दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरण आणि स्त्री सुरक्षितता उपाय

sanjivanik१'s picture
sanjivanik१ in काथ्याकूट
19 Dec 2012 - 10:04 pm
गाभा: 

दिल्लीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील ...........(शिव्या समजून घ्याव्यात)ना फाशी पण कमीच शिक्षा आहे. एखाद्या मुस्लिम देशा मधील सर्वात भयंकर शिक्षा द्यायला हवी. सरकारने तर लाज सोडलीच आहे . फक्त भाषणा मधून दुख व्यक्त करण्या पेक्षा कृती करावी .
अर्थात ती कृती करायला आणखी किती वर्ष घेतील देवास ठाऊक. तो पर्यंत त्या मुलीला आणि कुटुंबियांना किती त्रास होईल त्याची कल्पना न केलेली बरी.
मुंबईत बायका इतक्या तरी असुरक्षित नाही हे मात्र खर पण एकदम सुरक्षित आहेत अस पण नाही. तर समस्त स्त्रीवर्गाला विनंती कि ह्या परिस्थितीला तोंड द्यायला हत्यार पर्स मध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. तेव्हाच आपण सुरक्षित राहण्याची आणि नराधमाना वाचक बसण्याची शक्यता जास्त...

स्व सुरक्षितता आणि स्व रक्षणा साठी वेगवेगळ्या वयो गटातील स्त्री वर्ग काय करू शकतो ? किंवा केल आहे? त्याचे अनुभव ,हे जरूर इथे कळवा .

प्रतिक्रिया

ऐकीव माहितीप्रमाणे दिल्लीत तसेही आठ वाजल्यानंतर मुली, बायका फारश्या बाहेर फिरत नाहीत. हा गुन्हा बराच अवेळी झाला आहे. जे झाले त्याचा कितीही निषेध केला तरी कमीच. किती क्रूर असावे माणासाने! कामातुराणां न भयं न लज्जा असे म्हणतात त्याचा वाईट अवतार आहे हा! आता "आम्हालाही बाहेर फिरण्याचा हक्क" वगैरे मिळेल तेंव्हा मिळो, कायदे येतील तेंव्हा येवोत, सध्या स्वत:ला जपून असणे हेच शहाणपणाचे आहे असे वाटते. अगदी सातच्या आत घरात टाईप वाटेल, जुने मत वाटेल पण जीव वाचवणे महत्वाचे आहे. अवेळी घराबाहेर न पडणे.....अगदी भावा, वडीलां, नवर्‍याबरोबरही नाही. बसमधून कचरा बाहेर टाकावा तसे जर वापरून मनुष्याला टाकून देणार असले तर पुढचे आयुष्य विकलांग होऊन जगण्यापेक्षा आपापली बाहेरची कामे वेळेत आटोपून घरात बसलेले बरे.

विकास's picture

19 Dec 2012 - 10:33 pm | विकास

सध्या स्वत:ला जपून असणे हेच शहाणपणाचे आहे असे वाटते.

सहमत पण हे रिगार्डलेस कायदे असावे लागते. उदाहरणादाखलः बॉस्टन एकदम सेफ शहर आहे. येथे चार्ल्सनदीला लागून खूप छान जागा आहे जेथे अनेक जण पळायला जातात संध्याकाळी फिरायला वगैरे जातात. पण तेथे देखील पोलीस, विशेष करून स्त्रीयांना अवेळी पळायला जाऊ नका म्हणून सल्ला देतातच आणि तो न पाळणार्‍यांच्या बाबतीत घटना घडल्याचे प्रकार झाले आहेत. त्याचे कारण पोलीस सर्वत्र कायम असू शकत नाही आणि तुम्ही म्हणलात तसे "कामातुराणाम..." प्र्कारातली एकच व्यक्ती समोर येयची अशा वेळेस गरज असते.

पण तरी देखील विशेषतः दिल्लीत आणि इतरत्रही नजरेच्या स्पर्शापासून हपापलेल्या असल्या विकृत लोकांना मेसेज मिळेल असे कायदे आणि सुव्यवस्था दोन्ही हवे. त्यामुळे पब्लीकने आवाज उठवलाच पाहीजे. एकाने उठवला आता मला गरज नाही असे देखील म्हणून चालणार नाही. असो. स्मीता पाटीलला बस मधून उतरत असताना सहज धक्का मारलेल्याला पचतवायला लावणारा, अर्धसत्य मधील ओम पुरी आठवला...

यापेक्षा भयानक ही गोष्ट आहे की गुन्हासाठी वापरलेली ती स्कूलबस आहे. लहान तसेच वयात येणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना भक्ष्य बनवायला कितीसा वेळ लागणार? बरेच वर्षांपूर्वी अमेरिकेत स्कूलबस ड्रायव्हरने काही वर्तन केल्याची बातमी ऐकली होती (नक्की कधी ते आठवत नाही). फक्त मुलींची नाही तर मुलांचीही तेवढीच काळजी घ्यावी लागते.

बातमी वाचून अंगावर शहारा आला.खरं सांगायचं तर पेपरात ही बातमी सगळी वाचलीच नाही की न्यूज चॅनेलवरच्या चर्चा ऐकल्या नाहीत.कारण अशा बातम्या वाचल्या की नुसताच त्रास होतो आणि काही करता तर येत नाही.तेव्हा ही घटना रात्री नक्की किती वाजता झाली याची कल्पना नाही.जितक्या तितक्या वाजता झाली असेल तेव्हा असले गुन्हे केल्याबद्दल कडक शिक्षा व्हायलाच हवी.

आता "आम्हालाही बाहेर फिरण्याचा हक्क" वगैरे मिळेल तेंव्हा मिळो, कायदे येतील तेंव्हा येवोत, सध्या स्वत:ला जपून असणे हेच शहाणपणाचे आहे असे वाटते.

याला अगदी +१.न्यू यॉर्क-शिकागोमध्ये असे काही भाग आहेत की जिथे अंधार पडल्यानंतर गेल्यास सुरक्षिततेची खात्री नसते.अशा ठिकाणी तिथे जायचा हक्क असला तरी आपल्या सुरक्षिततेसाठी न गेलेले बरे.असाच प्रकार या केससंबंधीही.

स्वीटी's picture

20 Dec 2012 - 4:56 pm | स्वीटी

अगदी बरोबर आहे...पन तरिहि ज्या स्त्रियाना कामानिमित्त मनाविरुध जास्त वेळ बाहेर रहाव लागत आसेल त्याच्या सुरक्षेचि खरच गरज आहे...

अमोल खरे's picture

19 Dec 2012 - 10:27 pm | अमोल खरे

रेवतीताईशी पुर्ण सहमत. काही महिन्यांपुर्वी पेठकरकाकांनी एका धाग्यावर हेच सांगितलं होतं, त्यावेळी वादासाठी वाद घालण्यात आला होता. आपली सुरक्षितता आपणच पाहायची असते.

५० फक्त's picture

19 Dec 2012 - 10:34 pm | ५० फक्त

पुन्हा एकदा एक प्रामाणिक विनंती, बाकी तथाकथित सामाजिक आंतरजालीय संस्थळांवर व टिव्हीवर मिडियामध्ये या विषयावर वांझोटी चर्चा चालु आहे, तशीच पुन्हा इथं करण्यात काय हशील आहे, त्यापेक्षा अशा प्रकारांविरुद्ध आपण प्रत्येकानं आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणं आणि इच्छाशक्तीप्रमाणे जेंव्हा जिथं जे जमेल ते करत रहावं असं ठरवुन असे धागे बंद करु या का ?

रेवती's picture

19 Dec 2012 - 10:41 pm | रेवती

असे धागे बंद करु या का ?
यावरून एकच वाटतं की असे गुन्हे वारंवार होताहेत व वारंवार स्त्रिया जिथे जमेल तसे, जमेल तेंव्हा मुद्दा वर काढताहेत. ५० राव, बाईची दु:खं वगैरे मी बोलत बसणार नाही, पुरुषांनाही भावना असतात हे गृहित धरून सांगतीये की एक छोटे लेखन करण्याचा हा एक साधा मार्गही आपण का अवलंबीला नाही असे धागाकर्तीला वाटू शकते. फारतर आपण प्रतिसाद देणे थांबवू शकतो.

अति चर्चा केल्याने होणारा तुमचा त्रास मला कळतो आहे, पण असे विषय लोक मांडल्यावर लोक जरा भावनावश होऊन बोलती होतातच . पण लोक आपल्या क्षमतेप्रमाणं आणि इच्छाशक्तीप्रमाणे काय करतात ते या चर्चेतूनच कळेल, चर्चा एकदम बंद करून नाही.
तुमच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद....

माझ्या कॉलेजमध्ये एकदा एका मुलीने लायब्ररीत एकाला खेचला होता. त्याने झिप उघडली वगैरे वगैरे. हिने त्याला त्या अवस्थेतच बोंबाबोंब करत सर्वांपुढे आणले. रंगे हात पकडला गेला तो माणूस.

धाडसच म्हणायला हवे.

पैसा's picture

19 Dec 2012 - 10:53 pm | पैसा

स्वसंरक्षण. अशा वेळी अचानक केलेला हल्ला हाच सर्वोत्तम बचाव असतो. सगळ्या मुलींनी ज्युदो कराटे तैक्वांडो वगैरे आवश्यक तेवढे शिकून घेतलेच पाहिजे. एक तर ते उत्तम व्यायाम प्रकार आहेत आणि वेळप्रसंगी आपल्या वाटेला जाणार्‍याला बर्‍यापैकी इजा पोचवता येते.

शक्य तेवढे लवकर घरी पोचले पाहिजे. जेव्हा शक्य नसेल तेव्हा जास्तीत जास्त मोठा जमाव करणे आवश्यक. आयटीमधे नोकरी करणार्‍या मुली/स्त्रिया वगळता इतर कोणाला अशी उशीरापर्यंत कामावर रहायची वेळ येत नसावी, पण जर मौजमजा करण्यासाठी बाहेर रहायचे असेल तर अगदी १/२ जण असण्यापेक्षा मोठा घोळका असावा. घरी आपल्या हालचालींची खरी माहिती कळवत रहाणे हेही जरूरीचे आहे.

दिल्लीत ज्या मुलीवर अत्याचार झाला ती मृत्यूशी झुंजत आहे अशा बातम्या आल्या आहेत. जिवंत राहिली तरी कोणत्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत बिचारी राहील देवजाणे. अरुणा शानभग ३८ वर्षे नरकयातना भोगत आहे. तिच्यावर अत्याचार करणारा मात्र ७ वर्षे चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात काढून सुटला. :(

त्या प्रतिभा पाटिलनी अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्या अनेकांची फाशी माफ करून कायद्यावरचा सामान्यांचा विश्वास कधीच उडवून टाकला आहे. या हरामखोरांनाही फारशी शिक्षा होणार नाही हे निश्चित!

नर्मदेतला गोटा's picture

19 Dec 2012 - 11:07 pm | नर्मदेतला गोटा

सातच्या आत घरात

या असल्या विकॄत लोकांना काय शिक्षा व्हावी या बद्दल माझी फार टोकाची मतं आहेत. जी भारतात कधीही आमलात येऊ शकणार नाहीत हेही माहीत आहे. म्हणुन गप्प बसतो.

काय खबरदारी घेऊ शकतो?
सगळ्यात महत्वाचं स्वसंरक्षण करण्यासाठी एखादी मार्शल आर्ट शिकून घ्यावी.
ज्यांना हे शक्य नाही त्यांनी सदैव आपल्या पर्स मध्ये पेपर स्प्रे बाळगावा. जर तो उपलब्ध नसेल तर लाल मिरची पूड बाळगावी.

स्वीटी's picture

20 Dec 2012 - 5:07 pm | स्वीटी

अगदि बरोबर बोललात, ह्या विक्रुत लोकाना शिक्षा कधि होइल महित नाहि. भारतात अजुन तरि याबद्द्ल कड्क अधिनियम अमलात आलेला नाहि आनि नंतर कधि येइल असे वाटतहि नाहि..

स्वसंरक्षण करण्यासाठी मार्शल आर्ट शिकून घ्यावी.
सदैव आपल्या पर्स मध्ये पेपर स्प्रे बाळगावा.लाल मिरची पूड बाळगावी.
हे सगळे ठीक आहे पण सगळ्यात महत्वाचे कि स्वताला मर्द म्हणणार्यांनी/ सामाजानार्यानी पहिला अशा प्रासंगी मदतीला पुढे येणे जरुरी आहे..........

खरंय तुम्ही म्हणताय ते.
समजा कुणी 'मर्द' नाहीच आला मदतीला तर प्रत्येक स्त्री आपल्या परीने कशी सावधानता बाळगावी ते म्हणतोय.

बाईला वेळ प्रसंगी मदत करण्या पेक्षा तिचा मजे साठी वापर करण्यात खरा पुरुषी पणा आहे अस समज न्या र्या पुरुषांची संख्या आपल्या समाजात जास्त आहे. त्यांच्या कडून काय अपेक्षा बाळगणार

विश्वास बसत नाही की माणूस या थरालाही जाऊ शकतो.. :(
गुन्हेगारांनी गुन्हा कबूल केला आहे आणि स्वतःला फाशी द्यावी अशी मागणी केली आहे म्हणे..

पण आपल्याकडे रोजच बलात्काराच्या घटना घडत असतात..अचानक या एकाच केसला एवढी प्रसिद्धी का बरं मिळाली, हे काही कळलं नाही. कुणी 'बडे बाप के बेटे' आहेत का यात?

मृत्युन्जय's picture

20 Dec 2012 - 2:37 pm | मृत्युन्जय

पण आपल्याकडे रोजच बलात्काराच्या घटना घडत असतात..अचानक या एकाच केसला एवढी प्रसिद्धी का बरं मिळाली, हे काही कळलं नाही. कुणी 'बडे बाप के बेटे' आहेत का यात?

जी घटना घडली आहे त्याची निर्घ्रुणता न कळता हे असले भलतेच विचार मनात प्रसवतात हे बघुन मोठाच खेद झाला.

अजुनही घटनेची तीव्रता तुम्हाला कळलेली नसेल तर सांगतो:

१. एकापाठोपाठ ७ सो कॉल्ड पुरुषांनी त्या मुलीवर बलात्कार केला.
२. तिला लोखंडी कांबीने आणि इतर हत्यारांनी इतके मारले की तिची सगळी आतडी डॉक्टरना काढावी लागली.
३. आतड्याला दुखापत झाली आहे आणि दुरुस्त न करण्याइतपत आणि इतकी की अजुनही संसर्ग संभवतो तर यात केवऴ् पाशवी संभोग आणि बाह्यांगाला केलेली दुखापत एवढेच अंतर्भुत नसावे हे कळण्यासाठी फार प्रचंड बुद्धीची गरज नाही.
४. ती मुलगी यापुढे कधीही एका नॉर्मल माणसाचे वैवाहिक जीवन जगु शकणार नाही इतकी तिची अवस्था वाइट आहे.
५. हे पाशवी कृत्य केल्यानंतर त्या नराधमांनी त्या अवस्थेत त्या दोघांच्या अंगावरचे सगळे कपडे काढुन घेउन त्यांना चालत्या बसमधुन रस्त्यावर फेकले.
६. नंतर १ तास ती मुलगी त्या अवस्थेत रस्त्यात तळमळत होती.
७. गेल्या काही दिवसात तिच्यावर ७ ऑपरेशन्स झालेली आहेत आणि अजुनही होतील.
८. ती मुलगी अजुनही अधुन्मधुन कोमामध्ये जाते आणी ती जगेलच याची खात्री डॉक्टर्स देत नाही आहेत.
९. इतक्या क्रिटिकल अवस्थेत असणार्‍या स्त्रीवर उपचार करणारे डॉ़क्टर्स अतिशय तज्ञ असणार. त्यांनी अनेको सर्जेरी केल्या असाव्यात. अश्या डॉक्टरांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे की इतका पाशवी अत्याचार झालेले शरीर त्यांनी आजवर पाहिलेले नाही.

हे सगळे वाचुन अजुनही तुम्हाला असे वाटते की ही "जस्ट अनादर केस" आहे. हॅट्स ऑफ टू यु.

