गावातल्या गजाली : आता तुम्ही ऐकू सुद्धा शकता

साहना's picture
साहना in काथ्याकूट
5 Mar 2021 - 1:45 am
गाभा: 

मिपा वरील गावांच्या गोष्टी आता तुम्ही तुनळी वर ऐकू सुद्धा शकाल. अर्थांत नेहमी प्रमाणे लेख हे मिपावरच सर्वप्रथम प्रकाशित केले जातील.

https://www.youtube.com/watch?v=0eNQl9k-h5Q

आवाज रिकॉर्डिंग वर माझे नियंत्रण नसल्याने काही फेरबदल केले जातील अशी अपेक्षा आहे आणि बहुतेक वेळा हे बदल चांगलेच असतात (शुद्धलेखनाच्या सुधारणा वगैरे).

गांवातल्या गजाली हे नाव मला जास्त आवडले कारण कोंकण असल्याने "गजाली" हा शब्द इथे चपखल बसतो. कुठल्या तरी वर्तमानपत्राचा मोटो "गजालीश्रेष्ठ" असा होता. कुणाला आठवतेय का ? (केसरी कि मार्मिक ? )

परिवारातील एका लहान मुलीला मी अनुभव सांगताना गांवातील चित्रपटांची गम्मत सांगत होते आणि सर्व मंडळी पोट धरून हसू लागली. मग माझ्या डोक्यांत विचार आला कि आपले जुने अनुभव इतरांसाठी मनोरंजक असू शकतात. त्यामुळे मिपावर मी लेखमाला सुरु केली.

इथल्या वाचक मंडळींचे निर्भेळ प्रेम मिळाल्याने लेखनाचा हुरूप वाढत गेला आहे. त्यामुळे पाईप लाईन मध्ये आणखीन अनेक लेख आहेत ते यथोचित प्रकाशित करत राहीन. प्रतिक्रिया मात्र नक्की द्या.

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

5 Mar 2021 - 4:35 am | चित्रगुप्त

सदर च्यानेल सबस्क्राईब करून ठेवले आहे. प्रस्तावना ऐकली. आता प्रत्यक्ष 'गजाली' ऐकण्यास उत्सुक आहे. विशेषतः तुमचे लेख आवडीने वाचत असल्याने ते श्राव्य स्वरूपात ऐकायला कसे वाटतात, याची पण उत्सुकता आहे. अनेक आभार.

कंजूस's picture

5 Mar 2021 - 6:34 am | कंजूस

Mp3 file चा उपयोग म्हणजे मोबाईल स्क्रीन बंद ठेवून ओडियो ऐकता येतो. युट्युब विडिओवर ओडियोसाठी एकच चित्र दाखवणार तर काय उपयोग.
मग बुकस्ट्रकचाही उपयोग नाही. तुमच्याच युट्युब चानेलवर हे ओडियो टाका. ओनलाईन युट्युब ते एमपी३ कन्वरटरने ओडियो डाउनलोड होतो. तो कधीही ऐकता येतो ओफलाइन आणि स्क्रीन बंद ठेवून.

बाकी सर्व मनोरंजक आहेच.

MP३ फाईल्स सुद्धा मिळवून कायप्पा वगैरेवर शेयर होतीलच त्या शिवाय मी गुगल पॉडकास्ट वर सुद्धा उपलब्ध करून देणार आहे.

कंजूस's picture

5 Mar 2021 - 8:20 am | कंजूस

उत्तम.

मुक्त विहारि's picture

5 Mar 2021 - 8:51 am | मुक्त विहारि

छान उपक्रम

सौंदाळा's picture

5 Mar 2021 - 9:01 am | सौंदाळा

अभिनंदन आणि शुभेच्छा
सबस्क्राईब केले आहे.
'गावाकडच्या गजाली' या नावाचे मधुमंगेश कर्णिक यांचे पण एक सुंदर पुस्तक आहे. 'सारे प्रवासी घडीचे' हे जयवंत दळवी यांचे असेच एक सुंदर पुस्तक.
तुमचे लेख याची आठवण करून देत आहेत यातच या लेखमालिकेचे यश आले.

> तुमचे लेख याची आठवण करून देत आहेत यातच या लेखमालिकेचे यश आले.

१००%

तुषार काळभोर's picture

5 Mar 2021 - 12:24 pm | तुषार काळभोर

शुभेच्छा!

चौथा कोनाडा's picture

5 Mar 2021 - 1:18 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्तच !
उत्सुकता वाढलीय !
हा. शुभेच्छा !

गोरगावलेकर's picture

5 Mar 2021 - 1:44 pm | गोरगावलेकर

चांगला उपक्रम. शुभेच्छा
गावाच्या गोष्टी वाचत आहेच. गावातल्या गजाली सुद्धा ऐकायला निश्चितच आवडतील.

चॅनेल सबस्क्राईन केले आहे. फक्त एक सूचना. सध्या कित्येक प्रसिद्ध पुस्तकांच्या ऑडिओ versions बाहेर उपलब्ध आहेत. त्यात वाचणाऱ्यांचे मराठी भाषेबद्दल चे अज्ञान पाहून चांगल्या पुस्तकांचा त्यांनी सत्यानाश केला असे वाटते. परवा मृत्युंजय चं वाचन ऐकलं तेव्हा हे जाणवलं आणि वाचणाऱ्याचा राग आला. तेव्हा वाक्यामधला pause, भाषेचे पुणेरीकरण (म्हणजे प्रमाणीकरण), ट च्या जागी त वापरले न जाणे वगैरे वर तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार.

आवाजावर माझा कंट्रोल नाही. पण आवाज देणारा प्रोफेशनल वाटतो.