Skip to main content

दोन नको देऊ...

लेखक राजे १०७ यांनी शुक्रवार, 27/09/2019 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी ऐकलेली गोष्ट आहे ही. सदुबा नावाचा माणूस असतो. कलाबाई त्याची बायको. दोघं मस्त जगत असतात. एक दिवस सदुबा मित्राला जेवायला बोलवायचं ठरवतात. सदुबाचा मित्र गणपा खूप सज्जन माणूस होता. वेळप्रसंगी सदुबा आणि कलाबाईला कामा पडायचा. एक दिवस सदुबानं दोन मासे आणून कलाबाईकडं दिले व मस्त आमटी, भाकरी, भात बनवायला सांगितले. जेवायला गणपा येणार आहे हेही सांगितले. कलाबाईनं मस्त जेवण रांधलं. माशाचं कालवण म्हटल्यावर तिला मन आवरेना. थोडं वाढून घेतलं आणि भाकरी सोबत खाल्लं. अजून थोडे घेतलं, अजून थोडे.. असे करता करता सगळं कालवण संपवलं.

radio ga ga

लेखक क्षितिज जयकर यांनी शुक्रवार, 27/09/2019 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
RADIO GA GA……………… ह्या लेखाचं शीर्षक जरी इंग्लिश मधून असलं तरी ते मराठीत सुद्धा तितकंच सार्थ आहे. रेडिओ गा!!!!! गा!!!!. १९८४ साली QUEEN ह्या ब्रिटिश वाद्यवृंदाने हे गाणं रचनाबद्ध केलं , ते आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्याला रेडिओ वर हमखास ऐकायला मिळतं. मला हा लेख लिहिण्यासाठी जी स्फूर्ती मिळाली ती ह्याच गीतावरून. त्यामुळे सर्वप्रथम ह्या गाण्याबद्दल थोडीशी माहिती देतो. मगाशी लिहिल्याप्रमाणे QUEEN ह्या वाद्यवृंदाचा DRUMMER (त्याला ढोल वादक म्हणणं माझ्या जीवावर येतं) रॉजर टेलर याने ते १९८३ साली प्रथम ते रचनाबद्ध केलं , आणि मग १९८४ साली ते स्वरबद्ध करून सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलं.

जाणिवांची अंतरे

लेखक हजारो ख्वाईशे ऐसी यांनी शुक्रवार, 27/09/2019 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
त्वचेच्या रंगांवरून अगदीच वेगळे ओळखे जाऊ अशा देशात मी राहतेय सध्या. आपण कितीही म्हटलं तर मनाच्या एका कोपऱ्यात आपण खरंच सामावले जाऊ का इथल्या लोकांच्यात हा प्रश्न येतोच. मुलाची शाळा इंटरनॅशनल स्कूल. त्यात जगाच्या चारी कोपऱ्यातून आलेली पिल्लं. माझ्या पिल्लासारखीच. हसरी पण नवीन जागेला बावरलेली. पण ती एकमेकांचे छान दोस्त होतात. नवऱ्याच्या ॲाफिसमध्येही तसेच पूर्ण जगभरातून आलेले लोक. पण काम करता करता त्यांचीही गट्टी होते. राहता राहिले मी. सध्या ऑफिसला जात नसल्याने माझा तो लोकांच्यात मिसळायचा मार्ग नाही. मग उरतात मला रोज भेटणारे लोक.

सिकन मटन फिस

लेखक मृणमय यांनी शुक्रवार, 27/09/2019 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेज मध्ये असताना मला अनेक भाषा फाडायला मिळाल्या. कोकाट्याच्या फाडफाड इंग्लिश बरोबरच मी फाडफाड ( तोंडात रोसोगुल्ला ठेवून फॉडफॉड) बंगाली, असामीज आत्मसात कि भस्मसात केली माहित नाही. पण ह्या माझ्या गुणांमुळे मी नॉर्थ च्या खूप मैत्रिणी जमवल्या होत्या. त्यांचे राहणीमान आपल्यापेक्षा खूप वेगळे. त्या दिसायला पण इतक्या वेगळ्या कि नेपाळी किंवा तिबेटियन ,म्हणून सहज खपतील. बसके नाक आणि बारीक मिचमिचे डोळे. आता विचार करा ह्या डोळ्याच्या इवल्याश्या फटीतून डोळ्याचे हाव भाव कसे दिसतील? इमॅजिनेशन करून झाले असेल तर सांगते खूप छान दिसतात. अगदी जसे च्या तसे, पाहण्याची कला आपल्यात हवी.

पाहूणा पाऊस

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 27/09/2019 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
मी म्हणाले पावसाला तू येतोस कधी ब-याच दिवसात भेटला नाही तो म्हणाला मी तर येतच असतो नेहमीसारखा पण तूच माझ्याशी बोलत नाही मग मी त्याचे स्वागत करायचे ठरविले अगदी जवळ गेल्यासारखे भासविले पण त्याचे मनात काही वेगळेच असेल जवळ येवून त्याने सा-यांनाच कवेत घेतले
काव्यरस

आनंद

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 26/09/2019 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद ---------------------------------------------------------------------------------------------------- कपडे चढवताना तिने त्याला खुषीत डोळा मारला . “मजा आली ! ” तिच्या या वाक्यावर तो चमकला. एक धंदेवाली असं म्हणते ?... त्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून तीच पुढे म्हणाली , “प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा असं माझं तत्व आहे. जग दुःखाने भरलेलं आहे . आपण का दुःखी व्हायचं ? हे काम करताना पैसाही मिळतो . पण मी त्या कामाचाही आनंद लुटते –मनापासून !

बाइक, पाऊस आणि कोकण

लेखक रिकामटेकडा यांनी गुरुवार, 26/09/2019 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे ८.३० वाजून गेलेले सततच्या पावसामुळे आधीच शांत असलेले कोकण गुडूगुप होऊन झोपून जायच्या मार्गावर होतं. स्वरुपानंद स्वामींच्या पावसच्या आश्रमातून बाहेर पडून समोरच आईस्क्रीम खात उभे होतो. पाउस पडतच होता. दुकानदार काळजीपोटी म्हणाला आता नका जाऊ पुढे रत्नागिरीत. मधल्या रस्त्याला बिबट्याने दोघा तिघांना जखमी केलंय. मी फक्त हं म्हटल आणि आईसक्रिम खाऊन झाल्यावर बाईक ला स्टार्टर मारला. पहिला दिवस गणपती सुटीमध्ये कोकणात बाईकवर जाउया असा विचार मी आणि बायकोने केला होता.

India Deserves Better - २. शाळा , शाळेची अवास्तव फी आणि सरकारचा नसलेला अंकुश.

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 26/09/2019 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेंची फी आणि बस सेवा : खरे तर शासकिय शाळा या बद्दल या लेखा मध्ये मी बोलणार नाही, तो एक वेगळा मुद्दा आहे, आणि त्या बद्दल नंतर बोलणार आहेच. आजचा मुद्दा आहे , Charging of exorbitant fees in private schools is a major cause of concern in India. Steep hike in tuition fees along with additional costs such as fees for transport, extra-curricular activities and sports will add much burden on parents. Education Regulatory and Monitoring Commission सरकारणे आपल्या प्रायवेट शाळांना का लागु करु नये ?

क्लायमेट चेंज रियल आहे

लेखक पुणेरी कार्ट यांनी गुरुवार, 26/09/2019 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून व्हॅट्सऍप, फेसबुक आणि ट्विटरवर 'क्लायमेट चेंज इस रियल' च्या चर्चांना उधाण आले आहे.