मिपाकर मित्रानो,
आपल्या कॅमेर्यात मॅन्यूअल कंट्रोल असतात. पण बर्याच वेळा वेळे अभावी व बरेच वेळा आळसाने वा काही वेळा " त्यापेक्शा आटो बरा , आयला डोक्याला कटकट नाही ! या हिशेबाने मॅन्यूअल कंट्रोल वापरण्याचे आपण सर्व जण ( त्यात मी ही आलो) टाळतो.
आपला फोटो भुरकट येणे व धुरकट येणे या वेगवेगळ्या समस्या आहेत. आपल्याला फोकस जमला नाही की फोटो भुरकट येतो. पण फोटोत वातावरणातील दोषांमुळे एक धुरकट रंगाचा पातळ थर फोटोवर येतो. बहुतेक वेळा उन्हाकडे तोंड करून स्नॅप घेतला तर हा प्रकार घडतो.
असा फोटो आपल्या डोळ्याला त्रासदायक वाटतो. हा दोष फोटोशॉप मधील एका सोयीने सुधारता येतो. त्या टूल ला " अनशार्प मास्क" से म्हणतात. त्याचा उपयोग आपण पाहू या.
हा फोटो फोट्शॉप मधे file - open या मार्गाने open केला आहे. पण त्यात मधला देवळाच्या दाराभोवतीचा भाग धुरकट दिसत आहे.
यात लेअर पॅलट मधे जाऊन background layer ला right click करा .
यात एक नवे पॅलट ओपन होईल त्यात duplicate layer वर click करा . आता duplicate layer तयार झाला.
आता duplicate layer सिलेक्ट करून फिल्टर या मेनु मधे जा.
इथे filter- sharpen- unsharp mask या मागाने जाऊन unsharp mask ला click करा.
इथे तीन प्रकारे माहिती द्यावी लागेल. त्यात radius 7 ते 20 व threshold 0 ( शुन्य)ठेवा.
amount slider आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करा व ok वर click करा.
आपल्या फोटोतील धुरकट पणा नाहीसा झालेला दिसेल .आता खाली दोन फोटोची तुलना
करून पहा.
मूळ फोटो आपल्या दोषांसह.
अनशार्प मास्क वापरल्यानंतर
वरील फोटो कर्नाटक राज्यातील अतिशय अद्वितीय अशा सोमनाथपूर देवालयाचा आहे.
प्रतिक्रिया
11 Jun 2012 - 7:14 pm | चित्रगुप्त
धन्यवाद, असेच उपयोगी लेख येऊ द्यात.
11 Jun 2012 - 7:25 pm | आबा
माहिती उपयोगी आहे,
पण, प्रोसेस्ड फोटो मध्ये आकाश जास्त चमकदार झालय, आणि मंदिराच्या कडापण जास्त शार्प झाल्यात, त्यामुळे फोटो कृत्रीम वाटतोय. त्यासाठी सांगा एखादं टूल असेल तर...
11 Jun 2012 - 8:08 pm | चौकटराजा
एक गोष्ट खरी की डिजिटल मधे काही मिळाले म्हणजे काहीतरी निघून जाते. सबब स्लाईडर
वापरून या शार्पनेसची व्हॅल्यू कमी अधिक करता येते. शिवाय सिलेक्शन टूल वापरून हा
वा कोणताही फिल्टर हा ठराविक भागावर टाकता येतो. उदा या फोटोतील आकाश हे पांढरे फटक दिसतेय ते लाईट ब्लू कलर चा ब्लू फोटो फिल्टर टाकून निळसर करता येईल.
11 Jun 2012 - 8:06 pm | चित्रगुप्त
आबांनी सुचवल्याप्रमाणे :

यात मंदिराचा वरील भाग जरा गडद करून, कडा थोड्या अंधुक करून आकाश काहीसे ढगाळ केले आहे.
11 Jun 2012 - 8:10 pm | आबा
थॅन्क्यू थॅन्क्यू,
हा जास्त आवडला !