चिर्कुट's picture

20 Dec 2012 - 3:24 pm | चिर्कुट

खरंच मला इतके डिटेल्स माहिती नव्ह्ते. 'गँगरेप' हाच एक शब्द काल मी पाहात असलेल्या बातम्यांमध्ये होता.

तरीही मला या घटनेस मिळणार्‍या प्रसिद्धीबद्दल कसलाही आक्षेप नव्हता हे मी नोंदवू इच्छितो. एरवी बलात्काराच्या घटना कोणतीही वाहिनी इतका वेळ दाखवत नाही आणि इतके राजकारणीही अचानक याच विषयावर बोलत होते म्हणून असा प्रश्न मनात आला. कृपया गैरसमज नसावा.

बलात्काराच्या कोणत्याही केसमध्ये गुन्हेगाराला भयानक शिक्षा मिळावी याच मताचा मी आहे. काय शिक्षा मिळावी असं मला वाटतं ते मी इथे सांगू शकत नाही.

चिंतामणी's picture

21 Dec 2012 - 8:37 am | चिंतामणी

मृत्युंजय यांनी २,३ आणि ४ हे लिहीताना संयमाने लिहीले आहे. जो प्रकार झाला आहे त्यचे वर्णन इथे लिहीणे अशक्य आहे.

गणपाने म्हणले आहे तसे मलासुध्दा वाटते. पण आपल्या देशात ते शक्य नाही.

sanjivanik१'s picture

23 Dec 2012 - 1:24 pm | sanjivanik१

यातील काही DETAILS माहित होते , काही नाही. वाचताना त्रास झाला तो शब्दात सांगण शक्य नाही , पण तो होण मला आणि इतर वाचकांना पण होण आवश्यक . धन्यवाद

ह भ प's picture

20 Dec 2012 - 1:16 pm | ह भ प

हे सगळं वाचून मला तर असं वाटायला लागलं आहे की आपण गृहितच धरून चाललोय की पुरूषानं स्वतःच्या भावनांना आवर घालण्याऐवजी स्त्रीने स्वतःच स्वातंत्र्यावर निर्बंध घातलेच पाहिजेत..
जेव्हा स्त्रिया, मुली जरी कराटे तायक्वांदो वगैरेचं प्रशिक्षण नसताना, पर्समधे पेपर स्प्रे मिरची पावडर न बाळगता रात्री उशिरापर्यंत घराबाहेर निर्धास्त राहू शकतात तेव्हा कायदा सुव्यवस्था खर्‍या अर्थाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे असं म्हणता येईल.

हे सगळं वाचून मला तर असं वाटायला लागलं आहे की आपण गृहितच धरून चाललोय की पुरूषानं स्वतःच्या भावनांना आवर घालण्याऐवजी स्त्रीने स्वतःच स्वातंत्र्यावर निर्बंध घातलेच पाहिजेत..

दुरदैवानं बोचरं सत्य आहे. सध्याची परिस्थिती पहाता स्वसंरक्षणाची खबरदारी घेतली तर त्यात चुक काय?

जेव्हा स्त्रिया, मुली जरी कराटे तायक्वांदो वगैरेचं प्रशिक्षण नसताना, पर्समधे पेपर स्प्रे मिरची पावडर न बाळगता रात्री उशिरापर्यंत घराबाहेर निर्धास्त राहू शकतात तेव्हा कायदा सुव्यवस्था खर्‍या अर्थाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे असं म्हणता येईल.

असा स्वप्नातला भारत लवकर पहायला मिळावा अशी माझीही प्रामाणिक इच्छा आहे.

क्लिंटन's picture

20 Dec 2012 - 1:31 pm | क्लिंटन

सध्याची परिस्थिती पहाता स्वसंरक्षणाची खबरदारी घेतली तर त्यात चुक काय?

काय गणपाशेठ काय बोलता आहात हे?तुम्ही पण स्त्रीविरोधी म्हणून गणले जाल बरं का!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Dec 2012 - 1:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

साला वाईट वाटत अश्या बातम्या वाचुन. गंगाजल चित्रपट प्रत्यक्शात येणारे बहुतेक काही वर्षात. लोक चिडतील तेव्हा खरी कायदा सुव्यवस्था निर्माण होईल. आत्ताच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवण अशक्य आहे. पुर्वीच्या काळी अशी क्रुत्य कर्णार्याचे हात पाय तोडन्यात येत असत, तेच परत सुरु व्हाय्ला हवय.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Dec 2012 - 2:06 pm | प्रकाश घाटपांडे

कामातुराणां न भयं न लज्जा|
चीड येउन संवेदनशील माणसाचा तोल जाउन सूड घ्यावा असे वाटावे अशीच परिस्थिती आहे. बेदरकार पणे ड्रायव्हींग करुन सिग्नल तोडून जाणारे वाहनचालक पाहिले कि मनातल्या मनात मी त्यांच्या मागे जाउन त्यांच्या गाडीवर बाँब टाकतो किंवा त्यांना मशीनगनने गोळ्या घालतो. इतरांच्या जिवाशी खेळतात काय? यांना अशीच शिक्षा पाहिजे असे वर मनातल्या मनात म्हणतो. मी मनातल्या मनात या बलात्कार्‍यांना हाल हाल करुन जिवंत ठेव अशी माझ्या देवाजवळ प्रार्थना केली. फाशी हा शॉर्टकट झाला.

नितिन थत्ते's picture

20 Dec 2012 - 2:07 pm | नितिन थत्ते

घडलेल्या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. दोषी व्यक्तींवर शक्य तितकी लवकर आणि कठोर कारवाई व्हायला हवी.
:(

अर्धवटराव's picture

21 Dec 2012 - 9:19 am | अर्धवटराव

बरं.

अर्धवटराव

दरवेळी लिहितो तेच पुन्हा
१. मिरची, स्प्रे, पावडर वगैरे वगैरे
२. बलात्कार झालाच तर लगेच तक्रार करणे
३. बलात्कार झाल्यावर आंघोळ न करता + कपडे न बदलता पोलिस स्टेशनला जाणे आणि गेल्या गेल्या बायोलॉजिकल एव्हिडन्स कलेक्ट करायला लावणे (शक्य असल्यास सहा/आठ तासांच्या आत पो.स्टे.ला पोचायचे आहे, नसल्यास लवकरात लवकर)

सर्वात मुख्य बलात्कार झाला यात अजिबात लाज न बाळगणे. जी काय लाज वाटायची आहे ती बलात्कार करणार्‍याला वाटली पाहिजे..

बलात्कार हा खुनापेक्षा मोठा गुन्हा आहे वगैरे वाचलं की बलात्कारीत व्यक्तीलाच आपण अधिक कोशात ढकलत असतो असे वाटते.

अवांतरः बलात्कार करणार्‍याला कडक शिक्षेपेक्षा जलद शिक्षा महत्त्वाची वाटते. अति-शिक्षा कडक झाली की गुन्हेगार गुन्हाची कबुली द्यायला नकार देतो आणि मग ते सिद्ध करण्यासाठी बलात्कारीतेला नको त्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. शिवाय अतिकडक शिक्षेमुळे घाबरून खून करणे वगैरेही होऊ शकते.

असो. हे मत द्यायची ही वेळ नव्हे.. पण राहवत नाही

मृत्युन्जय's picture

20 Dec 2012 - 2:50 pm | मृत्युन्जय

अवांतरः बलात्कार करणार्‍याला कडक शिक्षेपेक्षा जलद शिक्षा महत्त्वाची वाटते. अति-शिक्षा कडक झाली की गुन्हेगार गुन्हाची कबुली द्यायला नकार देतो आणि मग ते सिद्ध करण्यासाठी बलात्कारीतेला नको त्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. शिवाय अतिकडक शिक्षेमुळे घाबरून खून करणे वगैरेही होऊ शकते.

ओक्के. समजा केवळ एकाच वर्षाची शिक्षा जाहीर केली तर Voluntary Disclosure of Income स्कीम प्रमाणे सगळे बलात्कारी रांगा लावुन आपल्या गुन्ह्याची कबुली देतील काय? किंवा हायकाय एका वर्षाची तर शिक्षा आहे. कर बलात्कार दे कबुली असा प्रकार करुन बलात्कारित स्त्रीचे आणि कायद्याचे काम सुकर करतील?

बलात्कार हा खुनापेक्षा मोठा गुन्हा आहे की नाही हे मला तरी वाटते समाजच ठरवेल. आणि सद्यस्थितीत तो तसा आहे. डोक्याने विचार करणार्‍या आणि माणुसकी असणार्‍या मुठभर लोकांनी समाज बनत नाही. तसे असले असते तर बलात्कारच झाले नसते.

दुर्दैवाने आजही ९९% जनता बलात्कारित मुलीला आपली पत्नी म्हणुन स्वीकारणार नाहित. लग्न आधीच झाले असेल तर गोष्ट वेगळी. समाज अजुनही इतका पुढारलेला नाही की बलात्कारित मुलीला समजवावे की " तु कशाला घाबरतेस. घाबरले तर त्याने पाहिजे. तु काहीच चुक केलेली नाही". अब्रु ही नेह्मी ज्याच्यावर बळजबरी होते त्याचीच जाते. कारण तो माणूस मनातुन खचुन जातो आणी समाजही अजुन तसेच समजतो. त्यामुळे बलत्कार्‍याला जोवर त्याच मानहानीला सामोरे जावे लागत नाही तोवर तरी त्याला त्याच्या गुन्ह्याची तीव्रता कळणार नाही आणि बलात्कारित स्त्रीला न्याय मिळाल्यासारखा वाटणार नाही.

राहता राहिला कडक शिक्षेचा प्रश्न तर कडक शिक्षा म्हणजे फाशी असेल तर त्याच्या मीही विरोधात आहे. बलात्कार्‍याला भर चौकात नागडा करुन त्याला सर्वांसमक्ष नपुंसक बनवला पाहिजे आणि मग ते त्याच्या कपाळावर, हातावर, पायावर गोंदवुन त्याला नग्नावस्थेत रस्त्यावर सोडला पाहिजे. आणि हो त्यावर २४ तास पहारा ठेवुन आत्महत्या करण्यापासुन प्रवृत्त केले पाहिजे. त्या असहाय्य, अपमानित अवस्थेत तो जगत राहिलाच पाहिजे. १० जणांना शिक्षा करा म्हणजे बंद दरवाज्याआड आपल्या बायकोवर देखील बळजबरी करण्याची हिंमत करणार नाही कोणी.

पैसा's picture

20 Dec 2012 - 3:20 pm | पैसा

अरुणा शानभाग बलात्कार आणि मारहाण यानंतर गेली ३८ वर्षे केवळ जिवंत राहिली आहे आणि तिच्यावर अत्याचार करणार्‍यावर बलात्काराचा आरोप सुद्धा लावला नव्हता म्हणे. तो पशु फक्त चोरी आणि मारहाण या दोन आरोपांवरून सात वर्षे शिक्षा भोगून नॉर्मल आयुष्य जागायला मोकळा सुटला. :(

अब्रु ही नेह्मी ज्याच्यावर बळजबरी होते त्याचीच जाते. कारण तो माणूस मनातुन खचुन जातो आणी समाजही अजुन तसेच समजतो

असे का होते? तो माणूस का खचून जातो? बलात्कार हा खुनापेक्षा वाईट आहे वगैरे वाक्ये जेव्हा समाज ऐकवतो तेव्हा आधीच भांबावलेल्या माणसाला आपल्यावर काहितरी भयंकर दिवस आले आहेत असे वाटते.

कित्येक बलात्कार तक्रार करूनही केवळ यामुळे सिद्ध होऊ शकत नाही कारण त्या स्त्रिया आंघोळ करून व त्यावेळचे कपडे जाळून, जिथे बलात्कार झाला तिथेच टाकून येतात. हे होते ते ही एकूणच 'बलात्कार' या विषयाबद्द्ल माहिती नसल्याने किंवा तितके समाज प्रबोधन नसल्याने. याविषयावर कोणी सांगायला गेलाच तर लोक यावर बोलायचे टाळतात तरी नाहितर काहितरी पोकळ भावनिक भुमिका घेतात. यात मानसिक ताण पडतो तो बलात्कारीत स्त्रियांवर

कडक कायदे (आता आहे त्यापेक्षा अधिक कडक म्हणजे फाशीच झाली कारण आजन्म कारावासाची तरतूद आधीच आहे) करून बलात्कार कमी होतील असे मानणे म्हणजे दिवास्वप्न बघितल्यासारखे वाटते.

बलात्कार हा खुनापेक्षा मोठा गुन्हा आहे की नाही हे मला तरी वाटते समाजच ठरवेल. आणि सद्यस्थितीत तो तसा आहे.

यावर मी काहिच बोलू शकत नाही. अश्याच कमेंट्स मुळे जराही चुक नसणार्‍या बलात्कारीत स्त्रिला आत्महत्या करायला समाज प्रवृत्त करत असतो. (याच वाक्याचा ध्वनित अर्थ त्याने तुला मारून टाकले असते तर परवडले असते पण हे असे कशाला सोडले! असा होतो) अश्या विधानांचा निषेध करावा तितका कमीच

प्रत्येक गुन्ह्याला किती शिक्षा असावी हे बहुमत ठरवेल याच्याशी सहमत. मी केवळ माझे मत दिले, जे सद्यस्थितीत बहुमत नाही याची पूर्ण जाण आहे.

मृत्युन्जय's picture

20 Dec 2012 - 4:13 pm | मृत्युन्जय

यावर मी काहिच बोलू शकत नाही. अश्याच कमेंट्स मुळे जराही चुक नसणार्‍या बलात्कारीत स्त्रिला आत्महत्या करायला समाज प्रवृत्त करत असतो.

बरोबर आहे. पण ज्या समाजात आपण राहतो तिथे जर ९०% लोक अजुनही याच मानसिकतेतील असतील तर सद्यपरिस्थितीत तरी बलात्कार हा खूनापेक्षा मोठा गुन्हा ठरतो. गरज आहे ती समाजाची मानसिकता बदलण्याची. पण ती इतक्या सहज बदलता येत नाही. त्यामुळे किमान कायदा कठोर करावा. तो ही जर नरमाईचा असेल तर काय उपयोग?

(याच वाक्याचा ध्वनित अर्थ त्याने तुला मारून टाकले असते तर परवडले असते पण हे असे कशाला सोडले! असा होतो) अश्या विधानांचा निषेध करावा तितका कमीच

माफ करा पण मी असे म्हणालो असे जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही फारच चुकीचे बोलत आहात. मी असे कधीच म्हणालो नव्हतो. केवळ बलात्कार हा खूनापेक्षा मोठा गुन्हा आहे असे मी म्हटल्याने मी पिडीत स्त्रियांना "मरण बरे" असा उपदेश कसा करतो ते कळत नाही. पण सद्यस्थितीत अश्या स्त्रियांचे जीवन एकुण समाज फारसे सुसह्य करत नाही हे तरी मला अमान्य करता येत नाही. अश्या परिस्थितीत तिला मिळालेला न्यायच तिचे जीवन सुसह्य करु शकतो. बलात्कार हा शारिरिक नुकसानीपेक्षा मानसिक नुकसान अधिक करतो त्यामुळे मानसिक समाधान होणारा न्यायच असावा. चोरीची शिक्षा पैशाच्या स्वरुपात होउ शकते, खूनाची शिक्षा फाशी असु शकते मग मानसिक यातनांच्या बदल्यात मानसिक यातनाच व्हायला पाहिजेत आणी पशुवत पुरुषत्वाचे प्रदर्शन करणार्‍यांकडुन त्यांची लंइगिक मर्दुमकी काड्।उन घेण्याहुन अधिक चांगला न्याय असुच शकत नाही. त्यामुळे छोट्या मोठ्या गुन्ह्यांची शिक्षा कृपा करुन बलात्काराला लावु नका.

