बकलावा (तुर्कीची स्वीट डिश)

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
18 Nov 2011 - 12:21 am

साहित्यः

फिलो शीट्स - बाजारात तयार मिळतात. २ पॅकेट
ऑलिव्ह ऑइल - १ वाटी
काजु - १ वाटी
आक्रोड - १ वाटी
बदाम - १ वाटी
पिस्ता - १ वाटी
दालचिनी पावडर - १ चमचा
वेलची पावडर - १ चमचा
साखर - २ वाटी
मध - १/२ वाटी
स्टार फुल - ३
लवंग - १०-१२
केक करायचे एक भांडे

कृती:

१. काजु, आक्रोड, बदाम व पिस्ता हे सगळे एकत्र करावे. त्यात ४ चमचे साखर, दालचिनी पावडर व वेलची पावडर टाकुन मिक्सर मधे एकदा फिरवुन घ्यावे. त्याची खुप बारीक पावडर करु नये.
२. केक करायच्या भांड्यामधे खाली ऑलिव्ह ऑइल लावावे.
३. त्यात १ शीट टाकावी. भांड्याच्या आकाराप्रमाणे बाकीची शीट कापुन घ्यावी. त्याला वरतुन परत ऑलिव्ह ऑइल लावावे.
४. अशा प्रकारे ४ शीट्स लावुन घ्याव्यात.
५. त्यावर अर्धी सुक्यामेव्याची भरड टाकुन सपाट करुन घ्यावे.
६. त्यावर परत ४ शीट्सचे थर लावावा. प्रत्येक शीट्स नंतर ऑलिव्ह ऑइल लावावे.
७. त्यावर उरलेली भरड टाकुन वरती परत ४ शीट्सचा थर लावावा व ऑलिव्ह ऑइल लावावे.
८. सगळ्यात शेवटा ह्याचे सुरीने चोकोनी तुकडे करावेत. प्रत्येक चोकोनात मधे १-१ लवंग लावावी.
९. आता हे भांडे ओव्हन मधे १५० degree celcius वर १ तास ठेवावे. त्याचा वरतुन ब्राउन रंग झाला पाहिजे.
१०. ह्या १ तासात पाक करावा. त्यासाठी एका भांड्यामधे २ वाटी पाणी, साखर व मध एकत्र करावे. त्याचा १ तारी पाक करुन घ्यावा. हा पाक होत असतानाच त्यात स्टार फुल टाकावे.
११. १ तासानी ओव्हन मधुन बकलावा बाहेर काढावा. त्यावर पाक ओतावा व झाकुन ठेवावे.
१२. २ तासात सर्व पाक त्यामधे मुरेल. बकलावा खायला तयार आहे.

baklava1

baklava2

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

18 Nov 2011 - 12:26 am | सोत्रि

मस्त!

- (बकलावा खात खात लावालाव्या करणारा) सोकाजी

इंटरनेटस्नेही's picture

18 Nov 2011 - 12:45 am | इंटरनेटस्नेही

अ प्र ति म! क्या बात है! दोन्ही फोटो पण एकदम नेत्रसुखद.

चाखता येत नाही म्हणुन सध्या फक्त लुक्स ला मार्क देतोय.
१०/१०.
घरपोच पार्सल दिल्यास चवीचे मार्क पण अपडेटल्या जातील.
_ /१०
;)

मला फार आवडतो बकलावा!
पण त्या फायलो शिट्स फार नाजूकपणे हताळाव्या लागतात बाई!
तू धन्य आहेस!

मोहनराव's picture

18 Nov 2011 - 1:20 am | मोहनराव

गोड पाककृती...
शोधुन बघतो कुठे मिळतय ते!! :)

फोटू मस्त!
हा प्रकार एकदा खायला सुरुवात केली की थांबता येत नाही म्हणून आणणे बंद केले आहे.;)

सुहास झेले's picture

18 Nov 2011 - 6:12 am | सुहास झेले

ज ह ब ह र ह द ह स्त ह !!

