नानाजी देशमुख गेले.

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in काथ्याकूट
1 Mar 2010 - 1:27 pm
गाभा: 

ज्यांच्या समोर ऊभ राहील्यावर नजर आपोआप पायकडे जावी असा एक महर्षी नुकताच काळाच्या पडद्याआड गेला.

सारी सुखं आणी अमाप सत्ता हातात येण्याची संधी आयुष्यात मीळुनही व्रतस्थपणे तिकडे पाठ फिरवुन समाजाच्या सगळ्यात शेवटच्या घटकासाठी काम करणारा आणि कधीही त्याचं श्रेयही न मागणारा हा योगी.

त्यांच्या स्मृतीला अनेक प्रणाम.

प्रतिक्रिया

अनामिका's picture

1 Mar 2010 - 2:05 pm | अनामिका

नानाजी देशमुख यांच्यासारख्या निस्वार्थी व नि:स्पृह व्यक्ती यापुढे औषधाला शोधुनही सापडणार नाहीत.
या थोर तपस्वी समोर सदैव नतमस्तक!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

शैलेन्द्र's picture

1 Mar 2010 - 3:37 pm | शैलेन्द्र

"यापुढे औषधाला शोधुनही सापडणार नाहीत."

असं म्हणु नका... मानवी समुहाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवावाच लागेल आपल्याला.

नितिन थत्ते's picture

1 Mar 2010 - 3:13 pm | नितिन थत्ते

सहमत आहे.
माझी पण श्रद्धांजली.

नावाचं गुजरातीकरण (पक्षी: नानजी खिमजी) आवडलं नाही.

नितिन थत्ते

शैलेन्द्र's picture

1 Mar 2010 - 3:33 pm | शैलेन्द्र

धन्यवाद, सुधारणा केली आहे.

विसोबा खेचर's picture

1 Mar 2010 - 3:25 pm | विसोबा खेचर

विनम्र श्रद्धांजली..

तात्या.

अप्पा जोगळेकर's picture

1 Mar 2010 - 4:10 pm | अप्पा जोगळेकर

त्यांच्या बद्दल थोडे लिहिले तर बरे होईल. मला काहीच माहिती नाही.

जे.पी.मॉर्गन's picture

1 Mar 2010 - 4:35 pm | जे.पी.मॉर्गन

ला असलेला त्यांचा आश्रम बघायचं भाग्य लाभलं... पेपरमध्ये बातमी वाचतानादेखील डोळे पाणावले. हिमालयाच्या उत्तुंगतेचा माणूस.

श्रद्धांजली

जे पी

जे.पी.मॉर्गन's picture

1 Mar 2010 - 4:36 pm | जे.पी.मॉर्गन

ला असलेला त्यांचा आश्रम बघायचं भाग्य लाभलं... पेपरमध्ये बातमी वाचतानादेखील डोळे पाणावले. हिमालयाच्या उत्तुंगतेचा माणूस.

त्यांच्याबद्दल जास्त माहिती ह्या दुव्यावर मिळेल.
श्रद्धांजली

जे पी

विकास's picture

2 Mar 2010 - 8:54 pm | विकास

म.टा.च्या धावते जग मधे "गांधीवादी 'स्वयंसेवक'!" थोडक्यात पण योग्य माहीती दिली आहे. तसेच गुरूमुर्तीच्या या आठवणपर लेखात पण बरीच माहीती आहे.

सगळ्यांशी मिसळून वागणार्‍या नानाजींना रा.स्व. संघातील असूनही लोहीया पण दूर नव्हते आणि विनोबा पण. १९४८ साली संघावर नेहरूंनी बंदी घातलेली असताना, त्यांच्याच मंत्रीमंडळातील रफी अहंमद किडवई यांच्या घरातून त्यांनी भूमिगत काम चालू ठेवले होते. मात्र अशा अनेक गोष्टींपेक्षा खर्‍या अर्थाने लक्षात ठेवण्याजोग्या दोन गोष्टी आहेतः एक म्हणजे वयाच्या पासष्टीला आलो आहे तेंव्हा नवीन लोकांना राजकारणात स्थान मिळावे म्हणून मंत्रीपद मिळत असूनही निवृत्त झाले ते आणि नंतरची ३० वर्षे केलेले दिनदयाळ रिसर्च इन्स्टीट्यूटचे काम - ज्याचे एक फळ म्हणजे चित्रकूटचा पहीला टप्पा.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

Manish Mohile's picture

3 Mar 2010 - 5:38 pm | Manish Mohile

दत्तप्रसाद दाभोळकरान्चे "प्रकाशवाटा" नावाचे पुस्तक आहे. त्यात दोन प्रकरणे आहेत. पहिले "सातही रन्ग प्रकाशाला म्हणाले" जे नानाजी देशमुखान्च्या जयप्रभाग्राम गोन्डा जिल्हा ऊत्तरप्रदेश येथील सामजिक कार्याबद्दल आहे आणि दुसरे प्रकरण "केमूर पर्वताच्या दक्षिणेकडे" जे वनवासी सेवा आश्रमाच्या प्रेमभाई आणि रागिणीताई यान्च्या सामाजिक कार्याविषयी आहे.

नानाजीन्च्या कार्याची विश्लेष्णात्मक ओळख या पुस्तकामधून होईल.