शिवाय बलात्कारित स्त्रीने काय काळजी घ्यावी हे तुम्ही जे सांगितले ते १००% बरोबर पण अव्यवहार्य आहे. समाजाची मानसिक स्थिती लक्षात घेता सद्यस्थितीत ते शक्य नाही. पहिल्यांदा समाज प्रबोधन करावे आणि मग समाज तितपत समजुतदार झाल्यानंतर पिडीत स्त्रियांकडुन अशी अपेक्षा करावी असे मला वाटते.

मी तुमच्या विचारांशी पुर्नपणे सहमत आहे मृत्युंजय्....असच व्हायला हव.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Dec 2012 - 12:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दुर्दैवाने आजही ९९% जनता बलात्कारित मुलीला आपली पत्नी म्हणुन स्वीकारणार नाहित. लग्न आधीच झाले असेल तर गोष्ट वेगळी.

लग्न झालं म्हणजे त्या मुलीचं कोटकल्याण होतं का? लग्न ही मुलगी/स्त्रीच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे हे शिकलेले, खाऊन-पिऊन सुखी घरातले, चर्चाप्रेमी, बुद्धीजीवी लोक समजतात तर खरोखर अजून चिक्कार शिक्षणाची आवश्यकता आहे.

कोटकल्याण नसेल होत, पण लग्न झाल्यावर समाजात मानाने जगायला आधार मिळतो. आपल्या समाजातील प्रचलीत रीतीनुसार लग्न न करता रहाणे स्त्रियांसाठी फारसे भुषणास्पद नाही. त्यात बलात्कारीत मुलीला चांगल्या घरी लग्न व्हायची शक्यता जवळ जवळ नाहीच.या मुळेच बलात्कारीत मुलगी आत्महत्येचा मार्ग स्विकारते.

या चालीरीती बदलायला खरोखच प्रचंड लोकप्रबोधनाची गरज आहे. आणी पुढच्या ५० वर्षांतही आपला समाज या चालीरीती बदलेल असे वाटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Dec 2012 - 8:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

Hence the proof.

----

आमची आदर्श - सुश्मिता सेन

सुश्मिताचं कौतुक मलाही वाटतंच पण सुश्मिताकडे जे स्टेटस आहे, ज्या वर्तुळात ती वावरते आणि जो पैसा आहे, हे सगळं नसतं, तर तिने जे केलं आहे ते तिला शक्य झालं असतं का ह्याचा वस्तुनिष्ठरीत्या जमल्यास जरुर विचार करावा. Proff, if not iron solid, is not proof enough.

५० फक्त's picture

21 Dec 2012 - 10:26 am | ५० फक्त

+१, धन्यवाद यशोधराताई.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Dec 2012 - 12:49 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आमची आदर्श - सुश्मिता सेन

क्रांतिकारी जन्माला यावा पण तो शेजाऱ्याच्या घरात, नाही?

गवि's picture

21 Dec 2012 - 12:55 pm | गवि

लग्न म्हणजे कोटकल्याण नव्हे या मताविषयी:

कोटकल्याण नसले तरी लक्षकल्याण किंवा सहस्रकल्याण इतपत सुख त्याला असाईन करायला हरकत नाही.

मी काय म्हणतो, की लग्नाशिवाय फार काही नुकसान होत नाही असं का बुवा म्हणायचं? लग्न करण्यात एक सहजीवनाचा, कुटुंब बनवणं त्या कुटुंबाचा मानसिक,शारिरीक आधार असे अनेक आनंद असतात. ते नसले तर जगात इतर काहीच आनंद नाहीत असं नव्हे, पण स्वतःचा नवरा / बायको असणं, पोरंबाळं असणं हे खूप मोठं सुख आहेच. मला तर मी घरी आल्यावर पोरगं येऊन झळंबतं तेव्हा जगण्याचं सार्थक वाटतं. तीव्र निराशेच्या वेळी सुद्धा बायको आणि पोर मला जगाशी घट्ट बांधून ठेवतात. एकटेपणात वेगळं स्वातंत्र्य असलं तरी ते बॅचरलीमधे उपभोगून झालं. आता हे पाश जगण्यासाठी फार उत्तम कारण पुरवतात.

तेव्हा लग्न हे ओव्हरऑल चांगलं असू शकतं असं मानायला काहीच हरकत नाही.

ते होऊ शकलं नाही याचा अर्थ आयुष्य भकास असा नव्हे, पण ते न होण्याने एक मोठं नुकसान झालं असं म्हणणं चूकही नाही.

शैलेन्द्र's picture

22 Dec 2012 - 9:45 pm | शैलेन्द्र

अगदी अगदी...

संसार ही माया असेल , पण ती फार सुंदर आहे आणि आजतरी मला मोक्षापेक्षा ही मायाच जास्त प्यारी आहे.. लग्न करणे वा न करणे हा बर्‍यापैकी व्यक्तीगत चॉईस असला तरी समाजधारणेसाठी लग्नाचा पर्याय मान्य करणारे लोक जास्त असणे गरजेचे आहे.
शेवटी बंध तर सगळीकडेच आहेत, साधा चहा घ्यायचा म्हटला तरी सकाळी उठुन दुध आणायच बंधन असतं, बंधनात राहुनही उन्मुक्त जगता येत, आणी उन्मुक्त जगतानाही अनेक बंधन पाळावी लागतात, सो लेट इट बी..

नेत्रेश's picture

22 Dec 2012 - 2:07 pm | नेत्रेश

Sushmita is an exception, one in billion.

मृत्युन्जय's picture

21 Dec 2012 - 10:32 am | मृत्युन्जय

लग्न झालं म्हणजे त्या मुलीचं कोटकल्याण होतं का?

मी असे कुठे म्हटले आहे?

लग्न ही मुलगी/स्त्रीच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे हे शिकलेले, खाऊन-पिऊन सुखी घरातले, चर्चाप्रेमी, बुद्धीजीवी लोक समजतात तर खरोखर अजून चिक्कार शिक्षणाची आवश्यकता आहे.

म्हणजे कोणते लोक? मी असे काही म्हटलेले नसल्याने इथे मी अभिप्रेत आहे असे मला वाटत नाही तरी स्पष्ट करुन सांग म्हणजे बरे पडेल.

अजुन काय उत्तर देउ मला वाटते तुझ्या प्रतिसादाची गल्ली चुकली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Dec 2012 - 11:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हं... मग बलात्काराला बळी पडलेल्या मुलीच्या लग्न होण्याचा उल्लेख का? संबंध काय या दोन गोष्टींचा?

एखादीचा नवरा जिवंत नसेल तर तिला सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रमाला न बोलावणारे आणि "अमकी गोष्ट झाली तर तिचं लग्न कसं होणार", "लग्न नाही झालं तर तिला सामाजिक प्रतिष्ठा नाही" म्हणणारे यांच्यातला मला फार फरक दिसत नाही. सुशिक्षित, well-to-do, चर्चा करण्यास उत्सुक लोकांकडून माझ्या खूपच जास्त अपेक्षा होत्या. असो.

---

सुश्मिता सेन वेगळ्या सामाजिक वर्तुळात वावरत असेलही; तिच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचतात. किंवा ती याच समाजाचा एक हिस्सा आहे. संपर्क नसलेल्या एखाद्या परग्रहावरची नाही.

माझ्या सामाजिक वर्तुळात लग्न न करता एकापेक्षा अधिक बॉयफ्रेंड असणार्‍या, लग्न न करता मूल दत्तक घेणार्‍या किंवा लग्न न करण्याचा निर्णय घेणार्‍या स्त्रिया आहेत. संख्येने कमी आहेत, पण आहेत; आणि त्यांच्यापैकी कोणीही बहिष्कृतेचे आयुष्य जगत नाहीत. त्यांच्याबद्दल इथे कोणाला माहित असण्याची शक्यता फार नाही.

त्या आमच्या समाजाचा भाग नाहीत किंवा त्या अ‍ॅबनॉर्मल आहेत म्हणून त्यांना वेगळं काढणंही सहजशक्य आहे. (मग हे थोडं नाडीसारखं होतं, अनुभव घ्या आणि मगच विश्वास ठेवा. स्वतःच या स्त्रियांना बहिष्कृत करा, वेगळं म्हणा आणि मग म्हणा "बघा त्या वेगळ्या आहेत, बहिष्कृत आहेत.")

मृत्युन्जय's picture

21 Dec 2012 - 12:01 pm | मृत्युन्जय

हं... मग बलात्काराला बळी पडलेल्या मुलीच्या लग्न होण्याचा उल्लेख का? संबंध काय या दोन गोष्टींचा?

अर्थातच संबंध आहे. मी समाजाच्या मानसिकतेबद्दल बोलतो आहे. समाजाची अशी मानसिकता आहे. लग्न झाल्याने मुलीचे काही कल्याण किंवा अकल्याण होत असे काहिच बोललेलो नाही. लग्न ही दोन व्यक्तींची गरज असते. जितकी मुलीची तितकीची मुलाची किंवा जितकी मुलाची तितकीच मुलीची. कौमार्य आणि लग्न या २ गोष्टींचा संबंध जर समाज लावत असेल किंवा त्यांच्या पावित्र्याच्या संकल्पना जर बलात्काराशी निगडीत असतील तर संबंध नक्कीच आहे. आजही आपल्याच समाजातील पुरुष बलात्कारित मुलीशी लग्न लावायला तयार होत नाहित त्याचे कारण यामागे आहे. हे योग्य आहे असे मी कुठे म्हटल्याचे किंवा त्यामुळे स्त्रीजातीचे काही प्रचंड नुकसान होते आहे असेही मी कुठे म्हटलेले नाही. तुला माझ्या प्रतिसादाचा रोखच कळालेला नाही आहे काय?

लग्न करणे गरजेचे आहे की नाही, लग्नाशिवाय प्रेम होउ शकत नाही का आणी आयुष्यभर टिककु शकत नाही का वगैरे प्रश्न आत्तापुरते सोडुन दे. पण लग्नानंतर आधाराची आणि प्रेमाची गरज दोघांनाही असते. जर सुखा समाधानाने नांदले तर दोघांचेही त्यातुन कल्याणच होते. परंतु आयुष्याची इतिकर्तव्यता लग्नामुळे ना मुलाची होते ना मुलीची होते. मी तसे म्हटलेही नाही आहे आणि माझ्या वाक्यांतुन तसे ध्वनितही होत नाही आहे.

एखादीचा नवरा जिवंत नसेल तर तिला सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रमाला न बोलावणारे आणि "अमकी गोष्ट झाली तर तिचं लग्न कसं होणार", "लग्न नाही झालं तर तिला सामाजिक प्रतिष्ठा नाही" म्हणणारे यांच्यातला मला फार फरक दिसत नाही.

अर्थाअर्थी काहीच फरक नाही. तसे म्हटला तर आहे देखील. पहिल्या प्रकारातील लोक एका व्यक्तीसमूहाला कुठल्या तरी गोष्टीपासून वंचित ठेवत आहेत तर दूसर्‍या मधील तो व्यक्तीसमूह एखाद्या गोष्टीपासून वंचित राहिला आहे किंवा राहिल याबद्दल हळहळ व्यक्त करत आहे. यात असे व्हायला नको पण होते आहे याचे दुंख आहे. एखादी गोष्ट मिळाल्याने फायदा असो किंवा नसो पण काही चुकीच्या कारणाने त्या व्यक्तीला त्या अधिकारापासून वंचित रहावे लागते आहे ही विषण्णता आहे. दोन्हीमध्ये एकांगी विचार केलास तर काहीच फरक नाही पण नीट विचार केलास तर २ धृवांचा फरक आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Dec 2012 - 1:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे

लग्न झालं म्हणजे त्या मुलीचं कोटकल्याण होतं का?

लग्न न झाल्याने कोट कल्याण होते असेही नाही. मुळात दर वेळी टोकाला गेलेच पाहिजे का ताई ?? कुठे बलात्कार कुठे सुष्मिता सेन.. प्रतिसादातले एक वाक्य उचलायचे आणि त्यातून उगाच काहीतरी गर्भित अर्थ काढायचे कशाला?

अजून बोललो असतो, पण जाऊदे. आधीच इथे वैयक्तिक प्रश्न विचारल्याचे आरोप होतात, उगाच अजून गोंधळ नको.

यशोधरा's picture

21 Dec 2012 - 2:25 pm | यशोधरा

whatever.. :) मुद्दा समजून न घेता ताडताड आणि बेसलेस विधाने करण्यामधे हशील नाही. तितक्यापुरतीच ती ठीक वाटतात. सबब पास.

आदिजोशी's picture

21 Dec 2012 - 6:36 pm | आदिजोशी

अर्थ समजून न घेता भावनेच्या आहारी जाऊन दिलेला उथळ स्त्रीमुक्तीवादी प्रतिसाद.

'बलात्कार झालेया स्त्रीला पत्नी म्हणून स्विकारणार नाहीत' ह्या वाक्याचा अर्थ त्या मुलीला पुन्हा पूर्वीसारखी, इतर मुलींसारखी नॉर्मल वागणूक मिळणार नाही असा होतो.

आणि लग्न करून कोटकल्याण होत नसलं तरी जवळ जवळ प्रत्येक जण झक्कत लग्न करतोच नी त्या लग्नसंस्थेचे व्यवस्थीत फायदेही उपटतोच. सबब, ह्यावर बोलणं उचीत होणार नाही.

ऋषिकेश योग्य, उपयुक्त, अचूक माहिती दिली तुम्ही. धन्यवाद

दादा कोंडके's picture

20 Dec 2012 - 2:38 pm | दादा कोंडके

वरती काही प्रतिसादातल स्वसरंक्षण वगैरे वाचून गंमत वाटली. चूक ते चूकच, सध्याची परिस्थिती पाहून वगैरे म्हणजे काय ते कळलं नाही. उद्या मग, 'असं आहे ते आहे', आणि म्हणून यातून मार्ग काढण्यासाठी बुरखा घालण्याचे सल्ले सुद्धा देतील लोक!

हे म्हणजे मुंबई मनपा सारखं नाले स्वच्छ करण्याचं सोडून आता सद्ध्याची परिस्थिती पाहून लोकांना वासाचा त्रास होउ नये म्हणून त्यावर सुगंधी फवारणी करण्यासारखं आहे. :)

पुष्करिणी's picture

20 Dec 2012 - 3:01 pm | पुष्करिणी

झालेली घटना अंधार्‍या/निर्जन/गावाबाहेर्/मध्यरात्री/एकटी मुलगी वगैरे घडलेली नाहीये. अत्यंत पॉश समजल्या जाणार्‍या वस्तीत झालेली आहे. ज्या मार्गावरून ९० मिनिटे ही अमानुष घटना घ्डली त्या मार्गावर ३ पोलिस स्टेशनं आहेत.

कितीही पेपर स्प्रे, कराटे वगैरे शिकलं तरी ७ लोकांसमोर काय काय पुरं पडणार? पोलिसांच्या सांगण्यानुसार या मुलीचा मित्र अतिशय सुदॄढ समजावा असा आहे ( ही इज इक्वल टू २ असं कमिशनर म्हटले ) त्यालाही डोक्यात लोखंडी रॉड घालून मारलंय.

याची सुरूवात का झाली तर या नालायकांच्या अरबट चरबट क्मेंट्स ना 'गप्प बसा' असा शाब्दिक विरोध केल्यामुळं. नंतर त्या मुलाला मारयला लागल्यावर मुलीनं केलेला विरोध ...त्यामुळे स्वसंरक्षण करायला येत असेल आणि करायची मानसिकताही असेल तरी काय उपयोग?

टिंटेड गाडया आणि जाड पडदे असलेल्या गाडया सुप्रिम कोर्टानं बर्‍याच वर्षांपुरवी बेकायदेशीर ठरवल्या असतानासुद्धा अशी गाडी बेदरकारपणे शहरात सकाळ-संध्याकाळ फिरतेय, पोलिस अशी गाडी फिरू देतात.
या दोघांना मारण्याआधी एका सुताराला लुटलं ७ जणांनी ७५०० रूपयाला..., म्हण्जे चांगलेच सराइत/अट्ट्ल गुन्हेगा/अट्ट्ल, पहिली वेळ नसावी. जर या सुताराला पोलिसांवर जरा जरी विश्वास असता तर त्यानं ताबडतोब तक्रार केली असती आणि कदाचित पुढची घटना टळली असती.
झालेल्या घटनेसाठी मी पोलिसांना ६० % जबाबदार धरते.

