गार्लिक - कोरिएंडर नान आणी मटर-पनीर

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
4 May 2012 - 1:46 pm

साहित्य गार्लिक -कोरीएंडर नान :

१ वाटी मैदा
२ टेस्पून दही
२ टेस्पून कोमट पाणी
१ टेस्पून ऑलिव्ह ऑईल
२-३ लसूण पाकळ्या
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून कलौंजी
२-३ कोथंबीरीच्या काड्या
३/४ टीस्पून इझी ब्लेंड ड्राईड यीस्ट
१ टीस्पून साखर
मीठ चवीनुसार

.

पाकृ:

मैदा, मीठ व धणेपूड एकत्र चाळून घ्या.
त्यात छोटा खळगा करून त्यात कोमट पाणी, दही, कलौंजी व तेल घालावे.
बारीक चिरलेला लसूण घालावा.
मी इथे इझी ब्लेंड ड्राईड यीस्ट वापरले आहे जे थेट मैद्याच्या मिश्रणात घालू शकतो. तुम्हाला जर का हे नाही मिळाले तर तुम्ही यीस्ट, कोमट पाणी व साखर एकत्र करुन , झाकून १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा. पाणी जेव्हा फेसाळ होईल तेव्हा ते यीस्ट्-मिश्रीत पाणी मैद्यात घालून पीठ चांगले मळून घेणे.
आता मैदा चांगला १० मिनिटे मळून घ्या. तेल लावलेल्या भांड्यात मैद्याचा गोळा ठेवा व त्यावर ओला कपडा ठेवून , झाकून उबदार ठिकाणी १-२ तास ठेवून द्या.

.

१-२ तासांनी पीठ फुगून दुप्पट झाले असेल. त्यावर मुक्के मारून चांगले मळून घ्या व त्याचे ४ सारखे भाग करुन घ्या.
एका गोळ्याची लाबंटसर पोळी लाटून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व कलौंजी भुरभुरा.

.

ओव्हन ला २५० डिग्रीवर प्री-हिट करुन घ्या. बेकिंग ट्रेवर तयार नान ठेवून ओव्हनमध्ये ५ मिनिटे भाजा. नान फुगला पाहिजे.
तयार नानवर बटर लावा.

.

साहित्य मटर- पनीरः

२ वाट्या मटारचे दाणे
१ वाटी पनीरचे तुकडे सोनेरी रंगावर शॅलो फ्राय केलेले
२ कांद्यांची प्युरे
३ टोमॅटोंची प्युरे
१ टीस्पून जीरे
१ टेस्पून आले +लसूण पेस्ट
दीड टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१/२ टीस्पून हळद
२ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर (रंगासाठी)
१-१/४ टीस्पून धणेपूड
१ टीस्पून गरम-मसाला
१ टीस्पून कसूरी मेथी
मीठ चवीनुसार
तेल
.

पाकृ:

एका पॅनमध्ये तेल गरम करुन जीरे घालावे.
जीरे तडतडू लागले की त्यात आले + लसूण पेस्ट घालावी.
आले + लसूण पेस्ट चांगली परतली गेली की त्यात कांद्याची प्युरे घालून परतावे. कच्चा वास कांद्याचा गेला पाहिजे.
आता त्यात टोमॅटोची प्युरे, मीठ व सर्व मसाले घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
त्यात मटारचे दाणे व गरजेप्रमाणे (ग्रेव्ही किती दाट हावी त्याप्रमाणे) पाणी घालून उकळी काढावी.
उकळी आली की त्यात तळून ठेवलेले पनीरचे तुकडे घालावे व ७-८ मिनिटे शिजु द्यावे.
शेवटी वरून चमचाभर बटर सोडावे.

.

कोथिंबीर घालून गरमा-गरम गार्लिक - कोरिएंडर नान बरोबर खायला सुरुवात करणे :)

.

प्रतिक्रिया

गणपा's picture

4 May 2012 - 1:55 pm | गणपा

लाजवाब.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 May 2012 - 2:18 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंच! अगदी लाजवाब! सुंदर प्रेझेंटेशन! गणपा स्कूल ऑफ कुकरी सारखंच अगदी!