12 Jun 2012 - 12:10 am | शशिकांत ओक
चित्रगुप्त,
एका फोटोवरील तांत्रिक प्रक्रिया म्हणून केलेले वरील प्रयोग चांगले आहेत.
या प्रक्रियेत त्या वास्तूतील दोन कळसांच्या मधील भाग मात्र उगीच निळसर झाक लाऊन नटून बसला आहे असे भासते.
11 Jun 2012 - 8:13 pm | जेनी...
मस्त ओ काका ..
अजुन येऊद्या
वाचतेय आणि फोल्लोव सुद्धा करतेय ....
11 Jun 2012 - 8:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे
फोटोशॉप येत नाही, पण डिजिटल इमेज प्रोसेसिंग नावाचा विषय शिकताना ह्या टूल्स मागचे गणित (इथे चालेल ना हो घासू गुर्जी ? ;-) ) शिकलो होतो ते आठवले. शार्पनेस साठी चक्क डेरीवेटिव्ह वापरतात हे ऐकून भरून पावलो होतो. बारावीत शिकलेल्या त्या किचकट पण मजेदार प्रकारचा इतका मस्त उपयोग होतो ऐकून बरे वाटले होते.
12 Jun 2012 - 3:48 pm | चौकटराजा
आपल्या घराच्या तळघरात थॉमस नॉल या तरूणाने हे रोपटे लावले. अनेक अभियंत्यांच्या
सहकार्याने त्याचे रूपांतर अतिशय प्रभावी व महागड्या सॉफ्टवेअर मधे झाले आहे. त्या सर्वाना दंडवत ! ( त्यात काही भारतीय ही आहेत! )
13 Jun 2012 - 12:01 pm | जोयबोय
Function,Limts & derivatives, Intigration ह्या संकल्पना नीट समजल्या नाही .
सोदाहरण समजवल्यास आभारी राहील
14 Jun 2012 - 12:08 pm | विश्वनाथ मेहेंदळे
function समजावून नाही सांगू शकत टाईप करून. लिमिट नाही कळले तरी फार फरक पडत नाही. :-)
Derivative is the function which determines slop of the curve at any give point for original function.
Integration is area under the curve. Simple :-)
अधिक माहितीसाठी विकिपीडिया बघा. प्रत्यक्ष शिकवणी हवी असेल तर व्यनी करा. आम्ही वन टू वन शिकवण्या पण घेतो. फी जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मिळकतीचे डीटेल्स द्यावे लागतील. मागील दोन वर्षांचे फॉर्म १६ तयार ठेवा.
16 Jun 2012 - 10:46 am | जोयबोय
ओके
11 Jun 2012 - 9:18 pm | मॅन्ड्रेक
सही..
11 Jun 2012 - 9:35 pm | मुक्त विहारि
छान छान..
11 Jun 2012 - 11:29 pm | सौरभ उप्स
छान प्रयत्न आहे.. पण त्याच योग्य तो एफ्फेक्ट आला नहीं अस वाटतय....
पुरेस blur अणि शार्पनेस तसेच clouds वापरून मी हा एफ्फेक्ट try केला.....
तुमच्या मुळ फोटो वरून मज्या पधातिने एक try केलाय......
कसा झालाय???
12 Jun 2012 - 2:51 pm | योगेश सुदाम शिन्दे
@ सौरभ उप्स -
ते clouds न वाटता, पाठीमागे काहीतरी जळल्याचा आभास होतोय .
प्रयत्न नक्कीच चांगला केलाय तुम्ही.
12 Jun 2012 - 3:03 pm | परिकथेतील राजकुमार
आमचे चौरा म्हणजे अलीबाबा आहेत. त्यांच्या मेंदूच्या गुहेत काय काय भरलेले असते..
बाकी अंगणावरती मेहनत घेण्यापेक्षा नाच सुधारावा असे आपले आमचे एक मत आहे.
13 Jun 2012 - 8:13 pm | आंबोळी
बाकी अंगणावरती मेहनत घेण्यापेक्षा नाच सुधारावा असे आपले आमचे एक मत आहे.