दादा कोंडके's picture

20 Dec 2012 - 6:45 pm | दादा कोंडके

अत्यंत पॉश समजल्या जाणार्‍या वस्तीत झालेली आहे.

सहमत. बलात्कार तर एक्स्ट्रीम गोष्ट आहे. स्त्रियांना अगदी रोजचे येणारे अनुभव ही तसेच. अगदी आयटी कंपनीच्या बसेस मध्ये आधी जाउन एसल शीटावर पुरुष बसतलेले बघितलेत. याचं कारण नंतर येणार्‍या बायकांचे स्पर्श 'एंजॉय' करण्यासाठी' असं एका त्यापैकीच मित्रानं सांगितल. :(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Dec 2012 - 12:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

निदान काही लोकांसाठी परदु:ख शीतल नसतं आणि काही स्त्रिया स्वबडव्या (masochist) नसतात हे पाहून आनंद झाला.

यशोधरा's picture

21 Dec 2012 - 2:27 pm | यशोधरा

पुष्की +१

स्वसंरक्षण ही बाजूही महत्वाची आहे अन सामाजिक विरोधही.
घटना घडल्यानंतर चिकित्सा काय कामाची ? शक्यतो, असे प्रकार होण्यापूर्वीच आजूबाजूला लोक असतील तर त्यांनी एकजुटीने रोखले पाहिजे. अन्यथा होऊन गेल्यानंतर समजले तर बलात्कार करणाऱ्याना ओळखीच्या सर्व लोकांनी इतकेच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांनीही छी:थू करून वाळीत टाकले पाहिजे. सर्व प्रकारे त्यांची मानहानी, पदोपदी अपमान करून अन चुकीच्या वर्तनाची जाणीव करून दिली पाहिजे. ते अन्न-वस्त्र निवाऱ्याला महाग होतील अशी वेळ समाजानेच आणली पाहिजे. तरच हे प्रकार कमी होतील.

स्मिता.'s picture

20 Dec 2012 - 4:29 pm | स्मिता.

तुमचे म्हणणे पटले. खरं तर बलात्कारीला फाशीची शिक्षा देऊन एका फटक्यात मोकळं करण्यापेक्षा त्याचं जगणं अवघड करायला पाहिजे.
पण बलात्कारीची मान, अब्रू, इज्जत वगैरे वगैरे कधीच जात नसते. अब्रू जाते ती निपराध स्त्रिचीच! तुम्ही म्हणताय ती मानहानी, पदोपदीचा अपमान, समाजाकडून छी-थू स्त्री सहन करते. आरोपी मात्र स्वतःला मर्द म्हणवत अभिमानाने मिरवतो.

जसं एखाद्याने चोरी, अफरातफर केली तर ते करणार्‍याची अब्रू जाते तशी बलात्कार करणार्‍याची का जात नाही?

छे! कालपासून मन नुसतं सुन्नं झालंय. डोक्यात विचारांचा कल्लोळ होतोय पण शब्दात मांडणं जमत नाहीये. :(

स्वसंरक्षण, घरात लवकर येणे आपली काळजी आपण घेणे वगैरे ठीक आहे.यासाठी ही लिंक पहावी - http://www.womanatics.com/2012/03/9-critical-safety-rules-for-women.html
पण घरातही बलात्कार झालेल्या कितीतरी केसेस आहेत. घरात घुसलेल्या अनोळखी व्यक्तीने , ओळखीतल्या व्यक्तिने, विश्वास असलेल्या व्यक्तीने, अगदी नवर्‍याने सुध्दा बलात्कार केलेल्या केसेस आहेत. अशावेळी बाईने वागून वागून तरी किती जपून वागायचे ? मुळात बाईकडे भोग्य वस्तू म्हणुन बघण्याची मानसिकता तर बदललीच पाहिजे पण कायद्यानेही अतिकडक शिक्षा झाली पाहिजे.आणि बलात्कार करणारा गुन्हेगार शिक्षा संपवून बाहेर आलाच तर त्याला समाजात अजिबात मानाने जगता येऊ नये ..त्याला वाहन चालवण्याचा परवाना मिळू नये, बँकेत खाते उघडता येऊ नये, लोन मिळू नये,वगैरे..अशा अनेक सुविधा वा गरजा ज्या सामान्य नागरिकाला मिळतात वा असतात त्या त्याला मिळू नयेत / पूर्ण करता येऊ नयेत.त्याच्या हातावर 'मी बलात्कारी आहे' असे गोंदवावे.

कवितानागेश's picture

20 Dec 2012 - 3:56 pm | कवितानागेश

मुळात बाईकडे भोग्य वस्तू म्हणुन बघण्याची मानसिकता तर बदललीच पाहिजे>>
१००% खरे आहे.
पण कसे काय??? :(

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Dec 2012 - 9:02 am | श्री गावसेना प्रमुख

या साठी खरे तर स्त्रियांनी कणखर व्हायला हवे,वरच्या केस मध्ये जाउ द्या पण एकट्याने जेव्हा हा प्रकार होतो तेव्हा खरे तर स्त्रियांनी त्याला लाथेने नपुंसक करायला हवे,जेव्हा मानसावर हल्ला होतो तेव्हा तो जीव एकवटुन प्रतीकार करतो तसे.

मुळात बाईकडे भोग्य वस्तू म्हणुन बघण्याची मानसिकता तर बदललीच पाहिजे>>
१००% खरे आहे.
पण कसे काय???

जो पर्यंत एक पुरुष आपल्या बायकोला मान सन्मानाने घरी वागवत नाही तो पर्यंत ही मानसीकता बदलने किंवा बदलवने अवघड आहे,यात एक गोष्ट नमुद करावीसी वाटते की पाश्चात्यांचे अन्धानुकरण्,प्रत्येक शहरात बोकाळलेले पब नाइट क्लब हे सुध्दा कारणीभुत असतात,याला कोण आवर घालणार मागे इण्डीया टुडे च्या नाइट क्लब विशेषांकात एक क्लब वाल्याने सांगीतले की आमच्या क्लब मध्ये मुख्यमंत्री सुध्दा येतात म्हने, मणीपुरी होता तो खरे खोटे देवच जाणो

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2012 - 7:31 pm | llपुण्याचे पेशवेll

मुळात बाईकडे भोग्य वस्तू म्हणुन बघण्याची मानसिकता तर बदललीच पाहिजे>>

सहमत. आमच्या समोर तर प्रत्येक माध्यम हे थोड्या बहुत प्रमाणात स्त्रिचे असे चित्रण हिरहीरीने रंगवत आहे. कुठल्या नटीमधे किती सेक्स अपील आहे यालाच महत्व आहे. संस्कार होणार कसा जेव्हा माध्यमांचा मारा जोरात आहे. "मैं करू तो साला कॅरॅक्टर ढीला है" आमच्या कानावर दणदणत असतो.
असो. ती मुलगी मरणयातनातून जात असताना असली चर्चा मला योग्य न वाटल्याने हा एकच प्रतिसाद देऊन थांबतो. बाकी चालूद्या.

मानसिकता बदलणे हाच खरा उपाय आहे पण ती बदलेल याची शक्यता कमीच , पण म्हणून कुणी उपट सुम्भाने असे पाशवी कृत्य करावे हे अजिबात मान्य नाही.

स्वत: काही बायकाच लोकांच्या या मानसिकतेचा स्वताच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतात त्या पण या मानसिकतेला वाढवायला कारणीभूत आहेत आणि अप्रत्यक्षरीत्या अशा पाशवी क्र्युत्या साठी पण

तुम्ही सुचवलेले शिक्षेचे मार्ग उत्तमच .

त्या आधी आपला नवरा एक हलकट माणुस आहे हे त्या स्त्रीला कळु नये काय? त्याच्या जवळ राहण्यापेक्षा तीने घटस्फोट घेणे योग्य होते.पण दिल्लीची केस ह्या गटात मोडत नाही.
मुलींनी रात्री ७ नंतर घराबाहेर पडु नये हा त्यावरील उपाय नाही. मुळात आपल्या कडे स्त्री-पुरुष भेदभाव जाती व्यवस्थेपेक्षा खुप भिनला गेला आहे. सुंदर मुलगी किंवा बाई दिसली की आपण पुरुष अगदी वळुन वळुन त्या स्त्री कडे बघत असतो.रस्त्यावर जर कोणी एकाद्या स्त्रीच्या अगंचटी लागत असेल तर आपण बिनधास्त डोळेझाक करतो.आपण बनियन वर फिरले तरी चालेल पण स्त्री ने अंगभर कपडे घातले पाहिजेत ही मानसिकता सगळी कडे आहे.तसेच दर हजारी पुरुषांपेक्षा महिलांचे घटलेले प्रमाण देखिल खुप चिंताजनक आहे.भारतात १०००/७५० असे जवळ जवळ सगळ्या राज्यात आहे.तसेच भारतात लैगिंक भावनाचा निचरा करणे देखिल खुप अवघड काम आहे. इथे विवाहबाह्य संबध सामाजिक तसेच कायद्याच्या नजरेत मोठा गुन्हा आहे.त्यामुळे देखिल बलात्काराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.शहरात हा प्रश्न खुप गंभीर आहे. काही ठिकाणी विदेशात वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे त्याप्रमाणे आपल्या इथे काही शहरात देखिल प्रायोगिक तत्वावर वेश्याव्यवसायाला मान्यता द्यायला हवी.
आरोपीना फक्त कठोर शिक्षा करुन हा प्रश्न सोडवणे शक्य नाही. त्यासाठी लोकांच्यात जागृती करणे गरजेचे आहे. कोणी जर मुळींची छेड काढत असेल तर त्याला लगेच जाब विचारणे गरजेचे आहे.सडकसख्याहरींच्या वर पोलिसानी कडक कारवाई करणे गरजेचे आहे. स्त्रींयाची छेडछाड करणार्‍या लोकाना सरकारच्या सर्व सोयीतुन वगळुन टाकले पाहिजे. म्हणजे त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करणे,सरकारी अनुदाने किंवा शिष्युवृत्या बंद करणे,पुढची पायरी सरकारी नोकरी साठी अपात्र करणे असे उपाय करुन हे आटोक्यात येवु शकते.

अनन्न्या's picture

20 Dec 2012 - 6:30 pm | अनन्न्या

(साल-१९९१ ते१९९६) मी कॉलेज करत असताना एका दुर्गम खेडेगावातून रोज अर्धा तास सुनसान रस्त्याने चालत यावे लागे. रोजचा दिवस पोटात भितीचा गोळा घेऊनच. एकदा एक रिक्षावाला मागेही लागला होता. कशीबशी निसटून घर गाठले. अजूनही अंगावर शहारा येतो. अर्थात बसची सोयच नव्ह्ती आणि शहरात रहाण्यासारखी परिस्थीती नव्ह्ती. शिक्षण हवे असेल तर पर्याय नव्हता. त्यावेळी बाबांनी सांगितलेले एक वाक्य आठवते, माणसा व्यतिरीक्त कोणताही प्राणी उगाच अंगावर येत नाही. वाघ आला तरी तो आपल्या वाटेने जाईल पण माणसाचा भरवसा नाही.

विकास's picture

21 Dec 2012 - 12:11 am | विकास

माणसा व्यतिरीक्त कोणताही प्राणी उगाच अंगावर येत नाही.

अगदी १००% सहमत. म्हणूनच अशा विकृत लोकांबद्दल त्रागा करताना त्यांना जनावर वगैरे म्हणणे जीवावर येते.

पिलीयन रायडर's picture

20 Dec 2012 - 7:35 pm | पिलीयन रायडर

ह्या विषयावर म्हणलं तर खुप काही बोलता येइल.. पण शब्द अजिबात नाहीत...
पर्ल ने दिलेली हि लिंक.. http://sunithakrishnan.blogspot.in/

तर्रीबाज's picture

20 Dec 2012 - 8:49 pm | तर्रीबाज

यकटी बाई बगितली, का मनानं विकृत आसलेला पुरुष लगीच जनावर बनतुया.
बायांनी एक जमन्यासारका सोपा उपाय करावा.
आपल्या आजूबाजूला न्हेमी ३-४ बायका आसतील याची खात्री करुन घ्यावी. आपुन येकटीच आन् भवती सगळं पुरुष आसा प्रसंग आसंल तितं बाईचं मन आलर्ट व्हायालाच हवं. एकांद्या बाईच्या वाटला पुरुष जात आसल आनि बाकी दोगींनी जरा आवाज चडवला तरी पुरुषातलं जनावर *** शेपूट घालतं.
बाईचा यकटेपना हा कंदीबी तिचा वैरीच ठरनार. मैत्रिनींच्या घोळक्यात आसावं हे चांगलं. यकटा नवरा किंवा मित्र सात सात गुंडांना भारी पडू शकत न्हाई. त्ये सगळं पिक्चरमंदी बगाया चांगलं आसतं.

दिल्लितिल पोलिस अधिकारि जर असे विचारत असेल कि," गुन्हा घडल्यावर त्याचि पोलिसात नोन्द केलि का ..."??? आणि वर तोन्ड करुन हसत असेल तर यावर तुमचे काय मत आहे ????? आधि लोकान्नि तिला रुग्णालयात दाखल करयला हवे होते कि आधि पोलिसान्ना कळवायला हवे होते ...??? याचे महत्व पोलिसन्नाच कळत नसेल तर हे लोक कसे काय संरक्षण करणार स्त्रियांचे..??

दुसरे असे कि माझे तर म्हणणे आहे कि या नराधमांना फाशीची शिक्षा न देता भर रस्त्यावर विवस्त्र करुन चाबकाचे फट्के मारुन लोळा गोळा करुन तसेच रस्त्यात फेकुन द्यायचे .कोणीहि त्यांचि विचार्पूस नकरता , कोणत्याहि प्रकारचि मदत त्यांना न देता अन्न्पाण्यावाचुन तसेच फेकुन द्यायचे जरा पक्षांन्नि पण त्यांचे लचके तोडावेत . आणि अशाच अवस्थेत त्यांना मरण यावे इतक्या वाईट प्रकारचि शिक्षा झाल्या शिवाय गुन्हे थांबणार नाहित .

जर त्यांचि कोर्टाने सुटका केलि तर मी असे म्हणीन कि मग दिल्लिच्या कोर्टा बाहेर लोकांनिच त्यांना अशाप्रकारे चाबकाचे फटके द्यावेत.

नेहरिन's picture

20 Dec 2012 - 9:31 pm | नेहरिन

तर्रीबाज
.
म्हणजे तुमच म्हणण असं आहे कि जे काय करायचे ते सगळ बायकांनिच कराव . आम्ही पुरुष काही सुधारणार नाही. आम्हा बायकांना बघून तुम्ही लोक कधीच तुमच्या मनाला आवर घालणार नाही ते कायमच विचालीतच होत राहणार . पण त्याच वेळी असा का विचार करणार नाही कि हि पण कुणाची तरी बहिण, बायको , आई , मुलगी आहे .तुम्हा पुरूषांना का कुणी बंधन नाही घालायची . किंवा तुम्ही स्वत:च
स्वत:ला का नाही बंधनं घालणार????

तर्रीबाज's picture

20 Dec 2012 - 10:52 pm | तर्रीबाज

नेहरीन ताई,
म्या समोर दिसंल त्यो सोपा उपाय सुचवला.
आमच्या गावाकडं बाया मान्सं झाड्याला जाताना, धुनं धुवायला, पानी भरायला आनि बाजाराला बी जाताना कुना तरी बाईमानसाची संगत बगून जात्यात. दोन तीन बाया समोर बगितल्यावर कुनी आगावपना करायची हिंमत करत न्हाई. त्यातून यकांदा जादाच कराया लागला तर साक्षीला त्या बरुबरच्या बायका आसत्यातच. त्या गावभर वरडा करत्यात आनि टवाळखोर नेमकं त्यालाच भेत्यात.
तुमी समद्या बायका अल्याड, आन सम्दी पुरुषं पल्याड आसं समजून कायबाय लिवलं हायसा. आमी आडानी मान्सं. आमाला काय आसं वकिलावानी प्वाईंटाच बोलता येत न्हाई. पन आमा गावाकडल्या लोकांचं जुनं आडाखंच येळेला कामाला येत्यात. म्हंजी आसं बगा. यकांद कुत्रं पिसाळलं हाय आसं समजल्यावर आमच्याकडची लोकं समद्या कुत्र्यांना सुधारन्याच्या मागं जात न्हाईत.

