स्क्रँबल्ड फ्रेंच टोस्ट

प्रभो's picture
प्रभो in पाककृती
21 Oct 2009 - 11:28 pm

स्क्रँबल्ड एग्स (मसाला कमी असलेली / नसलेली अंडा भुर्जी) व फ्रेंच टोस्ट आपण नेहमी खातोच..... दिवाळीच्या आधीच्या रविवारी असच टवाळकी करत असता दोन्ही एकत्र करावे वाटले म्हणून हा उपद्व्याप.

लागणारे साहित्य :
तीन अंडी बलकासहीत फेटून (थोडं तिखट आणी मीठ घालून)
टोमॅटो सॉस
एक बारीक चिरलेला कांदा

चार ब्रेड स्लाईस
बाकीचं नेहमीचच - तेल, तिखट, मीठ

प्रथम एका फ्राय पॅन मधे तेलावर बारीक चिरलेला कांदा परतून घ्या.

वरून थोडं मीठ आणी तिखट टाकून एकत्र करून त्यात तीन चतुर्थांश फेटलेले अंडे टाकून स्क्रँबल करा. बनलेली भुर्जी गॅस वरून उतरवून बाजूला ठेवा.

ब्रेड स्लाईसच्या जाड कडा कापून घ्या. कडा कापल्यानंतरच्या कडा ओल्या करून घ्या. दोन स्लाईसमधे स्क्रँबल्ड एग्स चे सारण भरा व कडा दाबून जोडून घ्या.

उरलेल्या फेटलेल्या अंड्यात थोडे पाणी घालून परत फेटा. हे मिश्रण एका पसरट थाळीत घ्या. आता सारण भरलेले ब्रेड स्लाईस ह्या मिश्रणात दोन्ही बाजूने चांगले घोळवून घ्या. आता हे सर्व एका फ्राय पॅन मधे तेल घेऊन त्यात शॅलो फ्राय करून घ्या.

आता तयार झाले तयार झाले स्क्रँबल्ड एग्स फ्रेंच टोस्ट.
(टीपः फ्रेंच टोस्ट च्या एवजी बेसनपीठाचा उपयोग करून अंडा भुर्जी भरलेले ब्रेड पकोडे पण बनवता येतील.)

खरं तर मला हे स्क्रँबल्ड एग्स फ्रेंच टोस्टच खायचे होते. पण हा प्रकार करताना बनवलेले स्क्रँबल्ड एग्स फ्रेंच टोस्ट तळायला टाकल्यावर फुटले, म्हणून मी हे फ्रेंच टोस्टच स्क्रँबल केले. त्यात थोडे तिखट , मीठ भुरभुरवले.... आणी आता तयार झाले स्क्रँबल्ड फ्रेंच टोस्ट

हा प्रकार खाताना खुपच कुरकुरीत लागतो...कारण ह्यात तेलात शॅलो फ्राय झालेला ब्रेड आहे आणी स्क्रँबल्ड एग्स पण...

आमचं रहाटगाडगं बॅचलर (ब्रम्हचारी म्हणायचं का ... :? ) असल्याने स्क्रँबल्ड फ्रेंच टोस्ट बनवलं , फोटो काढेपर्यंत तोंडाला पट्टी बांधली, नंतर पट्टी काढली आणी फस्त केलं .... थोडक्यात सांगायचं तर सजावटीला आपल्याकडे वेळ नव्हता...

सर्व्ह करताना टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

बघताय काय...करा हाणायला चालू ... :)

प्रतिक्रिया

शेखर's picture

21 Oct 2009 - 11:36 pm | शेखर

पाकृ सोपी सुटसुटीत आणी चवदार.... कोथींबीर टाकली असती मजा वाढली असती....
शेखर

टारझन's picture

22 Oct 2009 - 12:49 am | टारझन

वा !!!
अंड्यांच्या पाकृज मला नेहमी आवडतात ,एकदम साध्या सोप्प्या आणि पटकण् होणार्‍या !! धन्यवार प्रभ्या !! लेका .. आता फक्कड "उकडलेले अंडे" ची पाकृ येऊन दे !!

- आंडेलिया
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

शेखर's picture

22 Oct 2009 - 1:28 am | शेखर

उकडलेले अंडे...

(खास तुझ्या आग्रहा खातर प्रभो च्या वतीने )

एक कोंबडी शोधा.. ती कोंबडीच आहे ते परत एकदा कन्फर्म करा...

