राजकीय चेटकीशोध अर्थात पॉलीटीकल विच हंटींग

विकास's picture
विकास in काथ्याकूट
27 Dec 2013 - 2:13 am
गाभा: 

​आज मोदींच्या विरोधात पुन्हा चालू केला गेलेला खटला झकीया जाफरी आणि त्यांच्या बोलवित्या धनी मोदी विरोधक टिस्टा सेटलवाड (आणि पार्टी) परत एकदा हरल्या... अर्थात त्यांनी परत जाहीर केले आहे की आम्ही हा लढा चालूच ठेवू. जे झकीया जाफरींच्या बरोबर वैयक्तीक आयुष्यात झाले ते दुर्दैवी होते, अक्षम्य कृत्य होते. पण त्यांच्या आणि तशाच इतरांच्या भावनांशी खेळ करत जे काही टिस्टा सेटलवाड आणि त्यांच्या समाजवादी/डाव्या/स्युडोसेक्यूलर्सनी गेले १०+ वर्षे चालवले ते त्याहूनही अक्षम्य आहे असे वाटते.

यात मोदी बरोबर का चूक, आदर्श का अजून काही हे माझ्या दृष्टीने अत्यंत मामूली आहे. पण त्यांच्या (टीस्टा आणि पार्टीच्या) ह्या द्वेष आणि भडक विचार-प्रचाराने समाजात दुफळी माजत गेली हे कटू सत्य आहे. मात्र, कोर्टाने आज स्पष्ट केले आहे, याला genocide/pogram वगैरे म्हणणे बरोबर ठरणार नाही, जे शब्द सातत्याने या स्युडोसेक्यूलर्सनी वापरले आहेत...

याला इंग्रजीत शब्द प्रयोग केला जातो: पॉलीटीकल विचहंटीग. कुणालाही चेटकी आहे असा समज करण्याचा प्रयत्न... अंधश्रद्धेतील भूताखेताइतकेच किंबहूना त्याहूनही अधिक भिषण असे हे कृत्य आहे. दुर्दैव असे की त्याला अनेक चांगले, बुद्धीवादी त्यांच्यातील बौद्धीक अहंकाराने, कुठेतरी डावेपणाचे आकर्षण (अथवा डावी प्रवृत्ती) आणि धार्मिकतेस असलेला एकंदरीत विरोध यातून असा अप्रामाणिकपणा घडतो...

या विचहंटींगचा त्रास केवळ मोदी-भाजपा-संघ इतकाच मर्यादीत नव्हता.

मोदींना व्हिसा नाकारा म्हणून आरडाओरड करत भारतीयांमधील फूट अमेरीकेस स्पष्टपणे दाखवणार्‍यांना एक समजले नाही की आता तो आत्मविश्वास अमेरीका इतरत्रही वापरू शकते. आज खोब्रागडेंच्या बाबतीत जे काही झाले आहे ती केवळ पुढची पायरी आहे.

मोदींचा व्हिसा आणि खोब्रागडे याच्या मधे अजून एक घटना घडली होती. अमेरीकन नागरीक असलेल्या, गोल्डमन सॅक्सच्या उपाध्यक्ष, गुगल फाउंडेशनच्या ग्लोबल डेव्हलपमेंट इनिशिएटीव्हच्या प्रमुख असलेल्या सोनल शहांना नव्याने अध्यक्ष झालेल्या ओबामांना चांगले पद देऊन कॅबिनेट मधे घेयचे होते. पण परत या मोदी विरोधक डाव्या समाजवाद्यांनी हल्लाबोल केला. ओबामाने पूर्ण माघार घेतली नाही, पण सोनल शहांवर अन्याय होयचा तो झालाच. त्यांचा अपराध काय होता? तर त्या विश्व हिंदू परीषद ऑफ अमेरीका या अमेरीकन कायद्यानुसार आजही अधिकृत नोंदणी असलेल्या संस्थेत, त्या त्यावेळेस तरूण कार्यकर्ती म्हणून काम करत होत्या आणि त्यावेळेस, म्हणजे गुजरातच्या २००१ च्या भूज भूकंपाच्या वेळेस त्यांनी अमेरीकेत मदतनिधी गोळा केला होता आणि तेथे सेवाभावी संस्थांना पाठवला होता.... मला गंमत वाटते, हे डावे कम्युनिस्ट समाजवादी स्वतः मात्र अमेरीकेत राहतात!

त्या व्यतिरीक्त ज्या गोष्टी आता खोट्या ठरल्या आहेत, त्या खर्‍याच आहे असे खोट्या आचारांनी दाखवून ते अनेक ठिकाणी छापून ठेवले आहे. त्यावर टिपिकल डाव्या पद्धतीने पुस्तके, पेपर्स, रीपोर्ट्स तयार केले गेले आहेत आणि तुमच्या-माझ्या सारख्या मध्यमवर्गीय बुद्धीवाद्यांचे ब्रेनवॉशिंग करायला वापरले गेले आहेत.
_______________

अधिक माहीती:
या निमित्ताने किती गोष्टी गेल्या दहा वर्षात मोदी विरोधात केल्या गेल्या हे बघण्यासारखे आहे...

  1. सर्व प्रथम दंगल झाली तेंव्हा मोदी हे सत्तेत येऊन केवळ दोनच महीने झाले होते.
  2. दंगल चालू होताच त्यांनी या संदर्भातील नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, गुजरात सीमेलगतच्या सर्व राज्यांना (महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान) या राज्यांना कायदासुव्यवस्थेसाठी मदत मागितली होती. काँग्रेसच्या राज्यांनी - महाराष्ट्र (मुख्यमंत्री विलासराव देशमुख) राजस्थान आणि मध्यप्रदेश (मुख्यमंत्री दिग्विजय सिंग) यांनी मदत देण्याचे नाकारले अथवा टाळले. दुरूस्ती: फक्त महाराष्ट्र सरकारने (विलासराव देशमुख, मुख्यमंत्री) राज्यसुरक्षादलाच्या दोन तुकड्या मदतीसाठी पाठवल्या होत्या.
  3. गोध्रा मध्ये २७ फेब्रुवारी २००२ ला गाडी जाळण्यात आली, दुसर्‍या दिवशी धार्मिक दंगलीस सुरवात झाली. त्याच दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारीस गुलबर्ग सोसायटी हिंसाचार घडला. परीस्थिती राज्यसरकारच्या हाताबाहेर जात आहे, हे पाहून त्याच दिवशी केंद्राकडे लष्करी मदतीसाठी मदत मागितली गेली. पण अहमदाबदेत स्थानिक लष्करी तळ नसल्याने, सर्व पूर्ण होऊन लष्कर तैनात होईस्तोवर एक मार्च म्हणजे पुढचा दिवस लागला.
  4. एसआयटी स्थापण्याआधी शहा-नानावटी आयोग नेमण्यात आला आणि त्यातले निष्कर्ष हे काँग्रेस आणि टिस्टा सेटलवाड पार्टीस पटले नाहीत कारण तो आयोग भाजपाच्या राजवटीने स्थापला होता.
  5. मग लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्रीपद मिळताच - सुप्रिम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली अजून एक आयोग स्थापला. त्या आयोगाने रेल्वेमधे घातपात नसून अपघात झाला असे जाहीर केले. (नानावटी कमिशनने उलट सांगितले होते). त्याला, त्यात वाचलेल्या एका अपघात/घातपात ग्रस्त व्यक्तीने गुजरात हायकोर्टाने आव्हान दिले. लालूच्या अख्त्यारीतील रेल्वे मंत्रालयाने, "असे आव्हान देण्याचा हक्क त्या व्यक्तीस नाही," म्हणून याचना केली, जी कोर्टाने फेटाळली आणि पुढे जाऊन, "संपूर्ण बॅनर्जी आयोगच बेकायदेशीर आहे," असा निष्कर्ष काढला. युपिएच्या केंद्रसरकारने त्याला सुप्रिम कोर्टात आव्हान दिले नाही, याचा अर्थ त्यांना हा निर्णय मान्य होता. त्यामुळे हा अधिकृतपणे संसदेच्या पटलावर ठेवलाच गेला नाही/ ठेवू शकले नाहीत. तरी या संदर्भात राहून राहून आश्चर्य वाटते की आपण एका पोटेन्शिअली बेकायदेशीर आयोगावर काम करत आहोत हे एका सुप्रिम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधिशाला कळले देखील नाही? का दुर्लक्ष केले?
  6. त्यानंतर २००९ मध्ये सुप्रिम कोर्टाने स्वतंत्ररीत्या एसआयटी स्थापली. त्यांच्या निष्कर्षानुसार मोदींचा यात कट नव्हता हा भाग तर होताच पण टिस्टा सेटलवाड यांनी "cooking up macabre tales of killings" केले असा निष्कर्ष काढला.
  7. या सर्व काळात आणि नंतर ही दंगल पूर्ण आटोक्यात आणे पर्यंत अक्षम्य हिंसाचार झाला. पण त्याला मग तितकेच किंबहूना त्याहूनही अधिक अक्षम्य रंग लावले गेले. भडकपणा टाळण्यासाठी ते येथे लिहीत नाही... पण सुप्रिम कोर्टाने स्थापलेल्या स्पेशल इन्व्हेस्स्टीगेशन टिम (एसआयटी) ने छाननी केल्यावर त्यात काही तथ्य आढळले नाही. ते धादांत खोटे आरोप होते असा एस आय टी चा निष्कर्ष झाला.
  8. एसआयटी साठी अजून एक कारण होते ते म्हणजे आय पी एस ऑफिसर संजीव भट्ट यांचे विधान की दंगल मोदींच्या आदेशाने झाली. पण चौकशी करताना लक्षात काय आले? दंगलींच्या संदर्भातील त्या बैठकींना स्वतः भट्ट उपस्थितच नव्हते आणि हवे ते काम / जबाबदारी न मिळाल्याने ते मोदी सरकारवर नाराज (disgruntled employee) आहेत/होते.
  9. अजून एक नीचांकः मोदींच्या नावावर सर्वप्रथम टाईम्स ऑफ इंडीयाने आणि नंतर तमाम वृत्तपत्रांनी, ते "‘every action has an equal and opposite reaction’ - “Har kriya ki pratikriya hoti hai” असे म्हणाल्याचे प्रसिद्ध केले आणि त्यांच्यावर तुटून पडले. मात्र एसआयटीच्या म्हणण्याप्रमाणे ते तसे बोललेच नव्हते, त्यांचे मूळ म्हणणे, " "Every action causing an equal and opposite reaction. I don't want action, neither do I want any reaction." हे अर्धवट तोडून त्याचा गैरवापर केला गेला. कोणी केला अर्थातच परत टिस्टा सेटलवाड आणि पार्टीने.
  10. (टिव्हीवर ऐकल्याप्रमाणे) मोदी हे एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांनी स्वतःस चौकशीसाठी हवाली (submit) केले होते. एस आय टी समोर ते स्वतः (वकील नाही) ९ तास बसून प्रश्नांना सामोरे गेले. असे कुठल्याच दंगलींच्या संदर्भात कधी झालेले नाही. ना मुख्यमंत्री ना पंजाब दंगलीच्या वेळेस पंतप्रधान राजीव गांधी....

असो.

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

27 Dec 2013 - 2:28 am | प्यारे१

तुम्ही भाजप, मोदी समर्थक असल्यानं तुमचं म्हणणं खरं आहे की नाही हे समजून घेण्याची आम्हाला गरज नाही.
आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खटखटवू. आमचा लढा सुरु राहीलच.

- 'लेफ्ट' हॅण्डर स-माजवादी प्यारे

सिद्धार्थ ४'s picture

27 Dec 2013 - 2:29 am | सिद्धार्थ ४

झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतल्याना जागे कसे करणार? वक्तिश मला मोदी पंतप्रधान झालेले बघायला आवडेल (पण पूर्ण बहुमत मिळूनच)

आश्चर्य आहे. "टिस्टा सेटलवाड आणि पार्टी" मधील काही पार्ट्या इथे पण पाट्या टाकत असतात.
आगाऊ शुभेच्छा!

श्रीरंग_जोशी's picture

27 Dec 2013 - 2:44 am | श्रीरंग_जोशी

उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालय कुठलिही याचिका केवळ अर्ज केला गेला आहे म्हणून दाखल करून घेत नसते. त्यात प्राथमिक पातळीवर तथ्य असल्यासच दाखल करून घेतली जाते. अंतिम निकाल लागण्यापर्यंत अनेक घटक महत्वाची भूमिका पार पाडतात. वादी व प्रतिवादी उपलब्ध साक्षी पुराव्यांच्या आधारे काय सिद्ध करू शकतात यावर न्यायालयाचा निकाल ठरतो.

या प्रकरणावर मी येथे पूर्वी लिहिले आहे; त्याची पुनरावृत्ती टाळतो. या धाग्यावर आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला गेला होता की या सर्व (प्रस्तुत धाग्यात उल्लेखलेल्या) प्रकारांचा (मतांच्या ध्रुवीकरणाद्वारे) राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी झाला किंबहूना अजूनही होत आहे; असे असल्यास बळी गेल्याचा आव आणणे पटत नाही.

अर्धवटराव's picture

27 Dec 2013 - 2:53 am | अर्धवटराव

मोदिंचं कितीही वकिलपत्र तुम्ही घेतलं तरिही त्यांची डाळ शिजणार नाहि. इथे मिपावर देखील अनेक मोदिभक्त आहेत जे सार्कास्टिकली काँग्रेसला पाठिंबा दाखवतात पण अ‍ॅक्च्युली मोदिंचा प्रचार करतात. येत्या निवडणुकीत राहुलजींची यंग ब्रिगेड मोदिंना धुळ चाटायला लावेल यात शंका नाहि.

धागा अत्यंत बाळबोध वाटला. कोर्ट वगैरे सर्व मॅनेज केलय मोदिंनी. टिस्टाबाईंसारख्या सत्यासाठि झटणार्‍या व्यक्तिंना असल्या न्यायालयीन पुराव्यांची गरज नसते. त्या स्वयंभू सत्य आहेत. काय तर म्हणे मोदि स्वतः आयोगाला सामोरे गेले... राजीव गांधींकडे तेव्हढेच उद्योग होते काय आयोगाला सामोरे जायला? आता लालूजी देखील जेलच्या बाहेर आले आहेत. धर्मांध शक्तींना रोखण्याचा विडा उचलला आहे त्यांनी. भूतपूर्व रेलमंत्री म्हणुन खरं तर त्यांच्याच अध्यक्षतेखाली आयोग नेमायला हवा होता.. म्हणजे सत्य समोर आले असते. असो. भारतीय मतदार सूज्ञ आहेत.. आणि मिपाकर देखील.

मनिम्याऊ's picture

27 Dec 2013 - 2:58 pm | मनिम्याऊ

.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Dec 2013 - 4:55 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत यासाठि तिस्तांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत आणि मिपाकर त्यांना न्याय देतील.

हुप्प्या's picture

27 Dec 2013 - 7:10 am | हुप्प्या

मोदींचा पंतप्रधानपदाकडे जाणार्‍या वाटेतला एक मोठा अडसर दूर झाला. अजून बरेच अडथळे आहेत. आणि दूरची मजल आहे. पण अकारण फासिस्ट, हिटलर, वंशच्छेदी वगैरे शेलक्या विशेषणाने ह्या कर्तबगार माणसाची केली जाणारी निंदानालस्ती थांबावी अशी अपेक्षा.
काँग्रेसने ब्राह्मणांच्या, शिखांच्या डूख धरुन कत्तली केल्या पण त्या कुणाला फार खटकल्या नाहीत. काँग्रेसवर कुणी हिटलरगिरी, जेनोसाईड (वंशच्छेद) वगैरे आरोप करत नाहीत. मात्र मुस्लिमांविरुद्ध कुणी काही केले असा संशय आला तरी त्याविरुद्ध रान उठवुन माणूस आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला जातो. हे दुटप्पी धोरण का हे मला न उलगडलेले कोडे आहे.
बघू या इथले नेहमीचे काँग्रेसी ह्या घटनेची कशी प्रतिक्रिया देतात ते.

मोदी, गुजराथमधील दंगली आणि त्याविरुद्ध केलेल्या कारवायांची, तपासाची, खटल्यांची जंत्री मुद्देसूदपणे प्रसिद्ध केल्याबद्दल विकासरावांचे आभार.

विचारवंतांच काय म्हणणं आहे या विषयावर ?

नाखु's picture

27 Dec 2013 - 8:46 am | नाखु

स्$$$$$$$$$$$$$$$$चीन........

मिनेश's picture

27 Dec 2013 - 10:26 am | मिनेश

लेख आवडला....धन्यवाद...

पैसा's picture

27 Dec 2013 - 10:37 am | पैसा

तिस्ता सेटलवाड मुझफ्फरनगर मधील जाटांच्या कत्तलीबद्दल काय करत आहेत आता?

सर्व त्यांनीच करायचे म्हणजे "दे रे हरी खाटल्यावरी"अशी प्रवृत्ती झाली

हाडक्या's picture

27 Dec 2013 - 4:42 pm | हाडक्या

मंग तुमी करा की राव.. तुमच्यासारखे पुरोगामी-ओरिगामी सामाजिक जाण असलेले लोक हिते रतीब घालण्यापेक्षा त्या लोकांना मदत करतील तर बरं.. नाय का ?

सबरंग हे टिस्ता सेटलवाडचे पब्लीकेशन. दंगलग्रस्तांसाठी जमा केलेले पैसे त्यांना मिळायच्या ऐवजी तेथे आणि तिस्ताच्या बाकी संघटनेत आणि पगारात जात होते अशी तक्रार आहे. त्यात तथ्य आहे का माहीत नाही. पण वार्षिक पेपर्स फाईल न केल्या मुळे Ministry of Corporate Affairs कडून तुर्तास चौकशी करणे चालू झाले आहे

Ministry of Corporate Affairs taking legal action against Teesta Setalvad's company by dharma next

तिमा's picture

27 Dec 2013 - 11:01 am | तिमा

अभिनंदन, विकासराव. मोदींचा मी समर्थक नाही. पण त्यांनी केलेले चांगले काम हे चांगलेच म्हणायला हवे. त्यांच्यातल्या गुणांचा उपयोग या देशाला होत असेल तर तो करुन घेतला पाहिजे. इंदिराजींवरही अनेक आरोप केले गेले. ते कधी सिद्ध झाले नाहीत. त्यांच्यातल्या धडाडीचा देशाला उपयोग झाला. निपक्षपातीपणे विचार करता येणे हे बहुसंख्य भारतीयांना कोणीतरी शिकवणे जरुरी आहे.

मृत्युन्जय's picture

27 Dec 2013 - 11:46 am | मृत्युन्जय

मला एक कळत नाही जातीय / धार्मिक दंगली काय फक्त गुजरातेत झाल्या काय? महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश इथल्या दंगलींचे काय? काश्मीरमधुन विस्थापित झालेल्या लाखाहुन अधिक काश्मीर पंडितांचे काय? त्यांची जी पद्धतशीरपणे हकालपट्टी झाली, दहशत माजवली गेली ती गुजरातपेक्षा खुपच भयानक होती. इथे नक्की कुठल्या गोष्टीचा विपर्यास केला जातो आहे ते कळत नाही. "मुस्लिमांना वेचुन मारा " अशी जोपर्यंत मोदींनी आज्ञा केली नसेल तोवर ते कसे काय दोषी ठरतात? यापेक्षा जहाल भाषेत वक्तव्ये आणि कॄती ठाकर्‍यांनी केली नव्हती काय? आणि तरीही त्यांना काही शिक्षा झाली नाही मग मोदी दोषी कसे? राजीव गांधींनीही इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख शिरकाणासंदर्भात सूचक वक्तव्ये केली होती त्याबद्दल काय? महात्मा गांधींच्या हत्येनंतर ब्राह्म्णांची घरे जाळली गेली आणि त्यात नंतर मुख्यमंत्री झालेले एक दिग्गज गाढव नेते पण सहभागी होते. त्यांच्यावर तर खटलाही दाखल झाला नाही. असो.

अरेरे! काय हा अन्याय मोदी सारख्या सरळ साध्या माणसावर. लेख वाचून डोळे पाणावले.

मारकुटे's picture

27 Dec 2013 - 12:10 pm | मारकुटे

उगी उगी

नाखु's picture

27 Dec 2013 - 12:16 pm | नाखु

आम्च्या हाकेला ओ देवून आले एकदाचे..

"हाता"वर "घड्याळ" आणि डोळे(डोके)बंद सचीनचा पंखा
नाद्खुळा

ग्रेटथिन्कर's picture

28 Dec 2013 - 2:52 pm | ग्रेटथिन्कर

दिल्लीत केजरीवाल आले आणि मोदींची मिडीया पब्लिसीटी गायब झाली..
छान, योग्य वेळी केजरीवाल यांच्या प्रतिमेने आणि चांगल्या नेतृत्वाने मोदीला निप्रभ केले...

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2013 - 2:56 pm | श्रीगुरुजी

अभिनंदन! जे पप्पूला रात्रंदिवस मेहनत करून जमलं नाही, ते केजरीवालांनी करून दाखवलं. पुन्हा एकदा त्रिवार अभिनंदन!

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2013 - 8:59 am | टवाळ कार्टा

=))

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Dec 2013 - 4:57 pm | llपुण्याचे पेशवेll

आता मोदीविरोध करायचा तर आप चे शेपूट धरले पाहीजे. कितीही वाकडे असले तरी.

सचीन's picture

27 Dec 2013 - 12:19 pm | सचीन

ह्या लेखाची प्रत काढून न्यायालात दिली पाहिजे न्यायमूर्तींचे हि डोळे पाणावतील

विकास's picture

27 Dec 2013 - 8:45 pm | विकास

त्यातील माहिती न्यायालयाच्या निकालपत्राचा गोषवार्‍यावरच आधारीत आहे.

सुनील's picture

27 Dec 2013 - 12:29 pm | सुनील

कुणाला पटो न पटो. आवडो न आवडो. पण मोदींना गोध्राचे ओझे कायमचेच वागवीत रहावे लागणार आहे.

जसे गांधींना ५५ कोटींचे आणि नेहेरूंना कश्मिरचे ओझे वागवीत रहावे लागत आहे.

यात खरे-खोटे, योग्य-अयोग्य याचा काहीही संबंध नाही.

मारकुटे's picture

27 Dec 2013 - 12:32 pm | मारकुटे

माझ्या मते गोध्राचे ओझे मोदींपेक्षा विचारवंतच वाहत आहेत.

सर्वसामान्य जनता बाबरी विसरली, मुंबै स्फोट दंगे, गोध्रा गुजरात सर्व काही विसरली आहे. रोजच्या महागाई, टंचाईपुढे भुतकाळ आठवून वेचून वेचून आसवं गाळायला वेळ कुठे ? विचारवंतांचे तसे नसते, हेच करायला त्यांना पैसे मिळतात.

विकास's picture

27 Dec 2013 - 9:19 pm | विकास

कुणाला पटो न पटो. आवडो न आवडो. पण मोदींना गोध्राचे ओझे कायमचेच वागवीत रहावे लागणार आहे.
सहमत. पण त्यातील कारण वेगळे आहे... उदाहरणादाखल ३ दंगली घेऊयात जेथे ३ मुख्यमंत्री हे त्या दंगली तात्काळ आटोक्यात आणण्यास कमी पडले. मुंबईची १९९३ ची दंगल, गोध्रा प्रकरणानंतरची २००२ ची गुजरात दंगल आणि गेल्या काही महीन्यांपूर्वी झालेली उत्तर प्रदेशातील - मुझफ्फूरनगरची दंगल. तिन्ही मधे नेतृत्व कमी पडले. पण मोदींचे राक्षसीकरण केले गेले.

जसे गांधींना ५५ कोटींचे आणि नेहेरूंना कश्मिरचे ओझे वागवीत रहावे लागत आहे.
५५ कोटी पाकीस्तानला द्यावेत हा गांधीजींचा आग्रह होता हे वास्तव आहे. नथुरामने ते त्यांच्या उपोषणाला जोडले ह्याला ठोस पुरावा नाही. काश्मीरचा प्रश्न युएन मधे नेण्याचे श्रेय/अपश्रेय नेहरूंकडे जाते. तेच सार्वमतासंदर्भात... या दोन्हीचे अनेक संदर्भ आहेत पण येथे विषयांतर टाळत आहे. हवे असल्यास खरडूयात अथवा वेगळी चर्चा करूयात.

फरक
नेहरू-गांधींवर काश्मीर-५५ कोटींबद्दल टिका करणे योग्य का अयोग्य ह्यात दुमत होऊ शकेल. पण त्यामुळे गांधीवाद्यांचे अथवा गांधीवादाचे राक्षसीकरण केले गेले नाही. कुठल्याही विचारधारेला आवडणे-नावडणे, त्यावरील वैचारीक टिका सगळे समजू शकते. गांधीवादावर टिका करणार्‍या विचारवंतांनी आणि राजकीय नेत्यांनी कधी खोट्याचा आधार घेतला नाही. पण गुजरात दंगलीनंतर समाजवादी विचारवंतांनी अत्यंत खोट्याचा आधार घेतला. आणि ते मी केवळ मोदींच्या संदर्भातच म्हणत नसून ते अगदी अमेरीका-इग्लंड मधील अनिवासी भारतीयांचे देखील राक्षसीकरण केले गेले, जे कधीच सत्य ठरवता आले नाही. हे अक्षम्य आहे आणि असले दुफळी माजवणारे विचारवंत खरे राक्षस आहेत, वेगळी रुपे घेऊन पब्लीकमध्ये येतात इतकेच...

नाही??

बरे.

>>गांधीवादावर टिका करणार्‍या विचारवंतांनी आणि राजकीय नेत्यांनी कधी खोट्याचा आधार घेतला नाही.<<

बरे.

>> पण गुजरात दंगलीनंतर समाजवादी विचारवंतांनी अत्यंत खोट्याचा आधार घेतला. <<

ब ऽ र!! (फार एक्झांपल?)
---
महोदय, चष्मा तसे दिसते, इतकेच म्हणतो. तुमचा चष्मा भगव्या काचेचा आहे, असेही म्हणतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Dec 2013 - 5:00 pm | llपुण्याचे पेशवेll

महोदय, चष्मा तसे दिसते, इतकेच म्हणतो. तुमचा चष्मा भगव्या काचेचा आहे, असेही म्हणतो.

सहमत. काही लोकांचा हिरवाळलेल्या लाल काचेचा असतो पण त्याला सगळ्यांनी स्वच्छ आणि बिनरंगी म्हणावे असा अट्टहास असतो इतकेच.

आनंदी गोपाळ's picture

31 Dec 2013 - 12:03 am | आनंदी गोपाळ

पेशवे,
तुमचा रंग कोणता? ते सांगता का जरा?

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Jan 2014 - 3:45 pm | llपुण्याचे पेशवेll

तोच जो तुम्हाला तुमच्या चष्म्याच्या रंगामुळे दिसतो.

श्रीगुरुजी's picture

27 Dec 2013 - 12:39 pm | श्रीगुरुजी

>>> कुणाला पटो न पटो. आवडो न आवडो. पण मोदींना गोध्राचे ओझे कायमचेच वागवीत रहावे लागणार आहे.
जसे गांधींना ५५ कोटींचे आणि नेहेरूंना कश्मिरचे ओझे वागवीत रहावे लागत आहे.

गांधींचा ५५ कोटी प्रकरणात व नेहरूंचा काश्मिर प्रश्नाचा विचका करण्यात प्रत्यक्ष सहभाग होता. पण गुजरात दंगलीचा डाग विनाकारण मोदींवर लावला जात आहे आणि फक्त काँग्रेसी विचारांचे निधर्मांधच हा दोषारोप करतात. सर्वसामान्य जनतेचा या आरोपांवर विश्वास नाही व न्यायालयाने अनेकवेळा त्यांना निर्दोष जाहीर केलेले आहे. पण ५५ कोटी प्रकरणात व काश्मिर प्रश्नाचा विचका करण्यामध्ये गांधी-नेहरू नव्हते असे कोणीच म्हणत नाही कारण ती वस्तुस्थिती होती. मोदी प्रकरणात मात्र गोबेल्स तंत्राने खोटा प्रचार गेले १२ वर्षे रात्रंदिवस सुरू आहे. न्यायालयात अनेकवेळा उघडे पडूनसुद्धा काँग्रेसवाले कोडगेपणाने तोच प्रचार सुरू ठेवत आहेत.

सुनील's picture

27 Dec 2013 - 1:05 pm | सुनील

यू प्रूव्ड माय पॉईंट ;)

गांधी-५५ कोटी, नेहेरू-कश्मिर ही तुणतुणी जशी "काही" मंडळींकडून (कुठल्याही ठोस पुराव्याविना) कायमच तुणतुणवली जातात. तसेच काहीसे मोदी-गोध्रा प्रकरण आहे.

श्रीगुरुजी's picture

27 Dec 2013 - 1:17 pm | श्रीगुरुजी

>>> यू प्रूव्ड माय पॉईंट
गांधी-५५ कोटी, नेहेरू-कश्मिर ही तुणतुणी जशी "काही" मंडळींकडून (कुठल्याही ठोस पुराव्याविना) कायमच तुणतुणवली जातात. तसेच काहीसे मोदी-गोध्रा प्रकरण आहे.

तुम्हाला माझा प्रतिसाद समजलेला नाही. पुन्हा एकदा प्रयत्न करतो. गुजरात दंगलीसाठी मोदींवर काँग्रेसकडून दोषारोप केले जातात. परंतु मोदी त्यात दोषी नाहीत हे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे.

पण गांधी-नेहरू प्रकरणाचे तसे नाही. काश्मिर प्रकरणाचा नेहरूंनी स्वतः विचका केला हा इतिहास आहे. तो कोणीही (काँग्रेसवाले सुद्धा) नाकारत नाहीत. ५५ कोटी प्रकरण सुद्धा गांधींमुळेच घडले हा इतिहास आहे. गांधी व नेहरू या घटनांकरता प्रत्यक्ष व्यक्तिगत जबाबदार होते. तो घडलेला इतिहास होता. त्यात खर्‍याखोट्या आरोपांचा प्रश्नच उद्भवत नाही. मोदींच्या बाबतीत मात्र कोणताही पुरावा नसताना सातत्याने खोटे आरोप केले जात आहेत, ज्या आरोपांना न्यायालयाने सुद्धा नाकारले आहे.

सुनील's picture

27 Dec 2013 - 2:00 pm | सुनील

पुन्हा तेच!

विचका केला असे "काही" लोक मानतात. परंतु तसे मानण्यास ठोस पुरावे नाहीत.

बाळकराम's picture

28 Dec 2013 - 6:34 am | बाळकराम

सहमत. गृहीतक आणि निष्कर्ष यातील फरक न कळल्यामुळे बर्‍याच हिंदुत्त्ववादी लोकांचा हा गोंधळ आहे, त्यात भर अज्ञानाची आणि पूर्वग्रहांची. पाकिस्तानची निर्मिती होण्यास गांधीजी पूर्णपणे कारणीभूत होते हे धादांत असत्य इतकी वर्षे या लोकांच्या माथी त्यांच्या बोलवित्या धन्यांनी मारले आहे की हे लोक स्वतंत्र आणि विचक्षण बुद्धिने विचारच करु शकत नाहीत. यामुळे आणि अनेक पूर्वग्रह आणि अज्ञान यामुळे जडित झालेल्या यांच्या बुद्धिने गांधीजी हेच केवळ फाळणीला कारणीभूत असा निर्णयसुद्धा देऊन टाकला आहे. त्यामुळे आपण म्हणतो तेच सत्य असा एक प्रलापी विभ्रम यांना होत असतो. याला उपाय एकच- सावरकरप्रणित वस्तुनिष्ठ आणि विज्ञानवादी हिंदुत्त्ववादाचे संघप्रणित सत्यापलापी, पराभूत हिंदुत्त्ववादावर आरोपण. ते हे होवू देणार नाहीत कारण ते राजकीयदृष्ट्या सोयिस्कर नाही.

