजार शब्दांचं काम करतं!
6 Mar 2014 - 1:17 pm | आंबट चिंच
ं
मोड ऑन ( कायमचा) घ्या पोट्ट आमचं लग्न लावुन मोकळं झालं की ! काय चान्शच नाय ठेवला
6 Mar 2014 - 1:27 pm | सौंदाळा
वा वा, धाग्याची प्रगती बघुन बरे वाटले.
सुरुवातीला धाग्याने जरा मान टाकली होती पण आता चांगलच बाळसं धरलयं
खुद्द बुवा आणि बॅटमॅन जोरदार बॅटींग करतायत.
होणार होणार, शतक होणार.
6 Mar 2014 - 2:18 pm | बॅटमॅन
अहो आमच्या ब्याटिंगने काय होणार?
पाशवी हल्ला झाला तरच धाग्यात काही मजा आहे.
नैतर फक्त इतरांची ब्याटिंग पाहणे एक सजा आहे.
6 Mar 2014 - 3:16 pm | अत्रुप्त आत्मा
@नैतर फक्त इतरांची ब्याटिंग पाहणे एक सजा आहे.>>> =))
सजा ती सुटणार नाही,धागा उपेक्षेनेच मरणार
आणि आंम्ही हास्यवादी मंडळीच,धाग्याची शं भरी करणार!
=)) ... =)) .... =))
6 Mar 2014 - 1:38 pm | आंबट चिंच
आत्मु दादानु लय झ्याक. अहो हा जेपी म्हणजे पुर्वीचा तथास्तु हाए. तेव्हा माथ्यावर हात ठेविल हां सांभाळुन.
6 Mar 2014 - 2:59 pm | प्यारे१
धागाकर्ते आं चिं...
किती ची टोटल हवी आहे?
आमचे एक 'प्रबुद्ध' मित्र अशा सेन्च्युर्या 'ऑफिशियली हाणून' देतात. बाकी मित्र 'अनऑफिशियली' कुमक पुरवतात!
तुमचेच प्रतिसाद तुमच्याच धाग्यावर जास्त... बरं नाही दिसत हो!
6 Mar 2014 - 4:36 pm | राजेश घासकडवी
या धाग्यावरचे प्रतिसाद बघून बाळासाहेब ठाकरे गेले तेव्हाची सिच्युएशन आठवली. शिवसेनेची प्रचंड मिरवणुक निघणार आणि त्यात दंगाधोपा होणार, आणि मग आपण त्यांना चांगलंच (शाब्दिक) झोडून काढू अशा विचारांनी जिभल्या चाटत असणारे तथाकथित विचारवंत आठवले. (पळा आता, बॅटमॅन, प्रशांत आवले, अत्रुप्त आत्मा वगैरेंना तथाकथित विचारवंत म्हटलं, आणि पाशवी शक्तींना शिवसेना म्हटलं. म्हणजे दोन्हीकडून मार बसतोय आता!)
6 Mar 2014 - 6:34 pm | प्यारे१
>>>प्रशांत आवले वगैरेंना 'तथाकथित विचारवंत' म्हटलं
उचंबळून आलं! तुम्हाला एक प्यार्टी लागू. :)
6 Mar 2014 - 4:43 pm | जेपी
काय मंत्र असल्यास फुंका , लय स्लो चालु हाय . आतापातुर तर माजा मोबाईल बी गंडला नाय =))
6 Mar 2014 - 4:54 pm | आंबट चिंच
आता जावु दे हाफ सेंचुरी झाली की. आता पलि़कडचं म्हणणं पण ऐकुन घेवुया या. हु S श जळली मेली पुरुषजात ती या धाग्यावर.
6 Mar 2014 - 5:43 pm | स्वप्नांची राणी
ईईईईईईई....भेण्डी....
7 Mar 2014 - 4:47 am | लौंगी मिरची
काहिहि , प्रतिसादातहि दम नाहि आणि धाग्यात तर काडीमात्र जीव नाहि .
