नीर-डोसा

Primary tabs

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
16 Aug 2011 - 10:09 pm

साहित्यः

अडीच वाटया तादुंळ ४-५ तास भिजवून ठेवावे
१ वाटी खवलेले ओले खोबरे
चवीपुरतं मीठ
तेल
.

पाकृ:

भिजवलेले तादुंळ व ओले खोबरे मिक्सरवर बारीक वाटून घेणे.
त्यात चवीपुरतं मीठ व थोडे थोडे पाणी घालून मिश्रण पातळ बनवणे. (नीर डोश्याचे मिश्रण पाण्यासारखे पातळ हवे - Pouring Consistency)

.

नॉन-स्टीक तवा तापवून, थोडे तेल पसरवून डावाने मिश्रण तव्यावर ओतावे, कडेने थोडे तेल सोडावे.

.

डोसा तयार झाला की अलगद उलटावा व नारळाच्या चटणीसोबत, चिकनसोबत सर्व्ह करा.
मी काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत सर्व्ह केला...छानच लागला :)

.

प्रतिक्रिया

सुनील's picture

16 Aug 2011 - 10:17 pm | सुनील

पाकृ छान. ह्यालाच कोकणात घावन म्हणतात.

पुण्यात डेक्कनला असलेल्या आणि आता बंद पडलेल्या, डोसा डायनर मध्ये खाल्ला होता. पनीरसोबत. :)

नीरडोसा, घावन, पाणपोळे काही नाव द्या.... उपोषण चालु असताना हे धागे म्हणजे छळवाद आहे. :)

अरे वा असे आम्ही पाणी घालुन घावन करतो. सुंदर प्रकार.

बाकी. डिशमधली सजावट आणि तयार केलेली चांदणी बेस्टच आणि काय काम्बिनेशन आहे, काळ्या वाटाण्याची उसळ आणि पांढरा स्वच्छ डोसा, अगदि धुतल्या तांदळासारखा, ऐ कोण आहे अण्णांसारखा म्हणतोय ?

पण एक रुखरुख लागुन राहिलिये ओ सानिकातै, तव्यावरुन डिशमध्ये डोसा आणणार चमचा नाय दिसला तुमचा फोटुत, अन्याव ओ अन्याव, चमच्यांचं असंच होतं हल्ली, फोटोबि काडत नाय कुणी ?

सानिकास्वप्निल's picture

18 Aug 2011 - 1:39 am | सानिकास्वप्निल

चमच्यावर भारी जीव जडला तुमच्या ;)
पुढच्या भारतभेटीत भेट म्हणून तुमच्यासाठी नक्की चमचा आणेन हर्षदभाऊ :)

५० फक्त's picture

21 Aug 2011 - 8:49 am | ५० फक्त

'' एक से मेरा क्या होगा ?'

बाकी तुमच्या या चमच्यानं त्या चमच्याची ठेवलेलि आठवण तुम्हाला लक्षात राहिली त्याबद्दल धन्यवाद.

आईला मस्तच गं..... माझा आणि निशांतचा एकदम आवडता प्रकार आहे. मी एकदा try केला होता.. पण तो आपल्या साध्या डोस्या सारखा कडक झाला. तु केलेला सही दिसतोय. मऊ, लुसलुशीत.. जबरदस्त. :)

रेवती's picture

16 Aug 2011 - 11:55 pm | रेवती

नेहमीप्रमाणे छान फोटो व पाकृ!
असं ऐकलय की तांदूळ नारळाच्या पाण्यात भिजवल्यास आणखी चांगला होतो.

५० फक्त's picture

17 Aug 2011 - 12:08 am | ५० फक्त

''असं ऐकलय की तांदूळ नारळाच्या पाण्यात भिजवल्यास आणखी चांगला होतो.'' कोण कुणाला सांगत होतं ओ रेवतीआजै, सुधांशु स्पा ला का ?

सुधांशु, स्पा.....झालच तर परा असे अनेक आहेत.
तुमचं लग्न झालेलं दिस्तय, नाहीतर तुम्हालाही पदार्थ शिकवले असते.

