विश्व चॅम्पियन नेमबाज तेजस्विनी सावंतचे अभिनंदन

संजयशिवाजीरावगडगे's picture
संजयशिवाजीरावगडगे in काथ्याकूट
8 Aug 2010 - 2:27 pm
गाभा: 

विश्व चॅम्पियन नेमबाज तेजस्विनी सावंतचे अभिनंदन !!!!@@@!!!!
जर्मनीतील म्युनिक येथे सुरु असलेल्या विश्व चॅम्पियनशीप नेमबाजी स्पर्धेत भारताच्या तेजस्विनी सावंतने ५० मीटर रायफल प्रकारात ५९७ गुण मिळवले. सुवर्णपदक पटकावित जागतिक विक्रम नोंदविला.
अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.

प्रतिक्रिया

विनायक पाचलग's picture

8 Aug 2010 - 2:34 pm | विनायक पाचलग

मनापासुन अभिनंदन ..
जाता जाता ..
ती कोल्हापुरची आहे त्यामुळे जास्तच आनंद झाला आहे ..
(कोल्हापुरकर )विनायक

भारी समर्थ's picture

8 Aug 2010 - 3:23 pm | भारी समर्थ

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामधे सुवर्णपदक आणल्याबद्दल आनंद द्विगुणीत झाला.

तेजस्विनीचे त्रिवार अभिनंदन!!!

भारी समर्थ

पुष्करिणी's picture

8 Aug 2010 - 3:31 pm | पुष्करिणी

तेजस्विनीचे हार्दिक अभिनंदन

वारा's picture

8 Aug 2010 - 3:32 pm | वारा

SmileyCentral.com

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Aug 2010 - 5:19 pm | बिपिन कार्यकर्ते

अभिनंदन!!!

सागर's picture

8 Aug 2010 - 6:08 pm | सागर

नक्कीच अपार कौतुकास पात्र आहे तेजस्विनी.

तेजस्विनी ही भारताची कदाचित पहिली महिला नेमबाज असेन जिने कोणत्याही विश्वस्पर्धेत विश्वरेकॉर्ड करुन सुवर्णपदक मिळवले. ( खरे तर दोन्हींमधील ती पहिली महिला गोल्डमेडलिस्ट असावी ;) )

भारतीय's picture

8 Aug 2010 - 6:59 pm | भारतीय

तेजस्विनी कौतुकास पात्र आहेच.. पण तिच्या आधीही अशी कामगिरी करण्यार्‍या महीला नेमबाज आहेत.. आणि मला जी नावं आठवतात त्याही मराठीच महीला आहेत.. सुमा शिरुर व अंजली वेदपाठक..

अरे वा,

हे माहीत नव्हते मला.
अंजली वेदपाठक चे नाव ऐकले होते पण अशा प्रकारचे जागतिक सुवर्णपदक मिळवल्याचे ऐकिवात नव्हते.
माहितीत भर घातल्याबद्दल धन्यवाद भारतीय :)

sneharani's picture

9 Aug 2010 - 10:08 am | sneharani

तेजस्विनी ही पहिली भारतीय महिला आहे जिने जागतिक नेमबाजीत विश्वविजेतेपद मिळवलयं.

भारतीय's picture

9 Aug 2010 - 12:31 pm | भारतीय

नक्कीच! तेजस्विनी हि नेमबाजीच्या या प्रकारात (रायफल प्रोन) जागतिक विक्रमासहित विश्वविजेतेपद मिळविणारी पहीलीच भारतीय महीला आहे.. सुमा शिरूर व अंजली भागवत यांनी नेमबाजीच्या अन्य प्रकारात (१० मी. एअर रायफल)विश्वविक्रम नोंदवले आहेत..

अरे संजू आलास! तुझे मिपावर स्वागत आहे! तुला पाहुन सुखद धक्का बसला..

स्वाती२'s picture

8 Aug 2010 - 6:53 pm | स्वाती२

अभिनंदन आणि शुभेच्छा !

सुनील's picture

8 Aug 2010 - 6:54 pm | सुनील

अभिनंदन!

अप्पा जोगळेकर's picture

8 Aug 2010 - 7:09 pm | अप्पा जोगळेकर

तेजस्विनी सावंत यांचे अभिनंदन.

शानबा५१२'s picture

8 Aug 2010 - 7:12 pm | शानबा५१२

!!!!@@@!!!!