11 Mar 2014 - 12:32 pm | बॅटमॅन
तरीही प्रतिसाद दिलात यातच या धाग्याचे यश सामावले आहे.
11 Mar 2014 - 2:21 pm | वेल्लाभट
एकदम मनापासून लिहिलंयत हो तुम्ही ! :D
11 Mar 2014 - 2:35 pm | दिव्यश्री
लेख लिहिताना बायको डोळ्यासमोर ठेवून लिहिलात असे दिसते. लक्षात घ्या प्रत्येक स्त्री कोणाची बायको होण्याआधी एक माणूस असते, कोणाची तरी आई ,मुलगी , बहिण , असते . बायका म्हणजे यात सगळ्या स्त्रिया आल्या म्हणजे सगळ्यांच्या आया , बहिणी, मुली . कोणाच्याच डोक्यात हे आल नाही का कि आपली आई , बहिण ,मुलगी हि कोणाची तरी बायको असणारच आहे . सगळ्यांकडून स्त्री दाक्षिण्याची अपेक्षा नक्कीच नाही . टवाळी करताना भान राखावे प्रत्येकानेच . असो.
बाकी तुमच्या सौंची प्रतिक्रिया समजली तर बरे होयील .
11 Mar 2014 - 2:37 pm | बॅटमॅन
इतक्या मिर्च्या झोंबल्या म्ह. लेख खरोखरच मार्मिक आहे =))
11 Mar 2014 - 5:50 pm | पिलीयन रायडर
अच्छा.. म्हणजे लेखा विरुद्ध प्रतिसाद देणे = मिरच्या झोंबणे = लेख मार्मिक असणे...
लक्षात ठेव बर का हे...
बाकी लेख मार्मिक वगैरे सोड विनोदी पण नाहीये.. पण असोच...
11 Mar 2014 - 5:52 pm | बॅटमॅन
अर्थच्छटेतला फरक समजत नसेल तर वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
12 Mar 2014 - 9:12 pm | दिव्यश्री
मिर्च्या झोंबल्या>>> काय कारण ? कशासाठी झोंबाव्या ???
साप , मधमाश्या , बायको हि सायको असते , भुतावळ असे शब्द वाचले आणि काही लोकांनी जे तारे तोडले आणि फुशारकी मारली त्यांच्या साठी म्हणून मी हा प्रतिसाद लिहिला आहे . ज्याचं लग्न झालंय ते समजू शकतात की बायको नक्की काय करते ... कधी प्रेमाने , कधी रागाने, कधी कर्तव्य म्हणून का होईना ती करते . स्वताच्या जीवाची पर्वा न करता ती दिवसंरात्र संसारासाठी झटत असते. ती जर नोकरी करणारी असेल तर तिचे हाल कुत्रे देखील खात नाहीत. ती हे कधी हि कोणाला सांगायला जात नाही कि मी संसारासाठी काय काय करते. तिला माहिती असते कि हे मी केलंच पाहिजे , माझ कर्तव्यच आहे ते .
बायको हि विरंगुळा असू शकते का, तिची त्रेधातिरपीट हा चेष्टेचा विषय होऊ शकतो का ?????? जवळपास ९९% पुरुषांना विनोदनिर्मितीसाठी केवळ स्त्रीचा आधार घ्यावा लागतो , बायको तर अगदी सोफ्ट टार्गेट असते या बाबतीत. यातच सगळ आल अस मला वाटत.
13 Mar 2014 - 3:16 am | बॅटमॅन
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जमल्यास मोठ्या व्हा-सक्ती अर्थातच नाही.
14 Mar 2014 - 2:44 pm | दिव्यश्री
झोपेच सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही. बाकी मी अभ्यास करून शिकले , मोठी झाले आणि मग माझ लग्न हि झाल . त्यामुळे फुकटचे सल्ले आणि शुभेच्छा मला नकोत .