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2013 - 2:34 pm | श्रीगुरुजी

>>> विचका केला असे "काही" लोक मानतात. परंतु तसे मानण्यास ठोस पुरावे नाहीत.

काश्मिरची सध्याची दारूण अवस्था, तिथे उघडउघड होत असलेल्या भारतविरोधी कारवाया, त्या राज्याला दिली गेलेली स्वतंत्र राज्यघटना व विशेष दर्जा, तिथे व तिथून फोफावत असलेला दहशतवाद इ. गोष्टी पाहिल्या तर पाकिस्तानविरूद्ध जिंकत आलेलं युद्ध अर्धवट सोडून माऊंटबॅटनच्या सल्ल्याने काश्मिर प्रश्न यूनोत नेऊन व नंतर त्या राज्याला विशेष दर्जा देऊन त्या प्रश्नात यूनोची व ३७० व्या कलमाच्या कायमस्वरूपी पाचरी मारून ठेवून विचका केला हे उघड सत्य आहे.

विचका झालेलाच नाही किंवा विचका झाला याचे पुरावे नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर पुढे बोलणंच खुंटलं.

गुरुजी उत्कृष्ठ प्रतिसाद.
अहो गांधी, नेहरूच ठीक आहे हो पण मोदींवर डाग साक्षात मोदींवर डाग! ये नाही हो सक्त गुर्जी .
अरेरे बिच्चारे मोदी.
त्यांच्या सारख्या पुरोगामी,सत्शील,चारित्र्यवान,धर्मनिरपेक्ष, जातीय सलोखा राखण्यासाठी झटणारा समाजसुधारक इ..आणि त्याच्यावर डाग.. नही ये डाग झुटे है गुरुजी आप बराबर कहते है..

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2013 - 2:28 pm | श्रीगुरुजी

>>> त्यांच्या सारख्या पुरोगामी,सत्शील,चारित्र्यवान,धर्मनिरपेक्ष, जातीय सलोखा राखण्यासाठी झटणारा समाजसुधारक इ..

हे सर्व गुणविशेष त्यांच्या बाबतीत खरे आहेत, नाही का?

स्वाध्वी प्रज्ञासिंग ह्याच्या विरुध्द कोणताही पुरावा न सापडल्यामुळे त्याना निर्दोष मुक्त करण्यात येइल असे त्यात म्हटले आहे.मग इतकी वर्ष सरकार आणि तपास यत्रंणा काय झक मारत होत्या काय?

श्रीगुरुजी's picture

27 Dec 2013 - 12:56 pm | श्रीगुरुजी

>>> स्वाध्वी प्रज्ञासिंग ह्याच्या विरुध्द कोणताही पुरावा न सापडल्यामुळे त्याना निर्दोष मुक्त करण्यात येइल असे त्यात म्हटले आहे.मग इतकी वर्ष सरकार आणि तपास यत्रंणा काय झक मारत होत्या काय?

साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित, असीमानंद व इतर ८-९ जणांविरूद्धचे आरोप पूर्ण राजकीय आरोप आहेत. त्यांच्याविरूद्ध कणभरही पुरावा नाही. ऑक्टोबर २००८ पासून हे सर्वजण तुरूंगात आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र पोलिस, एटीस - १, एसआयटी, सीबीआय, एटीस - २ आणि एनआयए या सर्व तपाससंस्थांनी तपास करून कणभरही पुरावा तयार करता आलेला नाही. त्यामुळेच आजतगायत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले नाही व आरोपपत्र नसल्यामुळे खटलाच सुरू होत नाही.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बॅकफूटवर ढकलण्यासाठी हिंदू संघटनांशी संबंधित असलेल्या या लोकांवर खोटे आरोप करून त्यांना गेली ५ वर्षे डांबून ठेवण्यात आले आहे. आजतगायत त्यांना जामीन दिलेला नाही.

पण फक्त हिंदु संघटनाना दडपण्यासाठी कॉग्रेस व सेक्युलर लोकानी स्वाध्वीना खोट्या आरोपाखाली अटक करुन त्याचा छ्ळ केला.निदान आता तरी त्याना लवकर तुंरुगातुन सोडवावे.

आता ह्या क्षणी ते तुरुंगातून सुटले पाहिजेत

गब्रिएल's picture

27 Dec 2013 - 2:10 pm | गब्रिएल

कायच्या काय? त्यांनी काय लालूसारखा करोडोचा चारा खावून त्यातले चार पैसे भाट मन्ड्लिंना चारले आहेत की डोके विकून खानग्रेस समोर सपशेल शरणागति घेतलिय? का ते सुडो-सेक्युलर हाय्त??? बाजारात चार पैसे, चार मतं किम्वा निदान दम्दार पाय्चाटुपणा असा भक्कम खजिना असल्याशिवाय माय्बाप सर्कार तुरूम्गातून कस्काय सोडणार? हे काय चार खोट्या गोड शब्दाचा लेख लिहिण्याएवढं सोपय होय??? :)

मग नेमके केलेय तरी काय?

जेपी's picture

27 Dec 2013 - 2:10 pm | जेपी

सचीनभौ ,मग लावा वशिला , दोन्हीकडे तुमचेच सरकार आहे .

अरेच्च्या असही असत काय मला वाटले केंद्र सरकार पूर्ण देशाचे असते?

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दुग्धस्नान
हसन मुश्रीफ
कोल्हापूर: बुलडाण्यात अंगावर शाईचा अभिषेक झाल्यानंतर आमदार हसन मुश्रीफ यांचा आज दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. कोल्हापुरामधील सर्किट हाऊसवर राष्ट्रवादीच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीम यांना दुग्धस्नान घातलं.

बुलडाण्यातल्या समाधान योजना कार्यक्रमात राष्ट्रवादी अपंग सेलचा जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवेने मुश्रीफ यांच्या अंगावर शाई फेकली होती. त्यानंतर त्याला अटक करुन जिल्हाध्यक्ष पदावरुन निलंबित करण्यात आलं. ही शाई उतवण्यासाठी मुश्रीम यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला.

हसन मुश्रीफ यांच्यावर शाई फेकली

त्यानंतर आज सकाळी हसन मुश्रीफ रेल्वेने कोल्हापुरात परतले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना थेट सर्किट हाऊसवर नेलं आणि दुधाने अभिषेक केला.

फोटू कुठाय ? काय राव गम्मत करू लागले.

शेखर's picture

28 Dec 2013 - 12:04 am | शेखर

खाली दिलेल्या लिंक वर बघा.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-west-maharas...

नाखु's picture

27 Dec 2013 - 2:13 pm | नाखु

जोपर्यंत "अखिल बगळे" (काही) पण ठोकमत चे मिपा धुरीण विचार(?)वंताबरोबर चर्चा करित नाहीत तो पर्यंत सोडता येणार नाही
"हाता"वर "घड्याळ" आणि डोळे(डोके)बंद सचीन("अखिल बगळे") चा पंखा
नाद्खुळा

बघा खुळे रावानाही कळू लागलय. बहुधा ते डोक्यावर कमळ माळून फिरत असावेत.

नाखु's picture

27 Dec 2013 - 2:29 pm | नाखु

आम्ही खुळे आहोत हे आपल्या सारख्या (दिड) शहाण्याना पण कळले..
पन तुम्ही (दिड्)शहाणे आहात हे सगळ्यांना पूर्ण समजेपर्यण्त आप्ले प्रयत्न चालू राहू द्यात.

====
घड्याळात वाज्ले तीन|
काहिपण चेपीन्-सची$$न सची$$न||

विकास's picture

27 Dec 2013 - 9:24 pm | विकास

आता ह्या क्षणी ते तुरुंगातून सुटले पाहिजेत

तुम्ही नुसते म्हणायचा अवकाश, तात्काळ (डिसेंबर २७) ही बातमी दिसली! NIA set to drop case against Sadhvi Pragya, others arrested by MP Police

बघा सुटल्यान तुम्ही आपले उगाच काळजी करत बसला होता.
बाकी लेख झ्याक आहे. वाचून गम्मत वाटली.
असेच गमतीदार लिहा .

क्लिंटन's picture

27 Dec 2013 - 3:28 pm | क्लिंटन

लेख आवडला हे वेगळे सांगायलाच नको.

गोध्रा मध्ये २७ फेब्रुवारी २००२ ला गाडी जाळण्यात आली, दुसर्‍या दिवशी धार्मिक दंगलीस सुरवात झाली. त्याच दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारीस गुलबर्ग सोसायटी हिंसाचार घडला. परीस्थिती राज्यसरकारच्या हाताबाहेर जात आहे, हे पाहून त्याच दिवशी केंद्राकडे लष्करी मदतीसाठी मदत मागितली गेली. पण अहमदाबदेत स्थानिक लष्करी तळ नसल्याने, सर्व पूर्ण होऊन लष्कर तैनात होईस्तोवर एक मार्च म्हणजे पुढचा दिवस लागला.

१३ डिसेंबर २००१ रोजी संसदभवनावर हल्ला झाल्यानंतर भारतीय लष्कर भारत-पाकिस्तान सीमेवर, विशेषतः काश्मीरातील एल.ओ.सी आणि परिसरात तैनात होते.त्यामुळे तिथून लष्कर काढून गुजरातमध्ये आणेपर्यंत नक्कीच वेळ गेला. २००५ मध्ये रेडिफमध्ये Did Godhra save Pakistan? हा लेख आला होता. अर्थातच २००१-०२ मध्ये भारताने पाकिस्तानवर आरामात विजय मिळविला असता असल्या कल्पना लढविणार्‍यांपैकी मी नाही.पण या लेखातील बाकीचे मुद्दे नक्कीच विचार करण्यासारखे आहेत.

हुप्प्या's picture

28 Dec 2013 - 4:36 am | हुप्प्या

लष्कर बोलवायला विलंब व्हायचे कारण अप्रत्यक्षरित्या भाजपा केंद्रीय सरकार असे सुचवायचे आहे का इथे? संसदेसारख्या सर्वोच्च संस्थेवर पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला असे आक्रमक उत्तर देणे चुकीचे होते असे आपण सूचित करत आहात का?
भारतीय लष्कर इतक्या तोकड्या संख्येचे आहे का की पाकच्या सीमेवर काही दले हलवली तर अन्यत्र ते दुबळे होते? काही जास्तीची सैन्यदले अशा आणीबाणीकरता नेमलेली नसतात का?
संसदेवरील हल्ल्याच्या प्रत्युत्तरामुळे सैन्यदलाची हलवाहलव झाली त्यामुळे सैन्य अहमदाबादेत पोचायला "नक्की" उशीर झाला असे आपण म्हणता ही कुठल्या पुराव्यावर आधारित वस्तुस्थिती की निव्वळ आपले मत?

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2013 - 2:25 pm | श्रीगुरुजी

>>> भारतीय लष्कर इतक्या तोकड्या संख्येचे आहे का की पाकच्या सीमेवर काही दले हलवली तर अन्यत्र ते दुबळे होते? काही जास्तीची सैन्यदले अशा आणीबाणीकरता नेमलेली नसतात का?

पाकच्या सीमेचं सोडा, २६/११ च्या रात्री ८ च्या हल्ल्यानंतर काही वेळातच दिल्लीला माहिती मिळून व पहिल्या २ तासातच घटनेचं गांभीर्य लक्षात येऊन कमांडो पाठविण्याचा निर्णय झाला होता. तरी प्रत्यक्षात ते कमांडो दिल्लीहून मुंबईला पोहोचण्यास तब्बल १५ तास लागले होते. लष्कर/कमांडो हलवाहलवी इ. ला इतका वेळ का लागतो हे एक गूढच आहे.

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2013 - 9:00 am | टवाळ कार्टा

+१११११११११११११११११११११११११११११११११

हलकट्पणाचा कळस होता तो

नितिन थत्ते's picture

28 Dec 2013 - 9:55 am | नितिन थत्ते

>>सर्व प्रथम दंगल झाली तेंव्हा मोदी हे सत्तेत येऊन केवळ दोनच महीने झाले होते.

आपण गुजरात दंगलींची तुलना अनेकवेळा १९८४च्या शीख विरोधी दंगलींशी केली आहे (असे स्मरते. आत्ता मी दुवे शोधत बसलो नाही). आपल्या मोदी-दोनच महिने झाले लॉजिकने पाहिले तर राजीव गांधी पंतप्रधान होऊन एक दिवसच झाला होता (किंवा तेवढाही झाला नव्हता).

बाकी चालू द्या.

अवांतरः २०१४ मध्ये जर मोदी नव्यानेच पंतप्रधान झाले त्यानंतर किती काळपर्यंत अप्रिय घटना घडल्यास "ते नवीनच आहेत" हा युक्तिवाद चालू शकेल?

विकास's picture

28 Dec 2013 - 11:25 am | विकास

आपण गुजरात दंगलींची तुलना अनेकवेळा १९८४च्या शीख विरोधी दंगलींशी केली आहे (असे स्मरते. आत्ता मी दुवे शोधत बसलो नाही).

मान्य. दुवे शोधण्याची गरज नाही. :)

आपल्या मोदी-दोनच महिने झाले लॉजिकने पाहिले तर राजीव गांधी पंतप्रधान होऊन एक दिवसच झाला होता (किंवा तेवढाही झाला नव्हता).

बर्‍याचदा लोकांना ते माहीत नसते म्हणून ते लिहीले (आधीपण लिहीलेले आहे) आणि तेथेच ते संपले. पुढली सर्व विधाने क्रमांक २-९ शी त्याचा काहीच संबंध नाही. त्यात मोदींनी स्वतःला देखील चौकशी समोर बसवले हे आहे. मोदींचे "action reaction" संदर्भातील विधान हे आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट कसे आहे ते कोर्टाने सांगितले हे देखील लिहीले आहे. इतर मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत काय न्याय लावले जातात आणि मोदींच्या बाबतीत काय लावले जातात हे देखील सांगून झाले. इत्यादी सर्वांबाबत आपले काय मत आहे? का फक्त "बाकी चालू द्या." इतकेच?

अवांतरः २०१४ मध्ये जर मोदी नव्यानेच पंतप्रधान झाले त्यानंतर किती काळपर्यंत अप्रिय घटना घडल्यास "ते नवीनच आहेत" हा युक्तिवाद चालू शकेल?

आधी देखील सांगून झाले की हा युक्तिवाद नाही. पण अनेकदा मोदी जणू काही रांगत असल्यापासूनच मुख्यमंत्री होते असा समज होतो म्हणून दिलेली माहिती होती. मोदी पंतप्रधान झाले तर (जी माझ्या दृष्टीने कमी शक्यता आहे) मग काय अप्रिय घटना होण्याची आशा बाळगणार आहात का?

माझा मुद्दा हा आधी देखील अनेकदा सांगितले आहे आणि या लेखानिमित्ताने देखील सांगितला आहे की केवळ मोदींपुरताच नाही/नव्हता. ते जर चूक ठरले असते तर त्यांना सगळ्यात कडक शिक्षा न्यायालयाने द्यायला हवी. पण या दंगलीचा आणि दंगलग्रस्तांचा तथाकथीत विचारवंतांनी अतोनात गैरफायदा घेऊन सामाजीक फूट पाडली आणि जे त्यांच्या विरुद्ध आहेत त्यांना गांधीहत्येप्रमाणेच बादरायण संबंध आणि खोट्या विधानांनी गिल्ट बाय असोसिएशन तयार करून नामोशेष करण्याचा प्रयत्न केला. जे अत्यंत आक्षेपार्ह होते. त्या बद्दल आपले काही त्याच्या विरुद्ध म्हणणे असले अथवा आपण का असहमत आहात ते सांगितले तर बरे होईल.

अर्धवटराव's picture

28 Dec 2013 - 11:40 am | अर्धवटराव

वेधलं कि लक्ष... म्हणजे, मोदिंना जे काम निपटायला दोन महिने लागले ते काम राजीवजींनी एका दिवसात केलं म्हणा कि... ह्म्म्म्म... म्हणजे, मोठा वृक्ष उन्मळून पडणार असा त्यांना दृष्टांत झाला होता काय त्यांना...

आणि २०१४ मध्ये म्हणाल तर... अम्म्म्म... बघु... तसंही काँग्रेसला काहि काम राहणार नाहि... तेंव्हा ते जोपर्यंत काँग्रेस वृक्षकटाई करतील तोपर्यंत मोदिंना नाविन्य दाखवता येईल. शिवाय लालूजी वगैरे मंडळी आहेत सोबतीला... मॅड्डमला तेव्ह्ढीच सोबत लाकडं तोडायला.

च्यायला... राजीवजी गेलेत कि कधिचे... शांतपणे राहुद्या ना त्यांना जिथं असतील तिथं.

मारकुटे's picture

28 Dec 2013 - 1:22 pm | मारकुटे

अवांतरः २०१४ मध्ये जर मोदी नव्यानेच पंतप्रधान झाले त्यानंतर किती काळपर्यंत अप्रिय घटना घडल्यास "ते नवीनच आहेत" हा युक्तिवाद चालू शकेल?

आहा ! म्हणजे असा काही कॉग्रेसी लोकांचा डाव आहे तर... ग्रेट,... वरील प्रतिसादाची लिंक सायबर सेलच्या लोकांनी पाहायला हवी...

श्रीरंग_जोशी's picture

30 Dec 2013 - 3:59 am | श्रीरंग_जोशी

धाग्याच्या विषयाशी संबंधित आजच्या लोकसत्तेतील एक लेख:

मोदींची प्रतिमासफेदी

राजस्थान, मध्य प्रदेश आणि झारखंडमधील भाजपच्या विजयानंतर भरधाव निघालेल्या मोदीरथाचा मार्ग गुजरातमधील महानगर दंडाधिकाऱ्यांनी गुजरात दंगलीप्रकरणी दिलेल्या निकालाने निष्कंटक झाल्याचे भासत असले, तरी वस्तुस्थिती तशी नाही. या निकालाने नरेंद्र मोदी यांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र नक्कीच मिळाले आहे. त्यामुळे देशभरातील मोदी ब्रिगेडला हायसे वाटले असणार यात शंका नाही. राहता राहिला प्रश्न मोदींचे निकटवर्ती अमित शहा यांनी, त्यांच्या साहेबांकरिता एका तरुणीवर गुप्तहेरांकडून ठेवलेल्या पाळतीचा. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ न्यायालयीन आयोगाची स्थापना करणार आहे. पुढील तीन महिन्यांत त्या चौकशीचा अहवाल येईल. मोदींना त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मोदी ब्रिगेडची गोष्ट वेगळी आहे. अहवालातून काहीही बाहेर आले तरी मोदीभक्तांच्या श्रद्धेमध्ये अणुमात्र फरक पडणार नाही. त्यांनी मोदींना केव्हाच पंतप्रधानपदावर बसवून टाकले आहे. पण आपल्या भक्तांचे प्रेम हे टीकाकारांवर समाजमाध्यमातून तुटून पडणे यापलीकडे फारसे उपयोगाचे नाही; ट्विटरवरील फॉलोअर्स आणि फेसबुकवरील लाइक्स यांची संख्या या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही, हे जाणण्याची राजकीय शहाणीव मोदी यांच्याकडे निश्चितच आहे. निवडणुकीचे गणित जमवायचे तर त्यासाठी जाती, धर्म, वर्ग यांची समीकरणे जुळवावी लागतात, हे येथील राजकीय वास्तव आम आदमी पक्षाने दिल्लीत मोडीत काढले असले, तरी तो अजूनही अपवादच आहे. याची जाणीवही मोदी यांना नक्कीच असणार. गुजरात दंगल प्रकरणाच्या निकालानंतर त्यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ लेखातून हीच जाणीव स्पष्ट दिसते. मोदी यांचा चेहरा विकासपुरुषाचा आहे. त्यास सर्वसमावेशकत्वाची रंगसफेदी करण्याचा प्रयत्न म्हणजे तो लेख आहे. लोकसभा निवडणुकीत रालोआला सर्वाधिक जागा मिळतील; परंतु पूर्ण बहुमत मिळेल अशी शक्यता सध्या तरी दृष्टिपथात नाही. अशा वेळी सत्तास्थापनेसाठी अन्य पक्षांकडून रसद घ्यावी लागणार आहे. त्याची तरतूद करण्याचा प्रयत्न म्हणजे तो लेख आहे. आपण दंगल प्रकरणाच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून बाहेर पडलो आहोत, हे या लेखाद्वारे अधोरेखित करून मोदींनी या संभाव्य मित्रपक्षांची सोय करून दिली आहे. उद्या वेळ आलीच तर त्यांना मोदींचा हात धरणे यामुळे सोपे होणार आहे. अर्थात या लेखामागे केवळ राजकीय-व्यापारी उद्देशच आहे असे म्हणणे हा मोदींवरील अन्याय ठरेल. गुजरात दंगलीतील िहसक वेडाचारामुळे आपण मुळापासून हादरलो होतो, ही जी भावना मोदी यांनी व्यक्त केली आहे त्याबद्दल शंका घेता येणार नाही. दंगलीबद्दल त्यांनी माफी मागितली नाही, अशी टीका आता केली जात आहे. परंतु त्याचे कारण स्पष्ट आहे. त्यांना माफीचे काही कारणच दिसले नाही. न्यायालयानेही तसा निर्वाळा दिला आहे. तेव्हा तशी अपेक्षा करणे चूक आहे. एक गोष्ट खरी, की या लेखात त्यांनी केलेले काही दावे वस्तुस्थितीशी विपरीत आहेत. दंगलग्रस्तांना मदत आणि पुनर्वसन करण्यासाठी साधी समिती नेमण्यातही मोदींचे सरकार चालढकल करीत होते आणि अखेर वाजपेयींना त्यात हस्तक्षेप करावा लागला होता, असे वृत्त गेल्या शनिवारीच ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केले होते. तेव्हा मोदी यांच्या शोकाकुल लेखाने भारावून जाण्याचेही कारण नाही. प्रतिमासंवर्धनाची सुंदर खेळी एवढाच त्या लेखाचा खरा अर्थ आहे.

विकास's picture

30 Dec 2013 - 6:54 am | विकास

लोकसत्तेतील "अन्वयार्थ" मधील संपादकीय लेख येथे दिल्याबद्दल धन्यवाद. त्यासंदर्भात प्रतिवाद करण्यासाठी खालील प्रतिसाद नाही हे कृपया लक्षात असुंदेत. तरी देखील काही वेगळे / विरुद्ध वाटल्यास अवश्य कळवा...

सर्वप्रथम मूळ लेखाचा विषय हा मोदी कस्से चांगले हा नाही. वर देखील एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, मोदी जर दोषी ठरले असते तर त्यांना शिक्षा व्हायलाच हवी होती. पण ते दोषी ठरलेले नाहीत. आणि का ठरले नाहीत याचे कारण वकीली वाद-प्रतिवाद नसून जर नीट वर चर्चाप्रस्तावात दिलेले रिलेटेड मुद्दे पाहीले तर लक्षात येईल की जे आरोप होते, ते खोटे ठरले. पांडे हे २७ फेब्रुवारीच्या मिटींगला हजरच नव्हते. यावरून पांडे यांना एनडीटिव्हीवर देखील प्रश्न विचारला होता, पण त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही, अर्थात "मुद्दा तो नाही" असे म्हणत टाळले. मग हा माणूस त्या मिटींगबद्दल कसे काय काही सांगू शकतो, त्यातील कुणावरही आरोप करू शकतो आणि त्याचा वापर करत इतर जण ते आरोप ज्यांच्यावर केले त्या मोदींना राक्षस ठरवू शकतात... बाकी असे अनेक मुद्दे वर आहेत पण परत परत लिहायचे टाळतो. मात्र मुख्य मुद्दा आहे तो, मोदीं दोषी आहेत असे गृहीत धरत त्यामुळे सर्वांनाच म्हणजे जे कोणी संघाशी संबंधीत काम करत असतील त्या सर्वांनाच दोषी ठरवून नायनाट करायचा प्रयत्न केला गेला (अमेरीकेतील एक उदाहरण वर दिलेले आहेच), त्यातून प्रचंड सामाजीक फूट पाडण्यात आली, जी अक्षम्य होती, अक्षम्य आहे.

आता आपण दिलेल्या लेखासंदर्भात बघूयातः

पहीला मुद्दा: स्नूपिंग प्रकरणातील केंद्रसरकारचा चौकशी आयोग. परत तेच जर त्यात ते दोषी ठरले तर जी काय कायद्याने शिक्षा होयला हवी ती होउंदेत. पण एक प्रॉब्लेम हा काँग्रेसला होऊ शकतो. भाजपा आणि मोदी या संदर्भात बहुदा केंद्राच्या विरोधात खटला दाखल करणार आहेत. राज्य सरकारने एकदा चौकशी आयोग स्थापल्यावर परत केंद्र सरकारने स्थापणे म्हणजे कायद्याच्या चौकटीत न बसणारे ठरू शकेल. जर ते तसे ठरले तर ऐन निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस नाकावर आपटू शकते. आणि जरी काँग्रेसच्या बाजूने अशा खटल्याचा निकाल लागला, तरी भाजपा-मोदी काँग्रेसची राजकीय खेळी म्हणून जनतेमध्ये मार्केटींग करू शकते. आत्ताची तरी अवस्था अशी आहे की काँग्रेसवर कुठल्याही डोके शाबूत असणार्‍या व्यक्तीचा विश्वास नाही (अगदी अशा व्यक्ती भाजपा नको म्हणून अथवा स्वतःच्या स्वार्थापोटी काँग्रेसला मते देत असल्या तरी).

मुद्दा २: लेखाचे कारण हे इतर संभाव्य पक्ष जे निवडणुकांनंतर पाठींबा देऊ शकतील त्यांच्या सोयीसाठीचा अगदी बरोबर वाटला हा मुद्दा. पण हे राजकारण आहे. खेळले तर म्हणणार राजकीय चाल. नाही खेळले तर म्हणणार म्हणून संघवाले मार खातात! ;)

मुद्दा ३: "गुजरात दंगलीतील हिंसक वेडाचारामुळे आपण मुळापासून हादरलो होतो, ही जी भावना मोदी यांनी व्यक्त केली आहे त्याबद्दल शंका घेता येणार नाही... त्यांना माफीचे काही कारणच दिसले नाही. न्यायालयानेही तसा निर्वाळा दिला आहे. तेव्हा तशी अपेक्षा करणे चूक आहे" मला वाटते (बे"सुमार"तेतून बदलेला) लोकसत्ता हे मुख्यप्रवाहातील पहीले वर्तमानपत्र असेल ज्यांनी इतके स्पष्टपणे मान्य केले आहे. बाकी टिका करताना त्यात राक्षसीकरण करणे यातून पूर्णपणे टाळलेले दिसत आहे, जे स्वागतार्ह आहे.

शेवटचा मुद्दा: दंगलग्रस्तांना मदत आणि पुनर्वसन करण्यासाठी साधी समिती नेमण्यातही मोदींचे सरकार चालढकल करीत होते आणि अखेर वाजपेयींना त्यात हस्तक्षेप करावा लागला होता, असे वृत्त गेल्या शनिवारीच ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केले होते. मला ह्या बातमीचा दुवा मिळू शकला नाही. पण उत्सुकतेपोटी जेंव्हा गुगलले तेंव्हा हिंदू मधील ७ मार्च २००२ मधली बातमी मिळाली. त्यात म्हणले आहे: "...The Chief Minister, Narendra Modi, has announced a judicial inquiry into the post-Godhra violence. But a spokesman of the Chief Minister's Office said that the Government was yet to decide on whether or not to club the inquiry with the one into the train carnage. He said since the "nature" of the two incidents were different, it was possible that separate commissions would be constituted to go into them. " आणि पुढे असा देखील उल्लेख आला आहे, "...Mr. Modi visited relief camps housing the minorities and instructed the officials concerned to ensure supply of essential commodities. Doctors visited the camps to treat the injured for the first time today since the beginning of the violence. Some 30,000 people are being sheltered in 18 relief camps. " जर आठवड्याभराच्या आत १८ कँप्स होते आणि चौकशी समितीची घोषणा केली होती, तर नक्की त्यांनी किती आळमटळम केली ह्याचा विचार करावा लागेल. तुलनेसाठी: मुझ्झफरनगरची दंगल २७ ऑगस्टला चालू झाली समिती ९ ऑगस्टला स्थापली (१३ दिवसांनी). मुंबई दंगल आणि श्रीकृष्ण आयोग स्थापण्यामधे किती काळ होता माहीत नाही...

श्रीरंग_जोशी's picture

30 Dec 2013 - 8:33 am | श्रीरंग_जोशी

गुजरात मधील २००२ हिंसाचारांमध्ये तत्कालिन व तेव्हापासून आजवर मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांना त्यासाठी प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या दोषी सिद्ध करणे ही बाब भारतीय न्यायव्यवस्था व राजकीय व्यवस्था जुजबी ओळख असणारे सुद्धा अशक्य कोटीतील मानतील.

मी आजवर मांडत आलेला मुद्दा केवळ एवढाच आहे की त्यावेळी व त्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे कर्तव्य पार पाडायला हवे होते त्यात मोदी यांनी होईल तेवढी कसूर केली. यावर मी येथे सविस्तर लिहिले आहे.

आजवर कुठल्याही कारणामुळे महाराष्ट्रातील खटला दुसर्‍या राज्यात हलवावा लागला का? याउलट गुजरातमधील खटले महाराष्ट्रात चालवावे लागले.

बाकी आंतरराष्ट्रीय स्तरावर मे २००४ पासून केंद्रीय सत्तेत असलेल्या केंद्रीय सरकारने वारंवार गुजरात मधील हिंसाचार ही पूर्णपणे भारताची अंतर्गत बाब आहे हीच भूमिका घेतली. दुसर्‍या देशातील सरकार भारत सरकारची भूमिका लक्षात न घेता यावर आपले धोरण ठरवत असतील तर ती त्यांची अपरिपक्वता आहे.

पण २००२ मध्येच गुजरातचे मुख्यमंत्री अधिक जबाबदारीने वागले असते अथवा जबाबदारी पार पाडणे जमत नसल्याने पदावरून दूर झाले असते तर ही वेळच आली नसती.

विकास's picture

30 Dec 2013 - 10:23 am | विकास

नरेंद्र मोदी यांना त्यासाठी प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या दोषी सिद्ध करणे ही बाब भारतीय न्यायव्यवस्था व राजकीय व्यवस्था जुजबी ओळख असणारे सुद्धा अशक्य कोटीतील मानतील.

जर सिद्ध होत नसेल तर त्यांना राक्षस का केले जात आहे? हे कायद्याने तरी योग्य आहे का? गुजरातमधे घडलेल्या हिंसाचारास सातत्याने pogram म्हणले गेले आहे. हिंसाचार जितका अक्षम्य आणि निर्घॄण होता तितकाच त्याचे वर्णन करण्यासाठी वापरला गेलेला शब्द. इथे सर्वांच्या माहितीकरता सांगतो की हिटलरने जो ज्यूंचे पद्धतशीरपणे हत्याकांड केले त्याला pogram म्हणतात, ज्याचा अर्थ "An organized, often officially encouraged massacre or persecution of a minority group, especially one conducted against Jews." असा आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे की गुजरातसरकारने हिटलर सारखे पद्धतशीर हत्याकांड केले आहे?

मी आजवर मांडत आलेला मुद्दा केवळ एवढाच आहे की त्यावेळी व त्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे कर्तव्य पार पाडायला हवे होते त्यात मोदी यांनी होईल तेवढी कसूर केली.

मोदींनी कर्तव्य पार पाडले असे कोर्टाने संदर्भ मिळाले म्हणून म्हणले आणि त्यांच्यावरील गुन्हेगारीचे आरोप रद्द केले आहेत. त्यामुळे हे जे तुम्ही म्हणत आहात त्याला कृपया संदर्भ दिलेत तर बरे होईल.