मस्त कलंदर's picture

21 Dec 2012 - 10:32 am | मस्त कलंदर

अगदी हेच..
पण जिथं स्त्रियाच स्त्रियांना जपून राहण्याचे सल्ले देतात, तेव्हा अगदी उबग येतो.
जिथं एकटा नवरा/मित्र सात जणांपुढे काही करू शकत नाही, तिथं अशा अचानक आलेल्या संकटात त्या बाईला खिसा(असेल तर्)/पर्समधून चाकू/मिरचीपूड पटकन बाहेर काढून त्याचा उपयोग करता येईल का नाही याची शंका वाटते.

बलात्कारासारख्या घटनांना कायद्याच्या धाकाने रोखणे म्हणजे भूक लागली असता वैद्यकीय इलाज करणे झाले. हा व्यक्तीगत-कौटुंबीक-सामाजीक प्रश्न आहे... कायद्याची वाट न बघता समाजाने यावर उपाय शोधला तरच काहि संभावना.

अर्धवटराव

ऋषिकेश's picture

21 Dec 2012 - 9:31 am | ऋषिकेश

बास बास! मी जे म्हणतो आहे त्याचा हा नेटका निष्कर्श!
आभार अन् अर्थातच सहमत!

स्पंदना's picture

21 Dec 2012 - 9:59 am | स्पंदना

मी तर पुढे जाउन अस सुचवेन की अ‍ॅपल कापता येण्याजोगा एक चाकू कायम प्रत्येकीने जवळ बाळगावा अन त्या चाकूला पर्समध्ये न ठेवता हातात घेउन फिराव. फार अंगचटीला येताना कुणी दिसल तर सऱळ खालच्या बाजुला फिरवायचा. एक नराधम निदान 'त्या' भागाच्या उपयोगातून निकामी होइल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Dec 2012 - 1:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे

नीट विचार करा अपर्णाताई. अंगचटीला कुणी आले तर थेट सुरीहल्ला??
पायात काटा गेला तर तो सुईने काढायचा की तलवारीने ?

काट्यान काटा काढण शक्य नाही. आमचा समाज अश्यावेळी आमची मदत करत नाही. कायदा जमतील तेव्हढ्या पळवाटा काढु देतो. करायच काय? आमच्या मुलींनी जगायच कस अश्या समाजात. किती घाण झालीय पहाताय ना विमे? अश्या अघोरी उपायांनीच आळा बसेल. एखाद दुसरा तुमच्या सारखा मदत करायला पुढे आला तरी त्याची वाट लावुन टाकतात ही लोक. एकदा भिती बसली तर कमी होतील प्रकार हे.
पण या निमित्त्यान मला आणखी एक गोष्ट बोलायची आहे. ही पोर अशी चेकाळुन का फिरतात? का वाटत यांना अस वागावस? उत्तर जात आपल्या सन्माननिय दिलखेच आयटम साँग कडे. आता ही सॉग्ज सादर करणार्‍या बायका जर स्वतःला समाजा पुढे निव्वळ भोग वस्तु म्हणुन सादर करत असतील तर ते पाहुन चेकाळलेले लोक बाहेर पडल्यावर अशी शिकार शोधतच हिंडणार. कुठेतरी थाम्बायला हव हे सगळ. माझा उपाय काही इतका ठिक नाही आहे, पन मग जर कायद्याचा बडगा असता तर हे घडल नसत. पाण्यात बुडताना हातपाय झाडले म्हणुन तुम्ही बुडणार्‍याला दोषी धरु शकत नाही.
नेपाळचच उदाहरण घ्या. पिडीत महिलेची मानसिक अवस्था जाणुन तिला वा तिच्या रक्ताच्या आप्तांना २४ तासाच्या आत गुन्हेगाराच्या हत्येची मोकळीक आहे तिथे. काय अर्थ याचा? इतकाच की तेथे स्त्रीच्या अपमानाला अपमान समजल जात. त्याचा बदला घेण्याची कायद्याने तरतूद आहे. अन आपल्या वागण्याचा परिणाम आपल्या मृत्युत होउ शकतो याची गुन्हेगाराला भिती आहे. काय आहे आपलया कायद्यात अस काही की ज्याची भिती अश्या मस्तवाल जनावरांना वाटेल? मग निदान अशी तरी भिती वाटु दे. हातात चाकु घेउन चालतेय त्या अर्थी तिच्या जवळपास नको जायला. हा आता स्त्रीया याचा गैरफायदा घेणार नाहीत याची मला हमी नाही पन निदान काहीतरी जनसामान्यांच्या हातात असेल. निदान एखादा तरी स्वतःच रक्त पाहुन पुन्हा धजावायचा नाही?

कायदा भावनेने बनत किंवा चालत नाही. भावनेने बनवता किंवा चालवता येत नाही. त्याची दुसरी बाजू, नव्हे सर्व बाजू कायदा ठरवताना पहाव्या लागतात. लाखात एका केसमधे का होईना, पण त्याचा उलट दिशेने होऊ शकणारा उपयोग विचारात घ्यावा लागतो.

-पीडिताच्या इच्छेने गुन्हेगाराला शिक्षा देणं योग्य असं ठरवलं तर अपरिहार्यपणे अशा सिस्टीममधे गुन्हेगारालाही (आणि अनुषंगाने कोणालाही) त्याच्या त्याच्या इच्छेने काहीही करण्याची मोकळीक आपोआप मिळते. कारण मग ती लढाई व्यवस्था विरुद्ध गुन्हेगार असं न राहता व्यक्ती विरुद्ध व्यक्ती अशी होते. शिक्षेमधे स्टँडर्डायझेशन येत नाही. एकाच गुन्ह्याला एका अ‍ॅग्रेसिव्ह व्यक्तिमत्वाच्या पीडिताच्या इच्छेने दगडांनी ठेचून हत्या, आणि दुसर्‍या गुन्हेगाराला (मवाळ व्यक्तीवर बलात्कार केल्याने?!) तिच्या इच्छेनुसार फक्त पाच वर्षे कैद असा फरक पडतो.

कोणती स्त्री बलात्कार झाल्यावर योग्य शिक्षा ठरवण्याच्या रास्त मनस्थितीत असते?

नातेवाईकांना इथे शिक्षा ठरवण्यामधे काय जागा आहे?

बलात्कार = फाशी / मरण असं ठरवून टाकलं की बलात्कार होत असलेली स्त्री जिवंत सुटण्याची शक्यता शून्यवत होणार.

बलात्कार = स्त्रीच्या जबानीवर एकतर्फी निकाल असं म्हटलं की अशा कायद्याचे एरवी होत नसलेले दुरुपयोग वाढणार.

बलात्कार = नपुंसक बनवण्याची शस्त्रक्रिया आणि बाकी मोकळीक (तुरुंग नाही) असं केलं की त्या स्त्रीवर सूड उगवायला मोकळं रान. पुरुषाबाबत नपुंसकत्व, विशेषतः शिक्षा म्हणून केलेलं, हा आजरोजीच्या सामाजिक मानसिकतेत अगदी स्त्रीच्या बलात्काराइतकाच मानसिक खच्चीकरणाचा विषय ठरेल. शिक्षा म्हणून ती अगदी चपखल दिसली तरी तो पुरुष अशावेळी जणू "सर्वहारा" अशा भूमिकेतून फक्त सूड घेणं या एकाच उद्देशाने जगत राहण्याची शक्यता बरीच आहे. तेव्हा तुरुंगवासाऐवजी अशी शिक्षा ठेवणं योग्य ठरत नाही. प्रत्येक बलात्कारित स्त्रीला बलात्कार करणार्‍या पुरुषाच्या नपुंसकीकरणानंतर लाईफलाँग पोलीस प्रोटेक्शन देणं शक्य नाही.

बलात्काराला काय शिक्षा असावी या विषयावर योग्य मत देणं मला शक्य नाही, पण कायदा आणि सुव्यवस्था असं आपण ज्याला म्हणतो ती अशा विचारसरणीने निर्माण करता किंवा चालवता येत नाही ही बाजू दाखवण्याचा थोडा प्रयत्न केला.

अतिशय सम्यक प्रतिसाद! आवडला

दादा कोंडके's picture

21 Dec 2012 - 2:17 pm | दादा कोंडके

लाखात एका केसमधे का होईना, पण त्याचा उलट दिशेने होऊ शकणारा उपयोग विचारात घ्यावा लागतो.

एक जनरल कायदा म्हणून नाही पण अशा घटणावर जरब बसवण्यासाठी त्यातल्या कलमांना थोडसं वाकवून काही 'एक्सेंप्लरी पनिशमेंट' देण्यास हरकत नसावी. कारण रोज घडणार्‍या घटणां रोखण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसेल, सामाजिक वातावरण नसेल तर शिक्षेची भितीच गुन्हेगारांना रोखू शकते. एकूण बलात्कारापैकी पोलिसात दाखल होणार्‍या केसेस बघितल्या तर उगाच हजारो शक्यता ध्यानात घेउन केलेला गुळमुळीत कायदा काय कामाचा? दिल्लीतली घटणा आणि लोक भावनेचा आदर करून सातही गुन्हेगारांना फाशी द्यायला हवी.

ऋषिकेश's picture

21 Dec 2012 - 2:22 pm | ऋषिकेश

(सुदैवाने) आपल्या न्यायव्यवस्थेत निकाल हे लोकभावनेचा आदर वगैरे करून लागत नाही. सदर घटनेत त्या सात जणांपैकी जे दोषी सिद्ध होतील त्यांना योग्य ती शिक्षा न्यायालय देईलच

थोडक्यात योग्य बोललात ऋ.

गुन्ह्याला शिक्षा गुन्हा घडण्याआधी ठरलेली असावी. गुन्ह्याच्या व्हेरिएशनप्रमाणे शिक्षेची किमान आणि कमाल मर्यादा आणि पद्धत गुन्हा घडण्याआधी ठरलेली असावी. फक्त सिद्धता आणि अंमलबजावणी बाकी असावी. अशा सिस्टीमला चांगली कायदेपद्धत म्हणता येईल.

गुन्हा घडल्यावर मग मुळत शिक्षा ठरवण्याची प्रक्रिया ही पद्धत म्हणजे चांगली पद्धत असं म्हणता येणं शक्य नाही.

दादा कोंडके's picture

21 Dec 2012 - 3:38 pm | दादा कोंडके

मला वाटलं, या प्रकाराने एकुणच देशाच्या इतर भागात स्त्रियां किती सुरक्षित असतील याची जाणीव होते. या दिवसात पेपरभर विनयभंग, बलात्कार आणि अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. हे अचानकच घडलं नाहीये. या दिल्लीच्या घटणेनं हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे इतकच. हे सर्व थांबायचं असेल तर दिर्घकालीन सामाजिक उपचारांची गरज आहे हे मान्य पण आत्ता या घडीला माझ्या आया-बहिणींना आणि मुलींना थोडं सुरक्षीत वातावरण देण्यासाठी आपण काय करू शकतो? याचा विचार करून थोडसं भावूक होउन प्रतिसाद दिला मी.

पण माझे डोळे उघडले तुम्ही. तो बलात्कार अगदी भारताच्या राजधानीत चालत्या पब्लीक ट्रान्सपोर्ट बसमध्ये झाला म्हणून काय झालं? हां, आता तिनं कोऑपरेट केलं नसल्यामुळं तदनुषंगाने थोडीफार मारहाण झाली, आणि सात जणांनी एका पाठोपाठ बलात्कार केले म्हणून थोडीशी अवस्था वाईट आहे इतकच. त्यामुळे तुमच्या आदर्शवादी कायद्याच्या दृष्टीने प्रत्येकाला एका बलात्काराबद्दल जी काय थोडी-फार शिक्षा आहे ती जमली तर द्या.

गवि's picture

21 Dec 2012 - 4:08 pm | गवि

.

दादा कोंडके's picture

23 Dec 2012 - 6:33 pm | दादा कोंडके

दिल्लीमध्ये कोणत्याही राजकीय झेंड्याशिवाय उत्स्फुर्तपणे जमलेल्या लोकांच्यात आणि पोलिसांच्यात झटापट झाली. काही फोटो इसकाळवर आहेत. त्यातलाच हा, आपल्या छोटुकलीला कडेवर घेउन आलेले आईवडील पोलिसांशी भांडण करतानाचा फोटो बघून वाईट वाटल. :(

foto

ऋषिकेश's picture

24 Dec 2012 - 10:36 am | ऋषिकेश

अगदी योग्य.

बाकी सध्याच्या आंदोलनावर मंजूल यांची टिपणी मार्मिक म्हणता यावी ;)
मंजूल यांचे कार्टून

मी फक्त भावनातिरेकाने कायदे बनवता येत नाहीत हे म्हणतोय. अन्य वाक्यरचना करायची तर असं म्हणून पाहतो की: वर सुचवलेल्या अनेक शिक्षा / कारवाया या अन्याय पाहून संतापलेल्या आपल्यासारख्या सामान्याच्या दृष्टीने किंवा प्रत्यक्ष अत्याचारपीडित व्यक्तीच्या दृष्टीने अगदी तडफड कमी करणार्‍या, योग्य अशा वाटतील.

पण एका मोठ्या समाजासाठी कायदा बनवणार्‍याला आणि त्या कायद्याचा वापर करुन निकाल देणार्‍यांना त्या त्या जागी , त्या त्या सिच्युएशनल रोलमधे बसून अशा विचारांनी काम करता येत नाही, तसं केलं तर एकूण प्रक्रियेसाठी ते चांगलं नाही.

बलात्कार्‍याला फाशी किंवा अमुक इतकी शिक्षा देऊच नये अशी भूमिका मी मांडत नाहीये, किंवा त्या बलात्कार्‍याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करावा अशी एकतर्फी किंवा भंपक मागणी मी करत नाहीये. नपुंसकत्वाची शिक्षा देण्यालाही विरोध नाही, फक्त त्यासाठी कायदा बनवणारी ऑथॉरिटी काय विचार करेल ते मी मांडतोय.

जे आहे ते स्टँडर्ड असावं. "उलटा टांगून मिरच्यांची धुरी द्या, पासून त्याचे लिंग भर चौकात छाटा" पर्यंत रेंज असलेली क्षोभजन्य लोकभावना कायद्याच्या कामाची नाही.

प्रमाण कायदा असेल तरच व्यवस्था नीट चालते.

बाकी हे "हुच्चभ्रू" वाटत असेल तर तो तुमचा पर्स्पेक्टिव्ह. उच्चभ्रू किंवा फॉर दॅट मॅटर नीचभ्रू समजले जाण्यामुळे मनात असलेला प्रतिसाद बदलून उपयोग नसतोच..

स्पंदना's picture

21 Dec 2012 - 5:14 pm | स्पंदना

कोणती स्त्री बलात्कार झाल्यावर योग्य शिक्षा ठरवण्याच्या रास्त मनस्थितीत असते?

नातेवाईकांना इथे शिक्षा ठरवण्यामधे काय जागा आहे?

