पोरीयाल - कोबीची भाजी (द.भारतिय पद्धत)

उदय के'सागर's picture
उदय के'सागर in पाककृती
30 Jul 2012 - 11:09 am

मिपावर सध्या द.भारतीय पदार्थ फेस्टिवल चालू आहे की काय वाटलं (मागच्या दोनही इडली पाकृ पाहून) म्हणून मग म्हंटलं आपणही एक द.भारतीय पाकृ टाकावी :)

दक्षिण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी गेलेलो असतांना तिथल्या प्रत्येक ठिकाणी 'राईस-प्लेट' मध्ये कोबीची एक वेगळ्या प्रकारची भाजी (साइड डीश) खाण्यात आली आणि आवडली. एकदा तशी भाजी करावी म्हणून जरा आंतरजालावर माहिती शोधण्याचा प्रयत्न केला , फार काही माहिती मिळाली नाही पण जे काही मिळाले आणि जी काही चव आठवणीत होती त्याला समोर ठेवून तशीच भाजी बनवण्याचा एक प्रयत्न केला आणि सुदैवाने तो सफल झाला :) .

मिळालेल्या माहिती नुसार त्याला पोरीयाल (Poriyal) म्हणतात असे समजले, माझी हि माहिती चुकीची असल्यास कृपया निदर्शनास आणावे. माहिती अपुरी किंवा चुकीची हे तुम्ही सांगालच पण एक नक्की कि ज्यांना कोबी आवडत नाही किंवा कोबी खाऊन खाऊन कंटाळा आलाय त्यांनी जरूर हे करून पहावे, कदाचित कोबीची ही अशी भाजी आवडेल :)

साहित्य :

कोबी - १ मोठी वाटी बारीक किसलेला 

ओले खोबरे - अर्धी वाटी बारीक किसलेले 

उडीद डाळ(पांढरी) - १ टे.स्पून 

लाल सुक्या मिरच्या - २ 

तेल, कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग, मीठ, साखर - गरजेनुसार / आवडीप्रमाणे

कृती :

१. फोडणीसाठी तेल घेऊन ते व्यवस्थित तापले की लगेच उडदाची डाळ टाकून ती व्यवस्थित लालसर होईपर्यंत तळून/परतून घ्यावी. (हवे असल्यास आता मोहरी वा जिरं हि टाकू शकता. डाळ पूर्ण तळल्या/भाजल्या नंतर मोहरी-जिरं टाकल्याने ते जळण्याची शक्यता कमी असते ).

२. डाळ व्यवस्थित परतली कि लगेच त्यात कढीपत्ता, लाल मिरच्या, हिंग हे फोडणीस टाकून मंद आचेवर परतून घ्यावे.

३. किसलेला कोबी आता ह्या फोडणीत टाकावा आणि मध्यम आचेवर व्यवस्थित परतून घ्यावे. झाकण ठेऊन मंद आचेवर कोबी ५ मिनिटे शिजू द्यावा.

४. कोबी शिजल्यावर त्यात चवीप्रमाणे मीठ-साखर आणि त्याचबरोबर किसलेले ओले खोबरे व चिरलेली कोथिंबीर घालावी व व्यवस्थित परतून पुन्हा मंद आचेवर साधारण  २-३  मिनिटे शिजू द्यावे.  नंतर गॅस बंद करून ५-७ मिनिटे झाकण तसेच ठेवून भाजी शिजू द्यावी.

५. आवडत असल्यास कोथिंबीर व ओले खोबरे वरून पेरावे/भुरभुरावे. अश्या प्रकारे कोबी-पोरीयाल खाण्यासाठी तयार :)

उडीद डाळीचा खमंगपणा आणि ओल्या खोबऱ्याचा 'क्रिमीनेस' ह्यामुळे भाजी खूपच चवदार बनते, थोडक्यात नेहमीच्या कोबीच्या भाजी पेक्षा एकदम वेगळी. 

टिप :

हि भाजी एक साइड डीश आहे त्यामुळे हि भाजी एखाद्या पातळ भाजी बरोबर जास्तं चांगली लागते. फक्तं 'हीच' भाजी आणि पोळी कदाचित जरा 'बोरिंग' किंवा खूप कोरडे-कोरडे वाटू शकेल. पण साइड डीश म्हणून कोशिंबीर, रायते, चटणी ह्यापेक्षा जरा वेगळा प्रकार म्हणून हे नक्की करून बघा :)  

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

30 Jul 2012 - 11:14 am | शिल्पा ब

छान. पण कोबी किसलेलाच हवा का?

पक पक पक's picture

30 Jul 2012 - 11:17 am | पक पक पक

छान. पण कोबी किसलेलाच हवा का?