केंद्रीय सरकारने वारंवार गुजरात मधील हिंसाचार ही पूर्णपणे भारताची अंतर्गत बाब आहे हीच भूमिका घेतली.

मी माझ्या चर्चा प्रस्तावात अथवा या संदर्भातील लेखनात नक्की कुठे केंद्रसरकार बद्दल बोललो आहे हे दाखवाल का? माझा मुद्दा समजून घेतलात तर बरे होईल. समजत नसेल तर अवश्य विचारा परत एकदा समजावून सांगेन.

पण २००२ मध्येच गुजरातचे मुख्यमंत्री अधिक जबाबदारीने वागले असते

अधिक म्हणजे काय आणि कोणासारखे? १९९२-९३ च्या मुंबई दंगलीतल्या मुख्यमंत्र्यांसारखे का आत्ताच्या उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्र्यांसारखे, का १९८४ च्या शिख दंगलीच्या वेळेस वागले गेलेल्या पंतप्रधानांसारखे का अगदी भारताला स्वातंत्र्य मिळता क्षणी दुर्दैवी गांधीहत्येनंतर झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील दंगलीच्या वेळेस जसे नेहरू सरकार वागले तसे का त्यावेळ पासून ते १९८४ च्या अनंत दंगली झाल्या (त्यात ठाणे-भिवंडी दंगली पण आल्या) त्यात वागलेल्या सरकारांसारखे? सगळ्याची गोळाबेरीज करूयात.

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2013 - 12:58 pm | श्रीगुरुजी

विकास,

अगदी योग्य आणि मुद्देसूद प्रतिसाद!

काल सिब्बल म्हणत होता की आता इतक्या उशीरा ११ वर्षांनंतर खेद व्यक्त करण्याला अर्थ नाही. तो वकील असल्यामुळे कोणते मुद्दे सोयिस्कररित्या पुढे आणायचे व गैरसोयीचे मुद्दे कसे मागे ठेवायचे हे त्याला चांगले माहित आहे. १९८४ साली झालेल्या एकतर्फी दंगलीत ३००० हून अधिक शिखांची हत्या झाल्यावर त्यातल्या एकाही आरोपीवर काँग्रेसने खटला दाखल केला नाही. उलट त्यातल्या काही जणांना कॅबिनेट मंत्रीपदाची बक्षिशी दिली (हरेकृष्णलाल भगत, ललित माखन, सज्जनकुमार, टायटलर, कमलनाथ इ.). नंतर लोकसभेत २००५ मध्ये (म्हणजे तब्बल २१ वर्षांनी) पंतप्रधानांनी दंगलीबद्दल माफी मागितली. जर ११ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर खेद व्यक्त करणे चुकीचे तर २१ वर्षांनंतर माफी मागणे हे कसे समर्थनीय आहे?

ग्रेटथिन्कर's picture

30 Dec 2013 - 4:33 pm | ग्रेटथिन्कर

खेद व्यक्त करणे आणि माफी मागणे यातला फरक आपल्या बुद्धीला समजत नसेल तर त्याला आम्ही तरी काय करणार गुरुजी?

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2013 - 8:25 pm | श्रीगुरुजी

जे दंगली भडकावतात व जे दंगलीला प्रत्यक्ष जबाबदार असतात, त्यांनीच माफी मागायची असते. हे आपल्या बुद्धीला समजले असावे व समजावे अशी आशा करतो.

श्रीरंग_जोशी's picture

30 Dec 2013 - 9:00 pm | श्रीरंग_जोशी

साल २००२ किंवा २००३ असेल - तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते गुजरातमधील हिंसाचार हा राष्ट्रावरील डाग आहे. त्याखेरीज ते हे पण म्हणाले होते की गुजरातमधील हिंसाचारामुळे परदेश दौर्‍यावर जाताना कुठल्या तोंडाने जावे हाही प्रश्न त्यांना पडतो.

एप्रिल २००४ - लोकसभा निवडणूकींच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी गुजरात हिंसाचारादरम्यान मोदी सरकारच्या भूमिकेबाबत 'मानवद्रोह' हे विशेषण वापरले होते. तेव्हा स्व प्रमोद महाजनांनी पवारांना अतिशयोक्तिची बाधा झाली आहे असे म्हंटले होते. त्यानंतर काही आठवड्यांतच सर्वोच्चा न्यायालयानेही गुजरातमधील हिंसाचाराबाबत हेच अथवा याच अर्थाचे विशेषण वापरले होते.

तत्कालिन पंतप्रधान व सर्वोच्च न्यायालयाने त्या काळात व्यक्त केलेले मत या बाबतीत पुरेसे असावेत अशी आशा करतो.

त्याखेरीज योग्य वातावरण नसल्याने काही गुजरातमधील खटले महाराष्ट्रातील न्यायालयांत चालवावे लागले हे मी वर लिहिलेच आहे.

मी माझ्या चर्चा प्रस्तावात अथवा या संदर्भातील लेखनात नक्की कुठे केंद्रसरकार बद्दल बोललो आहे हे दाखवाल का? माझा मुद्दा समजून घेतलात तर बरे होईल. समजत नसेल तर अवश्य विचारा परत एकदा समजावून सांगेन.

तुम्ही केंद्रसरकारबद्दल काही म्हंटलय अस मी कुठे म्हंटलय. धागा नवा असताना त्यामध्ये लिहिलेल्या मुद्द्यांचा अधिक आधार घेतला जातो. जशी जशी चर्चा पुढे सरकते तेव्हा आपला मुद्दा मांडण्यासाठी विषयाशी संबंधित बाबींचा आधार घेतला जाण्यावर आक्षेप असेल तर मग काय बोलावे?

इतर दंगलींशी तुलना करायचीच आहे तर मी पुर्वी लिहिलेल्या प्रतिसादातील काही भाग इथे पुन्हा डकवतो.

भारतामध्ये पूर्वीही या प्रकारचा हिंसाचार झाला होताच पण सरकारी यंत्रणेची अन सत्ताधारी पक्षाची भूमिका या प्रकारची कधीच नव्हती. काही ठळकपणे आढळणारी उदाहरणे

  • माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये शिखांचे शिरकाण सुरू असताना शरद पवार (तेव्हा ते इंकाँमध्ये नव्हते), स्व. राजेश पायलट, स्व. माधवराव शिंदे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून हिंसक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते.
  • १९९२-९३ मुंबईतील दंगलीमध्ये मुस्लिम वस्ती असणाऱ्या चाळींवर हल्ला झालाच तर प्रत्युत्तर म्हणून गच्च्यांवर मोठाल्या कढयांमध्ये तेल उकळत ठेवले जात असे. सत्ताधारी काँग्रेसचे नेते स्व सुनील दत्त स्वतः तेथे जाऊन मुस्लिम जमावाला शांत करत होते.
विकास's picture

31 Dec 2013 - 12:34 am | विकास

​​

तुम्ही केंद्रसरकारबद्दल काही म्हंटलय अस मी कुठे म्हंटलय. धागा नवा असताना त्यामध्ये लिहिलेल्या मुद्द्यांचा अधिक आधार घेतला जातो. जशी जशी चर्चा पुढे सरकते तेव्हा आपला मुद्दा मांडण्यासाठी विषयाशी संबंधित बाबींचा आधार घेतला जाण्यावर आक्षेप असेल तर मग काय बोलावे?

खुलाशाबद्दल धन्यवाद. माझा मुद्दा हा केंद्रसरकार बद्दल नव्हता तर सामाजीक संस्थेच्या नावाखाली देशात दुही माजवणार्‍या तथाकथीत विचारवंत टोळ्यांबाबत आहे. मला वाटले आपल्यास ते समजले नाही म्हणून विचारले होते....

माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये शिखांचे शिरकाण सुरू असताना शरद पवार (तेव्हा ते इंकाँमध्ये नव्हते), स्व. राजेश पायलट, स्व. माधवराव शिंदे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून हिंसक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते.

नक्की किती आणि कुठे केला? त्यांच्याकडे काही अ‍ॅथॉरीटी होती का? म्हणजे ज्यांच्याकडे अ‍ॅथॉरीटी होती ते काय करत होते? कारण दिल्लीत ३००० च्या घरात शिखांना या दंगलीत मारल्याचे दाखले आहेत. राजीव गांधीं त्याच वेळेस दंगलीचे समर्थन कसे करत होते? त्यानंतर काँग्रेसकडून खासदार झालेल्या अमिताभने पण "खून का बदला खून से" असे म्हणल्याचे नंतर जाहीर झाले होते. जगदीश टायटलर, सज्जनकुमार कुठल्या पक्षाचे आहेत? काँग्रेसने नंतर स्वतःच स्थापलेला मारवा आयोग बरखास्त केला. इतकेच नव्हे तर मारवा यांच्या हस्ताक्षरातील नोंदी देखील पुढील आयोगास देण्यात आल्या नाहीत. अर्थात त्या पुढील चौकशीचा भाग राहील्या नाहीत. अजूनही सगळ्या चौकशा पूर्ण झाल्या नाहीत आणि शिखांना न्याय मिळालेला नाही.

आता गोध्राला काय झाले बघुयातः २७ फेब्रु. २००२ ला सकाळी दुर्घटना घडली आणि संध्याकाळी मोदी तेथे हजर होते, त्या आधीच त्यांनी गांधीनगर मधे असतानाच दंगल होऊ शकते हे ध्यानात घेऊन कर्फ्यूचे आणि दिसता क्षणी गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते. त्याच दिवशी म्हणजे २७ फेब्रुवारीस संघाने संयम पाळण्याचे सर्वांना आवाहन केले. “The tolerance of the Hindu society is a litmus test. Instead of taking the law into their hands, people should cooperate with the state government in dealing with the serious situation.” (टेलीग्राफ) त्या व्यतिरीक्त तात्काळ महाराष्ट्र-राजस्थान-म.प्र. या राज्यांना कुमक मागवली (फक्त महाराष्ट्रानेच दिली), लष्कराची मदत मागितली वगैरे मुद्दे तर सिद्ध झाले आहेतच. त्या उलट पंजाब दंगल १ नोव्हेंबरला चालू झाली आणि आदेश हे २ नोव्हेंबरपर्यंत दिले गेले नव्हते!

१९८४ साली दिल्लीत ३००० शिख आणि भारतभर ८००० शिख मारले गेले आहेत. गुजरात २००२ मधे सरकारी आकड्याप्रमाणे ७९० मुस्लीम आणि २५४ हिंदूंची हत्या झाली. मोदी विरोधक सामाजीक संस्थांच्या मते हा आकडा २००० मुस्लीम इतका आहे (त्या हिंदूंच्या हत्येबद्दल बोलत नाहीत). हत्या एक असली तरी वाईटच आणि निषेधार्हच आहे. पण आकडेवारीतील फरक, तत्कालीन सरकारची प्रतिक्रीया, निर्णय प्रक्रीया पाहिली तर pogram नक्की कशाला म्हणाल? का शरद पवार वगैरे रस्त्यावर उतरले म्हणून शिख दंगलीत चांगली काळजी घेतली असे म्हणायचे आहे? आणि तरी देखील आता अमर्त्य सेन सारखे "आपल्याला नोबेल/भारतरत्न मिळाले म्हणजे सगळीकडे बोलण्याचा हक्क आहे" असे समजणारे म्हणतात की "1984 Riots Not Comparable With Post-Godhra Violence"

तत्कालिन पंतप्रधान व सर्वोच्च न्यायालयाने त्या काळात व्यक्त केलेले मत या बाबतीत पुरेसे असावेत अशी आशा करतो.
या बद्दल अधिक लिहायचे टाळतो... मोदींनी राजधर्म पाळावा असे वाजपेयी म्हणल्याचे तेंव्हा प्रसिद्ध झाले होते पण त्याच व्हिडीओत, "तसा ते (मोदी) पाळत आहेत याची मला कल्पना आहे", अशा अर्थाचे पण ते बोलले होते जे जास्त सांगितले गेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्या काळात मत व्यक्त केले कारण सतत विरुद्ध बोलणार्‍यांचे दडपण होते. आणि तरी देखील ते जे काही म्हणाले ते हिंसाचाराबद्दलचे होते. आरोप सिद्ध झाल्याशिवाय कुणालाही जाहीर दोषी म्हणायची चूक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश करतील असे वाटत नाही. बरं आता तर सर्वोच्च न्यायालयानेच स्थापलेल्या एस आय टी ने पुराव्यावर आधारीत जाहीर केले आहे. का ते मान्य नाही आणि फक्त पुराव्यावीना जाहीर केलेले बरोबर?

त्याखेरीज योग्य वातावरण नसल्याने काही गुजरातमधील खटले महाराष्ट्रातील न्यायालयांत चालवावे लागले हे मी वर लिहिलेच आहे.

हे तुम्ही बेस्ट बेकरी केस संदर्भात म्हणत असाल असे समजतो. ती केस गुजरात सरकार अथवा मोदींच्या विरोधात नव्हती हे माहीत असेलच... इतर कुठला खटला मला आत्तातरी माहीत नाही. या केस संदर्भात गुजरात कोर्टातला निकाल मान्य न झाल्याने मानवी हक्क संघटनेने सुप्रिम कोर्टात तक्रार केली होती. तशी विनंती एफ आय आर दाखल करणार्‍या झाहीरा शेख हीने केली होती. त्यातील कोर्टाच्या आज्ञेनुसार आधी गुजरात सरकारने ही केस परत चालू केली आणि नंतर सुप्रिम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मुंबई हायकोर्टात हलवली. मात्र नंतर झाहीरा शेखने स्वतः खोटे बोलल्याचे आणि ते टिस्टाच्या दबावाखाली येऊन केल्याचे जाहीर केले. त्यात ती खोटे ठरली. पण केस मधे फिर्यादींच्या बाजूने असलेली यास्मिन शेख हीने नंतर टिस्टाने दिशाभूल केली अशी तक्रार कोर्टात (निकाल लागल्यावर) केली. त्याचे काय झाले माहीत नाही... मात्र या केस मध्ये, पाच जणांना सोडून दिले आणि चार जणांना बेस्ट बेकरीच्या कर्मचार्‍यांच्या साक्षिवर आधारीत गुन्हेगार ठरवून शिक्षा झाली. त्यात काहीच आक्षेपार्ह घडलेले दिसत नाही.

श्रीगुरुजी's picture

31 Dec 2013 - 8:53 pm | श्रीगुरुजी

>>> साल २००२ किंवा २००३ असेल - तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते गुजरातमधील हिंसाचार हा राष्ट्रावरील डाग आहे. त्याखेरीज ते हे पण म्हणाले होते की गुजरातमधील हिंसाचारामुळे परदेश दौर्‍यावर जाताना कुठल्या तोंडाने जावे हाही प्रश्न त्यांना पडतो.

कोणतीही दंगल व हिंसाचार हा राष्ट्रावरील डाग असतोच. त्याचे कोणीही समर्थन करत नाही. फरक एवढाच आहे की वाजपेयींनी ते बोलून दाखविले, पण त्यांच्या आधीच्या किंवा नंतरच्या पंतप्रधानांनी असे काही म्हटल्याचे ऐकिवात नाही. (चूभूदेघे).

>>> एप्रिल २००४ - लोकसभा निवडणूकींच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी गुजरात हिंसाचारादरम्यान मोदी सरकारच्या भूमिकेबाबत 'मानवद्रोह' हे विशेषण वापरले होते. तेव्हा स्व प्रमोद महाजनांनी पवारांना अतिशयोक्तिची बाधा झाली आहे असे म्हंटले होते. त्यानंतर काही आठवड्यांतच सर्वोच्चा न्यायालयानेही गुजरातमधील हिंसाचाराबाबत हेच अथवा याच अर्थाचे विशेषण वापरले होते.

त्या काळात टिस्टा व इतर अनेक एनजीओ, काँग्रेस व इतर विरोधी पक्ष व माध्यमे यांनी असा काही प्रोपागंडा तयार केला होता की जणू काही गुजरातमध्ये हिंदू तालिबानी सत्तेवर असून अफगाणीस्तानात जसे अमुस्लिमांना व महिलांना रस्त्यावर येणे अशक्य झाले होते, तसेच गुजरातमध्ये मुस्लिमांच्या बाबतीत झाले आहे. ही मंडळी पार यूनो, आंतरराष्ट्रीय न्यायालय इ. ठिकाणी जाऊन थडकली होती. दंगलीनंतर काही काळाने हात जोडून उभ्या असलेल्या एका मुस्लिम तरूणाचे चित्र सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. तो दंगलखोरांना प्राण वाचविण्याची विनंती करत आहे अशा कहाण्या प्रसिद्ध झाल्या होत्या. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी तर त्याला व त्याच्या कुटुंबाला कलकत्त्याला हलवून तिथे त्याची व्यवस्था केली होती. कालांतराने असे बोलले जाऊ लागले तो 'मॅनेज्ड' फोटो होता. फोटो काढणार्‍याने दंगलखोरांच्या उपस्थितीत इतक्या जवळून क्लोजअप् कसा घेतला हे एक गूढच होते. दंगलखोरांनी देखील त्याला फोटो काढून देऊन पुरावा निर्माण करून कसा दिला हे पण गूढ होते. काही महिन्यांनी तो तरूण व त्याचे कुटुंब गुजरातला परतले. इतक्या अशांत वातावरणात तो का परतला असावा?

>>> तत्कालिन पंतप्रधान व सर्वोच्च न्यायालयाने त्या काळात व्यक्त केलेले मत या बाबतीत पुरेसे असावेत अशी आशा करतो.त्याखेरीज योग्य वातावरण नसल्याने काही गुजरातमधील खटले महाराष्ट्रातील न्यायालयांत चालवावे लागले हे मी वर लिहिलेच आहे.

वर स्पष्टीकरण दिलेल्या खोट्या प्रचारामुळे न्यायाधीशांवर देखील प्रभाव पडला असावा आणि म्हणूनच बेस्ट बेकरीचा खटला गुजरातबाहेर हलविला असावा. पण उर्वरीत बहुसंख्य खटले हे गुजरातमध्येच चालविले गेले होते.

>>> माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये शिखांचे शिरकाण सुरू असताना शरद पवार (तेव्हा ते इंकाँमध्ये नव्हते), स्व. राजेश पायलट, स्व. माधवराव शिंदे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून हिंसक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते.

हे कधी वाचण्यात आले नव्हते. पवारांबद्दल तुम्ही कदाचित १९९३ च्या दंगलीबद्दल बोलत असणार. १९९३ च्या दंगलीच्या वेळी संरक्षण मंत्री असलेले पवार मुम्बईत राहून दंगल नियंत्रणाचा प्रयत्न करत होते. अर्थात त्याला वेगळी राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. दंगल नियंत्रण हा उद्देश होताच, पण सुधाकर नाईकांना घालविणे हा देखील उद्देश होता. १९९१ साली पवारांनंतर गादीवर आलेल्या नाईकांनी अल्पावधीत अजित पवार, थिटे इ. १२ मंत्र्यांची हकालपट्टी करून कलानी, ठाकुर इ. स्वपक्षाच्या आमदारांना टाडाखाली आत टाकले होते. त्यामुळे त्यांना घालविणे आवश्यक होते. १९९३ च्या दंगलीचा वापर करून त्यांना घालविले होते.

>>> १९९२-९३ मुंबईतील दंगलीमध्ये मुस्लिम वस्ती असणाऱ्या चाळींवर हल्ला झालाच तर प्रत्युत्तर म्हणून गच्च्यांवर मोठाल्या कढयांमध्ये तेल उकळत ठेवले जात असे. सत्ताधारी काँग्रेसचे नेते स्व सुनील दत्त स्वतः तेथे जाऊन मुस्लिम जमावाला शांत करत होते.

हे देखील ऐकिवात नाही.

श्रीरंग_जोशी's picture

2 Jan 2014 - 6:42 am | श्रीरंग_जोशी

माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये शिखांचे शिरकाण सुरू असताना शरद पवार (तेव्हा ते इंकाँमध्ये नव्हते), स्व. राजेश पायलट, स्व. माधवराव शिंदे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून हिंसक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते.

सदर घटनेचे वर्णन शरद पवारांवरील एका पुस्तकात वाचले आहे. दशकभरापूर्वी वाचले असल्याने पुस्तकाचे नेमके शीर्षक व लेखकाचे पूर्ण नाव आठवत नाही. सदर लेखक नाशिकचे पवार आडनावाचे गृहस्थ होते.

१९९२-९३ मुंबईतील दंगलीमध्ये मुस्लिम वस्ती असणाऱ्या चाळींवर हल्ला झालाच तर प्रत्युत्तर म्हणून गच्च्यांवर मोठाल्या कढयांमध्ये तेल उकळत ठेवले जात असे. सत्ताधारी काँग्रेसचे नेते स्व सुनील दत्त स्वतः तेथे जाऊन मुस्लिम जमावाला शांत करत होते.

स्व सुनील दत्त यांचा यांच्या सामाजिक कर्तृत्वाविषयी कुठल्यातरी मराठी वृत्तपत्रात किंवा मासिकात लेख वाचला होता त्यामध्ये याचे वर्णन होते. दुर्दैवाने नेमके कशात व कधी वाचले ते आठवत नाही पण मी टंकलेल्या वर्णनात कसलीही अतिशयोक्ती नाही.

या विषयावर मिपावर पूर्वीही बरीच चर्चा झालेली आहे व मी त्यात भाग घेतला आहे. या विषयावर माझी मते प्रत्यक्ष घटनांच्या काळातील मुद्रित व वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहून तेव्हाच बनली आहेत. दंगलग्रस्तांच्या बाजूने लढताना सेटलवाड वगैरे मंडळींनी अतिरंजित घटना रंगवल्या हे मलाही मान्यच आहे, मी त्या वर्णनांचा कधीही आधार घेतला नाही. सेटलवाड सारख्यांमुळे दंगलग्रस्तांना न्याय मिळण्याऐवजी त्यांची बाजू न्यायालयांत कमकुवत झाली असे निरीक्षण आहे.

या हिंसाचारामध्ये ज्यांनी आपले सर्वस्व गमावले त्यांनी न्यायालयीन लढाई लढणे व यात जिथून मिळेल तिथून मदत घेणे हे नैसर्गिक आहे. झाले गेले गंगेला मिळाले अशी अपेक्षा त्यांच्याकडून करणे चुकीचे आहे. तसेच त्यामागे त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा असेल हा तर्क पटत नाही.

विरोधी पक्षात असणे व सरकारमध्ये असणे यात खूप फरक असायला हवा. मुख्यमंत्री राज्यातील संपूर्ण जनतेचा असतो ठराविक गटांचा नाही. सामाजिक तणावाची अवघड परिस्थिती कशी हाताळावी याचे चांगले उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील युती शासनाचा साडेचार वर्षांचा कार्यकाळ. १९९५ च्या निवडणुकीत युतीबाबत काँग्रेसने पुरेपूर बागुलबुवा निर्माण केला होता. पण प्रत्यक्षात एकही दंगल घडली नाही. सर्वात अवघड परिस्थिती होती १९९७ सालच्या रमाबाई आंबेडकर नगरमधील अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर. पोलिस गोळीबारात १० जणांचा दुर्दैवी मृत्यू होऊनही युती सरकारने संपूर्ण संयमाने कौशल्यपूर्वक परिस्थिती हाताळल्याने राज्यभरात तीव्र आंदोलने होऊनही कुणाचा प्राण गेला नाही. सेनेने नामांतराला विरोध करून फार वर्षे झाली नव्हती तरीही. १९९९ नंतर राज्यात लहानसहान का होईना अनेक दंगली झाल्या, यावरील चर्चेत कुणी युतीच्या या बाबतीतल्या यशस्वी कार्यकाळाचा दाखला दिला की आघाडीचे नेते 'तेव्हा दंगली करणारेच सरकारमध्ये होते' असले पोरकट उत्तर देत.

२००२ मध्ये गुजरातमधील परिस्थिती नियंत्रित करण्यात आलेल्या अपयशाबद्दल कुणी काही बोलले की मोदींचे ठरलेले उत्तर असायचे '५ करोड गुजरातियों की अस्मिता'. यात कसली आली आहे अस्मिता. निरपराध लोकांनी महिनोंमहिने मरत राहावे व कुणी काही म्हटले की संपूर्ण राज्याच्या जनतेची अस्मिता कशी काय दुखावते बुवा. थोडक्यात काय आम्ही शासक असल्याने पाहिजे ते करणार पण कुणी काही टिका केली की राज्याच्या जनतेची अस्मिता दुखावली म्हणून बाऊ करणार.

असो या चर्चेला काही अंत नाही. माझ्या या प्रतिसादातील शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा टंकतो. उत्तर अपेक्षित नाहीये पण प्रत्येकाने स्वतःला विचारावा असा हा प्रश्न आहे.

कल्पना करा, हिंदू अल्पसंख्य असणाऱ्या राज्यातील गैरहिंदू मुख्यमंत्र्याने हिंदूविरुद्धचा या तीव्रतेचा हिंसाचार थोपवला नसता अन नंतर त्या राज्यात विक्रमी विकास केला असता तर आपण त्यास भारताच्या पंतप्रधानपदी बसण्यास खुला पाठिंबा दिला असता का?

विकास's picture

2 Jan 2014 - 7:23 am | विकास

हिंदू अल्पसंख्य असणाऱ्या राज्यातील गैरहिंदू मुख्यमंत्र्याने हिंदूविरुद्धचा या तीव्रतेचा हिंसाचार थोपवला नसता अन नंतर त्या राज्यात विक्रमी विकास केला असता तर आपण त्यास भारताच्या पंतप्रधानपदी बसण्यास खुला पाठिंबा दिला असता का?

हा प्रश्न बरोबर मानायचा असेल तर त्यात खालील अप्रत्यक्ष गृहीतके मान्य करावी लागतील, "गैरहिंदू मुख्यमंत्र्याने हिंदूविरुद्धचा या तीव्रतेचा हिंसाचार थोपवला नसता"

(१)मोदींनी हिंसाचार थांबवला नाही
(२) मोदींनी हिंसाचार मुद्दामून थांबवायचा नव्हता (हे गृहीतक आपल्या इतर मुद्यांवर आधारीत आहे)
(३) मोदींनी जे केले नाही ते इतर दंगलींच्या वेळेस गैरहिंदूत्ववादी मुख्यत्वे काँग्रेसी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी केले होते आणि हिंसचार थोपवला होता.

आता ही गृहीतके मला मान्यच नाहीत. का ते माझ्या लेखात आणि माझ्या आधीच्या सर्वच प्रतिसादांमधे वाचल्यास दिसेल. पण तुम्हाला ही गृहीतके मान्य आहेत का? मला उत्तर मिळाले तर नक्की आवडेल, बळजबरी नाही! :)

आणि तरी देखील माझे तुमच्या प्रश्नास उत्तर

समाजात वावरताना मी धर्माच्या चष्म्यातून काहीच बघत नाही आणि इतरांनी देखील असेच असावे असे माझे म्हणणे आहे. कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात तर धार्मिक, राजकीय अथवा जातीय चष्मा घालून कोणीच बघू नये असे माझे स्पष्ट मत आहे. मुख्यमंत्री / पंतप्रधान हे वैधानीक पद आहे त्याचा धर्म बघू नये. म्हणूनच महाराष्ट्रात अंतुले चालू शकले. गैरहिंदू गव्हर्रनरतर ढिगभर सांगता येतील. आणि म्हणूनच ३० लाख हिंदू पंडीतांना त्रास झाला, लाखो-हजारो हिंदूंना मारले गेले तरी त्या राज्याचे नेते फारूक अब्दुल्ला हे केंद्रात पंतप्रधान झाले नसले तरी दोन्ही बाजूंकडून कॅबिनेट मंत्री होऊ शकलेत.

श्रीरंग_जोशी's picture

2 Jan 2014 - 8:30 am | श्रीरंग_जोशी

मोदींनी जे केले नाही ते इतर दंगलींच्या वेळेस गैरहिंदूत्ववादी मुख्यत्वे काँग्रेसी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी केले होते आणि हिंसाचार थोपवला होता.

२००२ पूर्वीच्या दंगलींच्या वेळी माझे वय बरेच कमी असल्याने त्याबद्दल सविस्तर माहिती नाही. ९२-९३ स्वतःच्याच राज्यात घडल्याने त्याबद्दल वर्षानुवर्षे माध्यमांत चर्चा झाली असल्याने बर्‍यापैकी ठाऊक आहे.

२००२ मध्ये अशा अनेक गोष्टी सहजपणे उपलब्ध होत्या ज्या त्याप्रमाणात पूर्वी नव्हत्या (कारण १९९१ पासून राबवलेले उदारीकरणाचे धोरण) उदा घरोघरी पोचलेले दूरध्वनीचे जाळे, एसटीडी / पिसिओ केंद्रांचे जाळे, भ्रमणध्वनी व आंतरजाल यांची शहरी भागांतील किमान उपलब्धता, डिजीटल कॅमेरे. या सर्वांचा परिणामकारक वापर करून हिंसाचारावर अधिक नियंत्रण ठेवता आले असते अन पोलिसांद्वारे हिंसाचार करणार्‍यांविरुद्ध पुरावे जमा करता आले असते ज्याचा उपयोग न्यायालयीन कारवाईदरम्यान झाला असता.

दुर्दैवाने राज्यसरकारजवळ त्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती नसल्याने काही उपयोग झाला नाही.

याउलट दशकभरानंतर एक दिवसीय उपोषणे करण्याचा दांभिकपणा मात्र पुरेपूर होता.

अर्धवटराव's picture

2 Jan 2014 - 7:48 am | अर्धवटराव

गुजरातमधे जे काहि झालं त्याच्या जखमा विसरता येणं शक्य नाहि. पण ज्या आताताईपणापायी असले कांड होतात, ज्या व्होट बँकेच्या आश्रयला भुलुन राजकीय समर्थन दिलं जातं त्यात तरी कल्याण आहे काय? थोड्याफार प्रमाणात हि कारणं महाराष्ट्रात ज्यांना साडेतीन टक्के म्हटल्या जातं त्यांच्या बाबतीत पण लागु होतात.

थोड्याफार प्रमाणात हि कारणं महाराष्ट्रात ज्यांना साडेतीन टक्के म्हटल्या जातं त्यांच्या बाबतीत पण लागु होतात.

म्हणजे कसं? जरा विस्कटून सांगा की.

पॉलिटिकल विचहंटींग सध्या दोन्ही बाजूने सुरू आहे आणि खरं सांगायचं तर ते अत्यंत कंटाळवाणं आणि बालीश आहे! असो. चालायचंच!

फक्त कंटाळवाणे आणि बालीश?

गांधी हत्येपासून ते गोध्रानंतरच्या दंगली पर्यंत सातत्याने हिंदूत्व हा शब्द आला की पुढार्‍यापासून जनसामान्यापर्यंत त्याच्याशी काही संबंध दिसला तरी विचहंटीग करण्यात आले आहे. ते केवळ बालीश होते का? आधी कधी हे शब्द ऐकले नाहीत हो.. का आता असे उलट विचहंटींग होऊ शकते म्हणल्यावर ते कंटाळवाणे झाले?

प्रदीप's picture

30 Dec 2013 - 6:22 pm | प्रदीप

कुठे व कसले सुरू आहे, ह्याविषयी ऋषिकेशने काही लिहील्यास बरे होईल, कारण मलातरी तसे काही दिसलेले नाही.

बॅटमॅन's picture

30 Dec 2013 - 6:37 pm | बॅटमॅन

खरेय ते, पण फ्याशनपुढे भलेभले काही करू शकत नाहीत हो. चालायचंच.

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2013 - 8:27 pm | श्रीगुरुजी

>>> पॉलिटिकल विचहंटींग सध्या दोन्ही बाजूने सुरू आहे

दुसरी बाजू कोणती?

दुसरीकडून? कुणाकडून? कधी? जरा विदा द्या बरे...