बाकी मला एक कळत नाही लग्नच न केलेले लोक इतक्या का उड्या मारत आहेत. अनुभवाविण वाचाळता व्यर्थ आहे.
हा माझा या असल्या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद . आता मी गीता वाचणार नाही कोणाहीपुढे. ज्यांना फारच इच्छा , हुरूप , खाज ई. असेल त्यांनी खरड / व्यनि करावे. (खरड /व्यनि ला उत्तर देणे /न देणे , फाट्यावर मारणे , पुणेरी शब्दात समाज देणे ई. पर्यायांचे उपयोग केला जाईल .)
धन्यवादच .
14 Mar 2014 - 2:48 pm | बॅटमॅन
लग्न कसे करावे आणि विवाहोत्तर जीवन कसे जगावे याबद्दल सल्ले दिले असतील तरच वरची बडबड लागू होते. तसे सल्ले नसल्याने ती बडबड पूर्णपणे गैरलागू आहे. लग्न झालं म्हणजे जणू नोबेल मिळाल्याच्या थाटात प्रतिसाद देणार्यांना तरी काय सांगणार म्हणा. चालूद्या.
14 Mar 2014 - 2:50 pm | बॅटमॅन
अर्र. वरिजिनल प्रतिसाद म्ह. तुम्ही ज्याला उत्तर दिलेत तो- तो तुमच्या प्रतिसादाला उद्देशून नव्हता. पिलीयन रायडरांचा एक प्रतिसाद उडाला असे दिसते, त्याला उद्देशून तो होता. तो उडाल्याने माझा प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाला चिकटला. असो.
14 Mar 2014 - 2:59 pm | स्वप्नांची राणी
अय्या...तुमचं ल्ग्न अजुन झालेलं नहिये, लागूबंधु? लवकर मोठे व्हा आणि करुन टाका, हाकानाका..? मोठे होण्यासाठी आई तुझा आर्शिवाद आणि लग्नासाठी सुबेछा!!
14 Mar 2014 - 4:29 pm | वैभव जाधव
चुकले आन्ना. बाई असेल की म्यागासेसे, काम्पुटर वापरायाली की पलिट्झर, लग्नात बुकर आन नंतर अनाहिता झाली मग नोबेल असते. :-D
आपण कायबी असलो तरी ग्रामभुषण बी न्हाय. :-(
13 Mar 2014 - 9:35 am | लौंगी मिरची
हाहाहा
तो ' लग्न झालेले समजु शकतात ' हा मुद्दा आवडला .
13 Mar 2014 - 10:55 am | पिलीयन रायडर
तुझ्या भावना काय आहेत हे मी नक्कीच समजु शकते.. पण...
इथे व्यक्त होऊन काही उपयोग नाहीये..
सो.. इग्नोर मार..
13 Mar 2014 - 10:58 am | मदनबाण
अरेच्च्या... मी तर फक्त कळं लावुन {पक्षी :- काडी लावुन } गेलो होतो ! इथे तर भडका उडालेला दिसतो ! ;)
नवर्याला उशाखालाचा काय म्हणतात माहिती आहे ना ???
काय काय ? सांगा सांगा... टेल टेल...
बायको तर अगदी सोफ्ट टार्गेट असते या बाबतीत. यातच सगळ आल अस मला वाटत.
हो का ? मग नवर्याचा उल्लेख "ध्यान" "नमुना" असे स्त्रीया करतात तेव्हा पुरुष मंडळींनी काय म्हणावे ? हार्डटार्गेट ?
चला आगीत रॉकेल सॉरी... सॉरी तूप ओतलं आहे आता... चला जालिय विश्वातुन सटकावे म्हणतो ! ;)
.
..
...
नारायण नारायण ! ;)
13 Mar 2014 - 10:57 pm | सस्नेह
हम्म..! बायड्यांचा स्वभाव कळायला अभ्यास अन मानेवर एक डोकं असावं लागतं !
गुडघ्यात असून काय उपेग नाही !
14 Mar 2014 - 1:14 am | लौंगी मिरची
:D