आणि गणपाने इतकी मनमोकळी दाद दिली हे ही विशेष आवडलं! :)

अस्मी's picture

4 May 2012 - 2:00 pm | अस्मी

ऑसम!!!

इरसाल's picture

4 May 2012 - 2:03 pm | इरसाल

खतर्नाक झालय बघा.

मृत्युन्जय's picture

4 May 2012 - 2:03 pm | मृत्युन्जय

कातिल झाला आहे हो ना आणी मटर पनीर पण. तोंपासु

sneharani's picture

4 May 2012 - 2:05 pm | sneharani

अप्रतिम...काय फोटो दिसतायेत्...आहाहा!

खल्लास.
शॉल्लेट प्रेझेंटेशन.

स्पा's picture

4 May 2012 - 2:10 pm | स्पा

__/\__

धनुअमिता's picture

4 May 2012 - 2:15 pm | धनुअमिता

खल्लास. तोंपासु

परत भुक लागली.

स्मिता.'s picture

4 May 2012 - 2:20 pm | स्मिता.

हे असे फोटो बघून जिभेला आवर घालणे फार अवघड होते गं आणि मग वाढत्या वजनालाही आवर घालायला अवघड होते :(

गवि's picture

4 May 2012 - 2:26 pm | गवि

प्रेझेंटेशन उत्कृष्ट..
पदार्थही लई खास असणार. पनीर तळू जाता विरघळल्यासारखे होऊन त्याचा भुगा होतो आणि कढईत तळाशी चिकटून जळका गोळा उरतो असा अनुभव येऊन हतोत्साह झालो.

तेव्हापासून पनीरचे पदार्थ करण्याचे धाडस होत नाहीये.

पियुशा's picture

4 May 2012 - 2:26 pm | पियुशा

वॉव !!!!!!!!!
आय लव्ह मटर- पनीर :)

मुक्त विहारि's picture

4 May 2012 - 2:28 pm | मुक्त विहारि

चला ह्या रविवारी बायकोला लावतो कामाला...

प्यारे१'s picture

4 May 2012 - 2:39 pm | प्यारे१

आँ????
हे म्हणजे अतिच झालं.... लग्न झालंय का नक्की?

सानिकातैंचा नेहमीप्रमाणेच जाहीर निषेध!
स्वप्निल, आवर हो तुझ्या बाय्कोला.
छळ छळ मांडलाय ह्या बाईंनी.
अरे कुठं फेडाल ही पापं????

छळ मांडियेला मिपावरी भई,
पाकृ टाकूनि किती त्रासिती रे!

मुक्त विहारि's picture

4 May 2012 - 3:00 pm | मुक्त विहारि

ह्या ताईंनी , दाबेली कशी बनवायची त्याची क्रुती दिली होती...त्या पचवून झाल्या.

त्यामूळे बायको खूष, आणि मग ती स्वयंपाक घरात असल्याने आम्ही पण खूष.

ह्या सानिका बाईंनी अशाच भरपूर पाक-क्रुती देवोत आणि आमची बायको स्वयंपाक घरात बिझी राहो. अशीच रोज प्रार्थना करून मगच झोपायला जातो.देव आहे हो ह्या जगांत....

सानिकास्वप्निल जी, मस्त पा़कॄ
__/\__

वॉव !!

परिकथेतील राजकुमार's picture

4 May 2012 - 3:17 pm | परिकथेतील राजकुमार

गार्लिक - कोरिएंडर नान :- अप्रतिम ! झकास ! सर्वोतम !

येवढ्या सुंदर पाककृतील ते पनीरचे गालबोट कशाला ? कसे काय लोकं तो थर्माकोल खातात काय माहिती.

कपिलमुनी's picture

4 May 2012 - 5:28 pm | कपिलमुनी

कशी करता येइल ??