तुमच्यासारख्या हुषार माणसाकडून इतका बिनडोक प्रतिसाद यावा आश्चर्यच !!

काँग्रेसची महती गाणारे, गांधी घराण्याचे स्तुतीपाठक, खंदे काँग्रेसभक्त बगैरे लोकांचे सध्या काही खरे नाही. एक तर आपची लाट नाहीतर मोदींची लाट. अशा लाटेत सोनियानिष्ठ गटांगळ्या खात आहेत. त्यामुळे त्यांना सध्याचे राजकारण बालिश आणि कंटाळवाणे वाटू लागले आहे. स्वाभाविकच आहे.

पॉलिटिकल विचहंटिंगची दुसरी बाजू कोणती? आता संबंधित लोकांनी अर्धवट विधाने करून पळ काढल्यामुळे आपणच अर्थ लावायचा. बहुधा सम्राटपदोत्सुक युबराज आदर्श प्रकरणी ज्या कोलांट्या उड्या मारून आदर्शचा अहवाल पुन्हा विचारात घ्यायला भाग पाडत आहेत त्या प्रकाराविषयी बोलत असावेत असे वाटते. किंवा काँग्रेसने आपला पाठिंबा देऊन आपण भ्रष्टाचार मुक्तीबाबत कसे खंबीर आहोत ते दाखवून दिले ते असेल. अर्थात ह्या दोन्ही बाबतीत काँग्रेसची बाजू इतकी केविलवाणी आणि तकलादू आहे की झाडूने कोळिष्टक झटकावे तसे ह्या मुद्द्यांचे खंडन करता येईल. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन अर्धवट विधाने करुन चर्चेतून सूंबाल्या करणे इतकेच इष्ट आहे हे संबंधित लोकांच्या लक्षात आले असावे.

अर्थात युवराजांचे चाळे हे त्यांच्या तीर्थरूपांच्या वरताण आली लहर केला कहर छापाचे आहेत. त्याला कुठला धरबंध नाही. राजकारणात अनुभव नसल्याने, लायकी नसताना अफाट सत्ता हातात मिळाल्यावर जे दुष्परिणाम होतात ते युवराज प्रात्यक्षिक करुन दाखवत आहेत. महाराष्ट्रातले काँग्रेसी आणि राष्ट्रवादीचे लोक खाजगीत बोलताना ह्या उपद्व्यापी बाळाच्या (महात्यागी) पूर्वजांचा साग्रसंगीत उद्धार करत असतील ह्यात शंकाच नाही!

पहिली गोष्ट काल दुपारी वरील प्रतिक्रीया दिली आणि त्यानंतर वीस तास मिपावर येणे जमले नाही, त्यामुळे प्रतिसाद देता आला नाही याचा अर्थ चर्चेतून पळ काढला आहे, सुंबाल्या केला आहे वगैरे घेतला जात असेल तर कीव करावीशी वाटते.

असो.

हिंदुत्त्व हा शब्द्द उच्चारल्यावर जसे विचहंटिंग होते तसेच सेक्युलॅरिझम शब्द उच्चारल्यावरही होते. नेहरूंची काश्मिरमधील भुमिका, गांधीजींची फाळणीविषयक भुमिका, शीख दंगली, मनमोहन सिंगाचे तशाकथित नाकर्तेपण (ज्याला जालावर तर षंढही म्हटले गेलेले पाहिले आहे) वगैरे अनेक विषयांवर असेच विचहंटिंग होताना दिसले आहे - दिसते आहे.

मात्र हल्ली दोन्ही बाजुने चाललेले विचहंटिंग अतिशय कंटाळवाणे व बालिश झाले आहे. 'पप्पू' काय? 'फेकू' काय? किंवा जरा मागे म्हटले गेलेले 'मौत का सौदागर' काय? कोणत्याही मुद्द्यांशिवाय फक्त पोकळ गुद्द्यांनी चाललेली ही धुळवड अतिशय रोचक आणि जबाबदार/समंजस कोणाला वाटत असेल तर वाटो बापडे! मला तरी हे कंटाळवाणे व बालिश वाटते आहे.

बाळ सप्रे's picture

31 Dec 2013 - 1:19 pm | बाळ सप्रे

मोदीविरोध आणि राहुल गांधी/मनमोहन विरोध अतिशय बालिश आणि कंटाळवाणा झालाय हे खरं..
आता "आप" ला सत्ता मिळाल्यामुळे केजरीवालही अशांचे टारगेट होउ लागलेत..

मुद्द्यांपेक्षा दुसर्‍या पक्षाच्या वजनदार नेत्याचे वस्त्रहरण कसे करता येईल हेच पाहिले जात
मग कुठलेही मुद्दे कुठेहि कधिही कसेही वापरता येतात..

प्रदीप's picture

31 Dec 2013 - 2:11 pm | प्रदीप

'पॉलिटिकल विचहंटींग सध्या दोन्ही बाजूने सुरू आहे'

ह्या 'सध्या'ने माझा गैरसमज झाला.

सध्याही परिस्थिती काही वेगळी नाही. कोणी चुकीनही मोदींबद्दल काही चांगले बोलून पाहिले की मोदींना डागाळायला अहमिका लागते. तसेच मोदी निंदा केली किंवा सरकारी योजनांबद्दल चार चांगले शब्द लिहिले तर लगेच उलट विचहंटिंग सुरू होते.

समांतरः इथेही बघितले असेलच, एका मोदीविरोधी / काँग्रेसविरोधी सोडा न्युट्रल कमेंटमुळेही 'काँग्रेसची महती गाणारे, गांधी घराण्याचे स्तुतीपाठक, खंदे काँग्रेसभक्त' वगैरे लेबले लावणे याहून 'सध्याचे' उदाहरण काय द्यावे? ;)

श्रीगुरुजी's picture

31 Dec 2013 - 4:21 pm | श्रीगुरुजी

>>>> हिंदुत्त्व हा शब्द्द उच्चारल्यावर जसे विचहंटिंग होते तसेच सेक्युलॅरिझम शब्द उच्चारल्यावरही होते. नेहरूंची काश्मिरमधील भुमिका, गांधीजींची फाळणीविषयक भुमिका, शीख दंगली, मनमोहन सिंगाचे तशाकथित नाकर्तेपण (ज्याला जालावर तर षंढही म्हटले गेलेले पाहिले आहे) वगैरे अनेक विषयांवर असेच विचहंटिंग होताना दिसले आहे - दिसते आहे.

विचहंटिंगचा अर्थ राजकीयदृष्ट्या सूड घेणे असा असून प्रत्यक्ष व्यवहारात आपल्या विरोधकांच्या मागे पोलिस चौकशी, न्यायालयाच्या भानगडी लावून देणे, त्यांच्या कायम मागावर राहून त्यांचे भलेबुरे उद्योग शोधून काढणे अशा मार्गाने विचहंटिंग केले जाते.

तुम्ही वर जे लिहिले आहे त्याला राजकीय टीका/निंदा असे संबोधतात. ते विचहंटिंग नव्हे. अशी टीका राजकारणातल्या जवळपास प्रत्येक पुढार्‍यावर होते. त्यातून कोणीही सुटलेला नाही. पण विचहंटिंग जे सुरू आहे ते मुख्यत्वेकरून मोदींच्या बाबतीत सुरू आहे. त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी खटल्यात अडकविण्यासाठी गेली १२ वर्षे अथक प्रयत्न सुरू आहेत. इशरत जहाँ, सोहराबुद्दीन, एहसान जाफरी, स्नूपगेट, गुजरात दंगली इ. प्रकरणात त्यांना अडकविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गुजरात पोलिसदलातील वरीष्ठ अधिकार्‍यांकडून खोटी प्रतिज्ञापत्रे घेणे, स्टिंग ऑपरेशन इ. मार्ग त्यासाठी वापरण्यात येत आहेत. असेच विचहंटिंग केजरीवाल, रामदेवबाबा, जगनमोहन रेड्डी, मारन कुटुंबीय इ. च्या बाबतीत देखील सुरू आहे.

विकास's picture

31 Dec 2013 - 6:23 pm | विकास

पप्पू, फेकू वगैरे खरेच बालीशपणा आहे. केवळ टिका म्हणजे विच हंटींग म्हणाल तर सहमत आणि तुमचा तोच उद्देश असेल याबाबत मला खात्री आहे.

पण पुनरूक्ती टाळत फक्त एकच म्हणतो, की टिस्टा आणि पार्टीने केवळ मोदींचेच नाही तर आधी म्हणल्याप्रमाणे गिल्ट बाय असोसिएशनने कुणाचेही विचहंटींग केले आहे. चर्चेत दिलेले "सोनल शहा" हे पोतडीतले केवळ एक उदाहरण आहे. याहूनही गंभीर गोष्टी केलेल्या आहेत. उद्देश हाच की हिंदूत्व म्हणले की नेस्तनाबूत करायचे (आता त्या सोनल शहाला हिंदूत्व माहीती आहे का नाही हा संबंध नाही, पण गुजरात भूकंपास विहिंपअमेरीकेकडून मदत केली ना मग संपले!) असो.

ऋषिकेश's picture

31 Dec 2013 - 10:25 pm | ऋषिकेश

टिस्टा वगैरे गटाची उपद्रवमूल्य खूपच कमी आहे असे वाटते. ती तावातावाने मुद्दे मांडत असली तरी काही मोजके ट्यार्पीलोलूप पत्रकार सोडल्यास त्या बैंना कोणी हिंग लाऊनही विचारत असेल असे वाटत नाही. आक्रस्ताळेपणा करूनही किंबहुना केल्यानेच त्यांचे दुकान चालते आहे.

बाकी विचहंटिंगची व्याख्या मी एकाच व्यक्तीला टारगेट करून झोडपणे असे करतो. राजकारणात सत्यापेक्षा शेवटी प्रतिमांचा खेळ असल्याने काही प्रमाणात एकमेकांवर टिका चालतेही पण असे पद्धतशीर विचहंटिंग इतके चालले आहे की आता कंटाळा आला आहे. गेले काहि दिवसांत केजरीवाल यांनी चांगले/वाईट काहीही करून दाखवायच्या आधी मुख्यमंत्री होऊन आठवडाही होतोय न होतोय तोवर त्यांच्यावर इतक्या निगेटिव्ह टिपाण्ण्या होत आहेत की त्याला विचहंटिंग का म्हणू नये समजत नैये.

असो. मुद्दा पोचला होताच, फक्त सध्या विशेषतः गेल्या २-३ महिन्यात हे इतके वाढले आहे की त्याचा बरा/वाईट परिणाम होण्याइअवजी कंटाळा व तिडीक येत चालली आहे.

क्लिंटन's picture

1 Jan 2014 - 10:33 am | क्लिंटन

गेले काहि दिवसांत केजरीवाल यांनी चांगले/वाईट काहीही करून दाखवायच्या आधी मुख्यमंत्री होऊन आठवडाही होतोय न होतोय तोवर त्यांच्यावर इतक्या निगेटिव्ह टिपाण्ण्या होत आहेत की त्याला विचहंटिंग का म्हणू नये समजत नैये.

केजरीवालांची जी सबसिड्या द्यायची धोरणे आहेत ती आर्थिकदृष्ट्या अयोग्य आहेत.या सबसिडी संस्कृतीविरोधात मी स्वत: मिपावर कित्येकवेळा लिहिले आहे.सगळ्या लिंका शोधायला जात नाही आणि सबसिड्या वाईट का हा या लेखाचा विषय नाही म्हणून ते इथे लिहितही नाही.समजा केजरीवालांच्या सबसिड्या द्यायच्या धोरणावर एका वर्षाने (एक वर्ष हा कालावधी इथे प्रातिनिधीक म्हणून घेतला आहे) टिका केली तर ते विचहंटिंग नाही आणि एका आठवड्यात टिका केली तर ते विचहंटिंग आहे असे म्हणावे का? की केजरीवाल सत्तेत आल्यानंतर किती काळपर्यंत या मुद्द्यावर टिका केली तर ते विचहंटिंग नाही आणि त्यानंतर ते विचहंटिंग आहे अशी काही लक्ष्मणरेषा आहे का?

दुसरे म्हणजे कोणताही पक्ष जेव्हा आपल्या अजेंड्यातील एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर तडजोड करून सत्तेत येतो तेव्हा त्यावर इतर लोक त्यावर टिका करणारच.अगदी १९९८ च्या भाजपच्या जाहिरनाम्यामध्ये राममंदिर,कलम ३७० आणि समान नागरी कायदा या मुद्यांचा समावेश होता.पण एन.डी.ए सरकार स्थापन करताना हे मुद्दे भाजपने बाजूला ठेवले हे सगळ्यांनाच माहित आहे.वाजपेयींनी शपथ घेतली १९ मार्च १९९८ रोजी तर सरकारसाठीचा National Agenda for Governance प्रसिध्द झाला १७ मार्चला.अगदी त्या दिवसापासून भाजपवर ’आता राम कुठे गेला’ म्हणून टिका होतच होती/आहे.तसेच वाजपेयी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर २७-२८ मार्चला लोकसभेत चर्चा झाली तेव्हाही या कारणावरून सरकारवर टिका करण्यात आली होतीच. इथे केजरीवालांनी सत्तेत येताना ज्या पक्षाला इतक्या शिव्या घातल्या त्याच कॉंग्रेस पक्षाकडून पाठिंबा घेतला तेव्हा त्याकारणावरून इतर त्यांच्यावर अगदी पहिल्या दिवसापासून टिका करणारच. तेव्हा केजरीवाल सत्तेत येऊन किती कालावधी उलटला आहे ही गोष्ट या मुद्द्याच्या बाबतीतही अप्रस्तुत वाटते.

तिसरे म्हणजे केजरीवालांच्या १८ कलमी अजेंड्यातील एक मुद्दा--दिल्लीतील ३०% लोक अनधिकृत वस्त्यांमध्ये राहतात त्या वस्त्या अधिकृत करायच्या हा होता.आता या अनधिकृत वस्त्या मुळात उभ्या कशा राहिल्या, उभ्या राहिल्या तर इतकी वर्षे त्यावर काही कारवाई न होता टिकल्या कशा यात कायद्याची पायमल्ली, भ्रष्टाचार काहीच नव्हता का?आता केजरीवाल त्याच भ्रष्टाचाराला अधिकृत बनविणार का?म्हणजे तुमचा तो भ्रष्टाचार आमचा तो प्रामाणिकपणा असा holier than thou प्रकार आहे का?मग त्या कारणावरून केजरीवालांवर ते सत्तेत येऊन आठवडा पण झाला नाही म्हणून टिका करायची नाही का?आणि तशी टिका केल्यास ते विचहंटिंग ठरणार का? परत एकदा वरचाच प्रश्न:"केजरीवाल सत्तेत आल्यानंतर किती काळपर्यंत या मुद्द्यावर टिका केली तर ते विचहंटिंग नाही आणि त्यानंतर ते विचहंटिंग आहे अशी काही लक्ष्मणरेषा आहे का?"

चौथे म्हणजे कालपरवाच कमाल फारूकी हा वादग्रस्त नेता केजरीवालांना "जाहिरनाम्यावर चर्चा करायला" जाऊन भेटला आणि "सगळ्या जगाला तुम्हाला जॉईन व्हायचे आहे" असे काहीसे बोलून गेला.या नेत्याची पार्श्वभूमी नक्की काय आहे हे आधीच लिहिले आहे.अशा कोणाला एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने "जाहिरनाम्यावर चर्चा करायला" भेटणे यात तुम्हाला काहीच गैर वाटत नाही का? त्याकारणावरून केजरीवालांवर टिका केली तर ते सत्तेत येऊन किती दिवस झाले आहेत याचा संबंध काय?

पाचवे म्हणजे दिल्लीमध्ये केजरीवाल ज्या पक्षाकडून पाठिंबा घेत आहेत तोच पक्ष बिहारमध्ये जर लालूंबरोबर गेला (तसे व्हायची शक्यता आहेत) तर त्यात विसंगती आहे असे म्हणायचे की ’विचहंटिंग’ साठीची लक्ष्मणरेषा असलेली कालमर्यादा पूर्ण न झाल्यामुळे गप्प बसायचे?

असो.

१. सबसिडी ३ महिन्यांसाठी दिली आहे, नंतर पुनरावलोकन आहे वगैरे सोडा, मुळात सबसिडी आर्थिक दृष्ट्या योग्य/अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे. सध्या भारतातील प्रत्येक पक्षाचे सरकार सबसिड्या देत आहे. तेच केजरीवाल यांनी केले तर त्यांना सिंगल आउट करून का झोडपावे? मुळात ते धोरणात्मकरित्या सबसिड्यांच्या विरोधात आहेत असे त्यांनी कधी म्हटले आहे काय?
२. "दुसरे म्हणजे कोणताही पक्ष जेव्हा आपल्या अजेंड्यातील एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर तडजोड करून सत्तेत येतो तेव्हा त्यावर इतर लोक त्यावर टिका करणारच" हे खरे असले तरी भाजपाने आधी "आआप सत्तेपासून पळ काढत आहे असा बोभाटा केला होता. आता सत्ता स्थापन केल्यावर उलट ओरडा चालु आहे" याला एखाद्याला येनकेनप्रकारे झोडपणे म्हटले तर चुकले काय?
३: केजरीवाल जे काही करताहेत त्यांच्या मागे जनमत आहे. लोकांनी निवडून दिलेले सरकार हे करत आहे. भाजपा-शिवसेना सरकारनेही हे केले आहे काँग्रेसनेही हे केले आहे. मात्र केजरीवाल यांनी केल्यावर ओरडा केला जात आहे. मुळात भ्रष्टाचार झाला तेव्हा केजरीवाल यांचे सरकार नव्हते. सत्तेत आल्यावर आम्ही झोपड्या देताना झालेला भ्रष्टाचार निपटू असे वचन त्यांनी दिले नव्हतेच उलट त्या अधिकृत करण्याचे वचन त्यांनी दिले होते. ते त्यांच्या वचनाला जागले तरी ओरडा आणि त्यांनी या झोपड्या अधिकृत समजा उद्या करायला नकार दिला तरी त्यांनी वचनभंग केला म्हणून बोभाटा होईलच!
४, ५: निव्वळ शक्यतांचा आधार घेत एखाद्यावर इतकी टिका करायची तर ती भाजपा व काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांवरही करता यावी. केजरीवालच सिंगल आउट करणे विचहंटिंग नाही का?

बाकी, या सगळ्या प्रकारात दोन गोष्टी होताहेत:
१. केजरीवाल यांना फुकट ट्यार्पी व फोकस मिळतो आहे. जे त्यांच्या पथ्यावरच पडणार आहे.
२. भाजपा आता भ्याली आहे असी इमेज तयार होत आहे. (ते खरे नसेलही, पण जळी स्थळी केजरीवाल त्यांना दिसू लागले आहेत अशी भावना लोकांच्यात तयार होते आहे) जे भाजपालाच घातक आहे आणि आआपला फायद्याचे.

बाकी क्लिंटनः तुम्ही स्वतः विचहंटिंग करत आहात असे मत मी कधीही दिलेले नाही. बहुतांश वेळा तुम्ही मुद्देसुद व सुयोग्य टिकाच करत आला आहात. पण मी म्हणतोय ते तुमच्यापुरते वा मिपापुरते मर्यादित नाही, एकूणच आंतरजालावर बघितले तर अश्या मुद्देसूत प्रतिवादापेक्षा पोकळ गुद्य्यांनीच केजरीवाल यांनाही (मोदींप्रमाणेच) टार्गेट केले जात आहे, जे किमान माझ्यासारख्या मतदाराला तरी विचहंटिंग वाटत आहे.

शेवटी, पॉलिटिक्स इज गेम ऑफ पर्सेप्शन्स. जर आत्मपरिक्षण करण्याऐवजी भाजपाकडून - हे ही विचहंटिंग आहे असे आपले मत, पर्सेप्शन आहे असे सांगणार्‍यालाच- जाब विचारला जात असेल तर आपली इमेज काय होते आहे हे भाजपाला कळेल का असा प्रश्न पडतो. का भाजपाला, काँग्रेसला व/वा इतर पक्षांना पडलेले हे सत्तेचे स्वप्न नर्सिससच्या प्रतिमेप्रमाणे ठरणार आहे ते येता काळ व मतदार ठरवेल हे आपल्या सार्‍यांना मान्य आहेच!

आनन्दा's picture

15 Jan 2014 - 3:25 pm | आनन्दा

केजरीवाल जे काही करताहेत त्यांच्या मागे जनमत आहे. लोकांनी निवडून दिलेले सरकार हे करत आहे. भाजपा-शिवसेना सरकारनेही हे केले आहे काँग्रेसनेही हे केले आहे. मात्र केजरीवाल यांनी केल्यावर ओरडा केला जात आहे

ओक्के.. म्हणजे प्रश्नच मिटला.

हुप्प्या's picture

1 Jan 2014 - 3:34 am | हुप्प्या

पूर्वीचा अनुभव असा नव्हता.

ऊर्वरित जगात युवराजांची पप्पू म्हणून आणि मोदींची फेकू म्हणून संभावना होते हे आपणास कंटाळवाणे होत असेल तर एक समजू शकतो. पण प्रस्तुत लेख आपण वाचला असेल तर त्यात ह्या तथाकथित विशेषणांचा उल्लेखही नाही. अत्यंत मुद्देसूदपणे मोदींच्या सूडबुद्धीने चालवलेल्या बदनामीबद्दल हा लेख आहे. पण आपला पप्पूफेकूचा राग ह्या लेखावर व्यक्त करुन आपण वड्याचे तेल वांग्यावर ओतत आहात असे मला तरी वाटते.
मुळात आपला मोदींविषयी असणारा राग ह्यामुळेच आपली ही असली उथळ प्रतिक्रिया येते आहे असे मला ठामपणे वाटते.

चालायचेच. कुणाला लोकसभेच्या हिवाळी वा उन्हाळी अधिवेशनाचे तपशीलवार वर्णन रसाळ आणि स्फूर्तीदायक वाटते. कुणाला मोदी अग्नीपरीक्षेत उत्तीर्ण झाले तर त्यासंबंधी लिहिणे व वाचणे रोचक वाटते.

बाकी सोनियास्तवन लिहिणार्‍यांनी नि:पक्षपातीपणाचा दावा करणे गंमतीचे वाटते.

पण प्रस्तुत लेख आपण वाचला असेल तर त्यात ह्या तथाकथित विशेषणांचा उल्लेखही नाही.

लेखावर प्रतिक्रीया देताना लेखातील शब्दांचा विशेषणांचाच उल्लेख केला पाहिजे काय?

अत्यंत मुद्देसूदपणे मोदींच्या सूडबुद्धीने चालवलेल्या बदनामीबद्दल हा लेख आहे. पण आपला पप्पूफेकूचा राग ह्या लेखावर व्यक्त करुन आपण वड्याचे तेल वांग्यावर ओतत आहात असे मला तरी वाटते.

मुळात मी माझ्या प्रतिक्रियेत मोदींवर सूडबुद्धीने आरोप होत नाहियेत असे कुठेही म्हटलेले नाही. मुळात तो मुद्दा मला मान्यच आहे! मात्र मराठी आंतरजालावर प्रतिक्रीयांचे अनेक प्रकार आहेत त्यात 'पुरवणी' जोडणारे प्रतिसाद म्हणूनही काही प्रतिसाद असतात याची तुम्हाला कल्पना नसावी. प्रस्तूत चर्चा मी बर्‍याच उशीरा वाचली. तोपर्यंत लेखाच्या विषयावर बरेच काही लिहून झाले होते. पुन्हा तेच किंवा त्याच अंगाने लिहिण्यात मला रूचीही नव्हती आणि वेळही. मात्र या विचहंटिंगमुळे भारतीय राजकारण मुद्द्यांपासून निव्वळ गुद्यांकडे झुकला आहे याचे वैषम्य थोडक्यात मांडले. सध्या केजरीवाल यांच्यावर जी गरळ उधळली जात आहे, किंवा मनमोहनसिंग सोनिया वा राहुलवर वैयक्तिक पातळीवर होणारी शेरेबाजीही तितकीच खेदजनक आहे जितकी मोदींवर मर्यादेबाहेर चाललेली आगपाखड!

बाकी, मला मोदींबद्दल राग आहे हा जावईशोध तुम्ही जिथुन लावला तेथे तुम्हाला तो लखलाभ!

शेवटी, कोणाला काय गमतीचे वाटावे हा ज्याच्या त्याच्या असलेल्या/नसलेल्या बुद्धीचा प्रश्न आहे! तेव्हा असो.

क्लिंटन's picture

1 Jan 2014 - 10:41 am | क्लिंटन

शेवटी, कोणाला काय गमतीचे वाटावे हा ज्याच्या त्याच्या असलेल्या/नसलेल्या बुद्धीचा प्रश्न आहे! तेव्हा असो.

या प्रतिसादातील हा भाग ज्या मिपाकराला उद्देशून आहे त्याच्याशी १००% सहमत आहे/असतो असे अजिबात नाही.तरीही एखाद्याची असलेली/नसलेली बुद्धी यावर टिप्पणी करणे हे राजकारणातील फेकू-पप्पू म्हणणे या प्रकाराला मिसळपाववरील समकक्ष मानावे का?

अशी इतरांच्या बुद्धीमत्तेवर टिप्पणी करणारे काही सन्माननीय मिपाकर आहेत.त्या पंगतीत ऋषिकेशने गेल्यास खरोखरच वाईट वाटेल. असो.

ऋषिकेश's picture

2 Jan 2014 - 9:05 am | ऋषिकेश

सहमत आहे. क्षमस्व!

हाडक्या's picture

31 Dec 2013 - 6:52 pm | हाडक्या

+१ विकासभौ बर्‍यापैकी सहमत.. पण ह्र्षिकेशभौनी वॅलिड्ड मुद्दा मांडलाय.. जल्ला न्यट्रल अशी प्रतिक्रियाच सहन होत नाहीये आजकाल बर्‍याच लोकांना. आजुबाजुला जरा मोदी-विरोध केला की देशद्रोह केल्यासारखं किंवा केजरीवालबद्दल काही विरोधी बोललं की भ्रष्टाचाराला समर्थन केल्यासारखं आततायी वर्तन पाहिलं की असं वाटतं की अशाप्रकारच्या समर्थकांमुळेच या नेत्यांचे जास्त नुकसान होतं आणि मग स्युडो-सेक्युलर किंवा दाम्भिक सामाजिक कार्यकर्ते म्हणवणार्‍यांचे फावते..

(अतिअवांतरः @गुरुजी, तुमचे बरेचसे प्रतिसाद उत्तम असतात परंतु एखाद्या विचारसरणी अथवा नेत्याबद्दल केवळ आणि केवळ समर्थन वा एकच बाजू मांडणे थोडे खटकते.. विकास यांच्या प्रतिक्रियांबद्दल संतुलित म्हणता येते परंतु तुमचे बहुतेक प्रतिसाद एकाच बाजुने आल्यासारखे वाटल्याने आवडले तरी खातरजमेशिवाय स्वीकार्य होत नाहीत.. पण असो.. )

मन१'s picture

1 Jan 2014 - 11:58 pm | मन१

क्लिंटन व विकास ...
आपले प्रतिसाद दिसतात. तांत्रिकदृष्ट्या ते अत्यंत अचूकही असतात.
संदर्भविहीन असे त्यात काही सापडणे कठीण.
एकूणात तुमची भूमिका बर्‍यापैकी प्रो-बीजेपी, निदान प्रो-मोदी दिसते.
तितकी नसली तरी निदान तुम्ही गुजरात-विकास , भारताला उपलब्ध असलेले सध्या खंबीर नेतृत्व म्हणजे मोदी ह्याकडे अंगुलीनिर्देश करता. शिवाय कुठल्या वृत्तपत्रानं कशी खोडसाळ बातमी मोदी किंवा आडवाणी ह्या हार्डलायनर्सना बदनाम करायला दिली हे सांगता.
हे पाहून मोदी (व पूर्वी आडवाणी) हे साधु सत्पुरुष व आत्यंतिक मवाळ वगैरे वाटू लागतात.
प्रेस इतकी लुच्ची वाटू लागते की "आता मला भूक लागली आहे" इतके सरळ विधान जरी ह्या द्वयांनी केले तरी खोडसाळ , प्रो-सेक्युलर, बिकाउ मिडिया "आता मला भूक लागली आहे, म्हणून मी मुस्लिमांना कच्च्चा खाणार आहे" अशी वार्तांकने देतात असे दिसते.
.
.
प्रामाणिक प्रश्न :-
त्यांना हार्ड लायनर्स मानले जाते, ही १००% न्यूज च्यानेल व वृत्तपत्रांची कृपा आहे का?
ह्यांनी खर्रच कधीच काही बोललेलं किंवा जमावाला उत्तेजित करणारं विधान्/कृती केलेलं नाही का?
.
.
अजून एक , फिरुन फिरुन "अमुक अमुक गुन्हा सिद्ध् होउ शकला नाही म्हणून...." वगैरे वगैरे किंवा "खुद्द कोर्टानंही म्हटलय ...." अशा लायनीवरचं तुमच्या लिखाणात दिसतं.
चला, तुम्ही म्हणताय तेही मान्य करुया. कोर्टानंही नि अमुक अमुक समित्यांनीही क्लीन चीट दिली आहे.
पण खुद्द मोदी फ्यान, संघ परिवाराचे समर्थक हे आपसात, खाजगीत काय बोलतात, फेसबुकवर मोदींना धो-धो पाठिंबा का मिळतो हे तुम्हाला दिसत नाहिये का?
नाही, तसं म्हणत नाहिये मी. " विकास करण्याची क्षमता" हा प्रचाराचा नि पाठिंब्याचा एक मुद्दा आहेच हो. त्याला ना नाहिच. पण बहुतांश कडवट (खरंतर हिंसक ) लोकं "मोदीजी मुस्लिमांना गप्प बसवतील. चांगली अद्दल घडवलिये त्यानी एकदा" अशा अर्थांचे स्टेटस अपडेट्स टाकतातच की (अशा टिपिकल फेसबुकीय लिंकामध्ये व गप्पांमध्ये "मुल्लोने ऐसा किया, वैसा किया" अशी बहसह असते.) ! "मोदी हे हिंदु रक्षक व म्हणूनच पर्यायाने मुस्लिम निर्दालक आहेत" हा सेक्युलर का स्यूडोसेक्युलरांनी केलेला प्रचार जसा आहे, तसाच मोदी फ्यान्सनाही त्यांची ती इमेज भावते. त्यांना स्वतःला तीच इमेज वापरुन पुढे येता आले आहे. त्यांच्या इतरत्र भाषणांतूनही हे दिसत नाही काय ?
(जुने भाषण : "हम पाँच हमारे पच्चीस " वगैरे.)
.
.
तस्मात्, मोदी वगैरेंच्या उग्रवादी चेहर्‍याचा मिडियावगैरे उगीच बागुलबुवा करते असे तुम्ही का म्हणता ते नक्की समजत नाही. स्वतः मोदिंना तीच इमेज आधी सोयीची गेली आहे; त्यांनी ती व्यवस्थित वापरली आहे.
.
.
शिवाय काहीही झालं की "८४च्याशीख दंगलीत नाहित का लोकं मारली गेली" हे समोरुन येणार काय आर्ग्युमेंट आहे?
म्हणजे "त्यांनी शंभरेक शीख मारले; आम्हाला पन्नासेक तरी मुस्लिम मारु द्या" (????!!!!) असं काही आर्ग्युमेंट आहे का राव हे?
शिवाय मोदी- बीजेपी समर्थकांकडून वारंवार हे ८४ चे दंगे व बोफोर्स चा उल्लेख होतो.
सलग सहा- साडे सहा वर्षे सत्तेतील प्रमुख भागीदार असताना बीजेपीने ह्यासंदर्बहत नक्की काय केलं ते मात्र फारसं वाचण्यात आलं नाही. त्याबद्दल कुणी अधिक माहिती दिलीत तर बरं होइल. किंवा सध्या त्या केसेस पुढे सरकलेल्या नाहित ह्या निरिक्षणावरून "खरेतर बीजेपीलाही ती प्रकरणे तपासव्यवस्थेमार्फत तडीस नेण्यात रस नाही " असा निष्कर्ष काढला तर काय चूक? (माझी माहिती आपणा इतकी सखोल नाही, जुजबी -सामान्य माहिती व छापील मिडियावर मी अवलंबून आहे. माहितीत दुरुस्ती केल्यास आभारी असेन.)
मी निक्षून पुन्हा सांगतो, विविध वेळी परिचयातील लोकांत कधी हापिसात चहाला किंवा कधी इतरत्र दोन-चार व्यक्ती भेटतात तेव्हा त्यांच्या बोलण्यात मोदिंचे कौतुक असते. ते "गुजरातचा विकास केला" ह्या मुद्द्यावर असतेच, पण "वेळ पडल्यास हा पुन्हा एकदा मुस्लिमांना कापून काढील" ह्याही सुरात असते. "मोदीने काहिच केले नाही, त्याच्यावर विनाकारण आरोप लावला गेलाय; बिचारा प्रामाणिक मोदी" असे खुद्द त्याचे फ्यान म्हणवणारेही म्हणत नाहित.
(तुम्ही म्हणता, पण तुमच्यासारखे लोक मला अत्यल्प वाटतात.)
.
.
तुम्हा मंडळींचा अभ्यास, मुद्दे मांडायची हातोटी ह्याबद्दल विलक्षण कौतुक व आदर आहेच.
अजूनही थोडेफार मुद्दे आहेत. मिपावर परतायला जमले की लिहीन.(साला मिपा अ‍ॅक्सेस मर्यादित झालाय.)
.
.
पुढील भाग विकास व क्लिंटान ह्यांना नाही,. इतर प्रो-बीजेपीवाल्यांना आहे.
"लोकं आता ते विसरुन गेलेत" ह्या मुद्द्याबद्दल आश्चर्य वाटतं.
ह्याचा सरळ अर्थ होतो की "हो केलेत दंगे. मारलेत हजारभर (का शेकडो. जे काही असेल ते) पण त्यात काय एवढं. द्या ना सोडून . आता ज्यानं तुमच्या घरच्यांना जिवंत जाळलं ना, त्यालाच पी एम करुया. तो तुम्हाला नि तुमच्या घरच्यांना छान छान जॉब देइल,. विकास करेल . "
अरे?
काय हे? ?
"ते विसरून जाउया " काय म्हणताय? म्हणजे "ते" काहीतरी घडलय ना?
तपास करा ना. आणि जो कोण असेल त्याला धरा ना.
"सोडून द्या" काय?
जो अगणित निरपराधांच्या म्रुत्यूस व त्याहून अधिकांच्या हलाखीस जबाबदार आहे, त्यास उरलेल्यांचे भले करण्याची क्षमता असेल तरी सत्ता द्यायची का? शिक्षा नको का? अरे काय बोलताय हे??

