ओल्या फेण्या

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in पाककृती
20 May 2013 - 7:38 am

आज मी जी recipe इथे share करत्ये तो खास कोकणातला पदार्थ आहे. तांदळापासून बनणारा हा पदार्थ अतिशय साधा आणि कमीत कमी साहित्य वापरून तयार होतो. मात्र खावासा वाटला आणि करून खाल्ला असा मात्र नाही. याच्या तयारीला थोडा वेळ द्यावा लागतो. याला कोकणामध्ये ओल्या फेण्या म्हणतात. काहीजण त्यांना पापड्या देखील म्हणतात. या फेण्या वाळवल्या कि तळायच्या फेण्या तयार होतात. अतिशय हलक्या आणि कुरकुरीत तळलेल्या फेण्या जिभेवर अक्षरश: विरघळतात.
चला तर मग वळूया या आगळ्या recipe कडे.

साहित्य:
१ वाटी तांदूळ
१ Tb sp खसखस
चवीनुसार मीठ
दही

कृती:
१) तांदूळ धुवून घ्यावे. दुप्पट पाणी घालून भिजवावे व झाकून ठेवावे. ३ दिवस हे तांदूळ तसेच ठेवावे. पाणी बदलू नये.
साधारण तिसऱ्या दिवशी त्याला आंबूस वास येतो.
२) ही fermantation process झाली कि चौथ्या दिवशी तांदूळ धुवावे. धुतलेले तांदूळ mixer वर वाटून घ्यावेत. वाटताना त्यात अजिबात पाणी घालू नये. ते घट्टच वाटावेत. हे batter इडलीच्या पिठाइतके घट्ट असावे.
३) नंतर त्यात खसखस आणि मीठ घालून नीट mix करावे. हे झाले फेण्यांचे batter तयार.
४) फेण्या करायच्या वेळी प्रथम stand मधील ताटल्यांना थोडसे दही लावावे. नंतर त्यावर batter डावेने घालून घ्यावे. एका stand मध्ये ६ ताटल्या मावतात. ताट्ल्यांवर घातलेले batter खूप जाड अथवा पांतळ असू नये.
५) ढोकळ्याच्या cooker मध्ये किंवा मोठ्या पातेली मध्ये तळाशी पाणी घ्यावे व gas वरती उकळण्यास ठेवावे.
६) पाणी उकळले कि फेण्यांचा stand त्यात ठेवावा व झाकण लावावे. साधारण १० - १५ मिनिटांनी झाकण काढावे व गरम गरम फेण्या दह्याबरोबर serve कराव्यात.

aaa
aaaaa
aaaa
aa

काही महत्वाचे:
१) फ़ेण्या करण्यासाठी तांदूळ आंबणे खूप गरजेचे आहे.
२) आवडत असल्यास या batter ला तुम्ही मिरची कोथिंबीरही वाटून लावू शकता.
३) फ़ेण्यांचा stand तुळशीबाग पुणे येथे नक्की मिळेल. जर stand नसेलच तर stand ऐवजी मोठ्या पानांवर फ़ेण्या लिहू शकता जसे की केळीची पाने.

मूळ प्रेषकः रेश्मा ओक.
ब्लॉग लिंकः http://www.takkuuu.blogspot.in/
प्रतिक्रिया सदर लिंक वर दिल्या तरी चालेल.