सन्जोप राव's picture

18 Nov 2011 - 6:35 am | सन्जोप राव

बकलावा एकदा खाल्ला आणि खाणे थांबेचना. डेंजरस पदार्थ!
पाककृती व फोटो आवडले. पण तेवढा तो 'शीट' शब्द बदला बुवा! ताव, पापुद्रे काहीही चालेल.केक करायच्या भांड्यामधे खाली ऑलिव्ह ऑइल लावावे. त्यात १ शीट टाकावी. एवढे वाचूनच काही जणांना ढवळून येईल. ;-)

विजुभाऊ's picture

18 Nov 2011 - 4:44 pm | विजुभाऊ

पण तेवढा तो 'शीट' शब्द बदला बुवा
शीट आणि शिट हे दोन शब्द उच्चारानुसार वेगवेगळे अर्थ असणारे आहेत

नगरीनिरंजन's picture

18 Nov 2011 - 9:00 am | नगरीनिरंजन

बकलाव्याचा रंग, सजावट वगैरे अत्युत्कृष्ट! चवही मस्तच असणार!
परिपूर्ण पाककॄती!
पैकीच्या पैकी गुण!

मदनबाण's picture

18 Nov 2011 - 9:24 am | मदनबाण

मस्त !

स्टार फुल - ३
हे इस्टार फुल म्हणजी दगड फुल काय ?
फोटु मस्तच ! :)

(चमचम प्रेमी) ;)

पिंगू's picture

18 Nov 2011 - 10:13 am | पिंगू

मस्तच आहे. तोंडाला पाणी सुटले. बाकी फिलो ताव इथे मिळतील की नाही याबद्द्ल शंका आहे..

- पिंगू

जाई.'s picture

18 Nov 2011 - 11:37 am | जाई.

मस्त

कच्चा पापड पक्का पापड's picture

18 Nov 2011 - 1:39 pm | कच्चा पापड पक्क...

भारी दिसतोय.....!!

दीप्स's picture

18 Nov 2011 - 1:56 pm | दीप्स

छान आला आहे फोटो चवही छानच असेल.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Nov 2011 - 2:15 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍याच दिसतय हे प्रकरण.

चला आता फिलो शीट्स शोधणे आले.

पराशेठ,
काय्काय शोधून ठेवलंत आजपर्यंत?
एक गोदाम नक्कीच भरलं असेल ;-)

सानिकास्वप्निल's picture

18 Nov 2011 - 2:35 pm | सानिकास्वप्निल

मस्तचं....
तोंड लाळवलय मृणाल :)

विशाखा राऊत's picture

18 Nov 2011 - 3:17 pm | विशाखा राऊत

एकदम मस्त लागते हे.

ऋषिकेश's picture

18 Nov 2011 - 3:25 pm | ऋषिकेश

या पदार्थात वापरलेल्या शीट्स कसल्या कसतात? घरी बनविता येतात का? भारतात मिळतात का?

शिंगाड्या's picture

18 Nov 2011 - 3:44 pm | शिंगाड्या

एक तर तुर्की डीश्..त्यामुळे आधी मला वाटले तो प्रत्यक्ष कृतीचा विषय चुकुन पाककृतीत पडला की काय :-)
छान आला आहे फोटो!!

प्यारे१'s picture

18 Nov 2011 - 4:02 pm | प्यारे१

मस्तच...........

प रा, पदार्थ शोधण्यापेक्षा तुर्की रमणी शोधणं जास्त बरं पडेल ना रे?

परिकथेतील राजकुमार's picture

18 Nov 2011 - 4:13 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्ही तिला पोसणार असाल तर आमची काही हरकत नाही.
रात्रीच्या निवार्‍याची सोय करू आम्ही तिच्या.

रात्रीच्या निवार्‍याची सोय करू आम्ही तिच्या.

होय तर, कित्ती कित्ती उदार मन हे तुझं!

सोत्रि's picture

19 Nov 2011 - 12:00 am | सोत्रि

बेक्कार हसतोय रे....

च्यायला आयजीच्या जीवावर बायजी उदार म्हणायची :lol: :) :lol:

- (अतीउदार अंत:करणाचा) सोकाजी

प्यारे१'s picture

19 Nov 2011 - 11:18 am | प्यारे१

उत्तराला विलंब झाल्याबद्दल माफी....!