श्रीरंग_जोशी's picture

2 Jan 2014 - 12:40 am | श्रीरंग_जोशी

मनोबा, या विषयावर इतके विवेकी विचार एवढ्या स्पष्टपणे आंतरजालावर प्रथमच वाचायला मिळाले. याकरिता तुम्हाला दंडवत.

अस्वस्थामा's picture

2 Jan 2014 - 3:27 am | अस्वस्थामा

+१
मनोबा मनातले, अगदी मनातले बोललात..
दंडवत.. :)

मणोबाच्या डेरिंगला आपला एक कडक सलाम!!!!!!!!!!

ऋषिकेश's picture

2 Jan 2014 - 9:03 am | ऋषिकेश

+१ कडक सलाम!

मला वैयक्तिक रित्या विकास यांची विचारधारा बर्‍यापैकी माहितीची आहे. काही तथ्यांवर आधारीत त्यांची मते मी आंजावर आहे तेव्हापासून ठाम आहेत. (किंबहुना समान नागरी कायद्यासारख्या विषयांवर माझी मते बदलायला कुरूदकरांइतकीच विकास यांच्याबरोबरची चर्चा कारणीभूत ठरली आहे). क्लिंटन यांची 'कोणतीही राजकीय भुमिका न मांडता तथ्यांची मांडणी करणारा एक अ‍ॅनलिस्ट' अशी जी भुमिका माझ्या मनात होती ती आता मागे पडत चालली आहे. अजूनही त्यांच्या विधानांमध्ये तथ्ये असतातच पण अनेकदा ती त्यांची राजकीय भुमिका अधोरेखीत करायला उपयुक्त असणारीच असतात. पूर्वीसारखे बहुविध अंगांनी तथ्ये मांडणे कमी झालेय. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा धक्का म्हणा आश्चर्य म्हणा अधिक आहे. असो चालयचेच.. मते म्हटली की बदल होत असतातच ही गृहित विसरता कामा नये.

क्लिंटन's picture

3 Jan 2014 - 10:55 pm | क्लिंटन

क्लिंटन यांची 'कोणतीही राजकीय भुमिका न मांडता तथ्यांची मांडणी करणारा एक अ‍ॅनलिस्ट' अशी जी भुमिका माझ्या मनात होती ती आता मागे पडत चालली आहे.

निवडणुका आणि संबंधित गोष्टींविषयीची माहिती इथे सादर करताना अर्थातच मी एक अ‍ॅनलिस्ट आहे आणि राहणार आहे. कारण त्या विश्लेषणात स्वत:च्या राजकीय मतांना काही स्थान नाही.जे काही आहे ते सगळे आकडेच बोलतात. पण कोणतीही राजकीय भूमिका न मांडता हे वाक्य फारसे समजले नाही.

माझी राजकीय मते बनविताना मी काही गोष्टी विचारात घेत असतो. त्यात आर्थिक धोरण हा एक महत्वाचा मुद्दा असतो.त्याचबरोबर भ्रष्टाचार, परराष्ट्र धोरण, देशाच्या नेतृत्वाने देशाला दिशा दिली पाहिजे, ते खंबीर असावे इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.या गोष्टींचे वेटेज परिस्थितीबरोबर अर्थातच बदलते.म्हणजे अर्थव्यवस्था सांभाळणे हा मुद्दा माझ्यासाठी २००९ आणि २०१४ मध्ये जितका महत्वाचा होता तितकाच १९९९ आणि २००४ मध्ये नक्कीच नव्हता.त्या काळातील परिस्थितीला अनुसरून माझ्या मते जो पक्ष सर्वात योग्य त्या पक्षाला असते. या सगळ्यात माझे मत २००९ मध्ये कॉंग्रेसला होते.कारण त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीत मनमोहन सिंग हे अडवाणींपेक्षा अधिक चांगले पंतप्रधान होतील असे मला वाटले होते. (अन्यथा अडवाणींविषयी माझे मत तसेही चांगले नाही.मागे राजीव गांधींवरच्या मिपावरील चर्चेत मी भाजपला भाजीप (भारतीय जीना पक्ष) म्हटले होते त्यामागे अडवाणींचीच कर्तबगारी होती). आणि आजही जर अडवाणी पंतप्रधानपदाचे उमेदवार असते तर मी भाजपचेच समर्थन केले असते असे मला तरी वाटत नाही.

तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे या सगळ्यात मी राजकीय मते मांडलीच नाहीत हे मला तरी समजावून घेणे अवघड आहे. अर्थातच कोणाचेही अगदी डोळे झाकून समर्थन माझ्या आठवणीत मी जाणूनबुजून तरी केलेले नाही.तेव्हा प्रत्येक वेळा एखाद्या मुद्द्यावरून एखाद्या पक्षाचे समर्थन करताना दुसरी कोणती कमकुवत बाजूपण मी शक्यतो मांडलेली आहे.मोदींच्या माझ्या मते अशा काही बाजू आहेत त्या अजून मांडलेल्या नाहीत पण न्यायालयाने मोदींना सोडले हा मुद्दा लावून धरला म्हणून मी biased झालो असे वाटले असेल कदाचित. असो.

आपले विधान
>> ज्याने तुमच्या घरच्यांना जिवंत जाळले त्यालच पी एम करू या. ......

ह्या विधानाचा अर्थ असा की मोदीने जातीने मुस्लिमांना जिवंत जाळले आहे. हे आपण कशाच्या आधारावर म्हणता? आपल्या आसपास जी चारपाच मंडळी हवे ते अकलेचे तारे तोडतात असे आपण सांगितलेत त्याच्या आधारावर आपण हे विधान करत आहात का? हे अत्यंत बेताल, बिनबुडाचे, बिनडोक विधान आहे.

सदर लेखात एका न्यायालयाने मोदींवर असणारा आरोप की दंगलींना ते थेट जबाबदार होते ह्यातून त्यांची मुक्तता केली आहे ह्याबद्दल आहे असे असताना मोदीने स्वतः मुस्लिमांना जाळल्याचे बेजबाबदार विधान आपण का केले आहे?
आपल्या संपर्कातील नमुने सडक्या मेंदूचे आहेत म्हणून तमाम बीजेपी समर्थक तसे असणार हा निष्कर्ष कसा काढला? बीजेपी ने अधिकृत व्यासपीठावरून तसे म्हटले आहे का?

मी ९/११ चे हल्ले, २६/११ चे हल्ले ह्याचे अत्यंत सडक्या मेंदूतून निघालेले विश्लेषण लोकांच्या तोंडून ऐकले आहे. परंतु त्यावरून ती व्यक्ती ज्या धर्माची, भाषेची, प्रदेशाची आहे तिथले लोक तसाच विचार करतात असा निष्कर्ष मी काढत नाही. आपणही असेच करावे असा अनाहूत सल्ला मी देतो.

विकास's picture

2 Jan 2014 - 5:54 am | विकास

तांत्रिकदृष्ट्या ते अत्यंत अचूकही असतात. संदर्भविहीन असे त्यात काही सापडणे कठीण. एकूणात तुमची भूमिका बर्‍यापैकी प्रो-बीजेपी, निदान प्रो-मोदी दिसते.

मी अचूक प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो का ते माहीत नाही, पण संदर्भाशिवाय मला कुणालाही हार घालायला आवडत नाहीत अथवा कुणावरही प्रहार करायला आवडत नाहीत. म्हणूनच गेल्या (डिसेंबरच्या) महीन्याच्या सुरवातीस सोनीया गांधींच्या कथित संपत्तीविषयी एक धागा चालू झाला होता. त्याला वास्तवीक त्यावेळेस अनेक संदर्भ जालावर होते. पण मुळापर्यंत जाऊन काही तरी गडबड आहे हे येथे सांगितले... कारण संदर्भ... पण जर तुम्हाला माझ्या लेखनात संदर्भ दिसत असले तर ते कुणाच्याही बाजूने आहेत असे कसे म्हणता? पण मग तुम्ही किमान दुसरी बाजू असू शकते इतके देखील ढळढळीत संदर्भ दिसल्यावर मान्य करायला काचकूच का करता? मग त्यावरून तुम्हाला काय अँटी-बीजेपी,अँटीमोदी, डावे, काँग्रेसवाले, नक्की काय म्हणायचे(जसे तुम्ही मला (आणि क्लिंटनला) म्हणत आहात?)

शिवाय कुठल्या वृत्तपत्रानं कशी खोडसाळ बातमी मोदी किंवा आडवाणी ह्या हार्डलायनर्सना बदनाम करायला दिली हे सांगता.
अडवाणींना कधी म्हणले? आणि जर ससंदर्भ मजर कुणाचाही खोडसाळपणा दाखवला असला तर त्यात चूक काय? त्यात कोण हार्डलायनर आणि कोण कणाहीन आहे याचा काहीच संबंध येत नाही...

त्यांना हार्ड लायनर्स मानले जाते, ही १००% न्यूज च्यानेल व वृत्तपत्रांची कृपा आहे का?
माध्यमांपेक्षा त्यातील काही विकाऊ पत्रकारांची आणि टिस्टा सारख्या व्यक्तींची ती करणी आहे. बाकी हार्डलायनर नक्की कशाला म्हणावे ही एक वेगळी चर्चा चालू करा, अधिक इथे विषयांतर न करता तेथे विस्तृत उत्तरे देता येतील.

पण खुद्द मोदी फ्यान, संघ परिवाराचे समर्थक हे आपसात, खाजगीत काय बोलतात, फेसबुकवर मोदींना धो-धो पाठिंबा का मिळतो हे तुम्हाला दिसत नाहिये का?

हे "guiilt by association"चे एकदम चपखल उदाहरण आहे. आधी मोदींना नावे ठेवायची मग कोणी जर कोणी त्यांच्या बाजूने बोलले तर त्यांनापण हार्डलायनर रॅडीकल बोलायचे. आता येथे उलटे... तुम्हाला माहीत असलेले मोदी समर्थक फेसबुकवर आणि खाजगीत वाट्टेल ते बोलतात म्हणून मग मोदी वाईट! आजही मिसरूडही न फुटलेल्या पण संघाचा स्वयंसेवक असलेल्या मुलाला, गांधीहत्येची आठवण करून दिली जाते.... का तर नथूराम हा कधीकाळी (गांधी हत्येच्या अनेक वर्ष आधी) संघात गेला होता. येथे तर काय २००२ म्हणजे फारच आत्त्ताचे झाले!

वास्तवीक मी अनेक मोदी समर्थकांशी बोललेलो आहे. त्यातील अनेकजण संघात सोडा, देवळात पण जात नाहीत.... जे संघातले आहेत त्यांचा देखील राग खोटारडेपणा बद्दल दिसलेला आहे. मुस्लीमांच्या विरोधात तुम्ही म्हणता तसे हिंसक विचार करणारे मी बघितलेले नाहीत.... तरी देखील म्हणतो की माझ सॅपलींग तुमच्या सँपलींगप्रमाणेच मर्यादीत असेल. कारण हिंसक वृत्ती कुठेही दिसू शकते. गेले अनेक वर्षे अमेरीकेत भारतातून आलेले स्युडोसेक्यूलर्स विचारवंत-चळवळ्यांना मी काश्मीरच्या दहशतवाद्यांचे, अथवा नक्षलवाद्यांचे आणि त्यांच्या कृत्यांचे समर्थन करताना ऐकलेले आहे - काही पब्लीक मध्ये तर काही खाजगीत. अरुंधती रॉय सारख्या व्यक्तींबद्दल तर काय बोलावे? पण त्यांना कधी दहशतवादी म्हणले जात नाही अथवा गिल्ट बाय असोसिएशन केली जात नाही.

गोध्रा मध्ये रेल्वेचा डबा जाळला गेला तेंव्हा देखील असेच समर्थन करणारे अनेक राजकीय पुढारी (डावे-समाजवादी) होते. पण ते कधी कोणी बोलत नाही. गोध्रामध्ये आणि नंतर जे काही झाले ते दुर्दैवीच होते. पण त्याचा अपप्रचार करायला टिस्टा आणि तीच्या बोलवत्या धन्यांनी उपयोग केला इतकेच मी सातत्याने (आणि न कंटाळता परत परत) म्हणत आहे. ते देखील संदर्भ देऊन. त्या वेळेस अजून एक शब्दप्रयोग या समाजवाद्यांनी प्रचलात आणला होता हिंदूत्वाची प्रयोगशाळा... म्हणे गुजरात म्हणजे जणू काही मुसलमानांचा कत्तलखानाच केला आहे. पण एकदा का ती दंगल २००२ च्या वेळच्या आटोक्यात आल्यानंतर कितीवेळा दंगली झाल्या अथवा कितीवेळेस अगदी किरकोळ देखील धार्मिकतेवरून गडबडी झाल्या? अगदी अक्षरधाम मंदीरावरील हल्यानंतर देखील एकदा प्रयोगशाळा म्हणल्यावर उपयोग करता आला असता नाही का?

(जुने भाषण : "हम पाँच हमारे पच्चीस " वगैरे.)
मला वाटते ह्या भाषणाची चौकशी करण्याचा अल्पसंख्य आयोगाने प्रयत्न केला होता. पण पुढे काही झालेले नाही. का ते माहीत नाही. पण अशी भाषणेच जर उकरून काढायची असली तर "मौत का सौदागर" च्या संदर्भात आपले काय म्हणणे आहे? ते सांगू शकाल का?

शिवाय काहीही झालं की "८४च्याशीख दंगलीत नाहित का लोकं मारली गेली" हे समोरुन येणार काय आर्ग्युमेंट आहे?

(मुद्दामून का जाणूनबुजून माहीत नाही पण) अतिशय चुकीचे विधान आहे हे. ८४ च्या शिख दंगलीचाच कशाला? माझ्यापुरते म्हणाल तर गांधीहत्येनंतरच्या १९४८च्या दंगलींपासून मी सर्वच संदर्भ देतो. माझे म्हणणे इतकेच आहे की जर नेतृत्व म्हणून अशा वेळेस कोणी कमी पडले असले तर त्या सर्वांना समान न्याय द्यायला हवा ना? का तुम्हाला तसे वाटत नाही? दंगल सुरू होईल अशी काळजी वाटताच गोध्रा प्रसंग घडताच कर्फ्यू लावणारे आणि शिख दंगल सुरू झाल्यावर एकदीड दिवस काही हालचाल न करणारे यातला फरक देखील बघणे महत्वाचे आहे. तसेच दंगलीचे अतिशय चुकीचे समर्थन जेंव्हा when a big tree falls, the earth shakes या शब्दात देशाच्या नेता करतो तेंव्हा मोदींवर आहपखड करणारे का काही बोलले नाहीत? १०००० च्या घरात देशभर शिखांना मारले त्याला कधी हिटलरशाही (pogram) म्हणले गेले नाही की काँग्रेसी प्रयोगशाळा म्हणले गेले नाही.. हा प्रश्न आहे. सिलेक्टीव्ह क्रिटीसिझम हा केवळ बायस्ड असल्याने आणि समोरच्याला लोकशाहीचा गैरवापर करत नेस्तनाबूत करण्याच्या उद्देशाने होत असतो...

हो केलेत दंगे. मारलेत हजारभर (का शेकडो. जे काही असेल ते) पण त्यात काय एवढं. द्या ना सोडून . आता ज्यानं तुमच्या घरच्यांना जिवंत जाळलं ना, त्यालाच पी एम करुया.

अत्यंत आक्षेपार्ह विधान आहे. मोदींनी नक्की दंगल आटोक्यात आणायला काय काय केले आहे हे आता संदर्भासहीत कोर्टात सिद्ध झाले आहे. त्यांच्यावरील आरोप हे बेसलेस असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. तरी देखील तुम्ही तेच आरोप परत परत करत असाल तर तुमच्या उद्देशाबद्द्ल जर शंका घेतली तर काय चूक आहे? माझ्य मूळ लेखाचा उद्देश हा मोदींच्या अथवा भाजपाच्या बाजूने लिहीणे नव्हता (हे तेथे आणि आधी देखील सांगितले आहे) पण अशा राक्षसीकरण करणार्‍या वृत्तींसंदर्भात होता. दुर्दैवाने तुम्ही वरील विधान करून तुम्ही देखील त्यातलेच आहात हे दाखवून दिले आहे असे म्हणावे लागत आहे.

क्लिंटन's picture

2 Jan 2014 - 11:12 am | क्लिंटन

त्यांना हार्ड लायनर्स मानले जाते, ही १००% न्यूज च्यानेल व वृत्तपत्रांची कृपा आहे का?
ह्यांनी खर्रच कधीच काही बोललेलं किंवा जमावाला उत्तेजित करणारं विधान्/कृती केलेलं नाही का?

नक्कीच केले आहे याबद्दल वादच नाही.पण या बाबतीत न्यूज चॅनेलची कृपा अशी की ते एकच बाजू सतत दाखवितात पण दुसरी बाजू दाखवत नाहीत. मोदींना एस.आय.टी ने क्लिन चीट दिली आणि आता गुजरातमधल्या न्यायालयानेही ती ग्राह्य धरली (यावर उच्च-सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जातच आहे/तसे होईलच) पण या महत्वाच्या गोष्टीवर अजून तरी तितक्या प्रमाणावर मिडियामध्ये फोकस नाही हे समजून यायला अवघड नसावे. म्हणजे जर तुम्ही एक बाजू दाखवत असाल तर दुसरी बाजूही तितकीच दाखवा अशी अपेक्षा असेल आणि तसे झाले नाही तर तो पूर्वग्रह आहे असे म्हटले तर त्यात काय चुकले?

याविषयी समांतर उदाहरणे:
१. २००४ मध्ये कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना खुनाच्या प्रकरणात अटक झाली आणि मध्यंतरी त्यांची निर्दोष सुटका झाली. २००४ मध्ये मिडियामध्ये जयेंद्र सरस्वती प्रकरणाचे चर्वितचर्वण किती तास चालू होते आणि निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्या बातमीला किती कव्हरेज मिळाले याविषयीचे निष्कर्ष म्हणाल तर ते गुणोत्तर १००:१ पेक्षाही कमी आहे. मान्य आहे की खुनाची बातमी आणि त्याबद्दल शंकराचार्यांना अटक ही जास्त खळबळ माजविणारी बातमी होती आणि मिडिया अशा बातम्यांवरच चालतो म्हणून त्याची चर्चा जास्त झाली.तरीही आता त्यांची निर्दोष मुक्तता झाली त्यानंतर त्यांच्याकडे जवळपास पूर्ण दुर्लक्ष करणे कितपत समर्थनीय आहे? तसे झाल्यानंतर शंकराचार्यांच्या समर्थकांनी मिडियावर पूर्वग्रहदुषित असल्याचे आरोप केले तर त्यात अजिबात तथ्य नाही असे म्हणायचे का? त्यातही शंकराचार्यांचे समर्थक आणि नरेंद मोदींचे समर्थक यांच्या संख्येत कोणाचे समर्थक जास्त आहेत ही गोष्ट स्पष्ट आहे.त्यामुळे तितक्या जास्त प्रमाणावर आरोप मोदींच्या समर्थकांकडून होणे हे क्रमप्राप्त नाही का?
२. १९९६ मध्ये रमेश किणी हत्या प्रकरणात राज ठाकरे गोवले गेले.त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रांमध्ये रमेश किणी हत्या हाच महाराष्ट्रापुढील एकमेव प्रश्न असल्यासारखे त्यावर लिहिले जात होते (इथे रमेश किणींची हत्या कोणी केली, राज ठाकरे त्यात खरोखरच जबाबदार होते का इत्यादी प्रश्न अवांतर आहेत). त्या हत्येची चौकशी सी.बी.आय करवी करावी ही मागणी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली.पण नंतर सी.बी.आय चौकशीमध्ये राज ठाकरेंविरूध्द आरोप ठेवण्याइतका पुरावा नाही असे निष्पन्न झाले. ही बातमी वर्तमानपत्रात कुठे होती आणि त्याला किती कव्हरेज दिले गेले होते हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. आता या प्रकारावरून राज ठाकरे समर्थकांनी मिडियावर टिका केली तर त्यांचे काय चुकले? (मी राज ठाकरे समर्थक नाही हे इथेच स्पष्ट करतो).

तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे मिडिया या प्रकारात १००% जबाबदार नसला तरी एक मोठी आणि महत्वाची भूमिका वठवतो हे नक्कीच.

एकूणात तुमची भूमिका बर्‍यापैकी प्रो-बीजेपी, निदान प्रो-मोदी दिसते.

याला ऋषिकेशच्या प्रतिसादाला उत्तर देईन (बहुदा आज रात्री किंवा उद्या) त्यात उत्तर देईन. तरीही एक मुद्दा इथेच खालीच मांडत आहे.

पण खुद्द मोदी फ्यान, संघ परिवाराचे समर्थक हे आपसात, खाजगीत काय बोलतात, फेसबुकवर मोदींना धो-धो पाठिंबा का मिळतो हे तुम्हाला दिसत नाहिये का?

इतर लोक मोदींना कोणत्या कारणावरून पाठिंबा देतात यावर माझे काहीही नियंत्रण नाही तस्मात पास.आणि इतर लोक ज्या कारणावरून मोदींना पाठिंबा देतात ते चुकीचे आहे म्हणून मी मोदींना पाठिंबा देऊ नये अशी अपेक्षा करणे योग्य नाही (तुम्ही करत असाल असे म्हणत नाही पण तसे इतर कोणी म्हणत असलेच तर हे आधीच स्पष्ट करतो).

तरीही मी मोदींना पाठिंबा का देतो याचे कारण बरेचसे अर्थशास्त्रीय आहे तसेच एक नेता, एक पंतप्रधान म्हणून कसा असावा याविषयीच्या माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्यात इतरांपेक्षा मोदी अधिक फिट बसतात (म्हणजेच एक पंतप्रधान म्हणून मनमोहन, राहुल, मायावती, मुलायम, ममता, जयललिता, प्रकाश करात, इत्यादींपेक्षा मला मोदी अधिक उजवे वाटतात). शेवटी आपल्या राज्यपध्दतीत आपल्यापुढील पर्याय आहेत त्यापैकी आपल्या मते सर्वात चांगला (किंवा कमी वाईट) पर्याय निवडण्याव्यतिरिक्त आपण फारसे काही करू शकत नाही.त्या दृष्टीने माझा पाठिंबा आज मोदींना आहे. आजही माझ्या अपेक्षांमध्ये मोदींपेक्षा अधिक फिट बसणारा आणि पंतप्रधान व्हायची थोडी तरी शक्यता असलेला नेता पुढे आल्यास त्याला पाठिंबा द्यायला माझी एक मतदार म्हणून अजिबात ना नाही.

मला वाटते की माझा भूमिका मी बर्‍यापैकी स्पष्ट केली आहे. एका उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद मनोबा.

श्रीगुरुजी's picture

2 Jan 2014 - 2:37 pm | श्रीगुरुजी

मनोबांचा प्रतिसाद विकास व क्लिंटन यांना उद्देशून असला तरी त्यात काही जनरल विधाने आहेत. त्यामुळे प्रतिसाद देत आहे.

>>> त्यांना हार्ड लायनर्स मानले जाते, ही १००% न्यूज च्यानेल व वृत्तपत्रांची कृपा आहे का?

हो नक्कीच. ही कल्पना माध्यमांनीच जन्माला घातली आहे. कोणत्याही दोघांची तुलना करताना त्यातून हार्डलायनर्स / सॉफ्टलायनर्स ही कल्पना जन्माला आली. २००४ पर्यंत अडवाणी हार्डलायनर तर वाजपेयी सॉफ्टलायनर होते. आता २०१३ मध्ये अडवाणी सॉफ्टलायनर तर मोदी हार्डलायनर झालेत. मुरली मनोहर जोशी हार्डलायनर तर जसवंतसिंग सॉफ्टलायनर. बाळासाहेब ठाकरे हार्डलायनर तर उद्धव सॉफ्टलायनर ... अशा कल्पना माध्यमांनीच रंगविलेल्या आहेत.

>>> ह्यांनी खर्रच कधीच काही बोललेलं किंवा जमावाला उत्तेजित करणारं विधान्/कृती केलेलं नाही का?

मोदी किंवा अडवाणी यांनी अशी काही विधाने केलेली नाहीत किंवा जमावाला उत्तेजितही केलेलं नाही. २००२ च्या दंगलीत मोदींविरूद्ध उठविलेलं वाक्य, "प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच", हे खोटं होतं. असं वाक्य मोदींनी कधीही उच्चारलेलं नव्हतं हे नुकत्याच दिलेल्या न्यायपत्रात न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. याउलट मोदींनी जे वाक्य म्हटलं होतं, "आम्हाला क्रिया व प्रतिक्रिया दोन्ही नको आहेत" हे वाक्य माध्यमांनी कधीही चर्चेत आणलं नाही.

.

>>> पण खुद्द मोदी फ्यान, संघ परिवाराचे समर्थक हे आपसात, खाजगीत काय बोलतात, फेसबुकवर मोदींना धो-धो पाठिंबा का मिळतो हे तुम्हाला दिसत नाहिये का?

आपल्या फॅन्सनी, समर्थकांनी खाजगीत काय बोलावं किंवा फेसबुकवर पाठिंबा मिळवावा हे मोदींच्या नियंत्रणात नाही. खाजगीत सोडा, ब्रिगेडी समर्थक उघडउघड ब्राह्मणांवर विरूद्ध लिहितात आणि त्यांच्याविरूद्ध फारसे कोणी बोलत नाही.

>>> नाही, तसं म्हणत नाहिये मी. " विकास करण्याची क्षमता" हा प्रचाराचा नि पाठिंब्याचा एक मुद्दा आहेच हो. त्याला ना नाहिच. पण बहुतांश कडवट (खरंतर हिंसक ) लोकं "मोदीजी मुस्लिमांना गप्प बसवतील. चांगली अद्दल घडवलिये त्यानी एकदा" अशा अर्थांचे स्टेटस अपडेट्स टाकतातच की (अशा टिपिकल फेसबुकीय लिंकामध्ये व गप्पांमध्ये "मुल्लोने ऐसा किया, वैसा किया" अशी बहसह असते.) ! "मोदी हे हिंदु रक्षक व म्हणूनच पर्यायाने मुस्लिम निर्दालक आहेत" हा सेक्युलर का स्यूडोसेक्युलरांनी केलेला प्रचार जसा आहे, तसाच मोदी फ्यान्सनाही त्यांची ती इमेज भावते. त्यांना स्वतःला तीच इमेज वापरुन पुढे येता आले आहे. त्यांच्या इतरत्र भाषणांतूनही हे दिसत नाही काय ?
(जुने भाषण : "हम पाँच हमारे पच्चीस " वगैरे.)

या सर्व गोष्टींवर मोदींचे नियंत्रण नाही.

.

.

>>> तस्मात्, मोदी वगैरेंच्या उग्रवादी चेहर्‍याचा मिडियावगैरे उगीच बागुलबुवा करते असे तुम्ही का म्हणता ते नक्की समजत नाही. स्वतः मोदिंना तीच इमेज आधी सोयीची गेली आहे; त्यांनी ती व्यवस्थित वापरली आहे.

हा उग्रवादी चेहरा नक्की काय आहे? तो उग्रवादी आहे का समन्वयवादी आहे हे कोणी ठरविले. गेली अनेक वर्षे मोदी सभेतून विकासाबद्दल बोलतात. त्याबरोबरीने भ्रष्टाचार व भारत चीन व पाकिस्तानसमोर कायमच नांगी टाकतो याबद्दल बोलतात. लाच देणार नाही व कोणाला लाच घेऊ देणार नाही अशा त्यांच्या घोषणा असतात. अल्पसंख्य या नावाखाली विशेष सवलती द्यायला त्यांचा विरोध आहे. गुजरात मध्ये गुजराती आहे, अल्पसंख्य किंवा बहुसंख्य असे कोणीही नाही असे ते सांगतात. यातल्या कोणत्या गोष्टी उग्रवाद दर्शवितात?

.
.

>>> शिवाय काहीही झालं की "८४च्याशीख दंगलीत नाहित का लोकं मारली गेली" हे समोरुन येणार काय आर्ग्युमेंट आहे?
म्हणजे "त्यांनी शंभरेक शीख मारले; आम्हाला पन्नासेक तरी मुस्लिम मारु द्या" (????!!!!) असं काही आर्ग्युमेंट आहे का राव हे?
शिवाय मोदी- बीजेपी समर्थकांकडून वारंवार हे ८४ चे दंगे व बोफोर्स चा उल्लेख होतो.

त्याचं मुख्य कारण असं आहे की १९४७ पासून २०१३ पर्यंत भारतात असंख्य दंगली झाल्या. पण फक्त २००२ च्या दंगलीवरूनच मोदींना झोडपण्यात येते. इतर कोणत्याही दंगलीबद्दल कोणालाही जबाबदार धरले जात नाही. असे करण्यात काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे आपसूक १९८४ च्या दंगलीचा उल्लेख येणारच. आणि मुख्य फरक हा आहे की २००२ च्या दंगलीसंदर्भात अनेक खटले चालून काही जणांना शिक्षा झालेली आहे. परंतु १९८४ च्या दंगलीतील एकालाही आजवर शिक्षा झालेली नाही.