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

20 May 2013 - 10:56 am | दिपक.कुवेत

फोटो अतिशय जीवघेणे आहेत. अस वाटतय आत्ताच फेण्या उचलुन तोंडात टाकाव्यात. ओल्या फेण्या अतिशय आवड्तात. पण आम्हि त्यात खसखस नाहि घालत. जर फेण्यांचा स्टँड आणि पानं नाहिच मिळाली तरी हि करण्याची अजुन एक पदधत म्हणजे गॅसवर एका मोठया पातेल्यात पाणी उकळलायला ठेवावं. स्टिलच्या ताटलीच्या मागच्या भागाला तेलाचा हात लावुन एक डाव हे बॅटर घालावे आणि ताटली हळुवार गोलाकार फिरवावी (आपण गाडिचं ड्रायव्हिंग व्हिल फिरवतो तसं). एक मध्यम आकाराच्या गोल फेण्या झाल्या कि हि ताटली उकळत्या पाण्यावर ठेवावी (झाकण ठेवतो तसं). आतल्या वाफेने एक ५-१० मि. फेण्या तयार होतात. जरा गार झाल्या कि पाण्याचा हात लअवुन अलगद सुट्या होतात. वेल्लाभटजी खुप छान आठवण करुन दिलीत. धन्यवाद.

दिपक.कुवेत's picture

20 May 2013 - 11:03 am | दिपक.कुवेत

ह्या फेण्या सायट्या (सायीचं दहि) बरोबर मस्त लागतात. कोकणात काहि ठिकाणी दह्याबरोबर नारळाचं दुध पण घेतात.

चाणक्य's picture

20 May 2013 - 11:03 am | चाणक्य

आशेने उघडला होता धागा म्हणुन सांगु....

चाणक्य's picture

20 May 2013 - 11:04 am | चाणक्य

पा.कृ. मस्त आहे

वेल्लाभट's picture

20 May 2013 - 11:09 am | वेल्लाभट

पण... काय झालं राव?

चाणक्य's picture

20 May 2013 - 11:33 am | चाणक्य

मला वाटलं फेणी करायला शिकवताय कि काय...

प्रसाद गोडबोले's picture

20 May 2013 - 8:28 pm | प्रसाद गोडबोले

मी ही त्याच आशेने आलो होतो ...:(

प्रचेतस's picture

20 May 2013 - 11:09 am | प्रचेतस

हा प्रकार भयानक आवडतो. ताटल्यांशिवाय कुठल्याशा पानांवर पण थापून केलेल्या तांदळाच्या पापड्या खाल्लेल्या आहेत.

सौंदाळा's picture

20 May 2013 - 11:37 am | सौंदाळा

छान.
आंबोळीचेच छोटे भावंड वाटत आहे.

प्रभाकर पेठकर's picture

20 May 2013 - 11:40 am | प्रभाकर पेठकर

ह्याला आम्ही तांदूळाच्या पापड्या म्हणतो. गरम गरम असताना कच्च्या गोडेतेलात बुडवून खायचो. आमच्याकडेही खसखस घालत नाहीत. जीरे घालतात असे वाटते. (माझ्या लहानपणीची गोष्ट आहे.)
मुख्य उद्देश, त्या वाळवून वर्षभाराची बेगमी करणे हा असायचा. वाळलेल्या पापड्या तळून मस्त लागतात.

सानिकास्वप्निल's picture

20 May 2013 - 3:17 pm | सानिकास्वप्निल

आमच्याकडे सुध्दा ह्यात जीरे घातलेले असायचे.
तळून खुपचं मस्त लागतात.

बाकी फोटो व कृती छानच आहेत :)

सूड's picture

20 May 2013 - 11:55 am | सूड

फरक येवढाच की काकू खसखस घालून करायची आणि आई जिरं घालायची. आणखी एक गोष्ट म्हण्जे तिसर्‍या दिवसापर्यंत पाणी बदललं नाही तर प्रचंड आंबट वास येतो म्हणून आई रोज सकाळी तांदळातलं पाणी बदलायची.

निवेदिता-ताई's picture

20 May 2013 - 12:16 pm | निवेदिता-ताई

अहाहा....... आम्ही लहानपणी या अशा पापड्या करायचो, पापड्या झाल्या की हळूवार हाताने काढून वाळत घालायच्या....मस्त वाटायचे, करता करताच त्यातल्या बराच्श्या गट्टम व्ह्यायच्या....हे हे

तसेच कुरडईचा चिक शिजवला की गरम गरम खायला फार आवडतो, गरम गरम चिक व त्यावर तेलघालणे.......अहाहा...
अप्रतिम चव.