बॅचलर लोकं लग्न होण्यासाठी शिकतात, तर लग्न झालेले झालेले(केलेले नाही) लग्न टिकवण्यासाठी,

कसं हाय आजै गाडी शोरुम मध्ये धुवुन पुसुन ठेवतात विकायची असते म्हणुन पण घरी आणल्यावर सगळी कौतुकं करावी लागतात चालवायची असते म्हणुन तसंच हे पण,

लग्नानंतर किती वर्षे खिचडी(तांदुळ +मुग दाळ - अननस नाही))/मसाल्याचा चहा/ कांद्याची भजी/मॅगी/ सॅंडविच व इतर तत्सम बॅचलर पदार्थ करुन दाखवुन 'स्वयंपाक' केल्याचा आव आणणार कधीतरी असलं काहीतरी करुन दोनचार एक्स्ट्रा भांडी, ओटा, गॅस खराब करुन ठेवला की मग पुढचे सहा महिने आमच्या पाककलेबद्दल शंका घेतल्या जात नाहीत. व्यवस्थापनाचं एक मुलभुत तत्व आहे - if you can't convince then better confuse'.

जाई.'s picture

17 Aug 2011 - 12:08 am | जाई.

पाककृती व सादरीकरण दोन्हीही छान

चिंतामणी's picture

17 Aug 2011 - 1:00 am | चिंतामणी

तुम्हारा चुक्याच. (हे वाईट लागेल असे म्हणणे नाही. पण.......)

फिश करी बरोबर कधी खाउन बघीतले आहे का?

अत्यंत जिवघेणे Combination आहे. मग ती करी रेड करी असो अथवा ग्रीन. (फीश करी सोबत तंदुर रोटी खाण्या-यांची किव करतो.)

हे Combination कुठे मिळते हे जाणण्यासाठी संपर्क साधा.

(मत्स्यप्रेमी) चिंतामणी.

१३/१४/१५ जुलाई ला बंगलोर ला होतो तिथे " कांडला" मध्ये (रिचमंड सर्कल) प्र्वान गस्सी सोबत अगोदर साधा भात किंवा जीरा भात घ्यायच्या विचारात होतो पण म्हटला कि तिथल्या कोणाला विचारू काय कॉम्बिनेशन असते, तो म्हणाला कि "नीर डोसा आणि प्र्वान गस्सी" मग काय ३ प्लेट नीर डोसा आणि कोलंबी रस्सा मजबूत खाल्ले. (३ प्लेट म्हणजे १५ पातळ नीर डोसे).

इथे नीर डोसा ची पाकृ बघून आठवण आली. ह्यांनीपण काय मस्त बनवलेत. पण आज चतुर्थी आहे हो.

प्रचेतस's picture

17 Aug 2011 - 9:23 am | प्रचेतस

जबरदस्त पाककृती.

कच्चा पापड पक्का पापड's picture

17 Aug 2011 - 10:59 am | कच्चा पापड पक्क...

पुण्यात शिवाजीनगर "बाम्बू हाऊस" मधे खाल्ला होता. सेम असाच दिसत होता.

कच्ची कैरी's picture

17 Aug 2011 - 11:49 am | कच्ची कैरी

मस्त ,झकाआआआआआआआआस!!!!!!!!!!!!!!!!

मस्त!

अप्पम म्हणजे हेच का?

निवेदिता-ताई's picture

17 Aug 2011 - 1:05 pm | निवेदिता-ताई

नेहमीप्रमाणे छान फोटो व पाकृ!

निवेदिता-ताई's picture

17 Aug 2011 - 1:06 pm | निवेदिता-ताई

नेहमीप्रमाणे छान फोटो व पाकृ!

हा डोसा जास्त भाजायचा नाही काय ग ?

विशाखा राऊत's picture

17 Aug 2011 - 1:45 pm | विशाखा राऊत

सहीच दिसत आहे .. मी ही रेसेपी शोधत होते

मालोजीराव's picture

17 Aug 2011 - 6:08 pm | मालोजीराव

अहाहा ! चिकनसोबत लय झाक लागतंय राव हे

- मालोजीराव

पल्लवी's picture

17 Aug 2011 - 8:00 pm | पल्लवी

आई आमरसासोबत करते हे घावन.
अहहा ! सुख !!
फटु अ‍ॅज द युज्वल्ज्ज्ज !! :)

आशिष सुर्वे's picture

17 Aug 2011 - 9:42 pm | आशिष सुर्वे

इथं बंगलूरात नीर डोसा अगदी 'नीरे' परमाने उपलब्ध अस्तो बर्र का..
एकदा माझ्या डोल्यासमोर्र येका डोशे वाल्याने 'हिराच्या' झाडूने आधी तो भलामोठा तवा साफ (??) करून घेतला अन् मग त्यावर नीर डोशाचे पानी अगदी लादीवर फिनाईल टाकतात तसे टाकले.. तेव्हापासून नीर डोसा खाताना उगाचच नाकात फिनाईचा वास आणि डोल्यांत झाडूचा फर्राटा दाटून येतो बगा!