>>> मी निक्षून पुन्हा सांगतो, विविध वेळी परिचयातील लोकांत कधी हापिसात चहाला किंवा कधी इतरत्र दोन-चार व्यक्ती भेटतात तेव्हा त्यांच्या बोलण्यात मोदिंचे कौतुक असते. ते "गुजरातचा विकास केला" ह्या मुद्द्यावर असतेच, पण "वेळ पडल्यास हा पुन्हा एकदा मुस्लिमांना कापून काढील" ह्याही सुरात असते.

असे जे बोलतात त्यांच्यावर मोदींचे नियंत्रण नाही.

>>> "मोदीने काहिच केले नाही, त्याच्यावर विनाकारण आरोप लावला गेलाय; बिचारा प्रामाणिक मोदी" असे खुद्द त्याचे फ्यान म्हणवणारेही म्हणत नाहित.
(तुम्ही म्हणता, पण तुमच्यासारखे लोक मला अत्यल्प वाटतात.)

विनाकारण आरोप लावले गेले आहेत हे सत्य आहे. मोदींनी दंगल वाढविली, मोदींनी कत्तली केल्या, मोदी म्हणजे नरसंहार करणारा नरराक्षस, हिटलर, इदी अमीन, मौत का सौदागर, भस्मासुर इ. अनेक विशेषणांनी मोदींचे वर्णन केले जाते. मोदींनी स्वत: दंगलीला प्रोत्साहन दिले व दंगल थांबविण्याकडे दुर्लक्ष केले असे तद्दन खोटे आरोप केले जातात. आजतगायत एकाही खटल्यात हे सिद्ध झालेले नाही. दंगल काळात पहिल्या दिवशीच मोदींनी दंगल नियंत्रणासाठी लष्कर बोलाविले होते. ज्याला दंगल वाढवायची आहे तो लष्कर कशाला बोलवेल? दंगल नियंत्रणासाठी पोलिसांनी गोळीबाराच्या एकूण १६००० हून अधिक फैरी झाडल्याची अधिकृत नोंद आहे. जर पोलिसांना दंगल थांबवायची नव्हती तर ते कशाला गोळीबार करतील? यावर असे उत्तर येईल की त्यांना मुस्लिमांना मारायचे होते म्हणून. पण दंगलीत जसे मुस्लिम गेले तसे त्यातील एक तृतीयांश गेलेले हिंदू आहेत. त्यामुळे हाही दावा खोटा ठरतो. लष्कराला पाचारण करणे, पोलिसांनी दंगलनियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात गोळीबार करणे, दंगलीत दोन्ही धर्मांच्या लोकांचे मृत्यु होणे इ. गोष्टी हे सिद्ध करतात की दंगल एकतर्फी नव्हती व दंगल नियंत्रणासाठी पहिल्या दिवसापासून सरकारने प्रयत्न केले होते. "हिंदूना त्यांचा राग व्यक्त करू द्या" असे मोदींनी पोलिसांना सांगितले, "क्रियेविरूद्ध प्रतिक्रिया होणारच" असे मोदी म्हणाले अशा अफवा मुद्दाम पसरवल्या गेल्या. मोदींनी गोध्रा जळीतातील मृतदेह मुद्दाम दंगल होण्यासाठी अहमदाबादमध्ये आणले असाही आरोप केला जातो. पण, मृतातील अनेकजण अहमदाबादचे रहिवासी असल्यामुळे तिथे मृतदेह नेणे योग्य होते असे न्यायाधीशांनीच निकालपत्रात म्हटलेले आहे. एकंदरीत मोदींविरूद्ध मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला गेला हे सत्य आहे.

>>> पुढील भाग विकास व क्लिंटान ह्यांना नाही,. इतर प्रो-बीजेपीवाल्यांना आहे.
"लोकं आता ते विसरुन गेलेत" ह्या मुद्द्याबद्दल आश्चर्य वाटतं.

यात आश्चर्य काहीच नाही. दंगली ज्यांनी केल्या त्यांच्याविरूद्ध खटले सुरू आहेत, काहींना शिक्षा झाली आहे. असे असताना देखील फक्त दंगल हा एकच मुद्दा घेऊन मोदींविरूद्ध खोटे आरोप करणे सुरू आहे. मोदीविरोधकांना काहीही करून हा मुद्दा जिवंत ठेवून लोकांच्या भावना भडकत ठेवायच्या आहेत. हे सगळे आता थांबविले पाहिजे.

>>> ह्याचा सरळ अर्थ होतो की "हो केलेत दंगे. मारलेत हजारभर (का शेकडो. जे काही असेल ते) पण त्यात काय एवढं. द्या ना सोडून . आता ज्यानं तुमच्या घरच्यांना जिवंत जाळलं ना, त्यालाच पी एम करुया. तो तुम्हाला नि तुमच्या घरच्यांना छान छान जॉब देइल,. विकास करेल . "
अरे?

मोदींनी कत्तली केल्या किंवा ते दंगलीसाठी प्रत्यक्ष जबाबदार आहेत असे तुम्ही ठामपणे मनाशी गृहीत धरले आहे. आजतगायत हे आरोप खोटे ठरले आहेत.

>>> काय हे? ?"ते विसरून जाउया " काय म्हणताय? म्हणजे "ते" काहीतरी घडलय ना?
तपास करा ना. आणि जो कोण असेल त्याला धरा ना. "सोडून द्या" काय?

जे जबाबदार होते त्यांना धरले आहेच ना? बाबू बजरंगी सारख्यांना शिक्षा देखील झाली आहे. इतर खटले सुरू आहेत. कोणालाच सोडले गेले नाही. पण तुमची मनोमन इच्छा आहे की प्रत्यक्ष मोदींना धरून त्यांना शिक्षा व्हायला हवी. ते जर दोषी असतील तर ते सापडतील व त्यांना शिक्षा होईलच. त्यांना अडकविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेतच.

>>>> जो अगणित निरपराधांच्या म्रुत्यूस व त्याहून अधिकांच्या हलाखीस जबाबदार आहे, त्यास उरलेल्यांचे भले करण्याची क्षमता असेल तरी सत्ता द्यायची का? शिक्षा नको का? अरे काय बोलताय हे??

दंगलीला मोदी प्रत्यक्ष जबाबदार आहेत असा ठाम समज करून घेतल्याने तुम्ही असे लिहीत आहात. निदान न्यायालयावर तरी विश्वास ठेवा.

एकंदरीत मोदींविरूद्ध गेल्या १२ वर्षात किती विषारी व एकतर्फी प्रचार केला गेला आहे याचे उत्तम उदाहरण इथे आहे. न्यायालय व गुजरात व देशातील जनतेने ज्यांना दोषी मानलेले नाही, ते दोषी आहेतच अशा ठाम गृहितकावर हा प्रचार आधारित आहे.

ग्रेटथिन्कर's picture

2 Jan 2014 - 2:54 pm | ग्रेटथिन्कर

गुरुजी ,तूमी कितीही मोदीचा प्रचार केलात तरीही 2014ला ते पीएम बनणार नाहीत, केजरीवाल नामक वादळाने या मोदींना मीडीयामधून कधिच बाहेर फेकून दिले आहे. गुजरातच्या तथाकथित विकासाची तूलना आता दिल्लीच्या प्रत्यक्ष विकासाशी होईल तेव्हा मोदींना फेकू का म्हणतात ते लोकांना समजेल.

त्यांच्यावर मोदींचे नियंत्रण नाही

हे खरेच, पण अनेकांच्या मते मोदी हिंदुहृदयसम्राट आहेत, अनेकांच्या मते तेच हिंदू धर्म वाचवू शकतात (म्हणजे काय तेच जाणे पण ते असो), त्या अनेक भाजपा समर्थकांचे असे मत बनण्यासाठी मोदींनी काहीच केलेले नाही (समर्थक काय आपली मते असत्यावर आधारून काहीही बनवतात) असे तुमचे खरच मत आहे का?

क्लिंटन's picture

2 Jan 2014 - 5:10 pm | क्लिंटन

पण अनेकांच्या मते मोदी हिंदुहृदयसम्राट आहेत, अनेकांच्या मते तेच हिंदू धर्म वाचवू शकतात (म्हणजे काय तेच जाणे पण ते असो), त्या अनेक भाजपा समर्थकांचे असे मत बनण्यासाठी मोदींनी काहीच केलेले नाही (समर्थक काय आपली मते असत्यावर आधारून काहीही बनवतात) असे तुमचे खरच मत आहे का?

अनेकदा समर्थकांच्या आपल्या नेत्याकडून अवास्तव अपेक्षा असतात आणि त्या अवास्तव अपेक्षा बनवायला कधी ते स्वतः कारणीभूत असतात तर कधी परिस्थिती कारणीभूत असते. १९७१ चे युध्द जिंकल्यानंतर इंदिरा गांधींकडून समर्थकांच्या (आणि सगळ्यांच्याच) अपेक्षा अतोनात वाढल्या आणि अर्थातच त्या अपेक्षा पूर्ण करणे त्यांना काय कोणत्याही नेत्याला शक्य झाले नसते.इंदिरा गांधीं नंतरच्या काळात ज्या वेगाने बदनाम झाल्या त्यामागे १९७१ च्या युध्दानंतर त्यांच्याकडून लोकांच्या गगनाला भिडलेल्या अपेक्षा होत्या असे मला वाटते. नाहीतर महागाई, दुष्काळ, भ्रष्टाचार या गोष्टी १९६० च्या दशकात किंवा पूर्वी नव्हत्या असे नाही पण इंदिरा गांधी या प्रश्नांना उत्तर कसे शोधू शकत नाहीत ही लोकांची निराशा--युध्दातील विजयाच्या पार्श्वभूमीवर ही निराशा अधिक होती (आणि अर्थातच जेपींचे नेतृत्व) या गोष्टी पुढे जे काही झाल्या त्याला कारणीभूत होत्या असेही मला वाटते.

काँग्रेसचा २०१४ मध्ये पराभव झाल्यास त्याला महागाई आणि भ्रष्टाचार बर्‍याच अंशी जबाबदार असेल हे नाकारता येणार नाहीच.पण मग एक अर्थशास्त्रज्ञ देशाची अर्थव्यवस्था चांगली चालवेल (सामान्य लोकांच्या दृष्टीने किंमती नियंत्रणात ठेवेल) या आशेने २००९ मध्ये लोकांनी काँग्रेसला मते दिली त्यात पंतप्रधान मनमोहन सिंगांची प्रतिमा हा मुद्दा मोठा होता हे पण कोणी नाकारू शकत नाही.पण नेमके तिथेच पंतप्रधान कमी पडले आहेत असे लोकांपुढे चित्र उभे राहिले आहे/राहत आहे.तेव्हा २०१४ मध्ये काँग्रेसचा दणकून पराभव झाल्यास २००९ मध्ये लोकांच्या मनमोहन सिंगांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न होणे हे कारण नक्कीच असेल असे मला वाटते.आता या वाढलेल्या अपेक्षा कुठून निर्माण झाल्या? त्या वाढविण्यात खुद्द पंतप्रधान किंवा काँग्रेसच्या इतर नेत्यांनी काही जाणूनबुजून प्रयत्न केल्याचे माझ्या तरी लक्षात आलेले नाही.तरीही मनमोहन सिंगांचे जागतिक ख्यातीचे अर्थतज्ञ असणे हाच मुद्दा (विशेषतः २००९ च्या परिस्थितीत) लोकांच्या दृष्टीने त्यांचा मोठा प्लस पॉईंट ठरला आणि तोच मुद्दा २०१४ मध्ये एक लाएबिलिटी ठरणार असे आताचे चित्र आहे.

तेव्हा गुजरात दंगलींमुळे मोदींच्या समर्थकांचे ते हिंदू धर्माला "यवनांपासून" वाचवतील वगैरे अपेक्षा झाल्या असल्या तर समर्थकांना तसे वाटणे ही गोष्ट मोदींच्या हातात आहे असे वाटत नाही.तसेच मोदींचा दंगलीमध्ये हात आहे यासाठी खुद्द न्यायालयाला पुरावा सापडलेला नाही हाच या लेखाचा एक मूळ मुद्दा आहे.तेव्हा २००२ मधला प्रकार मोदींनी स्वतः केला नसला तरी त्यांच्या समर्थकांना तो मोदींनी केला असे वाटत असेल तर त्याला मोदी तरी काय करणार?

काही अंशी विरोधी पक्षातल्या नेत्याला आपल्याविषयीच्या अपेक्षा वाढविणे गरजेचे असते.पण सत्तेत आल्यावर त्या पूर्ण करता आल्या नाहीत तर मात्र ज्या वेगाने लोकांचा पाठिंबा आधी मिळाला होत्या त्याच्या दुप्पट वेगाने तो खाली जातो याचे भान त्या नेत्याने आणि त्याच्या समर्थकांनी ठेवायला हवे आणि लोकांच्या अपेक्षा तितपतच वाढवाव्यात असे मला वाटते.

असो.

ऋषिकेश's picture

2 Jan 2014 - 5:36 pm | ऋषिकेश

जनरलाइज्ड निरिक्षण म्हणून नक्कीच पटण्यासारखे आहे. प्रतिसाद अतिशय आवडला देखील.

तरी

तरी मोदींना हे किती लागु आहे साशंक आहे. त्यांनी आपली ही प्रतिमा पुसायचा फारसा प्रयत्न केलेला नाही. जो थोडा केला त्याला यश आलेले नाही. कारण ही प्रतिमा त्यांना सोयीस्कर आहे किंवा ही प्रतिमा नसून काही अंशी खरेच आहे. कल्पना नाही.

मोदींची दंगलीत सक्रीय भुमिका नाही हे मलाही बर्‍यापैकी पटलेले आहे. ते निष्क्रीय राहिले हा आरोपही बर्‍याच प्रमाणात अमान्य करण्यास पात्र वाटतो. मात्र त्यांची सहानुभुती दंगलकर्त्यांच्या बाजूने नव्हती किमान ज्यांच्यावर हल्ले होत होते त्यांच्या बाजुने होती हे मात्र काही केल्या पटत नाही.

तेव्हा मोदींच्या बाबतीत या विषयी मनात जो किंतू आहे तो निव्वळ उरलेल्या पुराव्याने जाईलसे वाटत नाही.

(अर्थात हिंदुत्त्वाबद्दलची प्रतिमा हा माझ्यासाठी त्यांच्या विरुद्धाचा फारसा मुद्दा नाही किंवा माझा त्याला मोठा आक्षेपही नाही. माझे मोदींबद्दलचे आक्षेप वेगळेच आहेत. त्याची कारणे इथे अगदीच अवांतर होतील म्हणून खरडीत)

क्लिंटन's picture

3 Jan 2014 - 10:36 pm | क्लिंटन

त्यांनी आपली ही प्रतिमा पुसायचा फारसा प्रयत्न केलेला नाही. जो थोडा केला त्याला यश आलेले नाही.

आजच्या पत्रकार परिषदेत स्वतः पंतप्रधानांनी एस.आय.टी चा अहवाल आणि न्यायालयाचा निर्णय या दोन्ही गोष्टींना फाट्यावर मारून म्हटले की जो मनुष्य अहमदाबादच्या रस्त्यांवर कत्तलींसाठी जबाबदार आहे तो पंतप्रधान झाल्यास ते एक मोढे संकट ठरेल असे म्हटले . जेव्हा पंतप्रधानांसारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तीही न्यायालयाचा आदेश काहीही असला तरी मोदी दोषीच हा हेका लावते त्यावरून मोदींनी प्रतिमा सुधारायचा कितीही प्रयत्न केला तरी तरी त्याचा उपयोग होणे नाही. याच चर्चेत त्याची प्रचिती येत आहे. आम्ही म्हणतो म्हणून मोदी दोषी मग कायदा काहीही बोलू दे, न्यायालय काहीही सांगू दे अशा पध्दतीचा दृष्टीकोन दिसत आहे. असे असेल तर अशा तथाकथित रंगसफेदीचा काय उपयोग आणि ती करावी तरी कशाला?

तेव्हा मोदींच्या बाबतीत या विषयी मनात जो किंतू आहे तो निव्वळ उरलेल्या पुराव्याने जाईलसे वाटत नाही.

ही पूर्णपणे वैयक्तिक गोष्ट झाली.

असो.

पैसा's picture

3 Jan 2014 - 11:05 pm | पैसा

पंतप्रधानांकडून असे वक्तव्य यावे हे अत्यंत दुर्दैवी आहे. टीव्हीवर पाहिले तेव्हा मनमोहन सिंग असे बोलले यावर विश्वास बसेना. साक्षात पंतप्रधानांचा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही असं म्हणावं का?

ग्रेटथिन्कर's picture

3 Jan 2014 - 11:32 pm | ग्रेटथिन्कर

बोफोर्समधून राजीव गांधींना क्लीन चीट मिळाली... तरीही त्यांच्या नावाने बीजेपी शंख करतच असते. तेव्हा त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नसतो काय?

गब्रिएल's picture

4 Jan 2014 - 12:14 am | गब्रिएल

लै फरक है बाप्पा !!! उलिसं थिंकीग पुरंल बगा.

त्येचं आसं हाय बगा,राजीवच्या बाजूला शिबिआय आनि कायकाय म्होट्टी फौज उभि व्हती सगला व्येवार आनि तो उगड करायला लागलेल्या कोनालाबी गाडून टाकायला. तित पर्देशातल्या कोर्टानं काय म्हनलय ते तुमच्या सार्की चार बुक शिकलेली आणि (गैर)विचार करू शकनारी मान्स वाचतात आनि विसारतात. पन आमी हावो अडानी आमालाबी त्ये कळ्तं थोड थोड पेप्रातबिप्रात आनि टिविबिविवर.

तेच्याउप्पर ते मोदीच्या मागं लैच झेंगटं लावून र्‍हायले बाईचं सर्कार ग्येल्या १०-१२ वर्षात. शिबिआय काय, येसायटी काय, हजार खटले काय, तिस्तासारकी पाळलेली लोकं काय, कोर्ट बदलून बी बगली, काय काय म्हंता काय कमी नाय केलं सर्कार्नं. पन दर कोर्टानं मोदीच्याच बाजूनं निकाल दिला ! (साली भार्तातली कोर्टंबी शिबिआय सार्की सर्कार्च्या पाटाखाल्ची मांजरं होयाला पायजे व्हती, नाय काय? सोडा जालं. लोकांनी मागच्या येळे सारकाच येडेपना करून निवडून आनलं तर फुडच्या पंचवार्षिक योजनेत कोर्टांचा चाम्गला निकाल लावू, कसं?)

लई ड्वास्क नाय लागत भौ यातला फरक समजाला. फकस्त डोस्क्याचा उपेग आपल्या न्येत्याच्या पायावर ठेवन्याबिगर थिंकिंगला क्येला की जमतय बगा, कसं?

श्रीगुरुजी's picture

4 Jan 2014 - 1:18 pm | श्रीगुरुजी

>>> पंतप्रधानांकडून असे वक्तव्य यावे हे अत्यंत दुर्दैवी आहे. टीव्हीवर पाहिले तेव्हा मनमोहन सिंग असे बोलले यावर विश्वास बसेना. साक्षात पंतप्रधानांचा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही असं म्हणावं का?

पंतप्रधान असे बोलले यात अजिबात आश्चर्य वाटले नाही. तेही दिग्विजय इतकेच वाचाळ आहेत, फक्त त्यांच्या वाचाळतेची फ्री॑क्वेन्सी कमी आहे. दुसर्‍या एका धाग्यावर त्यांच्या वाचाळतेची अनेक उदाहरणे मी दिली होती. एकतर ते क्वचितच बोलतात आणि जेव्हा बोलतात तेव्हा काहीतरी विचित्र बोलून फजिती करून घेतात.

उदा. "१९८४ मधील शिखांविरूद्धच्या दंगलीत रा.स्व.संघाचा हात होता"
"या देशातील साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा, विशेषतः मुस्लिमांचा, प्रथम हक्क आहे"
"ऑस्ट्रेलियात त्या मुस्लिम युवकाला दहशतवादाच्या आरोपावरून पकडल्याचे समजल्यावर मी रात्रभर झोपू शकलो नाही"

वरील प्रत्येक विधानावर त्यांच्यवर जोरदार टीका झाली होती. काहीतरी निराधार, विचित्र विधाने करणे हे त्यांना नवीन नाही.

विकास's picture

2 Jan 2014 - 6:35 pm | विकास

क्लिंटनने केलेल्या उहापोहात (ज्याच्याशी सहमत आहे) किंचित अधिक भर... (केवळ चर्चा म्हणून :) )

माझ्या मते मोदी ह्यांना हिंदूहृदयसम्राट वगैरे म्हणणे हे त्यांनी स्वत केले नाही. त्यांच्यातल्या काही जणांना त्यामुळे बाळासाहेबांशी (आणि पर्यायाने त्यांच्या लोकप्रियतेशी) स्पर्धा करणे शक्य होईल असे वाटल्याने तसे म्हणले गेले असावे. अशा उपाधी ह्या पब्लीक (अथवा समर्थक) देत असतात. संघाने इंदीराजींना बांग्लामुक्तीच्या वेळेच्या त्यांच्या कर्तुत्वास पाहून दुर्गा म्हणले होते. लोकमान्य, महात्मा, आचार्य, स्वातंत्र्यवीर वगैरे तर उपाध्या माहीतच असतील. अवांतर: गंमत म्हणजे, सावरकरांनी अत्र्यांना आचार्य ही उपाधी दिली. त्याच्या आधी कधीतरी अत्र्यांनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी दिली आणि नंतर दुसर्‍या महायुद्धाच्या काळात सावरकर जेंव्हा सैन्यभरतीस प्रोत्साहन देऊ लागले, तेंव्हा तेच अत्रे म्हणाले, "हा कसला स्वातंत्र्यवीर, हा तर रीक्रूटवीर!" :) (अर्थात नंतर अत्र्यांना जेंव्हा सावरकरांच्या या प्रोत्साहनातला खरा उद्देश समजला तेंव्हा त्यांनी स्वतःची चूक मान्य देखील केली!)

जर मोदींच्या आत्तापर्यंतच्या राज्यकारभारातील गुजरात दंगल वजा केली तर त्यांच्यावर केवळ हिंदूंचे म्हणावेत असे त्यांनी नक्की काय काय केले आहे असे म्हणता येईल? मला पटकन वाटणार्‍या दोन गोष्टी म्हणजे - त्यांनी मुस्लीम धर्मियांकडून टोपी न घालणे आणि दुसरी म्हणजे त्यांच्या किमान मागच्या वर्षातल्या विधानसभा निवडणूकीत मुस्लीम व्यक्तीस तिकीट नसणे. त्यातील पहीले काही करायची गरज नव्हती जरी ते देखील कुणाला डिफेन्ड करायचे असले तर ते करू शकतील. पण दुसरे म्हणजे विधानसभेची तिकीटे झाली, त्यात ते त्यांना जी काही विनिंग स्ट्रॅटेजी वाटली त्यानुसार केलेले आहे. पण तसे प्रश्न माध्यमांनी आणि विरोधकांनी त्यांना विचारले.. आज आप च्या सरकार मधे किती मुसलमान अथवा अल्पसंख्य आहेत आणि किती कायद्यानुसार सवर्ण नसलेले हिंदू आहेत हा एक प्रश्नच आहे. पण त्यांना कोणी ते विचारणार नाही. :(

श्रीगुरुजी's picture

3 Jan 2014 - 12:49 pm | श्रीगुरुजी

>>> हे खरेच, पण अनेकांच्या मते मोदी हिंदुहृदयसम्राट आहेत, अनेकांच्या मते तेच हिंदू धर्म वाचवू शकतात (म्हणजे काय तेच जाणे पण ते असो), त्या अनेक भाजपा समर्थकांचे असे मत बनण्यासाठी मोदींनी काहीच केलेले नाही (समर्थक काय आपली मते असत्यावर आधारून काहीही बनवतात) असे तुमचे खरच मत आहे का?

मोदींना काही जण हिंदूहृदयसम्राट म्हणत असतील, पण काही जण हिटलर/नरसंहार करणारा नरराक्षस/इदी अमीन्/मौत का सौदागर इ. पण म्हणतात. असे मत बनण्यासाठी मोदींनी काही केले आहे का?

क्लिंटन's picture

3 Jan 2014 - 10:22 pm | क्लिंटन

शिवाय मोदी- बीजेपी समर्थकांकडून वारंवार हे ८४ चे दंगे व बोफोर्स चा उल्लेख होतो.
सलग सहा- साडे सहा वर्षे सत्तेतील प्रमुख भागीदार असताना बीजेपीने ह्यासंदर्बहत नक्की काय केलं ते मात्र फारसं वाचण्यात आलं नाही. त्याबद्दल कुणी अधिक माहिती दिलीत तर बरं होइल.

म्हणजे भाजपने नक्की काय करायला हवे होती अशी तुमची अपेक्षा आहे? १९८४ चे दंगे केल्याचा आरोप आहे त्यांना न्यायालयाची प्रक्रीया पूर्ण न करताच तुरूंगात टाकायला हवे होते की फासावर लटकावायला हवे होते? भारतातली न्यायव्यवस्था लक्षात घेता आणि १९८४ नंतर इतकी वर्षे उलटलेली असताना त्यावेळचे पुरावे एकत्र करणे आणि त्याआधारे तपास करून न्यायालयात खटला उभा राहिल इतपत केस मजबूत करणे या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नक्कीच नव्हत्या. तसे न करताच ज्यांनी दंगे केले त्यांना फासावर लटकवणे कल्पनेत शक्य असेल पण प्रत्यक्षात ते शक्य नाही. वाजपेयी सरकारने १९९९ मध्ये १९८४ च्या दंगलींची चौकशी करायला निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली (बहुदा त्यांचे नाव नानावटी होते) आयोग नेमला होता.त्या आयोगाचा निकाल २००५ मध्ये आला आणि त्यात जगदीश टायटलर यांच्यावर ताशेरे ओढले असल्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला.आता असा आयोग नेमणे आणि त्या आयोगाला पूर्ण सहकार्य करणे या व्यतिरिक्त वाजपेयी सरकार काय करू शकत होते ते कळल्यास बरे होईल.

राहिली गोष्ट बोफोर्सची. मुळात बोफोर्स प्रकरणी क्वात्रोची आणि इतरांविरूध्द दाखल झाले ऑक्टोबर १९९९ मध्ये.त्यावेळी क्वात्रोची मलेशियात होता.त्याला भारतात आणायला सी.बी.आय ची टिम पाठवली होती पण तिथल्या कोर्टाने भारताची क्वात्रोचीच्या प्रत्यर्पणाची मागणी अमान्य केली.दुसऱ्या देशातून गुन्हेगाराला भारतात प्रत्यर्पण करून आणणे ही गुंतागुंतीची गोष्ट असते हे वेगळे सांगायलाच नको.तसेच बोफोर्स प्रकरणावरील इतर काही खटले दिल्ली उच्च न्यायालयात वाजपेयी सरकार सत्तेत आले तेव्हाही चालूच होते.मग या बाबतीत त्यांच्या हातात करण्यासारखे काय होते हे पण वाचायला आवडेल.

तुम्ही विचारलेलाच प्रश्न हा तुमच्यावरही उलटू शकतो हे तुमच्या लक्षात आले नाही का? २००४ पासून कॉंग्रेस पक्ष सत्तेत असतानाही नरेंद्र मोदींविरूध्द मनमोहन सरकारला काहीही करता का आले नाही?उलट २००५ मध्ये अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारल्यानंतर स्वत: पंतप्रधानांनी लोकसभेत म्हटले होते की मोदींविरूध्द कोणतेही आरोप सिध्द झालेले नाहीत. त्याविषयी काय म्हणणे आहे?

क्लिंटन's picture

11 Jan 2014 - 10:42 am | क्लिंटन

मनोबांनी काही प्रश्न उभे केले त्याला विकास आणि मी सुध्दा उत्तरे दिली.पण नंतर मनोबा कुठे गायब झाले?ती उत्तरे पटली/पटली नाहीत्/आणखी काही स्पष्टीकरण हवे आहे/नाही याविषयी काहीतरी लिहाल की नाही? गेले दहा दिवस वाट बघत आहे की आता काहीतरी लिहितील मग काहीतरी लिहितील पण कुठचे काय.असे असेल तर भविष्यात असे प्रश्न कोणी उभे केल्यास त्याला उत्तरे देण्यात वेळ घालवावा की नाही हा विचार मात्र जरूर करावा लागेल. असो.

मन१'s picture

12 Jan 2014 - 6:35 pm | मन१

माझ्या मिपा अ‍ॅक्सेसच्ची वाट लागली आहे. हापिसातून मिपा उघडत नाही. घरी फार तर पाच-सात मिनिटं इंटरनेट उघडायला जमतं; तेवध्यात फेसबुक-जीमेल पाहणं इत्यादी करतो. मिपावरून फार तर नजर फिरवता येते. पण प्रतिसाद देण्याइतपत वेळ काढता येत नाही.
मी प्रतिसाद लिहिल्यावर सर्वप्रथम विकास, हुप्प्य व इतर काहिंचे उपप्रतिसाद आले. तेव्हा मी तत्काळ व्य नि करन्न त्यांना ही अडचण सांगितली.
आपला प्रतिसाद अर्थातच त्या व्य नि नंतर आला. त्यामुळे मला आपणास कळवत आलें नाही.
क्षमस्व.
.
.
व्य नि मधील व्यक्ती :-
विकास, हुप्प्या, श्रीरंग_जोशी, अस्वस्थामा, बॅटमॅन and हतोळकरांचा प्रसाद
.
.
व्य नि चा मजकूर : -

विषय :- आभार.... परतायला वेळ लागेल.

नमस्कार.
तुम्ही सर्वांनी प्रतिसादाची दखल घेतल्याबद्दल आभार.
(तुम्ही काय पटत नाही किंवा प्रतिसाद्दातील कोणता विधान चुकीचे/वेडसर्/बिनबुडाचे वाटते हे सांगितलेत, तरी दखल घेतलित हे महत्वाचे. त्याबद्दल आभार.)
लागलिच पुन्हा तिथे चर्चा करु शकत नाही.
मिपा अ‍ॅक्सेस मर्यादित आहे.
ही केवळ पोच.

विकास ह्यांना :-
खरेतर तिथेही लिहिण्यासारखं आता खूप काही नाही. कारण चर्चा तुमची भूमिका काय आहे/असते आणि त्यातले मला दिसत असलेले गॅप्स किंवा त्याबद्दल पडलेल्या शंका; इतकीच आहे. तुम्ही गॅप्स चे बरेचसे तपशील दिलेत, त्यामुळे तुमच्या भूमिकेपुरतं अधिक विचारण्यासारखं आता फारच थोडं आहे. बाकी गांधीहत्या - संघ वगैरे कडे मी सरकत नाही; पूर्वी फार म्हणजे फारच चर्चा झालेली आहे. तो मुद्दा मान्य केला तरी काही लहान सहान शंका राहतात.

पुन्हा मिपावर परतलो की टंकतो. अर्थातच मजकूर अल्प असेल.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Jan 2014 - 5:01 am | हतोळकरांचा प्रसाद

तुमचा प्रतिसाद क्लिंटन व विकास यांना उद्देशून आहे, पण काही मुद्दे पटण्यासारखे नाहीत त्यामुळे प्रतिक्रिया द्यावी वाटली.

त्यांना हार्ड लायनर्स मानले जाते, ही १००% न्यूज च्यानेल व वृत्तपत्रांची कृपा आहे का?

