चॉकलेट फज

स्वाती२'s picture
स्वाती२ in पाककृती
15 Jan 2010 - 9:33 pm

माझा लेक लहान होता तेव्हा आमच्याकडे हॉलिडेला हा फज सांता साठी ठेवायचो. सांता येणं बंद झालं, त्या बरोबर फज करणंही.
या आठवड्यात लेकाला शाळेच्या टीम बरोबर गावाला जावे लागले. एक दिवस शाळा बुडली. बुडलेला अभ्यास भरुन काढायला मैत्रीणीने मदत केली. तेव्हा काल तिच्यासाठी लेकाने फज केला. झटपट आणि चॉकोलिशस.

साहित्य
१ कॅन(१४ औस) स्विटन्ड कंडेन्स्ड मिल्क
२ कप सेमि स्वीट चॉकलेट चिप्स
१ कप आक्रोडाचे तुकडे (नसले तरी चालतील)
१ टी स्पून वॅनिला

कृती
८ इंच चौकोनी पॅनला फॉईल लाऊन घ्या. फॉईल जरा पॅन च्या बाहेर येइल इतपत मोठी ठेवली तर फज काढायला सोपे जाईल.
मायक्रोवेव मधे चालेल अशा काचेच्या भांड्यात दूध आणि चॉकलेट एकत्र करुन मायक्रोवेव मधे १५-२० सेकंदांच्या अवधीने १-२ मिनिटांसाठी गरम करा. हे करताना अधुन मधून ढवळा. ढवळून एकजीव मिश्रण तयार झाले की वॅनिला आणि वापरणार असाल तर आक्रोडाचे तुकडे घालून ढवळा.
पॅन मधे पसरवून पॅन २ तासासाठी फ्रीज मधे ठेवा. घट्ट झाला की बाहेर काढा. फॉइल पकडून पॅन मधून बाहेर काढा. फॉईल काढुन तुकडे कापा. एंजॉय!

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

16 Jan 2010 - 3:01 am | चतुरंग

दोन आठवड्यापूर्वीच एक मस्त फज चाखला त्याची आठवण जागी झाली! :)

(गोडघाशा)चतुरंग

स्वाती२'s picture

16 Jan 2010 - 4:45 am | स्वाती२

धन्यवाद!
६-७ वर्षांच्या लहान मुलांना चॉकलेट बरोबर खेळायला शिकवायच असेल तर हा फज एकदम परफेक्ट. फ्रीज मधून फज बाहेर काढल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरच ते 'मी केलं' ....बस्स!...

चतुरंग's picture

16 Jan 2010 - 4:54 am | चतुरंग

चांगली आयडिया दिलीत, आता लेकाबरोबर करुन बघतो म्हणजे 'त्याला करुन बघायचंय' या बहाण्याने पुन्हा खाता येईल! ;)

चतुरंग

मदनबाण's picture

16 Jan 2010 - 1:44 pm | मदनबाण

हा प्रकार अजुन तरी खाल्ला नाही...
मस्त झालेला दिसतोय...

(चॉकलेट प्रेमी)
मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

प्रकाश घाटपांडे's picture

16 Jan 2010 - 1:51 pm | प्रकाश घाटपांडे

नीस्ती डिश पघितली तरी खावीशी वाटते. बाकी या आयटमला चॉकलेटच भज म्हनल तर? चौकोनी भज्याला फज म्हंतात काय?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.