असो.. सनिकातै, आपला नीर डोसा पाहून डोले तॄप्त झाले!
अन् काल्या वाटाण्याची भाजी म्हणजे आमच्यासारख्यांसाठी 'मटन'च जनू!

तर्री's picture

18 Aug 2011 - 1:58 pm | तर्री

वरळी ला फिशलॅड मध्ये ( फिश करी सोबत ) हा जीवघेणा प्रकार मिळ्तो.
हे हॉटेल मत्स्य प्रेमींचे तीर्थक्षेत्र आहे.

फोटो व पाक्रु अती ऊत्तम.

राही's picture

19 Aug 2011 - 12:04 am | राही

माझ्या अल्प माहितीप्रमाणे नीरदोश्याचे पीठ करताना थोडासा ओला नारळ खवणून तांदळांबरोबर वाटून घालतात अथवा थोडा नारळाचा जाड रस (दूध) काढून घालतात. घावन हे फक्त तांदळाचे असतात. अर्थात घावनाला नीरदोसा आणि नीरदोश्याला घावन म्हटले तरी काही फरक पडत नाही. नीरदोश्याचे पीठ इतके पातळ असायला हवे की ते तव्यावर पडल्यावर तवा हलकेच हलवून ते सर्वत्र गोल पसरता आले पाहिजे. हे थोडे कौशल्याचेच काम असावे. कूर्गी आणि मलयाली लोकांकडचे नीरदोसे बनताना आणि नंतर खाऊन बघितले आहेत. स्वच्छ, शुभ्र,अकलंक,मऊसूत. आणि बराच वेळ ते तसेच मऊ रहातात हे विशेष.

डावखुरा's picture

19 Aug 2011 - 10:09 am | डावखुरा

१कच नंबर.....

[कोणी दावणगिरि देईल का ईथे?]

सानिकास्वप्निल's picture

19 Aug 2011 - 1:45 pm | सानिकास्वप्निल

सगळ्यांना धन्यवाद :)

इंटरनेटस्नेही's picture

21 Aug 2011 - 11:22 am | इंटरनेटस्नेही

मस्त पाकृ, सानिका ताई!

सविता००१'s picture

21 Aug 2011 - 7:06 pm | सविता००१

वाचल्या वाचल्या लगेच तांदूळ भिजत घातले आणि करूनहि पाहिले. अफलातून झाले. अनेकानेक धन्यवाद.

स्पंदना's picture

24 Aug 2011 - 5:37 am | स्पंदना

फार छान दिसताहेत. मला हवी होती ही रेसिपी , मझ्या शेजारच्या आंटी बनवायच्या मुंबईत असताना, पण तेंव्हा आम्हाला त्याच मुबलक असण शिकायची गरज जाण्वुन नाही देउ शकल.

आता बनवेन, खरच मटण अन चिकन खाव तर या डोश्यांबरोबरच!!

प्रभाकर पेठकर's picture

31 Aug 2011 - 7:53 pm | प्रभाकर पेठकर

खास पाककृती आहे. मागे एकदा घरीच खाल्ला होता. मस्तच झाला होता. मीच केला होता. (वरील अनेक प्रतिसाद वाचता आपण आधी कुठे नीर डोसा खाल्ला होता हे सांगणे अपरिहार्य आहेसे वाटले म्हणून सांगितले.)

नीर डोसा मला तर कुठल्याही सामिष पदार्थाबरोबर आवडतो. तसाच तो काळ्या वाटाण्याच्या उसळी बरोबरही झकास लागतो.

भलती भोळे's picture

3 Nov 2011 - 4:05 pm | भलती भोळे

पूर्वी 'किमया नामे हॉटेल मध्ये खाल्ला होता हा, फार सुरेख दिसतोय (आणि सोपा आहे) ;) करून बघणार .

दीपा माने's picture

5 Sep 2013 - 3:20 am | दीपा माने

कधी केला नाही पण करण्याचा विचार आहे.