इंडीयन रोस्टी

Primary tabs

Keanu's picture
Keanu in पाककृती
23 Jun 2012 - 6:57 pm

हा थोडा German Rösti च्या जवळपास जाणारा पदार्थ. त्याचं नक्की नाव माहित नाही , आम्ही याला घरी पिझ्झा म्हणतो. लहान मुलांसाठी थोडा वेगळा प्रकार आणि सिमला मिरची न खाणार्‍यांनीही नक्की करुन पहा. :-)

लागणारा वेळ:
१ रोस्टीसाठी १५ मिनीटे

लागणारे जिन्नस:
४ मोठे बटाटे
१ मध्यम लाल कांदा बारिक चिरून
१ मध्यम टोमॅटो बारिक चिरून
२ मध्यम सिमला मिरची बारिक चिरून
मूठभर कोथिंबीर बारिक चिरून
धणे पावडर
जीरे पावडर
लाल तिखट
चवीपुरते मीठ
चवीपुरती साखर
तेल

क्रमवार पाककृती:
१. चिरलेला कांदा, टोमॅटो , सिमला मिरची, कोथिंबीर एकत्र करुन घ्या.
२. बटाटा एका पिझ्झा साठी लागतील इतकाच एका वेळी किसून घ्या.

३. त्यामधे १ छोटा चमचा धणे पावडर, १ छोटा चमचा जीरे पावडर, १ छोटा चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ, चवीपुरती साखर घालून मिश्रण एकत्र करून घ्या.

४. तवा थोडा तापवून , त्यावर थोडं तेल सोडून बटाट्याचा किस गोल आकारात पसरवून घ्या.

५. आत त्यावर कांदा, टोमॅटो , सिमला मिरची एकत्र मिश्रण पसरवून झाकून ठेवा.

६. ६-७ मिनिटा नतर झाकण काढून पिझ्झा अर्धा दुमडा.

७. तयार पिझझा हा असा दिसतो.

अधिक टिपा:
१. तव्यावर बटाट्याचा किस टाकण्याआधी थोडं तेल सोडाव, तसंच कडेने तेल सोडलं की क्रिस्पी होतात.
२. हे गरम असतानाच खाल्लं तर छान चव लागते.
३. लहान मुलांसाठी करायच असल्यास मिश्रणात चीझ घातल्यास चांगले लागतात.
४. बटाटा एका पिझ्झा साठी लागतील इतकाच एका वेळी किसून घ्यावा. अन्यथा काळा पडतो.
५. यात साखर असल्याने थोडा करपल्यासारखा दिसतो.
६. मक्याचे दाणे सुद्धा चांगले लागतात यात. आतले मिश्रण आपल्या आवडीनुसार घाला पण सिमला मिर्ची हवीच्..तिच्यामुळेच वेगळी चव येते.

वाढणी/प्रमाण:
वर दिलेल्या प्रमाणामध्ये ह्या फोटोतल्या साईज सारखे साधारण ८ होतात.

पूर्वप्रकाशितः घरगुती पिझ्झा

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

23 Jun 2012 - 10:14 pm | शिल्पा ब

वेगळी पाकृ. आहे. छान दिसतेय.
खुप स्टार्च असतं त्यात म्हणुन मला बटाटा आवडत नाही. असो. लहान मुलांना भाज्या खाउ घालायला छान आयडीया आहे. करुन बघेन.

प्राजु's picture

23 Jun 2012 - 10:25 pm | प्राजु

आत्ताच केली. लेकाला आवडली. चीज घातलं होतं... एकदम खुश झाला. हॅश ब्राऊन सारख लागतंय अस म्हणाला. :)
बटाट्याच्या थालीपीठाचाच प्रकार, थोडा वेगळा!
आवडला. धन्यवाद. :)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jun 2012 - 10:46 pm | अत्रुप्त आत्मा

चान चान आहे....

पैसा's picture

23 Jun 2012 - 11:58 pm | पैसा

वेगळाच प्रकार! आणि सोपा पण. नक्की करून बघेन.

जाई.'s picture

24 Jun 2012 - 12:00 am | जाई.

छानच आहे

करुन पहायला हवं, बटाटा हे या जगात मरण आणि इनकम टॅक्स या दोन गोष्टींएवढंच सत्य आहे.

वेगळा प्रकार छान आहे. फोटो पाहून हॅशब्राऊनची आठवण आली.

याला इंडियन का म्हणायचं? हा जर्मन / फ्रेंच पदार्थ आहे ना?

आणि इंडियन म्हणायचेच असेल तर इंडियन कशाला? वैदिक रोष्टी म्हटले तर चालणार नाहि का?

बॅटमॅन's picture

25 Jun 2012 - 4:44 pm | बॅटमॅन

हौ अबौट मूलनिवासी रोष्टी? वैदिक वैग्रे गोष्टी तर बाहेरच्याच, नैका?

इस्पिक राजा's picture

25 Jun 2012 - 4:55 pm | इस्पिक राजा

हाण्ण तिच्यायला. काय्य निब्बर हाणला आहे राव

मूल निवासी रोष्टी हाच शब्द योग्य आहे.. बटाट्याचा निवास मुळात असतो, म्हणून.

इथे स्मायल्य कशा द्यायच्या? मला एकच येते.

:)

बॅटमॅन's picture

25 Jun 2012 - 8:21 pm | बॅटमॅन

हा काही नीट जमला नाही ;)

डोळे मिचकावण्याची स्मायली = ; + ).

दात काढण्याची स्मायली = :+(कॅप्स लॉकमधील डी) इ.इ.

सुनील's picture

25 Jun 2012 - 9:02 pm | सुनील

बटाटा भारतात पोर्तुगिझांनी १५व्या शतकात आणला. तत्पूर्वी भारतात बटाटा नव्हता. तेव्हा "मूलनिवासी" बाद! ;)

बॅटमॅन's picture

25 Jun 2012 - 9:17 pm | बॅटमॅन

मान्य :) मग "बहुजन रोष्टी" बद्दल काय म्हणणे आहे ;)

सुनील's picture

25 Jun 2012 - 9:43 pm | सुनील

मान्य मग "बहुजन रोष्टी" बद्दल काय म्हणणे आहे
बटाटा हे बहुजनांचे खाद्य (उदा. वडा-पाव), तेव्हा बहुजन रोष्टी मान्य होण्यासारखे ;)

हा "रोष्टीव्यवहार" बहुजनमान्य झालाच तर मग शेवटी ;)

स्पंदना's picture

25 Jun 2012 - 8:38 am | स्पंदना

वेगळ पण इंटरेस्टींग !
करुन पाहते.
बाकी ज्या कोणाला बटाटा नको असेल त्यांनी रताळ वापरल तरी चालेल अस वाटतय.

ऋषिकेश's picture

25 Jun 2012 - 4:41 pm | ऋषिकेश

चान चान.. सोपा.. नक्की करून बघेन

सानिकास्वप्निल's picture

29 Jun 2012 - 11:38 am | सानिकास्वप्निल

मस्तचं :)
नक्की करून पाहीन :)
झटपट असा पदार्थ आहे :)