त्यांना हार्डलाइनर्स मानणे हि जरी १००% माध्यमांची कृपा नसली तरी त्यांना निगेटिव हार्डलाइनर्स बनवणे हा नक्कीच माध्यमांचा आहेर आहे. खालील काही प्रातिनिधिक बातम्या पहा, अगदी काहीही चर्चा करण्यासारखं किंवा वावगं नसताना माध्यमांनी यावर तासोनतास काथ्याकुट केलेला आहे.

१. एक कुत्ते का पिल्ला भी गाडी के नीचे आता है तो दु:ख होता है, दंगे तो बहूत बडी बात है.
२. (पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना)मै एक हिंदू हुं, मै एक राष्ट्रभक्त हुं, इसलिये मै हिंदू राष्ट्रवादी हुं!
३. इरफान पठाण मोदींच्या मंचावर उपस्थित राहिल्यानन्तरची बातमी.
४. गोध्रा शहरातल्या एखाद्या झोपडपट्टीतील मुस्लिम वस्तीत जाऊन विकास झाला नसल्याची बातमी (विशेषकरून मुस्लीम लोकांना प्रश्न विचारून).

मला वाटते कोणालाच मोदींना/अडवानींना साधू किंवा मवाळ सिद्ध करायची हौस/गरज नसावी. म्हणणं एवढंच आहे कि, तेही देशातील इतर नेत्यांसारखेच आहेत फक्त त्यांनी इतरांपेक्षा जास्त विकास करून दाखवला आहे. मग त्यांच्यावर वर नमूद केलेल्या गोष्टींसारख्या गोष्टींवर आगपाखड का?

ह्यांनी खर्रच कधीच काही बोललेलं किंवा जमावाला उत्तेजित करणारं विधान्/कृती केलेलं नाही का?

उदाहरणार्थ?

पण बहुतांश कडवट (खरंतर हिंसक ) लोकं "मोदीजी मुस्लिमांना गप्प बसवतील. चांगली अद्दल घडवलिये त्यानी एकदा" अशा अर्थांचे स्टेटस अपडेट्स टाकतातच की (अशा टिपिकल फेसबुकीय लिंकामध्ये व गप्पांमध्ये "मुल्लोने ऐसा किया, वैसा किया" अशी बहसह असते.) ! "मोदी हे हिंदु रक्षक व म्हणूनच पर्यायाने मुस्लिम निर्दालक आहेत" हा सेक्युलर का स्यूडोसेक्युलरांनी केलेला प्रचार जसा आहे, तसाच मोदी फ्यान्सनाही त्यांची ती इमेज भावते.

एकतर कदाचित मी फेसबुकवर तुमच्याइतका अक्टीव नसेन किंवा तुम्ही चुकीच्या पानांवर भेट देत आहात. मला प्रमाण उलटे वाटते. आणि कोणाला दंगलीच्या असुरक्षिततेतून तसे वाटत असेल तर त्यात गैर काय? ही असुरक्षितता काय मोदिंनी निर्माण केली आहे काय? कि त्यातून असे सिद्ध होते कि "त्या" लोकांना मोदी उरलेल्या धर्माच्या लोकांना भारताबाहेर काढतील आणि आपलं संरक्षण करतील असे वाटते आहे किंवा अशी त्यांची इच्छा आहे? मला वाटते अ‍ॅन्टीमोदी असल्यावर वरील मुद्दे जास्त दिसतात. कारण अद्दल खरंच घडली नाहीये का? ती फक्त मुस्लिमांनाच कशाला घडायला हवी? दंगलीत मेलेल्या हिंदुना घडली नाहीये का?

शिवाय काहीही झालं की "८४च्याशीख दंगलीत नाहित का लोकं मारली गेली" हे समोरुन येणार काय आर्ग्युमेंट आहे?
म्हणजे "त्यांनी शंभरेक शीख मारले; आम्हाला पन्नासेक तरी मुस्लिम मारु द्या" (????!!!!) असं काही आर्ग्युमेंट आहे का राव हे?

मन१ - बहुतेक तुम्हाला दंगलीच्या तुलनेचा मुद्दा कळला नसावा. हि तुलना त्यांनी एवढे मारले तर आमचे एवढे माफ करा अशी नाहीये. मुद्दा साधा सरळ आहे कि गुजरात दंगल हि काही भारतातील एकमेव दंगल नाही कि ज्यात कुठल्या एका धर्माचे लोक मारले गेले. जर आधीच्या किंवा नंतरच्या दंगलीच्या वेळचे शासक "मौत के सौदागर" नव्हते तर मग एकदम मोदीच कसे काय तसे? आणि इतर शासक पंतप्रधान होऊ शकतात तर मोदी का नाही? शिवाय काहीही झालं तरी गुजरात दंगलीचा दाखला देणं हे तरी "काय अर्ग्युमेंट आहे" का याचा निपक्षपातीपणे विचार करणार का?

"लोकं आता ते विसरुन गेलेत" ह्या मुद्द्याबद्दल आश्चर्य वाटतं.
ह्याचा सरळ अर्थ होतो की "हो केलेत दंगे. मारलेत हजारभर (का शेकडो. जे काही असेल ते) पण त्यात काय एवढं. द्या ना सोडून . आता ज्यानं तुमच्या घरच्यांना जिवंत जाळलं ना, त्यालाच पी एम करुया. तो तुम्हाला नि तुमच्या घरच्यांना छान छान जॉब देइल,. विकास करेल . "

अत्यंत हास्यास्पद आहे हे विधान. कोणी कुणाला जाळलं? कोणी केल्या दंगली? "ते" नेमकं का घडलं? कोण तुम्हाला काय विसरायला सांगतंय? तुम्हाला न्यायव्यवस्थेवर (तेही सत्ताधारी कॉंग्रेस असताना) विश्वास आहे का? कुठल्या आधारावर तुमचे हे विधान आहे? कमीत कमी प्रस्तुत लेखात लेखकाने जे पुराव्यानिशी मांडले आहे ते तरी खोडून काढा. गुजरातचे लोक ज्यांनी दंगली जवळून पाहिल्या/अनुभवल्या (दोन्ही हिंदू आणि मुस्लिम) ते एक वेळ भावनेच्या आहारी जाऊन मोदींना बहुमत देतील, दोन वेळेला देतील,तिसऱ्या वेळीही तेच? कि एकदा अ‍ॅन्टीमोडी चष्मा लावला कि बाकी सगळं गौन? दर २-३ वर्षांनी होरपळणारा गुजरात गेल्या १२ वर्षांत शांत आहे ह्याबद्दल काय मत आहे तुमचे? फक्त गुजरात दंगलीबाबतच तुमची ही मतं का? माध्यमांना हाताशी धरून कॉंग्रेसने केलेल्या अपप्रचाराला तुम्ही बळी पडलेले नाहीत हे कशावरून? कधीतरी गुजरात दंगल, मोदींचा संबंध, प्रचार आणि अपप्रचार, मोदींची गुजरातमधील दंगलीनंतरची १२ वर्षाची कारकीर्द आणि देशाला असलेली खंबीर नेतृत्वाची गरज याचा एकत्रितपणे निपक्षपातीपणे विचार करू शकाल काय?

जो अगणित निरपराधांच्या म्रुत्यूस व त्याहून अधिकांच्या हलाखीस जबाबदार आहे, त्यास उरलेल्यांचे भले करण्याची क्षमता असेल तरी सत्ता द्यायची का? शिक्षा नको का? अरे काय बोलताय हे??

अगदी हेच म्हणणं आहे. द्याना त्यांना शिक्षा! करू द्याना न्यायव्यवस्थेला निर्णय! तुम्ही स्वतः न्यायाधीश कुठल्या आधारावर होताय? जर तुमच्याकडे "अगणित" (हे अजून एक अ‍ॅन्टीमोदींचे लक्षण, आहे त्या पेक्षा प्रमाण वाढवले कि गुजरात दंगल इतिहासातील सर्वात काळी दंगल ठरते) मृत्यूंचे आणि त्याला कोण कारणीभूत आहे याचे काही पुरावे असतील तर द्या ते आणि मदत करा ना गुन्हेगाराला शिक्षा व्हायला (जेवढ्या ठामपणे तुम्ही वरील विधान करताय त्याअर्थी तुमच्याकडे नक्कीच पुरावा असणार)!

शेवटी तुमची प्रतिक्रिया वाचून मलाही फक्त एवढेच वाटते - "अरे काय हे?" "अरे काय बोलताय हे?"

श्रीरंग_जोशी's picture

3 Jan 2014 - 11:46 pm | श्रीरंग_जोशी

कुठल्याही पदावरील व्यक्ती आपल्या कर्तव्यांना चुकली अशा आरोपाखाली जर नि:पक्ष व परिणामकारक चौकशी व्हायची असेल तर ती व्यक्ती चौकशीच्या काळापुरती त्या पदावरून बाजूला केली जावी लागते. जर आरोप गंभीर असतील अन ती व्यक्ती पुरावे नष्ट करू शकेल अन साक्षीदारांच्या साक्षी साम-दाम-दंड-भेद यांच्या आधारे स्वतःच्या सोयीनुसार बदलून घेण्याची शक्यता दिसत असेल तर त्या व्यक्तीला तुरुंगात ठेवले जाते.

आता गुजरातमधील हिंसाचाराच्या काळापासून एकच व्यक्ती मुख्यमंत्री पदावर आहे. ज्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीविरुद्ध पुरावे जतन करून ठेवायचे आहेत व न्यायालयात साक्षी द्यायच्या आहेत ते सर्व जर त्या व्यक्तीच्याच हाताखाली काम करणार असतील तर त्या व्यक्तीवरील आरोप न्यायालयात सिद्ध करणे अशक्य आहे.

आता गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची याबाबतीतल्या कामगिरीचे मूल्यमापन हे व्यक्तिसापेक्ष असणार.

कुणासाठी हजार अकराशे लोक मारले जाणे व त्याविरुद्ध काही करण्यात राज्य सरकार फारसे काही करू न शकणे ही किरकोळ बाब असू शकते व कुणासाठी अतिशय गंभीर.

किमान भारताचे सध्याचे पंतप्रधान व त्यांच्या अगोदरचे पंतप्रधान यांनी या कामगिरीवरील आपले असमाधान अनुक्रमे स्पष्टपणे व संदिग्धपणे बोलून दाखवले आहे. पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तींची यावरची मते देशासाठी फार महत्त्वाची आहेत असे मला वाटते.

विकास's picture

4 Jan 2014 - 12:43 am | विकास

कुणासाठी हजार अकराशे लोक मारले जाणे व त्याविरुद्ध काही करण्यात राज्य सरकार फारसे काही करू न शकणे ही किरकोळ बाब असू शकते व कुणासाठी अतिशय गंभीर.
मला कल्पना आहे की शिख दंगलीच्या वेळेस तुम्ही लहान होता पण त्या दंगलीत देशभर ८००० तर नुसत्या दिल्लीत ३००० शिख मारले गेले होते. पंतप्रधान राजीव गांधी होते आणि गृहमंत्री नरसिंहराव होते. आजतागायत शिखांना न्याय मिळालेला नाही. मग तेथे देखील राजीव गांधींनी आणि खरे तर काँग्रेस पक्षानेच सत्तेपासून दूर रहायला हवे होते असे म्हणणे आहे का? सोनीया गांधींवर पण १९८४च्या दंगलग्रस्तांना न्याय मिळालेला नाही म्हणून मानवी हक्कांच्या अंतर्गत शिखांनी आता अमेरीकेत खटला भरला आहे. जगदीश टायटलरचा दंगलीत संबंध होत हे सिद्ध झाले तरी देखील अजूनही काँग्रेसमधून बाहेर काढलेले नाही. किमान गुजरातमध्ये ज्यांच्यावरील गुन्हे सिद्ध झालेत त्यांना शिक्षा तरी झाली. येथे त्या दंगली ज्यांचे देशात नेतृत्व असताना झाल्या त्यातील दोघे पंतप्रधान झाले! याबद्दल काय म्हणणे आहे? का ८००० माणसे मरणे ही गंभीर बाब नाही?

जर आरोप गंभीर असतील अन ती व्यक्ती पुरावे नष्ट करू शकेल अन साक्षीदारांच्या साक्षी साम-दाम-दंड-भेद यांच्या आधारे स्वतःच्या सोयीनुसार बदलून घेण्याची शक्यता दिसत असेल तर त्या व्यक्तीला तुरुंगात ठेवले जाते.

मोदींवर हा आरोप टिस्टाने पण केलेला दिसलेला नाही. इतके तुम्ही त्यांचे राक्षसीकरण करत आहात. आणि कुठल्यातरी पवारने कुठल्यातरी पवारबद्दल रस्त्यात उतरून दंगल थांबवायचा प्रयत्न केला अए म्हणणे, इतका पुरावा मात्र तुम्हाला बरोबर वाटतो. जणू काही नाहीतर ११००० शिख मारले गेले असते पण पवार-शिंदे-पायलट यांच्यामुळे ८००० च! असो. मोदी आवडो न आवडो, हा पूर्ण वेगळा आणि व्यक्तीगत मुद्दा आहे. पण या विषयात जर झापडे लावूनच लिहायचे असले, न्यायालयाचे निर्णयच जर संशयाने बघायचे असले आणि काँग्रेसचेच फक्त बरोबर म्हणायचे असले तर चर्चा करण्यात काही हशील नाही.

श्रीरंग_जोशी's picture

4 Jan 2014 - 1:34 am | श्रीरंग_जोशी

प्रथम दुसऱ्या भागाचे उत्तर देतो.

मी कुणावर कसला आरोप केलाय? गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत न्यायालयीन प्रक्रिया कशी चालते याबद्दल लिहिले आहे.

माझ्या या प्रतिसादात या बाबतीत प्रत्येकाचे मत व्यक्तिसापेक्ष असू शकते हे सुद्धा लिहिले आहे. उदा. जसे कुणाला सरकारमुळे महागाई खूप वाढली असे वाटते त्याच वेळी कुणाला सरकारच्या कामगिरीमुळे बरीच नवी रोजगारनिर्मिती झाली व त्यामुळे महागाईला तोंड देणे सोपे झाले असे वाटते.

गुजरातमध्ये त्या काळातले फोन रेकॉर्ड्स नष्ट केले गेल्याचेही वृत्तपत्रांत वाचले होते ते खरे असल्यास कुठलेच पुरावे नष्ट केले गेले नाही असे म्हंटले जाऊ शकत नाही.

सदर धागा जर शीख दंगलींच्या वेळी काँग्रेस सरकारच्या भूमिकेवर असता तर मी मला जमेल तेवढी माहिती मिळवून त्यावर मत व्यक्त केले असते.

गुजरात राज्य सरकारसारखी त्यावेळच्या केंद्र सरकारची भूमिका असती तर किमान शीख बहुसंख्य राहतात त्या पंजाब राज्यात पुन्हा कधीच काँग्रेस सत्तेवर आली नसती. (पंजाबच्या राजकारणाविषयी मला केवळ जुजबी माहिती आहे, हा केवळ एक तर्क आहे) काही वर्षांपूर्वी सध्याच्या काँग्रेस अध्यक्षांनी स्पष्टपणे शीख समुदायाची माफी मागितली होती.

काँग्रेसने / विविध काँग्रेस सरकारांनी दंगलींच्या बाबतीत जे केले तेच बरोबर असे मी या धाग्यावरच काय कुठेही लिहिले असेल तर कृपया तसे दाखवून द्यावे. मी जे चांगले उदाहरण दिले ते महाराष्ट्रातील युतीच्या कार्यकाळाचे होते याचा पुनरुच्चार करतो.

विकास's picture

4 Jan 2014 - 2:37 am | विकास

गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत न्यायालयीन प्रक्रिया कशी चालते याबद्दल लिहिले आहे.

तेच तर दाखवले की असे (तुम्ही म्हणता तसे) काही शिख हत्याकांडाच्या वेळेस घडले नाही. राजीव गांधीच पंतप्रधान राहीले होते. तेच मुंबई दंगलीसंदर्भात आणि तेच इतर सर्वच दंगली संदर्भात! तुम्हाला कुठला संदर्भ माहीत असला जो माझ्याकडून चूकून राहीला असला तर सांगा. नाहीतर केवळ मोदींनाच का वेगळा न्याय. शिवाय २००२ मधे दंगल झाली आणि २००२ मधेच नंतर आणि परत परत त्यांना आणि त्यांच्या पक्षास जनतेकडून बहुमत मिळाले. सगळे काही कायद्याप्रमाणे झालेले आहे. हा अजून एक वेगळाच मुद्दा.

गुजरातमध्ये त्या काळातले फोन रेकॉर्ड्स नष्ट केले गेल्याचेही वृत्तपत्रांत वाचले होते ते खरे असल्यास कुठलेच पुरावे नष्ट केले गेले नाही असे म्हंटले जाऊ शकत नाही.
फोन रेकॉर्डस नष्ट झाले हे बरोबरच आहे. पण तो आक्षेप कुणाचा होता? मोदी सरकारचाच! कारण काय? आयपीएस ऑफिसर शर्मा याने स्वतः तयार केलेले फोन रेकॉर्ड सिडी बद्दल साशंकता होती. अर्थात त्यात मोदी-शर्मा राजकारण असू शकते. पण तो वेगळा मुद्दा आहे. आक्षेप सरकारचा होता. म्हणून त्या फोन रेकॉर्डसची अधिकृत प्रत मागवली. हे प्रकरण कोर्टात साधारण २००७ मधे झाले. त्यावेळेस गुजरातमधे व्होडाफोन आणि आयडीआ मोबाईल ह्या दोन कंपन्या होत्या. त्यांनी ती रेकॉर्ड ठेवले नसल्याचे सांगितले. आता हे या कंपन्यांनी केले कारण कायद्याप्रमाणे पाच वर्षेच रेकॉर्डस ठेवावी लागतात. त्यामुळे गुजरात सरकारचे म्हणणे होते की शर्माच्या सिडीवरील रेकॉर्ड्स पुरावा म्हणून धरली जाऊ नयेत कारण ती अधिकृत नाहीत. ते नानावटी कमिशनने ऐकले नाही आणि ती रेकॉर्डस खटल्यासाठी पुरावा म्हणून वापरली गेली. थोडक्यात रेकॉर्ड नसणे हे गुजरातसरकारने केलेच नव्हते आणि त्यांनाच रेकॉर्डस हवी होती! त्यामुळे रेकॉर्ड्स नष्ट झाले असे तुमचे म्हणणे अर्धसत्य आहे.

काही वर्षांपूर्वी सध्याच्या काँग्रेस अध्यक्षांनी स्पष्टपणे शीख समुदायाची माफी मागितली होती.
माफी सध्याच्या पंतप्रधानांनी देखील मागितली आहे.पण म्हणजे तेव्हढे झाले की झाले का सगळे? हा शिख समाज किती दुरावला आहे हे अमेरीकेत पण तुम्ही बघू शकता. ८००० शिखांना मारले आणि माफी मगितली की सगळे झाले का? त्या टायटलरला का अजून काँग्रेसमधे ठेवलाय?

गुजरात राज्य सरकारसारखी त्यावेळच्या केंद्र सरकारची भूमिका असती तर किमान शीख बहुसंख्य राहतात त्या पंजाब राज्यात पुन्हा कधीच काँग्रेस सत्तेवर आली नसती.

नक्की काय म्हणायचे आहे ते कळले नाही. पण जर काँग्रेसचे राज्य पंजाबमधे आले म्हणजे केंद्रातील काँग्रेसने जे काही केले ते बरोबरच होते असे म्हणायचे असेल तर मग गुजरातेत मोदी तर तिनदा निवडून आलेत आणि काँग्रेसची मते कमीच होत गेली आहेत. त्यावरून काय म्हणणार? बरं त्यात २५% मुस्लीम मते आहेत, जाम नगर मधे तर पालीका निवडणुकीत भाजपाकडून सगळेच मुस्लीम उमेदवार होते आणि सगळेच जिंकले! त्यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढणार?

श्रीरंग_जोशी's picture

4 Jan 2014 - 2:55 am | श्रीरंग_जोशी

तत्कालिन मोदी सरकारच्या भूमिकेवर आक्षेप व्यक्त केला म्हणून मी काँग्रेस सरकारांच्या कृष्णकृत्यांचा थेट समर्थक बनलोय असा काहीसा सूर तुमच्या प्रतिसादांतून जाणवतोय.

पंजाबच्या बाबतीत मी वर स्पष्टपणे तर्क आहे म्हणून लिहिले असतानाही मी काँग्रेसच्या समर्थनार्थ मोठा दावा केला आहे असे तुमच्या प्रतिसादातून जाणवत आहे.

त्याखेरीज भाजपचा पूर्णपणे विरोधक आहे असाही सूर तुमच्या प्रतिसादांतून जाणवतो आहे.

फोन रेकॉर्डस हे केवळ उदाहरण म्हणून घेतले होते त्यालाही 'खरे असेल तर' हे जोडून.

जसे नागरीक म्हणून सरकारच्या धोरणांबाबत टिका केली जाते तसेच या प्रकारच्या हिंसाचाराच्या वेळी सरकारने बजावलेल्या कामगिरीवर केली जाऊ शकते, ते करण्यावरही आक्षेप असेल तर मी येथे थांबलेलेच बरे.

विकास's picture

4 Jan 2014 - 3:25 am | विकास

तुम्हाला कदाचीत मोठ्ठा विनोद वाटेल, पण जे लोकं मला जवळून ओळखतात त्यांना माहीत आहे की मी कधी एका पक्षाच्या बाजूने म्हणून बोलत/लिहीत नाही.

हा लेख लिहायचे कारण हे मोदी समर्थन नव्हते तर विचहंटींग कसे केले गेले हे होते आणि अजूनही तेच आहे. माझ्या दृष्टीने त्यामुळे सामाजीक भेद झाला जे अत्यंत अक्षम्य आहे. हे केवळ मोदींच्याच बाबतीत नाही तर सोनीयांच्या बाबतीतही लागू होईल. टिका करणे एक आणि खोट्या माहीतीने राक्षसीकरण करणे एक.

तुमच्या आलेल्या सततच्या प्रतिसादातून तुम्ही मोदींना एक न्याय लावत आहात आणि काँग्रेसला एक लावत आहात असे दिसत आहे. केवळ एकच उदाहरण म्हणजे, काँगेस पंजाब मधे निवडून आली याचा अर्थ काँग्रेस हत्याकांडास जबाबदार नव्हतीच असा तुम्ही "तर्क" करता. पण तोच "तर्क" मोदींना मुस्लीम मते मिळाली तर लावू शकत नाहीत.

तुम्ही भाजपाच्या बाजूने असा अथवा विरुद्ध त्याचा काहीच संबंध नाही. भाजपा एक राजकीय पक्ष आहे, जसा काँग्रेस आहे, आप आहे आणि इतर अनेक आहेत. तुमच्या वाटेला (भारतात असताना) जर यातील कुणाचाही योग्य उमेदवार आला तर त्याल मत द्या इतकेच म्हणेन असेच इतरांना सांगतो.

जसे नागरीक म्हणून सरकारच्या धोरणांबाबत टिका केली जाते तसेच या प्रकारच्या हिंसाचाराच्या वेळी सरकारने बजावलेल्या कामगिरीवर केली जाऊ शकते, ते करण्यावरही आक्षेप असेल तर

आक्षेप हा कुणावर आणि कशावर टिका केली याच्यावर नसून, संदर्भ नसताना अथवा चुकीचे संदर्भ घेऊन राक्षसीकरण करण्यावर आहे जो या लेखाचा/चर्चेचा उद्देश आहे. गेली अनेक वर्षे टिस्टा आणि पार्टी ते करत आली, आज पंतप्रधानांनी तेच केले. असो.

श्रीरंग_जोशी's picture

4 Jan 2014 - 9:42 am | श्रीरंग_जोशी

पुन्हा एकदा लिहितो मी केवळ एवढेच म्हणतोय की त्या सर्व काळात राज्य सरकार आपल्या कर्तव्यात कमी पडले. तुमच्या प्रतिसादांत अनेकदा आले आहे की माध्यमे नेहमीच मोदींच्या विरोधात होती.माझे असे निरीक्षण आहे माध्यमे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने फार कमी वेळा असतात (किंवा तसे स्पष्टपणे दाखवतात). २००२ साली तरी राजकीयदृष्ट्या नरेंद्र मोदी इतकेही मोठे राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते की माध्यमे त्यांना ठरवून खलनायक बनवत होती. हिंसक घटना घडल्या की लगेच तो घटनाक्रम थांबवण्यास सरकार अपयशी ठरले असेल असे चित्र रंगवून छापणे अथवा दाखवणे केले जाते असे मला वाटत नाही. काही काळानंतर तसे केले जाऊ शकते याबाबत शंका नाही.

जर माध्यमे मोदींच्या विरोधात होती हे चर्चेपुरते मान्य केले तरी सरकारचा प्रमुख म्हणून मोदी हिंसाचाराविरुद्ध आपला संदेश जनतेपर्यंत पोचवू शकत होते, दूरदर्शनचा वापर यासाठी केल्यास कुणीही आक्षेप घेतला नसता. वर्तमानपत्रांत राज्य सरकारे व केंद्र सरकार सरकारी तिजोरीमधले पैसे खर्च करून सरकारी योजनांच्या जाहिराती छापतातच की. जर प्रत्यक्षाहून प्रतिमा इतकी वेगळी निर्माण झाली असेल तर त्या व्यक्तीने वेळीच त्यासाठी काहीच का नाही केले? की त्या प्रतिमेचा राजकीय फायदा मिळवणे तेव्हा अधिक उपयोगाचे होते?

जर एवढा मोठा हिंसाचार होऊन त्याला अटकाव न करण्यास तत्कालीन राज्य सरकार जबाबदार नसेल तर मग जबाबदारी कोणाची? कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीतली बाब असते. याच न्यायाने २६/११ हल्ल्यांसाठी नैतिक जबाबदारी स्वीकारून शिवराज पाटील यांनी उगाच राजीनामा दिला असे म्हणावे लागेल. त्यांच्या हाताखालील गुप्तचर विभागाने हल्ल्यांबाबत आगाऊ इशारा देण्याचे काम केले होते. तट रक्षक दल जे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते अन स्थानिक पोलिस जे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येतात त्यांचे हे अपयश होते. २००१ च्या संसदेवरील हल्ल्याच्या वेळीही तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला नव्हता. राजधानीमधील कायदा सुव्यवस्था ही केंद्रीय गृहमंत्रालयाची जबाबदारी असते असे असूनही.

मी आजवर पुन्हा पुन्हा जालावर शोधून मोदी सरकारविरुद्धचे मुद्दे कधीच गोळा केले नाही. त्या काळातील ज्या बातम्या आठवतात त्यानुसारच माझे मुद्दे मांडले. थोड्या वेळापूर्वी सहज म्हणून विकीवर गुजरात हिंसाचार हे प्रकरण चाळले. त्यामध्ये विविध भारतीय / आंतरराष्ट्रीय संस्थांचा दाखला देऊन मोदी सरकारच्या अपयशाबद्दल अतिशय स्पष्टपणे लिहिले आहे. जर ते सर्व असत्य असेल तर अजूनही ते अप्रकाशित का होऊ शकले नाही याचे कुतूहल आहे. संवेदनशील मुद्द्यांवरील असत्य माहिती विकीवरून तक्रार केल्यास हटवली जाते असे ऐकले आहे. फार पूर्वीपासून मोदी यांच्यासाठी सायबर तज्ज्ञ स्वयंसेवकांचा गट इंटरनेटवर मोदींबाबत नकारात्मक गोष्टी हटवणे त्यांनी केलेली विकासकामे जाल शोधांच्या निकालांमध्ये प्रामुख्याने येतील यासाठी कार्यरत आहे असे ऐकले आहे. मग विकी वरची ही नकारात्मक माहिती कशी काय सुटली?

मोदींचे राजकीय विरोधक विच हंटींगसाठी पुरेपूर प्रयत्न करत असतील यात शंकाच नाही पण यासाठी हवे तेवढे मुद्दे तयार ठेवण्याचे काम केले कुणी? माध्यमांद्वारे विच हंटीगचा बळी ठरलेले उदाहरण म्हणजे नितीन गडकरी. त्यांनी सुद्धा पक्षाध्यक्ष असताना स्वतःच्या बोलण्यावर संयम न ठेवल्याने माध्यमांचे व विरोधकांचे काम अधिक सोपे केले.

तत्कालीन पंतप्रधान त्यावेळी मोदींना मुख्यमंत्रिपदावरून हटविले जावे या मताचे होते. 'पार्टीमें बवाल मच जायेगा' हे कारण सांगून अडवाणींनी मोदींना पदच्युत होण्यापासून वाचवले हा संवाद दिल्ली गोवा विमानप्रवासाच्या वेळी घडला होता असे गेल्या वर्षी किंवा त्यापेक्षा थोडे अगोदर छापून आले होते. हे जर खरे असेल तर वाजपेयी यांचे मतही मोदींच्या बाबतीत नकारात्मकच होते असे मानावे लागेल. त्यानंतर काही महिन्यांनी देशावरील डाग व परदेशात जाताना कुठल्या तोंडाने जायचे ही वक्तव्ये केली होती. अप्रत्यक्षपणे का होईना मोदींच्या कामगिरीबाबत अतिशय सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. की वाजपेयीसुद्धा विच हंटीगच्या प्रभावाने गैरसमजातून असे बोलले हे मानायचे?

विच हंटींग वाईट आहेच पण तसे करणाऱ्यांचे काम सोपे होईल अशी संदिग्ध कामगिरी करणे टाळायला हवे हा राजकीय धडा भारतातील नव्या पिढीच्या नेत्यांनी घेतला तर यातून काही तरी चांगले घडेल अशी आशा करता येईल.

विकास's picture

4 Jan 2014 - 10:33 am | विकास

तुम्ही माझा मूळ लेख-चर्चा प्रस्ताव न वाचताच लिहीत आहात याची कल्पना आहे पण आता स्पष्ट सांगणे भाग पडत आहे.

२००२ साली तरी राजकीयदृष्ट्या नरेंद्र मोदी इतकेही मोठे राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते की माध्यमे त्यांना ठरवून खलनायक बनवत होती.
आपण पहील्यांदा माझा मूळ चर्चाप्रस्ताव वाचावात आणि त्यात मी माध्यम हा शब्द तरी आणला आहे का हे सांगावेत. नंतर देखील आणला आहे तो प्रतिसादापुरता आणला आहे,... याचा अर्थ माध्यमे मोदींच्या बाजूने होती असे मला म्हणायचे नाही, पण त्यातील "सुमार" प्रकारातले पत्रकार आणि त्यांची मराठी-इंग्रजी-इतर भाषांमधील संपादकीय/लेख सोडल्यास विचहंटींग करत बसले असे म्हणणे अवघड जाईल. तेंव्हा मी नक्की काय म्हणालो ते परत वाचा.

दूरदर्शनचा वापर यासाठी केल्यास कुणीही आक्षेप घेतला नसता. ... तर त्या व्यक्तीने वेळीच त्यासाठी काहीच का नाही केले?
नक्की माहीत आहे का की हे असेच घडले म्हणून?

मी आजवर पुन्हा पुन्हा जालावर शोधून मोदी सरकारविरुद्धचे मुद्दे कधीच गोळा केले नाही. त्या काळातील ज्या बातम्या आठवतात त्यानुसारच माझे मुद्दे मांडले.

कुणावरतीही पब्लीक फोरम मध्ये टिका करताना अथवा बाजू घेऊन बोलताना आधी खात्री करावी की नक्की बरोबर आहे का ते. असे माझे स्पष्ट मत आहे. मध्यंतरी येथे मुरली मनोहर जोशींवरूनचा एक खोटारडेपणा कसा झाला ते कळले असेलच...

पण यासाठी हवे तेवढे मुद्दे तयार ठेवण्याचे काम केले कुणी?
विचहंटींग करणार्‍या विचेस नी मोदींनी नाही. सातत्यांनी या विचेसनी खोटारडेपणा केला आहे. त्यांच्या विरोधात आता मुसलमान पण जाऊ लागले आहेत. मोदींच्या विरोधात नाही तर त्यांना सपोर्ट करू लागले आहेत.