व्हय माय... ;)

उदय के'सागर's picture

30 Jul 2012 - 11:34 am | उदय के'सागर

कोबी किसलेलाच हवा असे काही नाही पण किसल्यामुळे कोबीला जरा पाणी सुटते आणि त्यामुळे भाजी एकदम कोरडी कोरडी लागत नाही... शिवाय डाळ ही थोडी शिजायला मदत होते.. अर्थात डाळ जरा कडक-'क्रिस्पी' राहिलेलीच छान लागते :)

परिकथेतील राजकुमार's picture

30 Jul 2012 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार

किसण्याची गोडी वेगळीच असते म्हणे.

प्रभाकर पेठकर's picture

30 Jul 2012 - 4:40 pm | प्रभाकर पेठकर

पण म्हणून काय कोबीSSSSSSS?

भले मग सालं निघाली तरी चालेल का ;)

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2012 - 7:25 am | अत्रुप्त आत्मा

पोरी याल ;-)

@भले मग सालं निघाली तरी चालेल का Wink>>> प्रस्तुतचे सर्व अवांतर,आणी पाककृतीचे नाव जमेला धरता, हे अवांतर होत नाही असा निष्कर्ष नोंदवतो. ;-)

नाहीतर तुझी खैर नव्हती.

छान पाककृती आहे ,आवड्ली :) करुन पाहिली जाइल...

चैतन्य दीक्षित's picture

30 Jul 2012 - 11:32 am | चैतन्य दीक्षित

कोणतीही कोरडी भाजी. खरा शब्द बहुतेक 'पोरियल' असावा, नक्की मलाही माहिती नाही.
पण पोरियल म्हणजे कोरडी भाजी आणि कोळंबु म्हणजे रस्सा-भाजी हे नक्की.
मलाही ही कोबीची भाजी आवडते.
इथे (चेन्नईत) कुठेही 'राईस प्लेट' घेतली की ही कोबीची भाजी हमखास असते.
(अजून एक दुधी भोपळ्याची थोडा रस असलेली आणि भरपूर ओलं खोबरं घातलेली भाजीही असते, ती पण सुंदर लागते.)
या वीकांताला जावेच कुठे तरी 'साप्पाडु' (मील्स) सापडायला (खायला) :)

या वीकांताला जावेच कुठे तरी 'साप्पाडु' (मील्स) सापडायला (खायला) Smile

:bigsmile: :bigsmile: :bigsmile:

उदय के'सागर's picture

30 Jul 2012 - 1:02 pm | उदय के'सागर

धन्यवाद चैतन्य अधिक माहितीबद्दल :)

(मलाही चेन्नई मधलं ते 'वसंत विहार' चेन ऑफ रेस्टॉरंट आठवलं... तिथे खुपदा खाल्लंय ... :) )

स्पंदना's picture

30 Jul 2012 - 5:45 pm | स्पंदना

अजून एक दुधी भोपळ्याची थोडा रस असलेली आणि भरपूर ओलं खोबरं घातलेली भाजीही असते,

अवियल म्हणतात कदाचित, मी हल्ली गणपतिला ज्या पाच फळभाज्या करतात् ना त्या अवियल स्टाइल करते फार छान लागतो हा प्रकार. फोडणीसाठी शुद्ध पॅराशुट ऑइल!

चैतन्य दीक्षित's picture

30 Jul 2012 - 5:51 pm | चैतन्य दीक्षित

अवियलच म्हणतात त्या भाजीला.
पण तेल कुठलं असतं इथे कुणास ठाऊक. खोबरेल तेल असेल तर मला विशेष फरक कळला नसेल (किंवा सपाटून भूक लागल्यामुळेही फरक जाणवला नसेल)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Jul 2012 - 8:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अवियल चा शोध भीमाने लावला म्हणे.
(अशी दंतकथा आहे, ती पण पौराणिक. तथाकथित विज्ञानवाद्यांनी उगाच धावत अंगावर येऊन पुरावे मागू नयेत)

निवेदिता-ताई's picture

30 Jul 2012 - 11:37 am | निवेदिता-ताई

मस्त आहे

छान...ही कृती पाहिजेच होती. कारण हा भाजीचा प्रकार खरोखर फार मस्त असतो.

दक्षिण भारतात राहात असताना ही फार आवडीने खाल्ली जायची. कोबीखेरीजही अनेक भाज्या यात असायच्या असं आठवतं. बिटाचीही एक अशी भाजी असायची बर्‍याचदा. हे सर्व खोबरेल तेलात केलं तर जास्त ऑथेंटिक लागेल का?