ह्हे काय दरक्षवतं(?)?

इन्द्र्राज पवार's picture

8 Aug 2010 - 8:51 pm | इन्द्र्राज पवार

तेजस्विनीचे हार्दिक अभिनंदन.
"सो-कुल" नामक टीव्ही कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी यानी तेजस्विनीची घेतलेली एक मुलाखात पाहायला मिळाली होती. देशविदेशातील विविध स्पर्धातून सुवर्णपदक/रौप्यपदक अशी दर्जेदार कामगिरी केलेल्या तेजस्विनीची बोलण्यातील नम्रता प्रकर्षाने जाणवत होती.

कोल्हापुरचाच "वीरधवल खाडे" हाही एक असाच गुणी जलतरणपटू आहे ज्याने "बिजिंग ऑलिम्पिक्स" मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

डॉ.प्रसाद दाढे's picture

8 Aug 2010 - 10:51 pm | डॉ.प्रसाद दाढे

तेजस्विनीचे मनापासून अभिनंदन! आपल्या देशात स्पोर्टस- शूटींग हा खेळ
फार म्हणजे फारच अवघड आहे.. त्यामुळे ती खरोखरंच सत्कार-पात्रच आहे.
भारतात शस्त्रांच्या बाबतीत इतके विचित्र नियम आणि अडचणी आहेत की सामान्य
माणसाच्या आवाक्यातली बाबच नाही ती. घरात पोलिस अथवा संरक्षण दलाशी संबधित पार्श्वभूमी
किंवा जबरदस्त पैसा ह्या दोन गोष्टी असतील तरच शूटिंग स्पोर्टसच्या नादी लाग असा सल्ला मला
अनेकांनी दिला होता. अर्थात त्याव्यतिरिक्त भरपूर मेहनत, एकाग्रता हे सगळं हवंच, पण..
भारतात शूटींग स्पोर्टसमध्ये खूप टॅलेंट आहे परंतु भारतीय असण्याचं दुर्दैव मोठं आहे..असो.
तेजस्विनी बरोबरच राही सरनौबतचही अभिनंदन केले पाहिजे; तिनेही म्युनिकमध्ये
नामांकन मिळविले आहे. राही पुण्याची असून केवळ सतरा वर्षांची आहे. मला तिचे शूटिंग
कौशल्य जवळून पाह्यची व ती वापरत असलेले पिस्तूल हाताळण्याची संधी एकदा मिळाली होती.

(हौशी) सेंटर फायर पिस्तूल (.३२) शूटर डॉ. प्रसाद दाढे

नीलकांत's picture

9 Aug 2010 - 8:52 am | नीलकांत

तेजस्विनी सावंत यांचे अभिनंदन.

- ( आनंदीत) नीलकांत

तेजस्विनीचे हार्दिक आणि मनःपूर्वक अभिनंदन आणि राष्ट्रकुल स्पर्धा आणि लंडन ऑलिंपिक्ससाठी भरपूर शुभाशिर्वाद आणि शभेच्छा!
'अटके'पारचा झेंडा आता फडकू दे आधी दिल्लीला आणि मग लंडनला.
जय हो!

sneharani's picture

9 Aug 2010 - 9:53 am | sneharani

तेजस्विनीचं हार्दिक अभिनंदन!
अन् पुढच्या वाटचालीस शुभेच्छा...!

अमोल केळकर's picture

9 Aug 2010 - 11:12 am | अमोल केळकर

अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !!

अमोल केळकर

तिला ऑलिंपिक मध्ये गोल्डमेडल मिळो हीच एक आता इच्छा आहे.
सर्वसाधारण कुटुंबातली एक मुलगी सुटिंग सारख्या महागड्या खेळात जगात अव्वल येणे हि एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
आता तरी बोलबच्चन सरकार ने तिला घर व आर्थिक मदत करावी व उरली सुरली लाज राखावी असे वाटते.

नितिन थत्ते's picture

9 Aug 2010 - 12:03 pm | नितिन थत्ते

अभिनंदन

राजेश घासकडवी's picture

9 Aug 2010 - 12:35 pm | राजेश घासकडवी

अभिनंदन

Dipankar's picture

9 Aug 2010 - 2:30 pm | Dipankar

अभिनंदन

अब् क's picture

9 Aug 2010 - 4:01 pm | अब् क

आमच्या कोल्हापुरची आहे ती :)