प्यारे१'s picture

20 May 2013 - 12:48 pm | प्यारे१

पाकृ मस्त आहे पण ते पापड्या करताना कशाच्या पानावर करुन वाळवतात ते आठवलं.

हे जर इडलीसदृश प्रकारे खायचं असलं तर गृहिणीला दिवसभर स्वैपाकघराबाहेर येता येईल असं वाटत नाही.
थोडक्यात किती नग खाऊन बास्स करायचं?

विसोबा खेचर's picture

20 May 2013 - 12:54 pm | विसोबा खेचर

लै भारी..

मोदक's picture

20 May 2013 - 1:25 pm | मोदक

वाह!

सुहास झेले's picture

20 May 2013 - 1:30 pm | सुहास झेले

भारीच..... फोटो तर जबरीच !!!

पैसा's picture

20 May 2013 - 2:34 pm | पैसा

फेण्या खूप आवडतात. पण हल्ली खायला कोण बोलावत नै! :(

मोदक's picture

20 May 2013 - 2:58 pm | मोदक

हा स्टँड कुठे मिळेल..?

दुकानदाराला काय म्हणून मागायचे..? ("फेण्याचा स्टँड" म्हणालो तर तो गुत्त्याचा पत्ता सांगून हॅ हॅ हॅ हसेल असे वाटते आहे.)

स्टँडची गरज पण नसते रे तशी. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवायचं. ताटाच्या एका बाजूला थोडं थोडं गोलाकार पीठ पसरायचं (हे ताट पातेल्यावर व्य्वस्थित बसेलसं हवं) आणि ज्या बाजूला पीठ लावलं असेल ती उलटून पातेल्याच्या आतल्या भागात जाईलसं बघून ताट पातेल्यावर ठेवायचं. हे असलं स्टँड घेऊन किती खेळ करत बसणार.

तू म्हणतोस त्या पद्धतीने सालपापड्या करतात..

अरे हो.. हा प्रकार सालपापड्यांच्या बराच जवळ जातो.

भावना कल्लोळ's picture

20 May 2013 - 4:14 pm | भावना कल्लोळ

आम्ही कधी शिकणार हे फेण्या, साल पापड्या करायला, आणि तुम्ही लोक असे पाकु टाकून का आम्हा गरीबासनी हिणवताय…. नोट फ़ेअर …

धनुअमिता's picture

20 May 2013 - 5:13 pm | धनुअमिता

आम्ही हि स्टँड न वापरता करतो. (पध्दत सूड रवांनी सांगितल्याप्रमाणे)
आम्ही ह्या फेण्या होळी,लग्न कार्य (तळणाच्या दिवशी)ह्या दिवसासाठी वापरतो.
रुखवतात ठेवण्यासठी ह्या फेण्यांवर नावेसुध्दा लिहू शकतो.(साबूदाणे वापरुन)

कच्ची कैरी's picture

21 May 2013 - 12:16 pm | कच्ची कैरी

माझ्यासाठी ही पाककृती नविन आहे , चव नक्कीच चांगली असेल यात शंका नाही .

मस्तच पाकॄ.. आमच्याकडे पण जीरे घालुन ह्या पापड्या करायचे.. असाच गव्हाचा चीक पण करतात, तो सुद्धा एकदम मस्त लागतो.

गौरीबाई गोवेकर's picture

22 May 2013 - 8:41 pm | गौरीबाई गोवेकर

कालच खाल्ल्या. पूर्वी लग्नात रंगीत असायच्या

यशोधरा's picture

22 May 2013 - 8:58 pm | यशोधरा

भारी.

इशा१२३'s picture

24 May 2013 - 11:39 am | इशा१२३

फेण्या सुंदरच दीसताहेत.करुन बघणार.