आपण पुर्वी याठिकाणी काड्यायुक्त नावाने वावरत होतात का?
14 Jun 2012 - 12:20 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
13 Jun 2012 - 11:35 am | जोयबोय
फोटोशॉपमधे चेहेर्याचा रंग कसा बदलावा हे सांगा
13 Jun 2012 - 6:36 pm | चित्रगुप्त
फोटोशॉपमधे चेहेर्याचा रंग कसा बदलावा हे सांगा

....
म्हणजे उदाहरणार्थ खालील फोटोतील चेहर्यांच्या रंगांची अदलाबदली करा:
हे फोटोशॉपच्या निर्मात्यांना तरी जमेल की नाही, शंका वाटते, तरी खरोखर असे करता येत असेल, तर कळवा कुणी.
15 Jun 2012 - 3:08 pm | सौरभ उप्स
हो चेहऱ्याच्या रंगाची अदलाबदल करता येते.....
वर दिलेल्या फोटो मध्ये मी तसा करायचा प्रयत्न केलाय.... १००% perfect होण तर कठीण असत....
15 Jun 2012 - 5:52 pm | सहज
यावर एक ट्युटोरीयल येउ द्या. जमल्यास लेखमालाच करा प्रोफाईल फोटो- कसे 'फोटोशॉप' करावेत गाल खप्पड, डबल चीन गायब, रंग गोरा, कांती नितळ :-)
वरच्या फोटो एक लेयर मधे स्कीनटोन काळा करुन व एक लेयर मधे गोरा करुन दोन लेयर एकमेकांवर चढवलेत काय?
15 Jun 2012 - 6:12 pm | चौकटराजा
यावर एक ट्युटोरीयल येउ द्या. जमल्यास लेखमालाच करा प्रोफाईल फोटो- कसे 'फोटोशॉप' करावेत गाल खप्पड, डबल चीन गायब, रंग गोरा, कांती नितळ
हे सारे फोटोशॉप मधे करता येते. देवी चे वण , कांजिण्याचे वण . तीळ ई गायब करता येतात
फुकट फेशियल करता येते. पण आपल्या कपाळावरची पडलेली खोक रूपी खूण एखाद्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग वाटत असेल तर तो कशाला ती एडीट करेल ???
आपल्याला कोणतीही व्यक्ती फोटो मधून गायब करून त्याजागी बॅकग्राउंड आणता येते.
15 Jun 2012 - 8:13 pm | चित्रगुप्त
चेहऱ्याच्या रंगाची अदलाबदल कशी केली हे पण सांगा.
16 Jun 2012 - 8:43 am | प्रचेतस
एक्दम झकास रे उप्स.
16 Jun 2012 - 10:30 am | विश्वनाथ मेहेंदळे
सही रे भौ !!!
16 Jun 2012 - 10:51 am | जोयबोय
झक्कास!
कसे केले ते कळवा ना राव.
17 Jun 2012 - 6:41 pm | किचेन
लय झक जम्लय.
16 Jun 2012 - 8:21 pm | सौरभ उप्स
Ho nakki purn making takto rao, somvar/mangalvari takto...
16 Jun 2012 - 9:07 pm | चौकटराजा
भाग १- फोटोशॉप------पेनटूल-- पाथ-कन्व्हट्र पाथ टू सिलेक्शन-
भाग २ फोटोशॉप--- मेनू -इमेज-- कलर बॅलन्स-
भाग ३- फोटोशॉप- मेनू- इमेज - लेव्हल ( किंवा कर्व्ह) जरूर पडल्यास .
17 Jun 2012 - 12:39 pm | सौरभ उप्स
चौकट राजा हे काय सांगताय तुम्ही???
17 Jun 2012 - 1:31 pm | चौकटराजा
@ सौरभ उ ,हा माझा एक तर्क आहे की या मार्गाने तू वरील बदल केला असावा. पण वेगळे काही टूल वापरले असल्यास माझ्याही ज्ञानात भर पडेल. सबब तुझ्या रहस्योदघाटनाच्या प्रतिक्षेत.