ज्याने बलात्कार केलाय त्याची मन:स्थीती कशी आहे आणि होती याची तपासणी करायची सोडुन पिडीत, जीच्या शरीराचा असा पाशवी वापर केला गेला, जे तिच्या मनःपटलावरुन कधीही पुसल जाणार नाही. एक जळजळती जखम, जीच वर्णन तुमच्या कोणत्याही अलंकारिक भाषेत होउ शकणार नाही तीची मनःस्थीती तुम्ही तपासताय?
अन आता नातेवाईक्...तुमच्या जन्माचा आनंद ज्यांना, जे तुम्हाला जन्म देतात, तुमचे सहोदर असतात, तुमचे पालक असतात, त्याम्ना तुमच्या दु:खाचा अधिकार नाही? तिच्या त्या अवस्थेत जर ती हलु शकत नसेल तर तिच्यावतीने तिच्या भावाने, नवर्‍याने, आईने वा बहिणीने तिला या बाबतीत सहाय्य करु नये? मी तर नुसती एक बाई म्हणुन मदत करेन तिला सुड ..हो सुडच्...घ्यायला. या असल्या गोष्टींचा सुडच घ्यायचा अस्तो. मरणापेक्षा वाईट अवस्था असते ही. निदान नेपाळच्या कायद्यात मला स्त्री बद्दल आदर अन सहानुभुती दिसते जी आपल्या कायद्यात नाही दिसत आहे. पुळचट कायदा. अन म्हणुनच अश्यावेळी स्त्रीयांनी असल्या पराकोटीच्या पाशवीपणाच्या विरोधात पराकोटीचे उपाय योजले पाहिजेत.

रास्त मनःस्थितीत नसते याचा अर्थ हाच की पीडीत हाच स्वतः न्यायकर्ता अन न्यायाधीश होऊ शकत नाही.

यात ज्याने बलात्कार केला त्याची मानसिकता न तपासता बळीची मानसिकता तपासतो आहे किंवा नातेवाईक आपल्याशी कसे घनिष्ठपणे अ‍ॅटॅच असतात याचा काहीच संबंध नाही.

सब्जेक्टिव्ह कृतींना न्याय म्हणता येत नाही. त्याने किती लवकर अराजक येऊ शकतं त्याची कल्पना करणं वाटतं तितकं कठीण नव्हे. आज जे चालू आहे ते अराजक आहे असंही कोणी म्हणेल, पण तसं नाहीये, नीट पाहिलं तर.

कायदा कितीही कडक करण्याविषयी काही आक्षेप नाही. पण बळी किंवा नातेवाईकांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असण्यात कोणतीही व्यवस्था नाही.

सब्जेक्टिव्ह कृतींना न्याय म्हणता येत नाही. त्याने किती लवकर अराजक येऊ शकतं त्याची कल्पना करणं वाटतं तितकं कठीण नव्हे. आज जे चालू आहे ते अराजक आहे असंही कोणी म्हणेल, पण तसं नाहीये, नीट पाहिलं तर.

कायदा कितीही कडक करण्याविषयी काही आक्षेप नाही. पण बळी किंवा नातेवाईकांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असण्यात कोणतीही व्यवस्था नाही.

एग्झॅक्टलि गवि.........भावनेच्या भरात अराजकाला प्रोत्साहन देण्याचाच प्रकार आहे हा. प्रत्येक गोष्टीचा विचार पर्सनल अँगलने केला की अशा इरॅशनल प्रतिक्रिया येतात-जे वैयक्तिकरीत्या बरोबर, पण समाजाच्या दृष्टीने अतिशय चूक असते.

मदनबाण's picture

24 Dec 2012 - 10:55 am | मदनबाण

आज जे चालू आहे ते अराजक आहे असंही कोणी म्हणेल, पण तसं नाहीये, नीट पाहिलं तर.
गवि अराजकता म्हणजे नक्की काय ते तुम्ही जरा स्पष्ट करुन सांगाल का ?
कायद्याचा धाक लोकांत नसेल तर ते अराजकतेचे पहिले लक्षण आहे, असे तुम्हाला वाटते का ? देशभर सतत बलात्कार होत असुन ( जवळ जवळ रोजच) त्यांची संख्या वाढतांनाच दिसते,असे असताना या देशात अराजकता नाही असे तुम्हाला का वाटते ? फक्त्त दिलीत दर वर्षी ४५०-५०० बलात्कारांच्या गुन्हयांची नोंद होते (नोंद न-होणारे गुन्हे वेगळे असावेत.) मग जर देशाची राजधानीच स्त्रीयांसाठी सुरक्षित नसेल तर देशाच्या इतर भागाची स्थिती काय असावी ? असे असताना देशात अराजकता नाही असे तुम्हाला का वाटावे ? याच देशाच्या स्त्री राष्ट्रपती स्वतः एक स्त्री असुन बलात्कारी गुन्हा करणार्‍यांची शिक्षा कमी करतात हे उत्तम शासन व्यवस्थेचे लक्षण आहे काय ?
फक्त बलात्कारच हा मुद्दा नसुन,देशातील लोकांच्या आत्महत्यांचे प्रमाण आणि त्यातही शेतकर्‍यांचे आत्महत्येचे प्रमाण देशात सर्वकाही आलबेल आहे असे दर्शवते का ? इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्या राष्ट्रात होत आहे,ते अराजकतेचे प्रतिक नाही का ? शीला दिक्षीत सारखी "स्त्री" मुख्यंमंत्री, ज्या १९९८ पासुन मुख्यंत्री पदावर आरुढ आहेत... त्या म्हणतात ६०० रु प्रति महिना हे ५ जणांच्या कुटुंबाला पोट भरण्यासाठी पुरेसे आहे. असे विधान करणारी स्त्री मुख्यमंत्री जिच्या राज्यातच सर्वात जास्त बलात्कार होतात ती हे अजब विधान करते, तेव्हा या देशात अराजकता आहे असे का म्हणु नये ? मुंबई हल्ला झाल्या नंतर सागरी सुरक्षता वाढवण्यासाठी घेतलेल्या बोटी भंगारात जातात आणि सीसीटिव्ही कॅमेरे सरकार अजुनही बसवु शकत नाही...अश्या या देशात जिथे प्रत्येक नागरिकाचे व्यक्तिगत आयुष्य /सुरक्षा आजच्या घडीला "राम भरोसे" आहे तिथे अराजकतेसाठी अजुन कोणती अधिक लक्षणे शोधली पाहिजेत ?

जाता जाता :--- या धाग्यात अनेकांची मते/विचार वाचतो आहे,समजवुन घेण्याचा प्रयत्न करतो आहे.प्रत्येकाची विचार सरणी ही वेगळी असते आणि त्या क्षणाला एखाद्याचे विचार पटतीलच असे नाही.

मदनबाण's picture

24 Dec 2012 - 11:13 am | मदनबाण

जरा या धाग्याच्या संदर्भा पासुन वेगळा असा एक व्हिडीयो इथे देत आहे.
अभिनेता परेश रावल यांचे हे विधान इथे देतो आहे कारण दिल्लीत सामान्य जनतेचा सरकार विरोधी आक्रोश सध्या मिडीयाच्या माध्यमातुन सर्वत्र दाखवला जात आहे... याच राजकारण्यां बद्धलचे मत या व्हिडीयोत व्यक्त करण्यात आले आहे, जे मला वाटतं माझे आणि या देशातल्या सर्व सामान्य नागरिकांचे मतच परेश रावल यांनी मांडले आहे.
http://youtu.be/ZEpfc7gI6Bc

त्याला राज्यव्यवस्थेतले, प्रशासनातले दोष असं म्हणता येईल. दोषांचं प्रमाण गंभीररित्या वाढतं आहे असं सिद्ध करता येईल. पण हे "अराजक" नव्हे. अराजक म्हणजे मोगादिशू, काहीकाळ इजिप्त, मधल्या काहीकाळात इराक यांमधे जे चालू आहे किंवा होतं ते अराजक. अराजक म्हणजे लोकभावनेवर कायदा चालणं.

अराजक म्हणजे एकाच गुन्ह्याला कधीकधी चौकात हात तोडण्याची शिक्षा तर कधीकधी त्याच गुन्ह्याला अफेक्टेड कुटुंबाने पैसे घेऊन माफ केलं तर माफसुद्धा..आणि कधीकधी कोणाकोणाला "वास्ता" असल्याने सोडून देणं.

अराजक म्हणजे एकाच शहरात सात वेगवेगळ्या गटांचे सात वेगळ्या युनिफॉर्मचे वेगळे वेगळे पोलीस, आणि प्रत्येकाच्या हाती वेगवेगळ्या ब्रँडची अनधिकृत हत्यारं.

आपली व्यवस्था आज जितकी घसरली आहे तितकी का होईना पण टिकवून धरली तरच सुधारणेची शक्यता राहते.

हाडांमधे कॅल्शियम कमी आहे म्हणून पेशंटचा आहे तो हाडांचा सापळा उखडून टाकून देत नाही आपण. त्या नाजुक ठिसूळ हाडांच्या साहाय्याने जिवंत राहून आपण योग्य दिशेने उपचार करतो की ज्याने हाडांना बळकटी येईल.

सिस्टीमच्या आत राहूनच सिस्टीम सुधारता येते. अ‍ॅबरप्ट , भावनेच्या उद्रेकाने दिलेल्या उत्स्फूर्त शिक्षा, सूडभावनेने कारवाई असं सगळं व्यक्तिगत पातळीवरच चालू शकतं.

एक शासन / सरकार असं वागलं तर आपलाही त्वरित सोमालिया होईल.

यात कुठेही बलात्कार्‍यांना सौम्य शिक्षा व्हावी असा उद्देश नाही. हे सर्व मुळात लिहीलं ते इथल्या "ठेचा, तुडवा, छाटा" अशा मूडमधल्या प्रतिक्रिया वाचूनच.

ह भ प's picture

21 Dec 2012 - 9:59 am | ह भ प

आज मटा, सकाळ उघडला तर मुंबईच्या २ मुली अन उत्तरप्रदेशची १ मुलगी यांच्या बातम्या..
मुंबईच्या मुलीतर १०-११ वर्षाच्या अन यु.पी.ची ७ वर्षाची..
शिवाय बारामतीची पण बातमी होती..
अर्रे यार.. काय चाललय काय?

अर्धवटराव's picture

21 Dec 2012 - 10:21 am | अर्धवटराव

सज्जनतेने सामर्थ्याची उपेक्षा केल्याचे परिणाम.... आणि काय...

अर्धवटराव

चित्रा's picture

21 Dec 2012 - 11:39 am | चित्रा

काही गोष्टी मुद्दाम बोलाव्याशा वाटल्या.

बलात्कारात संभोगाच्या इच्छेपेक्षाही बलात्कारित व्यक्तीवर अधिकार गाजवण्याची इच्छा बाळगण्याची प्रवॄत्ती जास्त आहे हे समजून घेतले पाहिजे. अधिकार आणि अमर्याद सत्ता गाजवण्याचा विचार आहे. बाईला बलात्कार करून आणि पुरुषांना बेदम मारून सत्ता गाजवता येते. वाटेल तसे वापरून झाल्यावर कचरा म्हणून टाकून देता येते हा विचार आहे.

लग्न करावे का नाही, कपडे कोणते घातले किंवा नाही घातले, रात्री बाहेर पडले का दिवसा, हे प्रश्न इतर वेळी योग्य असले तरी अशावेळी उपयोगाचे नाहीत.
कायद्याने काही होणार नाही, हा विचार मला योग्य वाटत नाही. कोणत्याही व्यक्तींवर अमर्यादित सत्ता गाजवता येत नाही ; आणि अपराधाला आयुष्यभर पुरून उरेल अशी शिक्षा होते, हे जेव्हा डोक्यात शिरेल तेव्हा असले प्रकार कमी होतील.
सध्या होते आहे ते असे की सगळीकडे अशा घटना घडत असूनही, लोकांकडून आणि पोलिसांकडून या गुन्ह्यांची दखल घेतली जात नाही, कायदा प्रत्येक वेळी नीट वापरला जात नाही, पकडले गेले तर होणार्‍या शिक्षा अपराधासाठी पुरेशा नसतात म्हणून अपराध्यांना, किंवा कायद्याचे उल्लंघन करू पाहणार्‍यांना धाक नाही. त्या शिक्षा कडकपणे राबवल्या आणि दीर्घ काळाच्या केल्या तर अपराध करण्याचे प्रमाण कमी व्हावे.

संरक्षणासाठी आपल्याबरोबर हत्यार घेऊन फिरावे हा विचार तेवढ्यापुरता सुडाच्या भावनेतून ठीक वाटला तरी योग्य नाही.

ज्या आईच्या पोटातही सुरक्षित नाहीत त्यांना इथे जगात मोठेपणीतरी कसली सुरक्षितता देणार समाज..? कधीकधी निराशा येते. बहुसंख्य सामान्य माणूसच असा आहे का या देशातला किंवा जगातला..? असं वाटून जबरदस्त निराशा येते. हा मुळात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे का असंही वाटतं.

मग सातच्या आत घरात किंवा उलट बाजूने नपुंसक करण्याच्या शिक्षा हे सर्व वरवरचं वाटायला लागतं..

कधीकधी असा काही विचार करण्याचंही बळ राहात नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Dec 2012 - 5:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्त्रीयांनी होताहोईल तितके अधिकाधिक सुरक्षित ठिकाणाचा वापर करावा, असे वाटते.

बाकी, कायद्याने अशा आरोपींना कोणत्याही संशयाचा फायदा न मिळता जलद न्यायालयासमोर अशा सर्व आरोपींना कठोर* शिक्षा व्हावी, आणि अशा शिक्षेची आणि शिक्षा कशाची भोगावी लागते याची खूप जाहिरात करायची अशा अपराधाबद्दल समाजात एक दहशत बसली पाहिजे, हाच त्यावर जालीम उपाय आहे.

* कठोर शिक्षा : आरोपी मरणार नाही याची काळजी घेऊन अधिक व्होल्टेजच्या  वीजेच्या तारांवर आरोपीला होत असेल तितक्या वेळी लघवी करायला लावणे.* अंधारकोठडीत उपाशी ठेवणे, पाणी न देणे, ढुंगावर सकाळ संध्याकाळ रट्टे देऊन बर्फाच्या लादीवर झोपायला लावणे इत्यादि. जितके क्रूर शिक्षा देता येईल तितकी द्यावी.

-दिलीप बिरुटे

बिरुटेसर्..सिंगापुरच उदाहरण घ्या. एखाद्या स्त्रीला जर कुणी पुरुषाने असा नको त्या अर्थाने हात लावला, तर तिचे म्हणने ग्राह्य धरुन त्या व्यक्तीला ताबडतोब एक वर्षाची सक्त मजुरी अन ढुंगणावर कमीत कमी ५ रत्तान्चे फटके ही शिक्षा आहे. जर संबंधीत व्यक्ती परदेशीय असेल तर एका वर्षाने हाता पासपोर्ट अन टिकीट. परत सिंगापुर मध्ये प्रवेश नाही. जन्मभराकरती.
पहा हा कायदा. अन मला खरच दु:ख होतय, पन हा कायदा मला खणखणीत हिंदीत दोघा तिघा आपल्या वंशियाम्नाच साम्गावा लागला. आता वाटतय सरळ कंप्लेन करुन रिकामी व्हायला हव होत. आम्हाला बांधव वाटतात त्या भडव्यांना वाटते का की ही भारतिय दिसतेय? गळ्यात मंगळसुत्र अन कपाळी कुंकु आहे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Dec 2012 - 5:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कडक कायद्यांच्या बाबतीत होतं काय की कायद्याचा बराच वेळा दुरुपयोग होतो की काय असे वाटायला लागते आणि म्हणून कायद्यात काही पळवाटा आपल्या नजरेस येतात. सिंगापूरमधील कायदे असे असतील तर चांगलीच गोष्ट आहे, निरपराध त्यात अडकणार नाही, अडकत नसेल तेव्हा मला वाटतं हा पर्याय उत्तमच. आपल्याकडं असं म्हटल्या जातं की एक आरोपी निर्दोष सुटला तरी चालेल परंतु निर्दोष माणसाला शिक्षा होऊ नये. आणि त्यामुळेच आपल्याकडे कायदेशीर कार्यवाही आणि शिक्षेच्या बाबतीत तो कठोरपणा नाही, असे मला वाटते.