दिवसभर आमच्याबरोबर 'कार्य-क्रम' झाल्यावर बिचारीला तुमच्याकडं निवार्‍याला पाठवायला आमची ना नाही! ;)
तुमच्याकडं शांत झोपेल ती.... घ्यायचे दोन दोन पेग आणि झोपायचे. कसे???? ;)

:D सगळ्यांचे धन्यवाद. :)
फिलो शीट्स आपल्याकडे मिळतात की नाही माहित नाही. बहुतेक सुपर मार्केट्स मधे मिळत असतील.
पण ह्या करण्यासाठी आधी मैदा १ कप, लिंबुचा रस ३ चमचे, ४ चमचे ऑलिव्ह ऑइल व पाणी टाकुन कणिक मळुन घ्यावी. ती १ तास झाकुन ठेवावी. १ तासानी त्याचे पातळ पोळी लाटुन घ्यावी. पोळी पारदर्शक होइ पर्यंत लाटावी. ह्यालाच फिलो शीट्स म्हणतात. ह्या फिलो शीट्स नेहमी ओल्या कपड्यानी झाकुन ठेवाव्यात.

ऋषिकेश's picture

22 Nov 2011 - 11:55 am | ऋषिकेश

धन्यवाद! धागा वाचनखुणेत साठवला आहे

स्मिता.'s picture

18 Nov 2011 - 4:55 pm | स्मिता.

हा पदार्थ आधी कधी खाल्ला नाहिये. पण फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. हिवाळ्यात करून बघायला हरकत नाही. मस्तच!

निवेदिता-ताई's picture

19 Nov 2011 - 8:50 am | निवेदिता-ताई

असेच म्हणते...पहिल्यांदाच पहाते आहे

५० फक्त's picture

18 Nov 2011 - 5:54 pm | ५० फक्त

येताना करुन घेउन या, तो पर्यंत फक्त मस्त दिस्तंय एवढंच म्हणेन.

चतुरंग's picture

19 Nov 2011 - 1:11 am | चतुरंग

बकलावा!! स्ल॑~~~~~~र्ल्प!!
मी शक्यतोवर ह्या पदार्थाच्या वाटेला जात नाही. जोवर मी पहिला बकलावा हातात घेत नाही तोवरच पण नंतर मला ताटलीतले सगळे बकलावा संपेपर्यंत थांबता येत नाही! ;)

(बकलावाप्रेमी) रंगलावा

थोडासा गंडलाय का? ऑलिव्ह ऑईल वापरतात की पातळ बटर? बटरमुळे पापूद्रे थोडेसे एकत्र राहतात. इथे फारच सुट्टे आणि कोरडे वाटत आहेत (कि तुम्ही क्यालरीजचा विचार करून सबस्टिट्युट केलय? ;-) )

प्रभाकर पेठकर's picture

19 Nov 2011 - 12:35 pm | प्रभाकर पेठकर

अत्त्त्तिशय गोड आणि उष्मांकाने परिपुर्ण पदार्थ.

मधुमेहामुळे मी तो पाहतो अनेकदा पण वर्षाकाठी एखाद तुकडा चाखतो. हाय रे दैवा!

इथे गल्फात त्यात ऑलिव्ह तेला ऐवजी शुद्ध तुपाचा वापर करतात त्यामुळे तो अजूनच प्राणघातक बनतो.

किशोरअहिरे's picture

22 Nov 2011 - 11:01 am | किशोरअहिरे

Mrunalini .. एकदम छान रेसीपी दिल्याबद्दल आभारी आहे.
यु.एस ला असताना पहिल्यांदा बकलावा खाल्ला होता.. खुपच अल्टिमेट टेस्ट होती..
मला गोड सहसा आवडत नाही पण बकलावा मात्र खुप आवडला..

देशी व्हर्जन मधे ऑलिव्ह ऑईल च्या जागी तुप वापरले तर चालेल का?

हो... तुप पण चालेल. पण ह्यात आपण प्रत्येक लेयरला तुप लावतो. त्यामुळे भरपुर तुप लावले जाणार. जर तुम्हाला तुपाचा वास आवडत असेल, तर नक्कीच लावु शकता. मला एवढा तुपाचा वास आवडत नाही, त्यामुळे मी ऑलिव्ह ऑइल वापरले.