मुक्त विहारि's picture

4 May 2012 - 7:40 pm | मुक्त विहारि

पण आपण त्या जागी फ्लॉवर टाकू शकता. एक वेळ पनीर चालेल पण ते गाजर आणि फरसबी नको.

एक वेळ पनीर चालेल पण ते गाजर आणि फरसबी नको

मुक्त विहारि ,
ह्याकरिता एक पोटंट कॉ़कटेल माझ्यातर्फे तुम्हाला.
ज्याने ह्या दोन गोष्टी घालून भाज्या करायचा शोध लावला त्याचा शोध घेतोय मी :angry:

- (भाजीत गाजर असल्यास 'लाल' होणारा) सोकाजी

प्रभाकर पेठकर's picture

5 May 2012 - 2:00 am | प्रभाकर पेठकर

परिकथेतील राजकुमार, कपिलमुनी, मुक्तविहारी.

पनीर ऐवजी 'टोफू' (बीन कर्ड) वापरून पाहा. पनीरच्या तुलनेत चवीला आणि पोषण मुल्यांना उजवे आहे.

प्रभाकर पेठकर's picture

4 May 2012 - 3:54 pm | प्रभाकर पेठकर

मस्त पाककृती. गार्लीक नान आणि मटार पनीर. भुक खवळली आहे.
कांदा नीट लाल होईपर्यंत परतल्यावर २ टेबलस्पून दही (फेटलेले) घालून व्यवस्थित परतून घ्यावे आणि मग इतर मसाले घालून तेल सुटेपर्यंत परतल्यास रश्याचा पोत मस्त येईल.

खादाड's picture

4 May 2012 - 3:55 pm | खादाड

नान tempting ! :) आणि मटर पनीर पण !

सुहास झेले's picture

4 May 2012 - 4:46 pm | सुहास झेले

ज ह ब री !!!

सानिकाजी, एवढे खतरनाक फोटो टाकत जाऊ नका हो !
हपिसात असताना फार पंचाईत होते. कधि एकदा घरी जाऊन सामान जमवून पाकृ करून पोटात जाईल असं होतं !
एक शंका. नान मायक्रोवेव्हमध्ये चांगलं होईल का ?

बॅटमॅन's picture

4 May 2012 - 6:18 pm | बॅटमॅन

ऐला काय जबरदस्त पाकृ हो तिच्या ****ला!!!!! आमचं जीभ तर बसल्याजागी खवळलं बगा :)

रेवती's picture

4 May 2012 - 7:32 pm | रेवती

सगळे फोटू व पाकृ फर्मास.
शीर्षक बघितल्यावर ही तुझी पाकृ असणार हे ओळखलं.

मदनबाण's picture

4 May 2012 - 8:19 pm | मदनबाण

शॉलिट्ट ! :)

(पनीर प्रेमी) ;)

अत्रुप्त आत्मा's picture

4 May 2012 - 8:30 pm | अत्रुप्त आत्मा

मोदक's picture

5 May 2012 - 2:11 am | मोदक

आवडले..

तुमच्या धाग्यांवर प्रतिसाद देउन कंटाळा आला आहे. आता या पुढचा प्रतिसाद डायरेक ऑगस्ट मधल्या धाग्यावर मिळेल.

पैसा's picture

5 May 2012 - 6:03 pm | पैसा

फोटो आणि पाकृ नेहमीप्रमाणे छान पण त्यातल्या क्यालर्‍या मोजायला लागले आणि फोटो बघून पुरे म्हटलं!

करा लेको चैन! खा लसणाची पोळी खा , मटार उसळ खा ;)

योगप्रभू's picture

6 May 2012 - 3:19 pm | योगप्रभू

लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबिरीची पाने टी-स्पूनमध्ये ठेवलेली बघून गंमत वाटली, पण सजावटीमध्ये छान दिसताहेत. रसिकतेचे कौतुक..

बाकी पाककृतीबाबत क्या कहना? झकास. :)

मस्तच गं..... टेम्पटिंग दिसतायत नान... मला आजकाल जास्त वेळच मिळत नाही कामामुळे... त्यामुळे सध्या काही करणं पण होत नाही....