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

21 Dec 2012 - 6:46 pm | नाना चेंगट

ज्याचे त्याचे प्रतिसाद त्याच्या त्याच्या ख्यातीनुसार.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Dec 2012 - 7:14 pm | प्रकाश घाटपांडे

सुरक्षिततेचे उपाय योजण्यासाठी बलात्कार का होतात या मूलगामी प्रश्नाची चर्चा करणे गरजेचे आहे. यासाठी जनुकीय अभियांत्रिक/शास्त्रज्ञ. मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ यांची मते घेणे आवश्यक ठरेल.मानवी प्रवृत्तीला कृष्णधवल चौकटीत बंदिस्त करता येत नाही.एखादा क्रूर माणूस काही बाबतीत हळवा संवेदनशील असू शकतो वा एखादा हळवा संवेदनशील माणुस एखाद्या बाबतीत क्रुर असु शकतो. दिल्ली च्या केस मधे अगदी सातही जणांना फाशी दिल तरी पिडीत स्त्रीचे नुकसान भरुन येणार आहे का? फार तर इतरांवर त्याचा वचक बसेल.तो ही काही काळ. जेव्हा उन्माद ही भावना जागृत होते त्यावेळी भय लोपले जाते. कामातुराणां न भयं न लज्जा| सर्वकाही आलबेल चालाव, जगा आणि जगू द्या हे तत्व सर्वत्र असाव, सर्वेपि सुखिन: संतु ही सुखद व भ्रामक कल्पना आहे. जगाच्या कुठल्या कालखंडात, कुठल्या देशात, कुठल्या समाजात अन्याय ( या केस मधे बलात्कार) झाला नाही? हा प्रश्न विचारल्यास मति कुंठीत होते.
हे विश्लेषण कदाचित काहींना असंवेदनशील वाटेल पण विचार करायला लावणारे आहे.
जर पिडित व्यक्तीच्या जागी आपण असतो वा आपले आप्तेष्ट असते तर विवेक वगैरे गोष्टी गेल्या *** मधे. त्या ठिकाणी सूडाचीच भावना निर्माण होईल. कारण ही भावना देखील मानवी प्रवृत्तीचाच भाग आहे. जसजसा काळ लोटला जाईल तस तशी या भावनेची तिव्रता कमी होत जाते.
मी मनातल्या मनात बलात्कार्‍यांना हाल हाल होत जगण्याची शिक्षा दिली आहे जी मरणापेक्षा भयंकर असेल. किमान (माझ्या) देवाकडे तशी मागणी केली आहे.

राही's picture

21 Dec 2012 - 8:50 pm | राही

योनिशुचितेच्या अवास्तव कल्पना,स्त्रीला भोगवस्तू समजण्याची सरंजामी पद्धती,स्त्री-पुरुष मुक्त वातावरणाचा अभाव,दारूचे व्यसन,कुठल्याही मेहनतीच्या आणि कन्स्ट्रक्टिव कामाला न भिडण्याचा आळशीपणा आणि त्यासोबतची मग्रूरी,त्यामुळे सेक्स आणि दारू हेच करमणुकीचे मुख्य साधन ही सगळी कारणमीमांसा हज्जारदा करून झालीय.मध्यप्रदेशच्या एका दुर्गम खेड्यातल्या सर्व्हेमध्ये तिथल्या बायकांना पुरुष काय करतात(म्हणजे काय उद्योगधंदा करतात)असे विचारले असता 'और क्या करेंगे,ठर्रा और ठुकाई' असे उद्वेगजनक उत्तर दिलेले वाचले होते. पुढची दोनशे वर्षे तरी यात बदल संभवत नाही. मुलींना जन्माला येऊ दिले जात नाही ते एका अर्थी बरेच आहे.पिढ्यानपिढ्या मुली जन्मालाच येऊ दिल्या नाहीत तर भारतापुरते तरी उत्क्रांतिवादाच्या नैसर्गिक निवडीनुसार मुलींचे प्रजनन थांबेल तो दिवस किती आनंदाचा असेल!

अप्पा जोगळेकर's picture

21 Dec 2012 - 8:53 pm | अप्पा जोगळेकर

एकंदरच खूप जास्त क्रूर घटना आहे.
मला तर हल्ली प्रत्येकच पुरुष ससेप्टिबल बलात्कारी तर नसतो ना अशी शंका येउ लागली आहे. रेप करणे ही आदिम प्रेरणा वगैरे तर नाही ना असे वाटून गेले. कुत्र्यांमधला रेप स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे वाटले असेल कदाचित.
माझ्या एका मित्राने जेंव्हा 'वुमन एन्जॉय रेप आफ्टर पेनिट्रेशन' असे बेजबाबदार विधान केले होते. मी त्याला तू याआधी रेप केला आहेस का असे विचारले तर नाही म्हणाला. कुठून असली अ‍ॅझम्शन्स तयार होतात कोणास ठाउक ?

विकास's picture

21 Dec 2012 - 8:58 pm | विकास

खाली विकीवरून विदा घेतला आहे. हा युएनचा विदा असून त्यात केवळ पोलीसांकडे रिपोर्ट केल्या गेलेल्या (बलात्काराच्या) अधिकृत केसेसच आहेत.

Year Reported Cases Reported cases per day
2004 18233 50
2005 18359 50
2006 19348 53
2007 20737 57
2008 21467 59
2009 21397 59
2010 22172 61

एक सहज लक्षात येणारी गोष्ट म्हणजे दर दिवसाला घडणार्‍या आणि रिपोर्ट केल्या गेलेल्या केसेस या २००४ ते २०१० च्या कालावधीत वाढत गेल्या आहेत. त्याचे देखील दोन अर्थ होतात, एक म्हणजे गुन्हे वाढलेत आणि/अथवा रिपोर्टींग वाढले आहे. तरी देखील त्यात भितीपोटी, लाजेपोटी, समाजातील अत्यंत दुर्बल घटक असल्याने (त्यात दलीत आले आणि लहान मुले देखील आली) इत्यादी, अनेक रिपोर्ट न झालेले गुन्हे असतील.

या कॅटेगरीतील कुठलाही गुन्हा हा विकृतच आहे. पण दिल्लीतला प्रसंग अत्यंत नीच स्वरूपाचा होता आणि तसेच प्रसंग अजूनही घडले आहेत जे वृत्तपत्रात येत असतात. पण मग आज होणारा आवाज केवळ हे दिल्लीत झाले, सीसीटिव्हीमुळे प्रत्यक्ष उजेडात आले म्हणून होत आहे का? एरवी त्याच हीन पातळीवर होणार्‍या गुन्ह्याकडे ना धड राजकारणी, ना धड समाजसेवी संस्था इतक्या गांभिर्याने आवाज उठवताना दिसत नाहीत...

मदनबाण's picture

21 Dec 2012 - 9:00 pm | मदनबाण

चौरंगा करणे ही शिवाजी महाराजांच्या काळातली शिक्षा आजच्या काळातही दिली गेली पाहिजे हे माझे ठाम मत आहे.
हात-पाय कापुन अश्या नराधमांना सार्वजनिक ठिकाणी कायमचे बसवले गेले पाहिजे,जाता येता लोकांनी अश्या व्यक्तीवर थुकावे अशी देखील तिथे सोय असावी.
शिक्षेचा धाक /कायद्याचा धाक उरला नाही की अशा घटनां मधे वाढ होते.तारिख पे तारिख चालण्यामुळे न्याय मागणारा न्याय मिळे परंत जिवंत राहतील की नाही याची शाश्वती आजच्या घडीला दिसत नाही.
जिथे कडक कायदा आणि शिक्षा देण्यासाठी निवडुन दिलेल्या राजकिय नेत्यांना स्मारके आणि पुतळे हे महत्वाचे विषय वाटतात त्या देशाची अवस्था अशीच असणार !आपला देश पुतळ्यांचा देश झाला आहे,जिथे फक्त शिश्नोदरपरायण मोकाट हिंडतात ! :(
४ दिवस चर्चा,मेणबत्ती मोर्चा आणि मोठ्या प्रमाणात काही दिवस मिडीया कव्हरेज / डिबेट या व्यतिरिक्त काही होणे नाही हे सामान्य लोकांना उमजले आहे.रोज बलात्कार / विनयभंग अश्या बातम्यांनी हिंदुस्थानातली वर्तमानपत्रे भरलेली असतात !सर्व वयोगटांच्या स्त्रीयांवर रोज हिंदुस्थानात बलात्कार होत असतो,मग ती चिमुरडी असो वा वॄद्धा ! :(

जाता जाता :--- काही दिवसांपूर्वी मी इथे माजी "स्त्री" राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या दयाळुपणावर ४ शब्द टंकले होते,तसेच कौतुक आज लोकसत्ते मधे देखील वाचायला मिळाले.आपले राजकारणी मग ती स्त्री असो वा पुरुष यांना सत्तेचा आणि पैशाचा भस्म्या रोग झाला आहे,ज्यात सगळे राष्ट्र होरपळले जात आहे. तुमची आणि तुमच्या देशाची सुरक्षा तुम्हीच बघा ! हे लोक फक्त आयुष्य चैनीत घालवणार ! :(

पक्या's picture

21 Dec 2012 - 11:38 pm | पक्या

परदु:ख शितल हेच खरे. ह्या बाबतीत सौम्य विचार करणार्‍यांनी फक्त एवढा विचार करावा बलात्कार झालेल्या स्त्री च्या जागी आपली आई, बहीण, मुलगी , बायको असती तर तेव्हा त्यांना कसे वाटले असते? डोळ्यासमोर असा प्रसंग आणून बघावा. बलात्कारी गुन्हेगारांना गुन्हा सिध्द झाल्यावर कायदा जी काय शिक्षा देईल ती देईल पण ती शिक्षा भोगण्याआधी त्या लोकांना भर रस्त्यावर आणून नग्नावस्थेत १५-२० चाबकाचे फटके हाणावेत. जेव्हा अशी काही शिक्षा सर्वांसमक्ष दिली जाईल तेव्हा काही प्रमाणात तरी अशा विकृत लोकांवर जरब बसेल. आणी तुरुंगातही सक्त मजुरीमध्ये सर्वात हलक्या दर्जाची किळस आणणारी कामे ह्यांना द्यावीत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Dec 2012 - 2:24 am | निनाद मुक्काम प...

राही आणि चित्रा ह्यांच्या प्रत्येक वाक्याशी सहमत
बलात्काराच्या बहुतांशी केस मध्ये स्त्रियांवर मालकी हक्क गाजवण्याची वृत्ती असते.
काही प्रमाणात विकृत माणसे लहान मुलांवर बलात्कार करतात.
कायदे कठोर झाले पाहिजे
पण त्याच सोबत योग्य वयात लैंगिक शिक्षण असले पाहिजे.

माझ्या मते एखाद्या माणसाचे बलात्कारी होणे व एखाद्याने आत्महत्या करणे ह्यामध्ये दोन समान गोष्टी आहेत
पहिली समान गोष्ट म्हणजे खुपदा भावनेचा उद्वेग होऊन तडकाफडकी बलात्कार किंवा आत्महत्या होते. तर दुसर्‍या प्रकारात वरवर सामान्य वर्तन करणारा माणसाच्या डोक्यात हळूहळू भावनेचा भडका उडायला लागतो व ते ठरवून हे कृत्य करतात.
पण आपल्या समाजात बलात्कारी का निर्माण होतात हा कळीचा मुद्दा आहे
महिला स्वसंरक्षण करतील किंवा रात्री घराबाहेर कदाचित पडणार नाही
मात्र २ महिन्याचे बाळ ते लहान मुलांवर जेव्हा बलात्कार होतो तेव्हा वरचे मुद्दे गैरलागू ठरतात ह्यात कितीतरी वेळा बलात्कार करणारे नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्ती असतात ही लोक मी उल्लेख केला तसा दुसऱ्या प्रकारात मोडतात.

उत्पल नावाच्या व्यक्तीची हो पोस्ट माझ्या मतांशी सुसंगत आहे ती येथे मी शेअर करतो ,

जगन रेप कर.
असं जगनला कुणी सांगत नाही.

जगन आपणहूनच रेप करतो.
शाळेत गेलेला, न गेलेला, एमबीए केलेला, न केलेला, फेसबुकवर असलेला, नसलेला जगन असे जगनचे प्रकार आहेत.
त्यातले सगळेच रेप करू शकतात.
... जगन इतरवेळी कदाचित चांगलाही असेल.
पण तरी तो कमलवर पाळत ठेवून मोका मिळताच तिच्यावर झडप घालतो.
आणि नंतर तिला अमानुषपणे मारूनही टाकतो.
जगन वाईट आहे. भयानक वाईट.

पण वाईट जगनपैकी एकाची एक केस आहे.

या केस मधल्या जगनला इतर जगनसारखंच पंधरा-सोळाव्या वर्षी इरेक्शन आलं.
कमलला न्हाण आलं त्याच्या एक-दोन वर्षांनंतर.
इरेक्शन आल्यावर काय करायचं हे त्याला आई-बाबांनी सांगितलं नाही.
कारण त्यांना त्याचा संकोच वाटायचा.
कमलला पाळी आली की आई तिला काय करायचं ते सांगते.
पण जगनला इरेक्शन आलं की काय करायचं हे बाबा त्याला सांगत नाही.
कारण बाबालाही ते कुणी सांगितलं नव्हतं.
बाबाच्या बाबाने त्याला एकदा नग्न बायकांची चित्रं असलेलं पुस्तक वाचताना पकडलं होतं आणि मारलं होतं.
पण इरेक्शनचं काय करायचं हे सांगितलं नव्हतं.
बाबाने तीसएक वर्षांपूर्वी हेलनला नाचताना बघून हस्तमैथुन केलं होतं.
आता तर नाचाची खूप प्रगती झालीय. जगनपुढे आता खूप बायका नाचतात. मल्लिका, मुन्नी, शीला वगैरे सगळया.
शिवाय कॅमेरा त्यांच्या शरीरावर फिरतो.
कारण कॅमेऱ्याला हे माहीत आहे की जगनला ते आवडेल.
आणि कॅमेऱ्यांच्या मागच्या माणसांना खूप पैसे मिळतील.
असे खूप जगन तयार करणं हे कॅमेऱ्याचं ध्येय आहे.
पण ते असो.
चूक जगनची आहे.

जगनही मग हस्तमैथुन करतो.
ते करताना एकदा आईने पाहिलं तर तिने भंजाळून जाऊन बाबाला सांगितलं.
बाबाने मार खाल्ला होता, म्हणून त्याने जगनला पण मार दिला.
पण मार खाऊन इरेक्शन थांबत नाही.
म्हणून मग जगन पुन्हा नाच बघतो, संभोग चित्रांची पुस्तकं वाचतो, ब्ल्यू-फिल्म बघतो.
आणि हस्त मैथुन करतो.

आपली परंपरा फार थोर आहे.
तिचा विजय असो.
आपल्या परंपरेने शिकवलं आहे की लग्नाआधी संभोग वाईट.
त्यामुळे लग्नापर्यंत थांबून नंतर सगळी कसर भरून काढली तरी चालेल.
म्हणजे पहिल्या रात्री बायकोला त्रास झाला तर चालेल.
पण लग्नापर्यंत स्त्रीचं कौमार्य अबाधित राहिलं पाहिजे.
त्यामुळे जगन नग्न बाईचे फोटो बघत थांबतो.
शिवाय अशा नग्न बायकांना वाईट समजलं जातं.
कारण त्या जगनला बिघडवतात.
पण जगनला त्या आवडतात.
कारण ज्याच्यामुळे इरेक्शनपासून सुटका मिळते ते जगनला चांगलं वाटतं.

पण इरेक्शन कायमचं कधीच संपत नाही.
जगनला आता 'बाई' हवीच असते.
तो कमलकडे आता बाई म्हणूनच बघू लागतो.
आणि एके दिवशी तिच्यावर झडप घालतो.
जगनचं जनावर होतं.

दुर्दैवाने जगन पुरूष आहे.
संस्कृती प्रगत झाली तरी संस्कृतीकडे अजूनही इरेक्शनला उत्तर नाही.
शिवाय इरेक्शनबरोबरच जगनला अजून एक महत्त्वाचं शिक्षण मिळतं.
पुरूषसत्ताकतेचं.
म्हणजे बाबा कुटुंबप्रमुख.
आई त्यानंतर.
जगन, तू मुलगा आहेस.
मुलींसारखा रडतोस काय?
जगन, तू मुलांच्यात बस बघू.
मुलींबरोबर कसला बसतोस?
जगन, मुली फक्त क्रिकेटमध्ये नाचण्यासाठी असतात.
क्रिकेट खेळायचा असतो मुलांनी.
जगन, स्वयंपाक तू नाही करायचास.
पण तुला प्लंबिंग आलं तर चांगलं आहे.
जगन, बायकांना डोकं जरा कमीच असतं.
त्यामुळे त्यांनी शक्यतो घरीच बसावं.
जगन, तू मर्द आहेस.
बाईला जिंकणं यात मर्दानगी असते.
वगैरे.