याच न्यायाने २६/११ हल्ल्यांसाठी नैतिक जबाबदारी स्वीकारून शिवराज पाटील यांनी उगाच राजीनामा दिला असे म्हणावे लागेल.

अरे बापरे! ऐन युद्धात फक्त माध्यमांसमोर तीनतीनदा कपडे बदलून येणार्‍या आणि त्या आधी देखील स्वतःच्या अख्त्यारीत दहशतवादी हल्ले झालेले असताना काही न करणार्‍या या माननीय मंत्र्यांबद्दल तुम्हाला जर असे वाटत असेल तर बोलणे इथेच थांबवतो. त्यावेळेस त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ मंत्री काय म्हणत होते ते वाचा... फक्त नंतर ते नैतिकतेने राजकारणातून बाहेर पडले का राज्यपाल झाले? नैतिकता कशाला म्हणता? ते काय शास्त्री आहेत का?

असो.

श्रीरंग_जोशी's picture

4 Jan 2014 - 9:41 pm | श्रीरंग_जोशी

सोपे बनू शकते जर माझ्या प्रतिसादांतील काही निवडक वाक्ये / तांत्रिक बाबी घेऊन त्यावर उत्तरे देण्याऐवजी आशयावर लक्ष केंद्रित केले तर.

राजकीय धाग्यांवर चर्चा करताना त्या चर्चाप्रस्तावातील एक एक वाक्य उचलून त्यावर माझे मुद्दे मांडण्याऐवजी त्याचा आशय व त्या विषयाचा मूळ स्रोत यावर मी लक्ष केंद्रित करतो. इतरांनी तसेच करावे हा आग्रह अजिबात नाही. हा चर्चाप्रस्ताव मी सुरुवातीलाच व्यवस्थित वाचलेला आहे. या बाबतीत अतिरेकी विच हंटींग झाले असले तरी तसे करू देण्यास मूळ मुद्दा (मोंदी सरकारचे अपयश व त्यांनी राबवलेले धोरण) हाच मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे हे माझ्या परीने मांडण्याचा मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतोय. तुम्हाला तो अजिबात मान्य नाही यावर मला आक्षेप घ्यायचा नाहीये.

चर्चा इतकी पुढे सरकली असताना तुमच्या चर्चेतील मुद्द्यांचा प्रतिवाद मी नंतरच्या प्रतिसादात केला म्हणून मी चर्चाप्रस्तावात नसलेले मांडलेले मुद्दे वापरले तर एवढे गैर काय.

गैरप्रचार रोखायला दूरदर्शनचा वापर ही केवळ एक तांत्रिक पद्धत वापरता आली असती हा मुद्दा आहे त्या काळात मी दूरदर्शनच्या बातम्या रोज पाहत होतो व वृत्तपत्रेही रोज वाचत होतो. खाजगी वृत्तवाहिन्या ज्यांचे वृत्तांकन भडक असते ते पाहत नव्हतो (घरी केबल नव्हते). मोदी सरकारने गैरप्रचार रोखण्यासाठी स्पष्टपणे काही केले असे मला तरी स्मरत नाही.

जालावरून खातरजमा करून काही घटना लिहिल्या नाही याचा अर्थ हा नाही की गावगप्पांमध्ये ऐकलेले मुद्दे मांडले. त्या काळात मोठमोठ्या वृत्तपत्रांत ज्या बातम्यांत जे प्रकाशित झाले होते तेच अतिरंजित न करता लिहिले. काल सहज विकीवर जाऊन पाहिले तर सरकारच्या अपयशाच्या अनेक उदाहरणे संदर्भासहित उपलब्ध असलेली दिसली.

शिवराज पाटील यांच्या राजीनाम्याचे उदाहरण 'फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट' साठी घेतले आहे. गृहमंत्री म्हणून त्यांच्या अपयशी कामगिरीचे समर्थन करण्यासाठी नाही.

आधुनिक भारताच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी प्रकरणावर चांगली चर्चा झाल्याबद्दल व या संबंधीत फारसे प्रकाशात नसलेले अनेक मुद्दे मांडल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

हतोळकरांचा प्रसाद's picture

4 Jan 2014 - 2:58 am | हतोळकरांचा प्रसाद

कुठल्याही पदावरील व्यक्ती आपल्या कर्तव्यांना चुकली अशा आरोपाखाली जर नि:पक्ष व परिणामकारक चौकशी व्हायची असेल तर ती व्यक्ती चौकशीच्या काळापुरती त्या पदावरून बाजूला केली जावी लागते

१. ती व्यक्ती भारताच्या सर्वोच्च स्थानी (अधिकाराने) बसलेली नाही.
२. चौकशी/तपास करणारी लोकं त्याच्या हाताखाली काम करत नाहीत.
३. ती ज्यांच्या हाताखाली काम करतात ते "त्या " व्यक्तीचे विरोधक (कि वैरी?) आहेत.
४. अवांतर : "त्या" व्यक्तीला पदावरून दूर करायचा असेल तर त्या तपासाला काही मर्यादित कालावधी असावा का? कि तो तपास १२ वर्षे चालणार असेल तर त्याला १२ वर्षे पदापासून दूर ठेवण्याची अपेक्षा आहे का (म्हणजे वैचारिकदृष्ट्या, "ती" व्यक्ती फक्त मोदी आहे म्हणून नव्हे)?

कुणासाठी हजार अकराशे लोक मारले जाणे व त्याविरुद्ध काही करण्यात राज्य सरकार फारसे काही करू न शकणे ही किरकोळ बाब असू शकते व कुणासाठी अतिशय गंभीर.

मला हा मुद्दा तर्कशुन्य वाटतो. मला नाही वाटत कि हजार अकराशे लोकांचा मृत्यू कुणाहीसाठी गंभीर गोष्ट नसेल. फक्त मुद्दा असा असू शकेल कि नेमका कोण या हत्यांना कारणीभूत आहे? काही लोक मानूनच चालले आहेत कि एक "व्यक्ती" त्या हत्यांना जबाबदार आहे तर काही मानतात कि एवढ्या विपरीत परिस्थितीत तब्बल १२ वर्षे हात धुवून लागूनही त्या व्यक्तीविरुद्ध काहीही पुरावे सापडले नाहीत त्यामुळे ती व्यक्ती निर्दोष आहे.

किमान भारताचे सध्याचे पंतप्रधान व त्यांच्या अगोदरचे पंतप्रधान यांनी या कामगिरीवरील आपले असमाधान अनुक्रमे स्पष्टपणे व संदिग्धपणे बोलून दाखवले आहे

कोणत्या कामगिरीवारचे कसले असमाधान पंतप्रधानांनी बोलून दाखवले? सरळ सरळ (कोर्टात सिद्ध होऊन, आणि उरलेला खटला अजून बाकी असताना) तुम्ही गुन्हेगारच आहात असे त्यांना म्हणायचे होते. हे देशाच्या पंतप्रधानपदी बसलेल्य व्यक्तीसाठी बेजबाबदार विधान आहे. बाकी त्या पत्रकारपरिषदेबाबत चर्चा करण्यासारखा एकमेव मुद्दा म्हणजे - ती पत्रकार परिषद घेतली कि घ्यायला लावली? असो, तब्बल तीन वर्षानंतर बोलले हेही नसे थोडके!

श्रीगुरुजी's picture

4 Jan 2014 - 1:10 pm | श्रीगुरुजी

>>> कुठल्याही पदावरील व्यक्ती आपल्या कर्तव्यांना चुकली अशा आरोपाखाली जर नि:पक्ष व परिणामकारक चौकशी व्हायची असेल तर ती व्यक्ती चौकशीच्या काळापुरती त्या पदावरून बाजूला केली जावी लागते. जर आरोप गंभीर असतील अन ती व्यक्ती पुरावे नष्ट करू शकेल अन साक्षीदारांच्या साक्षी साम-दाम-दंड-भेद यांच्या आधारे स्वतःच्या सोयीनुसार बदलून घेण्याची शक्यता दिसत असेल तर त्या व्यक्तीला तुरुंगात ठेवले जाते.

भारतातील बहुसंख्य नेत्यांवर (पंतप्रधानांसकट्)भ्रष्टाचार्/गुन्हेगारीचे गंभीर आरोप आहेत. तुमच्या तर्काप्रमाणे या सर्वांना तुरूंगात असायला हवं. किमान त्यांना पदावरून तरी दूर करायला हवं. पण त्यांच्याजागी जे नवीन नेते येतील त्यांच्यावरही आरोप झाले तर काय करायचं? यासाठी झटपट खटले निकालात काढणे व न्यायालयाच्या नियंत्रणाखालील एक पूर्ण वेगळी तपाससंस्था असणे आवश्यक आहे. अर्थात तुम्ही म्हणता त्यात थोडेसे तथ्य आहे. कोळसा घोटाळा आपल्यापर्यंत पोहोचत आहे हे पाहिल्यावर पंतप्रधान कार्यालयाने (म्हणजे नक्की कोणी?) चौकशीचा अहवालच बदलून टाकला व त्यानंतर त्यासंबंधीच्या फाईल्स सुद्धा नष्ट केल्या. आपले तथाकथित स्वच्छ पंतप्रधान पदावर असतानाच हे झाले आहे.

>>> आता गुजरातमधील हिंसाचाराच्या काळापासून एकच व्यक्ती मुख्यमंत्री पदावर आहे. ज्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीविरुद्ध पुरावे जतन करून ठेवायचे आहेत व न्यायालयात साक्षी द्यायच्या आहेत ते सर्व जर त्या व्यक्तीच्याच हाताखाली काम करणार असतील तर त्या व्यक्तीवरील आरोप न्यायालयात सिद्ध करणे अशक्य आहे.

असं होईलच असं नाही. लालू मुख्यमंत्रीपदावर असतानासुद्धा त्याच्यावर खटला होऊन उशीरा का होईना त्याला शिक्षा झाली. लालू, जगन्नाथ मिश्रा, पप्पू कलानी अशी इतरही उदाहरणे आहेत.

>>> कुणासाठी हजार अकराशे लोक मारले जाणे व त्याविरुद्ध काही करण्यात राज्य सरकार फारसे काही करू न शकणे ही किरकोळ बाब असू शकते व कुणासाठी अतिशय गंभीर.

राज्य सरकारने वेगात पावले उचलली नसती हाच आकडा याहून जास्त वाढला असता. एक लक्षात घ्या दंगलीत मारल्या गेलेल्या अंदाजे ९०० जणांपैकी ३०० हून अधिक पोलिस गोळीबारात मारले गेले आहेत. पोलिस दंगल थांबविण्याचा प्रयत्न नक्कीच करत होते.

>>> किमान भारताचे सध्याचे पंतप्रधान व त्यांच्या अगोदरचे पंतप्रधान यांनी या कामगिरीवरील आपले असमाधान अनुक्रमे स्पष्टपणे व संदिग्धपणे बोलून दाखवले आहे. पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तींची यावरची मते देशासाठी फार महत्त्वाची आहेत असे मला वाटते.

म.म.सिंगांच्या मतालाही कणभरही किंमत नाही. जो माणूस आपले सहकारी इतका भ्रष्टाचार करत असताना गप्प बसून राहतो आणि त्यांचे समर्थन करतो त्याच्या मताला काय महत्त्व आहे? आता वाजपेयींचं मत पाहिलं तर, १-२ गोष्टी सांगता येतात. "मोदींनी राजधर्म पाळावा" असे ते म्हणाले होते असं अनेकवेळा सांगण्यात येतं. पण या वाक्यानंतर "आणि ते (मोदी)तो पाळत आहेत" असं पुढचं वाक्य होतं. हे पुढील वाक्य कधीच का चर्चेत येत नाही? मोदींना हटवावे असे त्यांचे जून २००२ मध्ये मत होते. पण अडवाणींनी त्याला विरोध केला असं म्हणतात. यातलं खरंखोटं माहित नाही. पण कदाचित आपल्या सरकारच्या स्थैर्याची त्यांना काळजी असावी. कारण ममता बॅनर्जी २००१ मध्येच बाहेर पडली होती. रामविलास पास्वान गुजरात दंगलीनंतर बाहेर पडला. त्यांच्यापाठोपाठ दंगलीचे कारण देऊन अजून काही पक्ष बाहेर पडू नयेत असं त्यांना वाटत असावं. हा माझा अंदाज आहे.

रमेश भिडे's picture

4 Jan 2014 - 5:31 pm | रमेश भिडे

आप आणि केजरीवाल याना मिडियात मिळनारी अवास्तव प्रसिद्धी आणि मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट क्षेत्रातिल आकर्शित होत असलेले दिग्गज इत्यादि स्थिती पाहुन वर मोदी व भाजप ची मते फोडुन कोन्ग्रेस विरोधी मतविभाजन करुन भाजप ला सत्तेपासुन रोखण्यासाठी ही चाल आहे

मोदीन्च्या वाढत्या प्रभावाने गळितगात्र झालेल्या सोनिया बाइना व्हॅटिकन मधुन सुचना आली की तुम्ही मोदीना रोखण्यासाठी केजरीवाल याना पाठिम्बा द्यावा. त्यामुळे आपोआप मिडिया चा रोख मोदी वरुन केजरीवाल आणि आप कडे वळेल . लोक्सभा निवडणुका होइपर्यन्त पाठिम्बा चालू ठेवा ,नन्तर कधिही ते आपचे सरकार कोसळवता येइल.

हुप्प्या's picture

4 Jan 2014 - 10:34 pm | हुप्प्या

मनमोहनसिंग यांची पत्रकार परिषद काही दिवसांपूर्वी पार पडली. त्यात पंतप्रधान म्हणून एक प्रामाणिक निवेदन ऐकायला मिळेल असे वाटले होते. पण एका सच्च्या काँग्रेसनिष्ठाप्रमाणे गांधी घराण्याला कडक सलाम आणि मोदींवर बेताल दुगाण्या असे अजब वक्तव्य ऐकायला मिळाले.
कोर्टाने आजच्या घडीला तरी मोदींना निर्दोष ठरवले आहे वगैरे कंटाळवाणे आणि बालिश तपशील विसरून ह्या उताराला लागलेल्या माणसाने मोदींनी जातीने दंगली घडवून आणल्या आणि ते पंतप्रधान बनले तर देशाचे वाटोळे होईल अशी शापवाणी उच्चारली. थोडक्यात ह्या काथ्याकूटाचा विषय विचहंटिंग, त्याचीच री ओढली आहे. काँग्रेसने शिखांच्या शिरकाणात जातीने भाग घेतला त्याचे काय? का फक्त मुस्लिमांविरुद्ध दंगली करणे हे शिखाविरुद्ध दंगली करण्यापेक्षा जास्त वाईट आहे असे काही मतपेढीनिष्ठ तर्कट आहे?

हे करत असताना लाडक्या युवराज राहुलबा़ळाला पंतप्रधानपदाकरता सर्वथा योग्य असल्याचे प्रशस्तीपत्रक दिले. ते कशाच्या आधारावर? जो अजाण बालक पंतप्रधान व मंत्रीमंडळाचा निर्णय फाडून कचर्याच्या टोपलीत फेका असे बेताल बडबडतो, पक्षाचा उपाध्यक्ष असताना त्याविषयी पक्षाच्या लोकांशी विचारविनिमय करण्याच्या भानगडीत पडत नाही तो माणूस देशाचा कारभार हाकण्याकरता सुयोग्य?
ह्या व्यासपीठावरही मनमोहनसिंगाचे एक उत्कृष्ट अर्थतज्ञ वगैरे गुणगान केले गेले आहे. पण त्याचा काही उजेड देशाच्या कारभारावर पडलेला दिसत नाही. गांधी घराण्याच्या योग्य त्या व्यक्तीच्या चरणावर पगडी ठेवून आपली निष्ठा वेळोवेळी व्यक्त करणे आणि बाकी दगडी, निर्विकार चेहरा घेऊन मिरवणे इतकेच कर्तृत्व दिसते.
लोकांना आपलेसे करणारे वक्तृत्व नाही, पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका मांडायचा प्रांजळपणा नाही, (गेल्या दहा वर्षात एका हातावर मोजता येतील इतक्याच पत्रकार परिषदा!) आणि जर काही तत्त्वनिष्ठा असेल तर त्याकरता पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायचीही धमक नाही, भ्रष्टाचाराची इतकी प्रकरणे होत असताना त्यावर कारवाई करण्याची हिंमत नाही.
एकंदरीत एक अत्यंत नालायक पंतप्रधान अशीच इतिहास ह्या माणसाची नोंद करेल अशी खात्री आहे. पुन्हा असला माणूस भारताच्या नशिबी येऊ नये. एकवेळ युवराज सम्राट बनले तर चालतील पण असला यंत्रमानव नको.

मन१'s picture

13 Jan 2014 - 12:00 am | मन१

पब्लिकनं इतकी आवर्जून दखल घेतल्याबद्दल आभार. अगदि माझ्या लिखाणातली तुम्हाला वाटणारी चूक दाखवण्यासाठीही मला कन्सिडर केलत, हे महत्वाचं.
मूळ शंका ही "मोदी" ह्या विषयाबद्दल नव्हती. तो थोडासा अस्पष्ट विषय ठरेल.
"मोदींबद्दल विकास व क्लिंटन अमुक भूमिका का घेतात" ह्यापुरत्याच त्या शंका आहेत.
त्यामुळे मी तेवढ्याबद्दल बोलतो. पूर्ण राजकिय कॅनव्हास मला झेपणेबल वाटत नाही.
.
.
@क्लिंटन :-
कोणतीही राजकीय भूमिका न मांडता हे वाक्य फारसे समजले नाही.
मला सरळ एखादा राजकिय स्टँड घेण्यात काहीही चूक वाटत नाही. उमेदवार क्र १ व उमेद्वार क२ ह्यांच्या नुसत्या फायद्या तोट्यांबद्दल बोलायचं आणी शांत बसायचं ही झाली एक पद्धत. पण उमेदवार क्र१ हा उमेदवार क्र२ ह्यांच्यापेक्षा चाम्गला वाटत असेल तर सरळ तसे सांगणे ह्यात चूक काहिच नाही. उलट असा स्पष्ट स्टँड असणे इष्ट वाटते.
भाजीप (भारतीय जीना पक्ष) म्हटले होते
राइट. ह्यामुळेच काही प्रश्न होते.
.
.

@विकास
हे "guiilt by association"चे एकदम चपखल उदाहरण आहे. आधी मोदींना नावे ठेवायची मग कोणी जर कोणी त्यांच्या बाजूने बोलले तर त्यांनापण हार्डलायनर रॅडीकल बोलायचे. आता येथे उलटे... तुम्हाला माहीत असलेले मोदी समर्थक फेसबुकवर आणि खाजगीत वाट्टेल ते बोलतात म्हणून मग मोदी वाईट
हम्म. बरोबर आहे. dealign करणे जरुरी आहे.मान्य.
पण एकदा का ती दंगल २००२ च्या वेळच्या आटोक्यात आल्यानंतर कितीवेळा दंगली झाल्या अथवा कितीवेळेस अगदी किरकोळ देखील धार्मिकतेवरून गडबडी झाल्या?
माझ्या माहितीत अशा दंगली मोठ्या स्केलवर झालेल्या ऐकण्यात-वाचण्यात नाहित.
.
.
मोदींनी नक्की दंगल आटोक्यात आणायला काय काय केले आहे हे आता संदर्भासहीत कोर्टात सिद्ध झाले आहे.
हे मान्य. पूर्ण मान्य. पण शंका अशी की दरवेळी कोर्टाकडे पहाणं भाग पडतं. जर फक्त कोर्टाचे गणित लक्षात घेतले, तर खूपशा गोष्टी कोर्टात शिद्ध झालेल्या नाहित. फार फार थोड्या राजकारण्यांना सजा झालेल्या आहेत. कित्येकजण निर्दोष सिद्ध झालेत. हे मी मोदिंबद्दल म्हणत नाहिये. इतर कित्येकजण अगदि मुलायम-मायावती ते जयललिता.... सारे सारे कैक केसे मध्ये मुक्त झालेत . कोर्टानं ज्या राजकारण्यांविरुद्ध निकाल दिले असे बिग शॉट्स मला माहित असलेले म्हणजे इंदिरा गांधी (निवडणोक गैरव्यवहार) , नंतर नरसिंह राव ह्यांना न्या. अजित भरिहोक ह्यांनी सश्रम कारावास ठोठावला. पण वरच्या कोर्टाने तोही निकाल फिरवला. ह्याव्यतिरिक्त अनेकानेक लोकांवर अनेकानेक आरोप झाले. सिद्ध काहिच नाही.(युती सरकारच्या काळात घोटाळ्यांचा विक्रम झाला होता म्हणतात. पण फक्त तसे म्हणतच राहते पब्लिक. प्रत्यक्षात कोर्टात कोणतेच प्रकरण पुढे अजत नाही. फार तर नेते मंडळी राज्यस्तरावर राजीनामा देउन राष्ट्रिय स्तरावर निवडून येतात. मनोहर जोशींपासून अनेक उदाहरणे आहेत.)
म्हणजे कोर्टाच्या हिशेबाने आख्ख्या भारतात पाच-सात किंवा फार तर अजून थोडीफार मंडळीच काय ती भ्रष्ट आहेत.
बरं, समस्या अशी होते की कोर्टाचे निर्णय अतिरेकी संथगतीने चालतात(व्यक्ती म्रुत होइस्तोवर आणि मग फाइअल बंद होते.) म्हणून फक्त आरोप खरे धरायचे तर कोण व्यक्ती कोणावर कसले आरोप करेल ह्याला काही धरबंध नाही.
राजकिय मतं बनवताना आम पब्लिकचा हा लोच्या होतो.
ह्या केसमध्ये त्यातही मोदिंची बाजू फारच बिनचूक असावी असं दिसतं ; कारण खुद्द केंद्रातील सत्ताधारी मंडळी टार्गेट केल्यासारखी हात धुवून मागे लागला होती. पण नहेमीच राजकीय गोष्टींचा विचार करायचा झाला तर कसा करावा हेच कळेनासे होते, हे त्या निमित्ताने आठवले, जरा अवांतर होत असले तरी इथे टंकले.
बाकी आपली भूमिका पुनश्च स्पष्ट झाली , आभार.
.
.
.
@क्लिंटन पार्ट २ :-
२००४ मध्ये मिडियामध्ये जयेंद्र सरस्वती प्रकरणाचे चर्वितचर्वण किती तास चालू होते आणि निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्या बातमीला किती कव्हरेज मिळाले
यप्स. ह्या प्रकाराचे आश्चर्य वाटले.मला वाटते साध्वी प्रज्ञासिंग ह्यांच्यावरील चार्जशीटाही परत घेतली जात आहे. (किंवा अद्याप घेतली नसली तरी गुन्हा सिद्ध होण्यापूर्वी "भगवा दहशतवाद" नामाक कॉन्स्पिरसी खुद्द केंद्रिय गृहमंत्री बोलत होते.)
मिडियाचय भूमिकेबद्दल शंका आहेच.
.
.
शेवटी आपल्या राज्यपध्दतीत आपल्यापुढील पर्याय आहेत त्यापैकी आपल्या मते सर्वात चांगला (किंवा कमी वाईट) पर्याय निवडण्याव्यतिरिक्त आपण फारसे काही करू शकत नाही.त्या दृष्टीने माझा पाठिंबा आज मोदींना आहे. आजही माझ्या अपेक्षांमध्ये मोदींपेक्षा अधिक फिट बसणारा आणि पंतप्रधान व्हायची थोडी तरी शक्यता असलेला नेता पुढे आल्यास त्याला पाठिंबा द्यायला माझी एक मतदार म्हणून अजिबात ना नाही.
हा मुद्दा व मनमोहन विरुद्ध अडवाणी , मनमोहन विरुद्ध मोदी ह्या तुलनेत आपण कुणाला निवडता ह्याबद्दलच्या मतांमुळे भूमिका स्पष्त झाली. ती इतकी स्पष्ट आहे, की आता अधिक प्रश्न नाहित. कधी पडलेच, तर नक्कीच लिहीन.
.
.
क्लिंटन पार्ट ३ :-
वाजपेयी सरकारने १९९९ मध्ये १९८४ च्या दंगलींची चौकशी करायला निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली (बहुदा त्यांचे नाव नानावटी होते) आयोग नेमला होता. माहितीपूर्ण. आभार.
.
.
बाकी, हतोळकर, श्री गुरुजी आणि ह्या उपचर्चेतील इतर सर्वच मंडळिंचे प्रतिसाद वाचलेत. पण आता सध्या हरेकास उपप्रतिसाद देणे जमत नाहिये. लवकर परतण्याचा प्रयत्न करेन. त्यावेळी चर्चा ताजी असेल तर ह्यात अधिक भर घालेन.

@क्लिंटन & others :-
वरील काय्दा- न्यायालय ह्याविषयीची शंका फक्त विकास ह्यांना नाही. इतरही सर्वांनीच "विचार कसा करावा " हे सांगितलं तर बरं होइल. किंवा प्रत्येकानं तो/ती स्वतः विचार कसा करतो/करते हे सांगावं(हे अवांतर आहे. मोदी-गोध्रा वगरिए पुरतं नाही.). प्रश्न प्रामाणिकपणे विचारत आहे :- न्यायालयानं शिक्षा ठोठावली तर गुन्हेगार हे नक्कीच. पण मुळात भारतात केसेस निकाली लागण्याचं प्रमाण अल्प नव्हे नगण्य आहे. त्यातही राजकिय किंवा प्रभावशाली मंडळींना काही शिक्षा होत नाहित काही अल्प केसेस वगळता असा अनुभव आहे. आता ह्या परिस्थितीत, ह्या पार्श्वभूमीवर विचार कसा करावा? तुम्ही लोकं कसा करता?

क्लिंटन's picture

14 Jan 2014 - 10:18 pm | क्लिंटन

बरं, समस्या अशी होते की कोर्टाचे निर्णय अतिरेकी संथगतीने चालतात(व्यक्ती म्रुत होइस्तोवर आणि मग फाइअल बंद होते.) म्हणून फक्त आरोप खरे धरायचे तर कोण व्यक्ती कोणावर कसले आरोप करेल ह्याला काही धरबंध नाही.
राजकिय मतं बनवताना आम पब्लिकचा हा लोच्या होतो.

हो बरोबर आहे ना.जोपर्यंत केस कोर्टात लटकलेली आहे तोपर्यंत असा लोच्या असला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.पण प्रश्न निर्माण कधी होतो?कोर्टाचा निर्णय काहीही असला तरी आम्ही म्हणतो म्हणून मोदी दोषीच असा हेका लावला जातो तेव्हा.अशा म्हणण्याला पूर्वग्रह का म्हणू नये? असे म्हणणाऱ्यांच्या मांदियाळीमध्ये खुद्द पंतप्रधानांचाही समावेश होतो ही दुर्दैवाची गोष्ट.आणि या प्रवृत्तीला मिडियावाले आणि तथाकथित विचारवंत हातभार लावत असतात.

सुनील's picture

15 Jan 2014 - 8:37 am | सुनील

कोर्टाचा निर्णय काहीही असला तरी आम्ही म्हणतो म्हणून मोदी दोषीच असा हेका लावला जातो तेव्हा.अशा म्हणण्याला पूर्वग्रह का म्हणू नये?

अगदी हेच शरद पवार यांच्याबाबतीतदेखिल होते की! कोर्टाबिर्टाचा निर्णय सोडाच, त्यांच्यावर अद्याप एक केसही दाखल झालेली नाही. तरीही, महाराष्ट्रातील (विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील) कुठल्याही कथित घोटळ्यात त्यांच संबंध असल्याची चर्चा होतेच ना? (उदा. लवासा)

थोडक्यात पूर्वग्रहाबाबत म्हणाल तर, मोदी एकटे नाहीत!!

हुप्प्या's picture

15 Jan 2014 - 11:10 am | हुप्प्या

पवारांची लवासातली लफडी आणि मोदींवरील आरोप यात फरक आहेत.
एका धर्मावर डूख धरून त्या धर्माचे लोक ठार मारण्याचा आरोप जो गुन्हा हिटलरच्या वंशच्छेदाइतका गंभीर आहे असा आरोप मोदींवर आहे. हा इतका गंभीर आरोप आहे की भक्कम पुराव्याशिवाय असा करता कामा नये. दुसरीकडे शेतीची जमीन लाटून त्यावर आलिशान वसाहत निर्माण करणे, स्वतःचे वजन वापरुन कामे पटापट केली जातील असे बघणे आणि स्वतःचा थेट सहभाग झाकला जाईल अशी खबरदारी घेणे. केंद्रीय पर्यावरण मत्री जयराम रमेश यांनी लवासाच्या अनियमिततेबद्दल अनेक खटले दाखल केले आहेत. पवारांनी अशा खटल्यांच्या विरुद्ध अनेक प्रयत्न केले आहेत. अगदी उघडपणे. परंतु शिवसेनेपासून भाजपापर्यंत सर्व नेते पवारांच्या खिशात असल्यामुळे कुणाचीही त्यांच्याविरुद्ध कारवाई करायची छाती होत नाही. तथापि परिस्थितीजन्य पुरावा हा संशय निर्माण करायला पुरेसा आहे.
मोदींचा तथाकथित मुस्लिम वंशच्छेद आणि पवारांचा तथाकथित लवासा भ्रष्टाचार हा एका मापाने तोलला जाऊ नये.
उच्चपदस्थ राजकारणी भ्रष्टाचार करतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. उच्चपदस्थ राजकारणी डूख धरुन एका धर्माच्या लोकांना सरकारी यंत्रणा वापरून ठार मारतात हे तितके सार्वत्रिक नाही. असामान्य दाव्यांकरता असामान्य पुरावे लागतात.

प्रदीप's picture

11 Apr 2014 - 6:04 pm | प्रदीप

आजची बातमी:

गुजरातमधील २००२ साली झालेल्या दंगलीसंदर्भात SIT ने श्री. मोदींना निर्दोषी ठरवले होते. त्या निर्णयाची तपासणी केली जावी असा अर्ज दाखल करून घेण्यास आज सुप्रीम कोर्टाने नकार दिला.

तसेच सुप्रीम कोर्टाच्या वरीष्ठ न्यायाधीशांचा (ज्यामध्ये 'अल्पसंख्याकांतील एक व्यक्ति असावी') समावेश असलेली नवी SIT बनवण्यासही सुप्रीम कोर्टाने ह्यावेळी नकार दिला.

पैसा's picture

11 Apr 2014 - 9:44 pm | पैसा

SIT म्हणजे SIT. त्यात अल्पसंख्यांक समाजाची व्यक्ती असावी या मागणीचा अर्थच कळला नाही. आपल्याकडे अशा एजन्सीमधे धर्माधारित आरक्षण कधीपासून सुरू झाले? मग असे अल्पसंख्य समाजाचे असलेले पदाधिकारी मोदींच्या विरोधातच असतील हे गृहीतक कोणी आणि का मांडावे? त्यांच्या न्यायबुद्धीवर हा एकप्रकाराने अविश्वासच दाखवला म्हणायचा.

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2014 - 8:53 pm | श्रीगुरुजी

>>>> गुजरातमधील २००२ साली झालेल्या दंगलीसंदर्भात SIT ने श्री. मोदींना निर्दोषी ठरवले होते. त्या निर्णयाची तपासणी केली जावी असा अर्ज दाखल करून घेण्यास आज सुप्रीम कोर्टाने नकार दिला.

>>> तसेच सुप्रीम कोर्टाच्या वरीष्ठ न्यायाधीशांचा (ज्यामध्ये 'अल्पसंख्याकांतील एक व्यक्ति असावी') समावेश असलेली नवी SIT बनवण्यासही सुप्रीम कोर्टाने ह्यावेळी नकार दिला.

सत्यमेव जयते!