जनातलं, मनातलं
आपण IDIOT झालो आहोत का?
नुकताच डॉक्टर्स डे साजरा झाला. डॉक्टर लोकांविषयी आपल्याकडे सर्व प्रकारच्या भावना आणि मतं आहेत. मी स्वतः डॉक्टर नाही. डॉक्टर होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक गुणवत्ता मी सिद्ध करू शकलो नाही पण माझे मित्र, मैत्रिणी आणि काही नातेवाईक डॉक्टर आहेत. मी जिथे काम करतो त्या टिम मध्ये मी सोडून सगळे डॉक्टर आहेत त्यामुळे ह्या क्षेत्रातल्या बातम्या, चर्चा रोज कानावर पडत असतात.
"प्रेतात्म्यांची जत्रा" एक सिने परीक्षण.
कार्निवाल ऑफ सोल्स हा एक विचित्र, अविस्मरणीय आणि विशेष म्हणजे अत्यंत कमी खर्चात बनवलेला भीती चित्रपट आहे. ही चर्चमध्ये ऑर्गन वाजवणाऱ्या एका स्त्रीची करूण कहाणी आहे. (चित्रपटात नायक नाहीये. ह्या नायिकेच्याच भोवती हा चित्रपट बेतला आहे.) तिला एका अमानवी चेहेऱ्याने पछाडले आहे. नायिका नुकतीच एका जीवघेण्या अपघातातून वाचली आहे. मरणारच होती पण वाचली.
साथ.
त्याला सकाळी लवकर उठायची सवय होती. पण आज सकाळी त्याला नेहमीसारखे प्रसन्न वाटत नव्हते. काय कारण असावे?
त्याचे नाव होते राजे. अनंत राजे. जिम मध्ये जाऊन कमावलेले शरीर. धडधाकट प्रकृती. कधी दवाखान्याची पायरी चढलेला नाही. सकाळची भरभक्कम न्याहारी. न्याहारी न खावीशी वाटावी असं काही नव्हतं. जगण्यासाठी खाणे का खाण्यासाठी जगणे असले तात्विक विचार यायचं वय नव्हते.
सात-आठ महिन्यांपासून स्टॉक मार्केटमध्ये महिना ८० हजार कमावलेत
इशारा:
१. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते.
२. सदर धागा लेखक गुंतवणूक तज्ज्ञ वा बाजार सल्लागार नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास सदर धागालेखक वा हे संस्थळ जबाबदार असणार नाहीत.
---
नमस्कार मिपाकर्स मित्र मैत्रिणींनो.
स्वप्नपूर्ती..!!
जेव्हा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागते, कित्येक वेळा तुम्ही ती मिळवण्याच्या अगदी समीप जाता पण ती प्राप्त करनं तुम्हाला शक्य होत नाही. अशी गोष्ट जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो, माऊंट एव्हरेस्ट सर केल्याच्या feeling पेक्षा तो कमी नसतो. सेम feeling व आनंद शनिवारी भारतीय खेळाडू, क्रिकेटरसिक व संपूर्ण भारतवर्षाने अनुभवला..!!
Boys Played well..!
हुश्श्श..शेवटी एकदाचा भारताने विश्वकप जिंकला! सामना कसा थरारक होता, कोण कसं खेळलं, कोणामुळे जिंकलो ही सगळी चर्चा बऱ्यापैकी करून झालीय, चालू सुद्धा आहे. थोड्या वेळासाठी असं वाटून सुद्धा गेलं की..झालं, खाल्ली माती ह्या संघाने परत एकदा. पण नंतर अगदी उलट झालं. क्रिकेट हा प्रचंड शक्यता असणारा खेळ आहे आणि अगदी क्षणाक्षणाला बदलत जाणारा खेळाचा balance ह्यात प्रचंड थरार निर्माण करतो.
चहा!
