शशक'२०२२ - हाय काय, नाय काय

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
26 May 2022 - 7:51 am

"ए भावड्या, मी काय म्हनतो की एक होऊन जाऊ दे".
"नाय रे बाबा, पोरींना शब्द दिलाय. अजिबात फिरकणार नाय तिकडं."
"आरं, असा चान्स लवकर गावणार नाय. तिकडं माइंदळ गर्दी जमलीया. लई धमाल चाललीया."
"नको रं बाबा. तो नादच लई वाईट. पोरींची बारीक नजर असतीय. जरा त्यांना खबर लागली तर फाडून खातील."
"आरं, सगळा गुपचूप मामला हाय. ह्या कानाची त्या कानाला खबर लागत नाय तर त्यांना कसं कळंल?"
"च्या मायला, आसं म्हनतोस! पन लेका, एकदा तिकडं गेलं की बाहेर पडणं अवघड.

"आरं, त्यात काय यवडं राव? खरडायची एक शशक. मिसळपावला लॉगिन करायचं. साहित्य संपादकांना व्यनिने द्यायची पाठवून. हाय काय, नाय काय ."

प्रतिक्रिया

डाम्बिस बोका's picture

26 May 2022 - 9:01 am | डाम्बिस बोका

+१

चौथा कोनाडा's picture

26 May 2022 - 11:37 am | चौथा कोनाडा

+१

हा ... हा ...
मस्त...

विजुभाऊ's picture

26 May 2022 - 2:35 pm | विजुभाऊ

समजली नाही

सुरसंगम's picture

26 May 2022 - 8:53 pm | सुरसंगम

+१
विजुभावु तुमच्या पुस्तकांचा विषय आणि इथल्या कथा लेख इतर सगळे लोक समजुन घेतात मग सगळ्या शशक का नाही तुम्हाला समजत हो.
किती सरळ अर्थ आहे. खरं तर आज आलेल्या शशक पहिले यायला पहिजे होत्या.

"आरं, असा चान्स लवकर गावणार नाय. तिकडं माइंदळ गर्दी जमलीया. लई धमाल चाललीया." :- शशक रोज नसते वर्षा दिड वर्षातुन येते.
"नको रं बाबा. तो नादच लई वाईट. पोरींची बारीक नजर असतीय. जरा त्यांना खबर लागली तर फाडून खातील.":- जे सगळे मिपावेडे आहेत त्यंचा बायकांना विचारा काय म्हणतात ते. मुवि तर सवत आहे असं म्हंटले होते.

"आरं, सगळा गुपचूप मामला हाय. ह्या कानाची त्या कानाला खबर लागत नाय तर त्यांना कसं कळंल?" :- स्पर्धा असल्याने सगळ्या शशक संपादक मंडळ प्रासरित करतंय.

"च्या मायला, आसं म्हनतोस! पन लेका, एकदा तिकडं गेलं की बाहेर पडणं अवघड. :- एकदा मिपा पासुन दुर झालोय पुन्हा व्यसन लागलं तर

एव्हढं साधा सोपा अर्थ आहे. हाकानाका.

अजुन एक निरिश्क्षण की या स्पर्धेमध्ये डॉ सुबोध खरे यांनी एकाही शशकला प्रतिसाद दिलेला नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 May 2022 - 9:48 pm | अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे, श्रिगुरूजी, चंद्रसुर्यकुमार ह्या मोठमोठ्या संतांनी शशकच्या कुंभमेळ्यात डूबकी का मारली नाही हा प्रश्न मी खफवरही विचारला होता.

चौथा कोनाडा's picture

28 May 2022 - 1:17 pm | चौथा कोनाडा

सुरसंगम, सुरेख निरूपण !

आणि जे मिपाकर हिरीरीने जवळजवळ सतत हजेरी लावतात त्यांची शशक मधली निष्क्रियतेचे निरिक्षण जबरदस्त आहे !

सुरिया's picture

28 May 2022 - 4:05 pm | सुरिया

बाकी इतर मिपाकर जातात का त्यांच्या घडामोडींवर? उगी कचुरे काड्यासारु सारख्यांच्या प्रतिसादावर त्यांचे दुकान चालते तिथे, मग ते इकडे आले नाही तर काय बिघडले?
चलू दे जसे चालले तसे. काही काही जण त्या त्या जागीच ठिक असतात.

भागो's picture

26 May 2022 - 9:12 pm | भागो

व्वा
हे सगळे असच्या अस
जुगाराचा अड्डा
तमाशाचा फड
दारूचा अड्डा
ह्यालाही लागू पडेल.
असे हे मल्टीपरपज शशक
म्हणून
+१

श्वेता२४'s picture

27 May 2022 - 10:29 am | श्वेता२४

+१

लोथार मथायस's picture

28 May 2022 - 4:27 am | लोथार मथायस

+१

नगरी's picture

30 May 2022 - 2:22 pm | नगरी

+1

नगरी's picture

30 May 2022 - 2:25 pm | नगरी

मी पण अशाच आशयाचे लिहिणार होतो