पण मला दोन शंका आहेत :

१. जिरं आणि मोहोरी घालायचे की नाही? तुम्ही साहित्यात ते लिहिलेलं नाही आणि नंतर उडदाची डाळ परतताना हवे असल्यास घालावे असा उल्लेख केला आहे पण हे दोन्ही घटक भाजीत असल्याने अन नसल्याने बराच फरक पडेल असे(मुख्य टेस्टमेकर्सपैकी) आहेत. मूळ कृतीत काय आहे नेमकं?
२. कोबी शिजवण्याचा कालावधी तुम्ही जो दिलाय, तेवढ्यामधे कोबी पूर्ण मऊ शिजून ही नेहमीची कोबीची भाजी (सान्स हळद) होईल असं वाटतंय. मी जे पोरियल नेहमी खाल्लेलं आहे ते जरा करकरीत (अगदी कच्चं नाही पण अगदी शिजलेलं नाही..जणू फोडणीची कोशिंबिर) अशा कन्सिस्टन्सीचं होतं.

धन्यवाद..

उदय के'सागर's picture

30 Jul 2012 - 1:32 pm | उदय के'सागर

धन्यवाद गवि :)

आणि हो, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कोबी बरोबरच ईतरही भाज्या असतात 'पोरीयल' मधे. शिवाय कोबी खेरीज इतर भाज्यांची ही अश्याच पद्धतीने 'पोरीयल' बनते.. थोडक्यात चैतन्य ह्यांनी सांगितल्या प्रमाणे कोरड्या भाजीलाच 'पोरीयल' म्हणतात त्यामुळे ते कशाचंही बनू शकतं असं आता लक्षात आलंय :)

तुमच्या शंकेचे निरसन :
१. हो आपण मोहरी आणि जिरं टाकू शकतो. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मोहरी/जिरं ह्यांचा नक्कीच चवीत फरक पडतो... आणि कदाचित तेच मला नको होतं :P. मला त्या उडद डाळीची खमंग चव टिकवायची होती आणि भीती वाटत होती की जिरं/मोहरीचा तडका उडद् डाळीच्या खमंग पणाला 'डॉमीनेट' नको करायला :). पण मूळ कृती मधे नक्कीच मोहरी असते अगदी ती मोठे दाणे असलेली साऊथ-इंडियन स्टाईलची (जिर्‍यांबद्दल माहिती नाही किंवा आठवत नाही) .

२. हो हे थोडं होतं खरं मऊ. पण मी हे पोळी बरोबर खाण्याच्या दृष्टीने तसं बनवलं (आणि म्हणूनच त्याला 'कोबीची भाजी' असंही म्हटलंय :)). पण हो हे अगदी खरंय की द.भारतात जे पोरीयार मिळतं ते (tossed) सॅलड सारखं थोडं कच्चं-थोडं शिजलेलं लागतं. मी खाली दिलेल्या टिपेप्रमाणे साइड-डिश म्हणून बनवतांना तुम्ही म्हणता तसंच ते थोडं कच्चं-थोडं शिजलेलं असायला हवं.

(खरं तर मी मूळ कृतीच्या दृष्टीने पाकृ द्यायला हवी होती. मी जरा महाराष्ट्रीयन टच दिला आणि त्याचीच पाकृ दिली. असो, पुढच्या वेळी अशी कुठली पारंपारिक डिश बनवतांना ह्याची नक्कीच काळजी घेईन :) )

धन्यवाद !

कवितानागेश's picture

30 Jul 2012 - 12:18 pm | कवितानागेश

कोबी नारळाच्या दुधातच शिजू दिला तर जास्त छान लागते अशी भाजी....... असे ऐकलय! :)
मी नारळाचे व्याप करत नाही कधी.

नारळ खोवणं वगैरेचा व्याप होतो खरा..

अशावेळी

हा उत्तम उपाय मी करतो. खिचडी, मासे, थाई पदार्थ इत्यादि बनवताना भयंकर उपयोगी...

इरसाल's picture

30 Jul 2012 - 12:46 pm | इरसाल

बरोबर
त्या भाजीला तेलगुमधे पोरयाल म्हणतात व मल्याळममधे तोरॅन्/ थोरॅन म्हणतात.

१५ मि.पुर्वी हीच भाजी ताटात होती.

रेवती's picture

30 Jul 2012 - 7:20 pm | रेवती

उदयसाहेब, आपल्या उत्साहाबद्दल कौतुक करावेसे वाटते पण ही भाजी अत्यंत कोरडी ते अत्यंत पचपचीत अश्या प्रकारांत खाल्ल्याने नक्की कशी असते ते कळत नाही. एक मात्र नक्की त्यामुळे मला कोबीची शिसारी आलिये. वेगळा मदतीचा धागा काढायला नको म्हणून इथेच विचारते की कोणी खरच कोबीची चवदार भाजी मला शिकवू शकेल काय?