आधीच इरेक्शन आणि त्यात पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन.

जगन पार बिघडून गेलाय.
त्याच्यातला हिंस्त्रपणा जनावरांनी लाजावं इतका वाढलाय.

कमलच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणी, आई-बाबा आणि परंपरा सगळ्यांनाच जगनचा प्रचंड राग येतो.
त्याला फाशी द्यावी असं वाटतं.
जगनला फाशी जरूरच द्यावी.
त्याने जगन नक्की मरेल.
पण नर उरेल.

कारण नर आणि मादी कधीच कायम मेलेले नाहीत. अजूनही मरत नाहीत.

नर पुन्हा हस्त मैथुन करत वाढेल आणि पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन त्याला दिलं जाईल.

आणि मादी पुन्हा अनंतकाळ पहात असलेली वाट पहात राहील.
शुभंकर संभोगाची.

- उत्पल

दादा कोंडके's picture

24 Dec 2012 - 2:57 am | दादा कोंडके

इथं शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद निनाद.

गवि's picture

24 Dec 2012 - 6:48 am | गवि

:-)

दादा कोंडके's picture

24 Dec 2012 - 1:26 pm | दादा कोंडके

?

वेताळ's picture

24 Dec 2012 - 5:59 pm | वेताळ

आपल्या कडे मुलांना किंवा मुलींना लैगिंक शिक्षण मिळत नाही.त्यात लैगिंक भावनांचा निचरा योग्य प्रकारे करता येत नाही. त्याची फळे ही अशी बलात्काराची प्रकरणे घडण्यात होतो.

मदनबाण's picture

24 Dec 2012 - 6:46 pm | मदनबाण

जगन पुरुष आहे,जगन सारखे इरेक्शन इतर पुरुषांना देखील येते, मग सगळेच पुरुष बलात्कारी होतात का ? ज्या ज्या मुलांना लैगिंक शिक्षण मिळत नाही ते सर्वच बलात्कारी का होत नाहीत ? बलात्कार ही वासना शमवण्यासाठी केलेली परमोच्च अविचारी / अविवेकी कॄती आहे,या कॄतीचे जात-पात वय/लैगिंक शिक्षण यांच्याशी संबंध लावणे पूर्णतः चुकीचे आहे. या संदर्भात जंगली दिल्ली हा लेख वाचण्या सारखा आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Dec 2012 - 7:32 pm | निनाद मुक्काम प...

सगळे बलात्कारी होत नाहीत मात्र बायकांच्या येताजाता स्पर्श करणे ,गर्दीचा फायदा घेऊन चिमटा काढणे , किंवा कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या समवेत द्व्यर्थी बोलणे
आभासी जगतात महिला प्रोफाईल उघडून महिलांशी संपर्क साधणे आणि बर्‍याच विकृती
जगन मध्ये आजकाल बोकाळल्याने आहेत.
ह्याचा महिलांना सार्वजनिक जीवनात प्रचंड त्रास होतो ,
विनय भंगाचे प्रकार घडतात.
आणि ह्याचे पुढचे अंतिम पाऊल म्हणजे बलात्कारात होतो.
माझ्यामते महिलेवर बलात्कारातून अधिक घृणास्पद म्हणजे बालकांचे लैंगिक शोषण
ते अजून वाईट का तर मुलांना कळत सुद्धा नाही कि आपल्या सोबत चाललय ते अनैसर्गिक आहे , त्याचा प्रतिकार करावासा वाटून तो करता येत नाही ,सर्वात महत्वाचे म्हणजे , ह्या प्रकाराविरुद्ध तक्रार करायची असते तो कायद्याने गुन्हा आहे , ह्याची त्यांना कल्पना नसते.
आणि ह्या सर्व गोष्टी महिला व बालकांवर बल पूर्वक केलेल्या अत्याचारात मोडतात.

अप्पा जोगळेकर's picture

24 Dec 2012 - 9:10 pm | अप्पा जोगळेकर

हं. यानिमित्ताने काही घटना आठवून गेल्या. माझ्या कॉलेजच्या रस्त्यावर एक झोपडपट्टी होती. तिथे स्वतःच्या लहान मुलांना पाजत बसलेल्या गरीब बायकांकडे चवी चवीने पाहाणारा आणि नंतर तितक्याच चवीचवीने ते वर्णन करणारा एक मित्र आठवला. कॉलेजच्या फेस्टिवलमधे आम्ही सगळे मित्र दारु पिउन नाचत असू. तेंव्हा या जनावराने आमच्या वर्गातल्या एका मुलीच्या पार्श्वभागावर अशा काही चापट्या मारल्या की तिथून मुलींचा तो अक्खा ग्रुपच पळून गेला. आणखीन एका मित्राच्या हॉस्टेलवर राहणारा मुलगा काहीसा फेमिनाईन होता आणि कसल्याशा हार्मोनल प्रॉब्लेममुळे त्याची छाती मुलीसारखी होती. तर त्याचे रुममेट रोजच्या रोज त्याचा विनयभंग करत असत. आज माझी टर्न आहे यावरुन इतरांमधे म्हणे भांडणे चालायची. शिवाय हिजड्यांना ट्रेनच्या टॉयलेटमधे घेउन जाणारे लोक तर नित्यच द्रूष्टीस पडतात. याच्यात भरीस भर म्हणून गे असणे किंवा लेस्बियन असणे किती नैसर्गिक आहे असे ठासून सांगणारे विचारवंत तर मराठी संस्थळांवर पैशाला पासरीभर आहेत. दुसर्‍याला पीडा देत देत सेक्स करण्यात काहींना आनंद मिळतो असेही एकदोन ठिकाणी नुकतेच वाचले. त्यामुळे डोके भंजाळून जाउन नक्की प्रक्रूती कोणती आणि विक्रूती कोणती याचा विचार करणेच सोडून दिले आहे.

आणि ते वर्णन आपण किंवा आपल्या मित्रांनी ऐकण्यापेक्षा त्याला तिथेच टोकले की नाही?
शिवाय कॉलेज फेस्टिवल मधेही ज्याने कोणी वरील प्रसंग बघितला असल्यास (आपण वा आपले मित्र) लगेच त्या मुलाची तक्रार कॉलेज प्रशासनाकडे केलीत काय? गुन्हे घडत असताना असल्या मित्रांना रोखणे , विरोध करणे आणि ते शक्य नसल्यास त्यास वाळीत टाकणे एवढे तरी आपण नक्किच करू शकतो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Dec 2012 - 11:58 am | विश्वनाथ मेहेंदळे

तेंव्हा या जनावराने आमच्या वर्गातल्या एका मुलीच्या पार्श्वभागावर अशा काही चापट्या मारल्या की तिथून मुलींचा तो अक्खा ग्रुपच पळून गेला

आणि तुम्ही त्याला थोबाडून काढला नाहीत ? नंतर पुढे संबंध ठेवले त्याच्याशी ?
मी व्यक्तिश: अशा माणसाशी मैत्रीचे संबंध ठेवले नसते.
तो जनावर तर तुम्ही बघे कोण मग ?

दादा कोंडके's picture

26 Dec 2012 - 1:56 am | दादा कोंडके

आता बोला अप्पासाहेब. आता गप्प का? नाही, आता तुम्ही सांगाच.

बॅटमॅन's picture

26 Dec 2012 - 7:34 am | बॅटमॅन

+११११११११११११११११११११११

अप्पा जोगळेकर's picture

26 Dec 2012 - 8:55 pm | अप्पा जोगळेकर

नाही. मी त्याला थोबडवले नाही. यापुढे जाउन हेही सांगेन की तो माणूस आजदेखील माझा अत्यंत चांगला मित्र आहे. याचा अर्थ मी त्याच्या त्या कृत्याचे समर्थन करतो असा नाही. ते घृणास्पद कृत्य होतेच. त्याबद्दल त्याला चार शिव्या हासडण्यापलीकडे मी काही केले नाही हे खरे आहे.
शिवाय ज्या मुलीशी त्याने हे गैरवर्तन केले ती माझी मैत्रीण वगैरे नव्हती. मग या सगळ्या गदारोळात माझी काहीच चूक नसताना मी कशासाठी माझे पॉईंट मायनस करुन घेउ ?
आपल्या आजूबाजूची, जिवाभावाची किंबहुना घरातलीसुद्धा माणसं चुकतात. जर अशी फूटपट्टी घेऊन बसलो तर मला कित्येक माणसांना मुकावे लागेल.

यशोधरा's picture

30 Dec 2012 - 12:01 pm | यशोधरा

>>शिवाय ज्या मुलीशी त्याने हे गैरवर्तन केले ती माझी मैत्रीण वगैरे नव्हती. मग या सगळ्या गदारोळात माझी काहीच चूक नसताना मी कशासाठी माझे पॉईंट मायनस करुन घेउ ?>>

हे वाक्य वाचून हतबुद्ध झाले आहे! म्हणजे समजा उद्या रस्त्यावर एखाद्या अपरिचित स्त्रीला कोणी त्रास देत असले तर तुम्ही त्याकडे डोळेझाक करणार? आणि अशी डोळेझाक करुन पुन्हा सुखाने ज्गालही पुढे, कसलीही मानसिक टोचणी न लागता, नाही? बहुतांशी भारतीय समाजमन संवेदनारहित आहे हेच खरे.. :(

समजा उद्या तुमच्या स्त्री नातेवाईकांवर, मैत्रिणींवर असा त्रास सहन करायची वेळ आली तर इतरांनी त्यांना मदत करावी असे तुम्हांला वाटते की त्यांनीही ही माझी कोणी नाही, मग मी का माझे पॉईंट्स मायनस करुन घेऊ असे म्हणायचे आणि अशा मला काय करायचे आहे प्रवृत्तीमुळे तुमच्या परिघतल्या स्त्रीच्या जिवावर बेतले तर? तेही चालेल का? कदाचित चालेल. हो ना?

अप्पा जोगळेकर's picture

30 Dec 2012 - 3:23 pm | अप्पा जोगळेकर

माहीती नाही. खूप अवघड प्रश्न आहे.
माझे गप्प बसणे बरोबर की चूक हे मला अजूनही समजलेले नाही.

हा एकांगी विचार झाला निनाद. तुला असे वाटते का इरेक्शन येणार्‍या प्रत्येक पुरूषात ही वि़कृती असेल? चांगले संस्कार, शिक्षणाची जोड ह्या बरोबरच कायद्याचा ही धाक हा हवाच.

सांजसंध्या's picture

24 Dec 2012 - 7:59 am | सांजसंध्या

रेवतीतैच्या पहिल्या पोस्टला अनुमोदन.
या विषयावरची सगळ्यात प्रगल्भ चर्चा मिपावर चालू आहे हे जाणवलं. अशा ऑनलाईन चर्चांमधे कुठपर्यंत वाहवत जायचं याची लक्ष्मणरेषा कशी असावी हे इथं शिकायला मिळतं.

Kavita Mahajan's picture

24 Dec 2012 - 9:56 pm | Kavita Mahajan

Justice Verma Commitee invites suggestions from all at justice.verma@nic.in
Fax : 011-23092657

पैसा's picture

24 Dec 2012 - 10:50 pm | पैसा

जमेल तेवढ्यांनी आपाअपली मते/सूचना तिथे पोस्ट कराव्यात.

ऋषिकेश's picture

25 Dec 2012 - 10:37 am | ऋषिकेश

आभार! माझी मते न्या. वर्मा यांना इमेल केली आहेत

Pearl's picture

24 Dec 2012 - 11:11 pm | Pearl

१) Justice Verma Commitee
http://www.thehindu.com/news/national/justice-verma-committee-begins-wor...

२) नमिता भंडारे यांनी फाइल केलेले पेटिशन
http://www.change.org/petitions/president-cji-stop-rape-now

३) प्रज्वलच्या सुनिता यांचा ब्लॉग
http://sunithakrishnan.blogspot.com/2012/12/the-painthe-angerthe-outrage...

काळा पहाड's picture

25 Dec 2012 - 5:37 am | काळा पहाड

ते दिर्घकालीन उपाय वगैरे बडबडणं काही उपयोगाचं नाही. जेवढे गुन्हेगार सध्या कोठडीत बंद आहेत, त्यांना तुरुंगावर हल्ला करून त्यांची कत्तल केली पाहिजे. तरच या देशाला भवितव्य आहे. यात निरपराध पण मरतील. मरु देत. लोक आता अशा स्टेज ला पोचलेत, कि गन्गाजल सारख्या घटना वारंवार घडू लागतील, नव्हे घडल्याच पाहिजेत. हे जे कायदा कायदा म्हणून बडबडताहेत, त्यांनी त्या वेळी लोकांना समजावून दाखवावं.

संजिवनीके१ ताई, इतके प्रतिसाद आलेत, तुमचे यावर मत काय? तुमचा काथ्याकूट सुरु करण्याचा उद्देश सफल झाला का? यातून अनुमान काय निघाले असे वाटते? तुम्हाला या चर्चेत महत्वाच्या वाटलेल्या गोष्टी थोडक्यात मांडता येतील काय?

सर्वात योग्य प्रश्न, नाहीतर या चर्चेचा हेतुच मुळी मिपावर पहिल्याच धाग्यावर टिआर्पी खेचणे आहे असे वाटेल. धागाकर्ता किंवा कर्ती यांनी काही लिहावे ही विनंती.

मा. संपादक मंडळ, असे चर्चा प्रस्ताव मांडणारे किंवा मदत मागणारे धागाकर्ते किंवा कर्ती यांना सदर धाग्यावर चर्चा करुन झाल्यावर किंवा मदत करुन झाल्यावर, आभार प्रदर्शन किंवा अमुमान मांडणारा एक प्रतिसाद देणे कंपल्सरी करावे, ही नम्र विनंती.

दिल्लीतल्या अशा पुष्कळश्या घटना खाजगी बसेस किंवा वाहनामध्ये घडलेल्या आहेत.सुरक्षाकर्मचार्‍यांचाही यात मोठा सहभाग असतो. हे कर्मचारी बहुधा अनागर,पुरुषवर्चस्वी कल्पनांचा पगडा असलेल्या जातीजमातीतून येतात.(पुलीसही तसेच.)सुरक्षा एजन्सीज आणि खाजगी वाहतूक कम्पन्यांच्या मालकांना सक्तीने काही नियम पाळायला लावणे मनात आणले तर तितकेसे कठिण नाही.भरतीच्या वेळी कसून तपासणी/पडताळणी,सक्तीची जैवविदा नोंद आणि भरतीनंतर या कर्मचार्‍यांचे वारंवार प्रबोधन,समुपदेशन करून (प्रशिक्षण शिबिरांद्वारे) स्त्रियांविषयी त्यांच्या मनात आदरभाव रुजवण्याचा प्रयत्न करता येईल.त्यांच्या वर्तनावर कडक नजर राखून मग्रूरी,अतिसंताप, कामांधता आढळल्यास प्रथम समज देणे आणि नंतर नोकरीतून कमी करणे अशी शिस्तभंगाची कारवाई करणे खरे तर अशक्य नाही.पण निदान उत्तरभारतात तरी सध्या तरी हे शक्य दिसत नाही कारण अशा तर्‍हेचे गुन्हे हे गुन्हे नसून पुरुषार्थ आहे हीच भावना सर्वत्र रुजलेली आहे. एक छोटीशी माय्क्रोस्कोपिक आशादायक गोष्ट मला दिसते ती ही की आता या गुन्ह्यांबद्दल लोक उघडपणे बोलू तरी लागलेत आणि सनसनाटीखोरपणासाठी का होईना,रिपोर्टिंग तरी होतेय.