मग ती अंडे देणार आहे की नाही ते चेक करा ( आता ते कसे करायचे ते विचारु नये ) ... मग कोंबडी अंडे देण्याची वाट बघा...

कोंबडीने अंडे दिले की आधी पाण्याने धुवुन घ्या...

मग एक पातेले पाणी घ्या... त्यात थोडे मीठ टाका.... व ते पातेले चालु असलेल्या गॅस वर ठेवा...

मग त्यात कोंबडीने दिलेले अंडे हळुच टाका..... १० मिनीट कळ काढा....

मग ते अंडे सोला आणी मस्त पैकी त्याचे २ भाग करा आणी एक डिश मधे घेऊन सजवा आणी ते खायला मला बोलव.

विजुभाऊ's picture

23 Oct 2009 - 9:50 am | विजुभाऊ

एक कोंबडी शोधा.. ती कोंबडीच आहे ते परत एकदा कन्फर्म करा...
दुरूनच कोंबडा की कोंबडी हे कन्फर्म करण्यासाठी एक हमखास मार्ग .
कोंबडा/कोंबडी दिसली की गाडीचा हॉर्न जोरात वाजवा.
एका दिशेनेच पळाला तर तो कोंबडा आहे हे समजा.
एकसुलट एक उलट असे टाके घातल्यासारखी पळाली तर ती कोंबडी आहे असे समजा

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

टारझन's picture

22 Oct 2009 - 12:53 am | टारझन

एक्सलंट :)

- (अंडी प्रेमी) टार्‍या अतिभयंकर
प्रभ्याच्या आग्रहास्तव दोन-दोन प्रतिक्रिया ;)

मस्तानी's picture

22 Oct 2009 - 2:16 am | मस्तानी

पाककृती छानच आहे ... पण खर सांगू ... जे के बेकरी चा ब्रेड पाहून घराची / ठाण्याची खूप आठवण आली :)

सुबक ठेंगणी's picture

23 Oct 2009 - 10:09 am | सुबक ठेंगणी

असंच आलं मनात! :)
आणि तिथल्या गरम गुबगुबीत लादीपावांचीही आठवण झालीच! ;)

अवलिया's picture

22 Oct 2009 - 11:17 am | अवलिया

वा ! वा ! छान ! छान!

जियो प्रभो बेटा जियो !!
तुला चांगली वीणकाम करणारी बायको मिळो !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अवलिया's picture

22 Oct 2009 - 11:17 am | अवलिया

वा ! वा ! छान ! छान!

जियो प्रभो बेटा जियो !!
तुला चांगली वीणकाम करणारी बायको मिळो !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2009 - 9:44 am | पिवळा डांबिस

वा ! वा ! छान ! छान!
काय घंटा छान ! छान!!
फालतू रेसेपी.....

जियो प्रभो बेटा,,,तुला चांगली वीणकाम करणारी बायको मिळो !
हा नाना खुळा आहे...
तुला चांगला सैपाक करणारी बायको मिळो....

स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व, मिभो!!!

प्रभो's picture

23 Oct 2009 - 1:10 pm | प्रभो

काका,
स्पष्टोक्तीबद्दल धन्यवाद.....कुणाला आवडेल कुणाला नाही...त्यासाठी क्षमेची जरज नाही.

आणी हो....मी प्रभो आहे मिभो नाही..
--प्रभो

----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

पिवळा डांबिस's picture

24 Oct 2009 - 12:15 am | पिवळा डांबिस

आणी हो....मी प्रभो आहे मिभो नाही..
मुरावि बद्द्ल क्षमस्व!
(तरीच रेसेपीत विरजण वापरलेलं नाहीये!!!)
:)

अवलिया's picture

22 Oct 2009 - 11:17 am | अवलिया

वा ! वा ! छान ! छान!

जियो प्रभो बेटा जियो !!
तुला चांगली वीणकाम करणारी बायको मिळो !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

गणपा's picture

22 Oct 2009 - 12:51 pm | गणपा

वा ! वा ! छान ! छान!
असाचा (बायको मिळेपर्यंत) प्रयोगशील रहा. मग तिच तुझ्यावर प्रयोग करेल. ;)

प्रभो's picture

22 Oct 2009 - 8:46 pm | प्रभो

सर्व पाकृ बघणार्‍यांचे व प्रतिसादवणार्‍यांचे आभार...
विषेश आभार टारू आणी नान्यास अर्पण

--प्रभो
(लिखाणाचे जबहरा विडंबण करी टारू...टारूस त्रास नका देऊ)