कवितानागेश's picture

30 Jul 2012 - 8:23 pm | कवितानागेश

फक्त जिरे, आले, टोमॅटो, कोथिंबीर घालून बघ एकदा.
हळद बिल्कुल नको.

नाहीतर फक्त शेझवान सॉस घाल. जोडीला थोड्या फ्राइड नूडल्स! ;)

नाहीतर फक्त शेझवान सॉस घाल. जोडीला थोड्या फ्राइड नूडल्स!
हा हा हा...
धन्य जाहले.

प्रभाकर पेठकर's picture

30 Jul 2012 - 9:10 pm | प्रभाकर पेठकर

जरा जास्त तेल घेऊन, फोडणीला मोहरी, कढिलिंब, लांब चिरलेल्या २-३ हिरव्या मिरच्या घालून, त्यावर जाडसर चिरलेली कोबी घालायची, भिजवून शिजवलेली चण्याची डाळ घालायची, हवी असल्यास अर्धा चमचा हळद घालायची, नाही घातली तरी चालेल. पाणी अजिबात घालायचे नाही. नुसत्या तेलावर परतून अर्धवट शिजवायची. (झाकण ठेवायचं नाही) जरा करकरीतच राहिली पाहिजे. अशी अर्धवट शिजली की त्यावर चवीनुसार मीठ, भरपूर ओला नारळ आणि भरपूर कोथिंबीर घालून मिसळायची. आणि गॅसवरून उतरवायची.

अगदी अश्याच प्रकारे मी करते पण काही केल्या माझ्या हातची भाजी मला आवडत नाही.
असो, पाकृबद्दल धन्यवाद.

उदय के'सागर's picture

31 Jul 2012 - 10:26 am | उदय के'सागर

तुम्ही कोबीची पीठ पेरून केली आहे का भाजी? नसेल तर नक्की करुन पहा. माझ्या एका मित्राच्या गावाकडे गेलो असतांना त्याच्या घरी खाल्ली होती पहिल्यांदाच. थोडक्यात पाकृ अशी :
अगदी कमी तेलावर (२-३ टी.स्पून) बारीक चिरलेला किंवा किसून घेऊन जमेल तेवढं पाणी काढून टाकलेला कोबी जीरं, मोहरी, हळद आणि 'लाल तिखट' अश्या फोडणीत टाकून परतायचा, थोडा शीजत आला की त्यात मीठ साखर आणि २ चमचे चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आणि पीठाचा कच्चा वास जाई पर्यंत परतत रहायचं - थोड्क्यात खमंग वास येई पर्यंत. लगेच गॅस वरुन उतरवून गरम गरम पोळी बरोबर गट्ट्म करायची :) (पण काळजी घ्या की तुम्ही कोबीतलं शक्य तितकं पाणी काढाल नाहीतर पीठामुळे एकदम चिकट होईल, आपण ढोबळ्या मिरचीची करतो ना पीठ पेरुन तशीच कराची..that is pattern you can say for this भाजी :P )

किंवा मग तुम्ही कोबीचे कोफ्ते ही करु शकता :)

पीठ पेरलेली को. भा. हा नवीनच प्रकार ऐकतिये.
प्रयत्न करायला हरकत नाही.
धन्यवाद.

सानिकास्वप्निल's picture

30 Jul 2012 - 7:26 pm | सानिकास्वप्निल

पोरीयालची पाकृ आवडली :)

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jul 2012 - 7:51 pm | अत्रुप्त आत्मा

@पोरीयाल कोबिची भाजी.... >>>

ही भाजी नावानिशि आज कळली,पण मद्राशी लोकांच्यात कामाला गेल्यावर बरेचदा खाल्ली आहे. रस्सम भाता बरोबर खाताना,भाजी बरोबर भात जातोय,का भाताबरोबर भाजी हे कळत नाही,इतक हे कॉम्बिनेशन झ्याक लागतं. :-)

चित्रेचा तारा's picture

30 Jul 2012 - 8:08 pm | चित्रेचा तारा

शेजारी आण्णा बसलेला आहे. तो म्हणतो , पोरीयल म्हणजे कोणतीही सुकी भाजी.

पैसा's picture

30 Jul 2012 - 10:34 pm | पैसा

नक्कीच करून बघणार!

जाई.'s picture

30 Jul 2012 - 11:14 pm | जाई.

मस्त

मराठे's picture

30 Jul 2012 - 11:39 pm | मराठे

कधीतरी घरी 'पचडी' नावाचा प्रकार आई करायची. तसलाच काहीसा प्रकार आहे का?