चहा, जिव्हाळ्याचा विषय. चहा तयार करणं बऱ्याच अंशी एक कला आहे. थोडंसं गणित व शास्त्रही आहे म्हणा त्यात. चवीत सातत्य राखायचे असेल, तर त्यातील प्रत्येक घटकाची भूमिका, प्रमाण, आणि वेळ समजावून घेणं गरजेचं. एखादी सुंदर संगीत रचना जर करायची असेल, तर आधी तुम्हाला संगीत वाद्यांशी, प्रत्येक सुराशी समरस व्हावं लागतं, अगदी तसंच.
कृष्णाच्या गोष्टी-५
कृष्ण बलरामांचे वृंदावनातील अनेक पराक्रम मथुराधीश कंसाच्या कानी गेले. प्रलंबवधानंतर कंस थोडा घाबरलेला होता. त्यातच मथुरेला भेट देणाऱ्या नारदाने कंसाला सांगितले रामकृष्ण दुसरे तिसरे कोणी नसून वसुदेव देवकीचेच सातवे पुत्र आणि आठवे पुत्र आहेत आणि यादवांच्या कुलगुरूंच्या म्हणजेच गर्ग ऋषींच्या भविष्याप्रमाणे वसुदेवाचा कृष्ण हा आठवा पुत्र तुझा काळ ठरणार आहे.
ट-२० विश्वचषक अंतिम सामना
कालच इग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना ६८ धावांनी जिंकून भारतीय संघाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. २०२२ मधे उपांत्य फेरीत इग्लंडविरुद्ध झालेल्या एकतर्फी पराभवाची भारताने परतफेड केली. आता शनिवारी भारताची गाठ दक्षिण आफ्रिका संघाशी पडेल.
पुस्तक परिचय: ययाति
----
ययाति
----
वि. स. खांडेकर -- ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले, मराठीतील पहिले साहित्यिक. ययाति -- वि. स. खांडेकरांनी १९५९ मधे लिहिलेली, पौराणिक संदर्भ आणि सामाजिक आशय असलेली कथा. या कादंबरीसाठी १९७४ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
----
भिंत तुझी माझी...
मी खऱ्याखुऱ्या भिंतिविषयी बोलतो आहे. आभासी नव्हे. भिंत हा एक भारी प्रकार आहे. भिंतीविषयी उगाच एक नकारात्मक भावना जोडलेली आहे. भिंतीवर कितीतरी सुंदर गोष्टी सुद्धा असतात. म्हणजे छानशा पेंटिंग्ज, देवाचा फोटो, एकत्र कुटुंबाचा फोटो, वगैरे. ह्या भिंतीविषयी सुचण्याचे कारण म्हणजे, आज बाजारात फिरत असताना रस्त्यावर पोस्टर विकणारी एक बाई दिसली. कधी काळी मला हे पोस्टर्स फार आवडायचे.
पलंग..नव्हे मृत्यूचा सापळा
माझं महाविद्यालयीन शिक्षण नुकतंच संपलं होतं आणि माझ्या एका इंग्लिश मित्रासोबत मी पॅरिस मध्ये रहायला आलो होतो.आम्ही दोघेही तरुण होतो आणि आमच्या सध्याच्या वास्तव्याच्या या रंगतदार शहरात मनमुराद जगत होतो. लुव्र म्युझियम च्या अगदी समोर असलेल्या "पॅले रोयाल" मध्ये आम्ही रहात होतो.
गोष्टी कृष्णाच्या १
मला आवडतात गोष्टी वाचायला.आणि त्याजर मुळापर्यंत नेणाऱ्या असतील तर मनोरंजक वाटतात.
संदर्भ -शोध कृष्णाचा,पूर्णत्वाचा प्रवासी लेखक प्रा. डॉ.राम बिवलकर यांच्या पुस्तकातील जेवढा उमगेल तो गोषवारा देते.
फोटो -कृष्णा @मथुरा
- ‹ previous
- 22 of 1007
- next ›